वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt नीतिसूत्रे १:१-३१:३१
  • नीतिवचनं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नीतिवचनं
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नीतिवचनं

नीतिवचनं

१ दावीदचा मुलगा,+ इस्राएलचा राजा+ शलमोन याची नीतिवचनं:+

 २ बुद्धी+ आणि शिक्षण* मिळवण्यासाठी;*

बुद्धीची वचनं समजून घेण्यासाठी;

 ३ सखोल समज देणारं शिक्षण+ मिळवण्यासाठी;

नीतिमत्त्व,+ निर्णयशक्‍ती*+ आणि सरळपणा* विकसित करण्यासाठी;

 ४ भोळ्यांना चतुरपणा;+

तरुणाला ज्ञान आणि विचारशक्‍ती देण्यासाठी,+ ही नीतिवचनं लिहिण्यात आली आहेत.

 ५ बुद्धिमान माणूस ऐकतो आणि आणखी शिकतो;+

समजशक्‍ती असलेला माणूस चांगलं* मार्गदर्शन मिळवतो.+

 ६ त्यामुळे त्याला नीतिवचन आणि दाखला,*

बुद्धिमानांचे शब्द आणि त्यांची कोडी समजतील.+

 ७ यहोवाचं* भय* ही ज्ञानाची सुरुवात आहे.+

मूर्खच बुद्धीला आणि शिक्षणाला तुच्छ लेखतात.+

 ८ माझ्या मुला, तुझ्या वडिलांनी दिलेलं शिक्षण लक्ष देऊन ऐक,+

आणि तुझ्या आईची शिकवण* सोडू नकोस.+

 ९ त्यांनी दिलेलं शिक्षण तुझ्या डोक्यावर सुंदर मुकुटासारखं;+

आणि तुझ्या गळ्यात मौल्यवान हारासारखं आहे.+

१० माझ्या मुला, जर पापी लोकांनी तुला मोहात पाडायचा प्रयत्न केला, तर त्यांचं ऐकू नकोस.+

११ जर ते म्हणाले: “आमच्यासोबत चल.

आपण खून करण्यासाठी लपून बसू.

मजा म्हणून निर्दोष लोकांवर हल्ला करायला, आपण लपून बसू.

१२ कबर* गिळते, तसं आपण त्यांना जिवंत गिळू;

खळग्यात जाणाऱ्‍यांप्रमाणे, आपण त्यांना अख्खं गिळू.

१३ आपण त्यांची सगळी मौल्यवान संपत्ती हडपू;

त्या लुटीने आपण आपली घरं भरू.

१४ तूही आमच्यासोबत चल,

चोरलेल्या वस्तू आपण सारख्या वाटून घेऊ.”

१५ तर माझ्या मुला, त्यांच्यामागे जाऊ नकोस.

त्यांच्या वाटेवर पाऊलही ठेवू नकोस,+

१६ कारण त्यांची पावलं दुष्टपणा करण्यासाठी धावतात;

रक्‍त सांडण्यासाठी ते घाई करतात.+

१७ पक्ष्याच्या देखत त्याच्यासाठी जाळं पसरणं व्यर्थ आहे.

१८ म्हणूनच हे लोक खून करण्यासाठी लपून बसतात;

दुसऱ्‍यांचा जीव घेण्यासाठी ते टपून बसतात.

१९ ज्यांना बेइमानीची कमाई हवी असते, त्यांची कामं अशीच असतात,

त्यांची कमाई त्यांचा जीव घेईल.+

२० खरी बुद्धी+ रस्त्यावर हाक मारते.+

ती चौकाचौकांत मोठ्याने घोषणा करते.+

२१ गजबजलेल्या रस्त्यांच्या कोपऱ्‍यावरून ती बोलावते.

शहराच्या प्रवेशद्वारांवर ती म्हणते:+

२२ “अज्ञानी लोकांनो, तुम्ही तुमच्या अज्ञानावर कधीपर्यंत प्रेम करत राहाल?

थट्टा करणाऱ्‍यांनो, तुम्ही कधीपर्यंत थट्टा करण्यात आनंद मानत राहाल?

आणि मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत ज्ञानाचा तिरस्कार करत राहाल?+

२३ माझं ताडन स्वीकारून आपले मार्ग बदला.*+

मग मी तुम्हाला बुद्धीचं सामर्थ्य देईन;

मी माझे शब्द तुम्हाला प्रकट करीन.+

२४ मी हाक मारली, पण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत राहिलात,

मी हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिलं नाही.+

२५ माझ्या सर्व सल्ल्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहिलात

आणि माझं ताडन नाकारत राहिलात.

२६ म्हणून, जेव्हा तुमच्यावर संकट कोसळेल, तेव्हा मीही हसेन;

तुम्हाला ज्या संकटाची भीती वाटते, ते तुमच्यावर येईल, तेव्हा मी तुमची थट्टा करीन.+

२७ कारण संकट तुमच्यावर वादळासारखं येईल,

विपत्ती तुमच्यावर वादळी वाऱ्‍यासारखी येईल,

आणि तुमच्यावर यातना आणि पीडा येतील.

२८ त्या वेळी ते मला हाक मारत राहतील, पण मी उत्तर देणार नाही;

ते मला शोधण्याचा खूप प्रयत्न करतील, पण त्यांना मी सापडणार नाही.+

२९ कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला,+

आणि यहोवाची भीती बाळगायला ते तयार नव्हते.+

३० त्यांनी माझा सल्ला नाकारला;

आणि माझ्या ताडनाचा नेहमी अनादर केला.

३१ म्हणून, त्यांना त्यांच्या वागणुकीचे परिणाम भोगावे लागतील.*+

त्यांच्या दुष्ट योजनांचं* त्यांना पुरेपूर फळ मिळेल.

३२ माझ्याकडे पाठ फिरवल्यामुळे भोळे आपला जीव गमावतील,

मूर्खांच्या बेपर्वाईमुळे त्यांचा नाश होईल.

३३ पण जो माझं ऐकतो तो सुरक्षित राहील+

आणि त्याला संकटाची भीती सतावणार नाही.”+

२ माझ्या मुला, जर तू माझे शब्द ऐकशील

आणि माझ्या आज्ञा संपत्तीसारख्या साठवून ठेवशील,+

 २ जर तू बुद्धीच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकशील+

आणि समंजसपणाकडे मन लावशील;+

 ३ जर तू समजशक्‍तीला हाक मारशील+

आणि समंजसपणाला मोठ्याने पुकारशील;+

 ४ जर तू चांदीप्रमाणे त्यांना शोधशील+

आणि गुप्त खजिन्याप्रमाणे त्यांचा शोध घेत राहशील;+

 ५ तर यहोवाची भीती काय असते, हे तुला समजेल+

आणि तुला देवाचं ज्ञान मिळेल.+

 ६ कारण यहोवा स्वतः बुद्धी देतो;+

ज्ञान आणि समंजसपणा हे त्याच्याच तोंडून येतात.

 ७ तो सरळ लोकांसाठी व्यावहारिक बुद्धी राखून ठेवतो;

खरेपणाने चालणाऱ्‍यांसाठी तो एक ढाल आहे.+

 ८ तो न्यायाच्या मार्गांवर पहारा देतो

आणि आपल्या एकनिष्ठ सेवकांच्या वाटेचं रक्षण करतो.+

 ९ नीती, न्याय आणि निःपक्षपणा काय असतो, हेही तुला समजेल

आणि योग्य मार्ग कोणता हे तुला कळेल.+

१० जेव्हा बुद्धी तुझ्या मनात प्रवेश करेल+

आणि ज्ञान तुझ्या जिवाला* प्रिय वाटू लागेल,+

११ तेव्हा विचारशक्‍ती तुझा सांभाळ करेल+

आणि समंजसपणा तुझं रक्षण करेल.

१२ यामुळे वाईट मार्गापासून तुझा बचाव होईल.

जो माणूस घृणास्पद गोष्टी बोलतो,+

१३ जे अंधारात चालण्यासाठी

सरळ मार्ग सोडून देतात,+

१४ जे वाईट गोष्टी करण्यात आनंद मानतात,

ज्यांना दुष्टपणाच्या घृणास्पद गोष्टी करण्यात मौज वाटते,

१५ ज्यांचे मार्ग वाकडे आहेत

आणि जे आयुष्यभर कपटीपणाने चालतात, त्यांच्यापासून तुझा बचाव होईल.

१६ बुद्धी तुला वाईट चालीच्या* स्त्रीपासून;

गोड* बोलणाऱ्‍या अनैतिक* स्त्रीपासून वाचवेल.+

१७ ती आपल्या तरुणपणाच्या जोडीदाराला* सोडून देते+

आणि आपल्या देवाचा करार विसरते.

१८ तिच्या घरी जाणं मृत्यूकडे जाण्यासारखं आहे

आणि तिच्या घराकडे जाणारे मार्ग* कबरेकडे नेतात.+

१९ तिच्याशी संबंध ठेवणारे* परत येणार नाहीत,

ते पुन्हा जीवनाच्या मार्गांवर चालणार नाहीत.+

२० म्हणून चांगल्या लोकांच्या मार्गावर चालत राहा

आणि नीतिमानांच्या वाटांवर टिकून राहा.+

२१ कारण फक्‍त सरळ मनाचे लोक पृथ्वीवर राहतील

आणि जे निर्दोष आहेत* तेच तिच्यावर टिकून राहतील.+

२२ पण दुष्ट लोकांचा पृथ्वीवरून नाश केला जाईल+

आणि विश्‍वासघात करणाऱ्‍यांना तिच्यातून उपटून टाकलं जाईल.+

३ माझ्या मुला, माझी शिकवण* विसरू नकोस,

माझ्या आज्ञा मनापासून पाळ.

 २ कारण त्यांच्यामुळे तुला मोठं आयुष्य

आणि शांती लाभेल.+

 ३ एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा* कधीही सोडू नकोस.+

त्यांना आपल्या गळ्याभोवती बांध;

त्यांना आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.+

 ४ मग देवाच्या आणि माणसाच्या नजरेत

तुला सखोल समज असलेला म्हणून ओळखलं जाईल

आणि तुझ्यावर त्यांची कृपा होईल.+

 ५ यहोवावर अगदी मनापासून भरवसा ठेव+

आणि स्वतःच्या समजशक्‍तीवर अवलंबून* राहू नकोस.+

 ६ तुझ्या सर्व कार्यांत त्याची आठवण ठेव,+

म्हणजे तो तुझे मार्ग मोकळे करेल.+

 ७ स्वतःच्या बुद्धीवर भरवसा ठेवू नकोस.+

यहोवाची भीती बाळग आणि वाइटापासून दूर राहा.

 ८ ती तुझ्या शरीराला* आरोग्य

आणि तुझ्या हाडांना तजेला देईल.

 ९ आपल्या मौल्यवान वस्तूंनी;+

आपल्या उत्पन्‍नातल्या* पहिल्या फळांनी* यहोवाचा आदर कर.+

१० मग तुझी कोठारं भरलेली असतील+

आणि तुझी द्राक्षकुंडं नवीन द्राक्षारसाने भरून वाहतील.

११ माझ्या मुला, यहोवाकडून मिळणारी शिक्षा* नाकारू नकोस+

आणि त्याचं ताडन तुच्छ लेखू नकोस,+

१२ कारण जसा एक पिता आपल्या लाडक्या मुलाचं ताडन करतो,+

तसंच, यहोवाही ज्याच्यावर प्रेम करतो, त्याचं ताडन करतो.+

१३ ज्या माणसाला बुद्धी सापडते+

आणि जो माणूस समंजसपणा मिळवतो तो सुखी!

१४ कारण बुद्धी मिळवणं हे चांदी मिळवण्यापेक्षा चांगलं,

आणि बुद्धीचा लाभ सोन्यापेक्षा चांगला!+

१५ ती पोवळ्यांपेक्षाही* मौल्यवान आहे;

तुला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टीशी तिची तुलना करता येणार नाही.

१६ तिच्या उजव्या हातात मोठं आयुष्य

आणि तिच्या डाव्या हातात धनसंपत्ती आणि गौरव आहे.

१७ तिचे मार्ग सुखद

आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत.+

१८ तिला धरून राहणाऱ्‍यांसाठी, ती जीवनाचा वृक्ष आहे.

जे तिला घट्ट धरून राहतात, त्यांना सुखी म्हटलं जाईल.+

१९ यहोवाने पृथ्वीचा पाया बुद्धीने घातला;+

समंजसपणाने आकाशाला स्थापन केलं.+

२० त्याच्या ज्ञानाने खोल पाणी विभागण्यात आलं

आणि आभाळातून दव झिरपू लागलं.+

२१ माझ्या मुला, त्यांना* कधीही नजरेआड होऊ देऊ नकोस.

व्यावहारिक बुद्धीचं आणि विचारशक्‍तीचं रक्षण कर.

२२ ते तुला जीवन देतील

आणि तुझ्या गळ्यासाठी सुंदर दागिन्यासारखे असतील.

२३ मग तू आपल्या मार्गाने सुखरूपपणे चालशील

आणि तुझं पाऊल कधीच अडखळणार नाही.*+

२४ तू झोपशील तेव्हा तुला कसलीच भीती नसेल;+

तू बिछान्यावर पडशील, तेव्हा तुला चांगली झोप लागेल.+

२५ अचानक येणाऱ्‍या कोणत्याही संकटाला,

किंवा दुष्टांवर येणाऱ्‍या वादळाला+ तू घाबरणार नाहीस.+

२६ कारण यहोवा तुझा भरवसा असेल.+

तो तुझा पाय सापळ्यात अडकू देणार नाही.+

२७ ज्यांचं भलं केलं पाहिजे,* त्यांचं भलं करण्याची तुझ्यात ताकद असेल,*+

तर तसं करण्यापासून मागे हटू नकोस.+

२८ आपल्या शेजाऱ्‍याला एखादी गोष्ट देणं तुला शक्य असेल,

तर असं म्हणू नकोस, “जा, उद्या परत ये! मग मी तुला ती देईन.”

२९ तुझा शेजारी तुझ्यासोबत निर्धास्तपणे राहत असेल,

तर त्याच्याविरुद्ध वाईट योजना करू नकोस.+

३० एखाद्याने तुझं काही वाईट केलं नसेल,

तर त्याच्याशी विनाकारण भांडू नकोस.+

३१ हिंसा करणाऱ्‍या माणसाचा हेवा करू नकोस,+

किंवा त्याच्यासारखं वागू नकोस,

३२ कारण यहोवाला कपटी माणसाची घृणा वाटते,+

पण सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.+

३३ दुष्टाच्या घरावर यहोवाचा शाप असतो,+

पण नीतिमानाच्या घराला तो आशीर्वाद देतो.+

३४ थट्टा करणाऱ्‍यांची तो थट्टा करतो,+

पण नम्र लोकांवर तो कृपा करतो.+

३५ बुद्धिमानांना सन्मानाचा वारसा मिळेल,

पण मूर्ख स्वतःहून अपमान ओढवून घेतात.+

४ माझ्या मुलांनो, एका पित्याचं हे मार्गदर्शन* मन लावून ऐका;+

त्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला समजशक्‍ती मिळेल.

 २ कारण मी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन देईन;

माझी शिकवण* कधीही सोडू नका.+

 ३ मी आपल्या आईचा सगळ्यात लाडका होतो,+

आपल्या वडिलांचा मी आज्ञाधारक मुलगा होतो.+

 ४ ते मला शिकवायचे आणि म्हणायचे: “माझे शब्द मनात जपून ठेव.+

माझ्या आज्ञा पाळ, म्हणजे तुझं आयुष्य वाढेल.+

 ५ बुद्धी मिळव, समजशक्‍ती मिळव.+

मी सांगितलेल्या गोष्टी कधीच विसरू नकोस, त्यांपासून भरकटू नकोस.

 ६ तिला* कधीही सोडू नकोस म्हणजे ती तुझं रक्षण करेल.

तिच्यावर प्रेम कर म्हणजे ती तुला सांभाळेल.

 ७ बुद्धीच सर्वात महत्त्वाची* आहे,+ म्हणून बुद्धी मिळव

आणि जे काही मिळवशील, त्यासोबत समजशक्‍तीही मिळव.+

 ८ तिला खूप मौल्यवान समज, म्हणजे ती तुझा सन्मान करेल.+

तू तिला जवळ केल्यामुळे ती तुझा गौरव करेल.+

 ९ ती तुझ्या डोक्यावर फुलांचा सुरेख मुकुट ठेवेल;

ती सुंदर मुकुटाने तुला सजवेल.”

१० माझ्या मुला ऐक आणि मी सांगितलेल्या गोष्टी मनापासून स्वीकार,

म्हणजे तुला मोठं आयुष्य लाभेल.+

११ मी तुला बुद्धीच्या मार्गाचं शिक्षण देईन;+

सरळपणाच्या मार्गांनी तुला नेईन.+

१२ चालताना तुझ्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही

आणि तू धावशील तेव्हा तू अडखळणार नाहीस.

१३ ताडनाला* धरून ठेव, ते सोडू नकोस.+

त्याचं रक्षण कर, कारण तेच तुझं जीवन आहे.+

१४ दुष्टांच्या वाटेवर पाऊल ठेवू नकोस

आणि वाईट लोकांच्या मार्गाने चालू नकोस.+

१५ त्यावर जाऊ नकोस, त्याचा तिरस्कार कर.+

त्यापासून वळ, त्याच्या जवळही जाऊ नकोस.+

१६ कारण काही वाईट केल्याशिवाय दुष्टांना झोप लागत नाही.

कोणाचं नुकसान केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.

१७ ते दुष्टपणाच्या भाकरीने आपलं पोट भरतात;

ते हिंसेचा द्राक्षारस पितात.

१८ पण, नीतिमान माणसाचा मार्ग पहाटेच्या प्रकाशासारखा असतो;

दिवस पूर्ण उगवेपर्यंत वाढत जाणाऱ्‍या उजेडासारखा तो असतो.+

१९ दुष्टांच्या मार्गावर अंधार असतो;

आपण कशामुळे अडखळलो हेही त्यांना कळत नाही.

२० माझ्या मुला, माझ्या शब्दांकडे लक्ष दे;

मी सांगितलेल्या गोष्टी मनापासून ऐक.*

२१ त्या नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेव;

त्या आपल्या मनात अगदी खोलवर साठवून ठेव.+

२२ कारण त्यांचा स्वीकार करणाऱ्‍यांना जीवन मिळतं+

आणि त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य मिळतं.

२३ ज्या गोष्टींचं तू रक्षण करतोस, त्या सर्वांपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर,+

कारण त्यातूनच जीवनाचे झरे फुटतात.

२४ कपटीपणाचं बोलणं आपल्यापासून दूर ठेव+

आणि फसव्या गोष्टींपासून लांबच राहा.

२५ तू नेहमी पुढे पाहत राहा;

तुझी नजर नेहमी समोर खिळवून ठेव.+

२६ आपला मार्ग सपाट कर*+

म्हणजे तुझी पावलं कधीही डळमळणार नाहीत.*

२७ डावीकडे किंवा उजवीकडे वळू नकोस.+

वाईट मार्गापासून दूर राहा.

५ माझ्या मुला, माझ्या सुज्ञ* शब्दांकडे लक्ष दे.

मी शिकवलेल्या समंजसपणाच्या गोष्टी मनापासून ऐक,*+

 २ म्हणजे तू आपल्या विचारशक्‍तीचं रक्षण करू शकशील

आणि तुझ्या ओठांतून नेहमी खरं तेच निघेल.+

 ३ कारण वाईट चालीच्या* स्त्रीच्या ओठांतून मध पाझरतो+

आणि तिचे शब्द* तेलापेक्षा गुळगुळीत असतात.+

 ४ पण शेवटी ती दवण्यासारखी* कडू+

आणि दुधारी तलवारीसारखी धारदार असते.+

 ५ तिचे पाय खाली मृत्यूकडे जातात.

तिची पावलं सरळ कबरेकडे* नेतात.

 ६ जीवनाच्या मार्गाबद्दल ती विचार करत नाही.

तिची वाट भरकटत जाते, पण कुठे हे तिला माहीत नसतं.

 ७ म्हणून, माझ्या मुला,* माझं ऐक;

मी जे सांगतोय त्याकडे दुर्लक्ष करू नकोस.

 ८ तिच्यापासून लांबच राहा;

तिच्या घराच्या फाटकाजवळही जाऊ नकोस,+

 ९ म्हणजे तू आपलं चांगलं नाव गमावणार नाहीस+

आणि आयुष्यभर तुला दुःख भोगावं लागणार नाही;+

१० तुझी संपत्ती* परके लुबाडणार नाहीत+

आणि तुझ्या कष्टाची कमाई विदेश्‍याच्या घरात जाणार नाही.

११ नाहीतर, तुझ्या आयुष्याच्या शेवटी,

जेव्हा तुझी शक्‍ती नाहीशी होईल आणि शरीर खंगत* जाईल+

तेव्हा तू कण्हशील.

१२ मग तू म्हणशील: “मी शिक्षणाचा तिरस्कार का केला?

मी ताडनाला तुच्छ का लेखलं?

१३ मला मार्गदर्शन देणाऱ्‍यांचं मी ऐकलं नाही

आणि माझ्या शिक्षकांकडे लक्ष दिलं नाही.

१४ आता मंडळीच्या सर्व लोकांसमोर*

मी सर्वनाशाच्या मार्गाला लागलोय.”+

१५ तू आपल्याच कुंडातलं

आणि स्वतःच्याच विहिरीतलं पाणी पी.+

१६ तुझे झरे बाहेर का वाहून जावेत?

आणि तुझे प्रवाह चौकांत का वाहावेत?+

१७ ते परक्यांसाठी नाही,

तर फक्‍त तुझ्यासाठीच असू दे.+

१८ तुझा झरा* आशीर्वादित असो!

आपल्या तारुण्यातल्या बायकोसोबत आनंदी राहा.+

१९ ती सुंदर हरिणीसारखी, नाजुक रानशेळीसारखी आहे.+

तिचे स्तन नेहमी तुला तृप्त* करोत.

तिचंच प्रेम तुला नेहमी मोहित करो.+

२० माझ्या मुला, तू वाईट चालीच्या* स्त्रीवर का मोहित व्हावंस?

आणि एका अनैतिक* स्त्रीला का मिठी मारावीस?+

२१ कारण माणसाचे सगळे मार्ग यहोवाच्या नजरेसमोर असतात;

तो त्याच्या सगळ्या वाटांचं परीक्षण करतो.+

२२ दुष्ट माणूस स्वतःच्या अपराधांमुळे पाशात सापडेल,

तो आपल्याच पापाच्या दोरांमध्ये पकडला जाईल.+

२३ त्याच्या अति मूर्खपणामुळे तो भरकटत जाईल

आणि स्वतःला न सुधारल्यामुळे त्याचा मृत्यू होईल.

६ माझ्या मुला, जर तू आपल्या शेजाऱ्‍यासाठी जामीन राहिला असशील,+

जर तू एखाद्या परक्या माणसासोबत करार केला असशील,+

 २ आणि जर तू वचन देऊन अडकला असशील,

किंवा तुझ्या तोंडून निघालेल्या शब्दांत पकडला गेला असशील,+

 ३ तर माझ्या मुला, तू आपल्या शेजाऱ्‍याच्या हाती सापडला आहेस.

तेव्हा, स्वतःला सोडवण्यासाठी असं कर:

त्या शेजाऱ्‍याकडे जाऊन, तुझ्यावर दया करण्याची त्याला नम्रपणे आणि कळकळीने विनंती कर.+

 ४ जोपर्यंत तू असं करत नाहीस, तोपर्यंत आपल्या डोळ्यांवर झोप येऊ देऊ नकोस;

किंवा आपल्या पापण्या मिटून विश्रांती घेऊ नकोस.

 ५ शिकाऱ्‍याच्या हाती सापडलेल्या हरिणीप्रमाणे;

पारध्याच्या हाती सापडलेल्या पक्ष्याप्रमाणे, स्वतःला सोडवून घे.

 ६ अरे आळश्‍या, मुंगीकडे जा,+

तिचं निरीक्षण कर आणि बुद्धिमान हो.

 ७ तिच्यावर कोणी सेनापती, अधिकारी किंवा शासक नसतो,

 ८ तरी ती उन्हाळ्यात आपल्या अन्‍नाची सोय करते+

आणि कापणीच्या काळात आपली अन्‍नसामग्री गोळा करते.

 ९ अरे आळश्‍या, कधीपर्यंत असा लोळत पडशील?

कधी आपल्या झोपेतून जागा होशील?

१० जराशी डुलकी घेतो, जराशी झोप घेतो,

हात छातीशी घेऊन अजून थोडासा आराम करतो,+

११ असं म्हणत राहिलास, तर गरिबी एखाद्या लुटारूप्रमाणे,

आणि दारिद्र्‌य एखाद्या शस्त्रधारी माणसाप्रमाणे तुला गाठेल.+

१२ रिकामटेकडा आणि दुष्ट माणूस कपटीपणाच्या गोष्टी करत फिरतो;+

१३ तो डोळे मिचकावतो,+ पायांनी इशारे करतो, आणि बोटांनी खाणाखुणा करतो.

१४ त्याचं मन कपटी असतं.

तो नेहमी दुष्ट योजना करत राहतो+ आणि भांडणं लावत फिरतो.+

१५ त्यामुळे त्याच्यावर अचानक संकट कोसळेल,

एका क्षणात तो धुळीला मिळेल आणि पुन्हा उठू शकणार नाही.+

१६ यहोवाला सहा गोष्टींचा तिटकारा आहे;

हो, त्याला* सात गोष्टींबद्दल घृणा आहे:

१७ गर्विष्ठ नजर,+ खोटं बोलणारी जीभ,+ निर्दोष रक्‍त सांडणारे हात,+

१८ दुष्ट कारस्थानं करणारं मन,+ वाईट गोष्टींकडे घाईघाईने धावणारे पाय,

१९ क्षणाक्षणाला लबाड बोलणारा खोटा साक्षीदार+

आणि भावाभावांत भांडणतंटे उत्पन्‍न करणारा माणूस.+

२० माझ्या मुला, तू आपल्या वडिलांची आज्ञा पाळ

आणि आपल्या आईची शिकवण* सोडू नकोस.+

२१ त्यांचे शब्द नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून ठेव

आणि ते आपल्या गळ्यात बांधून ठेव.

२२ तू चालशील तेव्हा ते तुला मार्ग दाखवतील;

तू झोपशील तेव्हा ते तुझ्यावर पहारा देतील

आणि तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलतील.*

२३ कारण आज्ञा ही दिव्यासारखी,+

नियम हा प्रकाशासारखा+

आणि सुधारणुकीसाठी दिलेलं ताडन हे जीवनाच्या मार्गासारखं आहे.+

२४ ते तुला वाईट स्त्रीपासून वाचवतील,+

अनैतिक* स्त्रीच्या भुलवणाऱ्‍या शब्दांपासून तुझं रक्षण करतील.+

२५ तिच्या सौंदर्याचा तुझ्या मनाला मोह होऊ देऊ नकोस,+

किंवा तिच्या सुरेख डोळ्यांनी मोहित होऊ नकोस.

२६ कारण वेश्‍येमुळे माणूस कंगाल होतो*+

आणि दुसऱ्‍याच्या बायकोच्या नादी लागणारा आपला अनमोल जीव* गमावून बसतो.

२७ जो छातीशी विस्तव धरतो, त्याचे कपडे जळणार नाहीत का?+

२८ किंवा जो निखाऱ्‍यांवर चालतो, त्याचे पाय भाजणार नाहीत का?

२९ दुसऱ्‍याच्या बायकोसोबत संबंध ठेवणाऱ्‍याच्या बाबतीतही तसंच आहे;

तिला स्पर्श करणाऱ्‍याला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही.+

३० एखाद्याने आपली भूक भागवण्यासाठी* चोरी केली,

तर लोक त्याला दोष देत नाहीत.

३१ तरीपण, तो पकडला जातो तेव्हा त्याला सातपट भरपाई द्यावी लागते.

त्याला आपल्या घरातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू देऊन टाकाव्या लागतात.+

३२ जो एखाद्या स्त्रीसोबत व्यभिचार करतो, त्याला समज नसते;

तो स्वतःवर* नाश ओढवून घेतो.+

३३ त्याला फक्‍त दुःख आणि अपमान सहन करावा लागेल,+

आणि त्याचा कलंक कधीही पुसला जाणार नाही.+

३४ कारण ईर्ष्येने पेटलेल्या नवऱ्‍याचा क्रोध भयानक असतो;

सूड घेताना तो दयामया दाखवणार नाही.+

३५ तो कोणतीही भरपाई* स्वीकारणार नाही;

कितीही मौल्यवान भेट दिली, तरी त्याचा राग शांत होणार नाही.

७ माझ्या मुला, मी सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे वाग,

माझ्या आज्ञा संपत्तीसारख्या साठवून ठेव.+

 २ माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तुला मोठं आयुष्य लाभेल;+

डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे* माझ्या शिकवणीचं* रक्षण कर.

 ३ त्यांना तुझ्या बोटांभोवती बांधून ठेव;

आपल्या हृदयाच्या पाटीवर त्या लिहून ठेव.+

 ४ बुद्धीला म्हण, “तू माझी बहीण आहेस.”

आणि समजशक्‍तीला म्हण, “तू माझी नातलग आहेस.”

 ५ त्यामुळे वाईट चालीच्या* स्त्रीपासून तुझं रक्षण होईल;+

गोड* बोलणाऱ्‍या अनैतिक* स्त्रीपासून तू वाचशील.+

 ६ मी आपल्या घराच्या खिडकीतून;

आपल्या जाळीतून खाली पाहिलं.

 ७ रस्त्यावरच्या भोळ्याभाबड्या* लोकांना पाहताना,

मला तरुणांमध्ये एक असा तरुण दिसला, ज्याला समज नव्हती.+

 ८ तो तिच्या घराजवळच्या रस्त्यावरून गेला

आणि मग सरळ तिच्या घराच्या दिशेने चालू लागला.

 ९ ती मावळतीची, संध्याकाळची वेळ होती;+

रात्रीचा अंधार पडू लागला होता.

१० तेव्हा मी एका स्त्रीला त्याच्याजवळ येताना पाहिलं.

वेश्‍येसारखे कपडे*+ घातलेली ती स्त्री फार धूर्त होती.

११ ती मोठमोठ्याने बोलणारी आणि बेपर्वा वृत्तीची होती.+

तिचा पाय कधीच घरात टिकत नव्हता.

१२ एका क्षणाला घराबाहेर, तर दुसऱ्‍या क्षणाला चौकांत;

ती कोपऱ्‍याकोपऱ्‍यावर टपून असायची.+

१३ तिने त्याला धरून त्याचं चुंबन घेतलं.

ती निर्लज्जपणे त्याला म्हणाली:

१४ “मला शांती-अर्पणं द्यायची होती.+

आज मी माझे नवस फेडले.

१५ म्हणून मी तुला भेटायला आले.

मी तुला शोधलं आणि तू मला सापडलास!

१६ मी माझ्या पलंगावर सुंदर चादरी

आणि इजिप्तची* रंगीत मलमल अंथरली आहे.+

१७ मी माझ्या बिछान्यावर दालचिनी, अगरू* आणि गंधरस शिंपडलाय.+

१८ चल, आपण सकाळपर्यंत प्रेमरसाने धुंद होऊ;

एकमेकांच्या प्रेमात बुडून जाऊ.

१९ कारण माझा नवरा घरी नाही;

तो लांबच्या प्रवासाला गेलाय.

२० त्याने सोबत पैशांची थैली नेली आहे,

तो पौर्णिमेपर्यंत परत येणार नाही.”

२१ तिने लाडीगोडीने बोलून त्याला भुलवलं;+

आपल्या मोहक शब्दांनी त्याला जाळ्यात अडकवलं.

२२ मग कत्तलखान्याकडे जाणाऱ्‍या बैलासारखा;

खोड्यांत* अडकवण्यासाठी नेल्या जाणाऱ्‍या मूर्खासारखा,

तो अचानक तिच्यामागे चालू लागला.+

२३ पण शेवटी त्याच्या काळजात बाण घुसेल;

जाळ्यात झेपावणाऱ्‍या पक्ष्यासारखी त्याची अवस्था होईल,

आपला जीव जाईल, याची त्याला जाणीव नाही.+

२४ म्हणून माझ्या मुला,* माझं ऐक;

माझ्या शब्दांकडे लक्ष दे.

२५ आपलं मन तिच्या मार्गांकडे वळू देऊ नकोस.

आणि तिच्या वाटांकडे वाहवत जाऊ नकोस.+

२६ कारण तिने बऱ्‍याच जणांना घायाळ करून पाडलंय.+

तिने असंख्य माणसांचा जीव घेतलाय.+

२७ तिचं घर माणसाला कबरेकडे* नेतं;

त्याची वाट मृत्यूच्या आतल्या खोल्यांकडे जाते.

८ बुद्धी हाक मारत आहे

आणि समंजसपणा मोठ्याने पुकारत आहे.+

 २ ती चौकांमध्ये, रस्त्याच्या कडेला

उंच ठिकाणांवर+ उभी राहते.

 ३ शहराच्या फाटकांजवळ,

प्रवेशद्वारांजवळ,

ती मोठ्या आवाजात म्हणते:+

 ४ “लोकांनो, मी तुम्हाला हाक मारते;

मी तुम्हा सर्वांना असं सांगते:

 ५ भोळ्याभाबड्यांनो,* शहाणपण शिका,+

मूर्खांनो, समजशक्‍ती असलेलं मन उत्पन्‍न करा.

 ६ ऐका, कारण मी जे सांगत आहे ते महत्त्वाचं आहे,

माझ्या ओठांतून निघणाऱ्‍या गोष्टी योग्य आहेत.

 ७ मी हळू आवाजात सत्याची वचनं बोलते,

माझ्या ओठांना दुष्टपणाच्या गोष्टींची घृणा वाटते.

 ८ माझ्या तोंडून फक्‍त नीतीचे बोल निघतात.

त्यांपैकी कोणतेही फसवे किंवा कपटी नाहीत.

 ९ ते प्रामाणिक आहेत हे समंजस लोकांना कळतं,

आणि ते योग्य आहेत हे ज्ञानी लोक ओळखतात.

१० चांदीपेक्षा माझं शिक्षण निवडा

आणि सगळ्यात उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञान निवडा.+

११ कारण बुद्धी पोवळ्यांपेक्षा* उत्तम आहे;

कोणत्याही मौल्यवान गोष्टींची तिच्याशी तुलना होऊ शकत नाही.

१२ मी म्हणजे बुद्धी, शहाणपणासोबत राहते;

मला ज्ञान आणि विचारशक्‍ती सापडली आहे.+

१३ यहोवाची भीती बाळगणं म्हणजे वाइटाचा द्वेष करणं.+

अहंकार, गर्व,+ दुष्टपणा आणि कपटीपणाच्या गोष्टी+ यांचा मला तिटकारा आहे.

१४ माझ्याजवळ चांगला सल्ला आणि व्यावहारिक बुद्धी आहे;+

समजशक्‍ती+ आणि ताकद+ माझ्याजवळ आहे.

१५ माझ्यामुळे राजे राज्य करतात

आणि उच्च अधिकारी नीतिमान आदेश देतात.+

१६ माझ्यामुळेच शासक राज्य करतात

आणि अधिकारी नीतीने न्याय करतात.

१७ जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर मी प्रेम करते

आणि जे मला शोधतात त्यांना मी सापडेन.+

१८ माझ्याजवळ धनसंपत्ती आणि गौरव;

टिकणारं धन* आणि नीतिमत्त्व आहे.

१९ माझ्या देणग्या सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा मौल्यवान असतात,

आणि मी दिलेल्या गोष्टी सगळ्यात उत्तम चांदीपेक्षाही चांगल्या

असतात.+

२० मी नीतिमत्त्वाच्या मार्गाने चालते;

मी न्यायाच्या वाटांवर मधोमध चालते.

२१ माझ्यावर प्रेम करणाऱ्‍यांना मी समृद्ध वारसा देते,

मी त्यांची कोठारं भरून टाकते.

२२ यहोवाने आपल्या कार्यांची सुरुवात म्हणून मला उत्पन्‍न केलं.+

फार पूर्वीच्या त्याच्या अद्‌भुत कार्यांपैकी मी पहिली होते.+

२३ मला अगदी प्राचीन काळापासून, सुरुवातीपासून;+

पृथ्वी अस्तित्वात येण्याच्याही आधीपासून स्थापन करण्यात आलं.+

२४ जेव्हा महासागर नव्हते;+ पाण्याने ओसंडून वाहणारे झरे नव्हते,

तेव्हा मी जन्माला आले.

२५ पर्वतांना आपल्या जागी स्थिर करण्यात आलं

आणि डोंगर निर्माण करण्यात आले, त्याआधी मी जन्माला आले.

२६ त्या वेळी, त्याने पृथ्वी आणि तिच्यावरची रानंवनं,

किंवा जमिनीतल्या मातीची पहिली ढेकळंही निर्माण केली नव्हती.

२७ त्याने आकाश तयार केलं,+ तेव्हा मी तिथे होते;

जेव्हा त्याने पाण्यावर क्षितिजाची रेघ* ओढली;+

२८ जेव्हा त्याने आकाशात ढगांची स्थापना केली*

आणि महासागरातले झरे उत्पन्‍न केले;

२९ जेव्हा त्याने समुद्रासाठी सीमा घालून दिली

आणि त्याच्या लाटांनी ती पार करू नये, असा आदेश दिला;+

जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये स्थिर केले,*

३० तेव्हा मी एका कुशल कारागिरासारखी त्याच्यासोबत होते.+

दिवसेंदिवस मी त्याला खूप प्रिय वाटू लागले.+

मी सतत त्याच्यासमोर आनंदी असायचे.+

३१ त्याने मानवांसाठी बनवलेली पृथ्वी पाहून मला खूप आनंद झाला

आणि मानवांबद्दल मला खूप जिव्हाळा होता.

३२ म्हणून, माझ्या मुलांनो, माझं ऐका;

जे माझ्या मार्गांनी चालतात ते सुखी असतात.

३३ शिक्षणाकडे* लक्ष द्या+ आणि बुद्धिमान व्हा;

त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका.

३४ जो माणूस दररोज पहाटे माझ्या दाराशी येऊन,*

माझ्या उंबरठ्याजवळ थांबून

माझं ऐकतो, तो सुखी आहे!

३५ कारण ज्याला मी सापडेन त्याला जीवन मिळेल,+

आणि त्याच्यावर यहोवाची कृपा होईल.

३६ पण जो माझ्याकडे दुर्लक्ष करतो तो स्वतःचं* नुकसान करून घेतो,

आणि जे माझा द्वेष करतात, ते मरण ओढवून घेतात.”*+

९ खऱ्‍या बुद्धीने आपलं घर बांधलंय;

तिने सात खांबांवर ते उभारलंय.

 २ तिने मांस शिजवून ठेवलंय;

चवदार द्राक्षारस तयार केलाय;

आणि आपलं मेजही सजवलंय.

 ३ तिने आपल्या दासींना पाठवलंय;

त्या शहराच्या उंच ठिकाणांहून अशी घोषणा करतात:+

 ४ “जे भोळे आहेत,* त्यांनी इथे यावं.”

ज्यांना समज नाही, त्यांना ती म्हणते:

 ५ “या, माझ्याकडची भाकर खा

आणि मी तयार केलेला द्राक्षारस प्या.

 ६ आपला भोळेपणा सोडा, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल;+

समजशक्‍तीच्या मार्गाने पुढे चालत राहा.”+

 ७ जो थट्टा करणाऱ्‍याची चूक सुधारतो, तो आपला अपमान करून घेतो+

आणि जो दुष्टाचं ताडन करतो त्याचं नुकसान होईल.

 ८ थट्टा करणाऱ्‍याचं ताडन करू नकोस, नाहीतर तो तुझा द्वेष करेल.+

बुद्धिमानाचं ताडन कर, म्हणजे तो तुझ्यावर प्रेम करेल.+

 ९ बुद्धिमान माणसाला ज्ञान दे, म्हणजे तो आणखी बुद्धिमान होईल.+

नीतिमानाला शिकव, म्हणजे तो आपलं ज्ञान वाढवेल.

१० यहोवाची भीती बाळगणं हीच बुद्धीची सुरुवात आहे,+

आणि परमपवित्र देवाचं ज्ञान+ हीच समजशक्‍ती आहे.

११ कारण माझ्यामुळे* तुला मोठं आयुष्य लाभेल+

आणि तू बरीच वर्षं जगशील.

१२ तू बुद्धिमान झालास, तर तुलाच त्याचा फायदा होईल,

पण थट्टा करत राहिलास, तर तुलाच त्याचे परिणाम भोगावे लागतील.

१३ मूर्ख स्त्री मोठमोठ्याने बोलते.+

तिला कसलंही ज्ञान नसतं; कशाचीच माहिती नसते.

१४ ती शहरातल्या उंच ठिकाणी,

आपल्या घराच्या दाराजवळ बसते.+

१५ ती येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांना;

आपल्या रस्त्याने सरळ जाणाऱ्‍यांना हाक मारून म्हणते:

१६ “जे भोळे आहेत, त्यांनी इथे यावं.”

ज्यांना समज नाही त्यांना ती म्हणते:+

१७ “चोरलेलं पाणी गोड लागतं

आणि चोरून खाण्यातच खरी मजा आहे.”+

१८ पण त्यांना माहीत नसतं, की तिचं घर म्हणजे मृतांचं घर;

आणि तिच्या घरी जाणारे कबरेच्या* खोल ठिकाणांत जातात.+

१० शलमोनची नीतिवचनं.+

बुद्धिमान मुलगा आपल्या वडिलांना खूश करतो,+

पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दुःख देतो.

 २ दुष्टपणाने मिळवलेल्या संपत्तीचा

काहीच उपयोग होणार नाही,

पण नीतिमत्त्वामुळे मृत्यूपासून सुटका होते.+

 ३ यहोवा नीतिमानाला अन्‍न देऊन तृप्त करेल,+

पण तो दुष्टाची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही.

 ४ आळशी हातांमुळे गरिबी येते,+

पण मेहनती हातांमुळे संपत्ती मिळते.+

 ५ सखोल समज असलेला मुलगा उन्हाळ्यात पीक गोळा करतो,

पण निर्लज्जपणे वागणारा मुलगा कापणीच्या काळात गाढ झोपेत असतो.+

 ६ नीतिमानाला आशीर्वाद मिळतात,+

पण दुष्ट आपल्या मनातल्या हिंसक कल्पना लपवून ठेवतो.

 ७ नीतिमानाला लोक आठवणीत ठेवतील* आणि आशीर्वाद देतील,+

पण दुष्टाचं नाव कुजून जाईल.+

 ८ जो बुद्धिमान मनाचा असतो तो सल्ला* स्वीकारतो,+

पण मूर्खपणे बोलणाऱ्‍याला तुडवलं जाईल.+

 ९ खरेपणाने चालणारा सुरक्षितपणे चालेल,+

पण वाकड्या मार्गांनी चालणारा पकडला जाईल.+

१० कपटीपणे डोळे मिचकावणारा दुःख देतो+

आणि मूर्खपणे बोलणाऱ्‍याला तुडवलं जाईल.+

११ नीतिमानाचं तोंड म्हणजे जीवनाचा झरा,+

पण दुष्ट आपल्या मनातल्या हिंसक कल्पना लपवतो.+

१२ द्वेषामुळे भांडणांना तोंड फुटतं,

पण प्रेम सर्व अपराधांना झाकतं.+

१३ समंजस माणसाच्या ओठांवर बुद्धीच्या गोष्टी असतात,+

पण ज्याला समज नसते त्याच्या पाठीला काठीचा मार मिळतो.+

१४ जे बुद्धिमान असतात, ते ज्ञान साठवतात+

पण मूर्ख आपल्या तोंडाने नाश ओढवतो.+

१५ श्रीमंताची संपत्ती* त्याच्यासाठी तटबंदी शहरासारखी असते.

पण गरिबाची गरिबी त्याचा नाश करते.+

१६ नीतिमानाची कामं जीवन देणारी असतात;

पण दुष्टाची मिळकत त्याला पाप करायला लावते.+

१७ जो शिक्षणाकडे लक्ष देतो तो इतरांना जीवनाचा मार्ग दाखवतो,*

पण जो ताडनाकडे दुर्लक्ष करतो, तो इतरांना भरकटायला लावतो.

१८ जो आपला द्वेष लपवतो तो खोटं बोलतो+

आणि जो बदनामी करणाऱ्‍या गोष्टी* पसरवतो, तो मूर्ख असतो.

१९ जितके जास्त शब्द, तितक्याच जास्त चुका,+

पण जिभेवर ताबा ठेवणारा शहाणपणाने वागतो.+

२० नीतिमानाची जीभ उत्कृष्ट चांदीसारखी असते,+

पण दुष्टाचं हृदय कवडीमोल असतं.

२१ नीतिमानाचे बोल बऱ्‍याच लोकांचं पोषण* करतात,+

पण मूर्ख लोक समज नसल्यामुळे मरतात.+

२२ यहोवाच्या आशीर्वादानेच माणूस श्रीमंत होतो+

आणि तो त्यासोबत दुःख देत नाही.

२३ मूर्खाला लाजिरवाण्या गोष्टी करणं खेळ वाटतो,

पण समंजस माणसाकडे बुद्धी असते.+

२४ दुष्टाला ज्या संकटाची भीती वाटते तेच त्याच्यावर येईल;

पण नीतिमानाची इच्छा पूर्ण केली जाईल.+

२५ वादळ सरल्यावर, दुष्ट नाहीसा झालेला असेल,+

पण नीतिमान हा कायम टिकणारा पाया असतो.+

२६ शिरक्यामुळे* दातांना आणि धुरामुळे डोळ्यांना,

तसा आळशी माणसामुळे त्याच्या मालकाला* त्रास होतो.

२७ यहोवाची भीती बाळगल्यामुळे आयुष्य वाढतं,+

पण दुष्टाच्या आयुष्याची वर्षं कमी केली जातील.+

२८ नीतिमानाची आशा* आनंददायक असते,+

पण दुष्टाची आशा धुळीला मिळेल.+

२९ यहोवाचा मार्ग निर्दोष माणसासाठी बुरुजासारखा असतो,+

पण तो मार्ग दुष्टांवर विनाश आणतो.+

३० नीतिमान कधीच डळमळणार नाही,+

पण दुष्ट पृथ्वीवरून नाहीसे होतील.+

३१ नीतिमानाच्या तोंडून बुद्धीच्या गोष्टी निघतात,*

पण खोटं बोलणारी जीभ कापून टाकली जाईल.

३२ नीतिमानाच्या शब्दांमुळे त्याच्यावर कृपा होईल,

पण दुष्टाच्या तोंडून कपटीपणाच्या गोष्टी निघतात.

११ खोट्या* तराजूची यहोवाला घृणा वाटते,

पण अचूक वजनामुळे त्याला आनंद होतो.+

 २ गर्व झाला की अपमान ठरलेला असतो,+

पण जे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात, त्यांच्याकडे बुद्धी असते.+

 ३ सरळ लोकांचा खरेपणा त्यांना मार्ग दाखवतो,+

पण विश्‍वासघातकी लोकांचा कपटीपणा त्यांचा नाश करतो.+

 ४ क्रोधाच्या दिवशी संपत्तीचा* काहीच उपयोग होणार नाही,+

पण नीतिमत्त्वामुळे मृत्यूपासून सुटका होईल.+

 ५ निर्दोष माणसाचं नीतिमत्त्व त्याचा मार्ग सरळ करतं,

पण दुष्ट आपल्याच दुष्टपणामुळे पडेल.+

 ६ सरळ माणसांच्या नीतिमत्त्वामुळे त्यांची सुटका होते,+

पण विश्‍वासघातकी लोक आपल्याच इच्छांच्या सापळ्यात अडकतील.+

 ७ दुष्ट माणूस मरतो, तेव्हा त्याची आशा संपते;

त्याने आपल्या शक्‍तीच्या जोरावर केलेल्या अपेक्षाही नाहीशा होतात.+

 ८ नीतिमानाला संकटातून सोडवलं जाईल

आणि दुष्ट त्याची जागा घेईल.+

 ९ देवाची निंदा करणारा* आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्‍यावर नाश आणतो,

पण नीतिमानांची ज्ञानामुळे सुटका होते.+

१० नीतिमानाच्या चांगुलपणामुळे शहर खूश होतं;

दुष्टाचा नाश होतो, तेव्हा लोक जल्लोष करतात.+

११ सरळ लोकांच्या आशीर्वादामुळे शहराची भरभराट होते,+

पण दुष्टाच्या तोंडामुळे ते जमीनदोस्त होतं.+

१२ ज्याला समज नसते तो आपल्या शेजाऱ्‍याला तुच्छ लेखतो,*

पण जो खरोखर समंजस असतो, तो शांत राहतो.+

१३ बदनामी करणारा गुप्त गोष्टी सगळ्यांना सांगत फिरतो,+

पण जो भरवशालायक असतो, तो त्या गुप्त ठेवतो.*

१४ कुशल* मार्गदर्शन मिळालं नाही, तर लोकांना दुःख सहन करावं लागतं,

पण पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे यश* मिळतं.+

१५ जो अनोळखी माणसाचं कर्ज फेडण्याची हमी देतो,* त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही,+

पण जो हात मिळवून करार करण्याचं टाळतो,* तो सुरक्षित राहील.

१६ प्रेमळ* स्त्रीला सन्मान मिळतो,+

पण निर्दयी लोक संपत्ती बळकावतात.

१७ दयाळू* माणसाच्या वागणुकीमुळे त्याला फायदा होतो,*+

पण क्रूर माणूस स्वतःवर संकट* ओढवून घेतो.+

१८ दुष्टाची कमाई बेइमानीची असते,+

पण जो नीतिमत्त्व पेरतो त्याला खरं प्रतिफळ मिळतं.+

१९ जो नीतिमत्त्वासाठी ठाम उभा राहतो त्याला जीवन मिळतं,+

पण जो दुष्टपणाच्या मागे लागतो त्याच्यावर मृत्यू ओढवतो.

२० ज्यांच्या मनात कपट असतं, त्यांची यहोवाला घृणा वाटते,+

पण ज्यांचा मार्ग निर्दोष असतो, त्यांच्यामुळे त्याला आनंद होतो.+

२१ वाईट माणसाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्‍चित,+

पण नीतिमानाची मुलं संकटांतून सुटतील.

२२ समज सोडून वागणारी सुंदर स्त्री, म्हणजे

डुकराच्या नाकातली सोन्याची नथ.

२३ नीतिमानाच्या इच्छेमुळे चांगलं घडतं,+

पण दुष्टांच्या आशेमुळे क्रोध भडकतो.

२४ उदारपणे देणाऱ्‍याला* आणखी मिळतं;+

पण जे दिलं पाहिजे, ते देण्याचं जो टाळतो, त्याच्यावर गरिबी येते.+

२५ उदार माणसाची संपत्ती वाढेल;+

जो दुसऱ्‍यांची तहान भागवतो, त्याचीही तहान भागवली जाईल.+

२६ जो धान्याचा साठा करून ठेवतो, त्याला लोक शाप देतील,

पण जो धान्य विकतो त्याला ते आशीर्वाद देतील.

२७ जो चांगलं करण्यासाठी मनापासून झटतो, त्याच्यावर कृपा केली जाईल,+

पण जो वाईट करायला पाहतो, त्याच्यासोबत वाईटच घडेल.+

२८ आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवणारा खाली पडेल,+

पण नीतिमान हिरव्यागार पानांसारखा बहरेल.+

२९ जो आपल्या घराण्यावर संकट* आणतो, त्याच्या हाती काही लागणार नाही,*+

आणि मूर्ख बुद्धिमानाची चाकरी करेल.

३० नीतिमानाचं फळ म्हणजे जीवनाचा वृक्ष,+

आणि जो मनं वळवतो तो बुद्धिमान असतो.+

३१ पृथ्वीवर नीतिमानाला आपल्या कामाचं फळ मिळतं,

तर दुष्टाला आणि पापी माणसाला आणखी किती पटींनी मिळेल!+

१२ जो शिक्षणावर प्रेम करतो, तो ज्ञानावर प्रेम करतो,+

पण जो ताडनाचा तिरस्कार करतो, त्याला समज नसते.*+

 २ चांगल्या माणसाला यहोवाची पसंती मिळते,

पण जो दुष्ट योजना करतो, त्याला देव दोषी ठरवतो.+

 ३ दुष्टपणा करणारे सुरक्षित राहू शकत नाहीत,+

पण नीतिमान अशा झाडासारखा होईल, ज्याला उपटता येत नाही.

 ४ सद्‌गुणी बायको आपल्या नवऱ्‍यासाठी मुकुटासारखी असते,+

पण जी निर्लज्जपणे वागते, ती त्याच्या हाडांना सडवणाऱ्‍या रोगासारखी असते.+

 ५ नीतिमानाचे विचार न्यायाचे असतात,

पण दुष्टाचं मार्गदर्शन कपटी असतं.

 ६ दुष्टांचे शब्द जीवघेण्या सापळ्यासारखे असतात,*+

पण सरळ माणसांचे शब्द त्यांना वाचवतात.+

 ७ दुष्टांचा नाश होतो तेव्हा त्यांचं नामोनिशाण राहत नाही,

पण नीतिमानांचं घर कायम टिकून राहील.+

 ८ विचार करून बोलणाऱ्‍या माणसाची प्रशंसा केली जाते,+

पण कपटी मनाच्या माणसाला तुच्छ लेखलं जाईल.+

 ९ प्रतिष्ठा मिरवून उपाशी राहणाऱ्‍या माणसापेक्षा,

घरी एकच नोकर असलेला सर्वसामान्य माणूस बरा!+

१० नीतिमान माणूस आपल्या गुराढोरांची* काळजी घेतो,+

पण दुष्ट* क्रूर असतात.

११ आपल्या जमिनीची मशागत करणाऱ्‍याला भरपूर अन्‍न मिळेल,+

पण निरुपयोगी गोष्टींच्या नादी लागणाऱ्‍याला समज नसते.

१२ वाईट लोकांच्या लुटीचा दुष्टाला हेवा वाटतो,

पण नीतिमान माणूस खोलवर मुळावलेल्या फलदायी झाडासारखा असतो.

१३ दुष्ट माणूस आपल्याच तोंडून निघणाऱ्‍या वाईट गोष्टींमध्ये अडकतो,+

पण नीतिमान संकटातून सुटतो.

१४ माणूस आपल्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांमुळे चांगल्या गोष्टींनी तृप्त होतो,+

त्याच्या मेहनतीचं प्रतिफळ त्याला मिळेल.

१५ मूर्खाला आपला मार्ग योग्यच वाटतो,+

पण बुद्धिमान माणूस सल्ला स्वीकारतो.+

१६ मूर्ख आपला राग लगेच* दाखवतो,+

पण शहाणा माणूस अपमानाकडे दुर्लक्ष करतो.*

१७ खोटा साक्षीदार फसव्या गोष्टी बोलतो,

पण जो प्रामाणिकपणे* साक्ष देतो, तो खरं* बोलेल.

१८ विचार न करता बोललेले शब्द, तलवारीच्या घावांसारखे असतात,

पण बुद्धिमानाच्या शब्दांमुळे घाव भरून निघतात.+

१९ खरं बोलणारे ओठ सर्वकाळ टिकून राहतील,+

पण खोटं बोलणारी जीभ क्षणभरासाठी असते.+

२० ज्यांच्या मनात कपट असतं, ते इतरांचं वाईट करण्याची योजना करतात,

पण जे शांती टिकवण्याचा प्रयत्न करतात,* ते आनंदी असतात.+

२१ नीतिमानाचं कोणतंच नुकसान होणार नाही,+

पण दुष्टांवर एकापाठोपाठ एक संकटं येतील.+

२२ खोटं बोलणाऱ्‍या ओठांची यहोवाला घृणा वाटते,+

पण जे विश्‍वासूपणे वागतात त्यांच्यामुळे त्याला आनंद होतो.

२३ शहाणा माणूस आपल्याजवळ असलेली माहिती प्रकट करत नाही,

पण मूर्ख आपला सगळा मूर्खपणा बोलून दाखवतो.+

२४ मेहनत करणारे राज्य करतील,+

पण आळश्‍यांना सक्‍तीची मजुरी करावी लागेल.+

२५ मनातल्या चिंतेने माणूस खचून जातो,*+

पण दिलासा देणाऱ्‍या शब्दांमुळे त्याला आनंद होतो.+

२६ नीतिमान माणूस आपली कुरणं विचारपूर्वक निवडतो,

पण दुष्टांचा मार्ग त्यांना भरकटायला लावतो.

२७ आळशी आपल्या शिकारीच्या मागे धावत नाही,+

पण कष्टाळू वृत्ती, माणसाची मौल्यवान संपत्ती असते.

२८ नीतिमत्त्वाचा मार्ग जीवनाकडे नेतो;+

त्या वाटेवर मृत्यू नसतो.

१३ बुद्धिमान मुलगा आपल्या वडिलांची शिस्त स्वीकारतो,+

पण घमेंडी माणूस* ताडनाकडे* लक्ष देत नाही.+

 २ माणूस आपल्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांमुळे चांगल्या गोष्टींनी तृप्त होतो,+

पण विश्‍वासघातकी माणसाच्या जिवाला हिंसेची आवड असते.

 ३ जो सांभाळून बोलतो, तो आपला जीव वाचवतो,+

पण ज्याचा तोंडावर ताबा नसतो, तो नाश ओढवून घेईल.+

 ४ आळश्‍याला पुष्कळ गोष्टींची हाव असते, पण तरी त्याच्याजवळ काही नसतं,+

मेहनत करणारा* मात्र पूर्णपणे तृप्त होईल.+

 ५ नीतिमान माणूस खोटेपणाचा तिरस्कार करतो,+

पण दुष्टाच्या कामांमुळे त्याला लज्जित आणि अपमानित व्हावं लागतं.

 ६ निर्दोष मार्गाने चालणाऱ्‍याचं नीतिमत्त्वामुळे संरक्षण होतं,+

पण दुष्टपणा पापी माणसाला खाली पाडतो.

 ७ एखादा माणूस श्रीमंत असल्याचा दिखावा करतो, पण त्याच्याजवळ काहीही नसतं,+

दुसरा गरीब असल्याचं दाखवतो, पण त्याच्याजवळ भरपूर संपत्ती

असते.

 ८ श्रीमंत माणूस आपल्या जिवाच्या बदल्यात आपली संपत्ती देतो,+

पण गरिबाला कोणी साधी धमकीही देत नाही.+

 ९ नीतिमानाचा प्रकाश तेजस्वीपणे चमकतो,*+

पण दुष्टाचा दिवा विझून जाईल.+

१० गर्विष्ठपणामुळे मतभेद होतात,+

पण जे सल्ला घेतात,* ते बुद्धिमान असतात.+

११ झटपट मिळवलेली संपत्ती कमीकमी होत जाते,+

पण जो हळूहळू साठवतो,* त्याची संपत्ती वाढत जाईल.

१२ अपेक्षा* पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं,+

पण पूर्ण झालेली इच्छा म्हणजे जीवनाचा वृक्ष!+

१३ जो शिकवण* तुच्छ लेखतो, त्याला दंड भरावा लागेल,+

पण जो आज्ञेला मान देतो, त्याला प्रतिफळ मिळेल.+

१४ बुद्धिमानाची शिकवण* म्हणजे जीवनाचा झरा,+

ती माणसाला मृत्यूच्या सापळ्यांपासून वाचवते.

१५ ज्याच्याकडे सखोल समज असते त्याच्यावर कृपा होते,

पण विश्‍वासघातकी माणसाची वाट खडतर* असते.

१६ शहाणा माणूस सुज्ञपणे वागतो,+

पण मूर्ख आपला मूर्खपणा दाखवून देतो.+

१७ दुष्ट निरोप्या संकटात सापडतो,+

पण विश्‍वासू राजदूतामुळे फायदा होतो.+

१८ शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्‍यावर गरिबी आणि कलंक येतो,

पण जो ताडन* स्वीकारतो त्याचा गौरव होईल.+

१९ इच्छा पूर्ण झाल्यामुळे माणसाला आनंद होतो,+

पण वाईट गोष्टी सोडणं मूर्खांच्या जिवावर येतं.+

२० बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल,+

पण मूर्खांची संगत धरणाऱ्‍याचं नुकसान होईल.+

२१ संकट पापी लोकांची पाठ सोडत नाही,+

पण नीतिमानाला समृद्धी मिळते.+

२२ चांगला माणूस आपल्या नातवंडांसाठी वारसा ठेवून जातो,

पण पापी माणसाची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.+

२३ गरिबाच्या नांगरलेल्या शेतात भरपूर पीक येतं,

पण अन्यायामुळे ते हिरावून घेतलं जाऊ शकतं.*

२४ जो काठी आवरतो,* तो आपल्या मुलाचा द्वेष करतो,+

पण जो त्याच्यावर प्रेम करतो, तो त्याला शिक्षा करायला चुकत नाही.*+

२५ नीतिमान खाऊन तृप्त होतो,+

पण दुष्टाचं पोट रिकामंच राहतं.+

१४ जी स्त्री खरंच बुद्धिमान असते, ती आपलं घर बांधते,+

पण मूर्ख स्त्री आपल्याच हातांनी ते पाडून टाकते.

 २ जो सरळपणे चालतो, तो यहोवाला भिऊन वागतो,

पण ज्याचे मार्ग कपटीपणाचे* असतात, तो देवाला तुच्छ लेखतो.

 ३ मूर्खांचं गर्विष्ठ बोलणं काठीसारखं असतं,

पण बुद्धिमानांचे ओठ त्यांचं संरक्षण करतील.

 ४ गाय-बैल नसले, तर गोठा स्वच्छ राहतो,

पण बैलाच्या ताकदीमुळे भरपूर पीक मिळतं.

 ५ विश्‍वासू साक्षीदार खोटं बोलणार नाही,

पण खोटा साक्षीदार क्षणाक्षणाला लबाड बोलतो.+

 ६ थट्टा करणारा बुद्धीचा शोध घेतो, तरी त्याला ती सापडत नाही,

पण ज्याच्याजवळ समजशक्‍ती असते, त्याच्यासाठी ज्ञान घेणं सोपी गोष्ट असते.+

 ७ मूर्ख माणसापासून दूर राहा,

कारण त्याच्या ओठांवर तुला ज्ञान सापडणार नाही.+

 ८ शहाण्या माणसाला बुद्धीमुळे आपला मार्ग कळतो,

पण मूर्ख आपल्याच मूर्खपणामुळे फसतात.*+

 ९ मूर्ख आपला दोष* थट्टेत उडवतात,+

पण सरळ लोक समेट करायला तयार असतात.

१० मनाला आपलं दुःख* माहीत असतं,

त्याच्या आनंदात दुसरा कोणी सामील होऊ शकत नाही.

११ दुष्टाचं घर नष्ट होईल,+

पण सरळ माणसाचा तंबू समृद्ध होईल.

१२ माणसाला एक मार्ग योग्य वाटतो,+

पण तो मार्ग शेवटी मृत्यूकडे नेतो.+

१३ हसतानाही मन दुःखी असू शकतं

आणि आनंदाचा शेवट शोकाने होऊ शकतो.

१४ देवाचा अनादर करणारा आपल्या कामांचं फळ भोगेल,+

आणि चांगल्या माणसाला त्याच्या कार्यांचं प्रतिफळ मिळेल.+

१५ भोळा* प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवतो,

पण शहाणा माणूस विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो.+

१६ बुद्धिमान सावध असतो आणि वाइटापासून दूर राहतो,

पण मूर्ख बेपर्वा* असतो आणि फाजील आत्मविश्‍वास दाखवतो.

१७ लगेच रागावणारा मूर्खपणे वागतो,+

पण नीट विचार करून वागणाऱ्‍याचा द्वेष केला जातो.

१८ भोळे* मूर्खपणे वागतील,

पण शहाण्या माणसांच्या डोक्यावर ज्ञानाचा मुकुट असतो.+

१९ वाईट लोकांना चांगल्या लोकांपुढे झुकावं लागेल

आणि दुष्ट लोक नीतिमानांच्या फाटकांसमोर वाकतील.

२० गरिबाचे शेजारीही त्याचा द्वेष करतात,+

पण श्रीमंत माणसाला भरपूर मित्र असतात.+

२१ जो आपल्या शेजाऱ्‍याला तुच्छ लेखतो, तो पाप करतो,

पण दीनदुबळ्यांना दया दाखवणारा आनंदी असतो.+

२२ जे दुसऱ्‍याचं वाईट करण्याची योजना करतात, ते भरकटणार नाहीत का?

पण चांगलं करण्याची इच्छा असलेल्यांसोबत लोक एकनिष्ठ प्रेमाने आणि विश्‍वासूपणे वागतील.+

२३ मेहनत केल्याने नेहमीच फायदा होतो,

पण नुसती बडबड केल्याने गरिबी येते.+

२४ बुद्धिमानांची संपत्ती त्यांचा मुकुट आहे;

पण मूर्ख आपला मूर्खपणा सोडत नाहीत.+

२५ खरा साक्षीदार जीव वाचवतो,

पण खोटा साक्षीदार क्षणाक्षणाला लबाड बोलतो.

२६ यहोवाची भीती बाळगणारा सर्व गोष्टींत त्याच्यावर भरवसा ठेवतो+

आणि यामुळे त्याच्या मुलांना आश्रय मिळेल.+

२७ यहोवाची भीती म्हणजे जीवनाचा झरा;

ती माणसाला मृत्यूच्या सापळ्यांपासून वाचवते.

२८ मोठी प्रजा म्हणजे राजाचं वैभव,+

पण प्रजा नसलेल्या राजाची सत्ता टिकत नाही.

२९ जो लगेच रागावत नाही, तो फार समंजस असतो,+

पण उतावळा माणूस आपला मूर्खपणा दाखवतो.+

३० शांत मन शरीराला आरोग्य* देतं,

पण ईर्ष्या हाडांना सडवून टाकते.+

३१ दीनदुबळ्या माणसाची फसवणूक करणारा आपल्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो,+

पण जो गरिबाला दया दाखवतो, तो देवाचा गौरव करतो.+

३२ दुष्टाचा त्याच्याच वाईट कामांमुळे नाश होईल,

पण नीतिमानाला त्याच्या खरेपणामुळे संरक्षण मिळेल.+

३३ समजशक्‍ती असलेला माणूस आपल्या बुद्धीचा दिखावा करत नाही,+

पण मूर्ख आपल्याला किती ज्ञान आहे, हे दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.

३४ नीतिमत्त्वामुळे राष्ट्राचा गौरव होतो,+

पण पापामुळे राष्ट्रावर कलंक येतो.

३५ सखोल समज दाखवणाऱ्‍या सेवकामुळे राजाला आनंद होतो,+

पण निर्लज्जपणे वागणाऱ्‍याचा त्याला संताप येतो.+

१५ सौम्यपणे* दिलेल्या उत्तरामुळे राग शांत होतो,+

पण कठोर* शब्दामुळे क्रोध भडकतो.+

 २ बुद्धिमानांची जीभ ज्ञानाचा चांगला वापर करते,+

पण मूर्खांच्या तोंडून फक्‍त मूर्खपणाच निघतो.

 ३ यहोवाची नजर सगळीकडे असते,

तो चांगल्या आणि वाईट, सर्व लोकांना पाहतो.+

 ४ शांतपणे बोललेले शब्द* म्हणजे जीवनाचा वृक्ष,+

पण कपटी शब्दांमुळे मन दुखावतं.

 ५ मूर्ख आपल्या वडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा* अनादर करतो,+

पण शहाणा माणूस ताडन* स्वीकारतो.+

 ६ नीतिमानाच्या घरात भरपूर संपत्ती असते,

पण दुष्टाच्या उत्पन्‍नामुळे* त्याच्यावर संकट येतं.+

 ७ बुद्धिमानाचे ओठ बऱ्‍याच लोकांना ज्ञान देतात,+

पण मूर्खाला तसं करण्याची इच्छा नसते.+

 ८ दुष्टाने दिलेल्या बलिदानाची यहोवाला घृणा वाटते,+

पण प्रामाणिक माणसाच्या प्रार्थनेने त्याला आनंद होतो.+

 ९ यहोवाला दुष्टाच्या मार्गाची घृणा वाटते,+

पण जो नीतीने वागण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर तो प्रेम करतो.+

१० चांगला मार्ग सोडून देणाऱ्‍याला शिक्षा नकोशी* वाटते,+

पण ताडनाचा तिरस्कार करणारा आपला जीव गमावेल.+

११ कबर* आणि विनाशाचं ठिकाण यहोवापासून लपलेलं नाही,+

मग माणसांची मनं त्याच्यापासून कशी लपलेली असतील?+

१२ गर्विष्ठ माणूस आपलं ताडन करणाऱ्‍याचा* द्वेष करतो.+

तो बुद्धिमानांकडून सल्ला घेत नाही.+

१३ मन आनंदी असेल, तर चेहराही आनंदी दिसतो,

पण दुःखामुळे मन खचून जातं.+

१४ समजशक्‍ती असलेल्या माणसाचं मन ज्ञान शोधतं,+

पण मूर्खाच्या तोंडून मूर्खपणाच बाहेर पडतो.+

१५ दुःखी माणसासाठी सगळेच दिवस वाईट असतात,+

पण ज्याचं मन आनंदी असतं, त्याच्यासाठी दररोज मेजवानी असते.+

१६ भरपूर संपत्ती असून चिंता* असण्यापेक्षा,+

यहोवाची भीती बाळगून गरीब असणं बरं.+

१७ जिथे द्वेष आहे तिथे मेजवानी* करण्यापेक्षा,+

प्रेम असलेल्या घरातलं साधं जेवण* बरं.+

१८ तापट माणूस वाद सुरू करतो,+

पण जो लगेच रागवत नाही तो भांडण मिटवतो.+

१९ आळश्‍याचा मार्ग काट्यांच्या कुंपणासारखा असतो,+

पण सरळ मनाच्या माणसाची वाट महामार्गासारखी असते.+

२० बुद्धिमान मुलामुळे वडिलांना आनंद होतो,+

पण मूर्ख माणूस आपल्या आईला तुच्छ लेखतो.+

२१ ज्याला समज नसते, त्याला मूर्खपणात मौज वाटते,+

पण समंजस माणूस सरळ मार्गाने चालत राहतो.+

२२ मनमोकळी चर्चा होत नाही, तेव्हा योजना निष्फळ होतात,

पण पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे कामात यश मिळतं.+

२३ योग्य उत्तर दिल्यामुळे* माणसाला खूप आनंद होतो!+

योग्य वेळी बोललेला शब्द किती चांगला असतो!+

२४ सखोल समज असलेल्या माणसाला जीवनाचा मार्ग उंचावर नेतो,+

तो त्याला खाली कबरेत* जाण्यापासून वाचवतो.+

२५ गर्विष्ठ माणसाचं घर यहोवा पाडून टाकेल,+

पण विधवेच्या जमिनीचं तो रक्षण करेल.*+

२६ दुष्टांच्या योजनांची यहोवाला घृणा वाटते,+

पण प्रेमळ बोल त्याला शुद्ध वाटतात.+

२७ बेइमानीची कमाई करणारा आपल्याच घराण्यावर संकट* आणतो,+

पण ज्याला लाचखोरीची घृणा वाटते, तो जिवंत राहील.+

२८ नीतिमान माणूस विचार करून उत्तर देतो,*+

पण मूर्ख माणूस विचार न करता वाईट गोष्टी बोलतो.

२९ यहोवा दुष्टांपासून फार दूर असतो,

पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो.+

३० तेजस्वी डोळ्यांमुळे* मन आनंदी होतं;

चांगल्या बातमीमुळे हाडांना बळ मिळतं.*+

३१ जो जीवन देणारं ताडन ऐकतो,

तो बुद्धिमानांमध्ये राहतो.+

३२ जो शिक्षण नाकारतो, तो आपल्या जीवनाला* तुच्छ लेखतो,+

पण जो ताडन स्वीकारतो, त्याला समजशक्‍ती* मिळते.+

३३ यहोवाची भीती माणसाला बुद्धिमानपणे वागायला शिकवते,+

नम्रता दाखवल्यामुळे पुढे गौरव होतो.+

१६ माणूस मनात योजना करतो,

पण योग्य उत्तर* यहोवाकडून असतं.+

 २ माणसाला आपले सगळे मार्ग योग्यच* वाटतात,+

पण यहोवा हेतूंचं परीक्षण करतो.+

 ३ आपली सगळी कामं यहोवावर सोपव,+

म्हणजे तुझ्या योजना सफल होतील.

 ४ यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी सर्वकाही घडवून आणतो,

त्याने दुष्टांनाही संकटाच्या दिवसासाठी राखून ठेवलंय.+

 ५ गर्विष्ठ माणसाची यहोवाला घृणा वाटते.+

अशा माणसाला शिक्षा मिळेल हे निश्‍चित.

 ६ एकनिष्ठ प्रेमाने आणि विश्‍वासूपणाने अपराधाचं प्रायश्‍चित्त होतं+

आणि यहोवाची भीती बाळगल्यामुळे माणूस वाईट गोष्टींपासून दूर राहतो.+

 ७ माणसाच्या वागणुकीने जेव्हा यहोवा संतुष्ट होतो,

तेव्हा तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्यासोबत शांतीने राहायला लावतो.+

 ८ अन्यायाने मिळवलेल्या भरपूर संपत्तीपेक्षा,+

नीतिमत्त्वाची थोडीशी कमाई बरी!+

 ९ माणूस मनात आपला मार्ग ठरवतो,

पण यहोवा त्याच्या पावलांना दिशा दाखवतो.+

१० राजाच्या ओठांवर देवाचा* निर्णय असला पाहिजे;+

त्याने कधीही न्यायाला सोडून वागू नये.+

११ अचूक काटे आणि तराजू यहोवाकडून असतात;

पिशवीतली सगळी वजनं तोच पुरवतो.+

१२ राजांना दुष्ट व्यवहारांची घृणा वाटते,+

कारण नीतिमत्त्वामुळे राजासन स्थिर राहतं.+

१३ नीतीचे बोल ऐकून राजांना आनंद होतो.

प्रामाणिकपणे बोलणारे त्यांना आवडतात.+

१४ राजाचा क्रोध मृत्यूच्या दूतासारखा असतो,+

पण बुद्धिमान माणूस तो शांत करतो.*+

१५ राजाच्या कृपेमुळे आयुष्य सुखी होतं;

त्याची कृपा वसंत ऋतूत बरसणाऱ्‍या मेघांसारखी असते.+

१६ चांदीपेक्षा समजशक्‍ती मिळवणं,+

आणि सोन्यापेक्षा बुद्धी मिळवणं कधीही चांगलं.+

१७ सरळ मनाचे लोक वाईट मार्ग टाळतात.

जो आपल्या मार्गाचं रक्षण करतो, तो आपल्या जिवाचं रक्षण करतो.+

१८ गर्व झाला की नाश ठरलेला;

घमेंडी वृत्ती आली, की माणूस अडखळतो.+

१९ गर्विष्ठ लोकांसोबत लूट वाटून घेण्यापेक्षा,

दीन लोकांमध्ये नम्रपणे राहिलेलं बरं!+

२० सखोल समज दाखवणाऱ्‍याला यश* मिळेल;

यहोवावर भरवसा ठेवणारा सुखी असतो.

२१ बुद्धिमान माणसाला लोक समजूतदार म्हणतील,+

जो प्रेमळपणे बोलतो,* त्याचं बोलणं इतरांना सहज पटतं.+

२२ सखोल समज असलेल्यांसाठी ती जीवनाच्या झऱ्‍यासारखी असते.

पण मूर्खांना आपल्याच मूर्खपणामुळे शिक्षा मिळते.

२३ बुद्धिमानाचं मन त्याला सखोल समज देतं;+

इतरांना त्याचं बोलणं सहज पटतं.

२४ प्रेमळ शब्द मधाच्या पोळ्यासारखे असतात,

ते जिवाला* गोड लागतात आणि हाडांना आरोग्य देतात.+

२५ माणसाला एक मार्ग योग्य वाटतो,

पण तो मार्ग शेवटी मृत्यूकडे नेतो.+

२६ मजुराची भूक* त्याला मेहनत करायला लावते;

पोटाची खळगी* भरण्यासाठी त्याला कष्ट करणं भाग असतं.+

२७ दुष्ट माणूस वाईट गोष्टी उकरून काढतो;+

त्याचं बोलणं धगधगत्या आगीसारखं असतं.+

२८ कारस्थानं करणारा भांडणं लावतो,+

बदनामी करणारा जिवलग मित्रांची मैत्री तोडतो.+

२९ हिंसा करणारा आपल्या शेजाऱ्‍याला फसवतो

आणि त्याला वाईट मार्गाला लावतो.

३० तो डोळे मिचकावत दुष्ट योजना करतो,

ओठ घट्ट मिटून तो दुसऱ्‍यांचं नुकसान करतो.

३१ नीतीने चालणाऱ्‍यांचे पिकलेले केस+

मानाच्या* मुकुटासारखे असतात.+

३२ जो लगेच रागावत नाही,+ तो शूरवीरापेक्षा शक्‍तिशाली असतो;

रागावर नियंत्रण करणारा, शहर जिंकणाऱ्‍यापेक्षा ताकदवान असतो.+

३३ लोक चिठ्ठ्या टाकतात,*+

पण त्यांच्या मदतीने घेतलेला निर्णय यहोवाकडून असतो.+

१७ भांडणं असलेल्या घरात मेजवानी* करण्यापेक्षा,+

शांती* असलेल्या घरी कोरड्या भाकरीचा तुकडा खाल्लेला बरा!+

 २ सखोल समज असलेला नोकर निर्लज्जपणे वागणाऱ्‍या मुलावर अधिकार चालवेल;

मालकाच्या मुलांसोबत त्यालाही संपत्तीचा वारसा मिळेल.

 ३ सोनंचांदी शुद्ध करण्यासाठी आगीत टाकतात,+

पण हृदयांचं परीक्षण करणारा यहोवा आहे.+

 ४ दुष्ट माणूस दुखावणारे शब्द लक्ष देऊन ऐकतो,

लबाड माणूस दुसऱ्‍यांची निंदा ऐकतो.+

 ५ गरिबाची थट्टा करणारा आपल्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो,+

आणि दुसऱ्‍याचं संकट पाहून हसणाऱ्‍याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.+

 ६ नातवंडं* वृद्धांचा मुकुट असतात,

आणि वडिलांमुळे* मुलांचा गौरव होतो.

 ७ शहाण्यासारखं* बोलणं मूर्खाला शोभत नाही,+

मग खोटं बोलणं शासकाला* कसं शोभेल?+

 ८ भेटवस्तू देणाऱ्‍याला ती मौल्यवान रत्नासारखी वाटते;+

तो जिथे जाईल, तिथे त्याला तिच्यामुळे यश मिळतं.+

 ९ जो अपराध क्षमा करतो,* तो प्रेम दाखवतो,+

पण जो त्याबद्दल सतत बोलत राहतो, तो जिवलग मित्रांची मैत्री तोडतो.+

१० मूर्खाला शंभर फटके मारूनही जो परिणाम होत नाही,+

तो समजशक्‍ती असलेल्या माणसाला एकदाच रागावल्याने होतो.+

११ दुष्ट माणूस फक्‍त बंड करण्याची संधी शोधत असतो,

पण त्याला शिक्षा देण्यासाठी क्रूर दूताला पाठवलं जाईल.+

१२ मूर्खपणात गुरफटलेला एखादा मूर्ख भेटण्यापेक्षा,

जिची पिल्लं पळवून नेलेली आहेत, अशी अस्वलीण समोर आलेली बरी.+

१३ जर एखाद्याने चांगल्याची परतफेड वाइटाने केली,

तर त्याच्या घरावर संकटं येत राहतील.+

१४ वाद सुरू करणं हे धरणाचे दरवाजे उघडण्यासारखं* आहे.

भांडण पेटण्याआधीच तिथून निघून जा.+

१५ दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा,+

अशा दोघांचीही यहोवाला घृणा वाटते.

१६ मूर्खाकडे बुद्धी मिळवण्याची संधी असूनही,

ती मिळवण्याची त्याला इच्छाच नसेल, तर काय उपयोग?+

१७ खरा मित्र नेहमी प्रेम करतो;+

दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.+

१८ समज नसलेला माणूस हात मिळवतो

आणि एखाद्याचं कर्ज फेडण्याची आपल्या शेजाऱ्‍यादेखत हमी देतो.*+

१९ ज्याला भांडण्याची हौस असते, त्याच्याकडून चुका होतीलच!+

जो आपलं फाटक उंच बांधतो, तो नाशाला आमंत्रण देतो.+

२० कपटी मनाच्या माणसाला यश मिळणार नाही,+

आणि जो लबाडपणे बोलतो तो संकटात सापडेल.

२१ मूर्खाला जन्म देणारा बाप दुःखी होईल,

बेअक्कल मुलाच्या पित्याला सुख नसतं.+

२२ आनंदी मन हे उत्तम औषध आहे,*+

पण दुःखी मनामुळे शरीरात जोम राहत नाही.*+

२३ न्यायाचा मार्ग बदलण्यासाठी

दुष्ट माणूस गुप्तपणे लाच घेतो.+

२४ समंजस माणूस बुद्धीला आपल्या डोळ्यांसमोर ठेवतो,

पण मूर्खाची नजर सगळ्या पृथ्वीवर भिरभिरत असते.+

२५ मूर्ख मुलगा आपल्या बापाला शोक करायला लावतो

आणि त्याला जन्म देणाऱ्‍या आईचं मन दुखवतो.+

२६ नीतिमानाला शिक्षा देणं* चांगलं नाही;

आदरणीय लोकांना फटके मारणं योग्य नाही.

२७ ज्ञानी माणूस आपले शब्द आवरतो+

आणि समंजस माणूस शांत राहतो.+

२८ शांत राहणाऱ्‍या मूर्खालाही बुद्धिमान समजलं जाईल,

आणि तोंड बंद ठेवणाऱ्‍याला समंजस मानलं जाईल.

१८ जो नेहमी एकटा-एकटा राहतो, तो आपल्या स्वार्थी इच्छांच्या मागे लागतो;

तो सर्व प्रकारची व्यावहारिक बुद्धी नाकारतो.*

 २ मूर्खाला समजशक्‍ती नकोशी वाटते;

तो मनात जे काही आहे ते व्यक्‍त करायला उतावीळ असतो.+

 ३ दुष्ट माणसासोबत तिरस्कारही आलाच,

आणि निर्लज्जपणे वागल्याने बदनामी ठरलेली असते.+

 ४ माणसाच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे असतात.+

बुद्धीचा झरा खळखळत्या नदीसारखा असतो.

 ५ दुष्टाचा पक्ष घेणं;

किंवा नीतिमानाला न्याय नाकारणं चांगलं नाही.+

 ६ मूर्खाच्या शब्दांमुळे भांडण पेटतं,+

त्याचं तोंड फटक्यांना आमंत्रण देतं.+

 ७ मूर्खाच्या तोंडामुळे त्याचा नाश होतो,+

त्याचे ओठ त्याच्या जिवासाठी पाश ठरतात.

 ८ बदनामी करणाऱ्‍याचे शब्द जणू चविष्ट पदार्थाचे घास* असतात,+

ते गिळल्यावर सरळ पोटात जातात.+

 ९ जो कामात आळस करतो,

तो नासधूस करणाऱ्‍याचा भाऊ असतो.+

१० यहोवाचं नाव एक भक्कम बुरूज आहे.+

नीतिमान त्यात धावत जाऊन सुरक्षित राहतो.*+

११ श्रीमंताची संपत्ती त्याच्यासाठी तटबंदी शहर असते;

त्याच्या कल्पनेत ती संरक्षण देणाऱ्‍या भिंतीसारखी असते.+

१२ मन गर्विष्ठ झालं, की माणूस खाली आपटतो,+

पण जो नम्र असतो त्याचा गौरव होतो.+

१३ जो ऐकून घेण्याआधीच उत्तर देतो,

त्याच्यासाठी ते मूर्खपणाचं आणि लाजिरवाणं ठरतं.+

१४ माणसाचं मनोबल त्याला आजारपण सोसायला मदत करतं,+

पण, खचलेल्या मनाचा* भार कोण वाहू शकतं?+

१५ समजूतदार माणसाचं हृदय ज्ञान मिळवतं,+

आणि बुद्धिमानाचे कान ज्ञानाचा शोध घेतात.

१६ माणसाने दिलेल्या भेटवस्तूमुळे त्याचा मार्ग मोकळा होतो+

आणि त्याला मोठमोठ्या लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होतं.

१७ जो आपला दावा आधी मांडतो, त्याचं म्हणणं योग्य वाटतं,+

पण नंतर दुसरा पक्ष येऊन त्याची उलटतपासणी करतो.*+

१८ चिठ्ठ्या टाकल्याने भांडणं मिटतात+

आणि कट्टर विरोध्यांमध्ये निर्णय होतो.*

१९ दुखावलेल्या भावाची समजूत घालणं, तटबंदी शहर काबीज करण्यापेक्षा कठीण असतं,+

आणि काही मतभेद किल्ल्याच्या अडसरांसारखे असतात.+

२० माणसाच्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांनी* त्याचं पोट भरेल;+

त्याच्या ओठांच्या उत्पन्‍नाने तो तृप्त होईल.

२१ जिभेत मरण आणि जीवन देण्याची ताकद आहे;+

माणूस तिचा जसा वापर करायचं निवडतो, तसंच फळ त्याला भोगावं लागेल.*+

२२ ज्याला चांगली बायको मिळते, त्याला मौल्यवान खजिना सापडतो;+

त्याच्यावर यहोवाची कृपा असते.+

२३ गरीब माणूस गयावया करून बोलतो,

पण श्रीमंत माणूस कठोरपणे उत्तर देतो.

२४ काही सोबती एकमेकांचा नाश करायला तयार असतात,+

पण असाही एक मित्र असतो, जो भावापेक्षा जास्त जीव लावतो.+

१९ खोटं बोलणारा मूर्ख माणूस असण्यापेक्षा+

गरीब असणं आणि खरेपणाने चालणं बरं.+

 २ माणसाने अज्ञानी असणं ही चांगली गोष्ट नाही,+

आणि जो अविचारीपणे वागतो* तो पाप करतो.

 ३ माणसाचा स्वतःचा मूर्खपणा त्याला चुकीच्या मार्गाने नेतो

आणि त्याचं मन यहोवावर संतापतं.

 ४ संपत्ती आली की माणसाला बरेच मित्र मिळतात,

पण गरिबाचा एकुलता एक मित्रही त्याला सोडून देतो.+

 ५ खोट्या साक्षीदाराला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही,+

आणि जो क्षणाक्षणाला खोटं बोलतो तो सुटणार नाही.+

 ६ प्रतिष्ठित* माणसाची मर्जी मिळवण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात;

भेटवस्तू देणाऱ्‍या माणसाचा प्रत्येक जण मित्र असतो.

 ७ गरीब माणसाचे सगळे भाऊ त्याचा द्वेष करतात,+

मग त्याचे मित्र त्याचा किती तिरस्कार करतील!+

तो विनवण्या करत त्यांच्यामागे जातो, पण कोणीच त्याला उत्तर देत नाही.

 ८ जो समज मिळवतो, तो स्वतःवर* प्रेम करतो.+

जो समंजसपणाला मौल्यवान लेखतो, त्याला यश मिळेल.+

 ९ खोट्या साक्षीदाराला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही,

आणि जो क्षणाक्षणाला खोटं बोलतो त्याचा नाश होईल.+

१० ऐशआरामात राहणं मूर्खाला शोभत नाही,

मग सेवकाला अधिकाऱ्‍यांवर सत्ता चालवणं कसं शोभेल?+

११ सखोल समज माणसाचा राग शांत करते,+

अपराधाकडे* दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा गौरव होईल.+

१२ राजाचा राग सिंहाच्या* डरकाळीसारखा असतो,+

पण त्याची कृपा गवतावरच्या दवबिंदूंसारखी असते.

१३ मूर्ख मुलगा आपल्या बापावर संकट आणतो,+

आणि भांडखोर* बायको सतत गळणाऱ्‍या छतासारखी असते.+

१४ घर आणि संपत्ती वाडवडिलांकडून वारशाने मिळते,

पण सुज्ञ बायको यहोवाकडून मिळते.+

१५ आळशीपणामुळे गाढ झोप लागते;

सुस्त माणूस उपाशी राहील.+

१६ जो देवाची आज्ञा पाळतो, तो आपला जीव वाचवेल,+

पण जो बेपर्वाईने वागतो तो मरेल.+

१७ जो गोरगरिबांना मदत करतो, तो यहोवाला उसनं देतो;+

त्यांच्यावर केलेल्या दयेची तो परतफेड करेल.*+

१८ आशा आहे तोपर्यंत आपल्या मुलाला शिस्त लाव,+

आणि त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरू नकोस.*+

१९ तापट स्वभावाच्या माणसाला दंड भोगावा लागेल;

जर तू एकदा त्याला वाचवलंस, तर तुला पुन्हापुन्हा तसं करावं लागेल.+

२० भविष्यात बुद्धिमान होण्यासाठी,+

सल्ला ऐक आणि शिक्षण* स्वीकार.+

२१ माणसाच्या मनात बऱ्‍याच योजना असतात,

पण शेवटी यहोवाचीच इच्छा* पूर्ण होईल.+

२२ दुसऱ्‍यांवर प्रेम करणाऱ्‍या माणसाला चांगलं म्हटलं जातं;+

खोटं बोलण्यापेक्षा गरीब असलेलं बरं.

२३ यहोवाची भीती जीवनाकडे नेते;+

जो ती बाळगतो त्याचं कोणतंही नुकसान होणार नाही, त्याला चांगली विश्रांती मिळेल.+

२४ आळशी माणूस मेजवानीच्या ताटात हात तर घालतो,

पण तो तोंडाजवळ नेण्याचाही त्रास तो घेत नाही.+

२५ थट्टा करणाऱ्‍याला मार दे,+ म्हणजे अनुभव नसलेल्याला शहाणपण येईल,+

आणि समजूतदार माणसाला ताडन दे, म्हणजे त्याचं ज्ञान वाढेल.+

२६ जो मुलगा आपल्या वडिलांशी वाईट वागतो आणि आपल्या आईला हाकलून देतो,

तो लाज वाटण्याचं आणि अपमानित होण्याचं कारण ठरतो.+

२७ माझ्या मुला, जर तू ताडनाकडे दुर्लक्ष केलंस,

तर तू ज्ञानाच्या मार्गापासून भरकटशील.

२८ बिनकामाचा साक्षीदार न्यायाची थट्टा करतो,+

आणि दुष्ट लोक वाईट गोष्टी अन्‍नाप्रमाणे गिळून टाकतात.+

२९ थट्टा करणाऱ्‍यांसाठी शिक्षा+

आणि मूर्खांच्या पाठीसाठी फटके ठेवलेले आहेत.+

२० द्राक्षारसाने माणसाची थट्टा होते+ आणि दारूने तो बेफामपणे वागतो;+

यांमुळे जो वाईट मार्गाला लागतो तो बुद्धिमान नाही.+

 २ राजाचा धाक* सिंहाच्या* डरकाळीसारखा असतो,+

त्याला चीड आणणारा आपला जीव धोक्यात घालतो.+

 ३ भांडण टाळणं ही माणसासाठी आदराची गोष्ट आहे,+

पण प्रत्येक मूर्ख वाद घालत बसतो.+

 ४ आळशी माणूस हिवाळ्यात नांगरणी करत नाही,

त्यामुळे कापणीच्या वेळी त्याच्याकडे काही नसेल तेव्हा त्याला भीक मागावी लागेल.*+

 ५ माणसाच्या मनातले विचार* खोल पाण्यासारखे असतात,

पण समंजस माणूस ते बाहेर काढतो.

 ६ एकनिष्ठ प्रेमाची भाषा बरेच जण करतात,

पण विश्‍वासू माणूस सापडणं कठीण आहे.

 ७ नीतिमान माणूस खरेपणाने चालतो.+

त्याच्यामागे त्याची मुलं सुखी होतात.+

 ८ राजा न्याय करायला राजासनावर बसतो,+

तेव्हा तो आपल्या नजरेने दुष्टपणा पारखतो.*+

 ९ “मी माझं मन शुद्ध केलंय;

मी पापापासून मुक्‍त झालोय,” असं कोण म्हणू शकतो?+

१० चुकीची वजनं आणि फसवी मापं*

या दोन्ही गोष्टींची यहोवाला घृणा वाटते.+

११ लहान मुलालाही त्याच्या वागणुकीवरून ओळखता येतं;

त्याची वृत्ती योग्य आणि शुद्ध आहे की नाही, हे त्याच्या वागण्यावरून कळतं.+

१२ ऐकणारे कान आणि पाहणारे डोळे

दोन्ही यहोवाने बनवले आहेत.+

१३ झोपेवर प्रेम करू नकोस, नाहीतर तुझ्यावर गरिबी येईल.+

डोळे उघड, म्हणजे तुला पोटभर अन्‍न मिळेल.+

१४ विकत घेणारा, “हे चांगलं नाही, ते चांगलं नाही,” असं म्हणतो;

नंतर जाऊन तो स्वतःबद्दल बढाई मारतो.+

१५ एखाद्याजवळ सोनं आणि भरपूर पोवळी* असतील,

पण ज्ञानाच्या गोष्टी बोलणारे ओठ सर्वात मौल्यवान असतात.+

१६ जर कोणी अनोळखी माणसाचं कर्ज फेडण्याची हमी दिली असेल, तर त्याचं वस्त्र घे;+

त्याने वाईट चालीच्या स्त्रीचं* कर्ज फेडण्याची हमी दिली असेल, तर त्याच्याकडून तारण जप्त कर.+

१७ फसवणूक करून मिळवलेली भाकर माणसाला गोड लागते,

पण नंतर त्याच्या तोंडात माती पडेल.+

१८ आपसात चर्चा केल्याने* योजना सफल होतात,+

कुशल* मार्गदर्शनाने लढाई लढ.+

१९ बदनामी करणारा गुप्त गोष्टी सांगत फिरतो;+

ज्याला इतरांबद्दल गप्पागोष्टी करायला आवडतं* त्याची संगत धरू नकोस.

२० जो आपल्या आईवडिलांना शाप देतो,

त्याचा दिवा, अंधार पडल्यावर विझवून टाकला जाईल.+

२१ हाव धरून मिळवलेला वारसा

शेवटी फायद्याचा ठरणार नाही.+

२२ “मी वाइटाचा बदला घेईन,” असं म्हणू नकोस.+

यहोवावर भरवसा ठेव+ म्हणजे तो तुला वाचवेल.+

२३ चुकीच्या वजनांची* यहोवाला घृणा वाटते;

फसवा तराजू वापरणं योग्य नाही.

२४ कोणत्या मार्गाने जावं हे* माणसाला कसं कळेल?

माणसाच्या पावलांना यहोवा वाट दाखवतो.+

२५ विचार न करताच, “हे पवित्र आहे,” असं म्हणणं

आणि केलेल्या नवसाबद्दल नंतर विचार करणं, माणसासाठी पाश ठरू शकतं.+

२६ बुद्धिमान राजा दुष्टांना पाखडतो+

आणि मळणी करण्याचं चाक त्यांच्यावर फिरवतो.+

२७ माणसाचा श्‍वास हा यहोवाचा दिवा आहे,

त्याने तो माणसाचं अगदी खोलवर परीक्षण करतो.

२८ एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा राजाचं रक्षण करतात;+

एकनिष्ठ प्रेमानेच त्याचं राजासन टिकून राहतं.+

२९ तरुणांची ताकद हेच त्यांचं वैभव आहे,+

आणि वृद्धांचे पिकलेले केस ही त्यांची शोभा आहे.+

३० जखमांनी आणि घावांनी वाईटपणा दूर होतो,*+

आणि फटक्यांनी माणूस आतून शुद्ध होतो.

२१ राजाचं मन यहोवाच्या हातात पाटांच्या पाण्यासारखं असतं.+

त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.+

 २ माणसाला आपले सगळे मार्ग योग्यच वाटतात,+

पण यहोवा हृदयांचं* परीक्षण करतो.+

 ३ योग्य आणि न्यायीपणाची वागणूक,

यहोवाला बलिदानापेक्षा जास्त आवडते.+

 ४ गर्विष्ठ डोळे आणि अहंकारी मन,

दुष्टांना मार्ग दाखवणाऱ्‍या दिव्यासारखे आहेत आणि ते पाप आहेत.+

 ५ मेहनत करणाऱ्‍यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात,*+

पण जे उतावीळपणे वागतात त्यांच्यावर गरिबी आल्याशिवाय राहत नाही.+

 ६ खोटं बोलून मिळवलेली संपत्ती,

नाहीशा होणाऱ्‍या धुक्यासारखी, जीवघेण्या पाशासारखी असते.*+

 ७ दुष्टांचा हिंसाचार त्यांच्यावरच उलटेल,+

कारण ते न्यायाने वागायला तयार नसतात.

 ८ दोषी माणसाचा मार्ग वाकडा असतो,

पण शुद्ध मनाच्या माणसाची कामं सरळ असतात.+

 ९ भांडखोर* बायकोसोबत एकाच घरात राहण्यापेक्षा,

छताच्या कोपऱ्‍यावर राहणं बरं!+

१० दुष्ट माणूस* वाईट गोष्टी करायला आसुसलेला असतो;+

तो आपल्या शेजाऱ्‍याला जराही दया दाखवत नाही.+

११ थट्टा करणाऱ्‍याला शिक्षा केली जाते, तेव्हा अनुभव नसलेला आणखी शहाणा होतो,

बुद्धिमान माणसाला सखोल समज मिळते, तेव्हा त्याचं ज्ञान वाढतं.*+

१२ नीतिमान देव दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतो;

तो दुष्टांना उलथून त्यांचा नाश करतो.+

१३ जो गरिबाच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतो,

तो स्वतः हाक मारेल तेव्हा त्याला कोणीही उत्तर देणार नाही.+

१४ गुप्तपणे दिलेली भेटवस्तू राग शांत करते,+

लपून दिलेली लाच भडकलेला क्रोध शमवते.

१५ नीतिमान माणसाला न्यायाने वागायला आनंद वाटतो,+

पण वाईट कामं करणाऱ्‍यांना ते नकोसं वाटतं.

१६ जो माणूस सखोल समज दाखवायचं सोडून देतो

तो मृतांसोबत विश्रांती घेईल.+

१७ ज्याला मौजमजा* करायला आवडतं, त्याच्यावर गरिबी येईल;+

ज्याला द्राक्षारसाचा आणि तेलाचा शौक आहे, तो श्रीमंत होणार नाही.

१८ दुष्ट माणूस नीतिमानासाठी,

आणि विश्‍वासघातकी माणूस प्रामाणिक माणसासाठी खंडणी आहे.+

१९ भांडखोर आणि कटकट्या बायकोसोबत राहण्यापेक्षा,

ओसाड रानात राहणं बरं!+

२० बुद्धिमानांच्या घरात मौल्यवान खजिना आणि तेल सापडतं,+

पण मूर्ख माणूस आपल्याजवळ असलेलं सर्वकाही उधळून* टाकतो.+

२१ जो नीतीने आणि एकनिष्ठ प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो,

त्याला जीवन, नीतिमत्त्व आणि गौरव मिळतो.+

२२ बुद्धिमान माणूस ताकदवान माणसांच्या शहरावर चढून जातो*

आणि ज्या आश्रयदुर्गावर त्यांचा भरवसा आहे, तो पाडून टाकतो.+

२३ जो आपलं तोंड आणि जीभ सांभाळतो,

तो समस्येत अडकायचं टाळतो.+

२४ जो गर्विष्ठपणे आणि बेपर्वाईने वागतो,

त्याला अहंकारी आणि उद्धट असलेला बढाईखोर म्हणतात.+

२५ आळशी माणूस ज्या गोष्टीची इच्छा धरतो, तीच त्याचा जीव घेईल,

कारण तो आपल्या हातांनी काम करत नाही.+

२६ दिवसभर तो अधाशीपणे हाव धरतो,

पण नीतिमान काहीही राखून न ठेवता, उदारपणे देतो.+

२७ दुष्टाने दिलेलं बलिदान घृणास्पद असतं+

आणि त्याने ते वाईट हेतूने* दिलं, तर ते आणखी किती घृणास्पद असेल!

२८ खोटं बोलणाऱ्‍या साक्षीदाराचा नाश होईल,+

पण जो लक्ष देऊन ऐकतो त्याची साक्ष खरी ठरेल.*

२९ दुष्ट माणूस चेहऱ्‍यावर भीती नसल्याचा आव आणतो,+

पण प्रामाणिक माणसाचाच मार्ग सुरक्षित असतो.+

३० यहोवाच्या विरोधात कसलीही बुद्धी, शहाणपण आणि योजना चालत नाही.+

३१ घोड्याला लढाईच्या दिवसासाठी तयार केलं जातं,+

पण तारण यहोवाकडून मिळतं.+

२२ भरपूर धनसंपत्तीपेक्षा चांगलं नाव*+

आणि सोन्याचांदीपेक्षा आदर* मिळवणं बरं!

 २ श्रीमंत आणि गरीब यांच्यात एक गोष्ट सारखी आहे,*

त्या दोघांनाही यहोवानेच बनवलंय.+

 ३ शहाणा धोका पाहून लपतो,

पण भोळा पुढे जातो आणि परिणाम* भोगतो.

 ४ नम्र राहिल्याने आणि यहोवाची भीती बाळगल्याने

संपत्ती, गौरव आणि जीवन मिळतं.+

 ५ कपटी माणसाच्या मार्गात काटे आणि पाश असतात,

पण जो आपल्या जिवाची कदर करतो तो त्यांच्यापासून दूर राहतो.+

 ६ मुलाला* योग्य मार्गाने शिक्षण दे,+

म्हणजे म्हातारपणीही तो त्यापासून वळणार नाही.+

 ७ श्रीमंत गरिबावर सत्ता गाजवतो

आणि कर्ज घेणारा हा कर्ज देणाऱ्‍याचा गुलाम असतो.+

 ८ जो अनीतीचं बी पेरतो, त्याला संकटाची कापणी करावी लागेल+

आणि त्याच्या क्रूर सत्तेचा* अंत होईल.+

 ९ उदार माणसाला आशीर्वाद मिळेल

कारण तो गरिबाला आपल्या घासातला घास देतो.+

१० थट्टा करणाऱ्‍याला घालवून दे

म्हणजे भांडणतंटे मिटतील;

मतभेद* आणि अपमान बंद होतील.

११ जो शुद्ध मनाचा असतो आणि प्रेमळपणे बोलतो

त्याच्याशी राजा मैत्री करेल.+

१२ यहोवाचे डोळे ज्ञानाचं रक्षण करतात,

पण विश्‍वासघात करणाऱ्‍याचे शब्द तो खोटे ठरवतो.+

१३ आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे!

मी भर चौकात मारला जाईन!”+

१४ वाईट चालीच्या* बायकांचं तोंड म्हणजे खोल खड्डा.+

यहोवाने ज्याला धिक्कारलंय तो त्यात पडेल.

१५ मुलाच्या* मनात मूर्खपणा भरलेला असतो,+

पण शिस्तीच्या* काठीने तो दूर होईल.+

१६ जो गरिबांना फसवून आपली संपत्ती वाढवतो+

आणि श्रीमंताला भेटी देतो,

तो स्वतः गरीब होईल.

१७ माझ्या ज्ञानाकडे आपलं मन लाव+

आणि बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक;+

१८ ते मनात खोल रुजवणं चांगलं आहे,+

कारण त्यामुळे ते सतत तुझ्या ओठांवर राहतील.+

१९ तू यहोवावर भरवसा ठेवावा

म्हणून मी आज तुला ज्ञानाच्या गोष्टी सांगत आहे.

२० सल्ला आणि ज्ञान देणाऱ्‍या गोष्टींबद्दल

मी आधीच तुला लिहिलं नाही का?

२१ ज्याने तुला पाठवलं त्याच्याकडे तुला अचूक माहिती नेता यावी,

म्हणून तुला खऱ्‍या आणि भरवशालायक गोष्टी शिकवण्यासाठी मी असं केलं.

२२ गरिबाच्या गरिबीमुळे त्याला लुबाडू नकोस,+

आणि शहराच्या फाटकाजवळ दीनदुबळ्यांवर अत्याचार करू नकोस.+

२३ कारण यहोवा त्यांना न्याय मिळवून देईल+

आणि त्यांना लुबाडणाऱ्‍यांना तो ठार मारेल.

२४ तापट माणसाशी मैत्री करू नकोस

आणि लगेच रागावणाऱ्‍याची संगत धरू नकोस,

२५ नाहीतर तूही त्याच्यासारखं वागायला शिकशील

आणि पाशात सापडशील.*+

२६ हात मिळवून हमी देणाऱ्‍यांपैकी

आणि कर्जासाठी जामीन राहणाऱ्‍यांपैकी असू नकोस.+

२७ तुला परतफेड करता आली नाही,

तर तुझ्या अंगाखालचं अंथरूण काढून घेतलं जाईल!

२८ तुझ्या वाडवडिलांनी फार पूर्वी ठरवलेली

सीमेची खूण तिच्या जागेवरून हलवू नकोस.+

२९ आपल्या कामात कुशल असलेला माणूस तू पाहिला आहेस का?

तो सर्वसामान्य लोकांसमोर नाही,

तर राजांसमोर उभा राहील.+

२३ तू राजासोबत जेवायला बसलास,

तर आपल्यासमोर काय आहे याचा नीट विचार कर.

 २ तू खादाड असशील,

तर आपल्या गळ्याला सुरी लाव.*

 ३ त्याच्या पंचपक्वान्‍नांची हाव धरू नकोस,

नाहीतर त्यांमुळे तू फसशील.

 ४ संपत्ती मिळवण्यासाठी आपली शक्‍ती वाया घालवू नकोस.+

थांबून विचार कर आणि समजूतदारपणा दाखव.*

 ५ कारण तुझी नजर तिच्यावर पडेल, तेव्हा ती तिथे नसेल,+

तिला गरुडासारखे पंख फुटतील आणि ती उडून जाईल.+

 ६ कंजूस माणसाकडे जेवू नकोस;

त्याच्या पंचपक्वान्‍नांची हाव धरू नकोस.

 ७ कारण तो हिशोब ठेवतो;

“पोटभर खा, प्या” असं तो म्हणत असला, तरी ते मनापासून नसतं.*

 ८ तू जे काही खाल्लंस, ते ओकून टाकशील

आणि तू केलेली स्तुती वाया जाईल.

 ९ मूर्खाला शहाणपण शिकवायला जाऊ नकोस,+

कारण तुझ्या बुद्धीच्या गोष्टींना तो तुच्छ लेखेल.+

१० फार पूर्वी ठरवलेली सीमेची खूण, तिच्या जागेवरून हलवू नकोस,+

किंवा अनाथ मुलाचं* शेत बळकावू नकोस.

११ कारण त्यांचा समर्थक* शक्‍तिशाली आहे;

तो त्यांच्या वतीने तुझ्याशी वाद करेल.+

१२ शिक्षणाकडे मन लाव

आणि बुद्धीच्या वचनांकडे लक्ष दे.

१३ मुलाला* शिस्त लावायला मागेपुढे पाहू नकोस.+

छडीने मारल्यामुळे तो काही मरणार नाही.

१४ त्याला छडीने मार दे,

म्हणजे तू त्याला* कबरेपासून* वाचवशील.

१५ माझ्या मुला, तू बुद्धिमान झालास,

तर माझं मन आनंदी होईल.+

१६ तुझ्या ओठांतून खऱ्‍या गोष्टी निघतील,

तेव्हा मला अगदी मनापासून आनंद होईल.

१७ आपल्या मनात पापी लोकांचा हेवा करू नकोस,+

तर दिवसभर यहोवाची भीती बाळग,+

१८ म्हणजे तुझं भविष्य उज्ज्वल होईल+

आणि तुझी आशा नाहीशी होणार नाही.

१९ माझ्या मुला, ऐक आणि बुद्धिमान हो,

तुझ्या मनाला योग्य मार्ग दाखव.

२० जे खूप द्राक्षारस पितात+ आणि अधाशीपणे मांस खातात,+

त्यांची संगत धरू नकोस.

२१ कारण दारुड्या आणि खादाड माणसावर दारिद्र्‌य येईल,+

आणि गुंगीमुळे त्याला चिंध्या घालाव्या लागतील.

२२ तुला जन्म देणाऱ्‍या पित्याचं ऐक,

आणि आईचं वय झाल्यामुळे, तिला तुच्छ लेखू नकोस.+

२३ सत्य, तसंच बुद्धी, शिक्षण आणि समजशक्‍तीसुद्धा+

विकत घे;* त्यांना विकू नकोस.+

२४ नीतिमानाचा पिता नक्कीच आनंदी होईल;

जो बुद्धिमान मुलाला जन्म देतो, तो त्याच्यामुळे खूश होईल.

२५ तुझे आईवडील आनंदी होतील,

जिने तुला जन्म दिला ती हर्ष करेल.

२६ माझ्या मुला, माझ्याकडे मनापासून लक्ष दे,

माझ्या मार्गांनी चालण्यात आनंद मान.+

२७ कारण वेश्‍या खोल खड्ड्यासारखी असते,

आणि अनैतिक* स्त्री अरुंद विहिरीसारखी असते.+

२८ ती लुटारूंसारखी टपून बसते;+

ती धोकेबाज माणसांची संख्या वाढवते.

२९ कोण दु:खी आणि बेचैन आहे?

कोण सारखं-सारखं भांडतं आणि तक्रारी करतं?

कोणाला विनाकारण जखमा होतात? कोणाचे डोळे निस्तेज दिसतात?

३० जे बराच वेळ द्राक्षारस पीत राहतात+

आणि धुंद करणारा द्राक्षारस शोधत फिरतात.*

३१ प्याल्यात चमकणाऱ्‍या आणि सहज गळ्याखाली उतरणाऱ्‍या

द्राक्षारसाच्या लाल रंगाकडे पाहू नकोस.

३२ कारण शेवटी तो सापासारखा दंश करतो;

त्याच्या तोंडातून विषारी सापासारखं जहर निघतं.

३३ तुझ्या डोळ्यांना विचित्र गोष्टी दिसतील

आणि तू नको त्या गोष्टी बोलशील.+

३४ तू समुद्राच्या मधोमध पडलेल्या,

डोलकाठीच्या* टोकावर झोपलेल्या माणसासारखा होशील.

३५ तू म्हणशील: “त्यांनी मला फटके मारले, पण मला लागलंच नाही.*

त्यांनी मला मारलं तरी मला कळलं नाही.

मी कधी जागा होईन+

आणि आणखी एक प्याला पिईन?”

२४ दुष्ट माणसांचा हेवा करू नकोस

आणि त्यांच्या संगतीची इच्छा धरू नकोस.+

 २ कारण त्यांच्या मनात हिंसा करण्याचे विचार घोळत असतात

आणि ते नेहमी दुसऱ्‍यांची हानी करण्याच्या गोष्टी करतात.

 ३ घर* बुद्धीने बांधलं जातं+

आणि समंजसपणाने ते सुरक्षित राहतं.

 ४ ज्ञानामुळे त्याच्या खोल्या मौल्यवान

आणि सुंदर वस्तूंनी भरतात.+

 ५ बुद्धिमान माणसाजवळ ताकद असते+

आणि ज्ञानाने माणूस आपली शक्‍ती वाढवतो.

 ६ कुशल* मार्गदर्शनाने लढाई लढ;+

पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे विजय* मिळतो.+

 ७ खरी बुद्धी मूर्खाच्या आवाक्याबाहेर असते;+

शहराच्या फाटकाजवळ त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीही नसतं.

 ८ दुष्ट योजना करणाऱ्‍याला

लोक कारस्थानी म्हणतील.+

 ९ मूर्खपणाच्या* योजना पाप करायला लावतात

आणि थट्टा करणाऱ्‍याची लोकांना चीड येते.+

१० दुःखाच्या प्रसंगी* तू निराश झालास,

तर तुझी शक्‍ती कमी पडेल.

११ ज्यांना ठार मारायला नेलं जातंय, त्यांना सोडव

आणि ज्यांची कत्तल होणार आहे, त्यांना वाचवायचा प्रयत्न कर.+

१२ “पण आम्हाला याबद्दल माहीतच नव्हतं,” असं जर तुम्ही म्हणालात,

तर हृदयांचं* परीक्षण करणारा ते ओळखणार नाही का?+

हो, तुमच्यावर* लक्ष ठेवणाऱ्‍या देवाला ते कळेल

आणि तो प्रत्येक माणसाला त्याच्या कामांप्रमाणे फळ देईल.+

१३ माझ्या मुला, मध खा कारण तो चांगला असतो;

पोळ्यातला मध गोड असतो.

१४ त्याचप्रमाणे, बुद्धीही तुझ्यासाठी चांगली आहे* हे विसरू नकोस.+

तुला ती सापडली, तर तुझं भविष्य उज्ज्वल होईल

आणि तुझी आशा नाहीशी होणार नाही.+

१५ नीतिमान माणसाच्या घराजवळ दुष्ट इराद्याने टपून बसू नकोस;

त्याच्या विश्रांतीचं ठिकाण उद्ध्‌वस्त करू नकोस.

१६ कारण नीतिमान सात वेळा जरी पडला, तरी तो पुन्हा उठेल,+

पण दुष्टावर संकट येताच तो खाली पडेल.+

१७ तुझा शत्रू पडला तर आनंदी होऊ नकोस;

तो अडखळला तर मनातल्या मनात खूश होऊ नकोस.+

१८ नाहीतर, यहोवा हे बघेल तेव्हा त्याला ते आवडणार नाही

आणि तुझ्या शत्रूवरचा त्याचा राग शांत होईल.+

१९ वाईट कामं करणाऱ्‍यांमुळे चिडू* नकोस

आणि दुष्टांचा हेवा करू नकोस.

२० कारण वाईट माणसाचं भविष्य अंधकारमय असतं;+

दुष्टांचा दिवा विझून जाईल.+

२१ माझ्या मुला, यहोवाची आणि राजाची भीती बाळग.+

विद्रोह करणाऱ्‍यांची* संगत धरू नकोस.+

२२ कारण त्यांच्यावर अचानक संकट येईल.+

दोघं* त्यांच्यावर कोणती विपत्ती आणतील, हे कोण सांगू शकतं?+

२३ बुद्धिमानांनी असंही म्हटलेलं आहे:

न्याय करताना पक्षपात करणं योग्य नाही.+

२४ जो दुष्टाला, “तू नीतिमान आहेस,” असं म्हणतो,+

त्याला लोक शाप देतील आणि राष्ट्रं त्याचा तिरस्कार करतील.

२५ पण जे त्याला ताडन करतात त्यांचं भलं होईल;+

त्यांच्यावर कृपेचा आणि आशीर्वादांचा वर्षाव होईल.+

२६ प्रामाणिकपणे उत्तर देणाऱ्‍याचा लोक आदर करतील.*+

२७ आधी तुझी बाहेरची आणि शेतातली कामं कर;

मग तुझं घर* बांध.

२८ पुरावा नसताना आपल्या शेजाऱ्‍याविरुद्ध साक्ष देऊ नकोस.+

आपल्या शब्दांनी इतरांची फसवणूक करू नकोस.+

२९ “त्याने माझ्यासोबत केलं, तसंच मीही करीन;

त्याने जे केलं त्याचा मी बदला घेईन,” असं म्हणू नकोस.+

३० मी आळशी माणसाच्या शेताजवळून;+

समज नसलेल्या माणसाच्या द्राक्षमळ्याजवळून गेलो.

३१ तेव्हा मला त्यात सगळीकडे जंगली झुडपं उगवलेली दिसली;

जमीन काट्याकुसळ्यांनी भरली होती

आणि त्याची दगडी भिंत पडली होती.+

३२ हे पाहून मी त्यावर विचार केला

आणि त्यातून हा धडा घेतला:

३३ जराशी डुलकी घेतो, जराशी झोप घेतो,

हात छातीशी घेऊन अजून थोडासा आराम करतो,

३४ असं म्हणत राहिलास, तर गरिबी एखाद्या लुटारूप्रमाणे

आणि दारिद्र्‌य एखाद्या शस्त्रधारी माणसाप्रमाणे तुला गाठेल.+

२५ यहूदाचा राजा हिज्कीया+ याच्या लेखकांनी उतरवून घेतलेली,* शलमोनची आणखी काही नीतिवचनं:+

 २ एखादी गोष्ट गुप्त ठेवणं, यात देवाचा गौरव आहे,+

आणि एखाद्या गोष्टीचा शोध घेणं, यात राजांचा गौरव आहे.

 ३ आकाश जितकं उंच आणि पृथ्वी जितकी खोल आहे,

तितकाच राजाच्या मनाचा थांग लागणं अशक्य आहे.

 ४ चांदीमधून गाळ काढून टाक,

म्हणजे ती पूर्णपणे शुद्ध होईल.+

 ५ राजासमोरून दुष्टाला काढून टाक,

म्हणजे त्याचं राजासन न्यायामुळे स्थिर होईल.+

 ६ राजासमोर स्वतःची बढाई मारू नकोस,+

मोठमोठ्या लोकांमध्ये उभा राहू नकोस.+

 ७ कारण एखाद्या प्रतिष्ठित माणसासमोर त्याने तुझा अपमान करण्यापेक्षा,

“इकडे वर ये” असं त्याने म्हणणं चांगलं.+

 ८ खटला भरण्याची घाई करू नकोस,

कारण नंतर तुझ्या शेजाऱ्‍याने तुला लज्जित केलं, तर तू काय करशील?+

 ९ त्याच्यासोबत झालेला वाद मिटव,+

पण त्याच्या खाजगी गोष्टी* सगळ्यांना सांगू नकोस.+

१० कारण ती गोष्ट ऐकणारा तुझा अपमान करेल

आणि तू पसरवलेली वाईट गोष्ट* तुला मागे घेता येणार नाही.

११ योग्य वेळी बोललेले शब्द,

चांदीच्या टोपलीत ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदांसारखे असतात.+

१२ जो ऐकून घ्यायला तयार असतो, त्याच्यासाठी ताडन देणारा बुद्धिमान माणूस,

सोन्याच्या कर्णफुलासारखा आणि शुद्ध सोन्याच्या दागिन्यासारखा असतो.+

१३ कापणीच्या दिवशी जसा बर्फाचा गारवा,

तसा विश्‍वासू निरोप्या त्याच्या पाठवणाऱ्‍यासाठी असतो,

कारण तो आपल्या मालकाला* ताजंतवानं करतो.+

१४ ढग जमतात, वारा सुटतो पण पाऊस पडत नाही,

त्याचप्रमाणे एखादा माणूस, न दिलेल्या भेटवस्तूबद्दल* नुसतीच बढाई मारतो.+

१५ सहनशील वृत्तीमुळे अधिकाऱ्‍याचं मन जिंकता येतं,

आणि मऊ* जीभ हाड मोडते.+

१६ मध सापडला, तर हवा तेवढाच खा,

जास्त खाल्लास, तर तू तो ओकून टाकशील.+

१७ आपल्या शेजाऱ्‍याच्या घरी सारखंसारखं जाऊ नकोस,

नाहीतर तो कंटाळून तुझा द्वेष करू लागेल.

१८ आपल्या शेजाऱ्‍याविरुद्ध खोटी साक्ष देणारा,

सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण यांच्यासारखा असतो.+

१९ संकटाच्या काळात बेभरवशाच्या* माणसावर अवलंबून राहणं,

हे तुटलेल्या दाताने चावण्यासारखं आणि लटपटत्या पायाने चालण्यासारखं आहे.

२० दुःखी मनाच्या माणसासमोर गाणी म्हणणारा,+

थंडीच्या दिवशी वस्त्र काढून घेणाऱ्‍यासारखा

आणि मिठावर* ओतलेल्या शिरक्यासारखा* असतो.

२१ तुझा शत्रू* भुकेला असेल, तर त्याला खायला भाकर दे;

तो तहानलेला असेल, तर त्याला प्यायला पाणी दे.+

२२ कारण असं केल्यामुळे तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्‍यांचा ढीग रचशील,*+

आणि यहोवा तुला प्रतिफळ देईल.

२३ उत्तरेकडच्या वाऱ्‍यासोबत पाऊस येतोच,

तसंच निंदा करणारी जीभ राग आणते.+

२४ भांडखोर* बायकोसोबत एकाच घरात राहण्यापेक्षा,

छताच्या कोपऱ्‍यावर राहणं बरं!+

२५ थकलेल्या जिवाला* जसं गार पाणी,

तशी दूरच्या देशाहून आलेली चांगली बातमी असते.+

२६ दुष्टासमोर हात टेकणारा* नीतिमान माणूस,

गढूळ झालेल्या झऱ्‍यासारखा आणि दूषित झालेल्या विहिरीसारखा असतो.

२७ खूप जास्त मध खाणं जसं चांगलं नाही,+

तसंच स्वतःचा गौरव करणंही चांगलं नाही.+

२८ रागावर नियंत्रण नसलेला माणूस,

तटबंदी पडलेल्या शहरासारखा असतो.+

२६ उन्हाळ्यात बर्फवृष्टी आणि कापणीच्या वेळी पाऊस,

तसा मूर्खाला सन्मान शोभत नाही.+

 २ पक्षी निसटून जाण्यामागे आणि पाकोळी उडून जाण्यामागे काहीतरी कारण असतं,

तसंच कोणताही शाप विनाकारण लागत नाही.*

 ३ घोड्यासाठी चाबूक आणि गाढवासाठी लगाम,+

तशीच मूर्खांच्या पाठीसाठी काठी असते.+

 ४ मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस,

नाहीतर तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक राहील?*

 ५ मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणेच उत्तर दे,

नाहीतर तो स्वतःला बुद्धिमान समजेल.+

 ६ जो मूर्खावर कामं सोपवतो,

तो स्वतःचे पाय कापून टाकणाऱ्‍या आणि स्वतःचं नुकसान करणाऱ्‍या* माणसासारखा असतो.

 ७ मूर्ख लोकांच्या तोंडी बोधवाक्य,*

लंगड्या माणसाच्या लुळ्या* पायांसारखं असतं.+

 ८ मूर्खाचा गौरव करणं

गोफणीला दगड बांधून ठेवण्यासारखं असतं.+

 ९ मूर्खांच्या तोंडी बोधवाक्य*

म्हणजे दारुड्याच्या हाती आलेलं काटेरी झुडूप.

१० जो मूर्खाला किंवा कोणत्याही येणाऱ्‍या-जाणाऱ्‍याला कामावर ठेवून घेतो,

तो नेम न धरता सर्वांना जखमी करणाऱ्‍या तिरंदाजासारखा असतो.

११ पुन्हापुन्हा तोच मूर्खपणा करणारा मूर्ख,

आपल्या ओकारीकडे परत जाणाऱ्‍या कुत्र्यासारखा असतो.+

१२ स्वतःला बुद्धिमान समजणारा माणूस तू पाहिला आहेस का?+

त्याच्यापेक्षा एखाद्या मूर्खाला जास्त आशा आहे.

१३ आळशी म्हणतो: “रस्त्यावर सिंहाचा छावा आहे,

चौकात सिंह आहे!”+

१४ जसा दरवाजा बिजागऱ्‍यांवर फिरत राहतो,

तसा आळशी माणूस अंथरुणावर लोळत राहतो.+

१५ आळशी माणूस मेजवानीच्या ताटात हात तर घालतो,

पण तो तोंडाजवळ नेण्याचीही ताकद त्याच्यात नसते.+

१६ आळशी माणूस स्वतःला,

विचारपूर्वक उत्तर देणाऱ्‍या सात लोकांपेक्षा हुशार* समजतो.

१७ जो रस्त्याने जाताना दुसऱ्‍याच्या भांडणात पडून संतापतो,*

तो एखाद्या कुत्र्याचे कान ओढणाऱ्‍यासारखा असतो.+

१८ एखाद्या वेड्या माणसाने जळते बाण सोडावेत किंवा जीवघेणे भाले फेकावेत,

१९ तसा एखादा माणूस आपल्या शेजाऱ्‍याची फसवणूक करून, “मी तर फक्‍त चेष्टा करत होतो” असं म्हणतो.+

२० लाकूड नसलं, तर आग विझून जाते,

तसंच, बदनामी करणारा नसला की भांडण आपोआप मिटतं.+

२१ जसं आगीसाठी लाकूड आणि निखाऱ्‍यांसाठी कोळसा लागतो,

तशी भांडखोर माणसामुळे भांडणं पेटतात.+

२२ बदनामी करणाऱ्‍याचे शब्द जणू चविष्ट पदार्थाचे घास* असतात,

ते गिळल्यावर सरळ पोटात जातात.+

२३ दुष्ट मनाच्या माणसाचे प्रेमळ शब्द,*

मडक्याच्या खापरीवर चांदीच्या मुलाम्यासारखे असतात.+

२४ दुसऱ्‍यांचा द्वेष करणारा वरवर गोड बोलतो,

पण त्याच्या मनात कपट असतं.

२५ तो प्रेमळपणे बोलला तरी त्याच्यावर भरवसा ठेवू नकोस,

कारण त्याच्या मनात सात घृणास्पद गोष्टी आहेत.*

२६ त्याने कपटीपणे आपला द्वेष लपवला,

तरी त्याचा वाईटपणा सर्वांसमोर उघडा पडेल.

२७ जो खड्डा खोदतो, तो स्वतःच त्याच्यात पडेल

आणि जो धोंडा बाजूला लोटतो, त्याच्यावरच तो उलटेल.+

२८ खोटं बोलणारा, त्याने चिरडलेल्यांचा द्वेष करतो

आणि खोटी स्तुती करणारा नाशाला कारण होतो.+

२७ उद्याच्या दिवसाबद्दल बढाई मारू नकोस,

कारण उद्याचा दिवस कसा असेल* हे तुला माहीत नाही.+

 २ तुझ्या स्वतःच्या तोंडाने नाही, तर दुसऱ्‍याने* तुझी प्रशंसा करावी;

तुझ्या ओठांनी नाही, तर इतरांच्या* ओठांनी तुझी स्तुती करावी.+

 ३ दगड आणि वाळू दोन्ही वजनदार असतात,

पण मूर्खामुळे होणारा मनस्ताप त्यांच्यापेक्षाही जड असतो.+

 ४ क्रोधाची क्रूरता आणि संतापाचा महापूर परवडला,

पण ईर्ष्येपुढे* कोण टिकू शकतं?+

 ५ मनात लपवलेल्या प्रेमापेक्षा उघडपणे दिलेलं ताडन बरं!+

 ६ मित्राने केलेले घाव विश्‍वासू असतात,+

पण शत्रू चुंबनांचा वर्षाव करतो.*

 ७ ज्याचं पोट भरलेलं असतं, तो पोळ्यातल्या मधालाही नको म्हणतो,*

पण जो भुकेला असतो, त्याला कडू पदार्थही गोड लागतो.

 ८ स्वतःचं घर सोडून भटकणारा माणूस,

आपल्या घरट्यातून उडून जाणाऱ्‍या पक्ष्यासारखा असतो.

 ९ तेल आणि धूप यांमुळे जसा मनाला आनंद होतो,

तसाच प्रामाणिक* सल्ल्याने जुळलेल्या मैत्रीच्या गोड नात्यानेही होतो.+

१० तुझ्या मित्राला किंवा तुझ्या वडिलांच्या मित्राला सोडून देऊ नकोस

आणि संकटाच्या दिवशी आपल्या भावाच्या घरी पाऊल ठेवू नकोस;

दूर राहणाऱ्‍या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा!+

११ माझ्या मुला, सुज्ञपणे* वाग म्हणजे मला मनापासून आनंद होईल+

आणि मला टोमणे मारणाऱ्‍याला मी उत्तर देऊ शकेन.+

१२ शहाणा माणूस धोका पाहून लपतो,+

पण भोळा पुढे जातो आणि परिणाम* भोगतो.

१३ जर कोणी अनोळखी माणसाचं कर्ज फेडण्याची हमी दिली असेल, तर त्याचं वस्त्र घे;

त्याने वाईट चालीच्या स्त्रीचं* कर्ज फेडण्याची हमी दिली असेल, तर त्याच्याकडून तारण जप्त कर.+

१४ कोणी पहाटे उठून मोठ्या आवाजाने आपल्या मित्राला आशीर्वाद दिला,

तर तो आशीर्वादही शाप समजला जाईल.

१५ भांडखोर* बायको पावसाच्या दिवसांत सतत गळणाऱ्‍या छतासारखी असते.+

१६ जो तिला आवरू शकतो तो वाऱ्‍याला आवरू शकेल

आणि आपल्या उजव्या हाताने तेल पकडू शकेल.

१७ लोखंड जसं लोखंडाला धार लावतं,

तसाच एक माणूस आपल्या मित्राला सुधारतो.*+

१८ जो अंजिराच्या झाडाची काळजी घेतो, तो त्याचं फळ खाईल+

आणि जो आपल्या मालकाची काळजी घेतो, त्याचा सन्मान केला जाईल.+

१९ पाण्यात चेहऱ्‍याचं प्रतिबिंब दिसतं,

तसं एका माणसाच्या मनात दुसऱ्‍याच्या मनाचं प्रतिबिंब दिसतं.

२० कबर आणि नाशाचं ठिकाण कधीही तृप्त होत नाही,+

त्याच प्रकारे माणसाचे डोळेही कधीच तृप्त होत नाहीत.

२१ सोनंचांदी शुद्ध करण्यासाठी जसं आगीत टाकतात,+

तशीच माणसाची परीक्षा त्याला मिळणाऱ्‍या प्रशंसेमुळे होते.

२२ अक्कलशून्य माणसाला धान्यासारखं

उखळात घालून मुसळाने कुटलं,

तरी त्याचा मूर्खपणा जात नाही.

२३ तुला आपल्या कळपाची पूर्ण माहिती असली पाहिजे.

आपल्या मेंढरांची चांगली काळजी घे.*+

२४ कारण संपत्ती कायम टिकत नाही+

आणि मुकुटही पिढ्या न्‌ पिढ्या राहत नाही.

२५ हिरवं गवत सुकून, पुन्हा कोवळं गवत उगवतं

आणि डोंगरांवरून हिरवळ कापून गोळा केली जाते.

२६ कोकरांमुळे तुला वस्त्रं मिळतात

आणि बकरे विकून तुला शेत घेता येईल.

२७ तुझ्याकडे बकऱ्‍यांचं इतकं दूध असेल,

की तू आणि तुझ्या कुटुंबातले सर्व जण तृप्त होतील,

तसंच, तुझ्या दासींचंही पोषण होईल.

२८ दुष्ट लोक कोणी पाठलाग करत नसतानाही पळतात,

पण नीतिमान सिंहासारखे* धैर्यवान असतात.+

 २ देशातल्या अपराधांमुळे* त्याचे अधिकारी बदलत राहतील,+

पण समंजस आणि ज्ञानी माणसाच्या मार्गदर्शनामुळे, अधिकारी* बराच काळ टिकून राहील.+

 ३ दीनदुबळ्यांना लुबाडणारा गरीब माणूस,+

सगळं पीक वाहून नेणाऱ्‍या पावसासारखा असतो.

 ४ कायद्याला* न जुमानणारे लोक दुष्टाची प्रशंसा करतात,

पण कायदा* पाळणाऱ्‍यांना त्यांची चीड येते.+

 ५ वाईट माणसांना न्याय समजत नाही,

पण जे यहोवाचा शोध घेतात त्यांना सगळं समजतं.+

 ६ वाईट मार्गांनी चालणाऱ्‍या श्रीमंत माणसापेक्षा

खरेपणाने चालणारा गरीब माणूस बरा!+

 ७ समजूतदार मुलगा कायदा* पाळतो,

पण खादाडांचा सोबती आपल्या बापाला लज्जित करतो.+

 ८ जो व्याजखोरी+ आणि लुबाडणूक करून संपत्ती वाढवतो,

तो गरिबांवर दया करणाऱ्‍यासाठी ती साठवतो.+

 ९ जो कायद्याकडे* दुर्लक्ष करतो,

त्याची प्रार्थनासुद्धा घृणास्पद असते.+

१० जो सरळ मनाच्या माणसाला बहकवून वाईट मार्गाला लावतो, तो आपणच खोदलेल्या खड्ड्यात पडतो;+

पण निर्दोष माणसाला चांगल्या गोष्टींचा वारसा मिळेल.+

११ श्रीमंत स्वतःच्या नजरेत बुद्धिमान असतो,+

पण समंजस असलेला गरीब माणूस, त्याचं खरं स्वरूप ओळखतो.+

१२ नीतिमानांचा विजय होतो, तेव्हा लोक जल्लोष करतात,

पण दुष्टांच्या हाती सत्ता येते, तेव्हा लोक लपून बसतात.+

१३ जो आपले अपराध लपवून ठेवतो, त्याला यश मिळणार नाही,+

पण जो ते कबूल करून सोडून देतो, त्याला दया दाखवली जाईल.+

१४ नेहमी सावध राहणारा* माणूस सुखी असतो,

पण जो अडेलपणा करतो,* तो संकटात सापडेल.+

१५ असाहाय्य लोकांवर राज्य करणारा दुष्ट शासक,

गरजणाऱ्‍या सिंहासारखा आणि हल्ला करणाऱ्‍या अस्वलासारखा असतो.+

१६ समंजसपणा नसलेला नेता आपल्या सत्तेचा गैरवापर करतो,+

पण ज्याला बेइमानीच्या कमाईची घृणा वाटते, त्याला मोठं आयुष्य लाभेल.+

१७ दुसऱ्‍याचा जीव घेतल्यामुळे रक्‍तदोषी झालेला, मरेपर्यंत* पळत राहील.+

त्याला कोणीही मदत करू नये.

१८ निर्दोष मार्गाने चालणाऱ्‍याला वाचवलं जाईल,+

पण जो दुष्ट मार्गांनी चालतो तो अचानक पडेल.+

१९ आपल्या शेतीची मशागत करणाऱ्‍याला अन्‍न कमी पडणार नाही,

पण जो निरर्थक कामांच्या मागे लागतो, त्याच्यावर दारिद्र्‌य येईल.+

२० विश्‍वासू माणसाला पुष्कळ आशीर्वाद मिळतील,+

पण जो श्रीमंत होण्यासाठी उतावळा असतो, तो निर्दोष राहणार नाही.+

२१ पक्षपात करणं चांगलं नाही;+

पण कधीकधी माणूस भाकरीच्या तुकड्यासाठी चुकीचं काम करतो.

२२ दुसऱ्‍यांचा हेवा करणारा* माणूस श्रीमंत व्हायला उत्सुक असतो;

पण आपल्याला गरिबी गाठेल हे त्याला माहीत नसतं.

२३ खोटी प्रशंसा करणाऱ्‍यापेक्षा,

ताडन करणाऱ्‍याचेच+ नंतर जास्त आभार मानले जातील.+

२४ जो आपल्या आईबापाला लुबाडून, “यात काहीच चुकीचं नाही,” असं म्हणतो,+

तो नाश करणाऱ्‍याचा साथीदार असतो.+

२५ लोभी माणूस* भांडणं लावतो,

पण जो यहोवावर अवलंबून राहतो त्याची भरभराट होईल.+

२६ स्वतःच्याच मनावर भरवसा ठेवणारा मूर्ख असतो,+

पण जो सुज्ञपणे चालतो त्याचा बचाव होईल.+

२७ जो गरिबाला मदत करतो त्याला काहीच कमी पडणार नाही,+

पण जो त्यांना पाहून न पाहिल्यासारखं करतो, त्याला बरेच शाप लागतील.

२८ दुष्ट सत्तेवर येतात, तेव्हा लोक लपून बसतात,

पण दुष्टांचा नाश होतो, तेव्हा नीतिमान लोक वाढतात.+

२९ बरंच ताडन दिल्यावरही जो माणूस आपला हट्ट सोडत नाही,+

तो अचानक असा चिरडला जाईल, की पुन्हा कधीच उठणार नाही.+

 २ नीतिमान पुष्कळ असतात, तेव्हा लोक जल्लोष करतात;

पण दुष्ट सत्ता चालवतो, तेव्हा ते कण्हू लागतात.+

 ३ जो बुद्धीवर प्रेम करतो, त्याच्या वडिलांना त्याच्यामुळे आनंद होतो,+

पण जो वेश्‍यांची संगत धरतो, तो आपली संपत्ती उधळून टाकतो.+

 ४ न्यायामुळे राजा देशात शांती आणतो,+

पण लाच घेणारा माणूस देशाचा नाश करतो.

 ५ शेजाऱ्‍याची खोटी स्तुती करणारा,

त्याच्या पायांसाठी जाळं पसरवतो.+

 ६ वाईट माणूस आपल्या अपराधाच्या पाशात सापडतो,+

पण नीतिमान आनंदाने जल्लोष करतो.+

 ७ नीतिमानाला गरिबांच्या हक्कांची* काळजी असते,+

पण दुष्टाला त्यांची काहीच पर्वा नसते.+

 ८ बढाईखोर लोक नगराला आग लावून देतात,+

पण जे बुद्धिमान असतात, ते राग शांत करतात.+

 ९ बुद्धिमान माणसाने मूर्खाशी वाद घातला,

तर आरडाओरड आणि थट्टा होईल, पण तोडगा निघणार नाही.+

१० हिंसक लोक निर्दोष* माणसाचा द्वेष करतात,+

आणि सरळ मनाच्या माणसाचा जीव घेऊ पाहतात.*

११ मूर्ख माणूस आपल्या सगळ्या भावना व्यक्‍त करतो,+

पण बुद्धिमान माणूस त्यांवर नियंत्रण ठेवून शांत राहतो.+

१२ जेव्हा एखादा शासक खोट्या गोष्टींकडे लक्ष देतो,

तेव्हा त्याचे सर्व सेवक दुष्ट होतात.+

१३ गरीब माणूस आणि अत्याचार करणारा यांच्यात एक गोष्ट सारखी आहे:*

दोघांच्याही डोळ्यांना यहोवाच प्रकाश देतो.*

१४ राजा जेव्हा गरिबांचा योग्य न्याय करतो,+

तेव्हा त्याचं राजासन कायम टिकून राहतं.+

१५ काठी* आणि ताडन यांमुळे बुद्धी मिळते,+

पण मोकाट सोडलेला मुलगा, आपल्या आईला शरमेने खाली पाहायला लावतो.

१६ दुष्ट वाढले की अपराधही वाढतात,

पण नीतिमान त्यांचा नाश होताना पाहतील.+

१७ मुलाला शिस्त लाव म्हणजे तुझ्या जिवाला विश्रांती मिळेल;

आणि त्याच्यामुळे तू खूप सुखी होशील.*+

१८ देवाकडून मार्गदर्शन* मिळत नाही, तेव्हा लोक अंदाधुंदपणे वागतात,+

पण जे कायदा* पाळतात, ते सुखी असतात.+

१९ सेवक शब्दांनी सुधरत नाही,

कारण त्याला कळतं, तरी तो आज्ञा पाळत नाही.+

२० बोलण्याची घाई करणारा माणूस तू पाहिला आहेस का?+

त्याच्यापेक्षा मूर्खाला जास्त आशा आहे.+

२१ सेवकाला लहानपणापासून लाडवलंस,

तर नंतर तो तुझे उपकार विसरून जाईल.

२२ तापट माणूस वाद सुरू करतो;+

जो लगेच रागावतो तो पुष्कळ अपराध करतो.+

२३ गर्विष्ठपणा माणसाला खाली पाडतो,+

पण जो नम्र वृत्तीचा असतो, त्याचा गौरव होईल.+

२४ चोराचा साथीदार स्वतःचा* द्वेष करतो,

तो साक्ष देण्याची घोषणा* ऐकूनही, काहीच सांगत नाही.+

२५ माणसांची भीती* पाश ठरते,+

पण जो यहोवावर भरवसा ठेवतो, तो सुरक्षित राहील.+

२६ शासकाला भेटण्याची* इच्छा बऱ्‍याच लोकांना असते,

पण माणसाला न्याय यहोवाकडूनच मिळतो.+

२७ नीतिमानाला दुष्ट माणसाची घृणा येते,+

पण दुष्टाला सरळ मार्गाने चालणाऱ्‍याची घृणा वाटते.+

३० याकेचा मुलगा आगूर याने इथीएल आणि उकाल यांना दिलेला महत्त्वाचा संदेश.

 २ दुसऱ्‍या कोणाहीपेक्षा मी जास्त अज्ञानी आहे.+

माणसाजवळ असायला हवी, ती समजशक्‍ती माझ्याकडे नाही.

 ३ मी बुद्धी मिळवली नाही

आणि परमपवित्र देवाचं ज्ञान माझ्याकडे नाही.

 ४ आकाशात चढून कोण खाली उतरला आहे?+

कोणी वाऱ्‍याला आपल्या ओंजळीत ठेवलंय?

कोणी आपल्या वस्त्रांत पाण्याला बांधलंय?+

पृथ्वीच्या सगळ्या सीमा कोणी ठरवल्या* आहेत?+

त्याचं नाव काय आणि त्याच्या मुलाचं नाव काय? तुला माहीत असेल तर सांग.

 ५ देवाचा प्रत्येक शब्द शुद्ध आहे.+

त्याचा आश्रय घेणाऱ्‍यांसाठी तो ढाल आहे.+

 ६ त्याच्या शब्दांत काही भर घालू नकोस,+

नाहीतर तो तुला ताडन करेल

आणि तू खोटा ठरशील.

 ७ मी तुला दोन गोष्टी मागतो.

मला मरण येण्याआधी त्या मला दे, नाही म्हणू नकोस.

 ८ लबाडी आणि खोटेपणा माझ्यापासून दूर ठेव.+

मला दारिद्र्‌य किंवा श्रीमंतीही देऊ नकोस.

फक्‍त माझ्या पोटापुरतं अन्‍न मला दे.+

 ९ म्हणजे मी तृप्त होऊन तुला नाकारणार नाही आणि “यहोवा कोण आहे?” असं म्हणणार नाही.+

किंवा, गरीब होऊन मी चोरी करणार नाही आणि माझ्या देवाच्या नावाला कलंक लावणार नाही.*

१० एखाद्या सेवकाची त्याच्या मालकापुढे बदनामी करू नकोस,

नाहीतर तो तुला शाप देईल आणि तू दोषी ठरशील.+

११ एक पिढी* आपल्या बापाला शाप देते

आणि आपल्या आईबद्दल आदराने बोलत नाही.+

१२ एक पिढी* स्वतःच्या नजरेत शुद्ध आहे+

पण तिची अशुद्धता* साफ करण्यात आलेली नाही.

१३ एक पिढी* अशी आहे, जिचे डोळे अत्यंत गर्विष्ठ आहेत

आणि ती अहंकारी नजरेने पाहते!+

१४ एक पिढी* अशी आहे, जिचे दात तलवारींसारखे

आणि जबडे कत्तल करणाऱ्‍या सुऱ्‍यांसारखे आहेत;

ते पृथ्वीवरच्या दीनदुबळ्यांना

आणि गोरगरिबांना गिळून टाकतात.+

१५ जळवांना दोन मुली आहेत; “द्या! द्या!” असं त्या ओरडत असतात;

अशा तीन गोष्टी आहेत, ज्यांचं कधीही समाधान होत नाही,

चार गोष्टी अशा आहेत, ज्या “पुरे झालं!” असं कधीही म्हणत नाहीत.

१६ कबर*+ आणि वांझेचं उदर,

निर्जल प्रदेश,

आणि आग, जी “पुरे झालं!” असं कधीही म्हणत नाही.

१७ जे डोळे बापाची थट्टा करतात आणि आईची आज्ञा तुच्छ लेखतात,+

त्यांना खोऱ्‍यांतले डोमकावळे टोचा मारून बाहेर काढतील

आणि गरुडांची पिल्लं त्यांना खाऊन टाकतील.+

१८ अशा तीन गोष्टी आहेत, ज्या माझ्या समजण्यापलीकडे आहेत;*

चार गोष्टी अशा आहेत, ज्या मला समजत नाहीत.

१९ आकाशात गरुडाचं उडणं,

खडकावर सापाचं सरपटणं,

समुद्रावर जहाजाचं चालणं

आणि पुरुषाचं तरुण स्त्रीशी वागणं.

२० व्यभिचारी स्त्री अशी असते:

ती खाऊन तोंड पुसते

आणि म्हणते, “मी काहीच चुकीचं केलेलं नाही.”+

२१ अशा तीन गोष्टी आहेत ज्यांमुळे पृथ्वी हादरते,

चार गोष्टी अशा आहेत, ज्या ती सहन करू शकत नाही:

२२ दासाचं राजा म्हणून राज्य करणं,+

मूर्खाचं पोट तुडुंब भरेपर्यंत खाणं,

२३ कोणालाही न आवडणाऱ्‍या* स्त्रीचं लग्न होणं

आणि दासीने मालकिणीची जागा घेणं.+

२४ पृथ्वीवरचे चार जीव आकाराने अगदी लहान असतात,

पण ते जन्मतःच बुद्धिमान* असतात:+

२५ मुंग्या शक्‍तिशाली नसतात,

तरी त्या उन्हाळ्यात आपलं अन्‍न तयार करतात.+

२६ बिजू*+ ताकदवान प्राणी नसतात,

तरी ते खडकांत आपलं घर बनवतात.+

२७ टोळांचा+ राजा नसतो,

तरी ते आपापल्या गटाप्रमाणे पुढे जातात.+

२८ पाल+ आपल्या पायांनी भिंतीला चिकटते,

आणि राजाच्या महालात जाते.

२९ असे तीन जीव आहेत, ज्यांची चाल रुबाबदार असते;

चार असे आहेत, जे ऐटीत चालतात:

३० प्राण्यांमध्ये सगळ्यात ताकदवान असलेला सिंह;

तो कोणालाही घाबरून माघार घेत नाही;+

३१ शिकारी कुत्रा, बकरा;

आणि आपल्या सैन्यापुढे चालणारा राजा.

३२ तू मूर्खपणा करून स्वतःची बढाई मारली असशील,+

किंवा असं करण्याचा विचार केला असशील,

तर आपल्या तोंडावर हात ठेव.+

३३ कारण जसं दूध घुसळल्याने लोणी

आणि नाक पिळल्याने रक्‍त निघतं,

तसंच राग भडकवल्याने भांडणं पेटतात.+

३१ लमुएल राजाचे शब्द; त्याला शिकवण्यासाठी त्याच्या आईने त्याला दिलेला महत्त्वाचा संदेश:+

 २ माझ्या मुला,

माझ्या पोटच्या, माझ्या नवसाच्या मुला,

मी तुला काय सांगू?+

 ३ तुझी शक्‍ती स्त्रियांवर खर्च करू नकोस,+

राजांचा ज्यांमुळे नाश होतो, अशा मार्गांनी जाऊ नकोस.+

 ४ हे लमुएल, द्राक्षारस पिणं हे राजांसाठी नाही;

राजांना ते शोभत नाही.

“माझा प्याला कुठे आहे?” असं शासकांनी म्हणणं योग्य नाही.+

 ५ नाहीतर प्यायल्यावर ते कायदा विसरतील

आणि गोरगरिबांचे हक्क नाकारतील.

 ६ जे मरायला टेकले आहेत त्यांना दारू द्या+

आणि जे दुःखात बुडाले आहेत त्यांना द्राक्षारस द्या.+

 ७ म्हणजे ते पितील आणि आपली गरिबी विसरतील,

आणि त्यांना त्यांच्या दुःखांची आठवण राहणार नाही.

 ८ मुक्यांच्या वतीने बोल;

जे मरायला टेकले आहेत, त्या सर्वांच्या हक्कांचं रक्षण कर.+

 ९ गोरगरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या हक्कांचं समर्थन कर*

त्यांच्या वतीने बोल आणि नीतिमत्त्वाने न्याय कर.+

א [आलेफ ]

१० सद्‌गुणी* बायको कोणाला मिळू शकते?+

ती पोवळ्यांहूनही* जास्त मौल्यवान असते.

ב [बेथ ]

११ तिच्या नवऱ्‍याचा तिच्यावर पूर्ण विश्‍वास असतो,

आणि त्याला कोणत्याही मौल्यवान गोष्टीची कमतरता भासत नाही.

ג [गिमेल ]

१२ ती आयुष्यभर त्याच्या भल्यासाठी झटते;

त्याचं वाईट करत नाही.

ד [दालेथ ]

१३ ती लोकर आणि मलमल मिळवते;

आपल्या हातांनी कष्ट करायला तिला मनापासून आवडतं.+

ה [हे ]

१४ ती व्यापाऱ्‍यांच्या जहाजांसारखी असते;+

ती दूरदूरच्या ठिकाणांहून अन्‍न आणते.

ו [वाव ]

१५ ती पहाट होण्याआधीच उठून

आपल्या कुटुंबाला अन्‍न देते

आणि आपल्या दासींनाही त्यांचे वाटे देते.+

ז [झाइन ]

१६ ती एखादं शेत नीट विचार करून खरेदी करते;

स्वतः मेहनत करून* ती द्राक्षमळा लावते.

ח [हेथ ]

१७ ती कष्ट करायला कंबर कसून तयार असते+

आणि आपले हात बळकट करते.

ט [तेथ ]

१८ आपल्या उद्योगातून फायदा होईल, याकडे ती लक्ष देते;

तिचा दिवा रात्रीही विझत नाही.

י [योद ]

१९ ती काठीवर लोकर घेते

आणि टकळीने* सूत कातते.+

כ [खाफ ]

२० हात पुढे करून ती दीनदुबळ्यांना मदत करते

आणि आपली मूठ उघडून गरिबांना दान देते.+

ל [लामेद ]

२१ हिवाळ्यात तिला आपल्या कुटुंबाची चिंता नसते,

कारण तिच्या घरच्या सर्वांकडे उबदार* कपडे असतात.

מ [मेम ]

२२ ती स्वतःसाठी चादरी बनवते.

तिचे कपडे मलमलीचे आणि गडद लाल रंगाच्या लोकरीचे असतात.

נ [नून ]

२३ शहराच्या फाटकात तिच्या नवऱ्‍याला सगळे लोक ओळखतात;+

तिथे तो देशाच्या वडीलजनांसोबत बसतो.

ס [सामेख ]

२४ ती मलमलीची वस्त्रं* बनवून विकते

आणि पट्टे तयार करून व्यापाऱ्‍यांना पुरवते.

ע [आयन ]

२५ ती धैर्यवान असते आणि लोक तिचा आदर करतात;

ती भविष्याकडे आत्मविश्‍वासाने पाहते.*

פ [पे ]

२६ तिच्या तोंडून बुद्धीच्या गोष्टी निघतात;+

तिच्या जिभेवर दयेचा नियम* असतो.

צ [सादे ]

२७ ती आपल्या घरच्या सगळ्या कामांवर लक्ष ठेवते;

ती आळशीपणाची भाकर खात नाही.+

ק [खुफ ]

२८ तिची मुलं उठून तिची स्तुती करतात;

तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करतो.

ר [रेश ]

२९ तशा तर बऱ्‍याच सद्‌गुणी* स्त्रिया आहेत,

पण तू​—तू त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेस.

ש [शिन ]

३० आकर्षण फसवं असू शकतं आणि सौंदर्य नाहीसं होऊ शकतं,*+

पण यहोवाची भीती बाळगणाऱ्‍या स्त्रीची स्तुती केली जाईल.+

ת [ताव ]

३१ तिच्या मेहनतीचं प्रतिफळ तिला द्या.+

तिच्या कामांमुळे शहराच्या फाटकांत तिची प्रशंसा होईल.+

इथे वापरलेल्या मूळ भाषेतल्या शब्दाचे बरेच अर्थ असू शकतात. संदर्भानुसार या शब्दाचं भाषांतर पुढीलप्रमाणे केलं जाऊ शकतं: शिक्षण, सल्ला, शिकवण, सुधारणूक, इशारा, ताडन, शिक्षा, वळण लावणं आणि लगाम लावणं.

शब्दशः “जाणण्यासाठी.”

किंवा “न्याय.”

किंवा “निःपक्षपातीपणा.”

किंवा “सुज्ञ.”

किंवा “गूढ वचन.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “यहोवाबद्दल श्रद्धा.”

किंवा “नियम.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “माझ्या ताडनाला प्रतिसाद द्या.”

शब्दशः “फळातून खातील.”

किंवा “कारस्थानांचं.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “परक्या.” हे नैतिक रित्या देवाशी संबंध तुटलेल्या व्यक्‍तीला सूचित करतं.

किंवा “मोहक शब्द.”

शब्दशः “विदेशी.” हे देवापासून नैतिक रित्या दूर गेलेल्या व्यक्‍तीला सूचित करतं.

शब्दशः “जवळच्या मित्राला.” किंवा “नवऱ्‍याला.”

शब्दशः “पायवाटा.”

शब्दशः “तिच्याकडे जाणारे.”

किंवा “जे खरेपणाने वागतात.”

किंवा “नियम.”

किंवा “सत्य.”

शब्दशः “टेकून.”

शब्दशः “बेंबीला.”

किंवा “मिळकतीतल्या.”

किंवा “सर्वात उत्तम भागाने.”

नीत १:२ इथली तळटीप पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

हे आधीच्या वचनांत उल्लेख केलेल्या देवाच्या गुणांना सूचित करतं.

किंवा “तुझ्या पायाला कधीच ठेच लागणार नाही.”

किंवा “ज्यांचं भलं करणं तुझं कर्तव्य आहे.”

किंवा “तुझ्या हातात असेल.”

नीत १:२ इथली तळटीप पाहा.

किंवा “नियम.”

किंवा “बुद्धीला.”

किंवा “मुख्य.”

नीत १:२ इथली तळटीप पाहा.

शब्दशः “तुझा कान वळव.”

किंवा कदाचित, “काळजीपूर्वक विचार कर.”

किंवा “तुझे सर्व मार्ग स्थिर असतील.”

किंवा “बुद्धीच्या.”

शब्दशः “तुझा कान वळव.”

शब्दशः “परक्या.” नीत २:१६ पाहा.

शब्दशः “टाळू.” किंवा “जीभ.”

एक कडू वनस्पती.

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “मुलांनो.”

किंवा “शक्‍ती.”

किंवा “अशक्‍त होत.”

शब्दशः “सभेत आणि मंडळीत.”

किंवा “पाण्याचा स्रोत.”

किंवा “धुंद.”

शब्दशः “परक्या.” नीत २:१६ पाहा.

शब्दशः “विदेशी.” नीत २:१६ पाहा.

किंवा “त्याच्या जिवाला.”

किंवा “नियम.”

किंवा “तुला शिकवतील.”

शब्दशः “विदेशी.” नीत २:१६ पाहा.

किंवा “माणसाजवळ भाकरीच्या तुकड्याशिवाय काही राहत नाही.”

किंवा “जीवन.”

किंवा “आपला जीव तृप्त करण्यासाठी.”

किंवा “आपल्या जिवावर.”

किंवा “खंडणी.”

किंवा “बुबुळाप्रमाणे.”

किंवा “नियमाचं.”

शब्दशः “परक्या.” नीत २:१६ पाहा.

किंवा “मोहक शब्द.”

शब्दशः “विदेशी.” नीत २:१६ पाहा.

किंवा “अनुभव नसलेल्या.”

किंवा “वेश्‍येचं वस्त्र.”

किंवा “मिसरची.”

गण २४:६ इथली तळटीप पाहा.

किंवा “बेड्यांत.”

शब्दशः “मुलांनो.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “अनुभव नसलेल्यांनो.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वडिलोपार्जित शिकवण.”

शब्दशः “वर्तुळ.”

शब्दशः “दृढ केलं.”

किंवा “नेमले.”

नीत १:२ इथली तळटीप पाहा.

किंवा “जो माणूस दररोज जागं राहून.”

किंवा “आपल्या जिवाचं.”

किंवा “मरणावर प्रेम करतात.”

किंवा “ज्यांना अनुभव नाही.”

म्हणजे, बुद्धी.

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “लोक नीतिमानाचं नाव घेतील.”

शब्दशः “आज्ञा.”

किंवा “मौल्यवान वस्तू.”

किंवा कदाचित, “तो जीवनाच्या मार्गावर आहे.”

किंवा “अफवा.”

किंवा “मार्गदर्शन.”

एक आंबट द्रव. इंग्रजीत विनेगर.

किंवा “त्याला पाठवणाऱ्‍याला.”

किंवा “अपेक्षा.”

किंवा “बुद्धीचं फळ उत्पन्‍न होतं.”

किंवा “फसव्या.”

किंवा “मौल्यवान वस्तूंचा.”

किंवा “देवाचा आदर न करणारा.”

किंवा “द्वेष करतो.”

शब्दशः “गोष्ट झाकतो.”

किंवा “सुज्ञ.”

किंवा “तारण.”

किंवा “जामीन राहतो.”

शब्दशः “घृणा वाटते.”

किंवा “गोड स्वभावाच्या.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्‍या.”

किंवा “तो आपल्या जिवाचं भलं करतो.”

किंवा “कलंक.”

शब्दशः “विखरणाऱ्‍याला.”

किंवा “कलंक.”

शब्दशः “त्याच्या वाट्याला वारा येईल.”

किंवा “तो बेअक्कल असतो.”

किंवा “लपून बसलेल्या मारेकऱ्‍यासारखे.” शब्दशः “रक्‍तासाठी टपून बसलेले असतात.”

किंवा “गुराढोरांच्या जिवाची.”

शब्दशः “दुष्टांची दया.”

किंवा “त्याच दिवशी.”

शब्दशः “झाकून टाकतो.”

किंवा “विश्‍वासूपणे.”

शब्दशः “जे नीतिमान आहे ते.”

शब्दशः “जे शांतीचे सल्लागार असतात.”

किंवा “निराश होतो.”

किंवा “थट्टा करणारा.”

किंवा “सुधारण्यासाठी दिलेल्या सल्ल्याकडे.”

किंवा “करणाऱ्‍याचा जीव.”

शब्दशः “आनंदी होतो.”

किंवा “जे एकमेकांशी चर्चा करतात.”

शब्दशः “हाताने गोळा करतो.”

किंवा “आशा.”

किंवा “शब्द.”

किंवा “नियम.”

किंवा “दुःखांनी भरलेली.”

किंवा “सुधारण्यासाठी दिलेला सल्ला.”

किंवा “त्या गरिबाचा नाश होऊ शकतो.”

किंवा “शिक्षण देत नाही; शिक्षा देत नाही.”

किंवा कदाचित, “वेळीच देतो.”

किंवा “वाकडे.”

किंवा कदाचित, “मूर्ख इतरांना फसवतात.”

किंवा “भरपाई करण्याला.”

किंवा “आपल्या जिवाचा खेद.”

किंवा “अनुभव नसलेला.”

किंवा “तापट.”

किंवा “अनुभव नसलेले.”

किंवा “जीवन.”

किंवा “प्रेमळपणे.”

किंवा “दुखावणाऱ्‍या.”

किंवा “आरोग्य देणारी जीभ.”

नीत १:२ इथली तळटीप पाहा.

किंवा “सुधारण्यासाठी दिलेला सल्ला.”

किंवा “मिळकतीमुळे.”

किंवा “कठोर.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “आपली चूक सुधारणाऱ्‍याचा.”

किंवा “मनात गोंधळ.”

शब्दशः “धष्टपुष्ट बैल.”

शब्दशः “भाजी.”

शब्दशः “आपल्या तोंडून निघालेल्या उत्तरामुळे.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “सीमा टिकवेल.”

किंवा “कलंक.”

किंवा “कसं उत्तर द्यावं यावर नीट विचार करतो; बोलण्याआधी मनन करतो.”

किंवा “आनंदी नजरेने पाहिल्यामुळे.”

शब्दशः “हाडं जाडी होतात.”

किंवा “जिवाला.”

शब्दशः “हृदय.”

किंवा “त्याचं उत्तर.” शब्दशः “जिभेचं उत्तर.”

शब्दशः “शुद्धच.”

किंवा “देवाने प्रेरित केलेला.”

किंवा “चुकवतो.”

शब्दशः “चांगलं.”

किंवा “इतरांना आवडेल असं बोलतो.” शब्दशः “ओठांचा गोडवा.”

किंवा “चवीला.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “जीव.”

शब्दशः “तोंड.”

किंवा “सौंदर्याच्या.”

शब्दशः “मांडीवर चिठ्ठ्या टाकतात.”

शब्दशः “बलिदानं.”

किंवा “शांतता.”

किंवा “नातू.”

किंवा “पालकांमुळे; आईवडिलांमुळे.”

किंवा “चांगलं.”

किंवा “प्रतिष्ठित माणसाला.”

शब्दशः “झाकतो.”

शब्दशः “पाणी बाहेर सोडण्यासारखं.”

किंवा “जामीन राहतो.”

किंवा “आरोग्यासाठी चांगलं आहे.”

किंवा “हाडं सुकतात.”

किंवा “नीतिमानाकडून दंड घेणं.”

किंवा “तुच्छ लेखतो.”

किंवा “हावरटपणे गिळल्या जाणाऱ्‍या गोष्टी.”

शब्दशः “उंचावला जातो,” म्हणजे तो हाती लागणार नाही अशा ठिकाणी, सुरक्षित असतो.

किंवा “घोर निराशेचा.”

किंवा “झडती घेतो.”

शब्दशः “वेगळं करतो.”

शब्दशः “तोंडाने.”

शब्दशः “तिच्यावर प्रेम करणारा तिचं फळ खाईल.”

शब्दशः “घाईघाईने पावलं टाकतो.”

किंवा “उदार.”

किंवा “आपल्या जिवावर.”

किंवा “चुकीकडे.”

किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहाच्या.”

किंवा “कटकटी.”

किंवा “प्रतिफळ देईल.”

किंवा “मृत्यूची इच्छा बाळगू नकोस.”

नीत १:२ इथली तळटीप पाहा.

किंवा “संकल्प.”

किंवा “दरारा.”

किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहाच्या.”

किंवा कदाचित, “तो कापणीच्या वेळी शोधेल पण त्याला काही सापडणार नाही.”

किंवा “हेतू.” शब्दशः “इच्छा.”

किंवा “चाळतो.”

किंवा “दोन वेगवेगळी दगडी वजनं आणि दोन वेगवेगळी मापं.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “विदेशी माणसाचं.”

किंवा “सल्ला घेतल्याने.”

किंवा “सुज्ञ.”

किंवा “जो ओठांनी भुरळ पाडतो.”

किंवा “दोन वेगवेगळ्या दगडी वजनांची.”

किंवा “स्वतःचा मार्ग.”

किंवा “खरवडून निघतो.”

किंवा “हेतूंचं.”

किंवा “फायद्याच्या ठरतात.”

किंवा कदाचित, “मरणाची आस बाळगणाऱ्‍यांसाठी नाहीशा होणाऱ्‍या धुक्यासारखी असते.”

किंवा “कटकट्या.”

किंवा “दुष्ट माणसाचा जीव.”

किंवा “काय करायचं हे त्याला माहीत असतं.”

किंवा “चैन.”

शब्दशः “गिळून.”

किंवा “विजय मिळवतो.”

किंवा “निर्लज्जपणे वागून.”

शब्दशः “कायम बोलत राहील.”

किंवा “नावलौकिक.” शब्दशः “नाव.”

शब्दशः “कृपा.”

शब्दशः “एकत्र भेटतात.”

किंवा “दंड.”

किंवा “लहान मुलाला; तरुणाला.”

शब्दशः “क्रोधाची काठी.”

किंवा “खटले.”

शब्दशः “परक्या.” नीत २:१६ पाहा.

किंवा “लहान मुलाच्या; तरुणाच्या.”

नीत १:२ इथली तळटीप पाहा.

किंवा “तुझा जीव पाशात सापडेल.”

किंवा “स्वतःला आवर.”

किंवा कदाचित, “स्वतःच्या समजशक्‍तीवर अवलंबून राहायचं सोड.”

शब्दशः “त्याचं हृदय तुझ्यासोबत नसतं.”

किंवा “वडील नसलेल्या मुलाचं.”

शब्दशः “सोडवणारा.”

किंवा “लहान मुलाला; तरुणाला.”

किंवा “त्याच्या जिवाला.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मिळव.”

शब्दशः “विदेशी.” नीत २:१६ पाहा.

किंवा “चाखण्यासाठी जमतात.”

किंवा “जहाजाच्या शिडाच्या काठीच्या.”

किंवा “मला वेदना जाणवल्या नाहीत.”

किंवा “कुटुंब.”

किंवा “सुज्ञ.”

किंवा “यश; तारण.”

किंवा “मूर्खाच्या.”

किंवा “संकटाच्या काळात.”

किंवा “हेतूंचं.”

किंवा “तुमच्या जिवावर.”

किंवा “तुझ्या जिवासाठी गोड आहे.”

किंवा “संतापू.”

किंवा “बदल घडवू पाहणाऱ्‍यांची.”

म्हणजे, यहोवा आणि राजा.

शब्दशः “ओठांचं चुंबन घेतील.” किंवा कदाचित, “सरळ उत्तर देणं चुंबन घेण्यासारखं आहे.”

किंवा “कुटुंब.”

किंवा “नक्कल करून एकत्र केलेली.”

किंवा “पण इतरांची गुपितं.”

किंवा “बदनामी करण्यासाठी उठवलेली अफवा.”

किंवा “मालकाच्या जिवाला.”

शब्दशः “खोटेपणाच्या भेटवस्तूबद्दल.”

किंवा “सौम्य.”

किंवा कदाचित, “धोकेबाज.”

किंवा “क्षार.” इथे दिलेला हिब्रू शब्द सोडा या रसायनाला सूचित करतो.

एक आंबट द्रव. इंग्रजीत विनेगर.

शब्दशः “तुझा द्वेष करणारा.”

म्हणजे, त्या व्यक्‍तीची कठोर वृत्ती सौम्य करणं.

किंवा “कटकट्या.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “हार मानणारा; हातमिळवणी करणारा.” शब्दशः “दुष्टासमोर लटपटणारा.”

किंवा कदाचित, “विनाकारण दिलेला शाप खरा ठरत नाही.”

किंवा “नाहीतर तूही त्याच्या पातळीवर येशील.”

शब्दशः “हिंसा पिणाऱ्‍या.”

किंवा “नीतिवचन.”

किंवा “लटकणाऱ्‍या.”

किंवा “नीतिवचन.”

किंवा “बुद्धिमान.”

किंवा कदाचित, “नाक खुपसतो.”

किंवा “हावरटपणे गिळल्या जाणाऱ्‍या गोष्टी.”

शब्दशः “उत्सुक ओठ.”

किंवा “कारण त्याचं मन पूर्णपणे घृणास्पद आहे.”

शब्दशः “काय जन्माला आणेल.”

शब्दशः “अनोळखी माणसाने.”

शब्दशः “विदेश्‍याच्या.”

किंवा “हेव्यापुढे.”

किंवा कदाचित, “मनात कपट ठेवून; फक्‍त दाखवण्यासाठी.”

शब्दशः “पायाखाली तुडवतो.”

किंवा “मनापासून दिलेल्या.”

किंवा “बुद्धिमानपणे.”

किंवा “दंड.”

किंवा “विदेशी माणसाचं.”

किंवा “कटकटी.”

किंवा “धारदार करतो.” शब्दशः “मित्राच्या चेहऱ्‍याला.”

किंवा “मन लाव; लक्ष दे.”

किंवा “तरुण सिंहासारखे.”

किंवा “बंडामुळे.”

शब्दशः “तो.”

किंवा “देवाचं नियमशास्त्र.”

किंवा “देवाचं नियमशास्त्र.”

किंवा “देवाचं नियमशास्त्र.”

किंवा “देवाच्या नियमशास्त्राकडे.”

किंवा “नेहमी भीती बाळगणारा.”

शब्दशः “आपलं हृदय कठोर करतो.”

किंवा “कबरेपर्यंत.”

किंवा “लोभी.”

किंवा कदाचित, “अहंकारी जीव.”

किंवा “कायदेशीर हक्कांची.”

किंवा “निरपराध.”

किंवा कदाचित, “पण सरळ मनाचा माणूस आपल्या जिवाचं रक्षण करू पाहतो.”

शब्दशः “एकत्र भेटतात.”

म्हणजे, तो त्यांना जीवन देतो.

किंवा “शिस्त; शिक्षा.”

किंवा “तुझा जीव खूप सुखी होईल.”

शब्दशः “दृष्टान्त.” किंवा “भविष्याबद्दलचा दृष्टान्त; प्रकटीकरण.”

किंवा “देवाचं नियमशास्त्र.”

किंवा “स्वतःच्या जिवाचा.”

किंवा “शाप येण्याबद्दलची शपथ.”

किंवा “माणसांपुढे थरथर कापणं.”

किंवा कदाचित, “मर्जी मिळवण्याची.”

शब्दशः “उंचावल्या.”

किंवा “नावावर हल्ला करणार नाही.”

किंवा “लोकांचा एक गट.”

किंवा “लोकांचा एक गट.”

शब्दशः “मल.”

किंवा “लोकांचा एक गट.”

किंवा “लोकांचा एक गट.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “ज्यांचं मला खूप आश्‍चर्य वाटतं.”

किंवा “जिच्यावर कोणीही प्रेम करत नाही अशा.”

किंवा “खूप बुद्धिमान.”

खडकांमध्ये राहणारा सशासारखा एक प्राणी.

किंवा “न्याय मिळवून दे.”

किंवा “चांगली.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “स्वतःच्या मिळकतीने.” शब्दशः “आपल्या हातांच्या फळातून.”

धागा आणि सूत तयार करायचं साधन.

शब्दशः “दुप्पट.”

किंवा “अंतर्वस्त्रं.”

किंवा “भविष्यातल्या दिवसावर हसते.”

किंवा “प्रेमळ शिकवण; एकनिष्ठ प्रेमाचा नियम.”

किंवा “चांगल्या.”

किंवा “पोकळ असू शकतं.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा