वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g01 १/८ पृ. ३२
  • ‘तुम्ही सर्वांना प्रेम दाखवता’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘तुम्ही सर्वांना प्रेम दाखवता’
  • सावध राहा!—२००१
सावध राहा!—२००१
g01 १/८ पृ. ३२

‘तुम्ही सर्वांना प्रेम दाखवता’

युगोस्लाव्हियामधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला प्रशंसेचे हे उद्‌गार असलेले एक पत्र मिळाले. त्या देशात शतकानुशतकांपासून विविध जातीच्या लोकांमध्ये संघर्ष होत आहे. त्या पत्रात असे म्हटले होते:

“माननीय महोदय,

सारायेवो या माझ्या गावी मी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल पुष्कळ ऐकले होते. पण तुमच्या विश्‍वासांमध्ये मला मुळीच रस नव्हता. मात्र गेल्या उन्हाळ्यात जर्मनीमधील तुमच्या एका अधिवेशनाला मी गेलो आणि माझे मत एकदम बदलले. तेथे क्रोएशिया, युगोस्लाव्हिया आणि बॉस्निया येथील लोक एकमेकांच्या शेजारी बसून एकमेकांना बंधू-बहिणी म्हणतात हे पाहून मी खूपच प्रभावित झालो. असे दृश्‍य मी कोठेच पाहिले नव्हते! तुमच्यातील आपसातले प्रेम दाखवून देते की राजकारणाचा तुमच्यावर काहीच फरक पडत नाही. तुम्ही सर्वांना दाखवत असलेल्या प्रेमासाठी देव तुमचे भले करो!”

वर्षानुवर्षांपासून द्वेषभाव बाळगलेल्या देशांमधून असे काही ऐकायला मिळते तेव्हा असे वाटते की, युद्ध नसलेले जग कधी येईल का? हेच एका ३२-पानी माहितीपत्रकाचे शीर्षक आहे. युद्ध नसलेले जग स्थापन केले जाईल त्याविषयी त्यात सबळ पुरावा दिला आहे. पण कसे आणि केव्हा?

या ३२ पानी माहितीपत्रकाविषयी तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, कृपया सोबत दिलेले कुपन भरून त्यावरील पत्त्यावर किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील पत्त्यावर ते पोस्ट करा.

(g०० ११/८)

□ विल देअर एव्हर बी अ वर्ल्ड विदाऊट वॉर? या माहितीपत्रकाविषयी मला अधिक माहिती पाठवा.

□ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा