वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ५८ पृ. १४०-पृ. १४१ परि. ३
  • यरुशलेमचा नाश होतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यरुशलेमचा नाश होतो
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • मसीहाबद्दलची भविष्यवाणी—देवदाराचं मोठं झाड
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • सामर्थ्यशाली बाबेल—तिसरी बलाढ्य जागतिक सत्ता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • यहोवा प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणे फळ देईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • यहेज्केल—त्याचं जीवन आणि त्याचा काळ
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ५८ पृ. १४०-पृ. १४१ परि. ३
यरुशलेम आणि मंदिराला लागलेली आग

पाठ ५८

यरुशलेमचा नाश होतो

यहूदाचे लोक सतत यहोवाला सोडून खोट्या देवांची उपासना करायचे. त्यांनी सुधरावं म्हणून कित्येक वर्षं यहोवाने त्यांची मदत केली. लोकांना चेतावणी देण्यासाठी त्याने बऱ्‍याच संदेष्ट्यांना पाठवलं. पण त्यांनी ऐकलं नाही. याउलट त्यांनी संदेष्ट्यांची थट्टा केली. मग ते करत असलेली वाईट कामं आणि मूर्तिपूजा थांबवण्यासाठी यहोवाने काय केलं?

बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर एका नंतर एक राष्ट्र जिंकत गेला. नबुखद्‌नेस्सरने जेव्हा पहिल्यांदा यरुशलेमवर विजय मिळवला, तेव्हा त्याने यरुशलेमचा राजा यहोयाखीन याला पकडून बाबेलमध्ये नेलं. त्यासोबत त्याने तिथल्या राजकुमारांना, योद्ध्‌यांना आणि कारागिरांनाही नेलं. त्याने यहोवाच्या मंदिरातला सर्व खजिनासुद्धा नेला. त्यानंतर नबुखद्‌नेस्सर राजाने सिद्‌कीयाला यहूदाचा राजा बनवलं.

सिद्‌कीया राजा सुरुवातीला नबुखद्‌नेस्सरचं ऐकायचा. पण आसपासच्या राष्ट्रांनी आणि खोट्या संदेष्ट्यांनी त्याला बाबेलच्या विरोधात जायला सांगितलं. यामुळे यिर्मयाने सिद्‌कीयाला चेतावणी दिली: ‘जर तू राजाचं ऐकलं नाहीस तर यहूदातल्या लोकांना मारून टाकलं जाईल, दुष्काळ पडेल आणि आजारपण येईल.’

आठ वर्षं राज्य केल्यानंतर सिद्‌कीयाने बाबेलचा विरोध करण्याचं ठरवलं. त्याने मिसर देशाच्या सैन्याकडून मदत मागितली. हे समजल्यावर नबुखद्‌नेस्सरने यरुशलेमवर हल्ला करण्यासाठी आपले सैनिक पाठवले. सैनिकांनी शहराच्या बाहेर आपले तंबू बांधले. यिर्मयाने सिद्‌कीयाला म्हटलं: ‘यहोवा म्हणतो, की जर तू बाबेलच्या राजाचं ऐकलं आणि हार मानली तर तू आणि हे शहर वाचेल. पण जर का तू ऐकलं नाहीस, तर बाबेलचे लोक यरुशलेम जाळून टाकतील आणि तुला नेऊन जेलमध्ये बंद करतील.’ यावर सिद्‌कीया म्हणाला: ‘मी हार मानणार नाही!’

दीड वर्षांनंतर, बाबेलचे सैनिक यरुशलेमच्या भिंती पाडून शहरात शिरले. त्यांनी शहर आणि मंदिर जाळून टाकलं. सैनिकांनी खूप लोकांना मारून टाकलं. तसंच, हजारो लोकांना पकडून नेलं आणि जेलमध्ये टाकलं.

सिद्‌कीया यरुशलेममधून पळून गेला. पण बाबेलच्या लोकांनी त्याचा पाठलाग केला. त्यांनी त्याला यरीहो शहराजवळ पकडलं आणि नबुखद्‌नेस्सरकडे आणलं. बाबेलच्या राजाने सिद्‌कीयाच्या मुलांना त्याच्या समोरच मारून टाकलं. त्यानंतर त्याला आंधळा करून जेलमध्ये टाकून दिलं. शेवटी सिद्‌कीया तिथेच मरून गेला. पण यहूदाच्या लोकांना यहोवाने असं वचन दिलं: ‘मी तुम्हाला ७० वर्षांनंतर तुमच्या घरी म्हणजे यरुशलेममध्ये परत आणेन.’

मग ज्या तरुणांना बाबेलमध्ये नेण्यात आलं होतं त्यांचं काय झालं? ते यहोवाला विश्‍वासू राहिले का?

“हे सर्वसमर्थ यहोवा देवा, खरंच, तुझे निर्णय खरे व न्यायाला धरून आहेत.”—प्रकटीकरण १६:७

प्रश्‍न: नबुखद्‌नेस्सर कोण होता? त्याने यरुशलेम शहराचं काय केलं? सिद्‌कीया कोण होता?

२ राजे २४:१, २, ८-२०; २५:१-२४; २ इतिहास ३६:६-२१; यिर्मया २७:१२-१४; २९:१०, ११; ३८:१४-२३; ३९:१-९; यहेज्केल २१:२७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा