देवाच्या कळपाचा एकतेमध्ये सांभाळ करणे
कोणी विचारतातः ‘यहोवाच्या साक्षीदारांची जागतिक मंडळीची व्यवस्था कशी ठेवली जाते?’ आम्ही सांगतोः पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीच्या उदाहरणाला अनुसरुन आजची नियमन व्यवस्था आहे.
१८७० च्या दशकात चार्लस् टी रसेल व त्यांच्या सोबत्यांनी पवित्र शास्त्राच्या अभ्यासातून त्यांना मिळालेल्या फलनिष्पत्तीचा, भाषणे व छापील साहित्याद्वारे प्रसार करण्यात पुढाकार घेतला. त्या देशात सर्वत्र असलेले व या कामाशी संलग्न होण्याचा निर्णय घेतलेले लोक, रसेल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चमूकडे, ते प्रभूच्या कामामध्ये अनुभवी व आपल्या कामामध्ये सल्ला देण्यास योग्य आहेत या दृष्टीने पाहात.
१८८४ मध्ये पेनसिल्वेनियाच्या कॉमनवेल्थच्या कायद्यानुसार झायन्स वॉच टावर ट्रॅक्ट सोसायटी संघटित करण्यात आली. ही सोसायटी तसेच पवित्र शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या कार्याच्या मार्गदर्शनाशी रसेल व त्याच्या जबाबदार सहकाऱ्यांचा घनिष्ठ संबंध होता. १९०९ मध्ये त्यांनी प्रधान कार्यालय न्यूयॉर्क येथील ब्रुकलिनमध्ये हलवले. तेव्हापासून आजतागायत वॉचटावर संस्थेचे संचालक व इतर आध्यात्मिक पात्रता असलेले अभिषिक्त निकट सहकारी यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळाचे सदस्य या अर्थी काम करीत आहेत.
नियमन मंडळ हे अभिषिक्त ख्रिस्ती पुरुषांच्या एका गटाचे बनलेले असते. वॉचटावर संस्थेच्या संचालक मंडळातील ७ लोकांचा समावेश त्यात असतो. (१९८६ मध्ये त्या गटात १३ लोक होते.) यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्यावर ते देखरेख ठेवतात. ते इश्वरप्रेरित नसल्यामुळे अचूक असे नाहीत. परंतु भूतलावरील सर्वोच्च प्रमाण म्हणून ते देवाच्या वचनावर भरवसा ठेवतात, तसेच देवाच्या इच्छेच्या अधीन राहण्याचा त्यांना आयुष्यभराचा अनुभव आहे. त्यातील प्रत्येकाचा यहोवाच्या साक्षीदारांबरोबर पूर्ण वेळ सेवेचा ४० वर्षांहून अधिक अनुभव आहे.
संस्था जे प्रकाशित करते त्यावर नियमन मंडळ देखरेख ठेवते. कळपाच्या आध्यात्मिक गरजा ओळखून त्यावर आधारीत लिखाण केले जाते. तसेच ते देवाच्या वचनाचा प्रार्थनापूर्वक अभ्यास व संशोधनातून निर्माण झालेले असते. ही माणसे पवित्र शास्त्राचा सतत अभ्यास करत असताना तसेच देवाचा उद्देश जसजसा साध्य होत असल्याचे, जागतिक घटनांमध्ये भविष्यवाद पूर्ण होत असल्याचे व देवाच्या लोकांची जगातील स्थिती ते पाहतात तेव्हा त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे काही शिकवणींच्या समजूतींमध्ये फेरबदल करण्याची गरज त्यांना भासते. अशा रितीने सत्याचे ज्ञान वाढत जाते.—स्तोत्रसंहिता ९७:११; नीतीसूत्रे ४:१८; दानीएल १२:४.
जगभर २०० पेक्षा अधिक देश व बेटांमध्ये ९० पेक्षा अधिक शाखा दप्तरे आहेत. त्यातील प्रत्येकामध्ये कामाच्या देखरेखीसाठी, आध्यात्मिक पात्रता असलेल्या तीन वा अधिक पुरुषांच्या शाखा समितीची नेमणूक नियमन मंडळाने केलेली आहे. या शाखा आपापल्या देखरेखीखाली असलेल्या मंडळ्यांशी संपर्क ठेवतात. नियमन मंडळ व शाखा समिती यांच्यामध्येही नियमित संपर्क असतो. तसेच परिस्थितीची माहिती असावी म्हणून नियमन मंडळाचे सदस्य दर वर्षी अनेक शाखांना भेटी देतात.
ही माणसे इतरांच्या विश्वासावरील धनी नसून इतर अनेकांना देवाच्या वचनाची माहिती व्हावी म्हणून झटून काम करणारे उपाध्याय आहेत. ते धनलाभासाठी काम करीत नाहीत. पण इतर बेथेल गृहातील सदस्यांप्रमाणेच त्यांच्याहि भौतिक गरजा पुरवल्या जातात. जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांमधील आवेश, एकता, नैतिक मूल्यांचा उच्च स्तर व पवित्र शास्त्राच्या शिकवणींशी एकनिष्ठता पाहता ते विश्वासूपणे काम करीत आहेत हे सिद्ध होते.—१ करिंथकर ३:५-९; ४:१, २; २ करिंथकर १:२४; ३:१-३; १ पेत्र ५:२, ३.
● कोणती नियमन व्यवस्था निर्माण झाली?
● आज नियमन मंडळावर कोण काम करतात व त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या?
● इतर देशातील कार्याची देखरेख कशी केली जाते?
[२६ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
यहोवाचे साक्षीदार देवाची इच्छा आचरीत आहेत अशी क्षेत्रे
[२६ पानांवरील चित्रं]
वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष
सी टी रसेल, १८८४-१९१६
जे एफ रदरफोर्ड, १९१६-१९४२
एन एच नॉर, १९४२-१९७७
एफ डब्ल्यु फ्रान्झ, १९७७-
[२७ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील कामावर ज्यांच्यामार्फत देखरेख केली जाते अशा ९० पेक्षा अधिक शाखा दप्तरामधील काही
कॅनडा
झांबिया
जर्मनी
जपान
ऑस्ट्रेलिया
ब्राझिल