वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ५३ पृ. १२८
  • यहोयादाने धैर्य दाखवलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोयादाने धैर्य दाखवलं
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • त्याने राजघराण्याच्या वारसदाराचं संरक्षण केलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • वाईट संगतीमुळे यहोआशने यहोवाला सोडले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • आपण यहोवाची भीती का बाळगली पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • धाडस दाखवणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ५३ पृ. १२८
महायाजक यहोयादाने लोकांसमोर यहोआश राजाला नेलं

पाठ ५३

यहोयादाने धैर्य दाखवलं

ईजबेल राणीला एक मुलगी होती. तिचं नाव होतं अथल्या. ती तिच्या आईप्रमाणेच दुष्ट होती. अथल्या राणीचं लग्न यहूदाच्या राजाशी झालं. जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू झाला, तेव्हा तिचा मुलगा राजा बनला. पण तिच्या मुलाचासुद्धा मृत्यू झाला. मग ती स्वतः यहूदावर राज्य करू लागली. त्यानंतर ती अशा सर्वांना मारून टाकायची, जे तिची जागा घेऊ शकत होते. इतकंच काय, तर तिने आपल्या नातवंडांनासुद्धा सोडलं नाही. राजघराण्यातल्या सर्व मुलांना मारून टाकण्याचा तिने प्रयत्न केला. यामुळे सगळेच तिला घाबरायचे.

अथल्या चुकीची कामं करत आहे हे महायाजक यहोयादा आणि त्याची पत्नी यहोशेबा यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता, अथल्या राणीच्या एका नातवाला लपवलं. त्याचं नाव यहोआश होतं. त्या वेळी यहोआश लहान बाळ होता. त्यांनी त्याला मंदिरात वाढवलं.

जेव्हा यहोआश सात वर्षांचा झाला, तेव्हा यहोयादाने सर्व सरदारांना आणि लेवींना बोलवून म्हटलं: ‘मंदिराच्या दारावर पहारा द्या आणि कोणालाही आत येऊ देऊ नका.’ मग यहोयादाने यहोआशला मुकुट घातला आणि त्याला यहूदाचा राजा बनवलं. यहूदाच्या लोकांना आनंद झाला आणि ते मोठ्या आवाजात म्हणाले: ‘राजा खूप-खूप वर्षं जगो!’

अथल्या राणी ओरडताना

अथल्या राणीने लोकांचा आवाज ऐकला आणि ती लगेच मंदिराकडे गेली. तिने जेव्हा नवीन राजाला पाहिलं, तेव्हा ती ओरडून म्हणाली: ‘विश्‍वासघात! विश्‍वासघात!’ मग सरदारांनी त्या दुष्ट राणीला पकडून नेलं आणि तिला मारून टाकलं. पण देशातल्या सर्व लोकांवर तिचा जो वाईट प्रभाव पडला होता, त्याबद्दल काय?

यहोयादाने देशातल्या सर्व लोकांना यहोवासोबत एक करार करायला मदत केली. त्यांनी वचन दिलं की ते फक्‍त यहोवाचीच उपासना करतील. यहोयादाने लोकांना बआल देवाच्या मंदिराचा आणि मूर्तींचा नाश करायला सांगितलं. त्याने मंदिरात सेवा करण्यासाठी याजक आणि लेवी नेमले. यामुळे लोक मंदिरात पुन्हा उपासना करू शकत होते. तसंच, मंदिरात कोणी अशुद्ध व्यक्‍ती येऊ नये, म्हणून त्याने मंदिराच्या दारावर रक्षण करणाऱ्‍यांनासुद्धा नेमलं. त्यानंतर यहोयादा आणि सरदारांनी यहोआशला महालात नेलं आणि त्याला राजपद दिलं. यहूदाच्या लोकांना खूप आनंद झाला. दुष्ट अथल्या राणीपासून आणि बआल देवाच्या उपासनेपासून, यहूदाचे लोक शेवटी मुक्‍त झाले होते. ते आता यहोवाची उपासना करू शकत होते. यहोयादाने धैर्य दाखवल्यामुळे बऱ्‍याच लोकांना मदत झाली, नाही का?

“जे शरीर नष्ट करतात, पण जीवन नष्ट करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका; तर जो गेहेन्‍नात जीवन आणि शरीर दोन्ही नष्ट करू शकतो त्याचं भय बाळगा.”—मत्तय १०:२८

प्रश्‍न: यहोयादाने धैर्य कसं दाखवलं? यहोवा तुलासुद्धा धैर्य दाखवायला मदत करू शकतो का?

२ राजे ११:१–१२:१२; २ इतिहास २१:१-६; २२:१०–२४:१६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा