वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • rj भाग ५ पृ. १२-१५
  • आपल्या मेंढपाळाकडं व जिवाचं रक्षण करणाऱ्‍याकडं परत या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या मेंढपाळाकडं व जिवाचं रक्षण करणाऱ्‍याकडं परत या
  • यहोवाकडं परत या
  • मिळती जुळती माहिती
  • “माझ्याकडे परत या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • तो तुला बळ देईल
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • लवकरात लवकर परतण्यास त्यांना साहाय्य करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
यहोवाकडं परत या
rj भाग ५ पृ. १२-१५

भाग पाच

आपल्या मेंढपाळाकडं व जिवाचं रक्षण करणाऱ्‍याकडं परत या

हे माहितीपत्रक वाचत असताना तुम्हाला अनेकदा असं वाटलं असेल, की ‘अरे हो, माझीसुद्धा हीच समस्या आहे!’ असं आहे तर तुम्ही एकटे नाही. प्राचीन काळात व आजच्या काळातही यहोवाच्या बऱ्‍याच विश्‍वासू सेवकांना अशाच समस्यांना तोंड द्यावं लागलं. पण यांवर मात करण्यासाठी जशी यहोवानं त्यांना मदत केली तसंच तो तुम्हालाही मदत करेल.

तुम्ही परत याल तेव्हा यहोवा तुमचं स्वागत करेल

तुम्ही परत याल तेव्हा यहोवा तुमचं स्वागत करेल याची खातरी बाळगा. चिंता, दुखावलेल्या भावना यांवर मात करण्यासाठी आणि शुद्ध विवेक मिळवण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. यामुळं तुम्हाला मनःशांती मिळेल. तुम्ही पुन्हा एकदा मंडळीतील बांधवांसोबत यहोवाची सेवा आवेशानं करू शकाल. प्रेषित पेत्रानं पहिल्या शतकातील ख्रिस्ती बांधवांना जे लिहिलं ते तुमच्या बाबतीतही खरं ठरेल. त्यानं म्हटलं: “तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहा.”—१ पेत्र २:२५.

यहोवाकडं परत येणं हा तुमच्या जीवनातला सर्वात चांगला निर्णय असेल. असं का म्हणता येईल? कारण यामुळं तुम्ही यहोवाचं मन आनंदित कराल. (नीतिसूत्रे २७:११) हे खरं आहे की यहोवा आपल्याला त्याची सेवा व त्याच्यावर प्रेम करण्यासाठी कधीच जबरदस्ती करत नाही. (अनुवाद ३०:१९, २०) पण हे लक्षात घ्या की यहोवालाही आपल्यासारख्याच भावना आहेत. आपण जे काही करतो त्यामुळं त्याला एकतर आनंद होतो किंवा दुःख. एका बायबल विद्वानानं असं म्हटलं की आपलं मन हे एका दारासारखं आहे. या दाराला बाहेरून कडी नाही, फक्‍त आतून आहे. त्यामुळं आपल्याला जर आपलं मन उघडायचं असेल, तर ते दुसरं-तिसरं कुणी नव्हे तर आपल्यालाच उघडावं लागेल. यहोवावरील प्रेमापोटी त्याची उपासना करण्याद्वारे आपण  जणू काय ते दार उघडतो. आणि असं केल्यास यहोवाला खूप आनंद होतो. उपासना मिळवण्याचा हक्क फक्‍त यहोवालाच आहे. आणि त्याची उपासना करण्याद्वारे आपल्याला जो आनंद मिळतो त्याची तुलना दुसऱ्‍या कोणत्याच गोष्टीशी करता येणार नाही.—प्रेषितांची कृत्ये २०:३५; प्रकटीकरण ४:११.

मंडळीतील बंधुभगिनी एका अक्रियाशील बहिणीचं आनंदानं स्वागत करतात

यासोबतच यहोवाची पुन्हा सेवा सुरू केल्यामुळं तुमची आध्यात्मिक भूकदेखील भागेल. (मत्तय ५:६) कोणत्या अर्थानं? आज जगातील लोक, ‘आपण या पृथ्वीवर का आहोत?’, ‘जीवनाचा उद्देश काय आहे?’ या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी कुठंकुठं भटकतात. माणसामध्ये अशा गोष्टी जाणून घेण्याची ओढ आहे कारण यहोवानंच त्याला तसं निर्माण केलं आहे. त्याची उपासना करण्यात आपल्याला समाधान मिळावं या उद्देशानं यहोवानं आपल्याला बनवलं होतं. त्यामुळं, आपण प्रेमापोटी त्याची भक्‍ती करत आहोत या जाणीवेमुळं येणारं समाधान इतर कशानंच मिळत नाही.—स्तोत्र ६३:१-५.

यहोवा तुमच्या परतण्याची वाट पाहत आहे. आम्ही हे इतकं खातरीनं का म्हणू शकतो? हे माहितीपत्रक यहोवाला अनेकदा प्रार्थना केल्यानंतर खास तुमच्यासाठी बनवण्यात आलं आहे. कदाचित मंडळीतील वडिलांनी किंवा एखाद्या बांधवानं तुम्हाला हे दिलं असेल. ते मिळाल्यावर तुम्हाला ते वाचावंसं वाटलं आणि यातील माहितीनुसार पावलं उचलण्यास तुम्ही तयार झाला. यहोवा तुम्हाला विसरला असता, तर खास तुमच्यासाठी त्यानं हे माहितीपत्रक काढलं असतं का? हे माहितीपत्रक या गोष्टीचा पुरावा आहे की यहोवा अजूनही तुमच्यावर खूप प्रेम करतो. तो तुम्हाला परत येण्याची विनंती करत आहे.—योहान ६:४४.

यहोवा हरवलेल्या मेंढरांना कधीच विसरत नाही हे पाहून आपलं मन भरून येतं. याबद्दल डॉना नावाच्या बहिणीनं असं म्हटलं: “मी हळूहळू सत्यातून बाहेर गेले. पण बऱ्‍याच वेळा मी स्तोत्र १३९:२३, २४ या वचनावर विचार करायचे. त्या वचनात म्हटलं आहे, की ‘हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव.’ मला जगातील लोकांची वागणूक कधीच पटली नाही. मी यहोवाच्या संघटनेत असायला हवं असंच मला वाटायचं. मला जाणवू लागलं, की यहोवानं मला  अजूनही सोडलेलं नाही, मीच त्याला सोडून गेले असल्यामुळं आता मलाच त्याच्याजवळ  परत जाण्याची गरज होती. आणि ते मी केलं याचा मला खूप आनंद होतो!”

“मला जाणवू लागलं, की यहोवानं मला  अजूनही सोडलेलं नाही, मीच त्याला सोडून गेले असल्यामुळं आता मलाच त्याच्याजवळ  परत जाण्याची गरज होती”

तुम्ही पुन्हा एकदा यहोवाकडून मिळणारा आनंद अनुभवू शकाल अशी आम्ही मनापासून प्रार्थना करतो. (नहेम्या ८:१०) यहोवाजवळ परत येण्याचा तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही.

तुमच्या मनातील काही प्रश्‍नांची उत्तरं

सुरुवात कशी करू?

एक अक्रियाशील बहीण बायबल वाचत आहे

खूप दिवसांपासून आजारी असलेल्या व्यक्‍तीला दररोजची कामं लगेच सुरू करता येणार नाही. तर तिला हळूहळू ती करावी लागतील. तसंच तुम्हीदेखील दररोज थोडंथोडं आध्यात्मिक अन्‍न घेऊन सुदृढ होऊ शकता. तुम्हाला सर्व गोष्टी एकदम सुरू कराव्या लागतील, असा विचार करू नका. कदाचित तुम्ही दररोज काही मिनिटं बायबलचं वाचन करू शकता, आपल्या एखाद्या प्रकाशनातून अभ्यास करू शकता, jw.org/mr वेबसाईटवर नवीन माहिती वाचू शकता किंवा याच वेबसाईटवर ब्रॉडकास्टिंगचा कार्यक्रम पाहू शकता. तसंच, होईल तितक्या लवकर मंडळीच्या सभेला जाण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाला प्रार्थना करा आणि त्याला मदत मागा. “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:७.

“यहोवापासून दूर गेल्यानंतर मला प्रार्थना करायलासुद्धा लाज वाटू लागली. काही काळानं यहोवाला प्रार्थना करण्यासाठी मी माझं मन तयार केलं, त्या वेळी मंडळीतील एक वडील मला भेटायला आले. त्यांनी मला जाणीव करून दिली की यहोवा मला अजूनही विसरलेला नाही. मी दररोज बायबल वाचावं असं त्यांनी सुचवलं. मी बायबल वाचू लागले आणि त्यामुळं मला सभेला जाण्याचं धैर्य मिळालं. हळूहळू मी प्रचार कार्यात जाऊ लागले. यहोवानं मला कधीच सोडलं नाही यासाठी मी त्याची खूप आभारी आहे.”—ईवा नावाची बहीण.

मंडळीत गेल्यावर बंधुभगिनी काय म्हणतील?

