मीखा
१ योथाम,+ आहाज+ आणि हिज्कीया+ या यहूदाच्या राजांच्या+ शासनकाळात मोरेशेथ इथला मीखा*+ याला यहोवाचा* एक संदेश मिळाला. दृष्टान्ताद्वारे मिळालेला हा संदेश शोमरोन आणि यरुशलेम यांच्याविषयी होता:
२ “सर्व राष्ट्रांनो, ऐका!
पृथ्वी आणि तिच्यावर जे काही आहे, त्या सर्वांनी लक्ष द्यावं.
सर्वोच्च प्रभू यहोवाने तुमच्याविरुद्ध साक्ष द्यावी,+
यहोवाने आपल्या पवित्र मंदिरातून तुमच्याविरुद्ध साक्ष द्यावी.
३ कारण पाहा! यहोवा आपल्या ठिकाणाहून निघाला आहे;
तो खाली येऊन पृथ्वीच्या उच्च स्थानांवरून चालेल.
४ आगीसमोर ठेवलेल्या मेणासारखे,
आणि उतारावर ओतलेल्या पाण्यासारखे,
पर्वत त्याच्या पायांखाली वितळतील+
आणि दऱ्याखोऱ्या* दुभंगतील.
याकोबच्या बंडाला कोण जबाबदार आहे?
शोमरोनच नाही का?+
आणि यहूदामधल्या उच्च स्थानांसाठी+ कोण जबाबदार आहे?
यरुशलेमच नाही का?
६ मी शोमरोनला शेतातल्या दगडांच्या ढिगाऱ्यासारखं करीन,
मी तिला द्राक्षमळे लावायच्या जमिनीसारखं करीन;
मी तिचे दगड खोऱ्यात फेकून देईन,*
आणि तिचे पाये उघडे पाडीन.
७ तिच्या सगळ्या कोरीव मूर्तींचा चुराडा होईल,+
आणि ज्या भेटवस्तूंच्या बदल्यात तिने स्वतःला विकलं, त्या जाळून टाकल्या जातील.*+
मी तिच्या सगळ्या मूर्तींचा सर्वनाश करीन.
कारण, तिने त्या वेश्येच्या कमाईतून गोळा केल्या आहेत.
आणि त्या पुन्हा वेश्यांची कमाई होतील.”
मी कोल्ह्यांसारखा ओरडीन,
आणि शहामृगांसारखा शोक करीन.
तिची पीडा माझ्या लोकांच्या फाटकापर्यंत, यरुशलेमपर्यंत पसरली आहे.+
१० “गथमध्ये याची घोषणा करू नका;
तुम्ही मुळीच रडू नका.
बेथ-अफ्रा इथे* धुळीत लोळा.
११ शाफीरच्या रहिवाशांनो,* नग्न आणि लज्जित होऊन पलीकडे जा.
सअनानचे रहिवासी* बाहेर आले नाहीत.
बेथ-एसल तुझा आधार होता, पण आता तिथे फक्त रडण्याचा आवाज ऐकू येईल.
१२ काही चांगलं घडेल म्हणून मारोथच्या रहिवाशांनी* वाट पाहिली,
पण यरुशलेमच्या फाटकावर यहोवाकडून संकटच आलंय.
१३ लाखीशच्या+ रहिवाशांनो,* रथाला घोडे जोडा.
१४ म्हणून मोरेशेथ-गथ जायला निघेल, तेव्हा तुला भेटवस्तू द्याव्या लागतील.
अकजीबच्या+ घराण्यांनी इस्राएलच्या राजांशी बेइमानी केली.
१६ तुम्ही आपल्या लाडक्या मुलांसाठी केस काढून मुंडण करा.
गरुडासारखं टक्कल करा,
कारण त्यांना तुमच्यापासून दूर, बंदिवासात नेण्यात आलंय.”+
२ “जे दुसऱ्यांचं नुकसान करण्याचे कट रचतात,
जे बिछान्यावर पडल्या-पडल्या दुष्ट योजना करतात, त्यांचा धिक्कार असो!
पहाट होताच ते त्या योजना पूर्ण करतात,
कारण त्यांच्या हातात तसं करण्याची ताकद असते.+
२ ते शेतांची हाव धरतात आणि ती बळकावतात;+
घरांचा लोभ धरतात आणि ती ताब्यात घेतात;
ते एखाद्याची फसवणूक करून त्याचं घर,+
आणि त्याचा वारसा हिरावून घेतात.
३ म्हणून यहोवा म्हणतो:
‘आता मी या घराण्याविरुद्ध एक असं संकट आणीन,+ ज्यातून तुम्ही वाचू शकणार नाही.*+
तुम्ही पुन्हा कधी गर्विष्ठपणे चालणार नाही,+ कारण ती संकटाची वेळ असेल.+
ते म्हणतील: “आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत!+
त्याने आमच्या लोकांचा हिस्सा आमच्याकडून काढून परक्यांना दिला आहे.+
त्याने आमची शेतं विदेश्यांना दिली आहेत.”
५ त्यामुळे यहोवाच्या मंडळीत जमीन वाटून देण्यासाठी,
मोजायची दोरी ताणून धरायला तुमच्यामध्ये कोणी नसेल.
६ ते घोषणा करतात, “प्रचार थांबवा!
या गोष्टींबद्दल प्रचार करू नका;
आमचा अपमान होणार नाही!”
७ हे याकोबच्या घराण्या, तू म्हणतोस:
“यहोवा* उतावीळ झाला आहे का?
हे सगळं त्यानेच केलंय का?”
माझ्या शब्दांमुळेच नीतीने चालणाऱ्यांचं भलं होत नाही का?
८ पण अलीकडे माझेच लोक शत्रूंसारखे उठले आहेत;
जे युद्धावरून परत येणाऱ्यांसारखे न घाबरता चालतात,
त्यांचे मौल्यवान दागिने तुम्ही उघडपणे हिसकावून घेता.
९ माझ्या लोकांच्या स्त्रियांना तुम्ही त्यांच्या सुंदर घरांमधून बाहेर काढता;
त्यांच्या मुलांपासून तुम्ही माझं वैभव कायमचं हिरावून घेता.
१० उठा आणि चालते व्हा, हे आराम करायचं ठिकाण नाही.
कारण अशुद्धतेमुळे+ देशाचा नाश, खूप दुःखदायक नाश होणार आहे.+
११ जर एखादा माणूस व्यर्थ गोष्टींमागे चालून आणि फसवणूक करून, असं खोटं बोलला:
“मी तुम्हाला द्राक्षारसाबद्दल आणि मद्याबद्दल प्रचार करीन,”
तर असाच प्रचारक या लोकांना आवडेल!+
मेंढवाड्यातल्या मेंढरांप्रमाणे, मी त्यांना एकतेत ठेवीन,
ते कुरणातल्या* कळपासारखे असतील;+
तिथे लोकांचा गोंगाट असेल.’+
त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालेल,
यहोवा त्या सर्वांचं नेतृत्व करेल.”+
३ मी म्हणालो: “याकोबच्या प्रमुखांनो, कृपा करून ऐका!
आणि इस्राएलच्या घराण्याच्या शासकांनो, तुम्हीही ऐका!+
तुम्हाला न्यायाची जाणीव असायला नको का?
२ पण तुम्ही तर चांगल्याचा द्वेष करता+ आणि वाइटावर प्रेम करता;+
तुम्ही माझ्या लोकांची कातडी सोलून काढता आणि त्यांच्या हाडांवरच्या मांसाचे लचके तोडता.+
३ तुम्ही माझ्या लोकांचं मांस खाता+
आणि त्यांची कातडी सोलून काढता,
भांड्यात* शिजवण्यासाठी जसे मांसाचे तुकडे करतात,
तशी तुम्ही त्यांची हाडं तोडता आणि त्यांचे तुकडेतुकडे करता.+
४ त्या वेळी ते यहोवाला मदतीसाठी हाक मारतील,
पण तो त्यांना उत्तर देणार नाही.
५ यहोवाच्या लोकांना चुकीच्या मार्गावर जायला लावणारे संदेष्टे,+ दातांनी चावताना*+ शांतीची घोषणा करतात,+
पण ज्याच्याकडून त्यांना तोंडात घालायला काही मिळत नाही, त्याच्याविरुद्ध ते युद्धाची घोषणा करतात;*
अशा संदेष्ट्यांविरुद्ध तो म्हणतो:
६ ‘रात्र असल्याप्रमाणे तुम्ही काळोखात असाल;+ तुम्हाला दृष्टान्त दिसणार नाहीत;+
तुमच्यावर फक्त अंधार असेल, तुम्ही भविष्य सांगू शकणार नाही.
संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल,
आणि त्यांच्यासाठी दिवसाढवळ्या काळोख होईल.+
त्या सर्वांना आपलं तोंड* झाकावं लागेल,
कारण देवाकडून त्यांना काहीही उत्तर मिळणार नाही.’”
८ पण मी तर याकोबला त्याच्या बंडाबद्दल आणि इस्राएलला त्याच्या पापाबद्दल सांगण्यासाठी,
यहोवाच्या पवित्र शक्तीच्या* सामर्थ्याने,
आणि न्यायाने व धैर्याने भरून गेलो आहे.
९ याकोबच्या घराण्याच्या प्रमुखांनो, कृपा करून हे ऐका!
आणि इस्राएलच्या घराण्याच्या शासकांनो, तुम्हीही ऐका!+
तुम्हाला न्यायाची घृणा वाटते आणि सरळ असलेल्या गोष्टींना तुम्ही वाकडं करता,+
१० तुम्ही रक्तपाताने सीयोन आणि अनीतीने यरुशलेम बांधता.+
आणि इतकं असूनही, यहोवावर भरवसा ठेवून* ते म्हणतात:
“आपल्यावर कोणतंच संकट येणार नाही.+
यहोवा आपल्यासोबत नाही का?”+
१२ म्हणून, तुमच्यामुळे
सीयोनला एखाद्या शेतासारखं नांगरलं जाईल,
यरुशलेम दगडमातीचा ढिगारा होईल,+
आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या उच्च स्थानांसारखा होईल.+
तो सर्व टेकड्यांहून उंच केला जाईल,
आणि देशोदेशीचे लोक प्रवाहासारखे त्याच्याकडे येतील.+
२ आणि बऱ्याच राष्ट्रांचे लोक येतील आणि म्हणतील:
“चला, आपण यहोवाच्या पर्वतावर
आणि याकोबच्या देवाच्या मंदिराकडे जाऊ.+
तो आपल्याला त्याचे मार्ग शिकवेल,
आणि त्याने दाखवलेल्या वाटेने आपण चालू.”
कारण सीयोनमधून नियम,*
आणि यरुशलेममधून यहोवाचा शब्द निघेल.
यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध तलवार उचलणार नाही,
आणि ते युद्ध करायलाही शिकणार नाहीत.+
४ त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या द्राक्षवेलाखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल,*+
कोणीही त्यांना घाबरवणार नाही,+
कारण सैन्यांचा देव यहोवा हे बोलला आहे.
५ सर्व राष्ट्रांचे लोक आपापल्या देवाच्या नावाने चालतील,
पण आम्ही तर सदासर्वकाळ आमच्या देवाच्या, यहोवाच्या नावाने चालू.+
६ यहोवा म्हणतो, “जे* लंगडत होते,
त्यांना मी त्या दिवशी गोळा करीन,
आणि ज्यांची पांगापांग झाली होती,
तसंच, ज्यांच्याशी मी कठोरपणे वागलो होतो, त्यांनाही मी एकत्र करीन.+
७ जे* लंगडत होते त्यांच्यातल्या उरलेल्यांना मी वाचवीन,+
आणि ज्यांना दूर पाठवण्यात आलं होतं, त्यांचं मी एक मोठं राष्ट्र बनवीन;+
आतापासून सदासर्वकाळ,
यहोवा सीयोन पर्वतावर राजा म्हणून त्यांच्यावर राज्य करेल.
८ हे कळपाच्या बुरुजा,
सीयोनच्या मुलीच्या डोंगरा,+
पहिली* सत्ता येईल, हो, ती पुन्हा तुझ्याकडे येईल,+
यरुशलेमच्या मुलीचं राज्य पुन्हा तिला मिळेल.+
९ तू अशी मोठमोठ्याने का ओरडत आहेस?
तुला राजा नाही का?
की तुला सल्ला देणारा मेलाय?
म्हणूनच तुला जन्म देणाऱ्या स्त्रीसारख्या कळा येत आहेत का?+
१० हे सीयोनच्या मुली, जन्म देणाऱ्या स्त्रीसारखी,
तू अशीच तळमळत आणि कण्हत राहा,
कारण आतापासून तू शहरात नाही, तर रानात राहशील.
तू पार बाबेलपर्यंत जाशील,+
आणि तिथून तुला वाचवलं जाईल;+
तिथे यहोवा तुला तुझ्या शत्रूंच्या हातून परत विकत घेईल.+
११ बरीच राष्ट्रं तुझ्याविरुद्ध एकत्र येतील;
ती म्हणतील, ‘तिला दूषित होऊ दे,
आमच्या डोळ्यांदेखत सीयोनसोबत असं घडू दे.’
१२ पण यहोवाचे विचार त्यांना माहीत नाहीत,
त्याचा उद्देश त्यांना कळत नाही;
कारण तो त्यांना नुकत्याच कापलेल्या धान्याच्या पेंढ्यांसारखा खळ्यात* गोळा करेल.
तू पुष्कळ राष्ट्रांचा चुराडा करशील.+
त्यांची बेइमानीची कमाई तू यहोवाला अर्पण करशील;
आणि त्यांची संपत्ती तू संपूर्ण पृथ्वीच्या खऱ्या प्रभूला अर्पण करशील.”+
५ “शत्रूंनी वेढलेल्या शहराच्या रहिवाशांनो,
तुम्ही स्वतःच्या शरीरावर घाव करून घेत आहात;
आपल्याला वेढा घालण्यात आला आहे.+
ते काठीने इस्राएलच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतात.+
२ आणि तू, हे बेथलेहेम एफ्राथा,+
तू यहूदाच्या हजारोंमध्ये* मोजला जाण्यासाठी अगदी लहान आहेस,
तरी तुझ्यातून माझ्यासाठी असा एक जण येईल, जो इस्राएलचा शासक बनेल;+
त्याचा उगम* प्राचीन काळापासून, फार पूर्वीच्या दिवसांपासून आहे.
३ म्हणून जी जन्म देणार आहे, तिने जन्म देईपर्यंत
तो त्यांना सोडून देईल.
आणि त्याचे बाकीचे भाऊ इस्राएलच्या लोकांमध्ये परत येतील.
४ तो उभा राहील आणि यहोवाच्या सामर्थ्याने,
त्याचा देव यहोवा याच्या महान नावाने कळपाचं पालन करेल,+
आणि ते सुरक्षित राहतील,+
कारण आता त्याची कीर्ती पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचेल.+
जर अश्शूऱ्याने आपल्या देशावर हल्ला केला आणि जर त्याने आपले तटबंदीचे बुरूज पायाखाली तुडवले,+
तर आपण त्याच्याविरुद्ध सात मेंढपाळ आणि अधिकारी* म्हणून आठ माणसं उभी करू.
६ ते अश्शूरच्या देशाला आणि निम्रोदच्या देशाला+
त्याच्या सरहद्दींजवळ तलवारीने शिक्षा करतील,+
आणि जेव्हा अश्शूरी आपल्या देशावर हल्ला करून आपला प्रदेश पायाखाली तुडवेल,
तेव्हा तो शासक आपल्याला अश्शूऱ्यापासून वाचवेल.+
७ जसं यहोवाकडून येणारं दव,
आणि झाडाझुडपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरी
माणसांची आस धरत नाहीत,*
किंवा मानवांची* वाट पाहत नाहीत,
तसे अनेक राष्ट्रांमध्ये याकोबचे उरलेले लोक असतील.
८ जसा जंगलातल्या प्राण्यांमध्ये सिंह असतो;
जसा एखादा तरुण सिंह* मेंढरांच्या कळपांत जाऊन
त्यांच्यावर झडप घालतो आणि त्यांना फाडून टाकतो,
आणि कोणीही त्यांना सोडवू शकत नाही,
तसे याकोबचे उरलेले लोक बऱ्याच देशांमध्ये,
आणि पुष्कळ राष्ट्रांमध्ये होतील.
९ तुझ्या विरोधकांवर तू विजयी होशील,
आणि तुझ्या सर्व शत्रूंचा नाश होईल.”
१० यहोवा म्हणतो, “त्या दिवशी,
मी तुझ्या सर्व घोड्यांचा आणि रथांचा नाश करीन.
११ मी तुझ्या देशातली शहरं उद्ध्वस्त करीन
आणि तुझे सर्व तटबंदीचे बुरूज पाडून टाकीन.
