सफन्या
१ आमोनचा+ मुलगा योशीया,+ जो यहूदाचा राजा होता, त्याच्या शासनकाळात कूशीचा मुलगा सफन्या* याला यहोवाकडून* एक संदेश मिळाला. कूशी गदल्याचा, गदल्या अमऱ्याचा आणि अमऱ्या हिज्कीयाचा मुलगा होता. सफन्याला हा संदेश मिळाला:
२ यहोवा म्हणतो, “मी पृथ्वीच्या पाठीवरून सर्वकाही नाहीसं करीन.”+
३ “मी माणसांना आणि प्राण्यांना नष्ट करीन.
आकाशातल्या पक्ष्यांना आणि समुद्रातल्या माशांना नाहीसं करीन,+
दुष्टांसोबत मी सर्व अडथळेही*+ नाहीसे करीन;
आणि मी सबंध पृथ्वीवरून मानवांचा नाश करीन,” असं यहोवा म्हणतो.
४ “मी यहूदाविरुद्ध आणि यरुशलेमच्या सर्व रहिवाशांविरुद्ध,
आपला हात उगारीन.
या ठिकाणातून मी बआलचं नामोनिशाण मिटवून टाकीन,*+
याजकांचं आणि परक्या देवांच्या पुजाऱ्यांचं नावही उरणार नाही.+
५ जे आपल्या छतांवर आकाशाच्या सैन्याला नमन करतात,+
जे एकीकडे यहोवाला नमन करून त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात;+
आणि दुसरीकडे मल्कामशीही एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात,+
६ जे यहोवाच्या इच्छेप्रमाणे चालायचं सोडून देतात;+
आणि जे यहोवाला शोधत नाहीत किंवा त्याचा सल्ला घेत नाहीत,+ त्या सर्वांचा नाश होईल.”
यहोवाने एक बलिदान तयार केलं आहे; त्याने ज्यांना आमंत्रण दिलं आहे, त्यांना त्याने पवित्र केलं आहे.
८ “यहोवाच्या बलिदानाच्या दिवशी मी सर्व अधिकाऱ्यांकडून,
राजाच्या मुलांकडून+ आणि विदेश्यांसारखा पेहराव करणाऱ्यांकडून हिशोब घेईन.
९ त्या दिवशी, जो कोणी मंचावर* चढतो त्या प्रत्येकाकडून;
आणि जे आपल्या मालकाच्या घरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि फसवणूक करतात,
त्या सर्वांकडून मी हिशोब घेईन.”
शहराच्या नवीन भागातून+ शोक करण्याचा आवाज येईल,
आणि टेकड्यांवरून मोठ्या धडाक्याचा आवाज येईल.
११ मक्तेशच्या* रहिवाशांनो रडा!
कारण सर्व व्यापाऱ्यांचा नाश करण्यात आला आहे;
आणि चांदी तोलून देणाऱ्या सर्वांना ठार मारण्यात आलं आहे.*
१२ त्या वेळी मी दिवे घेऊन यरुशलेमचा कोपरा न् कोपरा शोधीन,
आणि ‘यहोवा चांगलं करणार नाही आणि वाईटही करणार नाही,’
असा विचार करणाऱ्या बेपर्वा लोकांकडून मी हिशोब घेईन.+
१३ त्यांची संपत्ती लुटली जाईल आणि त्यांची घरं उजाड पडतील.+
ते घरं बांधतील पण त्यांत राहू शकणार नाहीत;
आणि द्राक्षमळे लावतील पण त्यांचा द्राक्षारस पिऊ शकणार नाहीत.+
१४ यहोवाचा मोठा दिवस जवळ आला आहे!+
तो जवळ आहे आणि फार वेगाने* येत आहे!+
यहोवाच्या दिवसाचा आवाज भयानक आहे.+
ऐका, योद्धा मोठ्याने ओरडत आहे!+
तो संकटाचा आणि यातनांचा दिवस आहे,+
तो वादळाचा आणि नाशाचा दिवस आहे,
तो अंधाराचा आणि काळोखाचा दिवस आहे,+
तो ढगांचा आणि भयंकर काळोखाचा दिवस आहे,+
१६ तो तटबंदीच्या शहरांविरुद्ध आणि उंच बुरुजांविरुद्ध,*+
रणशिंगाचा आणि युद्धाच्या ललकारीचा दिवस आहे.+
१८ यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचं सोनं किंवा चांदी त्यांना वाचवू शकणार नाही;+
त्याच्या आवेशाच्या आगीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल,+
कारण तो पृथ्वीवर राहणाऱ्या सगळ्या लोकांचा सर्वनाश करेल; तो नाश खरोखर भयंकर असेल.”+
२ हुकूम अंमलात येण्याआधी,
आणि दिवस भुशासारखा उडून जाण्याआधी,
यहोवाचा भयानक क्रोध तुमच्यावर येण्याआधी,+
आणि यहोवाच्या क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्याआधी,
३ अहो पृथ्वीवरच्या सर्व नम्र लोकांनो,
देवाच्या नीतिनियमांप्रमाणे* चालणाऱ्यांनो,
यहोवाला शोधा.+
नीतीने आणि नम्रतेने वागण्याचा मनापासून प्रयत्न करा.*
म्हणजे कदाचित, यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुमचं रक्षण केलं जाईल.+
४ कारण गाझा शहर उजाड होईल,
आणि अष्कलोन ओसाड पडेल.+
५ “समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्यांचा, करेथी लोकांच्या राष्ट्राचा धिक्कार असो!+
यहोवाने तुमच्याविरुद्ध न्यायदंड घोषित केला आहे.
हे कनान, हे पलिष्टी लोकांच्या राष्ट्रा, मी तुझा नाश करीन,
तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही.
६ समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशाची कुरणं होतील.*
तिथे मेंढपाळांसाठी विहिरी आणि मेंढरांसाठी मेंढवाडे असतील.
७ तो यहूदाच्या घराण्यातल्या उरलेल्यांचा+ प्रदेश होईल;
ते तिथे चरतील.
संध्याकाळी ते अष्कलोनच्या घरांमध्ये आरामात पडतील.
८ “मवाबने केलेली निंदा+ आणि अम्मोनी लोकांनी केलेला अपमान मी ऐकला आहे,+
त्यांनी माझ्या लोकांना टोमणे मारले आणि त्यांचा देश बळकावण्याच्या धमक्या दिल्या.”+
९ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “माझ्या जिवाची शपथ,
मवाब सदोमसारखा होईल,+
आणि अम्मोन गमोरासारखा होईल.+
तो जंगली झाडाझुडपांचं ठिकाण, मिठाचा खड्डा आणि कायमचा ओसाड प्रदेश बनेल.+
माझ्या लोकांमधले उरलेले त्यांना लुटतील.
आणि माझ्या राष्ट्रातले उरलेले लोक त्यांना हाकलून लावतील.
१० त्यांच्या गर्वाच्या बदल्यात हेच त्यांच्या पदरी पडेल,+
कारण त्यांनी सैन्यांचा देव यहोवा याच्या लोकांना टोमणे मारले आणि त्यांना तुच्छ लेखलं.
११ त्यांना यहोवाची दहशत बसेल;*
कारण तो पृथ्वीवरच्या सर्व देवांना नाहीसं* करेल,
आणि राष्ट्रांची सर्व बेटं आपापल्या जागेवरून त्याला नमन* करतील.+
१२ कूशच्या* लोकांनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मारले जाल.+
१३ तो उत्तरेकडे आपला हात उगारेल आणि अश्शूरचा नाश करेल,
१४ गुरंढोरं, तसंच सर्व प्रकारची जंगली जनावरं* तिच्यात पडून राहतील.
पाणकोळी आणि साळिंदर तिच्या पडलेल्या खांबांमध्ये रात्र काढतील.
खिडकीतून गाण्याचा आवाज येईल.
उंबरठ्यावर नुसतेच दगडधोंडे असतील;
कारण तो देवदाराच्या चौकटींना उघडं पाडेल.
१५ हीच ती गर्विष्ठ नगरी आहे, जी अगदी निर्धास्त बसली होती,
ती मनात म्हणायची, ‘मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय कोणीच नाही.’
आता पाहा, तिची किती भयानक अवस्था झाली आहे!
ती जंगली प्राण्यांचं विसाव्याचं ठिकाण बनली आहे.
येणारा-जाणारा प्रत्येक जण तिच्याकडे बोट दाखवून तिची थट्टा करेल.”*+
३ त्या बंडखोर, दूषित आणि अत्याचारी नगरीचा धिक्कार असो!+
२ तिला कोणाचंही ऐकायचं नव्हतं;+ तिने ताडन* स्वीकारलं नाही.+
तिने यहोवावर भरवसा ठेवला नाही;+ ती आपल्या देवाजवळ गेली नाही.+
३ तिच्यामधले अधिकारी गरजणारे सिंह आहेत.+
तिचे न्यायाधीश रात्री शिकार करणारे लांडगे आहेत.
सकाळपर्यंत ते चावायला साधं हाडही ठेवत नाहीत.
४ तिचे संदेष्टे उद्धट आणि विश्वासघातकी आहेत.+
५ तिच्यामध्ये राहणारा यहोवा नीतिमान आहे;+ तो कधीही अन्याय करत नाही.
पहाट जशी न चुकता उगवते,
तसा तो दररोज सकाळी आपले न्याय-निर्णय प्रकट करतो.+
पण तरी अनीतिमान माणसाला लाज वाटत नाही.+
६ “मी राष्ट्रांचा नाश केला; त्यांचे बुरूज उजाड झाले.
मी त्यांचे रस्ते उद्ध्वस्त केले, त्यामुळे त्यांवरून कोणी ये-जा करत नव्हतं.
त्यांची शहरं ओसाड पडली, त्यांत एकही माणूस, एकही रहिवासी उरला नाही.+
७ तिचं ठिकाण नष्ट होऊ नये म्हणून,+
मी म्हणालो, ‘आता तरी तू नक्कीच माझं भय मानशील आणि ताडन* स्वीकारशील,’+
कारण या सर्व गोष्टींचा मला तिच्याकडून हिशोब घ्यावा लागेल.*
पण ते आणखीनच दुष्टपणे वागू लागले.+
८ यहोवा म्हणतो, ‘ज्या दिवशी मी लूट घेण्यासाठी उठीन,*
त्या दिवसापर्यंत माझी धीराने वाट पाहत राहा;+
कारण मी राष्ट्रांना गोळा करण्याचा, राज्यांना एकत्र आणण्याचा,
आणि त्यांच्यावर माझा संताप, माझा सगळा क्रोध ओतण्याचा निर्णय* घेतला आहे;+
कारण माझ्या आवेशाच्या आगीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल.+
९ तेव्हा मी लोकांची भाषा बदलून त्यांना एक शुद्ध भाषा देईन,
म्हणजे ते सर्व जण यहोवा या नावाने मला हाक मारतील,
१० मला प्रार्थना करणारे, म्हणजे पांगापांग झालेले माझे लोक,
कूशच्या नद्यांच्या प्रदेशातून, माझ्यासाठी भेट आणतील.+
कारण मी तुझ्यामधून गर्विष्ठपणे बढाया मारणाऱ्यांना काढून टाकीन;
मग माझ्या पवित्र पर्वतावर, तू पुन्हा कधीही गर्विष्ठपणे वागणार नाहीस.+
१२ मी तुझ्यामध्ये नम्र आणि दीनदुबळ्या लोकांना राहू देईन,+
आणि ते यहोवा या माझ्या नावामध्ये आश्रय घेतील.
१३ इस्राएलचे उरलेले लोक+ अनीतीने वागणार नाहीत;+
ते खोटं बोलणार नाहीत किंवा आपल्या जिभेने कोणाची फसवणूक करणार नाहीत.
ते खातील* आणि आराम करतील; कोणीही त्यांना घाबरवणार नाही.”+
१४ हे सीयोनच्या मुली, आनंदाने जयजयकार कर!
हे इस्राएल, जयघोष कर!+
हे यरुशलेमच्या मुली,+ खूश हो आणि पूर्ण मनाने आनंद साजरा कर!
१५ यहोवाने तुझ्याविरुद्धचे न्यायदंड रद्द केले आहेत.+
त्याने तुझ्या शत्रूला परत पाठवलं आहे.+
इस्राएलचा राजा यहोवा तुझ्यासोबत आहे.+
यापुढे तुला संकटाची भीती वाटणार नाही.+
१६ त्या दिवशी यरुशलेमला असं म्हटलं जाईल:
“हे सीयोन, घाबरू नकोस.+
निराश होऊ नकोस.
१७ तुझा देव यहोवा तुझ्यासोबत आहे.+
एका वीर योद्ध्याप्रमाणे, तो तुला वाचवेल.
तुझ्यामुळे त्याला अतिशय आनंद होईल.+
तो आपल्या प्रेमात शांत* होईल.
तुझ्याबद्दल आनंद झाल्यामुळे तो मोठ्याने गाईल.
१८ तुझ्या सणांना येऊ न शकल्यामुळे जे दुःख करतात,+ त्यांना मी गोळा करीन;
परक्या देशात निंदा सहन करत असल्यामुळे ते तुझ्याकडे येऊ शकले नाहीत.+
१९ पाहा! त्या वेळी मी तुझ्यावर अत्याचार करणाऱ्या सर्वांना शिक्षा देईन;+
ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांना मी एकत्र करीन.+
आणि ज्या देशात त्यांना लज्जित व्हावं लागलं होतं,
त्या देशात मी त्यांना स्तुती आणि प्रतिष्ठा* मिळवून देईन.
२० ज्या वेळी मी तुम्हाला गोळा करीन,
त्या वेळी मी तुम्हाला परत आणीन.
मी तुमच्यादेखत तुमच्या बंदिवानांना परत आणीन,+
आणि अशा रितीने पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुम्हाला प्रतिष्ठा* आणि स्तुती मिळवून देईन,”+ असं यहोवा म्हणतो.
म्हणजे “यहोवाने लपवलं (जपून ठेवलं) आहे.”
शब्दार्थसूची पाहा.
हे मूर्तिपूजेशी संबंधित वस्तूंना किंवा कार्यांना सूचित करतात.
किंवा “अंशही राहू देणार नाही.”
किंवा “व्यासपीठावर; उंबरठ्यावर.” कदाचित राजासनाचा चौथरा.
हा कदाचित यरुशलेम शहराचा, मासे फाटकाजवळचा भाग असावा.
शब्दशः “गप्प बसवण्यात आलं आहे.”
किंवा “घाईघाईने.”
किंवा “कोपऱ्यांवरच्या उंच बुरुजांविरुद्ध.”
शब्दशः “आतड्या.”
शब्दशः “त्याच्या न्यायाप्रमाणे.”
शब्दशः “नीती शोधा, नम्रता शोधा.”
किंवा “भर दुपारी.”
किंवा “प्रदेशाच्या चारण्याच्या जमिनी होतील.”
किंवा “त्यांची काळजी घेईल.”
किंवा “विस्मय वाटेल.”
किंवा “दुबळं.”
किंवा “उपासना.”
किंवा “इथियोपियाच्या.”
किंवा “कोरडं.”
शब्दशः “राष्ट्रातला प्रत्येक प्राणी.”
शब्दशः “शिट्ट्या मारेल.”
किंवा “शिस्त.”
किंवा “शिस्त.”
किंवा “शिक्षा करावी लागेल.”
किंवा कदाचित, “साक्षीदार म्हणून उभा राहीन.”
किंवा “न्याय-निर्णय.”
किंवा “एकतेत माझी उपासना करतील.”
किंवा “चरतील.”
किंवा “गप्प; समाधानी; तृप्त.”
शब्दशः “जी.”
शब्दशः “एक नाव.”
शब्दशः “एक नाव.”