रद्दीच्या दुकानात सापडले
भारतातील चेन्नई येथील एका तामीळ भाषिक तरुणाला ऑगस्ट ८, १९९९ चा सावध राहा! अंक तेथे सापडला. ते मासिक आणि त्याने प्राप्त केलेले इतर अंक पडताळून पाहिल्यावर त्याने यहोवाच्या साक्षीदारांच्या भारतातील शाखा दफ्तराला लिहिलेल्या पत्रात आपले मत व्यक्त केले.
त्याने लिहिले, “सावध राहा! हे मासिक अत्यंत ज्ञानवर्धक आणि उपयोगी आहे. त्यातील विषय फारच मदतीचे ठरले आहेत. अभिनंदन!”
मग त्या तरुणाने अशी विनंती केली: “जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहंचणारे हे माहितीपूर्ण मासिक माझ्याही पुस्तकांच्या संग्रहात असावे अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत प्रकाशित केलेली मासिके वाचल्यावर पुढील अंक मिळवायला मला आवडेल.”
प्रत्येक मासिकाच्या पृष्ठ ४ वर सांगितल्याप्रमाणे, सावध राहा! हे मासिक अनेक विषयांची माहिती देते. तरीपण, त्यामध्ये हा उद्देश दिला आहे की: “सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे नियतकालिक, निर्माणकर्त्याच्या शांती व निर्भयतेच्या नवीन जगाच्या अभिवचनावर आत्मविश्वास वाढवते, जे सध्याच्या दुष्ट व भक्तिहीन व्यवस्थीकरणाला काढून टाकील.”
देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे ३२-पानी माहितीपत्रक देवाच्या या उद्देशाविषयी खासकरून सांगते आणि त्याची संमती मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे याबद्दल बायबलमधून माहिती देते. सोबत दिलेले कूपन भरून त्यावर दिलेल्या किंवा या मासिकाच्या पृष्ठ ५ वर दिलेल्या उचित पत्त्यावर पोस्ट करून तुम्ही या माहितीपत्रकाबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.
□ देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाबद्दल मला अधिक माहिती पाठवा.
□ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.