१३ मी तुझ्या कोरीव मूर्ती आणि तुझे पूजेचे स्तंभ नष्ट करीन,
आणि तू आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तूंना पुन्हा कधीही नमन करणार नाहीस.+
१५ ज्या राष्ट्रांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,
त्यांच्यावर मी क्रोधाने आणि रागाने सूड उगवीन.”
६ यहोवा काय म्हणतो, ते कृपा करून ऐका!
उठा, पर्वतांसमोर खटला चालवा,
आणि टेकड्यांना तुमचा आवाज ऐकू द्या.+
२ हे पर्वतांनो, यहोवाचा वाद ऐका,
पृथ्वीच्या भक्कम पायांनो, तुम्ही ऐका,+
कारण यहोवाचा त्याच्या लोकांविरुद्ध एक खटला आहे.
तो इस्राएलच्या विरोधात वाद करेल:+
३ “माझ्या लोकांनो, मी तुमचं काय वाईट केलंय?
मी तुम्हाला कसा कंटाळा आणलाय?+
माझ्याविरुद्ध साक्ष द्या.
मी मोशे, अहरोन आणि मिर्याम+ यांना तुमच्याकडे पाठवलं.
५ माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय कारस्थान केलं होतं,+
आणि बौरचा मुलगा बलाम याने त्याला काय उत्तर दिलं होतं, ते आठवा.+
शिट्टीमपासून+ गिलगालपर्यंत+ कायकाय घडलं, हे आठवून पाहा,
म्हणजे तुम्हाला यहोवाची नीतिमान कार्यं कळतील.”
६ मी यहोवासमोर काय घेऊन येऊ?
कोणती अर्पणं आणून स्वर्गात राहणाऱ्या देवासमोर नमन करू?
त्याच्यासमोर मी होमार्पणं घेऊन येऊ का?
त्याच्यासाठी मी एका वर्षाची वासरं आणू का?+
७ हजारो बकऱ्यांच्या बलिदानाने यहोवाला आनंद होईल का?
तेलाच्या दहा हजार नद्यांनी त्याचं समाधान होईल का?+
मी माझ्या अपराधासाठी* माझ्या प्रथमपुत्राला द्यावं का?
माझ्या पापाबद्दल* मी माझ्या पोटच्या मुलाला* अर्पण करावं का?+
८ अरे माणसा, चांगलं काय आहे हे त्याने तुला सांगितलं आहे.
शेवटी, यहोवा तुझ्याकडून काय अपेक्षा करतो?*
छडीकडे आणि ती ज्याने नेमली त्याच्याकडे लक्ष द्या.+
१० दुष्टाच्या घरात अजूनही दुष्टपणाची धनसंपत्ती आहे का?
आणि ज्याची देवाला घृणा वाटते, ते एफाचं* खोटं* माप अजूनही त्याच्याकडे आहे का?
१२ कारण तिची श्रीमंत माणसं सतत हिंसाचार करतात,
आणि तिचे रहिवासी खोटं बोलतात;+
त्यांची जीभ फसव्या गोष्टी करते.+
१३ “म्हणून मी तुला कठोर शिक्षा करीन,+
तुझ्या पापांमुळे मी तुला उजाड करीन.
१४ तू खाशील, पण तृप्त होणार नाहीस;
तुझं पोट रिकामंच राहील.+
ज्या वस्तू तू सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करशील, त्या तुला सुखरूप ठिकाणी नेता येणार नाहीत,
आणि तू त्या नेल्यास, तरी मी त्या तलवारीच्या हाती देईन.
१५ तू बी पेरशील, पण कापणी करणार नाहीस.
तू जैतून तुडवशील, पण त्यांचं तेल तुला वापरायला मिळणार नाही;
आणि तू नवीन द्राक्षारस बनवशील, पण तो पिऊ शकणार नाहीस.+
१६ कारण तुम्ही अम्रीचे कायदे पाळता, अहाबच्या घराण्याच्या रीतींप्रमाणे वागता,+
आणि तुम्ही त्यांच्या सल्ल्याचं पालन करता.
म्हणून, तुम्हाला पाहून लोकांना भीती वाटेल अशी मी तुमची स्थिती करीन
आणि शहराच्या रहिवाशांना पाहून लोक त्यांची थट्टा करतील;+
आणि राष्ट्रं तुम्हाला तुच्छ समजतील.”+
७ अरेरे, माझी किती वाईट स्थिती आहे! मी अशा माणसासारखा आहे,
ज्याला उन्हाळ्यातली फळं गोळा केल्यावर
आणि कापणीनंतर उरलेली द्राक्षं वेचल्यावर,
द्राक्षाचा एकही गुच्छ खायला मिळाला नाही;
पहिल्या बहरातलं अंजीर खायची इच्छा असून, मला एकही अंजीर मिळालं नाही.
२ पृथ्वीवरून एकनिष्ठ माणूस नाहीसा झाला आहे;
माणसांमध्ये एकही जण प्रामाणिक नाही.+
ते सर्व रक्तपात करायला टपलेले असतात.+
प्रत्येक जण जाळं टाकून आपल्याच भावाची शिकार करतो.
३ त्यांचे हात वाईट कामं करण्यात तरबेज आहेत;+
अधिकारी मागण्या करतो,
न्यायाधीश मोबदला मागतो,+
प्रतिष्ठित माणूस आपल्या इच्छा सांगतो,+
ते सर्व मिळून कट रचतात.
४ त्यांच्यातला सगळ्यात चांगला माणूस काट्यांसारखा आहे,
तर सगळ्यात सरळ माणूस, काटेरी कुंपणाहून वाईट आहे.
त्यांच्या पहारेकऱ्यांचा दिवस आणि तुमचा न्याय करण्याचा दिवस येईल.+
तेव्हा ते घाबरतील.+
५ आपल्या सोबत्यावर विश्वास ठेवू नकोस
आणि जवळच्या मित्रावर भरवसा ठेवू नकोस.+
आपल्या बायकोजवळही मनातलं बोलू नकोस.
६ कारण मुलगा आपल्या वडिलांना तुच्छ समजतो,
मुलगी आपल्या आईचा विरोध करते;+
आणि सून आपल्या सासूचा विरोध करते;+
माणसाच्या घरचे लोकच त्याचे शत्रू आहेत.+
७ पण मी तर यहोवाकडे डोळे लावीन.+
माझं तारण करणाऱ्या देवाची मी धीराने वाट पाहीन.*+
माझा देव माझं ऐकेल.+
८ माझ्या शत्रूने* माझ्यावर आलेलं संकट पाहून खूश होऊ नये.
कारण मी पडलो असलो, तरी पुन्हा उठीन;
मी अंधारात राहत असलो, तरी यहोवा माझा प्रकाश होईल.
९ मी यहोवाविरुद्ध पाप केलं आहे.+
म्हणून जोपर्यंत तो माझा खटला चालवून माझा न्याय करत नाही,
तोपर्यंत मी त्याचा क्रोध सहन करीन.
तो मला बाहेर प्रकाशात आणेल;
मी त्याचा न्यायीपणा पाहीन.
१० जी माझी वैरीण आहे, तीसुद्धा हे पाहील,
“तुझा देव यहोवा कुठे आहे?”+ असं जी मला म्हणते, ती लज्जित होईल.
माझ्या डोळ्यांदेखत हे घडेल.
आता तिला रस्त्यावरच्या चिखलासारखं तुडवलं जाईल.
११ तुझ्या भिंती बांधण्याचा तो दिवस असेल;
त्या दिवशी सीमा वाढवली जाईल.
१२ त्या दिवशी ते तुझ्याकडे येतील.
ते थेट अश्शूरहून आणि इजिप्तच्या शहरांतून येतील,
इजिप्तपासून फरात नदीपर्यंत;
एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि एका पर्वतापासून दुसऱ्या पर्वतापर्यंत राहणारे लोक तुझ्याकडे येतील.+
१३ देश आपल्या रहिवाशांमुळे
आणि त्यांनी केलेल्या कामांमुळे* उजाड होईल.
१४ तू आपल्या काठीने तुझ्या लोकांचं, तुझ्या वारशाच्या कळपाचं पालन कर,+
तो जंगलात, फळांच्या बागेत एकटा राहत होता.
त्यांनी पूर्वीच्या दिवसांसारखं बाशानमध्ये आणि गिलादमध्ये चरावं.+
१५ “तुम्ही इजिप्तच्या देशातून बाहेर आला होता, त्या दिवसांप्रमाणेच,
मी त्याला अद्भुत गोष्टी दाखवीन.+
१६ राष्ट्रांतले लोक त्या गोष्टी पाहतील आणि खूप शक्तिशाली असूनही ते लज्जित होतील.+
ते आपल्या तोंडावर हात ठेवतील;
त्यांचे कान बहिरे होतील.
