वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ २४ पृ. ६२-पृ. ६३ परि. ३
  • त्यांनी आपलं वचन पाळलं नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांनी आपलं वचन पाळलं नाही
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • सोन्याचं वासरू
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • यहोवाचे मार्ग जाणून घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • एक जळणारं झुडूप
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ २४ पृ. ६२-पृ. ६३ परि. ३
इस्राएली लोक सोन्याच्या वासराभोवती गाताना आणि नाचताना

पाठ २४

त्यांनी आपलं वचन पाळलं नाही

यहोवाने मोशेला म्हटलं: ‘वर डोंगरावर ये. माझे नियम मी तुला दगडांच्या पाट्यांवर लिहून देईन.’ मग मोशे डोंगरावर गेला आणि तिथे ४० दिवस व ४० रात्री राहिला. तो तिथे असताना यहोवाने दोन दगडी पाट्यांवर दहा महत्त्वपूर्ण नियम लिहिले. या नियमांना दहा आज्ञा म्हटलं जातं. यहोवाने त्या दगडी पाट्या मोशेला दिल्या.

मोशे दगडी पाट्या जमिनीवर फेकतो

मोशे बरेच दिवस खाली आला नाही म्हणून इस्राएली लोकांना वाटलं, की तो त्यांना सोडून कुठेतरी निघून गेला आहे. म्हणून त्यांनी अहरोनला म्हटलं: ‘आता आमचं मार्गदर्शन कोण करेल? आमच्यासाठी देव बनव, जो आमचं मार्गदर्शन करेल.’ अहरोनने उत्तर दिलं: ‘तुमचं सोनं मला द्या.’ त्याने ते सोनं वितळवलं आणि एका वासराची मूर्ती बनवली. त्यानंतर लोकांनी म्हटलं: ‘हे वासरूच तर आमचा देव आहे. यानेच आम्हाला मिसरमधून सोडवलं!’ ते त्या सोन्याच्या वासराची उपासना करू लागले. त्यांनी उत्सव साजरा केला. पण त्यांनी जे केलं ते बरोबर होतं का? मुळीच नाही. कारण त्या लोकांनी वचन दिलं होतं, की ते फक्‍त यहोवाचीच उपासना करणार. पण आता असं करून, खरंतर ते दिलेलं वचन मोडत होते.

जे काही घडत होतं ते यहोवाने पाहिलं. त्याने मोशेला म्हटलं: ‘खाली लोकांकडे जा! ते माझी आज्ञा मोडत आहेत. ते एका खोट्या देवाची उपासना करत आहेत.’ मोशेने त्या दोन दगडी पाट्या घेतल्या आणि तो खाली उतरला.

लोक राहत होते त्या ठिकाणाच्या जवळ आल्यावर, मोशेला लोकांच्या गाण्याचा आवाज ऐकू आला. तिथे पोचल्यावर लोक नाचत आहेत आणि वासराला वाकून नमस्कार करत आहेत हे त्याने पाहिलं. मोशेला खूप राग आला. इतका की त्याने त्या दोन दगडी पाट्या जमिनीवर आपटल्या आणि त्यांचे तुकडे-तुकडे झाले. मोशेने लगेच ती मूर्ती नष्ट केली. त्यानंतर त्याने अहरोनला विचारलं: ‘या लोकांनी तुला असं काय सांगितलं, ज्यामुळे तू इतकी वाईट गोष्ट करायला तयार झालास?’ अहरोनने उत्तर दिलं: ‘माझ्यावर रागावू नकोस. तुला तर माहीतच आहे, हे लोक कसे आहेत ते. त्यांना एक देव हवा होता. म्हणून मी त्यांचं सोनं आगीत टाकलं आणि हे वासरू तयार झालं.’ खरं पाहिलं तर, अहरोनने असं करायला नको होतं. मोशे परत डोंगरावर गेला आणि यहोवाने लोकांना माफ करावं यासाठी त्याच्याकडे विनंती करू लागला.

जे यहोवाचं ऐकण्यासाठी तयार होते त्यांना यहोवाने माफ केलं. तुला काय वाटतं? मोशेच्या मार्गदर्शनानुसार चालणं इस्राएली लोकांसाठी खूप महत्त्वाचं नव्हतं का?

“तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मूर्खावर प्रसन्‍न होत नसतो; जो नवस तू केला असेल त्याची फेड कर.”—उपदेशक ५:४

प्रश्‍न: मोशे जेव्हा डोंगरावर गेला तेव्हा इस्राएली लोकांनी काय केलं? मोशेने परत आल्यावर काय केलं?

निर्गम २४:१२-१८; ३२:१-३०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा