भाग १० ची प्रस्तावना
यहोवाला सर्व गोष्टींवर अधिकार आहे. तो महान राजा आहे. सुरुवातीपासून त्याचा सर्व गोष्टींवर अधिकार होता आणि पुढेही राहील. उदाहरणार्थ, यिर्मयाचा जीव घेण्यासाठी त्याला एका विहिरीत टाकून देण्यात आलं, तेव्हा यहोवाने त्याला वाचवलं. त्याने शद्रख, मेशख, अबेद्नगो यांना आगीच्या भट्टीतून आणि दानीएलला सिंहांपासून वाचवलं. तसंच, यहोवाने एस्तेरचं रक्षण केलं. यामुळे ती पूर्ण राष्ट्राला वाचवू शकली. यहोवा दुष्टतेला नेहमीसाठी राहू देणार नाही. भव्य पुतळ्याच्या आणि मोठ्या झाडाच्या भविष्यवाणीवरून आपल्याला खात्री मिळते, की देवाचं राज्य लवकरच सर्व वाईट गोष्टींना काढून टाकेल आणि या पृथ्वीवर राज्य करेल.