वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 १२/८ पृ. ३२
  • तंबाखूमुळे भारत आणि चीन धोक्यात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तंबाखूमुळे भारत आणि चीन धोक्यात
  • सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 १२/८ पृ. ३२

तंबाखूमुळे भारत आणि चीन धोक्यात

भारतातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

पश्‍चिमी देशांत तंबाखूविषयी जाहिरातींवर वाढता प्रतिबंध येत आहे; शिवाय, धूम्रपान केल्याने कोण कोणते आजार जडतात याबद्दल लोकांना जागरूक केले जात आहे. यामुळेच तंबाखू उत्पादन करणाऱ्‍या मोठमोठ्या कंपन्यांनी आता पूर्वेकडे वाट काढली आहे. विश्‍व बँकेच्या सौजन्याने घेतलेल्या अभ्यासातून असा अंदाज काढण्यात आला, की २०१० पर्यंत प्रती वर्ष चीनमध्ये तंबाखूने मरणाऱ्‍यांची संख्या १० लाख इतकी होऊ शकते. चीनमध्ये २९ वयाखाली असणारे १० कोटी लोक धूम्रपानामुळे मरण पावतील असे द ब्रिटिश मेडिकल जर्नलने सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने असा अंदाज व्यक्‍त केला की चीनसोबत जवळजवळ एक अरब लोकसंख्येच्या भारतात देखील “तंबाखूने उद्‌भवणाऱ्‍या आजारांत कधी नव्हे इतकी विलक्षण वाढ होण्याची शक्यता आहे.” अहवाल असे दाखवून देतात की प्रत्येक वर्षी तेथील सुमारे दोन कोटी मुलं सिगारेट पिण्यास सुरू करतात. कित्येक वर्षांपासून दक्षिण भारतातल्या एका व्यक्‍तीला सिगारेट पिण्याची सवय होती. धूम्रपान पूर्णपणे सोडण्यास मदत करणाऱ्‍या एका लेखामुळे त्याने पत्राद्वारे सावध राहा! चे आभार मानले. जानेवारी ८, १९९९ च्या अंकात “आम्ही सवय मोडली—तुम्हीपण मोडू शकता!” हा लेख प्रकाशित झाला होता.

धूम्रपान का चुकीचे आहे? यावर विचार करण्यास प्रवृत्त करतील अशी काही कारणे, देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रिकेच्या पान २५ वर दिले आहे. वरील माहितीपत्रिकेविषयी तुम्हाला जास्त माहिती हवी असल्यास कृपया पुढील कूपन भरून ते टपालाने दिलेल्या पत्त्यावर आम्हाला पाठवून द्यावे अथवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर ते मागवावे.

□ देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रिकेविषयी मला जास्त माहिती पाठवा.

□ मला एक मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे; तरी यासंबंधी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा