वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत २४
  • ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • प्रतिफळावर दृष्टी ठेवा!
    यहोवाचे गुणगान करा
  • नवे जग डोळ्यांपुढे ठेवा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • बक्षिसावर लक्ष केंद्रित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत २४

गीत २४

ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

(२ करिंथकर ४:१८)

१. ज्योती परतेल नेत्रांची,

गाईल स्तुती जिव्हा मुकी.

नव्याने सूर स्पर्शता

सुखावतील बधिर कानां.

पायांत नाही त्राण ज्यां,

आतुरतील धावण्या

स्वतः पाहू नंदनवनी,

ध्येया ठेवता लोचनी.

२. वैराण वाळवंटातुनी

वाहील खळाळुनी पाणी.

सारी धरा ही मोहरेल,

गिरीमाथीही पीक डोलेल.

खेळेल मूल तान्हेसे

सिंहासंगे निर्भयपणे.

स्वतः पाहू नंदनवनी,

ध्येया ठेवता लोचनी.

३. होईल वृद्ध कायाही

कोमल नवी बाल्यापरी.

गेले निजुनी प्रिय जे,

पुन्हा घेतील श्‍वास ते.

हे आशीर्वाद याहाचे

विपुल, सर्वकाळाचे,

आम्हा मिळतील नंदनवनी,

ध्येया ठेवता लोचनी.

(यश. ११:६-९; ३५:५-७; योहा. ११:२४ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा