शेवटचे पृष्ठ
कुटुंबाला, प्राचीन मानवी संस्था म्हणून ओळखले जाते, पण आज ते संकटात आहे. किशोरवयीनांमध्ये मादक पदार्थांचा दुरुपयोग आणि अनैतिकता यांची भयानक वाढ, घटस्फोट आणि कौटुंबिक हिंसाचाराची आधुनिक साथ, एक पालकीय कुटुंबांच्या संख्येतील विलक्षण वाढ तसेच इतर गंभीर समस्यांमुळे, कौटुंबिक जीवन निभावेल का असा काहींना प्रश्न पडलाय.
असे असले तरी, एखाद्या कुटुंबाला स्थिर राहून आपल्या सदस्यांकरता परिपोषक वातावरण निर्माण करता येणे शक्य आहे का? कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य माहीत झाल्यावर ते शक्य आहे. हे रहस्य कुठे दडवून ठेवण्यात आलेले नाही. अनेकानेक शतकांपासून त्याचा अवलंब करून ते यशस्वी शाबीत करण्यात आले आहे. ते आहे तरी काय? कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक तुम्हाला त्याचे उत्तर देईल. हे “रहस्य” अनेक आव्हानात्मक कौटुंबिक समस्या सोडवण्यास मदत करू शकते याची व्यावहारिक उदाहरणेही या पुस्तकात दिली आहेत. ही माहिती आज कुणाला नकोशी वाटेल का?