भाग १३ ची प्रस्तावना
अपरिपूर्ण लोकांसाठी आपला जीव द्यायला येशू या पृथ्वीवर आला. त्याला जरी मारून टाकण्यात आलं, तरी त्याने या जगाला जिंकलं. यहोवा त्याच्या पुत्राला एकनिष्ठ होता आणि म्हणूनच त्याने त्याला पुन्हा जिवंत केलं. येशूने मृत्यूपर्यंत नम्रतेने लोकांची सेवा केली आणि त्यांच्या चुका माफ केल्या. पुनरुत्थानानंतर येशू त्याच्या शिष्यांसमोर प्रकट झाला. त्यांच्यावर सोपवलेलं महत्त्वाचं काम ते कसं करू शकतात हे त्याने त्यांना सांगितलं. आज आपल्यावरही तेच काम सोपवण्यात आलं आहे. तुम्हाला मुलं असतील तर त्यांना या कामाची कदर करायला शिकवा.