यामुळे शांतीने राहण्यास त्यांना मदत मिळाली
संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलाने ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांना असे पत्र लिहिले:
“मला तुमची पुस्तकं वाचायला फार आवडतात आणि विशेषकरून कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य पुस्तक तर मला फारच आवडतं. हे पुस्तक मिळण्याआधी मी आणि माझी थोरली बहीण सतत एकमेकांशी भांडायचो. एकदा आम्ही त्या पुस्तकाचा अभ्यास करण्याचा निश्चय केला आणि आमच्या लक्षात आलं, की देव आमच्याकडून जे काही अपेक्षित होता ते तर आम्ही मुळीच करत नव्हतो.
“या पुस्तकामुळे आम्हाला खूप खूप मदत झाली. त्यासाठी मी आभारी आहे आणि हे पुस्तक अत्युत्कृष्ट असल्यामुळे इतर कुटुंबांनाही त्याचे वाचन करण्यास मी प्रोत्साहित करतो. घरामध्ये सुखशांती राखण्यास हे पुस्तक माझ्या कुटुंबाचीही मदत करत आहे.”
कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य, हे १९२ पृष्ठांचे पुस्तक असे सहायक विषय हाताळते जसे की: “तुमच्या कुटुंबाचे विध्वंसक परिणामांपासून संरक्षण करा,” “तुमच्या घरात शांती राखा” आणि “कुटुंबाचे नुकसान करणाऱ्या समस्यांवर तुम्ही मात करू शकता.”
तुमच्यासोबत कोणी मोफत गृह बायबल अभ्यास संचालित करावा अशी तुमची इच्छा असल्यास, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहा.