प्रश्न १३
कामाबद्दल बायबल काय सांगतं?
“आपल्या कामात कुशल असलेला माणूस तू पाहिला आहेस का? तो सर्वसामान्य लोकांसमोर नाही, तर राजांसमोर उभा राहील.”
“चोरी करणाऱ्याने यापुढे चोरी करू नये. उलट, त्याने मेहनत करावी आणि आपल्या हातांनी प्रामाणिकपणे काम करावं, म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला देण्यासाठी त्याच्याजवळ काहीतरी असेल.”
“प्रत्येकाने खावं-प्यावं आणि आपल्या सगळ्या मेहनतीच्या फळाचा आनंद घ्यावा. ही देवाची देणगी आहे.”