वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ १२ पृ. ३४
  • याकोबला वारसा मिळाला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • याकोबला वारसा मिळाला
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • भिन्‍न असलेले जुळे भाऊ
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • योग्य निवडी करून तुमचा वारसा सुरक्षित ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • याकोब आणि एसावचं भांडण मिटलं
    बायबलमधून शिकू या!
  • कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने धाडस दाखवलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ १२ पृ. ३४
एसावने वाटीभर डाळीच्या बदल्यात याकोबला आपला ज्येष्ठपणाचा हक्क दिला

पाठ १२

याकोबला वारसा मिळाला

इसहाक आणि रिबका आपल्या जुळी मुलं याकोब आणि एसावसोबत

इसहाक ४० वर्षांचा असताना त्याचं रिबकासोबत लग्न झालं. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. पुढे त्यांना दोन जुळी मुलं झाली.

मोठ्या मुलाचं नाव होतं एसाव आणि लहान मुलाचं याकोब. एसावला जास्तकरून बाहेर राहायला आवडायचं. तो शिकार करण्यात खूप हुशार होता. पण याकोब त्याच्या अगदी उलट होता. त्याला घरी राहायला आवडायचं.

त्या काळात वडिलांच्या मृत्यूनंतर, मोठ्या मुलाला संपत्तीचा जास्त वाटा मिळायचा. याला वारसा असं म्हणतात. इसहाकच्या कुटुंबात वारशामध्ये आणखी एक गोष्ट सामील होती. ती म्हणजे यहोवाने अब्राहामला दिलेली वचनं. एसावला या वचनांची जरासुद्धा पर्वा नव्हती. पण ती किती महत्त्वाची आहेत, हे याकोबला माहीत होतं.

याकोब आणि एसाव

एक दिवस एसाव शिकार करून घरी परत आला. पूर्ण दिवस शिकार केल्यामुळे तो खूप थकला होता. त्या वेळी याकोब खाण्यासाठी जे बनवत होता त्याचा सुगंध एसावला आला. तो म्हणाला: ‘मला भूक लागली आहे! मला ती थोडी लाल डाळ दे.’ तेव्हा याकोब म्हणाला: ‘देतो, पण आधी मला वचन दे, की तू मला तुझा वारसाहक्क देशील.’ त्यावर एसाव म्हणाला: ‘मला काय करायचं त्या वारशाचं? घे तुला तो वारसा. पण मला ती डाळ दे पटकन खायला.’ एसावने जे केलं, त्याबद्दल तुला काय वाटतं, ते बरोबर होतं का? नाही. कारण, एसावने फक्‍त वाटीभर डाळीसाठी खूप मौल्यवान गोष्ट देऊन टाकली.

आता इसहाक खूप म्हातारा झाला होता. आपल्या मोठ्या मुलाला आशीर्वाद देण्याची वेळ आली होती. पण रिबकाने आपल्या धाकट्या मुलाला म्हणजे याकोबला तो आशीर्वाद मिळवायला मदत केली. पण जेव्हा एसावला याविषयी कळलं, तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने आपल्या सख्ख्या भावाचा जीव घेण्याचं ठरवलं. इसहाक आणि रिबका यांना याकोबला वाचवायचं होतं. म्हणून ते त्याला म्हणाले: ‘एसावचा राग शांत होईपर्यंत, तू लाबान मामाकडे जाऊन राहा.’ याकोबने आपल्या आईवडिलांचं ऐकलं आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिथून निघून गेला.

“खरोखर, एखाद्या माणसाने संपूर्ण जग मिळवलं, पण आपला जीव गमावला तर त्याचा काय उपयोग? एखादा माणूस आपल्या जिवाच्या मोबदल्यात खरंच काय देऊ शकेल?”—मार्क ८:३६, ३७

प्रश्‍न: एसाव आणि याकोब हे एकमेकांपासून कसे वेगळे होते? एसावच्या जागी याकोबला का आशीर्वाद मिळाला?

उत्पत्ति २५:२०-३४; २७:१–२८:५; इब्री लोकांना १२:१६, १७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा