पाप आणि मरणापासून आमची मुक्तता कशी होते?
३५ पहिला मानव आदाम याने पाप केले हे तुमच्या लक्षात आहे का? त्याने जीवन व नंदनवन गमाविले आणि आपणही सर्व मरतो कारण आपण त्याची मुले आहोत.—रोमकर ५:१२; ३:२३
३६ दुसऱ्या कोणा अव्यंग (परिपूर्ण) माणसाने स्वतःचे जीवन आपल्यासाठी अर्पण केले किंवा खंडणी भरून मृत्युपासून आपली सुटका केली तरच ते अव्यंग जीवन आपल्याला पुन्हा प्राप्त होऊ शकेल.—१ करिंथकर १५:४५; रोमकर ५:१९, २१
३७ येशू हा देवाचा पुत्र होता. तो अव्यंग मानव होता. त्याने पाप केले नाही.—इब्रीयांस ५:९; ७:२६
३८ देवाला ओळखत नसलेल्या लोकांच्या हातून येशूने मरण पत्करले.—प्रे. कृत्ये २:२३
हेच ते आपल्यासाठी केलेले त्याचे समर्पण.—१ तीमथ्य २:६
३९ एका खोदलेल्या गुहेत किंवा थडग्यात येशूचे दफन करण्यात आले. तीन दिवस तो मेलेला होता. त्यानंतर देवाने त्यास पुन्हा जिवंत केले.—प्रे. कृत्ये २:२४
४० तो स्वर्गास परत गेला. आता आज्ञाधारक लोकांची मदत करावी अशी देवाला तो विनंती करू शकतो.—इब्रीयांस ९:२४; १ योहान २:१, २