मंडळीतील बंधुभगिनी तुमचं मनापासून स्वागत करतील याची खातरी बाळगा. तुम्हाला नावं ठेवण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी ते तुम्हाला उत्तेजन देतील. आणि तुम्हाला मदत करण्यासाठी जे शक्य आहे ते करतील.—इब्री लोकांस १०:२४, २५.

“मला मंडळीत परत जायला लाज वाटत होती. माझे जुने मित्र मला काय म्हणतील याचा मी विचार करत होतो. मला ३० वर्षांपासून ओळखणाऱ्‍या एका वृद्ध बहिणीनं मला पाहून म्हटलं, ‘तुला परत पाहून खूप आनंद झाला!’ माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला खरंच घरी आल्यासारखं वाटलं.”—काव्यर नावाचा बांधव.

“मी सभेला गेलो. मला कुणी ओळखू नये म्हणून मी शेवटच्या रांगेतच बसलो. पण मी लहानपणी सभेला जायचो त्या वेळी जे बंधुभगिनी होते त्यांनी मात्र मला ओळखलं. त्यांनी आनंदानं माझं स्वागत केलं आणि ते माझ्याशी खूप प्रेमानं वागले. हे पाहून माझं मन भरून आलं. मला वाटलं मी अनेक वर्षांनंतर घरी परत आलोय.”—मार्को नावाचा बांधव.

वडील माझ्याशी कसं वागतील?

मंडळीतील वडील तुमच्याशी प्रेमानं वागतील. यहोवाबद्दल तुमच्या मनात असलेलं ते पहिलं प्रेम पुन्हा जागृत झाल्यामुळं ते तुमची प्रशंसा करतील. (प्रकटीकरण २:४) तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील तर त्या सुधारण्यास ते तुम्हाला सौम्यतेनं मदत करतील. (गलतीकर ६:१; नीतिसूत्रे २८:१३) एखाद्या पुस्तकातून, जसं की “कायम जीवनाचा आनंद घ्या!”  यातून कदाचित तुमचा बायबल अभ्यास घेण्यास वडील एखाद्या बांधवाला नेमतील. ते नेहमी तुम्हाला मदत करतील व सांत्वन देतील या गोष्टीची खातरी बाळगा.—यशया ३२:१, २.

“मी ८ वर्षं मंडळीबाहेर होतो. तरीपण वडील मला अधूनमधून भेटून मदत करण्याचा प्रयत्न करायचे. एकदा एका वडिलानं मला जुने फोटो दाखवले ज्यात आम्ही सगळे जण खूप आनंदी दिसत होतो. त्या वेळी मी यहोवाची सेवा किती आनंदानं करायचो याची मला आठवण झाली. वडिलांनी मला परत यायला व आध्यात्मिक गोष्टींमध्ये सहभागी व्हायला प्रेमळपणे मदत केली.”—विक्टर नावाचा बांधव.

“तो तुला बळ देईल”

मंडळीत दोन बहिणी एकाच गीत पुस्तिकेतून गीत गात आहेत

यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!  या आपल्या गीतपुस्तकात अनेक गीतं आहेत जी तुम्हाला सांत्वन, उत्तेजन आणि यहोवाची सेवा पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा देऊ शकतात. जसं की, ३८ क्रमांकाच्या गीतातील बोल पाहा. १ पेत्र ५:१० वर आधारित असलेल्या या गीताचं शीर्षक आहे: “तो तुला बळ देईल.”

  1. वाटेवरून काळोख्या याहाने तुला,

    सत्याच्या प्रकाशात आणले.

    नीतीची आस तुझ्या मनी त्याने पाहून,

    जवळ तुला प्रेमाने घेतले.

    केले जेव्हा त्याला समर्पण तू,

    त्यानेही मैत्रीचे वचन दिले.

  2. एकुलत्यालाही ज्याने नाही राखले,

    सोसू दिले मरण तुझ्यासाठी.

    सोडेल का तुला तो आधाराविना?

    देईल साहाय्य तो पदोपदी.

    तू दाखवलेले प्रेम आणि विश्‍वास,

    विसरण्या नाही तो अन्यायी.

    (कोरस)

    अर्पण दिले मुलाचे, तुला सोडवण्या.

    देईल बळ तोच, विश्‍वासू राहण्या.

    नाही तो सोडणार, कधी हात तुझा.

    तो देईल बळ तुला, विश्‍वासू राहण्या!

सिंग टू जेहोवा—वोकल रेंडिशन्स

या आणि इतर राज्य गीतांचं संगीत ऐकायचं असेल तर jw.org या वेबसाईटवर पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा