वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १२/८ पृ. ३२
  • सर्वच धर्म देवाकडे नेतात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वच धर्म देवाकडे नेतात का?
  • सावध राहा!—१९९७
सावध राहा!—१९९७
g97 १२/८ पृ. ३२

सर्वच धर्म देवाकडे नेतात का?

लक्षावधी लोकांचा असा विश्‍वास आहे की सर्व धर्म, एकाच ठिकाणी नेणारे केवळ विभिन्‍न मार्ग आहेत. वस्तुतः, विविध धर्मांमधील शिकवणुकी, कर्मकांड आणि देवदैवते यांच्यात साधर्म्य आहे. उदाहरणार्थ, सा.यु. आठव्या शतकात आढळणाऱ्‍या भारतातील केरळच्या, हिंदू पौराणिक कथेतील पात्राच्या या मूर्तीकडे लक्ष द्या.

लक्षवेधक गोष्ट म्हणजे, अनेकानेक पुरातन धर्मांत बैलांची उपासना केली जात असे. उदाहरणार्थ, सा.यु.पू. पहिल्या शतकातील ग्रीक इतिहासकार डायोडोरस सिकुलस यांच्या मते, अम्मोनी दैवत मोलेख यास मानवाचे धड आणि बैलाचे डोके होते.

जगभरातील निरनिराळ्या धर्मांत इतके उल्लेखनीय साधर्म्य का आहे बरे? या धर्मांचे उगमस्थान एकच आहे का? ते एकाच ठिकाणी नेणारे निव्वळ विभिन्‍न मार्ग आहेत का? त्या सर्वांचाच देव स्वीकार करतो का?

मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी) या पुस्तकात, जगातील प्रमुख धर्मांचा उगम आणि विकास यांच्या दिलेल्या चित्तवेधक अहवालात अशा प्रश्‍नांची उत्तरे सापडतात. तुम्हाला हे पुस्तक हवे असल्यास, अथवा सदर विषयावर बायबलचे काय म्हणणे आहे याची चर्चा करण्यासाठी कोणी तुमच्या घरी यावे अशी तुमची इच्छा असल्यास, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा