वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g16 क्र. ४ पृ. १०-११
  • एक आश्‍चर्यकारक घटक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक आश्‍चर्यकारक घटक
  • सावध राहा!—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • कोणाजवळ पेन्सिल आहे का?
    सावध राहा!—२००७
  • तुमच्या उत्कृष्ट तांबड्या रक्‍त कोशिका
    सावध राहा!—२००६
  • दृष्टीपलीकडील सृष्टीवर एक नजर
    सावध राहा!—२०००
  • हिरे इतके महाग का असतात?
    सावध राहा!—१९९७
सावध राहा!—२०१६
g16 क्र. ४ पृ. १०-११

एक आश्‍चर्यकारक घटक

कार्बनचे अणू

“जीवनासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व घटकांपैकी कार्बन हा सर्वात आवश्‍यक घटक आहे,” असं नेचर्स बिल्डिंग ब्लॉक्स या पुस्तकात म्हटलं आहे. कार्बनमध्ये असलेल्या असाधारण वैशिष्ट्यांमुळे तो स्वतःशी आणि इतर रासायनिक घटकांशी सहज जोडला जातो. यामुळेच कार्बनच्या आणि इतर धातूंच्या लाखो संयुगांचा सतत शोध लावला जातो किंवा ती बनवली जातात.

आपण या खालील उदाहरणांत पाहू शकतो की, कार्बनचे अणू वेगवेगळ्या आकारात एकत्र येऊ शकतात. जसं की साखळी, पिरॅमिड, गोलाकार, नळ्यांचा आकार आणि इतर अनेक आकार. कार्बन खरोखर एक आश्‍चर्यकारक घटक आहे! (g16-E No. 5)

हिरा

एक हिरा

कार्बनचे अणू पिरॅमिडच्या आकारात एकत्र येतात ज्यांना टेट्राहेड्रॉन्स म्हणतात. या रचनेमुळेच हिरा हा नैसर्गिक रीतीने तयार होणारा सर्वात कठीण पदार्थ आहे. एक सर्वोत्तम हिरा म्हणजेच कार्बनच्या अणूंनी मिळून बनलेला एक परमाणू.

ग्रॅफाईट

एक शिस्याची पेन्सिल

घट्टपणे एकत्र असलेले कार्बनचे अणू सैल थरांवर मांडलेले असतात. पेपरच्या गठ्ठ्यावरून जसे पेपर निसटू शकतात तसे हे अणू निसटू शकतात. याच गुणधर्मामुळे ग्रॅफाईट शिस्याच्या पेन्सिलमधलं मुख्य घटक आहे आणि ते वंगणाचंदेखील काम करते.a

ग्राफिन

एक पेन्सिलने काढलेली रेघ

हे कार्बनचे अणू एका थरात षटकोनी जाळीच्या आकारात विणलेले असतात. ग्राफिनची ताण सहन करण्याची शक्‍ती स्टीलच्या कित्येक पट जास्त असते. पेन्सिलने जेव्हा पेपरवर लिहिलं जातं तेव्हा त्यात थोड्या प्रमाणात ग्राफिनचे एक किंवा अनेक थर असतात.

फुलरेन्स

फुलरेन्स

कार्बनचे हे अणू सूक्ष्म गोळ्यांच्या आणि नळ्यांच्या आकारात असतात ज्यांना नॅनोट्युब्स म्हणतात. त्यांचा आकार नॅनोमीटर्समध्ये मोजला जातो. १०० करोड नॅनोमीटर म्हणजे एक मीटर.

जीवसृष्टी

जिवंत पेशी ज्यांमध्ये कार्बन असतो

झाडं, प्राणी आणि माणसं यांची रचना ज्या पेशींपासून केली जाते त्यांचा मुख्य घटक म्हणजे कार्बन. हा घटक कार्बोहायड्रेट्‌स, चर्बी आणि अमायनो ॲसिड्‌स यांमध्ये आढळतो.

“[देवाचे] सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.”—रोमकर १:२०.

a ऑक्टोबर २००७ मधल्या सावध राहा! अंकात “कोणाजवळ पेन्सिल आहे का?” हा लेख पाहा

एक तारा

कार्बन—ताऱ्‍यांच्या अचूक रचनेमुळे उत्पन्‍न होतो

कार्बनची निर्मिती हेलियम वायूची तीन केंद्रके एकत्र आल्याने होते. शास्त्रज्ञ असं मानतात की ही प्रक्रिया रेड जायंट्‌स नावाच्या मोठ्या ताऱ्‍यांमध्ये होते. पण हेलियम एकत्र येण्यासाठी एका विशिष्ट परिस्थितीची गरज असते. “भौतिक नियमांमध्ये जर थोडेदेखील बदल झाले असते म्हणजे अगदी सूक्ष्म बदल, तर हे विश्‍व, जीवन आणि मानवदेखील अस्तित्वात नसते,” असं भौतिकशास्त्रज्ञ पॉल डेविस यांनी लिहिलं. या अचूक रचनेला आपण काय म्हणू शकतो? काही म्हणतात हे सर्व आपोआप घडलं. काहींना त्यात एक बुद्धिमान निर्माणकर्त्याचा पुरावा दिसतो. तुम्हाला यापैकी कोणता दृष्टिकोन योग्य वाटतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा