वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g02 ७/८ पृ. ३२
  • विवाहांकरता संजीवनी ठरणारे पुस्तक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विवाहांकरता संजीवनी ठरणारे पुस्तक
  • सावध राहा!—२००२
सावध राहा!—२००२
g02 ७/८ पृ. ३२

विवाहांकरता संजीवनी ठरणारे पुस्तक

अमेरिकेतील लुइझिॲना येथील लेस्ली नावाच्या एका स्त्रीला गेल्या वर्षी टुलेन विद्यापीठातून एक फोन आला. फोन करणाऱ्‍या स्त्रीने म्हटले, की टुलेन व आणखी एक विद्यापीठ लुइझिॲनातील नव्याने लग्न झालेल्या दांपत्यांचा सर्व्हे घेत आहे.

लेस्लीने सर्व्हेत भाग घेण्यास होकार दिल्यानंतर, तिला एक प्रश्‍नावळी पाठवण्यात आली; तिने ती प्रश्‍नावळी भरून त्याच्यासोबत कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य नावाचे पुस्तक पाठवून दिले. तिने सांगितले, की ती आणि तिचा पती यहोवाचे साक्षीदार होते व त्या दोघांनी विवाहाची तयारी करताना या पुस्तकाचा अभ्यास केला होता.

काही आठवड्यांनंतर, या सर्व्हेचे आयोजन करणाऱ्‍या व्यवस्थापकांकडून लेस्लीला एक पत्र आले, ज्यांत असे लिहिले होते: “विवाहाला मजबूत व सुदृढ बनवण्यासाठी तुमच्यासारख्या दांपत्यांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळेल अशी आम्ही आशा करतो. तुम्ही दोघं वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीचे असूनही सुखाने नांदत आहात हीच गोष्ट सर्वात महत्त्वपूर्ण आहे, कारण विवाहात सहसा याच गोष्टीमुळे तणाव निर्माण होत असतो. पण लग्नाच्या आधी तुम्ही दोघांनी तयारी केली, आणि तेही आम्हाला पाठवलेल्या पुस्तकातल्या माहितीनुसार तुम्ही तयारी केली त्यामुळे विवाहात येणारी प्रत्येक समस्या तुम्ही यशस्वीरीत्या हाताळू शकता. आणि, विवाहात देवाला महत्त्वाचे स्थान देणेही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हा दोघांचा विश्‍वास मजबूत असल्यामुळे व मदतीसाठी तुम्ही देवावर अवलंबून असल्यामुळे तुम्ही दोघंही नशीबवान आहात.

“तुम्ही मला पाठवलेले पुस्तक मी नेहमी माझ्या टेबलावरच ठेवतो, आणि माझे विद्यार्थी माझ्याकडे विवाहाविषयी मार्गदर्शन विचारायला येतात तेव्हा मी त्यांना ते दाखवतो. मी असले पुस्तक पूर्वी कधीही पाहिले नव्हते. खरंच हे अप्रतिम आहे.”

तुम्हालाही या पुस्तकातली माहिती मौल्यवान वाटेल याची आम्हाला खात्री आहे. आणखी माहितीसाठी खालील कूपन भरा आणि कूपनवर दिलेल्या पत्त्यावर किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वर दिलेल्या उचित पत्त्यावर पाठवा. समस्या सोडवण्यासाठी व निर्माणकर्त्याच्या मर्जीप्रमाणे कौटुंबिक जीवन सुखी बनवण्यासाठी तुम्हाला विशिष्ट सूचना दिल्या जातील. (g०२ ४/२२)

□ कृपया मला कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाची आणखी माहिती पाठवावी.

□ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा