‘काळजी वाहणारा कोणी आहे हे जाणणे सांत्वनदायी आहे’
काही लोक निर्श्चित दिसतात, परंतु त्यांना भयंकर भीती वाटत असते. त्यांना काय मदत करू शकते? काळजी आणि समजदारी फार महत्त्वाची आहे. मागच्या वर्षी अशाच एका व्यक्तिने, ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील वॉचटावर संस्थेला पुढील प्रमाणे लिहिले:
“आत्ताच मी, खिन्न जनांस सांत्वन [इंग्रजी] ही पत्रिका वाचली. रासायनिक असंतुलनामुळे ठराविक वेळेला होणारे नैराश्य मी सहन करत आहे. ही पत्रिका फार सांत्वनदायी आहे.
“निराशेविषयी आशा आहे व त्याला तोंड देण्याचे अनेक मार्ग आहेत हे जाणणे सांत्वनदायी आहे. तुमच्याविषयी काळजी करणारा व माझ्यासारख्या लोकांना समजून घेणारा कोणीतरी आहे हे देखील धीर देणारे आहे.”
ही पत्रिका त्रोटक असली तरी पुष्कळ काही सांगते. तुम्हाला तिची एक प्रत किंवा आणखी माहिती हवी असेल तर कृपया, Watchtower, H-58, Old Khandala Road, Lonavla, 410 401. Mah., पत्त्यावर लिहा.
[३२ पानांवरील चित्र]
खिन्न जनांस सांत्वन