वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • my कथा १८
  • याकोब हारानला जातो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • याकोब हारानला जातो
  • बायबल कथांचं माझं पुस्तक
  • मिळती जुळती माहिती
  • याकोबाला आध्यात्मिक मूल्यांची कदर होती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • याकोबाचं मोठं कुटुंब
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने धाडस दाखवलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • मनापासून केलेल्या प्रयत्नांना यहोवा केव्हा आशीर्वादित करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
बायबल कथांचं माझं पुस्तक
my कथा १८
याकोब हारानच्या लोकांशी लाबान आणि राहेलबद्दल बोलत आहे

कथा १८

याकोब हारानला जातो

याकोब ज्यांच्याशी बोलतो आहे, ती माणसं कोण आहेत ते तुम्हाला माहीत आहे का? बरेच दिवस प्रवास केल्यानंतर, एका विहिरीपाशी याकोब त्यांना भेटला. ते लोक आपल्या मेंढरांची राखण करत होते. याकोबानं विचारलं, ‘तुम्ही कोठले आहात?’

ते म्हणाले, ‘हारान.’

‘तुम्हाला लाबान माहीत आहे का?’ याकोबानं विचारलं.

‘होय,’ ते उत्तरले. ‘पहा, त्याची मुलगी राहेल, त्याच्या मेंढरांच्या कळपाबरोबर येत आहे.’ दूरवर राहेल येत असलेली, तुम्हाला दिसते का?

राहेल आपल्या वडिलांची मेंढरं चारत आहे

याकोबानं आपला मामा लाबान याच्या मेंढरांसह राहेलीला पाहिलं तेव्हा, मेंढरांना पाणी पिता यावं म्हणून, त्यानं विहिरीवरचा धोंडा बाजूला लोटला. मग राहेलीचा मुका घेऊन, आपण कोण आहोत, ते याकोबानं सांगितलं. तिला खूप आनंद झाला, आणि तिनं घरी जाऊन आपले वडील लाबान यांना सांगितलं.

याकोबाला ठेवून घेण्यात लाबानाला अतिशय आनंद वाटला. आणि याकोबानं राहेलीशी लग्न करण्याची परवानगी मागितली तेव्हा, लाबान खूष झाला. परंतु लाबानानं, राहेलीकरता याकोबाला आपल्या शेतात सात वर्षं काम करायला सांगितलं. राहेलीवर त्याचं अतिशय प्रेम असल्यानं, याकोबानं ते केलं. पण लग्नाची वेळ आल्यावर काय झालं, तुम्हाला माहीत आहे का?

लाबानानं राहेलीऐवजी याकोबाला आपली मोठी मुलगी लेआ दिली. याकोबानं लाबानासाठी आणखी सात वर्ष काम करण्याचं कबूल केल्यावर, लाबानानं त्याला राहेलही बायको म्हणून दिली. त्या काळी, देवानं माणसांना एकापेक्षा जास्त बायका करू दिल्या. परंतु आता, बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे, एका माणसाला एकच बायको असली पाहिजे.

उत्पत्ति २९:१-३०.

अभ्यासासाठी प्रश्‍न

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा