वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १२/८ पृ. ३२
  • “सावध राहा! सर्व दृष्टीने उत्तम आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सावध राहा! सर्व दृष्टीने उत्तम आहे”
  • सावध राहा!—१९९८
सावध राहा!—१९९८
g98 १२/८ पृ. ३२

“सावध राहा! सर्व दृष्टीने उत्तम आहे”

वरील उद्‌गार, नायजेरिया या आफ्रिकन देशातल्या बेनिन शहरात राहणाऱ्‍या एका १६ वर्षांच्या मुस्लिम तरुणाचे आहेत. यहोवाच्या साक्षीदारांच्या नायजेरियन शाखा दफ्तरास लिहिलेल्या आपल्या पत्रात त्याने असे म्हटले:

“मला पहिल्यांदाच सावध राहा! मासिक वाचण्याचा योग आला तो माझ्या मित्राच्या घरी; मी त्याच्याकडून नऊ अंक वाचायला घेतले. चक्क एका दिवसात मी हे नऊच्या नऊ अंक वाचून काढले! पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे सावध राहा! सारखे उत्कृष्ट मासिक तयार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला आहे त्या सर्वांची तसेच यहोवाची मला प्रशंसा करावीशी वाटते. तुम्ही ज्याप्रकारे पर्यावरणाच्या विषयांचा संबंध बायबलशी आणि देवाशी जोडता यांमुळे मी खास प्रभावित झालो. नायजेरियन कॉनसर्व्हेशन फाऊंडेशनचा एक सदस्य असल्यामुळे मला माझी स्वतःची एक पर्यावरणविषयक/निसर्गविषयक लायब्ररी तयार करायची आहे आणि त्यासाठी मी सतत अशा साहित्यांच्या शोधात असतो. माझी खात्री पटली आहे, की सावध राहा! सर्व दृष्टीने उत्तम आहे. दर महिन्याला या मासिकाचे दोन दोन अंक कसे मागवता येतील हे कृपया मला कळवावे.”

कदाचित तुमचीही सावध राहा! मासिक वाचण्याची ही पहिलीच वेळ असेल. तुम्हाला याची आणखीन एक प्रत हवी असल्यास पुढील पत्त्यावर किंवा पृष्ठ ५ वर दिलेल्या उचित पत्त्यावर कृपया याची मागणी करावी: Praharidurg Prakashan Society, plot A/35, Nr. Industrial Estate, Nangargaon, Lonavla 410 401, Mah. India. आम्ही जरूर तुम्हाला याची आणखीन एक प्रत पाठवू किंवा मग तुमची इच्छा असल्यास, आपण जगत आहोत तो काळ कोणत्या दृष्टीने महत्त्वाचा आहे याची चर्चा करण्यासाठी कुणाला तरी तुमच्या घरी पाठवू.

□ मला सावध राहा! मासिकाचा चालू अंक पाठवा.

□ मला एक मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे; तरी यासंबंधी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

पृथ्वी: Courtesy of Replogle Globes, Inc.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा