वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lv पृ. २४६-पृ. २४९ परि. १
  • रक्‍ताचे अंश आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रक्‍ताचे अंश आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया
  • देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • मिळती जुळती माहिती
  • रक्‍ताबद्दल देवाचा दृष्टिकोन
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • जिवंत देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
देवाच्या प्रेमात टिकून राहा
lv पृ. २४६-पृ. २४९ परि. १

परिशिष्ट

रक्‍ताचे अंश आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया

रक्‍ताचे अंश. हे अंश तांबड्या पेशी, पांढऱ्‍या पेशी, प्लेटलेट व प्लास्मा या रक्‍ताच्या चार मुख्य घटकांतून काढले जातात. उदाहरणार्थ, तांबड्या पेशींमध्ये हेमोग्लोबीन प्रथिने असतात. मानव किंवा प्राण्यांच्या हेमोग्लोबीनपासून तयार केलेली औषधे पंडुरोग किंवा खूप रक्‍तस्राव झालेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येतात.

प्लास्मा या रक्‍ताच्या घटकात ९० टक्के पाणी असते. त्यात कित्येक होर्मोन्स, अजैव क्षार, एन्झाईम्स आणि इतर पौष्टिक पदार्थ उदाहरणार्थ, खनिजे व शर्करा असतात. शिवाय ॲल्ब्‌युमिन यांसारखी प्रथिने, रक्‍त गोठण्यास सहायक ठरणारे पदार्थ, तसेच रोगांचा प्रतिकार करणारे प्रतिजैव पदार्थ देखील प्लास्मात असतात. एखाद्याचे विशिष्ट रोगापासून रक्षण करण्यासाठी डॉक्टर त्या रोगाचा प्रतिकार करू शकणाऱ्‍या व्यक्‍तीच्या प्लास्मामधून गॅमा ग्लोब्युलिन काढतात आणि ते रूग्णाला देतात. पांढऱ्‍या कोशिकांपासून इंटरफेरॉन आणि इंटरल्युकिन हे पदार्थ मिळतात; हे पदार्थ विशिष्ट संसर्गजन्य रोगांवर व कॅन्सरवर उपचार करण्याकरता वापरले जातात.

रक्‍ताचे अंश असलेल्या उपचारपद्धती ख्रिश्‍चनांनी स्वीकाराव्यात का? बायबल याविषयी सविस्तर माहिती देत नाही त्यामुळे प्रत्येकाने देवासमोर आपल्या विवेकानुसार निर्णय घेतला पाहिजे. काही जण कदाचित सर्वच अंश नाकारतील; ते म्हणतील, की देवाने इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात सांगितले होते, की एखाद्या प्राण्यातून काढलेले सर्व रक्‍त “जमिनीवर ओतून द्यावे.” (अनुवाद १२:२२-२४) तर इतर जण, संपूर्ण रक्‍ताचे किंवा त्याच्या प्रमुख घटकांचे संक्रमण नाकारतील पण रक्‍ताचा एखादा अंश असलेल्या उपचारपद्धती स्वीकारतील. ते म्हणतील, की रक्‍तातून काढलेले अंश काही काळानंतर ज्या प्राण्याच्या रक्‍तातून काढण्यात आले होते त्या प्राण्याच्या जीवनाला सूचित करत नाहीत.

रक्‍ताचे अंश स्वीकारायचे किंवा नाहीत याबद्दलचा निर्णय घेताना पुढील प्रश्‍नांचा विचार करा: रक्‍ताचे सर्व अंश मी नाकारतो याचा अर्थ, मी रोगांचा प्रतिकार करण्यासाठी दिली जाणारी किंवा रक्‍तस्राव थांबवण्यासाठी रक्‍त गोठवणारी काही औषधेही (ज्यांत रक्‍तापासून बनवलेले पदार्थ असतात) स्वीकारणार नाही, याची जाणीव मला आहे का? रक्‍ताचे एक अथवा अनेक अंश मी का नाकारतो अथवा स्वीकारतो हे मी डॉक्टरांना समजावून सांगू शकेन का?

शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया. यांत हेमोडायल्यूशन व सेल साल्वेज या प्रक्रियांचा समावेश होतो. हेमोडायल्यूशनमध्ये रूग्णाचे काही रक्‍त शरीरातून एका पिशवीत भरले जाते. आणि रूग्णाच्या शरीरातील बाकीच्या रक्‍ताचे प्रमाण वाढवण्याकरता त्यात एक द्रव मिसळला जातो. शस्त्रक्रियेच्या शेवटी पिशवीतील रक्‍त पुन्हा रूग्णाच्या शरीरात पाठवले जाते. सेल साल्वेज या प्रक्रियेत, शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णाच्या जखमेतून किंवा शरीराच्या पोकळीतले रक्‍त गोळा केले जाते, ते गाळून अथवा फिल्टर करून पुन्हा रूग्णाच्या शरीरात टाकले जाते. प्रत्येक डॉक्टरची या प्रक्रियेची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे, ख्रिश्‍चनांनी त्यांचे डॉक्टर कोणती पद्धत अवलंबणार आहेत हे विचारले पाहिजे.

या प्रक्रियांविषयी निर्णय घेताना स्वतःला विचारा: ‘माझे काही रक्‍त माझ्या शरीराच्या बाहेर वळवले जाईल व कदाचित काही काळापुरता रक्‍तस्राव थांबवला जाणार असेल तर माझा विवेक मला या रक्‍ताला अजूनही माझ्या शरीराचाच भाग समजेल का व त्यामुळे मला ते “जमिनीवर ओतून द्यावे” लागणार नाही?’ (अनुवाद १२:२३, २४) ‘एखाद्या वैद्यकीय उपचारादरम्यान माझ्याच शरीरातले काही रक्‍त काढले जाते, त्यात काही औषधे मिसळली जातील व पुन्हा माझ्या शरीरात वळवले जात असेल तर माझा बायबल प्रशिक्षित विवेक मला ही उपचार पद्धती स्वीकारण्याची परवानगी देईल का? माझ्या स्वतःच्या रक्‍ताचा उपयोग करून दिल्या जाणाऱ्‍या सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारपद्धती जर मी नाकारणार असेन तर याचा अर्थ मी, रक्‍ताची चाचणी, हेमोडायलेसीस किंवा हार्ट-लंग बायपास मशीन हे उपचार देखील घेणार नाही, हे मला माहीत आहे का?’

२४७ पानांवरील रेखाचित्र

एखाद्या शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेत आपल्या स्वतःच्या रक्‍ताचा कशा प्रकारे वापर केला पाहिजे हा निर्णय एका ख्रिश्‍चनाने स्वतः घेतला पाहिजे. स्वतःच्या शरीरातून थोड्या प्रमाणात रक्‍त घेऊन आणि मग कदाचित त्यात काही फेरफार करून व ते पुन्हा शरीरात टोचण्याच्या वैद्यकीय चाचण्या व औषधोपचार स्वीकारायचे किंवा नाहीत याबाबतीत एक ख्रिश्‍चन स्वतःच निर्णय घेईल.

डॉक्टरांना विचारण्यासाठी सुचवलेले काही प्रश्‍न

तुम्हाला जर शस्त्रक्रिया करावी लागणार असेल किंवा एखादा उपचार घ्यावा लागणार असेल ज्यात रक्‍तातील पदार्थांचा वापर करण्यात आला आहे तर तुम्हाला रक्‍त संक्रमण दिले जाऊ नये म्हणून तुम्ही सर्व कायदेशीर कागदपत्रे जसे की हेल्थ केअर प्रॉक्सी पूर्ण भरलेले आहे किंवा नाही याची खातरी करावी. याशिवाय, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना पुढील प्रश्‍न विचारू शकता:

  • मी यहोवाचा साक्षीदार असल्यामुळे मला कोणत्याही परिस्थितीत रक्‍त संक्रमण (संपूर्ण रक्‍त, तांबड्या पेशी, पांढऱ्‍या पेशी, प्लेटलेट्‌स किंवा प्लास्मा) दिले जाऊ नये, हे उपचारपद्धतीत गोवलेल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांना माहीत आहे का?

  • रक्‍ताचे अंश असलेले एखादे औषध घेण्यास मला सांगण्यात आले असेल तर या औषधात कोणकोणते घटक आहेत? हे औषध मला किती प्रमाणात दिले जाईल व कशा प्रकारे दिले जाईल?

  • माझा विवेक मला रक्‍तातील एखादा अंश घेण्याची परवानगी देत असेल तर यांमध्ये कोणते वैद्यकीय धोके आहेत? कोणते पर्यायी उपचार उपलब्ध आहेत?

वर उल्लेखण्यात आलेल्या गोष्टींविषयी निर्णय घेण्याआधी, यहोवाला प्रार्थना करून त्याला तुमच्या मनातील चिंता सांगा. जे विश्‍वासाने त्याच्याजवळ ‘मागत राहतात’ त्यांना तो आवश्‍यक ती बुद्धी देण्याचे वचन देतो.—याकोब १:५, ६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा