वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g04 ७/८ पृ. ३२
  • देवाच्या वचनाचा कसून अभ्यास करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या वचनाचा कसून अभ्यास करा!
  • सावध राहा!—२००४
सावध राहा!—२००४
g04 ७/८ पृ. ३२

देवाच्या वचनाचा कसून अभ्यास करा!

एकमेव खऱ्‍या देवाची उपासना करा (इंग्रजी), हे पुस्तक तुम्हाला असे करायला मदत करेल. बायबलच्या विद्यार्थ्यांना देवाच्या वचनांतील शिकवणुकी आपल्या जीवनात लागू करण्यास मदत करण्याकरता हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. पश्‍चिम आफ्रिकेच्या नायजेरियातील एका बायबल शिक्षकाने असे म्हटले: “हे पुस्तक मला खूप आवडले कारण यातील प्रत्येक अध्यायात विचाराला चालना देणारे प्रश्‍न असल्यामुळे जो कोणी हे पुस्तक वाचेल त्याला, वाचलेली माहिती ग्रहण करून त्यावर मनन करायला मदत मिळेल.”

अनेक वर्षांपासून बायबल शिक्षक असलेल्या एका भगिनीने म्हटले: “हे पुस्तक किती सोप्या भाषेत लिहिले आहे! या पुस्तकातून विद्यार्थ्यांबरोबर अभ्यास घेणं खरोखर खूप आनंददायक आहे.”

“आपल्या सर्वांना तोंड द्यावा लागणारा वादविषय,” “देवाने दुष्टाईला परवानगी का दिली यावरून आपण काय शिकतो,” “पुनरुत्थानाच्या आशेची शक्‍ती,” “सल्ला ऐका, शिक्षेचा स्वीकार करा,” यांसारख्या अध्यायांचे परीक्षण केल्यावर तुम्हालाही या पुस्तकाविषयी कदाचित वरील लोकांप्रमाणेच वाटेल. अधिक माहितीसाठी तुम्ही, एकमेव खऱ्‍या देवाची उपासना करा (इंग्रजी) या १९२ पानी पुस्तकाची एक प्रत खालील कुपन भरून ते या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवून मागवू शकता. (g०४ ४/८)

□ कसल्याही बाध्यतेविना, मी एकमेव खऱ्‍या देवाची उपासना करा (इंग्रजी) या पुस्तकाविषयी अधिक माहितीची विनंती करत आहे.

□ कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

पुस्तकाचे मुखपृष्ठ: U.S. Navy photo

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा