वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g04 १/८ पृ. ३२
  • येशूचे जीवन बहुमोल देणगी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूचे जीवन बहुमोल देणगी
  • सावध राहा!—२००४
सावध राहा!—२००४
g04 १/८ पृ. ३२

येशूचे जीवन बहुमोल देणगी

जवळजवळ २००० वर्षांपूर्वी, देवाने मानवजातीला एक सर्वश्रेष्ठ देणगी दिली—आपला पुत्र येशू ख्रिस्त याचे जीवन त्याने मानवजातीसाठी दिले; यामुळे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणे शक्य झाले आहे. (योहान ३:१६) या देणगीबद्दल कृतज्ञ असलेल्या अनेकांनी आपल्या मित्रांना व नातेवाईकांना भेट म्हणून सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाची एक प्रत भेट म्हणून दिली आहे; चार शुभवर्तमानांत येशूच्या जीवनक्रमाविषयी जे सांगितले आहे त्याचे वर्णन या पुस्तकात दिले आहे.

काही दिवसांपूर्वी एका मनुष्याने सांगितले, की तो हे पुस्तक अशा लोकांना देतो जे त्याला नाताळाचे कार्डस्‌ पाठवतात. तो त्यांना पत्राद्वारे संक्षिप्त रूपात विश्‍वकोश, डिक्शनरी, बायबल यांचे संदर्भ देऊन हे समजावून सांगतो, की त्याने नाताळ साजरा करण्याचे का सोडून दिले आहे. आणि पत्रासोबत सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाची एक प्रत त्यांना पाठवतो.

या मनुष्याने म्हटले, की त्याला विद्यापीठांतील प्राध्यापकांकडून अतिशय प्रोत्साहनदायक अशी दोन पत्रे मिळाली. एका पत्रात म्हटले होते: “तुम्ही पाठवलेली सुरेख भेट अर्थात सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक मला मिळाले. ते पाहून आम्हाला खूप आनंद वाटला. हे पुस्तक खरोखर किती सुरेख आहे. त्यातील माहितीचा आम्ही उपयोगही करू लागलो आहोत.”

या पुस्तकात येशूने दिलेली प्रवचने आणि दाखले तसेच त्याने केलेल्या चमत्कारांची देखील माहिती दिली आहे. या पुस्तकातली माहिती होता होईल तितकी कालक्रमानुसार आहे. त्यातली चित्रे अतिशय सुंदर आहेत; येशू आणि त्याच्या काळच्या लोकांच्या भावना व्यक्‍त करण्यासाठी या चित्रांवर बरेच काळजीपूर्वक संशोधन केले आहे.

तुम्हाला या ४४८ पृष्ठांच्या पुस्तकाविषयी आणखी माहिती हवी असेल तर कृपया खालील कूपन भरा आणि या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर ते पाठवा. (g०३ १२/२२)

□ कसल्याही बाध्यतेविना, मी सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाविषयी अधिक माहितीची विनंती करत आहे.

□ कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा