वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g19 क्र. १ पृ. ३
  • आपली सुरक्षा धोक्यात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपली सुरक्षा धोक्यात
  • सावध राहा!—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • पैशांची अडचण—देवाचं राज्य याबद्दल काय करेल?
    आणखी विषय
  • प्रवाळ खडकांच्या संरक्षणार्थ काय केले जाऊ शकते?
    सावध राहा!—१९९६
  • इंटरनेटची तुम्हाला खरोखरच गरज आहे का?
    सावध राहा!—१९९७
  • असमानता—देवाचा उद्देश?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०१९
g19 क्र. १ पृ. ३

समस्या

आपली सुरक्षा धोक्यात

“आजच्या पिढीने तंत्रज्ञान, विज्ञान आणि आर्थिक व्यवस्थेत कधी नव्हे इतकी वाढ पाहिली आहे, . . . आणि तरीही ही कदाचित पहिली पिढी असेल जिने जगाला [राजनैतिक, आर्थिक आणि पर्यावरण] विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे.”​—द ग्लोबल रिस्क्स रिपोर्ट २०१८, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम.

आज जगातील बरेच सुशिक्षित लोक आपल्या आणि या पृथ्वीच्या भविष्याबद्दल इतके चिंतित का आहेत? आज आपल्यासमोर असलेल्या काही समस्यांचा विचार करा.

  • पासवर्ड टाकलेलं कंप्युटर

    सायबर गुन्हे: ऑस्ट्रेलिया देशातल्या एका वृत्तपत्राने असं म्हटलं की, “इंटरनेट वापरणं दिवसेंदिवस खूप धोक्याचं बनत चाललं आहे. मुलांचं शोषण करणाऱ्‍या, लोकांना धमकावणाऱ्‍या, त्यांना त्रास देणाऱ्‍या आणि कंप्युटरची माहिती हॅक करणाऱ्‍या लोकांसाठी ते एक घर बनलं आहे.” आज लोकांची ओळख चोरणं हा जगातला सर्वात गतीने वाढणारा गुन्हा आहे. इंटरनेटमुळे लोकांना आपल्या वाईट इच्छा अगदी निर्दयीपणे आणि क्रूरपणे पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे.

  • बरेच लोक पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत

    आर्थिक पातळीत असमानता: ऑक्सफॅम इंटरनॅश्‍नल रिपोर्टनुसार, जगातल्या ५० टक्के लोकांजवळ एकूण जितका पैसा आहे, तितकाच पैसा जगातल्या ८ सर्वात श्रीमंत लोकांकडे आहे. त्या रिपोर्टमध्ये पुढे असंदेखिल सांगितलं आहे की, आपलं अर्थशास्त्र असमान असल्यामुळे श्रीमंत लोक दिवसेंदिवस आणखी श्रीमंत बनत चालले आहेत आणि गरीब लोक आणखी गरीब. काही लोकांच्या मते या आर्थिक असमानतेमुळे लोक बंड करू शकतात.

  • बॉम्ब

    युद्ध आणि छळ: संयुक्‍त राष्ट्र शरणार्थी समितीच्या २०१८ सालच्या अहवालानुसार आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर शरणार्थी लोक कधीच नव्हते. ६ कोटी ८० लाखांपेक्षा जास्त लोकांना युद्ध आणि छळ यांमुळे आपलं घर सोडून शरणार्थी म्हणून राहावं लागत आहे. त्या अहवालानुसार जगात दर दोन सेकंदांत एका व्यक्‍तीला शरणार्थी बनण्यासाठी भाग पाडण्यात येतं.

  • प्रदूषण

    पर्यावरणाला धोका: द ग्लोबल रिस्क्स रिपोर्ट २०१८  यानुसार जगभरात प्राण्यांच्या आणि झाडांच्या अनेक जाती लुप्त होत चालल्या आहेत. तसंच, हवा व पाणी यातील प्रदूषणामुळे आज लोकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. काही देशांमध्ये कीटकांची संख्याही खूप कमी होत चालली आहे. कीटक हे झाडांच्या वाढीसाठी गरजेचे असल्यामुळे, वैज्ञानिक पर्यावरणाला होणाऱ्‍या मोठ्या धोक्याबद्दल इशारा देत आहेत.

बदल करून या जगाला सुरक्षित बनवणं आपल्याला शक्य आहे का? काहींच्या मते लोकांना शिक्षण देणं हा या समस्येचा तोडगा आहे. जर असं असेल, तर मग कोणत्या प्रकारचं शिक्षण देणं गरजेचं आहे? पुढच्या लेखांमध्ये या प्रश्‍नांची उत्तरं देण्यात आली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा