वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ७७ पृ. १८२-पृ. १८३ परि. २
  • विहिरीवर आलेली स्त्री

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विहिरीवर आलेली स्त्री
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • एका शोमरोनी स्त्रीला शिकवणे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • एका शोमरोनी स्त्रीस शिक्षण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • स्त्री सोबत विहिरीपाशी
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • पुष्कळ शोमरोनी विश्‍वास धरतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ७७ पृ. १८२-पृ. १८३ परि. २
याकोबच्या विहिरीजवळ येशू शोमरोनी स्त्रीशी बोलताना

पाठ ७७

विहिरीवर आलेली स्त्री

वल्हांडण सणानंतर काही काळाने, येशू आणि त्याचे शिष्य गालील प्रदेशात जायला निघाले. ते शोमरोन प्रदेशातून जात असताना, सूखार शहराजवळ असलेल्या याकोबच्या विहिरीकडे पोचले. येशूचे शिष्य काहीतरी खायला आणण्यासाठी शहरात गेले. तोपर्यंत येशू तिथेच विहिरीजवळ आराम करण्यासाठी थांबला.

तेव्हा एक स्त्री त्या विहिरीवर पाणी भरायला आली. येशूने तिला म्हटलं: “मला प्यायला पाणी दे.” यावर तिने म्हटलं: ‘तुम्ही माझ्याशी का बोलत आहात? मी तर एक शोमरोनी स्त्री आहे आणि यहुदी लोक शोमरोनी लोकांशी बोलत नाहीत.’ येशू तिला म्हणाला: ‘जर तुला माहीत असतं की मी कोण आहे, तर तूच माझ्याकडे पाणी मागितलं असतं आणि मी तुला जीवन देणारं पाणी दिलं असतं.’ ती स्त्री म्हणाली: ‘तुम्ही काय बोलत आहात ते मला कळत नाही आणि तुमच्याकडे तर बादलीसुद्धा नाही.’ येशूने तिला उत्तर दिलं: ‘मी दिलेलं पाणी जो कोणी पिईल, त्याला पुन्हा कधीच तहान लागणार नाही.’ मग स्त्रीने म्हटलं: ‘मलासुद्धा ते पाणी द्या.’

त्यानंतर येशू तिला म्हणाला: ‘तुझ्या पतीला इथे विहिरीवर घेऊन ये.’ ती म्हणाली: ‘मला पती नाही.’ यावर येशूने तिला म्हटलं: ‘तू खरं बोललीस. तुझं पाच वेळा लग्न झालं आहे आणि आता ज्या माणसासोबत तू राहत आहेस, त्याच्याशी तुझं लग्न झालेलं नाही.’ स्त्रीने म्हटलं: ‘मला वाटतं तुम्ही एक संदेष्टे आहात. माझे लोक मानतात, की देवाची उपासना करण्यासाठी या डोंगरावर आलं पाहिजे. आणि यहुदी लोकांचं म्हणणं आहे, की उपासना करण्यासाठी आपण यरुशलेमला गेलं पाहिजे. पण, माझा विश्‍वास आहे की जेव्हा मसीहा येईल, तेव्हा उपासना कशी करायची हे तोच आम्हाला शिकवेल.’ यानंतर येशूने तिला अशी एक गोष्ट सांगितली, जी याआधी त्याने कोणालाही सांगितली नव्हती. तो तिला म्हणाला: ‘मीच मसीहा आहे.’

येशू शोमरोनी स्त्रीशी बोलताना

ती स्त्री घाईघाईने आपल्या शहराकडे गेली आणि तिने शोमरोनी लोकांना म्हटलं: ‘मला वाटतं की मला मसीहा सापडला आहे. त्याला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत आहे. चला तुम्हीच येऊन पाहा!’ त्यानंतर ते लोक तिच्या मागोमाग विहिरीजवळ गेले. येशूने त्यांना जे शिकवलं, ते त्यांनी लक्ष देऊन ऐकलं.

मग शोमरोनी लोकांनी येशूला आपल्या शहरात राहण्यासाठी बोलवलं. येशूने दोन दिवस तिथल्या लोकांना शिकवलं आणि बऱ्‍याच लोकांनी त्याच्यावर विश्‍वास दाखवला. त्या लोकांनी शोमरोनी स्त्रीला म्हटलं: ‘या मनुष्याचं ऐकल्यानंतर आम्हाला खात्री पटली आहे, की हाच जगाचं तारण करेल.’

“‘ये!’ आणि जो तहानलेला आहे त्याने यावे; आणि ज्या कोणाला जीवनाचे पाणी हवे आहे, त्याने ते मोफत घ्यावे.”—प्रकटीकरण २२:१७

प्रश्‍न: येशू शोमरोनी स्त्रीशी बोलला तेव्हा तिला आश्‍चर्य का वाटलं? तो तिला काय म्हणाला?

योहान ४:१-४२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा