होशेय
१ यहूदाचे राजे+ उज्जीया,+ योथाम,+ आहाज+ आणि हिज्कीया,+ तसंच इस्राएलचा राजा, म्हणजे योवाशचा+ मुलगा यराबाम यांच्या शासनकाळात,+ बैरीचा मुलगा होशेय* याला यहोवाकडून* संदेश मिळाला. २ यहोवाने होशेयद्वारे आपला संदेश सांगायला सुरुवात केली, तेव्हा यहोवा त्याला म्हणाला: “जा, आणि अशा एका स्त्रीशी लग्न कर जी वेश्येसारखी वागेल* आणि तिच्या व्यभिचारामुळे* तुला मुलं होतील. कारण या देशानेही अशाच प्रकारे वेश्येसारखं वागून* यहोवाला पूर्णपणे सोडून दिलंय.”+
३ तेव्हा त्याने जाऊन दिब्लाइमची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केलं. ती गर्भवती झाली आणि तिने त्याच्या मुलाला जन्म दिला.
४ मग यहोवा होशेयला म्हणाला: “त्याचं नाव इज्रेल* ठेव. कारण थोड्याच काळाने मी इज्रेलच्या रक्तपाती कृत्यांसाठी येहूच्या घराण्याकडून हिशोब मागीन.+ आणि इस्राएलच्या घराण्याच्या राज्याचा मी अंत करीन.+ ५ त्या दिवशी, मी इज्रेलच्या खोऱ्यात* इस्राएलचा धनुष्य मोडून टाकीन.”
६ ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. तेव्हा देवाने त्याला सांगितलं: “तिचं नाव लो-रुहामा* ठेव, कारण मी इस्राएलच्या घराण्याला यापुढे दया दाखवणार नाही.+ मी त्यांना नक्कीच हाकलून लावीन.+ ७ पण मी यहूदाच्या घराण्याला दया दाखवीन.+ मी धनुष्य, तलवार, युद्ध, घोडे किंवा घोडेस्वार यांच्याद्वारे त्यांना वाचवणार नाही.+ तर मी यहोवा, त्यांचा देव, मी त्यांना वाचवीन.”+
८ लो-रुहामा हिचं दूध तुटल्यावर, गोमर पुन्हा गर्भवती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. ९ तेव्हा देव म्हणाला: “त्याचं नाव लो-अम्मी* ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाही आणि मीही तुमचा देव नाही.
१० आणि इस्राएलच्या लोकांची* संख्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी होईल; तिचं मोजमाप करता येणार नाही.+ आणि ‘तुम्ही माझे लोक नाही,’+ असं जिथे त्यांना म्हणण्यात आलं होतं, तिथे ‘तुम्ही जिवंत देवाची मुलं आहात,’ असं त्यांना म्हणण्यात येईल.+ ११ आणि यहूदाच्या व इस्राएलच्या लोकांना जमवून एकतेत आणलं जाईल.+ ते स्वतःसाठी एक पुढारी नेमतील आणि देशातून बाहेर निघतील, कारण इज्रेलचा दिवस महान असेल.+
२ तुमच्या भावांना, ‘माझे लोक!’*+
आणि तुमच्या बहिणींना, ‘देवाने दया दाखवलेली स्त्री!’* असं म्हणा.+
२ आपल्या आईला दोष द्या; तिला दोष द्या,
कारण ती माझी बायको नाही+ आणि मी तिचा नवरा नाही.
तिने वेश्येसारखं वागायचं* थांबवलं पाहिजे
आणि आपल्या स्तनांच्या मधून व्यभिचार दूर केला पाहिजे,
३ नाहीतर ती तिच्या जन्माच्या दिवशी होती, तशी मी तिला नग्न करीन,
मी तिची अवस्था ओसाड रानासारखी,
आणि निर्जल भूमीसारखी करीन,
म्हणजे ती तहानेने तडफडून मरेल.
४ मी तिच्या मुलांना दयामाया दाखवणार नाही,
कारण ती वेश्येची* मुलं आहेत.
५ त्यांच्या आईने वेश्येसारखी कामं* केली आहेत.+
त्यांना आपल्या गर्भात वाढवणारी त्यांची आई निर्लज्जपणे वागली आहे,+ कारण ती म्हणाली,
‘मी माझ्या प्रियकरांमागे जाईन;+
जे मला अन्नपाणी पुरवतात,
जे मला लोकर, मलमल, तेल आणि द्राक्षारस पुरवतात, त्यांच्यामागे मी जाईन.’
६ म्हणून मी काट्यांचं कुंपण घालून तिला अडवीन;
मी तिच्यासमोर दगडांची भिंत रचीन
म्हणजे तिला मार्ग सापडणार नाही.
७ ती आपल्या प्रियकरांच्या मागे धावेल, पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही;+
ती त्यांना शोधेल, पण तिला ते सापडणार नाहीत.
मग ती म्हणेल, ‘मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईन,+
कारण माझी आधीची स्थिती आतापेक्षा चांगली होती.’+
८ तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल देणारा मीच होतो, हे तिने ओळखलं नाही,+
मीच तिला भरपूर चांदी दिली,
आणि सोनंही दिलं. पण, तिने ते बआलच्या उपासनेसाठी वापरलं.+
९ ‘म्हणून मी कापणीच्या वेळी परत येऊन माझं धान्य घेईन,
मी द्राक्षांच्या हंगामात माझा नवीन द्राक्षारस परत घेईन,+
आणि तिचं उघडं अंग झाकण्यासाठी असलेली लोकरीची आणि मलमलीची वस्त्रं मी हिसकावून घेईन.
११ मी तिचे सगळे आनंदाचे सोहळे बंद करीन,
तिचे उत्सव,+ नवचंद्राचे दिवस,* शब्बाथ आणि नेमलेले सण मी बंद करीन.
१२ तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराची झाडं मी उद्ध्वस्त करीन; त्यांविषयी ती म्हणाली होती:
‘माझ्या प्रियकरांनी मला दिलेली ही कमाई आहे’;
पण, मी त्यांचं जंगल करून टाकीन,
आणि जंगली जनावरं ती खाऊन टाकतील.
१३ मी त्या सर्व दिवसांचा तिच्याकडून हिशोब मागीन, जेव्हा ती बआलच्या मूर्तींना बलिदानं अर्पण करायची,+
आणि नथ आणि दागदागिने घालून आपल्या प्रियकरांमागे जायची;
पण मला मात्र ती विसरून गेली,’+ असं यहोवा म्हणतो.
१५ मग, तिचे द्राक्षमळे मी तिला परत देईन,+
आणि अखोरचं खोरं*+ तिच्यासाठी आशेचं द्वार ठरेल;
इजिप्त* देशातून ती बाहेर आली होती, त्या दिवसाप्रमाणे,+
तिच्या तारुण्याच्या दिवसांप्रमाणे, ती तिथे माझं ऐकेल.’
१६ यहोवा म्हणतो, ‘त्या दिवशी
तू मला, “माझा मालक”* नाही, तर “माझा नवरा” म्हणून हाक मारशील.’
१७ ‘मी तिच्या तोंडून बआलच्या मूर्तींची नावं काढून टाकीन,+
त्यांच्या नावांची पुन्हा कधी आठवण केली जाणार नाही.+
१८ त्या दिवशी मी माझ्या लोकांसाठी रानातल्या पशूंशी,
आकाशातल्या पक्ष्यांशी आणि जमिनीवर रांगणाऱ्या जिवांशी करार करीन;+
मी देशातून धनुष्य, तलवार आणि युद्ध नाहीसं करीन,+
आणि ते तिथे निर्भयपणे राहतील.+
१९ मी लग्नाचं वचन देऊन तुला आपली वधू म्हणून कायमचं स्वीकारीन,
आणि तुझ्याशी नीतीने, न्यायाने,
एकनिष्ठ प्रेमाने आणि दयेने+ वागण्याचं मी तुला वचन देईन.
२० मी तुला विश्वासू राहण्याचं वचन देईन,
आणि मी जो यहोवा, त्याला तू नक्कीच ओळखशील.’+
२१ यहोवा म्हणतो, ‘त्या दिवशी मी ऐकेन,
मी आकाशाचं ऐकेन
आणि आकाश पृथ्वीचं ऐकेल;+
२२ पृथ्वीही धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल यांचं ऐकेल;
२३ बी पेरतात तसं मी तिला माझ्यासाठी जमिनीत पेरीन,+
आणि जिला दया दाखवण्यात आली नव्हती, तिला मी दया दाखवीन;*
जे माझे लोक नव्हते त्यांना,* “तुम्ही माझे लोक आहात” असं मी म्हणीन,+
आणि तेही, “तू आमचा देव आहेस” असं म्हणतील.’”+
३ मग यहोवा मला म्हणाला: “इस्राएलचे लोक दुसऱ्या देवांच्या मागे जातात+ आणि आवडीने मनुकांच्या ढेपा* अर्पण करतात, तरीसुद्धा यहोवा त्यांच्यावर प्रेम करतो;+ तसाच आता तूही, जिच्यावर दुसरा माणूस प्रेम करतो आणि जी व्यभिचार करत आहे,+ अशा स्त्रीवर पुन्हा प्रेम कर.”
२ म्हणून मी चांदीचे १५ तुकडे आणि दीड होमर माप* जव देऊन तिला विकत घेतलं. ३ मग मी तिला म्हणालो: “तू बऱ्याच दिवसांपर्यंत माझी म्हणून राहशील. तू वेश्येसारखी कामं करू नकोस* आणि दुसऱ्या माणसाशी संबंध ठेवू नकोस आणि मीही तुझ्याशी तसाच वागीन.”*
४ कारण इस्राएलचे लोकही बऱ्याच काळापर्यंत* राजाशिवाय,+ राजकुमाराशिवाय, अर्पणाशिवाय, पूजेच्या खांबाशिवाय, तसंच एफोद+ व कुलदैवतांच्या मूर्ती* यांशिवाय राहतील.+ ५ नंतर इस्राएलचे लोक परत येऊन आपला देव यहोवा याचा,+ आणि आपला राजा दावीद याचा शोध घेतील+ आणि येणाऱ्या काळात, ते यहोवाचा चांगुलपणा अनुभवण्यासाठी थरथर कापत त्याच्याकडे येतील.+
४ इस्राएली लोकांनो, यहोवाचा संदेश ऐका,
देशाच्या रहिवाशांविरुद्ध यहोवाचा खटला आहे,+
कारण देशात सत्य, एकनिष्ठ प्रेम किंवा देवाबद्दलचं ज्ञान नाही.+
२ खोट्या शपथा घेणं, खोटं बोलणं,+ हत्या करणं,+
चोरी आणि व्यभिचार+ सगळीकडे होत आहे,
हत्येमागून हत्या होत आहे.+
३ म्हणून हा देश शोक करेल;+
त्यातला प्रत्येक रहिवासी अशक्त होत जाईल.
रानातले पशू, आकाशातले पक्षी,
आणि समुद्रातले मासेही नष्ट होतील.
४ “म्हणून कोणीही दुसऱ्याचा विरोध करू नये किंवा दोष दाखवू नये,+
कारण याजकाचा विरोध करणाऱ्या लोकांसारखे तुझे लोक झाले आहेत.+
५ म्हणून तू भरदिवसा अडखळशील,
आणि रात्र असल्याप्रमाणे, संदेष्टा तुझ्यासोबत अडखळेल.
आणि मी तुझ्या आईचा आवाज बंद करीन.*
६ मी माझ्या लोकांचा आवाज बंद करीन,*
कारण त्यांना माझी ओळख नाही.
त्यांनी मला नाकारल्यामुळे,+
मीही त्यांना नाकारीन आणि माझे याजक म्हणून सेवा करू देणार नाही.
७ त्यांची संख्या जितकी वाढली, तितकंच जास्त त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केलं.+
मी त्यांचा गौरव अपमानात बदलून टाकीन.*
८ माझ्या लोकांच्या पापांवर ते आपलं पोट भरतात,
त्यांच्या अपराधांसाठी ते हपापले आहेत.*
९ लोकांशी आणि याजकांशी मी एकसारखाच व्यवहार करीन;
त्यांच्या वागणुकीबद्दल मी त्यांच्याकडून हिशोब मागीन,
आणि त्यांच्या कृत्यांचे परिणाम मी त्यांना भोगायला लावीन.+
१० ते खातील पण तृप्त होणार नाहीत.+
ते व्यभिचार करतील,* पण त्यांची संख्या वाढणार नाही.+
कारण त्यांनी यहोवाचा अनादर केला आहे.
१२ माझे लोक आपल्या लाकडी मूर्तींचा सल्ला घेतात,
त्यांची काठी* सांगेल तसं ते वागतात;
कारण व्यभिचारी* वृत्तीमुळे ते भरकटले आहेत,
आणि व्यभिचार* करून ते आपल्या देवाच्या अधीन राहायला नकार देतात.
१३ ते पर्वतांच्या माथ्यांवर बलिदानं देतात,+
आणि टेकड्यांवर हवन करतात.
अल्लोन* आणि लिवने* वृक्षांखाली आणि प्रत्येक मोठ्या झाडाखाली ते बलिदानं देतात,+
कारण या झाडांखाली चांगली सावली असते.
म्हणून तुमच्या मुली वेश्येसारखी कामं* करतात
आणि तुमच्या सुना व्यभिचार करतात.
१४ मी तुमच्या मुलींना वेश्यांसारखं वागल्याबद्दल,*
आणि तुमच्या सुनांना व्यभिचार केल्याबद्दल जबाबदार धरणार नाही.
कारण पुरुष वेश्यांसोबत जातात
आणि मंदिरातल्या वेश्यांसोबत बलिदानं देतात.
समजबुद्धी नसलेल्या या लोकांचा+ नाश होईल.
१६ एखाद्या हट्टी गायीसारखा इस्राएल हट्टी झाला आहे.+
कोकऱ्याला मोकळ्या कुरणात* चरायला नेतात, तसं आता यहोवा त्याला चरायला नेईल का?
१७ एफ्राईम मूर्तींच्या नादी लागला आहे.+
त्याला सोडून द्या!
त्याच्या शासकांना* नीच कामं आवडतात.+
१९ वारा त्याला आपल्या पंखांत लपेटून टाकेल,*
त्याच्या बलिदानांमुळे त्याची लाजिरवाणी स्थिती होईल.
हे इस्राएलच्या घराण्या, लक्ष दे,
हे राजाच्या घराण्या, ऐक,
तुम्ही मिस्पासाठी पाश असल्यामुळे,
आणि ताबोरवर+ पसरलेल्या जाळ्यासारखे असल्यामुळे
हा न्यायदंड तुमच्यावर येणार आहे.
२ बंडखोर* कत्तल करण्यात बुडून गेले आहेत;*
त्या सर्वांना मी ताकीद देत आहे.*
३ मी एफ्राईमला ओळखतो,
आणि इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही.
हे एफ्राईम, तू व्यभिचार केला आहेस;*
इस्राएलने स्वतःला दूषित केलं आहे.+
४ त्यांची कृत्यं त्यांना देवाकडे परत येऊ देत नाहीत,
कारण त्यांच्यामध्ये व्यभिचारी* वृत्ती आहे;+
ते यहोवाला ओळखत नाहीत.
५ इस्राएलच्या गर्वाने त्याच्याविरुद्ध* साक्ष दिली आहे;+
इस्राएल आणि एफ्राईम दोघंही आपल्या अपराधांमुळे अडखळून पडले आहेत,
आणि यहूदाही त्यांच्यासोबत अडखळून पडला आहे.+
६ ते आपले कळप घेऊन यहोवाला शोधायला गेले,
पण तो त्यांना सापडला नाही.
तो त्यांच्यापासून दूर गेला होता.+
७ त्यांनी यहोवाशी विश्वासघात केला आहे,+
कारण त्यांनी परक्या मुलांना जन्म दिला आहे.
आता एका महिन्यात त्यांचा आणि त्यांच्या शेतांचा* नाश होईल.
८ गिबामध्ये शिंग फुंका+ आणि रामामध्ये+ कर्णा वाजवा!
बेथ-आवेनमध्ये+ युद्ध घोषित करा; हे बन्यामीन, तू सैन्याच्या पुढे चाल!
९ हे एफ्राईम, न्यायदंडाच्या दिवशी तुझी वाईट दशा होईल.+
जे नक्की घडणार आहे, ते मी इस्राएलच्या वंशांना सांगितलं आहे.
१० यहूदाचे अधिकारी सीमेच्या खुणा हलवणाऱ्यांसारखे आहेत.+
पाणी ओतावं, तसा मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतीन.
११ एफ्राईमने आपल्या शत्रूच्या मागे जाण्याचा निश्चय केला,+
म्हणून तो पीडित झाला आहे, न्यायदंडाने चिरडला गेला आहे.
१२ त्यामुळे मी एफ्राईमसाठी कसरीसारखा,*
आणि यहूदाच्या घराण्यासाठी किडीसारखा झालो.
१३ एफ्राईमने आपला रोग पाहिला आणि यहूदाने आपली जखम पाहिली,
तेव्हा एफ्राईम अश्शूरकडे गेला+ आणि एका महान राजाकडे त्याने दूत पाठवले.
पण तो तुझा रोग दूर करू शकला नाही,
तो तुझी जखम बरी करू शकला नाही.
१४ कारण मी एफ्राईमसाठी एका तरुण सिंहासारखा,
आणि यहूदाच्या घराण्यासाठी ताकदवान सिंहासारखा* होईन.
मी त्यांना फाडून त्यांचे तुकडे करीन आणि निघून जाईन;+
मी त्यांना उचलून नेईन, तेव्हा कोणीही त्यांना सोडवणार नाही.+
१५ मी माझ्या ठिकाणी परत निघून जाईन आणि त्यांना त्यांच्या पापांचे परिणाम भोगावे लागतील;
संकटात सापडल्यावर, ते माझा शोध घेतील.”+
त्याने आपल्याला जखमी केलं, पण तोच आपल्या जखमांना पट्टी बांधेल.
२ तो दोन दिवसांनी आपल्याला जिवंत करेल.
तिसऱ्या दिवशी तो आपल्याला उठवेल,
आणि आपण त्याच्यासमोर जिवंत राहू.
३ आपण यहोवाला जाणून घेऊ, आपण त्याला जाणून घेण्याचा मनापासून प्रयत्न करू.
पहाट उगवण्याइतकंच त्याचं येणं निश्चित आहे;
तो बरसणाऱ्या सरींसारखा आपल्याकडे येईल,
पृथ्वीला ओलंचिंब करणाऱ्या वसंतातल्या पावसासारखा तो येईल.”
४ “अरे एफ्राईम, मी तुझ्यासोबत काय करू?
अरे यहूदा, मी तुझं काय करू?
कारण तुझं प्रेम सकाळच्या मेघांसारखं आहे,
लगेच नाहीशा होणाऱ्या दवासारखं आहे.
५ म्हणून मी संदेष्ट्यांद्वारे त्यांना कापून टाकीन;+
माझ्या तोंडातून निघणाऱ्या शब्दांनी मी त्यांना ठार मारीन.+
तुमच्यावर येणारे न्यायदंड प्रकाशासारखे चमकतील.+
६ कारण मला बलिदानाने नाही, तर एकनिष्ठ प्रेमाने* आनंद होतो,
आणि होमार्पणांनी नाही, तर देवाच्या ज्ञानाने मला आनंद होतो.+
७ पण त्यांनी पापी मानवांप्रमाणे माझा करार मोडला आहे.+
त्यांनी तिथे माझ्याशी विश्वासघात केला आहे.
९ याजकांची टोळी एखाद्या माणसाला मारायला टपून बसलेल्या लुटारूंच्या टोळीसारखी आहे.
ते शखेमच्या+ रस्त्यावर खून करतात;
त्यांचं वागणं लाजिरवाणं आहे.
१० इस्राएलच्या घराण्यात मला एक किळसवाणी गोष्ट दिसली.
११ हे यहूदा, तुझ्यासाठी तर कापणीचा काळ ठरलेला आहे;
त्या वेळी मी माझ्या बंदिवान लोकांना गोळा करून परत आणीन.”+
७ “जेव्हा जेव्हा मी एफ्राईमला बरं करायचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा त्यांचे अपराध,+
आणि शोमरोनची दुष्टता+ उजेडात येते.
२ पण मी त्यांची सगळी दुष्टता लक्षात ठेवीन, असं ते मनात म्हणत नाहीत.+
त्यांच्या अपराधांनी त्यांना घेरलं आहे;
त्यांचे अपराध माझ्यापासून लपलेले नाहीत.
३ ते आपल्या दुष्टतेमुळे राजाला,
आणि आपल्या लबाडीने राजकुमारांना खूश करतात.
४ ते सर्व व्यभिचारी आहेत,
रोटी भाजणाऱ्याने तापवलेल्या भट्टीसारखे ते आहेत.
तो पीठ मळल्यावर ते फुगेपर्यंत, विस्तव चाळवत नाही.*
५ आमच्या राजाच्या उत्सवाच्या दिवशी, अधिकाऱ्यांना मळमळू लागलं
—द्राक्षारसामुळे ते संतापले आहेत.+
राजाने थट्टा करणाऱ्यांच्या हातात हात दिला आहे.
६ कारण त्यांचं हृदय तापलेल्या भट्टीसारखं आहे.*
रोटी भाजणारा रात्रभर झोपतो,
सकाळी त्याच्या भट्टीतली आग धगधगत असते.
८ एफ्राईम इतर राष्ट्रांसोबत मिसळतो.+
तो एका बाजूने भाजलेल्या रोटीसारखा आहे.
९ अनोळखी लोकांनी त्याची शक्ती शोषून घेतली आहे,+ पण त्याला याची कल्पना नाही.
त्याचे केस पांढरे झाले आहेत, पण त्याच्या लक्षात येत नाही.
१० इस्राएलच्या गर्वाने त्याच्याविरुद्ध साक्ष दिली आहे,+
पण ते आपला देव यहोवा याच्याकडे परत आले नाहीत;+
आणि हे सर्व झाल्यावरही त्यांनी त्याचा शोध घेतला नाही.
११ एफ्राईम एखाद्या भोळ्या कबुतरासारखा आहे, त्याला बुद्धी नाही.*+
त्यांनी इजिप्तला हाक मारली आहे+ आणि त्यांनी अश्शूरकडे धाव घेतली आहे.+
१२ ते कुठेही गेले, तरी मी माझं जाळं त्यांच्यावर टाकीन.
मी आकाशातल्या पक्ष्यांसारखं त्यांना खाली पाडीन.
त्यांना* ताकीद दिल्याप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन.+
१३ त्यांचा धिक्कार असो, कारण ते माझ्यापासून दूर गेले आहेत!
त्यांचा नाश होवो, कारण त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केलं आहे!
मी त्यांना सोडवायला तयार होतो, पण ते माझ्याविरुद्ध खोटं बोलले आहेत.+
१४ त्यांनी मनापासून मला मदतीसाठी हाक मारली नाही,+
ते फक्त आपल्या अंथरुणांवर पडून ओरडत राहिले.
ते धान्यासाठी आणि नवीन द्राक्षारसासाठी शरीरावर घाव करून घ्यायचे;
ते माझा विरोध करतात.
१५ मी त्यांना शिकवलं आणि त्यांचे हात मजबूत केले,
पण ते माझा विरोध करतात आणि कटकारस्थानं रचतात.
१६ त्यांनी आपला मार्ग बदलला, पण ते चांगल्या मार्गाला लागले नाहीत;*
सैल दोरी असलेल्या धनुष्यासारखे ते बेभरवशाचे होते.+
त्यांचे अधिकारी त्यांच्या उद्धट जिभांमुळे तलवारीने मारले जातील.
यामुळेच इजिप्त देशात त्यांची थट्टा केली जाईल.”+
८ “शिंग फुंका!+
२ ते मला हाक मारतात, ‘हे आमच्या देवा, आम्ही इस्राएल, तुला ओळखतो!’+
३ जे चांगलं आहे त्याला इस्राएलने नाकारलंय.+
शत्रू त्याचा पाठलाग करेल.
४ त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या परवानगीने नाही.
त्यांनी अधिकारी नेमले आहेत, पण त्यांनी मला विचारलं नाही.
५ हे शोमरोन, मी तुझं वासरू नाकारलंय.+
माझा राग त्यांच्याविरुद्ध भडकतो.+
या दोषापासून शुद्ध* व्हायला ते अजून किती काळ लावतील?
६ कारण ते वासरू इस्राएलचं आहे.
एका कारागिराने ते बनवलं, आणि ते देव नाही;
शोमरोनच्या वासराचे तुकडेतुकडे होतील.
पेरलेल्या बियाण्याला पीक येत नाही;+
अंकुरापासून पीठ मिळत नाही.
काही मिळालं, तरी विदेशी* लोक ते गिळून टाकतील.+
८ इस्राएलला गिळून टाकलं जाईल.+
ते राष्ट्रांमध्ये,+
नको असलेल्या भांड्यासारखे होतील.
९ कारण ते एकट्या रानगाढवाप्रमाणे अश्शूरकडे गेले.+
ते वेश्यांकडे गेले.+
१० त्यांनी त्यांना पैसे देऊन राष्ट्रांमधून आणलं असलं,
तरी, आता मी त्यांना गोळा करीन;
राजाने आणि अधिकाऱ्यांनी टाकलेल्या ओझ्यामुळे,
त्यांना दुःख भोगावं लागेल.+
११ कारण एफ्राईमने पाप करण्यासाठी पुष्कळ वेदी बांधल्या.+
या वेदी बांधून त्यांनी पाप केलं.+
१२ मी त्याला बरेच नियम लिहून दिले.*
पण त्याला ते विचित्र वाटले.+
१३ ते मला बलिदानांच्या भेटी आणून देतात, आणि बलिदानांचं मांस खातात.
पण यहोवाला या बलिदानांनी आनंद होत नाही.+
आता तो त्यांच्या अपराधांकडे लक्ष देईल आणि त्यांना त्यांच्या पापांसाठी शिक्षा देईल.+
१४ इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याला विसरला आहे+ आणि त्याने मंदिरं बांधली आहेत,+
आणि यहूदाने तटबंदी असलेली भरपूर शहरं बांधली आहेत.+
पण मी त्याच्या शहरांमध्ये आग पाठवीन,
आणि ती प्रत्येक शहराचे बुरूज जाळून टाकेल.”+
९ “हे इस्राएल, तू आनंदी होऊ नकोस,+
इतर राष्ट्रांप्रमाणे आनंद करू नकोस.
कारण व्यभिचारामुळे* तू आपल्या देवापासून दूर गेला आहेस.+
धान्याच्या प्रत्येक खळ्यामधली* वेश्येची कमाई तुला आवडते.+
२ पण खळ्यामुळे आणि द्राक्षकुंडामुळे त्यांचं पोट भरणार नाही,
आणि त्यांना नवीन द्राक्षारस मिळणार नाही.+
३ ते यहोवाच्या देशात टिकणार नाहीत;+
तर, एफ्राईम इजिप्तला परत जाईल,
आणि अश्शूरमध्ये तो अशुद्ध गोष्टी खाईल.+
ती बलिदानं शोक करणाऱ्यांच्या अन्नासारखी आहेत.
ते अन्न खाणारे स्वतःला दूषित करतात.
५ तुमच्या ठरलेल्या सणांच्या वेळी,
आणि यहोवाच्या सणाच्या दिवशी तुम्ही काय कराल?
६ कारण पाहा! देशाचा नाश झाल्यामुळे त्यांना पळून जावं लागेल.+
इजिप्त त्यांना गोळा करेल+ आणि मोफ* त्यांना दफन करेल.+
जंगली झुडपं* त्यांच्या चांदीच्या मौल्यवान वस्तूंचा ताबा घेतील,
आणि त्यांच्या तंबूंमध्ये काटेरी झुडपं येतील.
त्यांचा संदेष्टा मूर्ख ठरेल आणि संदेश सांगणारा माणूस वेडा होईल;
तुमचे अपराध पुष्कळ असल्यामुळे, तुमचा खूप द्वेष केला जाईल.”
८ एफ्राईमचा पहारेकरी+ माझ्या देवासोबत होता.+
पण आता संदेष्टे+ एफ्राईमच्या सर्व मार्गांवर पारध्याच्या फासासारखे आहेत;
त्याच्या देवाच्या मंदिरात* द्वेष आहे.
९ गिबाच्या दिवसांत झालं त्याप्रमाणे, ते विनाशकारक गोष्टी करण्यात पूर्णपणे गुंतले आहेत.+
तो त्यांचे अपराध लक्षात ठेवेल आणि त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा देईल.+
१० “ओसाड रानातल्या द्राक्षांसारखा इस्राएल मला सापडला.+
तुमचे वाडवडील मला अंजिराच्या झाडाला लागलेल्या पहिल्या अंजिरांप्रमाणे दिसले.
पण ते पौरच्या बआलकडे गेले;+
त्यांनी स्वतःला लाजिरवाण्या गोष्टीला* समर्पित केलं,+
आणि ज्याच्यावर त्यांचं प्रेम आहे, त्याच्यासारखेच ते घृणास्पद बनले आहेत.
११ एफ्राईमचं वैभव पक्ष्यासारखं उडून जातं;
कोणाला गर्भ राहणार नाही, किंवा कोणी जन्मही देणार नाही.+
१२ त्यांना मुलं झाली तरी,
मी त्यांच्या मुलांना हिरावून घेईन आणि शेवटी त्यांच्यात एकही माणूस उरणार नाही;+
मी त्यांच्याकडे पाठ फिरवल्यावर त्यांची खरंच दुर्दशा होईल!+
१३ कुरणात* लावलेला एफ्राईम माझ्यासाठी सोरसारखा होता;+
आता एफ्राईमला आपल्या मुलांना कत्तलीसाठी आणावं लागेल.”
१४ हे यहोवा, तू त्यांना जे दिलं पाहिजेस, ते त्यांना दे;
ज्यात गर्भ टिकत नाही असं गर्भाशय आणि सुकलेले स्तन.
१५ “त्यांचा सगळा दुष्टपणा गिलगालमध्ये+ होता,
कारण तिथे मी त्यांचा द्वेष करू लागलो.
त्यांच्या वाईट कृत्यांमुळे मी त्यांना माझ्या घरातून हाकलून लावीन.+
यापुढे मी त्यांच्यावर प्रेम करणार नाही.+
त्यांचे सगळे अधिकारी हट्टी आहेत.
१६ एफ्राईमला एखाद्या झाडासारखं पाडून टाकलं जाईल.+
त्याचं मूळ सुकून जाईल, आणि त्याला फळं येणार नाहीत.
त्यांना मुलं झाली, तरी मी त्यांच्या लाडक्या मुलांना* मारून टाकीन.”
१७ माझा देव त्यांना नाकारेल,
कारण त्यांनी त्याचं ऐकलं नाही,+
ते बेघर होऊन राष्ट्रा-राष्ट्रांतून भटकतील.+
१० “इस्राएल फळं देणाऱ्या सडक्या* द्राक्षवेलासारखा आहे.+
त्याला जितकी जास्त फळं येतात, तितक्या जास्त वेदी तो बांधतो;+
त्याची जमीन जितकं जास्त पीक देते, तितकेच सुंदर पूजेचे खांब तो उभे करतो.+
२ त्यांचं हृदय ढोंगी आहे;
आता त्यांना दोषी ठरवलं जाईल.
देव त्यांच्या वेदी मोडून टाकेल आणि त्यांचे खांब उद्ध्वस्त करेल.
३ आता ते म्हणतील, ‘आम्हाला राजा नाही,+ कारण आम्ही यहोवाचं भय मानलं नाही.
राजा आमच्यासाठी काय करू शकेल?’
४ ते पोकळ शब्द बोलतात, खोट्या शपथा घेतात+ आणि करार करतात;
त्यामुळे त्यांनी केलेला न्याय शेतात उगवणाऱ्या विषारी झुडपांसारखा आहे.+
५ शोमरोनच्या रहिवाशांना बेथ-आवेनच्या वासराच्या मूर्तीसाठी भीती वाटेल.+
त्याचे लोक त्या मूर्तीसाठी रडतील,
तसंच, परक्या देवांचे जे पुजारी तिच्यामुळे आणि तिच्या वैभवामुळे आनंदी व्हायचे तेही रडतील,
कारण तिला त्यांच्यापासून दूर बंदिवासात नेलं जाईल.
६ तिला अश्शूरला एका महान राजासाठी भेट म्हणून नेलं जाईल.+
एफ्राईमला लज्जित केलं जाईल,
आणि चुकीचा सल्ला पाळल्यामुळे इस्राएलची लाजिरवाणी स्थिती होईल.+
८ इस्राएलचं पाप,+ म्हणजे बेथ-आवेनची+ उच्च स्थानं नष्ट केली जातील.+
त्यांच्या वेदींवर काटेरी झुडपं उगवतील.+
लोक पर्वतांना म्हणतील, ‘आम्हाला झाकून टाका!’
आणि टेकड्यांना म्हणतील, ‘आमच्यावर पडा!’+
९ हे इस्राएल, गिबाच्या दिवसांपासून तू पाप केलं आहेस.+
तिथे तुझी वृत्ती बदलली नाही.
गिबामध्ये दुष्ट लोकांना* युद्धाने गाठलं नाही.*
१० मला वाटेल तेव्हा मी त्यांना शिक्षा करीन.
आणि त्यांचे दोन अपराध त्यांच्यावर बांधले जातील*
तेव्हा राष्ट्रांना त्यांच्याविरुद्ध एकत्र केलं जाईल.
११ एफ्राईम शिकवलेली गाय* होती; तिला धान्याची मळणी करायला आवडायचं,
म्हणून मी तिच्या सुंदर मानेवर ओझं लादलं नाही.
आता मात्र मी एफ्राईमवर स्वाराला बसवीन.*+
यहूदा नांगरणी करेल; याकोब त्याच्यासाठी मातीची ढेकळं फोडेल.
१२ स्वतःसाठी नीतीने बी पेरा आणि एकनिष्ठ प्रेमाची कापणी करा.
यहोवाला शोधण्याची संधी असेपर्यंत+
स्वतःसाठी सुपीक जमिनीची नांगरणी करा,+
म्हणजे तो येऊन तुम्हाला नीतीचं शिक्षण देईल.+
१३ पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली,
आणि अनीतीची कापणी केली.+
तुम्ही लबाडीचं फळ खाल्लं;
कारण तुम्ही स्वतःच्या विचारांवर
आणि आपल्या योद्ध्यांवर भरवसा ठेवला.
१४ तुमच्या लोकांविरुद्ध युद्धाचा गोंधळ ऐकू येईल;
ज्याप्रमाणे आर्बेलच्या घराण्याचा शल्मनने नाश केला,
तेव्हा युद्धाच्या दिवशी आईला तिच्या मुलांसोबत जमिनीवर आपटून ठार मारलं गेलं,
त्याप्रमाणे तटबंदी असलेली तुमची सगळी शहरं उद्ध्वस्त होतील.+
१५ हे बेथेल, तुझ्या भयंकर दुष्टपणामुळे तुझ्यासोबत असंच केलं जाईल.+
पहाटे इस्राएलच्या राजाचा नाश केला जाईल.”*+
३ मीच एफ्राईमला चालायला शिकवलं,+ आणि त्यांना उचलून घेतलं;+
पण मी त्यांना बरं केलं, हे त्यांनी ओळखलं नाही.
४ मी त्यांना दयेने आणि प्रेमाने आपल्याजवळ ओढून घेतलं;*+
मी त्यांच्या मानेवरून* जू* काढलं,
आणि प्रेमाने प्रत्येकाला अन्न आणून दिलं.
५ ते इजिप्तला परत जाणार नाहीत, पण अश्शूर त्यांचा राजा होईल,+
कारण ते माझ्याकडे परत यायला तयार झाले नाहीत.+
६ एफ्राईमच्या शहरांविरुद्ध तलवार फिरेल,+
आणि ती त्याचे अडसर तोडून त्यांचा नाश करेल, कारण त्यांनी दुष्ट योजना केल्या आहेत.+
७ माझ्या लोकांनी माझ्याशी अविश्वासूपणे वागण्याचा निश्चय केला आहे.+
त्यांनी त्यांना वर बोलावलं,* पण कोणी उठून आलं नाही.
८ हे एफ्राईम, मी तुला कसं सोडून देईन?+
हे इस्राएल, मी तुला शत्रूंच्या हाती कसा देईन?
मी तुझ्याशी अदमासारखा कसा वागीन?
मी तुला सबोईमसारखं कसं करीन?+
माझं मन बदललं आहे;
आणि त्याच वेळी माझ्या हृदयात कालवाकालव झाली आहे.+
९ मी माझ्या क्रोधाचा अग्नी भडकू देणार नाही.
मी पुन्हा एफ्राईमचा नाश करणार नाही,+
कारण मी माणूस नाही, तर देव आहे,
मी तुमच्यासोबत असणारा पवित्र देव आहे;
आणि मी संतापाच्या भरात तुमच्याकडे येणार नाही.
१० ते यहोवामागे चालतील आणि तो सिंहासारखा गरजेल;+
तो गर्जना करेल, तेव्हा त्याची मुलं पश्चिमेकडून थरथर कापत येतील.+
११ ते इजिप्तमधून पक्ष्यांसारखे,
आणि अश्शूरमधून कबुतरासारखे थरथर कापत येतील;+
आणि मी त्यांना त्यांच्या घरी परत आणीन,” असं यहोवा म्हणतो.+
१२ “एफ्राईमने मला खोटेपणाने
आणि इस्राएलच्या घराण्याने मला फसवणुकीने घेरलं आहे.+
१२ “एफ्राईम वाऱ्याने आपलं पोट भरतो.
तो दिवसभर पूर्वेच्या वाऱ्यामागे धावतो.
तो खोटेपणात आणि हिंसाचारात भर घालतो.
ते अश्शूरशी करार करतात+ आणि इजिप्तला तेल नेतात.+
२ यहोवाचा यहूदाविरुद्ध एक खटला आहे;+
तो याकोबकडून त्याच्या वागणुकीचा हिशोब घेईल,
आणि त्याच्या कृत्यांप्रमाणे त्याला प्रतिफळ देईल.+
४ तो एका स्वर्गदूतासोबत लढत राहिला आणि शेवटी विजयी ठरला.
त्याने रडून त्याच्याकडे आशीर्वादाची याचना केली.”+
तो देवाला बेथेलमध्ये सापडला आणि तिथे देव आपल्याशी बोलला.+
६ “म्हणून आपल्या देवाकडे परत या,+
एकनिष्ठ प्रेमाने आणि न्यायाने वागायचं सोडू नका,+
आणि देवाची सतत वाट पाहत राहा.
ती सगळी मी स्वतःच्या मेहनतीने मिळवली आहे, त्यांना माझ्यात कोणताही अपराध किंवा पाप सापडणार नाही.’
९ पण तुम्ही इजिप्तमध्ये होता, तेव्हापासून मी तुमचा देव यहोवा आहे.+
ठरलेल्या वेळी होणाऱ्या सणाच्या दिवसांप्रमाणे,
मी तुम्हाला पुन्हा तंबूंमध्ये राहायला लावीन.
१० मी संदेष्ट्यांशी बोललो,+
मी त्यांना पुष्कळ दृष्टान्त दाखवले.
मी संदेष्ट्यांद्वारे दाखले देऊन बोललो.
११ गिलादमध्ये फसवणूक*+ आणि असत्य आहे.
गिलगालमध्ये त्यांनी बैलांची बलिदानं दिली आहेत.+
त्यांच्या वेदी शेतातल्या दगडांच्या ढिगाऱ्यांप्रमाणे आहेत.+
१२ याकोब अरामच्या* प्रदेशात* पळून गेला;+
तिथे इस्राएलने+ बायको मिळावी म्हणून चाकरी केली,+
बायको मिळावी म्हणून त्याने मेंढरांची राखण केली.+
१३ यहोवाने एका संदेष्ट्याद्वारे इस्राएलला इजिप्तमधून बाहेर आणलं,+
आणि एका संदेष्ट्याद्वारे त्याचं रक्षण केलं.+
१४ एफ्राईमने देवाला खूप चीड आणली;+
त्याचा रक्तदोष त्याच्याच डोक्यावर राहील;
त्याने केलेल्या अपमानाबद्दल त्याचा प्रभू त्याची परतफेड करेल.”+
१३ “एफ्राईम बोलायचा तेव्हा लोक थरथर कापायचे;
तो इस्राएलमध्ये प्रतिष्ठित होता.+
पण बआलमुळे तो दोषी ठरला+ आणि मेला.
२ आता ते आपल्या पापांमध्ये भर घालतात
आणि आपल्या चांदीपासून मूर्ती* बनवतात;+
कारागिरांप्रमाणे ते कुशलतेने मूर्ती बनवतात.
ते त्यांना म्हणतात, ‘बलिदानं देणाऱ्या माणसांनी वासरांचं चुंबन घ्यावं.’+
३ म्हणून ते सकाळच्या मेघांसारखे,
लगेच नाहीशा होणाऱ्या दवासारखे,
वादळाने खळ्यातून* उडून जाणाऱ्या भुशासारखे,
आणि धुराड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरासारखे होतील.
४ पण इजिप्तपासून मीच तुमचा देव यहोवा आहे;+
तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा कोणी देव माहीत नव्हता,
आणि माझ्याशिवाय कोणी तारणकर्ता नाही.+
५ ओसाड रानात, दुष्काळ पडलेल्या देशात मी तुझी काळजी घेतली.+
आणि त्यामुळे ते मला विसरले.+
७ मी त्यांच्यासाठी तरुण सिंहासारखा,+
आणि वाटेवर लपून बसलेल्या चित्त्यासारखा होईन.
८ पिल्लं हरवलेल्या अस्वलीसारखा मी त्यांच्यावर हल्ला करीन,
आणि मी त्यांची छाती* फाडीन.
सिंहासारखा मी त्यांचा फडशा पाडीन.
रानातला जंगली पशू त्यांचे तुकडेतुकडे करेल.
९ हे इस्राएल, तो तुझा नाश करेल,
कारण तू माझ्यावर, तुला मदत करणाऱ्यावर उलटलास.
१० मग आता तुझ्या सर्व शहरांमध्ये तुला सोडवू शकेल, असा तुझा राजा कुठे आहे?+
आणि ‘मला राजा आणि अधिकारी दे,’ असं तू ज्यांच्याबद्दल बोललास, ते तुझे शासक* कुठे आहेत?+
१२ एफ्राईमच्या अपराधाचं गाठोडं बांधलेलं आहे;*
त्याचं पाप साठवून ठेवलेलं आहे.
१३ जन्म देणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याला वेदना होतील.
तो एका मूर्ख मुलासारखा आहे;
जन्माच्या वेळी तो गर्भाशयाच्या मुखाजवळ येत नाही.
अरे मरणा, तुझा डंख कुठे आहे?+
अगं कबरे, तुझी नाश करण्याची शक्ती कुठे आहे?+
मी दया दाखवणार नाही.
१५ जरी त्याची गवतामध्ये भरभराट झाली,
तरी पूर्वेचा, म्हणजे यहोवाकडून येणारा वारा
वाळवंटातून येईल आणि त्याची विहीर सुकवेल आणि त्याचा झरा आटवेल.
तो त्याच्या मौल्यवान वस्तूंचा खजिना लुटेल.+
त्यांचा तलवारीने नाश होईल,+
त्यांच्या मुलांना आपटून मारलं जाईल,
आणि त्यांच्या गरोदर बायकांना चिरून टाकलं जाईल.”
१४ “हे इस्राएल, तुझ्या देवाकडे, यहोवाकडे परत ये,+
कारण तुझ्या अपराधामुळे तू अडखळून पडला आहेस.
२ यहोवाकडे परत ये आणि त्याला असं म्हण,
‘कृपा करून आमच्या अपराधाची क्षमा कर+ आणि जे चांगलं आहे त्याचा स्वीकार कर,
म्हणजे, जशी आम्ही वासरं अर्पण करतो, तशी आमच्या ओठांची स्तुती तुला अर्पण करू.+
३ अश्शूर आम्हाला वाचवणार नाही.+
आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही,+
आणि आमच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींना आम्ही पुन्हा कधीही, “हे आमच्या देवा!” असं म्हणणार नाही,
४ मी त्यांचा अविश्वासूपणा बरा करीन.+
५ मी इस्राएलसाठी पहाटेच्या दवासारखा होईन;
तो भुईकमळासारखा फुलेल
आणि त्याची मुळं लबानोनच्या झाडांच्या मुळांसारखी खोलवर रुजतील.
६ त्याच्या फांद्या पसरतील,
त्याचं सौंदर्य जैतुनाच्या झाडासारखं,
आणि त्याचा सुगंध लबानोनच्या झाडांसारखा असेल.
७ ते पुन्हा एकदा त्याच्या छायेत राहतील.
ते धान्य उगवतील आणि द्राक्षवेलीसारखे बहरतील.+
तो लबानोनच्या द्राक्षारसासारखा प्रसिद्ध* होईल.
८ एफ्राईम म्हणेल, ‘मूर्तींशी आता माझं काय घेणंदेणं?’+
मी त्याचं ऐकेन आणि त्याची काळजी घेईन.+
मी हिरव्यागार गंधसरूच्या झाडासारखा होईन.
मीच तुला फळ देईन.”
९ बुद्धिमान कोण आहे? त्याने या गोष्टी समजून घ्याव्या.
समजदार कोण आहे? त्याने त्या जाणाव्या.
होशायाह या नावाचं हे संक्षिप्त रूप आहे. होशायाह या नावाचा अर्थ “याहने वाचवलेला; याहने वाचवलं,” असा होतो.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करेल; चारित्र्यहीन होईल.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यांमुळे; चारित्र्यहीनतेमुळे.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करून; चारित्र्यहीन होऊन.”
म्हणजे, “देव बी पेरेल.”
किंवा “खालच्या मैदानात.”
म्हणजे, “जिला दया दाखवण्यात आली नाही.”
म्हणजे, “माझे लोक नाहीत.”
शब्दशः “मुलं.”
होशे १:९ तळटीप पाहा.
होशे १:६ तळटीप पाहा.
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करण्याचं; चारित्र्यहीन वर्तन.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यांतून झालेली; चारित्र्यहीन वर्तनामुळे झालेली.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं; चारित्र्यहीन वर्तन.”
शब्दशः “गुप्तांगे.”
चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.
किंवा “खालचं मैदान.”
किंवा “मिसर.”
किंवा “माझा बआल.”
म्हणजे, “देव बी पेरेल.”
होशे १:६ तळटीप पाहा.
होशे १:९ तळटीप पाहा.
म्हणजे, ज्या खोट्या उपासनेसाठी वापरल्या जात होत्या.
एक होमर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करू नकोस; चारित्र्यहीन वर्तन करू नकोस.”
किंवा “मी तुझ्याशी संबंध ठेवणार नाही.”
शब्दशः “बरेच दिवस.”
किंवा “तेराफीम मूर्ती.”
किंवा “नाश करीन.”
किंवा “नाश करीन.”
किंवा “शिक्षण.”
किंवा कदाचित, “त्यांनी माझा गौरव करण्याऐवजी अपमान केला आहे.”
किंवा “लोभी झाले आहेत.”
किंवा “अतिशय अनैतिक कामं करतील; वेश्येसारखी कामं करतील.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं; चारित्र्यहीन वर्तन.”
किंवा “प्रेरणा.”
शब्दशः “हृदय काढून घेतात.”
किंवा “शकुन पाहणाऱ्याची काठी.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करण्याच्या; चारित्र्यहीन.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं; चारित्र्यहीन वर्तन.”
एक प्रकारचा मोठा वृक्ष. इंग्रजीत त्याला “ओक” म्हणतात.
सुंदर आणि सुगंधी फुलांचं एक झाड.
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं; चारित्र्यहीन वर्तन.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं केल्याबद्दल; चारित्र्यहीन वर्तनाबद्दल.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करत आहेस; चारित्र्यहीन आहेस.”
शब्दशः “मोकळ्या जागेत.”
किंवा “अतिशय अनैतिक कामं करतो; वेश्येसारखी कामं करतो.”
शब्दशः “ढालींना.”
किंवा “वाहून नेईल.”
किंवा “जे पडले आहेत ते.”
किंवा “पूर्णपणे गुंतले आहेत.”
किंवा “शिक्षा करीन.”
किंवा “अनैतिकपणे वागला आहेस; वेश्येसारखी कामं केली आहेस.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करण्याची; चारित्र्यहीन.”
शब्दशः “त्याच्या तोंडावर.”
किंवा “हिश्शांचा.”
किंवा “नाश करणाऱ्या किड्यासारखा.”
किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहासारखा.”
शब्दशः “मुख.”
किंवा “दयेने.”
किंवा “वेश्येसारखी कामं करतो.”
किंवा “आग वाढवण्यासाठी निखारे हलवत नाही.”
किंवा कदाचित, “कारस्थानं करायला येताना त्यांचं हृदय तापलेल्या भट्टीसारखं असतं.”
शब्दशः “न्यायाधीशांना.”
शब्दशः “हृदय नाही.”
शब्दशः “त्यांच्या मंडळीला.”
म्हणजे, उच्च दर्जाच्या उपासनेकडे वळले नाहीत.
किंवा “निर्दोष.”
किंवा “अनोळखी.”
किंवा “बरंच शिक्षण दिलं.”
किंवा कदाचित, “परत जातील.”
किंवा “वेश्येसारखी कामं केल्यामुळे; चारित्र्यहीन वर्तनामुळे.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “त्यांच्याच जिवासाठी.”
शब्दशः “घरात.”
किंवा “मेम्फिस.”
किंवा “खाजकुइलीची झुडपं.”
शब्दशः “घरात.”
किंवा “लाजिरवाण्या देवाला.”
किंवा “गुरं चारण्याच्या जमिनीत.”
शब्दशः “संततीला.”
किंवा कदाचित, “पसरणाऱ्या.”
शब्दशः “गप्प केलं जाईल.”
शब्दशः “अनीतीच्या पुत्रांना.”
किंवा “पूर्णपणे नाश केला नाही.”
म्हणजे, मानेवर ठेवलेल्या जुवासारखी ते आपली शिक्षा भोगतील.
किंवा “कालवड.”
किंवा “खोगीर टाकीन.”
शब्दशः “गप्प केलं जाईल.”
म्हणजे, इस्राएलला शिकवण्यासाठी पाठवलेल्या संदेष्ट्यांनी आणि इतरांनी.
शब्दशः “माणसाच्या आणि प्रेमाच्या दोऱ्यांनी मी त्यांना ओढत राहिलो.”
शब्दशः “जबड्यांतून.”
शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, उच्च दर्जाच्या उपासनेकडे.
किंवा “चालतो.”
किंवा “हे नाव त्याचं स्मारक आहे.”
किंवा “दुकानदाराच्या.”
किंवा “गूढ गोष्टी.”
किंवा “सीरियाच्या.”
शब्दशः “शेतात.”
किंवा “ओतीव मूर्ती.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “गुरं चारण्याच्या जमिनींमध्ये.”
शब्दशः “त्यांच्या हृदयाचं कुंपण.”
शब्दशः “न्यायाधीश.”
किंवा “सांभाळून ठेवलेलं आहे.”
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “वडील नसलेल्या मुलाला.”
शब्दशः “स्मारक.”