वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ६० पृ. १४४-पृ. १४५ परि. २
  • नेहमीसाठी टिकणारं राज्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नेहमीसाठी टिकणारं राज्य
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाने बादशहांना धडा शिकविला तेव्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • दानीएल पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • मोठ्या झाडासारखं एक राज्य
    बायबलमधून शिकू या!
  • देवाच्या भविष्यवाणीच्या वचनाकडे आज लक्ष द्या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ६० पृ. १४४-पृ. १४५ परि. २
नबुखद्‌नेस्सर राजाच्या स्वप्नातल्या पुतळ्याला दगड लागल्यामुळे त्याचा चुरा होतो

पाठ ६०

नेहमीसाठी टिकणारं राज्य

एका रात्री, नबुखद्‌नेस्सर राजाला एक खूप विचित्र स्वप्न पडलं. त्यामुळे तो इतका बेचैन झाला, की त्याला झोपच लागली नाही. त्याने त्याच्या जादूगारांना बोलावलं आणि त्यांना म्हटलं: ‘माझ्या स्वप्नाचा अर्थ मला सांगा.’ ते जादूगार त्याला म्हणाले: ‘महाराज, आम्हाला तुमचं स्वप्न सांगा.’ पण नबुखद्‌नेस्सरने त्यांना म्हटलं: ‘नाही! मी कोणतं स्वप्न पाहिलं ते तुम्हीच मला सांगा, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकेन.’ यावर त्यांनी राजाला म्हटलं: ‘अगोदर तुम्ही तुमचं स्वप्न आम्हाला सांगा, मग आम्ही त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो.’ राजा म्हणाला: ‘तुम्ही सर्व मला फसवण्याचा प्रयत्न करत आहात. मी काय स्वप्न पाहिलं ते सांगा मला!’ जादूगार राजाला म्हणाले: ‘हे तर अशक्य आहे! तुम्ही जे म्हणत आहात तसं करणं कोणालाही जमणार नाही.’

नबुखद्‌नेस्सर राजा इतका चिडला की त्याने राज्यातल्या सर्व जादूगार आणि सर्व बुद्धिमान पुरुषांना मारून टाकण्याचा आदेश दिला. त्या बुद्धिमान पुरुषांमध्ये दानीएल, शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो हेदेखील होते. त्यामुळे दानीएलने राजाजवळ थोडा वेळ मागितला. त्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी मदतीसाठी यहोवाजवळ प्रार्थना केली. मग यहोवाने काय केलं?

यहोवाने दानीएलला एका दृष्टान्तात नबुखद्‌नेस्सर राजाचं स्वप्न दाखवलं. तसंच, त्याने त्या स्वप्नाचा अर्थसुद्धा त्याला सांगितला. दुसऱ्‍याच दिवशी दानीएल, राजाच्या सेवकाकडे गेला. तो त्याला म्हणाला: ‘कोणत्याही बुद्धिमान पुरुषाचा जीव घेऊ नका. कारण राजाच्या स्वप्नाचा अर्थ मी सांगू शकतो.’ तो सेवक दानीएलला नबुखद्‌नेस्सरकडे घेऊन गेला. दानीएलने राजाला म्हटलं: ‘पुढे काय घडणार आहे, हे देवाने तुम्हाला स्वप्नात दाखवलं आहे. स्वप्नात तुम्ही एक खूप मोठा पुतळा पाहिला. त्याचं डोकं सोन्याचं होतं. त्याची छाती आणि हात चांदीचे होते. त्याचं पोट आणि मांड्या तांब्याच्या होत्या. त्याचे पाय लोखंडाचे होते. आणि पावलं लोखंड व मातीची होती. मग तुम्ही डोंगरातून एक मोठा दगड आपोआप येऊन त्या पुतळ्याच्या पावलांवर आदळताना पाहिला. त्या दगडामुळे पुतळ्याचा चुरा झाला आणि वाऱ्‍यासोबत तो चुरा उडून गेला. पण त्या दगडाचा मात्र एक मोठा डोंगर तयार झाला. त्या डोंगराने सर्व पृथ्वी भरून गेली.’

स्वप्न सांगितल्यानंतर दानीएलने राजाला त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. त्याने म्हटलं: ‘त्या पुतळ्याचं सोन्याचं डोकं म्हणजे तुमचं राज्य. चांदीचा भाग म्हणजे तुमच्या राज्यानंतर येणारं राज्य. मग एक असं राज्य येईल जे तांब्यासारखं असेल आणि ते पूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. त्यानंतर येणारं राज्य लोखंडासारखं मजबूत असेल. मग शेवटी एक असं राज्य येईल, ज्याचा काही भाग लोखंडासारखा मजबूत, तर काही भाग मातीसारखा कमजोर असेल. त्यामुळे त्या राज्यात एकता नसेल. तुम्ही जो दगड डोंगर बनलेला पाहिला, तो दगड म्हणजे देवाचं राज्य. देवाचं हे राज्य बाकी सर्व राज्यांचा चुराडा करेल आणि ते नेहमीसाठी टिकेल.’

नबुखद्‌नेस्सरने जमिनीवर पडून दानीएलला नमस्कार केला. तो म्हणाला: ‘तुझ्या देवाने तुला या स्वप्नाचा अर्थ सांगितला आहे. खरंच तुझ्या देवासारखा दुसरा कोणीच नाही.’ दानीएलचा जीव घेण्याऐवजी नबुखद्‌नेस्सरने त्याला बाबेलमधल्या सर्व बुद्धिमान पुरुषांचा प्रमुख बनवलं. तसंच त्याने दानीएलला बाबेलमधला एक शासकसुद्धा बनवलं. दानीएलच्या प्रार्थनेचं यहोवाने कसं उत्तर दिलं, हे तू पाहिलंस का?

“त्यांनी इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.”—प्रकटीकरण १६:१६

प्रश्‍न: दानीएलला नबुखद्‌नेस्सर राजाच्या स्वप्नाचा अर्थ का सांगता आला? त्या स्वप्नाचा काय अर्थ होता?

दानीएल २:१-४९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा