तुम्हाला आणखी जाणून घ्यायला आवडेल का?
या माहितीपत्रकात, बायबलच्या संदेशाचा एक धावता सारांश सादर करण्यात आला आहे. पण, प्रत्येक विषयावर बायबल काय शिकवते याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न येथे करण्यात आलेला नाही.
उदाहरणार्थ, पुढील प्रश्नांना बायबल काय उत्तर देते हे जाणून घेण्यास कदाचित तुम्ही उत्सुक असाल: देवाला माझी खरोखर काळजी आहे का? मृत्यूनंतर माणसाचे अस्तित्व राहते का? आनंदी जीवनाचे रहस्य काय?
या आणि अशा इतर मनोवेधक प्रश्नांची उत्तरे यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकात तुम्हाला आढळतील. सदर पुस्तकात एकेक विषय घेऊन त्याचा सविस्तर खुलासा करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या मांडणीमुळे विशिष्ट विषयावर बायबल काय सांगते याचे तपशीलवार परीक्षण करणे शक्य होते. हे पुस्तक मागवायचे असल्यास कृपया खाली दिलेले कुपन भरून उचित पत्त्यावर पाठवावे.
कसल्याही बाध्यतेविना, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाची एक प्रत मला पाठवावी