त्या सर्वांनी ते घेतले
बेसल, स्वित्झर्लंड येथील एका शाळेत एका शिक्षिकेने अशी घोषणा केली की विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या कोणत्याही विषयावर १० ते १५ मिनिटांचे भाषण तयार करावे. पंधरा वर्षीय रोझीने, “तुमचे तारुण्य—त्यापासून सर्वोत्तम लाभ मिळवणे,” हा विषय निवडला.
“हा कसला विषय?” तिच्या वर्गमित्रांनी विचारले. “तू ड्रग्जविषयी बोलणार आहेस का?”
ती त्यांना म्हणाली: “पाहा तर मी कशावर बोलणार आहे ते.”
भाषणाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मग रोझी म्हणाली: “आपल्या तारुण्याचा सर्वात उत्तम उपयोग कसा करायचा हे सांगण्यासाठी खरे तर पंधरा मिनिटे पुरेशी नाहीत.” म्हणून, “मी तुमच्या सर्वांसाठी एक भेट आणली आहे,” असे ती म्हणाली. तिने, प्रत्येक विद्यार्थ्याला एक, अशाप्रकारे एकूण २० तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे या पुस्तकांचे वाटप केले. प्रत्येक पुस्तकाच्या आत तिने प्रत्येक वर्गमित्राचे नाव लिहून पुस्तकाला छानपैकी वेष्टन लावले होते.
सर्वांनी तिचे आभार मानत पुस्तक घेतले आणि सर्व जण पुस्तकातील अनुक्रमणिका पाहत असल्याचे तिने पाहिले. “मला माझ्या पालकांकडून अधिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल?,” “मला खरे मित्र कसे बनवता येतील?,” “मी कोणती कारकीर्द निवडावी?,” “विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?,” “खरे प्रेम असल्याचे मी कसे ओळखावे?,” यांसारखे विषय या पुस्तकात दिले आहेत.
या पुस्तकात एकूण ३९ अध्याय आहेत. तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर सोबतचे कूपन भरा आणि कूपनावरील किंवा या मासिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर ते भरलेले कूपन पोस्टाने पाठवा.
□कृपया मला तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे पुस्तकाविषयी आणखी माहिती पाठवावी.
□मोफत गृह बायबल अभ्यासासाठी माझ्याशी संपर्क साधा.