वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt ओबद्या १-२१
  • ओबद्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ओबद्या
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
ओबद्या

ओबद्या

१ सर्वोच्च प्रभू यहोवाने* ओबद्या* याला अदोमबद्दल एक दृष्टान्त दाखवला.

तो म्हणतो:+

“आम्हाला यहोवाकडून एक बातमी मिळाली आहे,

राष्ट्रांकडे एका राजदूताला पाठवण्यात आलं आहे:

‘उठा, आपण अदोमविरुद्ध युद्धाची तयारी करू.’ ”+

 २ “पाहा! मी तुला राष्ट्रांमध्ये कवडीमोल केलंय;

ते तुला अगदी तुच्छ समजतात.+

 ३ तुझ्या गर्विष्ठ मनाने तुला फसवलंय,+

तू खडकाच्या कपारींमध्ये राहतोस,

तू उच्च स्थानांमध्ये राहतोस आणि मनातल्या मनात म्हणतोस,

‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’

 ४ जरी तू गरुडासारखं उंचावर घरटं बांधलंस,*

किंवा ते ताऱ्‍यांमध्ये नेऊन ठेवलंस,

तरी मी तुला तिथून खाली आणीन,” असं यहोवा म्हणतो.

 ५ “रात्री तुझ्याकडे चोर किंवा दरोडेखोर आले,

तर त्यांना हवं तेवढंच ते लुटून नेणार नाहीत का?

किंवा जर द्राक्षं गोळा करणारे तुझ्याकडे आले,

तर तेही काही द्राक्षं सोडून जाणार नाहीत का?+

पण तुझे शत्रू मात्र तुझा अगदी पूर्णपणे नाश करतील!*

 ६ एसावला कसं शोधून काढण्यात आलंय!

त्याचा लपवलेला खजिना कसा लुटण्यात आलाय!

 ७ त्यांनी तुला सीमेवर हाकलून दिलंय.

तुझ्या सर्व साथीदारांनी* तुला फसवलंय.

जे तुझ्यासोबत शांतीने राहायचे, त्यांनी तुला मात दिली आहे.

जे तुझ्यासोबत बसून जेवायचे, त्यांनीच तुझ्यासाठी जाळं पसरलं आहे,

पण तुला समजत नाही.”

 ८ यहोवा म्हणतो, “त्या दिवशी,

मी अदोमच्या बुद्धिमानांचा नाश करणार नाही का?+

आणि एसावच्या डोंगराळ प्रदेशातून समज नाहीशी करणार नाही का?

 ९ अरे तेमान,+ तुझे योद्धे भयभीत होतील,+

कारण एसावच्या डोंगराळ प्रदेशातल्या प्रत्येकाची कत्तल केली जाईल.+

१० तू आपला भाऊ याकोब याच्याशी क्रूरपणे वागलास,+

म्हणून तू लज्जित होशील,+

आणि तुझा कायमचा नाश होईल.+

११ ज्या दिवशी परक्यांनी त्याच्या सैन्याला बंदिवासात नेलं,+

त्या दिवशी तू नुसता बघत उभा राहिलास.

ज्या दिवशी त्याच्या फाटकात विदेशी शिरले आणि त्यांनी यरुशलेमवर चिठ्ठ्या टाकल्या,+

त्या दिवशी तू पण त्यांच्यासारखाच वागलास.

१२ तुझ्या भावावर संकट आलं, त्या दिवशी तू आनंद साजरा करायला नको होतास,+

यहूदाच्या लोकांच्या नाशाच्या दिवशी, तू खूश व्हायला नको होतंस,+

आणि त्यांच्या दुःखाच्या दिवशी, तू गर्वाने बोलायला नको होतंस.

१३ माझ्या लोकांच्या संकटाच्या दिवशी, तू त्यांच्या फाटकाच्या आत यायला नको होतंस,+

त्याच्या विपत्तीच्या दिवशी, तू आनंद साजरा करायला नको होतास,

आणि त्याच्या संकटाच्या दिवशी, तू त्याच्या संपत्तीवर हात टाकायला नको होतास.+

१४ तू चौकात उभं राहून, त्याच्या पळून जाणाऱ्‍या लोकांना ठार मारायला नको होतंस,+

आणि संकटाच्या दिवशी त्याच्या वाचलेल्यांना, तू शत्रूंच्या हाती द्यायला नको होतंस.+

१५ कारण सर्व राष्ट्रांच्या विरुद्ध यहोवाचा दिवस येतोय.+

तू जसं केलं आहेस, तसंच तुझ्यासोबत केलं जाईल.+

तू इतरांशी जसा वागलास, तशीच वागणूक तुला मिळेल.

१६ कारण जसा तू माझ्या पवित्र पर्वतावर द्राक्षारस पीत होतास,

तशी सर्व राष्ट्रं माझ्या क्रोधाचा द्राक्षारस पीत राहतील.+

ती नक्कीच माझा क्रोध पितील आणि गिळतील,

आणि ती राष्ट्रं कधीच अस्तित्वात नव्हती, अशी होतील.

१७ पण जे वाचलेले आहेत, ते सीयोन पर्वतावर असतील,+

आणि तो पर्वत पवित्र असेल;+

आणि याकोबचं घराणं आपल्या मालकीच्या गोष्टींचा ताबा घेईल.+

१८ याकोबचं घराणं अग्नीसारखं होईल,

योसेफचं घराणं ज्वालेसारखं होईल.

तर एसावचं घराणं सुकलेल्या गवतासारखं होईल;

ते त्यांना आग लावून भस्म करतील,

आणि एसावच्या घराण्यातून कोणीही वाचणार नाही,+

कारण यहोवा स्वतः असं बोललाय.

१९ ते नेगेबचा आणि एसावच्या डोंगराळ प्रदेशाचा,+

शेफीलाचा* आणि पलिष्ट्यांच्या देशाचा,+

एफ्राईमच्या आणि शोमरोनच्या शेतांचा ताबा घेतील+

आणि बन्यामीन गिलादचा ताबा घेईल.

२० कनानी लोकांचा देश थेट सारफथपर्यंत,+

या तटबंदीच्या बंदिवानांचा,+ म्हणजे इस्राएली लोकांचा होईल.

यरुशलेमचे बंदिवान, जे सफारदमध्ये होते, ते नेगेबच्या शहरांचा ताबा घेतील.+

२१ एसावच्या डोंगराळ प्रदेशाचा न्याय करण्यासाठी,+

वाचवणारे सीयोन पर्वतावर जातील,

आणि राज्यपद यहोवाचं होईल.”+

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, “यहोवाचा सेवक.”

किंवा कदाचित, “उंच उडालास.”

किंवा कदाचित, “त्यांनी किती प्रमाणात नाश केला असता?”

किंवा “ज्यांनी तुझ्याशी करार केला त्यांनी.”

किंवा “टेकड्यांच्या प्रदेशाचा.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा