‘यांमुळे दृष्टिकोनाची क्षितिजे रुंदावतात’
सोव्हिएत युनियनचे पूर्वीचे प्रजासत्ताक अर्थात किर्गीस्तान येथील व्यवस्थापनेच्या काराकूल संस्थेतील विदेशी भाषा विभागाचे प्रमुख यांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांची प्रशंसा केली. रशियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तराला त्यांनी पुढीलप्रमाणे पत्र पाठवले:
“आजच्या सामाजिक आणि आर्थिक गोंधळाच्या परिस्थितीत, तुमची पुस्तकं आणि माहितीपत्रकं आम्हाला इंग्रजी, जर्मन, रशियन, किर्गीज आणि टर्किक भाषा शिकण्यास साह्य करतात. . . . प्रत्यक्षात भाषांतराचा अभ्यास करणाऱ्यांकडून तुमच्या माहितीपत्रकाला जास्त मागणी आहे. . . . जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी), कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य, आणि तरुणांचे प्रश्न—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी) या पुस्तकांबद्दल तुमचे आभार.
“आमच्याकडे अनेक विद्यार्थी यहोवाचे साक्षीदार आहेत. ते सावध राहा! नियतकालिकातील लेख अतिशय उत्सुकतेने वाचतात आणि त्यांना गृहपाठ दिला जातो तेव्हा त्यांचा उपयोग करतात.”
प्रशंसा करण्याकरता या लेखकाने केवळ सावध राहा! नियतकालिकाची निवड केली: “मनोरंजक आणि माहितीपूर्ण लेखांबद्दल आम्ही आपले खूप आभार मानतो. . . . ते आपल्यामध्ये आशा उत्पन्न करतात आणि आपल्या सर्वसामान्य दृष्टिकोनाची क्षितिजे रुंदावतात. . . . आम्ही सर्वजण सावध राहा! नियतकालिकातील ‘जगावरील दृष्टिक्षेप’ हा भाग आवर्जून वाचतो.”
तुम्हाला सावध राहा! नियतकालिकाची प्रत हवी असेल किंवा तुमच्याबरोबर बायबलची चर्चा करण्याकरता यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधायचा असेल तर कृपया Praharidurg Prakashan Society, Plot A/35 Nr Industrial Estate, Nangargaon, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहा.