वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g20 क्र. १ पृ. १४-१५
  • तणावमुक्‍त जीवन शक्य आहे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तणावमुक्‍त जीवन शक्य आहे!
  • सावध राहा!—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२०
  • देवाच्या राज्यात “विपुल शांती असेल”
    सावध राहा!—२०१९
  • तणाव, चांगला आणि वाईट
    सावध राहा!—१९९८
  • तणावाचा सामना कसा करता येईल?
    सावध राहा!—२०२०
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२०
g20 क्र. १ पृ. १४-१५
एक लहान मुलगा आणि त्याचे वडील समुद्रात खेळत आहेत आणि आई व मुली किनाऱ्‍यावर बसून त्यांना पाहत आहेत.

तणाव कसा कमी कराल?

तणावमुक्‍त जीवन शक्य आहे!

बायबलमध्ये दिलेल्या मार्गदर्शनामुळे आपल्याला विनाकारण येणारा तणाव टाळायला मदत होते. हे खरं आहे की आपण स्वतःच्या बळावर आपल्या जीवनातून तणाव काढू शकत नाही. पण आपला निर्माणकर्ता तो काढू शकतो. त्याने आपली मदत करण्यासाठी एका व्यक्‍तीची निवड केली आहे. ती व्यक्‍ती म्हणजे येशू ख्रिस्त. तो जेव्हा पृथ्वीवर मानव म्हणून होता तेव्हा त्याने बरीच आश्‍चर्यकारक कामं केली. आणि लवकरच तो संपूर्ण जगात त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात अद्‌भुत कामं करणार आहे. जसं की:

येशूने आजारी लोकांना बरं केलं होतं आणि भविष्यातही तो तसं करेल.

“लोक त्याच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे आजार व दुखणी . . . घेऊन आले आणि त्याने त्यांना बरे केले.”—मत्तय ४:२४.

येशू सर्वांना राहायला घर आणि पुरेसं अन्‍न देईल.

“ते [येशूच्या राज्यातली प्रजा] घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही.”—यशया ६५:२१, २२.

येशूच्या राज्यात संपूर्ण पृथ्वीवर शांती आणि सुरक्षा असेल.

“त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो. समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो . . . त्याचे वैरी धूळ चाटोत.”—स्तोत्र ७२:७-९.

येशू अन्याय पूर्णपणे काढून टाकेल.

“दुबळा व दरिद्री यांच्यावर तो दया करेल, दरिद्र्‌यांचे जीव तो तारेल. जुलूम व जबरदस्ती यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करेल.”—स्तोत्र ७२:१३, १४.

येशू दुःख आणि मृत्यू काढून टाकेल.

“मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”—प्रकटीकरण २१:४.

अतिशय तणावाचा काळ

गॅलप नावाच्या कंपनीचे संपादक मोहम्मद एस युनिस म्हणतात: “आज जगात कधी नव्हे इतक्या जास्त प्रमाणात आपल्याला तणाव, दुःख, चिंता, त्रास पाहायला मिळतोय.”

तणाव येणं आज सर्वसामान्य का झालं आहे? बायबलमध्ये याचं समाधानकारक उत्तर दिलं आहे. २ तीमथ्य ३:१ या बायबलमधल्या वचनात सांगितलं आहे, की “शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण [तणावपूर्ण] काळ येईल हे लक्षात ठेव.” मग बायबलमध्ये पुढे म्हटलं आहे की तणाव येणं सर्वसामान्य झालं आहे कारण आज लोकांमध्ये वाईट वृत्ती आहे. यात लोभ, गर्व, देवाची भक्‍ती करण्याचा दिखावा करणं, हिंसक, कुटुंबासाठी प्रेम नसणं आणि असंयमी असणं अशा वृत्तींचा समावेश आहे. (२ तीमथ्य ३:२-५) लवकरच देव या पृथ्वीवर आपलं सरकार स्थापित करणार आहे व येशू ख्रिस्त या पृथ्वीवर राज्य करेल. तेव्हा या शेवटच्या दिवसांचा अंत होईल.—दानीएल २:४४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा