वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ११/८ पृ. ३१
  • अखेर विध्वंसाचा अंत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अखेर विध्वंसाचा अंत
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • आपली पृथ्वी टिकून राहील असं देवाने वचन दिलंय
    सावध राहा!—२०२३
  • पृथ्वी ग्रहाचा सर्वनाश ठरलेला?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • पृथ्वी ग्रह शेवटच्या घटका मोजत आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • समुद्रातले स्वादिष्ट धावपटू
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 ११/८ पृ. ३१

अखेर विध्वंसाचा अंत

ब्रिटनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

“गेल्या २५ वर्षांच्या काळात, मनुष्याने निसर्गाचा चक्क एक तृतियांश भाग नष्ट केला आहे.”

वर्ल्डवाईड फंड फॉर नेचरच्या अहवालावर आधारित असलेली ही धक्केदायक आकडेवारी, जागतिक पर्यावरणाचा अभिनव संख्याशास्त्रीय अभ्यासात अर्थात लिर्व्हिग प्लॅनेट इंडेक्सचे प्रकाशन झाले तेव्हा उघडकीस आली.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीवरील अरण्य क्षेत्रे १० टक्क्यांनी घटली आहेत. पण ही आकडेवारी, उष्णकटिबंधातील पर्जन्यारण्ये वा शुष्कारण्ये यांत होणारी प्रचंड हानी दाखवत नाही; या शिवाय, प्राण्यांच्या विश्‍वात १० टक्क्यांहून अधिक होणारी हानी तर वेगळीच, असे लंडनचे दि इंडिपेन्डेंट वृत्तपत्र म्हणते. समुद्रजीवनांत देखील ३० टक्के हानी झाली असून ही गोष्ट अटलांटिक महासागरातील ब्लूफिन ट्यूना मासा आणि आशियाई महासागरातील लेदरबॅक कासव यांच्या नष्ट होत चाललेल्या जातींवरून स्पष्ट होते. पण, गोड्यापाण्याच्या परिस्थितीकी सूचीत तर सर्वात जास्त घट झालेली आढळते; ५० टक्क्यांचीही घट खासकरून वाढत्या कृषी आणि औद्योगिक प्रदूषणामुळे आणि त्यासोबतच पाण्याच्या बेसुमार वापरामुळे झाली असल्याचे म्हटले जाते.

लंडनच्या क्यु रॉयल बोटॅनिकल गार्डन्सचे संचालक सर गिल्यन प्रान्स म्हणतात: “नैसर्गिक परिस्थितीकीचे संवर्धन करणे ही फक्‍त श्रीमंत लोकांना परवडणारी चैनीची गोष्ट नाही; पण, पृथ्वीग्रहावरील अत्यावश्‍यक परिस्थितीकी कार्ये अर्थात ज्यावर आपल्या सर्वांचे अस्तित्वच अवलंबून आहे ती सुरळीत चालली आहेत की नाहीत ही खात्री करण्यासारखी एक गरजेची गोष्ट आहे.” तेव्हा, निसर्गाचे संवर्धन करणे हे पृथ्वीच्या प्रत्येक रहिवाशाचे कर्तव्य आहे. पण, यावर एखादा कायमस्वरूपी तरणोपाय नाही का?

बायबलमध्ये प्रकटीकरण या शेवटल्या पुस्तकात पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा उल्लेख करण्यात आला आहे. भविष्यातील अशा एका काळाकडे बायबल आपले लक्ष वेधते जेव्हा पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचाच नाश केला जाईल. (प्रकटीकरण ११:१८) मग, या नाशातून कोणाचा बचाव होईल का? निश्‍चित. कारण यामागे खुद्द ‘सर्वसमर्थ, यहोवा परमेश्‍वराचा’ हात असेल; पर्यावरणसंबंधित समस्यांवर केवळ त्याच्याजवळच उपाय आहे आणि तो अंमलात आणण्याचे सामर्थ्य देखील. (प्रकटीकरण ११:१७) प्रकटीकरण २१:३ त्या काळाचे वर्णन करते जेव्हा देव ‘मानवजातीबरोबर वस्ती करील आणि ते त्याचे लोक होतील.’

मग, ‘त्याचे लोक’ होण्यासाठी तसेच सध्या पर्यावरणाचा होत असलेला ऱ्‍हास पालटल्याचे चित्र पाहण्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे? त्यासाठी, या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वर दिलेल्या पत्त्यावर पत्र लिहून तुमच्या परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा. किंवा मग, पुढच्या वेळी ते तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांच्याशी बोला. लवकरच देव जो नाश आणणार आहे त्यातून बचावण्यासाठी तुम्ही आता कोणते पाऊल उचलले पाहिजे हे जाणून घेण्यास मोठ्या आनंदाने ते तुमची मदत करतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा