वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ypq प्रश्‍न ५ पृ. १५-१७
  • मी त्रास देणाऱ्‍यांचा सामना कसा करू शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी त्रास देणाऱ्‍यांचा सामना कसा करू शकतो?
  • तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं
  • मिळती जुळती माहिती
  • दांडगाई करण्यात गैर काय?
    सावध राहा!—१९९७
  • तुम्हाला कोणी त्रास देतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९८
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं
ypq प्रश्‍न ५ पृ. १५-१७
एका मुलाला त्याच्या शाळासोबत्यासमोर त्रास दिला जात आहे

प्रश्‍न ५

मी त्रास देणाऱ्‍यांचा सामना कसा करू शकतो?

हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

तुम्ही त्रास देणाऱ्‍यांना जशी प्रतिक्रिया देता त्यामुळे त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम घडू शकतात.

तुम्ही काय केलं असतं?

कल्पना करा: थॉमसला आज शाळेत जायचं नाहीये. पण प्रश्‍न फक्‍त आजचा नाहीये त्याला शाळेत जायची इच्छाच नाहीये. पण का बरं? तीन महिन्यांआधी त्याच्या वर्गातील मुलांनी त्याच्याबद्दल खोटी अफवा पसरवली. त्यानंतर सर्व जण त्याला वेगवेगळ्या नावाने चिडवू लागले. कधीकधी तर थॉमस चालत असताना ते मुद्दामहून त्याच्या हातातली सर्व पुस्तकं पाडायचे आणि मग “सॉरी! चुकून धक्का लागला,” असं म्हणायचे. कधीकधी मुलं त्याला मागून धक्का मारायचे आणि मग काहीच झालं नाही असं वागायचे. थॉमसने वळून पाहिलं की त्याला कळायचं नाही की नेमकं आपल्याला कोणी धक्का मारला. आणि काल तर पाणी डोक्यावरूनच गेलं, थॉमसला कोणीतरी इंटरनेटवरून चक्क धमकावलं!

तुम्ही थॉमसच्या जागी असता तर काय केलं असतं?

थांबा आणि विचार करा!

घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही हात न उचलता त्रास देणाऱ्‍यांचा सामना करू शकता? पण कसं?

  • लगेच प्रतिक्रिया देऊ नका. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “मूर्ख आपल्या मनांतील सर्व क्रोध व्यक्‍त करतो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवतो.” (नीतिसूत्रे २९:११) होताहोईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा किंवा कमीत कमी शांत आहात असं दाखवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा त्रास देणाऱ्‍यांना तुम्हाला पुन्हा सतावण्यात काहीच रस उरणार नाही.

  • जशास तसं वागू नका. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका.” (रोमकर १२:१७) बदला घेतल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते.

  • चार हात लांब राहा. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.” (नीतिसूत्रे २२:३) जे लोक त्रास देतात त्यांच्यापासून लांब राहा. आपल्याला त्रास दिला जाऊ शकतो अशा ठिकाणी जाण्याचं होताहोईल तितकं टाळा.

  • काहीतरी अनपेक्षित करा. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते.” (नीतिसूत्रे १५:१) तुम्ही काहीतरी मजेशीर बोलू शकता. जसं की, तुम्हाला त्रास देणाऱ्‍यांनी “ए जाड्या!” असं चिडवलं तर तुम्हाला काहीच फरक पडला नाही हे दाखवण्यासाठी म्हणू शकता: “हो! आहे की नाही माझी भारी पर्सनॅलिटी.”

  • काही न बोलता तिथून निघून जा. “शांत राहिल्यानं तुम्ही दाखवून देता की तुम्ही एक समजदार व्यक्‍ती आहात आणि तुम्ही त्रास देणाऱ्‍यापेक्षा मजबूत आहात. तसंच, तुम्ही संयमी आहात हेही दिसून येतं.” असं नॉरा नावाची १९ वर्षांची मुलगी म्हणते.—२ तीमथ्य २:२४.

  • तुमचा आत्मविश्‍वास वाढवा. जे स्वतःबद्दल नकारात्मक विचार करतात आणि सहसा घाबरून काहीच उत्तर देत नाहीत अशांना हे त्रास देणारे लोक पटकन ओळखतात. याउलट जर तुम्ही दाखवून दिलं की तुमच्यावर त्यांची दादागिरी चालत नाहीये, तेव्हा ते लगेच माघार घेतात आणि तुम्हाला त्रास द्यायचं बंद करतात.

  • मोठ्यांना सांगा. एक रिटायर्ड शिक्षिका म्हणतात: “कोणाला त्रास दिला जात असेल तर मी त्याला असा सल्ला देते, की त्याने शांतपणे सहन करू नये तर मोठ्यांना सांगावं. कारण त्याने सांगितलं नाही तर उद्या दुसऱ्‍या कोणालातरी त्रास भोगावा लागेल.”

एक तरुण त्रास देणाऱ्‍याचा आत्मविश्‍वासाने सामना करत आहे

आत्मविश्‍वास आपल्याला ते बळ देईल जे सहसा त्रास देणाऱ्‍यांकडे नसते

तुम्हाला माहीत होतं का?

पुढील गोष्टीदेखील त्रास देण्यात सामील आहेत:

  • त्रास देणाऱ्‍याच्या तोंडातून शब्द आगीसारखे बाहेर येत आहेत

    बोलण्यानं त्रास देणं. २० वर्षांची सेलीना म्हणते: “मला त्यांनी काय-काय नावं ठेवली आणि माझ्याशी ते कसे बोलले हे मी कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या बोलण्यामुळे वाटायचं की मी काहीच कामाची नाही, माझी काहीच किंमत नाही, मी सर्वांना नकोशी आहे. मला मारलं असतं तर एवढं दुःख झालं नसतं जेवढं त्यांच्या टोचून बोलण्यानं झालं.”

  • सोबत्यांनी एकटं टाकल्यामुळे एक तरुण वेगळा बसला आहे

    एकटं टाकणं. १८ वर्षांची हेली म्हणते: “माझ्या शाळासोबत्यांनी मला एकटं पाडलं. मी त्यांच्यासोबत डबा खायला जायचे तर ते ‘जागा नाही’ असं म्हणायचे आणि मुद्दामहून मला सोबत बसू द्यायचे नाही. त्यांनी मला एकटं टाकल्यामुळे मी नेहमी रडायचे आणि वर्षभर मी एकटीनंच बसून डबा खाल्ला.”

  • एक तरुणी इंटरनेटवरून त्रास दिल्यामुळे कम्प्यूटरपासून लांब जात आहे

    इंटरनेटवरून त्रास देणं. १४ वर्षांचा डॅनिएल म्हणतो: “कंप्युटरच्या की-बोर्डवर नुसती बोटं जरी फिरवली तरी कुणाचंही चांगलं नाव काही क्षणातच खराब होऊ शकतं किंवा त्यांचं आयुष्य उद्‌ध्वस्तही होऊ शकतं. हे चढवून बोलल्यासारखं वाटत असलं तरी असं घडू शकतं!”

क्विज

बरोबर किंवा चूक

उत्तरं

१ त्रास देणं हे हजारो वर्षांपूर्वीपासून सुरू आहे.

१ ✔. उदाहरणार्थ, बायबलमध्ये काही अतिशय धिप्पाड लोकांबद्दल सांगितलं आहे ज्यांना हिब्रू भाषेत नेफिलीम म्हणायचे. ज्याचा अर्थ “पाडणारे” किंवा “जे दुसऱ्‍यांना खाली पाडतात” असा होतो.—उत्पत्ति ६:४.

२ त्रास देण्यात गंभीर काहीच नाही, ती फक्‍त क्षुल्लक मस्करी आहे.

२ X. अनेक मुलं आत्महत्या करतात त्यामागे त्रास देणं हे एक मोठं कारण आहे.

३ त्रास देणाऱ्‍यांचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जशास तसं करणं.

३ X. बऱ्‍याचदा त्रास देणारे शरीराने जास्त ताकदवान असतात, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी जशास तसे वागून उपयोग नाही.

४ एखाद्याला त्रास दिला जात आहे हे तुम्ही पाहता, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य आहे.

४ X. कुणाला त्रास दिला जात आहे हे नुसतंच शांतपणे बघत राहणं चुकीचं आहे. असं केल्यानं तुम्हीदेखील त्रास देणाऱ्‍याला साथ देत आहात असं होईल.

५ त्रास देणारे जरी फुशारकी मारत असले, तरी त्यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना असते.

५ ✔. काही त्रास देणाऱ्‍या व्यक्‍तींना स्वतःबद्दल गर्व असला, तरी त्यातील अनेकांच्या मनात भीतीची भावना असते आणि आपण काहीतरी आहोत, हे दाखवण्यासाठी ते इतरांना त्रास देतात.

६ त्रास देणारे बदलू शकतात.

६ ✔. त्रास देणाऱ्‍यांना सुधारण्यासाठी मदत केली गेली, तर त्यांच्या वागण्यात आणि विचार करण्यात बदल होऊ शकतो.

माझा निर्धार

  • जर मला कुणी त्रास देऊ लागलं तर मी काय करणार?

याविषयी आणखी जाणून घ्या

हात न उचलता त्रास देणाऱ्‍यांचा सामना करा

हात न उचलता त्रास देणाऱ्‍यांचा सामना करा हा व्हाईटबोर्ड ॲनिमेशन व्हिडिओ www.jw.org या वेबसाईटवर पाहा. (jw.org वर BIBLE TEACHINGS > TEENAGERS या टॅबखाली बीट अ बुली विदाऊट युजिंग युअर फिस्ट्‌स या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा