शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
संघटित व आनंदी कुटुंब असण्यात अप्रतिम सुंदरता खरीच आहे. तथापि, आजचे कौटुंबिक जीवन मोठमोठ्या दबावाखाली भरडले जात आहे. “कुटुंब निभावू शकेल काय?” असे कित्येक देशात लोक विचारतात सुद्धा. कौटुंबिक व्यवस्थेत यशप्राप्ती होण्याचा आत्मविश्वास बाळगण्याजोगे प्रत्येक कारण आम्हापाशी आहे. याच मनोदयाने आम्ही हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. कुटुंबात उद्भवणाऱ्या समस्यांना सोडविण्यासाठी आवश्यक वाटणाऱ्या सूचना व मार्गदर्शनाच्या सर्वोत्तम उगमाकडे वाचकांचे ते लक्ष वेधवून घेते. तुमच्याही कुटुंबात सौख्यानंदाची भर टाकण्यात हे पुस्तक बहुमोल साहाय्य करील अशी आम्ही प्रामाणिक इच्छा व आशा बाळगून आहोत.
—प्रकाशक