वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • jl पाठ ११
  • आम्ही संमेलनांना का जातो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आम्ही संमेलनांना का जातो?
  • यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • मिळती जुळती माहिती
  • संमेलनांमध्ये हर्ष व देवाची स्तुती करणे
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
jl पाठ ११

पाठ ११

आम्ही संमेलनांना का जातो?

मेक्सिकोत यहोवाच्या साक्षीदारांचे एक प्रांतीय अधिवेशन

मेक्सिको

जर्मनीतील एका प्रांतीय अधिवेशनात एका नव्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे

जर्मनी

बोट्‌सवाना येथील यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन

बोट्‌सवाना

निकाराग्वा येथे एका तरुणाचा बाप्तिस्मा होत आहे

निकाराग्वा

इटलीतील एका प्रांतीय अधिवेशनात प्राचीन काळातील लोकांच्या वेशभूषेतील नाटक

इटली

चित्रात दाखवलेल्या लोकांच्या चेहऱ्‍यांवर इतका आनंद का आहे? कारण ते आमच्या एका संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. देवाने प्राचीन काळातील त्याच्या सेवकांना वर्षातून तीन वेळा एकत्र यायला सांगितले होते, त्याचप्रमाणे आज आम्हीसुद्धा मोठ्या जमावांत एकत्र येतो. (अनुवाद १६:१६) दरवर्षी आमचे तीन मुख्य कार्यक्रम असतात: एक दिवसाची दोन विभागीय संमेलने आणि तीन दिवसांचे प्रांतीय अधिवेशन. या कार्यक्रमांतून आम्हाला कसा फायदा होतो?

ते आमच्या ख्रिस्ती बंधुसमाजाला मजबूत करतात. प्राचीन काळातील इस्राएली लोकांनी जसे आनंदाने जनसभेत यहोवाचे स्तवन केले, तसे आम्हीसुद्धा आमच्या खास कार्यक्रमांमध्ये एकत्र येऊन यहोवाची उपासना करण्यात आनंद मिळवतो. (स्तोत्र २६:१२; १११:१) या संमेलनांमुळे आम्हाला इतर मंडळ्यांमधील व काही वेळा तर इतर देशांतील साक्षीदारांसोबत सहवास राखण्याची संधी मिळते. संमेलनाच्या ठिकाणी दुपारी आम्ही मैत्रीपूर्ण वातावरणात सोबत मिळून जेवण करतो. (प्रेषितांची कृत्ये २:४२) तेथे आम्हाला जगभरातील आमच्या बंधुसमाजाला जोडणारे प्रेम प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळते.—१ पेत्र २:१७

ते आम्हाला आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करतात. इस्राएली लोकांना समजावून सांगण्यात आलेली शास्त्रवचने त्यांना “समजली” तेव्हा त्यांना आध्यात्मिक रीत्या फायदा झाला. (नहेम्या ८:८, १२) संमेलनांमध्ये आम्हाला बायबलमधून जो सल्ला दिला जातो त्याची आम्हीसुद्धा मनापासून कदर करतो. प्रत्येक भाग बायबलवर आधारित असतो. देवाच्या इच्छेनुसार जीवन कसे जगायचे ते आम्ही रोचक भाषणांतून, परिचर्चेतून आणि प्रात्यक्षिकांतून शिकतो. या कठीण काळात एक ख्रिस्ती म्हणून जीवन जगताना अनेकांनी यशस्वीपणे जीवनातील समस्यांना तोंड दिले आहे; अशांचे अनुभव ऐकून आमचा विश्‍वास आणखी दृढ होतो. प्रांतीय अधिवेशनांत, प्राचीन काळातील वेशभूषेत सादर करण्यात येणाऱ्‍या नाटकांमुळे बायबलचे उतारे आणखी खरे वाटू लागतात आणि त्यांतून व्यावहारिक धडे आम्हाला शिकायला मिळतात. ज्यांना आपले जीवन देवाला समर्पित करायचे आहे अशांसाठी प्रत्येक संमेलनात बाप्तिस्म्याची व्यवस्था केली जाते.

  • संमेलने आनंदाचे प्रसंग का असतात?

  • संमेलनाला उपस्थित राहिल्याने तुम्ही कसा फायदा मिळवू शकता?

अधिक जाणून घ्या

तुम्हाला आमचा बंधुसमाज आणखी जवळून पाहण्याची इच्छा असल्यास आम्ही तुम्हाला आमच्या पुढील संमेलनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देतो. तुमचा बायबल शिक्षक तुम्हाला एखादा छापील कार्यक्रम दाखवू शकतो, जेणेकरून कोणत्या विषयांवर चर्चा केली जाते याची तुम्हाला एकंदरीत कल्पना येऊ शकते. तुमच्या कॅलेंडरवर पुढच्या संमेलनाच्या तारखेची व ठिकाणाची नोंद करून ठेवा आणि तेथे उपस्थित राहण्याचा पूर्ण प्रयत्न करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा