सावध राहाने! एकाचा जीव कसा वाचला
“मला माझ्या कुटुंबावर बोजा बनायचे नव्हते म्हणून मला वाटलं आत्महत्या हाच एक उपाय आहे.” नेपाळमधील एका मनुष्याने असे लिहिले. तो पुढे म्हणाला: “मी एक दोर आणला आणि कोठे व कोणत्या तारखेला आत्महत्या करायची ते ठरवलं. पण तो दिवस येण्याच्या एक आठवड्याआधी मला सावध राहा! मासिकाचा मार्च ८, २००० अंक मिळाला.”
त्यातले लेख खास “आत्महत्येच्या विळख्यात सापडतात कोण?” या विषयावर होते. तो मनुष्य असे लिहितो: “मी मनाचे धाडस करून ते मासिक घेऊन वाचले. आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्या दहा संभाव्य कारणांचा माझ्या मनावर प्रभाव पडला आणि मी माझे मन बदलले.” त्याने शेवटी असे लिहिले: “तुम्ही माझ्यावर किती मोठे उपकार केलेत याबद्दल आभार मानल्याशिवाय मला राहावले नाही. हा लेख लिहिण्याचे परिश्रम घेतल्यामुळे माझा जीव वाचला!”
आज आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे आणि याला अनेक कारणे आहेत. त्याचे एक कारण म्हणजे अनेकांना वाटते की जीवनात काही उद्देश नाही. जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? या माहितीपत्रकामुळे अनेकांना चांगल्या जीवनाची आशा आहे हे समजायला मदत मिळाली आहे. सोबत दिलेले कुपन भरून त्यावरील पत्त्यावर किंवा या मासिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर ते पोस्ट करून तुम्ही या माहितीपत्रकाविषयी अधिक माहिती मागवू शकता. (g०१ १०/८)
□ जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? या माहितीपत्रकाविषयी मला अधिक माहिती पाठवा.
□ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.