“ते लिखाण उत्कृष्ट आहे”
कॅलिफोर्निया यु.एस.ए. येथील, एका वाचकाद्वारे वॉचटावर संस्थेला गुणग्राहकतेचे पत्र आले. त्यामध्ये तिने म्हटले: “अवेक! ‘एकाकीपणा—त्याबद्दल तुम्ही काय करु शकता’ या विषयावर (सप्टेंबर २२, १९९३) अलिकडे नियतकालिकांचा मी किती आनंद घेत आहे हे तुम्हाला सांगण्यास मला प्रवृत्त करत आहे. ते लिखाण खूपच उत्कृष्ट आहे. एकाकीपणाचे हे लेख खूपच चांगल्या पद्धतीने लिहिले आहेत व काव्यमयही आहेत. त्याशिवाय एकाकीपणाची जबाबदारी, तो अनुभवणाऱ्या व्यक्तीवर टाकण्यामध्ये त्या लेखांनी जो प्रामाणिकपणा दाखविला त्याची मला गुणग्राहकता वाटते. खरोखरच ते लेख यहोवाचे खोल प्रेम व लोकांच्या काळजीची चिंता स्पष्ट करत आहे.”
द वॉचटावर व अवेक! ही नियतकालिके यहोवाच्या साक्षीदारांद्वारे जगभरामध्ये वितरीत केली जातात. यापैकीचे पहिले, प्रचलित घडामोडीबद्दल पवित्र शास्त्र आधारित चर्चा प्रस्तुत करते. त्याचे प्रकाशन ११५ भाषांमधून १.६ कोटीपेक्षा अधिक सरासरी छपाई मध्ये होते. नंतरचे नियतकालिक, वेगवेगळ्या विषयावर शैक्षणिक माहिती प्रस्तुत करणारे असून ते ७३ भाषांमध्ये उपलब्ध आहे व त्याची छपाई सरासरी १.३ कोटी एवढी आहे.
या नियतकालिकांच्या नमून्याचे अंक प्राप्त करण्यास तुम्हाला आवडत असेल तर, कृपया तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाशी संपर्क साधा, किंवा पृष्ठ ५ वर पत्त्याची यादी दिली आहे त्यातील तुम्हाला जवळ असणाऱ्या पत्त्यावर संपर्क साधा.