वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पृ. १२२-१२३
  • भाग ९ ची प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भाग ९ ची प्रस्तावना
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोयादाने धैर्य दाखवलं
    बायबलमधून शिकू या!
  • वाईट संगतीमुळे यहोआशने यहोवाला सोडले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • त्याने राजघराण्याच्या वारसदाराचं संरक्षण केलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • तिची मदत करायची इच्छा होती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पृ. १२२-१२३
एक इस्राएली मुलगी कुष्ठरोगी नामानच्या बायकोशी बोलताना

भाग ९ ची प्रस्तावना

या भागात आपण काही लहान मुलांबद्दल, संदेष्ट्यांबद्दल, आणि राजांबद्दल शिकणार आहोत. त्यांनी यहोवावर उल्लेखनीय विश्‍वास दाखवला. अराम देशात राहणाऱ्‍या एका लहान इस्राएली मुलीला विश्‍वास होता, की यहोवाचा संदेष्टा नामानला बरं करू शकतो. अलीशा संदेष्ट्याला यहोवावर पूर्ण भरवसा होता, की तो त्याला शत्रू राष्ट्राच्या सैन्यापासून वाचवेल. महायाजक यहोयादाने आपल्या जिवाची पर्वा न करता, लहान यहोआशला त्याची दुष्ट आजी अथल्या हिच्यापासून वाचवलं. अश्‍शूरी सैन्याने हिज्कीया राजाला धमकी दिली तेव्हा तो घाबरला नाही. कारण यहोवा यरुशलेमला अश्‍शूरी सैन्यापासून वाचवेल असा त्याचा भरवसा होता. योशीया राजाने देशात चाललेली मूर्तिपूजा बंद केली. तसंच, यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करून खरी उपासना करण्यासाठी लोकांचं मार्गदर्शन केलं.

आपण काय शिकणार आहोत?

  • आपण लहान असलो, तरी आपण यहोवाबद्दल लोकांना सांगू शकतो

  • आपण योग्य ते करतो, तेव्हा यहोवा आपल्याला साथ देण्याचं वचन देतो

  • आपण योनासारखं, यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करायला शिकलं पाहिजे. तसंच मनाप्रमाणे एखादी गोष्ट होत नाही, तेव्हा आपण तक्रार करू नये हेही आपण शिकलं पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा