प्रस्तावना
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी समस्या येतात. आजारामुळे, एखाद्या अपघातामुळे, नैसर्गिक विपत्तीमुळे किंवा हिंसेमुळे.
असं का होतं याचं उत्तर लोक शोधत असतात.
काही जण दुःखासाठी नशिबाला दोष देतात. तर काहींना असं वाटतं की आपल्यासोबत जे घडतं त्यावर आपला काहीच ताबा नाही.
काही जण कर्मावर विश्वास ठेवतात. ते म्हणतात, की आपण या जन्मात किंवा मागच्या जन्मात केलेल्या चुकांमुळे आज आपल्याला दुःख भोगावं लागतं.
पण समस्या का येतात याचं उत्तर लोकांना मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या मनात आणखी प्रश्न निर्माण होतात.