१७ ते सापांसारखे धूळ चाटतील;+
जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे ते आपल्या सुरक्षित ठिकाणांतून थरथर कापत येतील.
ते भीतभीत देवाकडे, यहोवाकडे येतील,
आणि ते त्याचं भय मानतील.”+
१८ तुझ्यासारखा देव कोण आहे?
तू अपराधांची क्षमा करतोस आणि तुझ्या वारशाच्या लोकांमधून जे उरलेले आहेत,+ त्यांच्या पापांची तू आठवण ठेवत नाहीस.+
तुझा क्रोध सर्वकाळ राहणार नाही,
कारण तुला एकनिष्ठ प्रेमाची आवड आहे.+
१९ तू आम्हाला पुन्हा दया दाखवशील;+ तू आमचे अपराध पायाखाली तुडवशील.*
तू आमची सर्व पापं खोल समुद्रात टाकून देशील.+
२० तू पूर्वीच्या काळात आमच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे+
याकोबशी विश्वासूपणे वागशील,
आणि अब्राहामला एकनिष्ठ प्रेम दाखवशील.
हे मीखाएल (याचा अर्थ “देवासारखा कोण आहे?”) किंवा, मीखाया (याचा अर्थ “यहोवासारखा कोण आहे?”) या नावांचं संक्षिप्त रूप आहे.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “खालची मैदानं.”
शब्दशः “ओतीन.”
किंवा “तिची वेश्येची सर्व कमाई जाळून टाकली जाईल.”
किंवा “अफ्राच्या घरात.”
शब्दशः “रहिवाशीण.”
शब्दशः “रहिवाशीण.”
शब्दशः “रहिवाशीण.”
शब्दशः “रहिवाशीण.”
किंवा “बंडं सापडली.”
शब्दशः “रहिवाशीण.”
शब्दशः “तुम्ही तुमच्या माना काढणार नाही.”
किंवा “यहोवाची पवित्र शक्ती.”
किंवा “गुरं चारण्याच्या जमिनीवरच्या.”
किंवा “भगदाड.”
किंवा “मोठ्या तोंडाच्या भांड्यात.”
किंवा कदाचित, “त्यांच्याकडे चावायला काही असतं तेव्हा.”
शब्दशः “पवित्र करतात.”
किंवा “मिशी.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “डोकी.”
किंवा “चांदी.”
किंवा “यहोवावर भरवसा असल्याचा दावा करून.”
किंवा “काळाच्या शेवटच्या भागात.”
किंवा “शिक्षण.”
किंवा “चुकीच्या गोष्टी सुधारेल.”
म्हणजे, माती सुटी करण्यासाठी वापरलं जाणारं लोखंडी अवजार.
किंवा “राहील.”
शब्दशः “जी.”
शब्दशः “जी.”
किंवा “पूर्वीची.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कुळांमध्ये.”
किंवा “सुरुवात.”
किंवा “पुढारी.”
किंवा “भरवसा ठेवत नाहीत.”
किंवा “माणसांच्या मुलांची.”
किंवा “आयाळ असलेला तरुण सिंह.”
शब्दशः “तुझ्या हातातून.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “मिसरमधून.”
किंवा “बंडासाठी.”
किंवा “माझ्या जिवाच्या पापाबद्दल.”
शब्दशः “माझ्या शरीराचं फळ.”
किंवा “परत मागतो.”
किंवा “न्यायी असावं; पक्षपाती नसावं.”
किंवा “दयाळूपणे आणि एकनिष्ठपणे प्रेम करावं.” शब्दशः “एकनिष्ठ प्रेमावर प्रेम करावं.”
किंवा “व्यावहारिक बुद्धी.”
अति. ख१४ पाहा.
किंवा “अपूर्ण.”
किंवा “नैतिक रितीने शुद्ध.”
किंवा “देवासाठी मी वाट पाहण्याची वृत्ती दाखवीन.”
हिब्रू भाषेत, शत्रू हा शब्द स्त्रीलिंगी आहे.
शब्दशः “त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे.”
किंवा “अपराधांवर मात करशील.”