वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g17 क्र. ३ पृ. १०-११
  • न्यूझीलंडला भेट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • न्यूझीलंडला भेट
  • सावध राहा!—२०१७
सावध राहा!—२०१७
g17 क्र. ३ पृ. १०-११
मिलफोर्ड साऊंड, न्यूझीलंड

मिलफोर्ड साऊंड

देश आणि लोक

न्यूझीलंडला भेट

जवळजवळ ८०० वर्षांपूर्वी माओरी जमातीचे लोक, हजारो मैलांचा समुद्री प्रवास करून एका भूप्रदेशात येऊन पोचले. तो भूप्रदेश होता न्यूझीलंड. माओरी लोक तिथेच स्थायिक झाले. हा भूप्रदेश ते आधी राहत असलेल्या पॉलिनेशिया या उष्ण प्रदेशापेक्षा अगदी वेगळा होता. या प्रदेशात पर्वत, हिमनद्या, बर्फ आणि गरम पाण्याचे झरे होते. मग, जवळजवळ पाच शतकांनंतर आणखी एका जमातीचे लोक दूर युरोपमधून तिथे स्थायी होण्यासाठी आले. आज न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्‍या बऱ्‍याच जणांनी पॉलिनेशियन आणि अँग्लोसॅक्सन म्हणजे जर्मन कुळातल्या लोकांची संस्कृती स्वीकारली आहे. न्यूझीलंडमध्ये जवळजवळ ९० टक्के लोक शहरात राहतात. वेलिंग्टन शहर हे न्यूझीलंडची राजधानी आहे. या राजधानीचं वैशिष्ट्य म्हणजे, ही जगात अगदी दक्षिणेकडे असलेली राजधानी आहे.

चंदेरी नेच्याचं झाड

चंदेरी नेच्याचं झाड ३० फूट (१० मी.) पेक्षाही जास्त उंच वाढू शकतं

न्यूझीलंडच्या उत्तर बेटात असलेली उकळणाऱ्‍या चिखलाची डबकी

उत्तर बेटात असलेली उकळणाऱ्‍या चिखलाची डबकी

उडता न येणारा टकाहे पक्षी

उडता न येणारा टकाहे पक्षी लुप्त झाल्याचं १९४८ पर्यंत मानलं जायचं

न्यूझीलंडमधले निसर्गाचे देखावे खूप भिन्‍न आणि लक्ष वेधून घेणारे असे आहेत. आणि म्हणूनच ही गोष्ट आश्‍चर्य करण्यासारखी नाही, की न्यूझीलंड या दुर्गम देशात दरवर्षी जवळजवळ ३० लाख पर्यटक येतात.

उडता न येणारा टकाहे पक्षी

उडता न येणारा टकाहे पक्षी लुप्त झाल्याचं १९४८ पर्यंत मानलं जायचं

न्यूझीलंडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे अनेक निरनिराळे वन्यजीव आहेत. त्यांच्यातला एक म्हणजे पालीसारखा सरपटणारा ट्यूटारा. हा प्राणी १०० वर्षांपर्यंत जगू शकतो! तसंच, उडता न येणाऱ्‍या पक्षांच्या सर्वात जास्त जाती इथे आहेत. इथे काही स्थानिक सस्तन प्राणीसुद्धा आहेत. जसं की, वटवाघळाच्या काही जाती आणि देवमासा व डॉल्फीन यांसारखे समुद्रातले काही मोठे मासे.

अल्हॅझेन

यहोवाचे साक्षीदार न्यूझीलंडमध्ये जवळपास १२० वर्षांपासून सेवा करत आहेत. ते जवळजवळ १९ भाषांमध्ये बायबल शिकवतात. त्या भाषांमध्ये काही पॉलिनेशियाच्या भाषांचाही समावेश होतो. जसं की नियुॲन, रारोटाँगन, सामोअन आणि टॉनगन. ◼

माओरी लोक एक गाणं सादर करताना

पारंपरिक पोशाखात माओरी लोक एका गाण्यावर नृत्य सादर करताना

तुम्हाला माहीत होतं का?

नेदरलँड्‌समधल्या झीलंड प्रांताच्या नावावरून न्यूझीलंड हे नाव पडलं. न्यूझीलंडसाठी असलेल्या एओटीएरोआ या माओरी नावाचा अर्थ, “लांब सफेद ढगांचा देश” असा होतो.

न्यूझीलंडचे बहुतेक लोक इंग्रजी भाषा बोलत असले, तरी मूळ भाषा माओरी ही पुन्हा वापरात आली आहे. आणि आता ती शाळेतही शिकवली जात आहे. यहोवाच्या साक्षीदारांची अधिकृत वेबसाईट jw.org माओरी भाषेत उपलब्ध आहे.

  • लोकसंख्या: ४७ लाख

  • राजधानी: वेलिंग्टन

  • देश: उत्तर बेट ज्वालामुखींचा आणि उष्णतेचा, तर दक्षिण बेट हजारो हिमनद्यांचा प्रदेश आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा