वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ९२ पृ. २१४-पृ. २१५ परि. १
  • येशू मासे धरणाऱ्‍यांना भेटतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू मासे धरणाऱ्‍यांना भेटतो
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • गालील समुद्रापाशी
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • माणसे धरणारे अशी सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • त्यानं भीती व शंका यांवर मात केली
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ९२ पृ. २१४-पृ. २१५ परि. १
मासे विस्तवावर शिजत असताना येशू शिष्यांशी बोलत आहे

पाठ ९२

येशू मासे धरणाऱ्‍यांना भेटतो

येशू प्रेषितांना भेटल्याच्या काही काळानंतर, पेत्र गालील समुद्रात मासे धरण्यासाठी गेला. त्या वेळी थोमा, याकोब, योहान आणि इतर काही शिष्यसुद्धा पेत्रसोबत गेले. रात्रभर प्रयत्न करूनही त्यांना मासे मिळाले नाहीत.

मग दुसऱ्‍या दिवशी पहाटे त्यांना समुद्रकिनाऱ्‍यावर एक माणूस दिसला. त्याने मोठ्याने हाक मारून त्यांना विचारलं: ‘तुम्हाला मासे मिळाले का?’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं: “नाही!” मग त्या माणसाने म्हटलं: ‘बोटीच्या उजवीकडे जाळं टाका, म्हणजे तुम्हाला मासे मिळतील.’ जेव्हा त्यांनी तसं केलं, तेव्हा त्यांचं जाळं माशांनी भरून गेलं. इतकं, की त्यांना ते जाळं वर ओढताच आलं नाही. तेव्हा अचानक योहानला जाणवलं, की तो माणूस येशू आहे आणि तो म्हणाला: “हा तर प्रभू आहे!” मग लगेच पेत्रने समुद्रात उडी टाकली आणि तो किनाऱ्‍यापर्यंत पोहत आला. बाकीचे शिष्य बोटीतून किनाऱ्‍यापर्यंत आले.

किनाऱ्‍यावर पोचल्यावर त्यांनी पाहिलं, की निखाऱ्‍यांवर भाकरी आणि मासे ठेवलेले आहेत. खाण्यासाठी आणखी मासे हवे होते. त्यामुळे, येशूने त्यांना धरलेल्या माशांपैकी काही आणायला सांगितले. मग त्याने म्हटलं: ‘या, खाऊन घ्या.’

पेत्र पोहून किनाऱ्‍यापर्यंत पोचतो. बाकीचे शिष्य बोटीतून किनाऱ्‍यापर्यंत येतात.

त्यांचं खाऊन झाल्यावर येशूने पेत्रला विचारलं: ‘मासे धरण्याच्या कामापेक्षा तुझं माझ्यावर जास्त प्रेम आहे का?’ पेत्रने उत्तर दिलं: ‘हो प्रभू, आणि तुला तर ते माहीत आहे.’ येशू त्याला म्हणाला: ‘माझ्या कोकरांना खाऊ घाल.’ मग येशूने पुन्हा पेत्रला विचारलं: ‘पेत्र, तू माझ्यावर प्रेम करतोस का?’ पेत्रने उत्तर दिलं: ‘प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे तर तुला माहीत आहे.’ येशू म्हणाला: “माझ्या लहान मेढरांची काळजी घे.” नंतर येशूने तिसऱ्‍यांदाही त्याला तेच विचारलं. या वेळी पेत्र फार दुःखी झाला. तो म्हणाला: ‘प्रभू, तुला तर सर्वकाही माहीत आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे तू जाणतोस.’ येशूने त्याला म्हटलं: ‘माझ्या लहान मेढरांना खाऊ घाल.’ त्यानंतर येशूने पेत्रला म्हटलं: “माझ्यामागे चालत राहा.”

“[येशू] त्यांना म्हणाला: ‘माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करेन.’ हे ऐकताच त्यांनी आपली जाळी टाकून दिली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.” —मत्तय ४:१९, २०

प्रश्‍न: मासे धरणाऱ्‍यांसाठी येशूने कोणता चमत्कार केला? “तू माझ्यावर प्रेम करतोस का?” असा प्रश्‍न येशूने पेत्रला तीन वेळा का विचारला असावा?

योहान २१:१-१९, २५; प्रेषितांची कार्ये १:१-३

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा