वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt स्तोत्र १:१-१५०:६
  • स्तोत्रं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्तोत्रं
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्रं

स्तोत्रं

पहिलं पुस्तक

(स्तोत्रं १-४१)

१ सुखी आहे तो माणूस, जो दुष्टांच्या सल्ल्याप्रमाणे वागत नाही;

पापी लोकांच्या मार्गात उभा राहत नाही,+

आणि निंदा करणाऱ्‍यांसोबत बसत नाही!+

 २ तर तो यहोवाच्या* नियमशास्त्रावर मनापासून प्रेम करतो,+

आणि रात्रंदिवस त्याच्यावर विचार करतो.*+

 ३ तो वाहत्या पाण्याजवळ लावलेल्या अशा झाडासारखा होईल,

जे आपल्या ऋतूमध्ये फळ देतं,

आणि ज्याची पानं कोमेजत नाहीत.

तो जे काही करतो त्यात त्याला यश मिळतं.+

 ४ पण, दुष्टांचं तसं नाही;

ते वाऱ्‍याने उडून जाणाऱ्‍या भुशासारखे असतात.

 ५ म्हणून, न्यायाच्या वेळी दुष्ट टिकू शकणार नाहीत;+

आणि पापी लोक नीतिमान लोकांमध्ये उभे राहू शकणार नाहीत.+

 ६ कारण नीतिमान माणसांचे मार्ग यहोवाला माहीत असतात,+

पण दुष्टांचा आणि त्यांच्या मार्गांचा अंत होईल.+

२ राष्ट्रं अशी का खवळली आहेत?

लोक एका व्यर्थ गोष्टीबद्दल का पुटपुटत आहेत?*+

 २ पृथ्वीवरचे राजे यहोवाच्या आणि त्याच्या अभिषिक्‍ताच्या*+ विरोधात उभे राहतात;

शासक त्यांच्याविरुद्ध एकत्र येतात.*+

 ३ ते म्हणतात: “आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू,

त्यांची बंधनं काढून फेकू!”

 ४ स्वर्गात राजासनावर बसलेला त्यांना हसेल;

यहोवा त्यांची थट्टा करेल.

 ५ त्या वेळी तो रागाने त्यांच्याशी बोलेल;

तो आपल्या भयानक क्रोधाने त्यांना घाबरवून सोडेल.

 ६ तो म्हणेल: “मी माझ्या पवित्र पर्वतावर, सीयोनवर+

माझ्या निवडलेल्या राजाला राजासनावर बसवलंय.”+

 ७ यहोवाचं हे फर्मान ऐका!

तो मला म्हणाला: “तू माझा मुलगा आहेस;+

आज मी तुझा पिता बनलोय.+

 ८ माझ्याकडे माग, म्हणजे मी सर्व राष्ट्रं तुला वारसा म्हणून देईन

आणि सबंध पृथ्वीची मालकी तुला देईन.+

 ९ तू लोखंडाच्या राजदंडाने त्यांचे तुकडेतुकडे करशील,+

मातीचं मडकं फोडावं, तसा त्यांचा चुराडा करशील.”+

१० म्हणून राजांनो, आता तरी शहाणे व्हा;*

पृथ्वीच्या न्यायाधीशांनो, दिलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष द्या.*

११ यहोवाचं भय मानून त्याची सेवा करा,

आनंदाने त्याच्याबद्दल आदर बाळगा.

१२ देवाच्या मुलाचा सन्मान करा,*+ नाहीतर देव* संतापेल

आणि तुमचा नाश होईल,+

कारण देवाचा क्रोध लगेच भडकतो.

त्याचा आश्रय घेणारे सुखी आहेत.

दावीदचं गीत. हे गीत त्याने आपला मुलगा अबशालोम याच्यापासून पळून जात असताना रचलं.+

३ हे यहोवा, माझे शत्रू इतके का वाढले आहेत?+

इतके जण माझ्याविरुद्ध का उठले आहेत?+

 २ बरेच जण माझ्याबद्दल* म्हणतात,

“देव त्याला वाचवणार नाही.”+ (सेला )*

 ३ पण हे यहोवा, तू माझ्याभोवती ढालीसारखा आहेस,+

तू माझं वैभव,+ माझी मान वर करणारा आहेस.+

 ४ मी यहोवाला मोठ्याने हाक मारीन,

तेव्हा तो त्याच्या पवित्र पर्वतावरून मला उत्तर देईल.+ (सेला )

 ५ मी स्वस्थपणे पडून शांत झोप घेईन,

रात्र सुखरूपपणे घालवून जागा होईन,

कारण यहोवा सतत मला सांभाळतो.+

 ६ हजारो लोकांनी मला चारही बाजूंनी घेरलं,

तरी मी घाबरणार नाही.+

 ७ हे यहोवा, ऊठ! हे माझ्या देवा, मला वाचव!+

तू माझ्या सगळ्या शत्रूंचा जबडा फोडशील,

तू दुष्टांचे दात पाडशील.+

 ८ हे यहोवा, तारण करणारा* तूच आहेस!+

तुझा आशीर्वाद तुझ्या लोकांवर आहे. (सेला )

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. हे गीत तंतुवाद्यांसोबत गायलं जावं.

४ हे माझ्या नीतिमान देवा,+ मी हाक मारीन तेव्हा मला ओ दे.

संकटातून सुटण्याचा मार्ग मला दाखव.*

माझ्यावर कृपा कर आणि माझी प्रार्थना ऐक.

 २ अहो लोकांनो, तुम्ही कुठपर्यंत गौरवाऐवजी माझा अपमान करत राहाल?

तुम्ही कुठवर निरर्थक गोष्टींवर प्रेम कराल आणि बनावट गोष्टींच्या मागे लागाल? (सेला )

 ३ यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकावर विशेष कृपा करेल* हे लक्षात ठेवा;

मी यहोवाला हाक मारीन तेव्हा तो माझं ऐकेल.

 ४ तुम्हाला राग आला, तरी पाप करू नका.+

बिछान्यावर पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा आणि शांत राहा. (सेला )

 ५ चांगल्या मनाने* बलिदानं अर्पण करा

आणि यहोवावर भरवसा ठेवा.+

 ६ कित्येक लोक म्हणतात, “आम्हाला चांगले दिवस कोण दाखवेल?”

हे यहोवा, तुझ्या चेहऱ्‍याचा प्रकाश आमच्यावर चमकू दे.+

 ७ ज्यांच्याकडे धान्याची आणि नव्या द्राक्षारसाची रेलचेल आहे,

त्यांच्यापेक्षा जास्त आनंद तू माझ्या मनाला दिला आहेस.

 ८ मी स्वस्थपणे पडून शांत झोप घेईन,+

कारण हे यहोवा, फक्‍त तूच मला सुरक्षित ठेवतोस.+

दावीदचं गीत. नेहिलोथसाठी* संचालकाला सूचना.

५ हे यहोवा, माझे शब्द ऐक.+

माझे उसासे लक्ष देऊन ऐक.

 २ हे माझ्या राजा, माझ्या देवा! माझ्या याचनेकडे लक्ष दे,

कारण मी तुला विनवणी करतोय.

 ३ हे यहोवा, तू सकाळी माझी हाक ऐकशील;+

सकाळी मी माझी चिंता तुला सांगीन+ आणि आतुरतेने वाट पाहीन.

 ४ कारण तू दुष्टता पाहून आनंदी होणारा देव नाहीस;+

वाईट गोष्टी करणारा कोणीही तुझ्याजवळ राहू शकत नाही.+

 ५ गर्विष्ठ माणूस तुझ्यापुढे उभा राहू शकणार नाही.

दुष्टपणे वागणाऱ्‍या सर्वांचा तू द्वेष करतोस.+

 ६ खोटं बोलणाऱ्‍यांचा तू नाश करशील.+

हिंसक आणि कपटी लोकांची* यहोवाला घृणा वाटते.+

 ७ मी तर तुझ्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे+ तुझ्या मंदिरात येईन;+

आदरपूर्ण भीतीने मी तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन.+

 ८ हे यहोवा, माझ्या शत्रूंनी मला घेरलंय;

म्हणून, मला तुझ्या नीतिमान मार्गांवर चालव.

तुझा मार्ग माझ्यासाठी मोकळा कर.+

 ९ कारण त्यांचा एकही शब्द भरवशालायक नाही;

त्यांच्या मनात फक्‍त कपट भरलंय;

त्यांचं तोंड म्हणजे उघडी कबर!

ते आपल्या जिभेने खोटी स्तुती करत राहतात.*+

१० पण देव त्यांना दोषी ठरवेल;

ते स्वतःच्याच कारस्थानांमुळे अडखळून पडतील.+

त्यांच्या अनेक अपराधांमुळे त्यांना हाकलून लाव,

कारण त्यांनी तुझ्याविरुद्ध बंड केलंय.

११ पण तुझा आश्रय घेणारे सर्व आनंदी होतील;+

ते सतत जल्लोष करतील.

तू त्यांच्या वैऱ्‍यांना त्यांच्याजवळ येऊ देणार नाहीस;

तुझ्या नावावर प्रेम करणारे तुझ्यामुळे हर्षित होतील.

१२ कारण हे यहोवा, तू नीतिमान लोकांना आशीर्वाद देशील;

तुझ्या कृपेची मोठी ढाल त्यांचं संरक्षण करेल.+

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. हे गीत शमीनीथ* या सुरावर तंतुवाद्यांसोबत गायलं जावं.

६ हे यहोवा, रागाच्या भरात माझं ताडन करू नकोस,

क्रोधाने मला शिक्षा करू नकोस.+

 २ हे यहोवा, माझ्यावर कृपा* कर, कारण मी दुर्बळ होत चाललोय.

हे यहोवा, मला बरं कर,+ कारण माझी हाडं खिळखिळी झाली आहेत.

 ३ मी* खरंच खूप अस्वस्थ झालोय.+

हे यहोवा, मला सांग, मी अजून किती वाट पाहू?+

 ४ हे यहोवा, परत ये आणि माझी* सुटका कर;+

तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे मला वाचव.+

 ५ कारण मृत लोक तुझा उल्लेख* करत नाहीत;

कबरेत* कोण तुझी स्तुती करेल?+

 ६ मी कण्हून कण्हून थकलोय;+

रात्रभर माझा बिछाना अश्रूंनी ओलाचिंब होतो;

माझ्या पलंगावर आसवांचा पूर येतो.+

 ७ शोकाने माझे डोळे थकले आहेत;+

छळ करणाऱ्‍यांमुळे माझी दृष्टी अंधूक झाली आहे.

 ८ दुष्टपणे वागणाऱ्‍यांनो, तुम्ही सगळे माझ्यापासून दूर व्हा,

कारण यहोवा माझ्या रडण्याचा आवाज नक्की ऐकेल.+

 ९ यहोवा माझी कृपेची याचना ऐकेल;+

यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल.

१० माझे सर्व शत्रू लज्जित आणि भयभीत होतील;

एकाएकी झालेल्या अपमानामुळे* ते माघार घेतील.+

दावीदचं शोकगीत. बन्यामीन वंशातला कूश दावीदला जे बोलला,

त्यामुळे त्याने यहोवाला उद्देशून हे गीत गायलं.

७ हे यहोवा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय घेतलाय.+

माझा छळ करणाऱ्‍या सर्वांपासून मला वाचव आणि माझी सुटका कर.+

 २ नाहीतर, सिंह फाडतो तसे ते मला फाडून माझे तुकडेतुकडे करतील,+

ते मला उचलून नेतील आणि मला सोडवणारा कोणीच नसेल.

 ३ हे यहोवा, माझ्या देवा, जर या बाबतीत मी दोषी असेन,

जर मी अन्यायीपणे वागलो असेन,

 ४ जर माझं भलं करणाऱ्‍याचं मी नुकसान केलं असेल,+

किंवा कारण नसताना माझ्या शत्रूला लुटलं असेल,*

 ५ तर शत्रूने माझा पाठलाग करून मला गाठावं;

त्याने मला पायाखाली तुडवावं

आणि माझं वैभव धुळीला मिळवावं. (सेला )

 ६ हे यहोवा, क्रोधित होऊन ऊठ;

माझ्या संतापलेल्या वैऱ्‍यांविरुद्ध उभा राहा;+

माझ्यासाठी जागा हो आणि न्याय व्हावा असा हुकूम कर.+

 ७ राष्ट्रांना तुझ्याभोवती एकत्र होऊ दे

आणि उच्च स्थानावरून त्यांच्याविरुद्ध कारवाई कर.

 ८ यहोवा लोकांबद्दल आपला निर्णय सुनावेल.+

हे यहोवा, माझं नीतिमत्त्व

आणि माझा खरेपणा+ पाहून माझा न्याय कर.

 ९ कृपा करून दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत कर;

पण, नीतिमानांचा मार्ग भक्कम कर.+

कारण तू हृदयांचं+ आणि मनातल्या खोल भावनांचं*+ परीक्षण करणारा नीतिमान देव आहेस.+

१० देव माझी ढाल आहे;+ तो सरळ मनाच्या लोकांचं तारण करणारा आहे.+

११ देव नीतिमान न्यायाधीश आहे,+

तो दररोज आपले न्यायदंड घोषित करतो.

१२ जर एखाद्याने पश्‍चात्ताप केला नाही,+ तर देव आपल्या तलवारीला धार लावतो;+

तो आपलं धनुष्य ताणून सज्ज करतो.+

१३ तो आपली घातक शस्त्रं तयार करतो

आणि आपले जळते बाण सज्ज करतो.+

१४ पोटात दुष्टतेचं बीज असणाऱ्‍याकडे पाहा;

तो संकटाचा गर्भ वाढवतो आणि लबाडीला जन्म देतो.+

१५ तो खड्डा खोदतो; अगदी खोलपर्यंत खणत जातो.

पण त्याने खोदलेल्या खड्ड्यात तो स्वतःच पडतो.+

१६ त्याने आणलेलं संकट त्याच्यावरच उलटेल;+

त्याचा अत्याचार त्याच्याच माथी येईल.

१७ मी यहोवाच्या न्यायाबद्दल त्याची प्रशंसा करीन;+

सर्वोच्च देव यहोवा+ याच्या नावाची स्तुती गाईन.*+

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. गित्तीथ* याच्या चालीवर गायलं जावं.

८ हे यहोवा, आमच्या प्रभू, सबंध पृथ्वीवर तुझं नाव किती महान आहे!

तू आपलं वैभव आकाशापेक्षाही उंच केलं आहेस!*+

 २ तुझा विरोध करणाऱ्‍यांमुळे,

तू लहान मुलांच्या आणि तान्ह्या बाळांच्या तोंडून+ सामर्थ्य प्रकट केलं आहेस.

तू शत्रूचा आणि सूड घेणाऱ्‍याचा आवाज बंद केला आहेस.

 ३ तू आपल्या हातांनी निर्माण केलेलं आकाश*

आणि तू घडवलेले चंद्र-तारे+ जेव्हा मी पाहतो,

तेव्हा माझ्या मनात विचार येतो,

 ४ नाशवंत माणूस काय आहे, की तू त्याला आठवणीत ठेवावं?

आणि मानव काय आहे, की तू त्याची काळजी घ्यावी?+

 ५ तू त्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी बनवलंस;

तू त्याला गौरवाचा आणि वैभवाचा मुकुट घातलास.

 ६ तुझ्या हातांच्या कार्यांवर तू त्याला अधिकार दिलास;+

तू सर्व गोष्टी त्याच्या पायांखाली ठेवल्या.*

 ७ मेंढरांचे व गुरांचे कळप,

आणि सर्व जंगली पशू;*+

 ८ आकाशातले पक्षी व समुद्रातले मासे,

तसंच, समुद्रात फिरणारे सर्व जीव!

 ९ हे यहोवा, आमच्या प्रभू, सबंध पृथ्वीवर तुझं नाव किती महान आहे!

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. मथ-लाबेन* याच्या चालीवर गायलं जावं.

א [आलेफ ]

९ हे यहोवा, मी अगदी पूर्ण मनाने तुझी स्तुती करीन;

तू केलेल्या अद्‌भुत गोष्टींचं मी वर्णन करीन.+

 २ मी तुझ्यामुळे आनंद करीन आणि हर्षित होईन;

हे सर्वोच्च देवा, मी तुझ्या नावाची स्तुती गाईन.*+

ב [बेथ ]

 ३ माझे शत्रू माघार घेतील;+

ते अडखळून पडतील आणि तुझ्यासमोरून नष्ट होतील.

 ४ कारण तू माझ्या हक्काचं समर्थन करतोस;

तू आपल्या राजासनावर बसून नीतीने न्याय करतोस.+

ג [गिमेल ]

 ५ तू राष्ट्रांना शिक्षा केली आहेस;+ तू दुष्टांचा नाश केला आहेस.

तू सदासर्वकाळासाठी त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकलं आहेस.

 ६ शत्रूंचा कायमचा नाश झालाय;

तू त्यांची शहरं उद्ध्‌वस्त केली आहेस,

त्यांची आठवणही कोणाला राहणार नाही.+

ה [हे ]

 ७ पण यहोवा राजासनावर बसून सर्वकाळासाठी राज्य करेल;+

त्याने न्यायासाठी आपलं राजासन स्थिर केलंय.+

 ८ तो सबंध पृथ्वीचा* नीतीने न्याय करेल;+

तो नीतीने राष्ट्रांचा न्यायनिवाडा करेल;+

ו [वाव ]

 ९ अत्याचार सोसणाऱ्‍यांसाठी यहोवा सुरक्षित आश्रय* होईल,+

संकटाच्या वेळी तो त्यांचा सुरक्षित आश्रय ठरेल.+

१० तुझं नाव जाणणारे तुझ्यावर भरवसा ठेवतील;+

हे यहोवा, तुझा शोध घेणाऱ्‍यांना तू कधीही त्यागणार नाहीस.+

ז [झाइन ]

११ सीयोनमध्ये राहणाऱ्‍या यहोवाची स्तुती गा;

त्याच्या कार्यांबद्दल सर्व लोकांना सांगा.+

१२ तो दुःखीकष्टी लोकांचा आक्रोश विसरणार नाही.+

त्यांच्या रक्‍ताचा सूड घेणारा देव त्यांची आठवण ठेवतो.+

ח [हेथ ]

१३ हे यहोवा, मरणाच्या दारातून मला परत आणणाऱ्‍या देवा,+

माझ्यावर कृपा कर; माझा द्वेष करणारे मला कसे छळतात ते पाहा.

१४ म्हणजे मी सीयोनच्या मुलीच्या फाटकांजवळ, तुझी प्रशंसनीय कार्यं घोषित करीन;+

तू केलेल्या तारणाच्या कृत्यांबद्दल मी आनंद करीन.+

ט [तेथ ]

१५ राष्ट्रांनी खोदलेल्या खड्ड्यात, ती स्वतःच पडली आहेत;

त्यांनी लपवलेल्या जाळ्यात, त्यांचाच पाय अडकलाय.+

१६ यहोवाला त्याच्या न्यायदंडावरून ओळखलं जातं.+

दुष्ट स्वतःच्याच कृत्यांच्या पाशात सापडलाय.+

हिग्गायोन.* (सेला )

י [योद ]

१७ दुष्ट लोक आणि देवाला विसरणारी राष्ट्रं

परत कबरेकडे* जातील.

१८ पण गरिबांकडे कायम दुर्लक्ष केलं जाणार नाही;+

दीनदुबळ्यांची आशा कधीच नाहीशी होणार नाही.+

כ [खाफ ]

१९ हे यहोवा, ऊठ! नाशवंत माणसाचा विजय होऊ देऊ नकोस.

राष्ट्रांचा तुझ्यादेखत न्याय होऊ दे.+

२० हे यहोवा, त्यांना घाबरवून सोड.+

राष्ट्रांना कळू दे, की ते केवळ मानव आहेत. (सेला )

ל [लामेद ]

१० हे यहोवा, तू असा दूर का उभा राहतोस?

संकटं येतात तेव्हा तू आमच्यापासून का लपतोस?+

 २ दुष्ट गर्विष्ठपणे असाहाय्य माणसाचा पाठलाग करतो,+

पण त्याने रचलेल्या कटकारस्थानांमध्ये तो स्वतःच अडकेल.+

 ३ दुष्ट आपल्या स्वार्थी इच्छांबद्दल फुशारक्या मारतो+

आणि लोभी माणसाला आशीर्वाद देतो;*

נ [नून ]

तो यहोवाचा अनादर करतो.

 ४ दुष्ट आपल्या गर्वामुळे देवाचा शोध घेत नाही;

“देवच नाही,” अशी त्याला खातरी आहे.+

 ५ तो जे काही करतो त्यात त्याची भरभराट होते,+

पण तुझे नियम त्याच्या समजण्यापलीकडे आहेत.+

तो आपल्या सर्व विरोधकांना तुच्छ लेखतो.

 ६ तो आपल्या मनात म्हणतो: “मी कधीच पडणार नाही;*

पिढ्या न्‌ पिढ्या, मला कधीच संकट पाहावं लागणार नाही.”+

פ [पे ]

 ७ त्याच्या तोंडात कायम शिव्याशाप, लबाड्या आणि धमक्या असतात;+

छळाच्या आणि नाशाच्या गोष्टी त्याच्या जिभेवर असतात.+

 ८ तो वस्त्यांजवळ टपून बसलेला असतो;

लपण्याच्या ठिकाणातून बाहेर येऊन, तो निर्दोष माणसाची हत्या करतो.+

ע [आयन ]

त्याचे डोळे लाचार माणसाची शिकार करण्यासाठी वाट पाहत असतात.+

 ९ सिंह आपल्या गुहेत* असतो, तसा दुष्ट आपल्या लपण्याच्या ठिकाणी टपलेला असतो.+

असाहाय्य माणसाला धरण्यासाठी तो टपून बसतो.

तो जाळं ओढून बंद करतो आणि असाहाय्य माणसाला त्यात धरतो.+

१० लाचार चिरडला जातो आणि त्याला धुळीला मिळवलं जातं;

असाहाय्य माणसं त्याच्या तावडीत* सापडतात.

११ तो मनात म्हणतो: “देव विसरलाय.+

त्याने आपलं तोंड फिरवलंय.

तो लक्षच देत नाही.”+

ק [खुफ ]

१२ हे यहोवा, ऊठ.+ हे देवा, आपलं सामर्थ्य दाखव!+

असाहाय्य माणसांना विसरू नकोस.+

१३ दुष्ट माणूस देवाचा अनादर का करतो?

तो मनात म्हणतो: “देव माझ्याकडून हिशोब मागणार नाही.”

ר [रेश ]

१४ पण तुला संकटं आणि विपत्ती नक्की दिसतात.

त्यांना पाहून तू पाऊल उचलतोस.+

लाचार लोक तुझ्याकडे येतात;+

तू अनाथाला* मदत करतोस.+

ש [शिन ]

१५ दुष्ट आणि वाईट माणसाचा हात मोडून टाक,+

म्हणजे जेव्हा तू त्याची दुष्टता शोधशील,

तेव्हा तुला ती सापडणार नाही.

१६ यहोवा सदासर्वकाळाचा राजा आहे.+

दुष्ट राष्ट्रांचा पृथ्वीवरून नाश झाला आहे.+

ת [ताव ]

१७ पण हे यहोवा, तू नम्र लोकांची विनंती ऐकशील.+

तू त्यांचं मन स्थिर करशील+ आणि त्यांच्याकडे लक्ष देशील.+

१८ तू अनाथांना आणि चिरडलेल्यांना न्याय देशील,+

म्हणजे यापुढे पृथ्वीवरचा तुच्छ मानव त्यांना घाबरवू शकणार नाही.+

दावीदचं गीत. संचालकासाठी.

११ मी यहोवाचा आश्रय घेतलाय.+

तर मग, तुम्ही मला कसं म्हणू शकता:

“पक्ष्याप्रमाणे आपल्या पर्वतावर उडून जा!

 २ सरळ मनाच्या लोकांना मारण्यासाठी,

दुष्ट अंधारात कसं आपलं धनुष्य वाकवतात

आणि आपला बाण ताणतात, ते पाहा.

 ३ जर पायाच* ढासळला असेल,

तर नीतिमानांनी काय करावं?”

 ४ यहोवा त्याच्या पवित्र मंदिरात आहे.+

यहोवाचं राजासन स्वर्गात आहे.+

त्याचे डोळे मानवांना पाहतात; त्याचे तेजस्वी डोळे* त्यांचं परीक्षण करतात.+

 ५ यहोवा नीतिमानासोबतच दुष्टाचंही परीक्षण करतो;+

हिंसाचाराची आवड असलेल्यांचा तो द्वेष करतो.+

 ६ तो दुष्टांवर संकटांचा* वर्षाव करेल;

त्यांच्या प्याल्यात आग, गंधक+ आणि होरपळणारा* वारा असेल.

 ७ कारण यहोवा नीतिमान आहे;+ त्याला नीतिमान कार्यं आवडतात.+

सरळ मनाच्या लोकांवर त्याची कृपा होईल.*+

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. शमीनीथ* या सुरावर गायलं जावं.

१२ हे यहोवा, मला वाचव, कारण एकनिष्ठ माणसांपैकी एकही उरला नाही;

प्रामाणिक लोक नाहीसे झाले आहेत.

 २ माणसं एकमेकांशी खोटं बोलतात;

ते आपल्या ओठांनी खोटी स्तुती करतात आणि कपटी* मनाने बोलतात.+

 ३ खोटी स्तुती करणारे ओठ;

आणि फुशारक्या मारणारी जीभ+ यहोवा कापून टाकेल.

 ४ ते म्हणतात: “आम्ही आमच्या जिभेने विजय मिळवू.

आम्ही आपल्या ओठांनी वाटेल ते बोलू;

आम्हाला हुकूम देणारा कोण?”+

 ५ “दीनदुबळ्यांवर जुलूम होत आहेत;

गोरगरीब उसासे टाकत आहेत;+

म्हणून, मी उठून कारवाई करीन.

त्यांना तुच्छ लेखणाऱ्‍यांपासून, मी त्यांचा बचाव करीन,” असं यहोवा म्हणतो.

 ६ यहोवाचे शब्द शुद्ध आहेत;+

ते मातीच्या भट्टीत,* सात वेळा शुद्ध केलेल्या चांदीसारखे आहेत.

 ७ हे यहोवा तू त्यांना सांभाळशील;+

या पिढीपासून सर्वकाळापर्यंत, तू त्यांच्यापैकी प्रत्येकाचं रक्षण करशील.

 ८ माणसं नीच कामांना प्रोत्साहन देतात,

त्यामुळे दुष्ट लोक बिनधास्त फिरत आहेत.+

दावीदचं गीत. संचालकासाठी.

१३ हे यहोवा, तू कुठपर्यंत मला विसरशील? कायमचं?

तू कधीपर्यंत माझ्यापासून आपलं तोंड फिरवशील?*+

 २ मी कधीपर्यंत असा चिंतेत राहू?

कधीपर्यंत दररोज मनात दुःख बाळगू?

माझा शत्रू कुठपर्यंत माझ्यावर विजयी ठरेल?+

 ३ हे यहोवा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा आणि मला उत्तर दे.

माझ्या डोळ्यांना प्रकाश दे, नाहीतर मी मरून जाईन.*

 ४ “मी त्याला हरवलं,” असं माझ्या शत्रूला म्हणू देऊ नकोस.

मी पडल्यामुळे माझ्या विरोधकांना आनंदी होऊ देऊ नकोस.+

 ५ मी तर तुझ्या एकनिष्ठ प्रेमावर भरवसा ठेवतो;+

तुझ्या तारणाच्या कार्यांमुळे माझं मन हर्षित होईल.+

 ६ मी यहोवासाठी गीत गाईन कारण त्याने मला भरपूर आशीर्वाद दिले आहेत.+

दावीदचं गीत. संचालकासाठी.

१४ मूर्ख* माणसं आपल्या मनात म्हणतात:

“यहोवा अस्तित्वात नाही.”+

ते वाईट कामं करतात आणि त्यांची वागणूक घृणास्पद आहे;

चांगली कामं करणारा एकही नाही.+

 २ पण यहोवा स्वर्गातून खाली मानवांकडे पाहतो.

सखोल समज दाखवणारा आणि यहोवाचा शोध घेणारा कोणी आहे का, हे तो पाहतो.+

 ३ ते सगळे भरकटले आहेत;+

सगळेच्या सगळे भ्रष्ट आहेत.

चांगली कामं करणारा एकही नाही,

एकसुद्धा नाही!

 ४ दुर्जनांपैकी कोणालाही कळत नाही का?

भाकर खावी तसे ते माझ्या लोकांना खाऊन टाकतात.

ते यहोवाला हाक मारत नाहीत.

 ५ पण ते भीतीने कावरेबावरे होतील,+

कारण यहोवा नीतिमान लोकांसोबत* आहे.

 ६ दुर्जनांनो, तुम्ही गरिबाच्या योजना धुळीला मिळवू पाहता,

पण यहोवा त्याचा आश्रय आहे.+

 ७ सीयोनवरून इस्राएलचं तारण होवो!+

बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांना यहोवा गोळा करेल,

तेव्हा याकोब आनंदी होवो, इस्राएल हर्ष करो!

दावीदचं गीत.

१५ हे यहोवा, तुझ्या तंबूत राहण्यासाठी तू कोणाचं स्वागत करशील?

तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहू शकतं?+

 २ असा मनुष्य, जो निर्दोषपणे* चालतो,+

योग्य ते करतो+

आणि मनातसुद्धा खरं बोलतो.+

 ३ तो आपल्या जिभेने बदनामी करत नाही,+

आपल्या शेजाऱ्‍याचं वाईट करत नाही,+

आणि आपल्या मित्रांची निंदा करत नाही.*+

 ४ तो वाईट कामं करणाऱ्‍यांना तुच्छ लेखतो,+

पण यहोवाचं भय मानणाऱ्‍यांचा आदर करतो.

नुकसान सहन करावं लागलं, तरी तो दिलेला शब्द* मोडत नाही.+

 ५ तो व्याजाने पैसे उसने देत नाही+

आणि निर्दोष माणसाविरुद्ध लाच घेत नाही.+

जो कोणी या गोष्टी करतो, तो कधीच डळमळणार नाही.*+

दावीदचं मिक्‍ताम.*

१६ हे देवा, माझं रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतलाय.+

 २ मी यहोवाला म्हणालो: “हे यहोवा, माझ्यासाठी सर्व चांगल्या गोष्टींचा उगम तूच आहेस.

 ३ पृथ्वीवरचे पवित्र आणि प्रतिष्ठित जन

यांच्यामुळे मला खूप आनंद होतो.”+

 ४ इतर देवांच्या मागे लागणारे आपल्या दुःखांत भर घालतात.+

मी कधीही त्यांच्यासाठी रक्‍ताची पेयार्पणं ओतणार नाही;

माझ्या ओठांवर त्यांची* नावं कधीही येणार नाहीत.+

 ५ यहोवा माझा वाटा आणि वारसा आहे;+ तो माझा प्याला आहे.+

तू माझ्या वारशाचं रक्षण करतोस.

 ६ माझ्या वाट्याला सुंदर जागा आल्या आहेत.*

खरंच, मला मिळालेल्या वारशाबद्दल मी समाधानी आहे.+

 ७ मी यहोवाची स्तुती करीन, कारण त्याने मला सल्ला दिलाय.+

रात्रीच्या वेळीही माझ्या मनातले खोल विचार* मला मार्गदर्शन करतात.+

 ८ मी सतत यहोवाला माझ्यापुढे ठेवतो.+

तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे, माझी पावलं कधीही डळमळणार* नाहीत.+

 ९ म्हणूनच माझं हृदय हर्षित होतं; मला अगदी मनापासून आनंद होतो.

आणि मी निर्धास्त राहतो.

१० कारण तू मला कबरेत* सोडून देणार नाहीस.*+

तू आपल्या एकनिष्ठ सेवकाला खळग्यात* राहू देणार नाहीस.*+

११ तू मला जीवनाचा मार्ग दाखवतोस.+

तुझ्या सहवासात* अमाप सुख आहे;+

तुझ्या उजव्या हाताला सर्वकाळाचा आनंद* आहे.

दावीदची प्रार्थना.

१७ हे यहोवा, मी न्यायासाठी केलेली फिर्याद ऐक;

माझ्या मदतीच्या याचनेकडे लक्ष दे;

मी निष्कपट मनाने केलेल्या प्रार्थनेचं उत्तर दे.+

 २ तू योग्य निर्णय घेऊन मला न्याय दे.+

खरं काय आहे, ते तू आपल्या डोळ्यांनी पाहा.

 ३ तू माझ्या हृदयाचं परीक्षण केलं आहेस; तू रात्रीच्या वेळी मला पारखलं आहेस;+

तू मला शुद्ध केलं आहेस,+

मी कोणतीही दुष्ट योजना केली नाही

आणि माझ्या तोंडून कोणतीही वाईट गोष्ट निघाली नाही, हे तुला दिसेल.

 ४ इतरांनी काहीही केलं,

तरी मी तुझ्या तोंडून निघालेल्या शब्दांप्रमाणे, लुटारूंच्या मार्गांपासून दूर राहतो.+

 ५ माझी पावलं तुझ्याच मार्गांवर राहू दे,

म्हणजे माझे पाय अडखळणार नाहीत.+

 ६ हे देवा, तू मला उत्तर देशील म्हणून मी तुला हाक मारतो.+

माझी प्रार्थना ऐक.* माझ्या विनंतीकडे लक्ष दे.+

 ७ अद्‌भुत रितीने तुझं एकनिष्ठ प्रेम दाखव;+

हे देवा, तुझ्या विरोधकांपासून बचाव होण्यासाठी,

जे तुझ्या उजव्या हाताला आश्रय घेतात,

त्यांचं तू तारण करतोस.

 ८ तुझ्या डोळ्याच्या बाहुलीसारखं मला सांभाळ;+

तुझ्या पंखांनी माझ्यावर पाखर घाल.*+

 ९ माझ्या जिवावर उठलेल्या शत्रूंनी मला घेरलंय;

माझ्यावर हल्ला करणाऱ्‍या दुष्टांपासून माझं रक्षण कर.+

१० ते कोडगे झाले आहेत;*

ते उद्धटपणे बोलतात.

११ ते आम्हाला सर्व बाजूंनी वेढतात;+

आम्हाला खाली पाडण्याची संधी शोधतात.

१२ शिकारीचे तुकडेतुकडे करायला उतावीळ झालेल्या सिंहासारखा माझा शत्रू आहे;

तो टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा आहे.

१३ हे यहोवा, ऊठ आणि त्याच्याशी सामना करून+ त्याला खाली पाड;

तुझ्या तलवारीने त्या दुष्टापासून माझी* सुटका कर.

१४ हे यहोवा, या जगातल्या* लोकांपासून माझी सुटका कर

त्यांचा वाटा याच जीवनात आहे;+

तू त्यांना पुष्कळ चांगल्या गोष्टी देऊन तृप्त करतोस+

आणि ते आपल्या मुलांसाठी वारसा ठेवून जातात.

१५ पण माझ्या नीतिमत्त्वामुळे तू माझ्यावर कृपा करशील;

मी जागा होऊन तुला* पाहीन, तेव्हा मला समाधान मिळेल.+

संचालकासाठी. यहोवाने दावीदला त्याच्या सर्व शत्रूंच्या आणि शौलच्या हातून सोडवलं, तेव्हा यहोवाचा सेवक दावीद याने यहोवासाठी हे गीत रचलं. तो म्हणाला:+

१८ हे यहोवा, तू माझी ताकद आहेस,+ माझं तुझ्यावर प्रेम आहे.

 २ यहोवा माझा खडक आणि माझा मजबूत गड आहे, तोच मला वाचवतो.+

माझा देव माझा खडक आहे,+ मी त्याचा आश्रय घेतलाय.

तो माझी ढाल, माझं तारणाचं शिंग* आणि माझा सुरक्षित आश्रय* आहे.+

 ३ यहोवा स्तुतिपात्र आहे, मी त्याला प्रार्थना करतो;

तो मला माझ्या शत्रूंपासून वाचवेल.+

 ४ मृत्यूच्या दोरांनी मला वेढलं;+

नीच माणसांच्या महापुराने मला घाबरवून सोडलं.+

 ५ कबरेच्या* दोरांनी मला घेरलं;

मी मृत्यूच्या सापळ्यांत अडकलो.+

 ६ संकटात मी यहोवाला हाक मारली,

मी माझ्या देवाला मदतीची याचना करत राहिलो.

त्याने त्याच्या मंदिरातून माझी हाक ऐकली,+

आणि माझी मदतीची याचना त्याच्या कानापर्यंत पोहोचली.+

 ७ तेव्हा पृथ्वी हादरली आणि थरथरू लागली;+

पर्वत लटपटू लागले

आणि त्यांना हादरे बसले, कारण त्याचा क्रोध भडकला होता.+

 ८ त्याच्या नाकपुड्यांतून धूर,

आणि त्याच्या तोंडातून भस्म करणारी आग निघू लागली;+

त्याच्यासमोर निखारे धगधगत होते.

 ९ खाली उतरताना त्याने आकाशाला वाकवलं,+

त्याच्या पायांखाली काळाकुट्ट अंधार होता.+

१० करुबावर* स्वार होऊन तो उडत आला.+

स्वर्गदूताच्या पंखांवरून तो खाली झेपावला.+

११ मग त्याने स्वतःला अंधाराने झाकून घेतलं,+

त्याच्याभोवती घनदाट काळ्या ढगांचा मंडप होता.+

१२ त्याच्यासमोर असलेल्या तेजाने,

ढगांतून गारा आणि निखारे बाहेर पडले.

१३ यहोवा आकाशात गर्जू लागला;+

सर्वोच्च देवाचा आवाज ऐकू आला.+

तेव्हा गारा आणि निखारे बरसू लागले.

१४ त्याने बाण मारून माझ्या शत्रूंची पांगापांग केली;+

वीज पाडून त्यांचा गोंधळ उडवला.+

१५ हे यहोवा, तुझ्या धमकावण्यामुळे जमिनीचे पाये उघडे पडले;

तुझ्या नाकपुड्यांतून निघणाऱ्‍या जोरदार श्‍वासाने,

नद्यांचे तळ* दिसू लागले.+

१६ तो उंचावरून खाली वाकला;

त्याने मला धरून, खोल पाण्यातून बाहेर काढलं.+

१७ त्याने माझा द्वेष करणाऱ्‍या, माझ्यापेक्षा बलवान असलेल्या,

माझ्या शक्‍तिशाली शत्रूपासून मला सोडवलं.+

१८ माझ्या संकटाच्या दिवशी ते माझ्यावर उठले,+

पण यहोवा माझ्या पाठीशी होता.

१९ त्याने मला सुरक्षित ठिकाणी* आणलं;

तो माझ्यावर खूश होता, म्हणून त्याने मला वाचवलं.+

२० यहोवा माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे;

माझ्या हातांच्या निर्दोषतेप्रमाणे* मला प्रतिफळ देतो.+

२१ कारण मी यहोवाच्या मार्गांनी चाललो;

माझ्या देवाला सोडून देण्याचा दुष्टपणा मी केला नाही.

२२ त्याचे सर्व न्याय-निर्णय* माझ्यासमोर आहेत;

मी त्याच्या कायद्यांकडे दुर्लक्ष करणार नाही.

२३ मी त्याच्यासमोर नेहमी निर्दोष राहीन,+

स्वतःला अपराधापासून दूर ठेवीन.+

२४ यहोवाने मला माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे;

माझ्या हातांच्या निर्दोषतेप्रमाणे मला प्रतिफळ द्यावं.+

२५ जो एकनिष्ठ, त्याच्याशी तू एकनिष्ठपणे वागतोस;+

प्रामाणिक माणसाशी तू प्रामाणिकपणे वागतोस.+

२६ जो शुद्ध, त्याच्याशी तू शुद्धतेने वागतोस,+

पण कपटी माणसाशी तू हुशारीने वागतोस.+

२७ कारण तू दीनदुबळ्यांना* वाचवतोस,+

पण गर्विष्ठांना* तू खाली पाडतोस.+

२८ हे यहोवा, तूच माझा दिवा पेटवतोस,

माझ्या देवा, तू माझ्या अंधाराला प्रकाशात बदलतोस.+

२९ तुझ्या मदतीने मी लुटारूंच्या टोळीवर तुटून पडू शकतो;+

देवाच्या सामर्थ्याने मी तट ओलांडू शकतो.+

३० खऱ्‍या देवाचा मार्ग परिपूर्ण आहे;+

यहोवाचे शब्द शुद्ध आहेत.+

त्याचा आश्रय घेणाऱ्‍या सर्वांसाठी तो ढालीसारखा आहे.+

३१ कारण यहोवाशिवाय दुसरा कोण देव आहे?+

आमच्या देवासारखा भक्कम खडक कोण आहे?+

३२ खरा देवच माझ्यावर सामर्थ्याचं वस्त्र पांघरतो,+

तो माझा मार्ग मोकळा करेल.+

३३ तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे चपळ करतो;

तो मला उंच ठिकाणी उभं करतो.+

३४ तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो;

माझे बाहू तांब्याचं धनुष्य वाकवू शकतात.

३५ तू मला तुझी तारणाची ढाल देतोस,+

तुझा उजवा हात मला आधार देतो*

आणि तुझी नम्रता मला महान बनवते.+

३६ माझ्या पावलांसाठी तू मार्ग रुंद करतोस;

माझे पाय घसरणार नाहीत.+

३७ मी आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यांना गाठीन;

त्यांचा सर्वनाश होईपर्यंत मी परत येणार नाही.

३८ मी त्यांना असं चिरडून टाकीन, की ते पुन्हा उठूच शकणार नाहीत;+

ते माझ्या पायांजवळ पडतील.

३९ तू मला शक्‍ती देऊन युद्धासाठी सज्ज करशील;

माझ्या वैऱ्‍यांना तू माझ्यासमोर खाली पाडशील.+

४० तू माझ्या शत्रूंना माझ्यापुढून माघार घ्यायला लावशील,

माझा द्वेष करणाऱ्‍यांचा मी अंत करीन.*+

४१ ते मदतीची याचना करतात, पण त्यांना वाचवायला कोणीही नाही;

ते यहोवालाही हाक मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही.

४२ वाऱ्‍यासोबत उडून जाणाऱ्‍या धुळीसारखा मी त्यांचा भुगा करीन;

रस्त्यावरच्या चिखलासारखं मी त्यांना फेकून देईन.

४३ माझी टीका करणाऱ्‍या लोकांपासून तू मला वाचवशील.+

तू मला राष्ट्रांवर प्रमुख म्हणून नेमशील.+

मी ज्या लोकांना ओळखत नाही तेही माझी सेवा करतील.+

४४ माझ्याबद्दल नुसतं ऐकूनही ते माझी आज्ञा पाळतील;

विदेशी लोक घाबरत घाबरत माझ्यापुढे येतील.+

४५ विदेशी लोकांचं धैर्य खचेल,

ते थरथर कापत आपल्या गडांमधून बाहेर येतील.

४६ यहोवा जिवंत देव आहे! खडकासारख्या माझ्या देवाची स्तुती होवो!+

तारण करणाऱ्‍या देवाचा सन्मान होवो!+

४७ खरा देव माझ्या शत्रूंचा बदला घेतो;+

तो राष्ट्रांना माझ्या अधीन करतो.

४८ तो माझ्या संतप्त शत्रूंपासून मला सोडवतो.

हे देवा, माझ्यावर हल्ला करणाऱ्‍यांपासून तू मला दूर उंचावर ठेवतोस;+

हिंसाचार करणाऱ्‍यापासून तू मला वाचवतोस.

४९ म्हणून हे यहोवा, मी राष्ट्रांमध्ये तुझा महिमा करीन,+

मी तुझ्या नावाचं गुणगान करीन.*+

५० तो आपल्या राजाचं अद्‌भुत रितीने तारण करतो;*+

तो आपल्या अभिषिक्‍तावर;+

दावीदवर आणि त्याच्या संततीवर*+ सर्वकाळ एकनिष्ठ प्रेम करतो.

दावीदचं गीत. संचालकासाठी.

१९ आकाश देवाच्या गौरवाचं वर्णन करतं;+

अंतराळ त्याच्या हस्तकृती* जाहीर करतं.+

 २ प्रत्येक दिवशी त्यांचे शब्द खळखळत्या झऱ्‍यासारखे वाहतात;

प्रत्येक रात्री ते ज्ञान प्रकट करतात.

 ३ बोल नाहीत, शब्द नाहीत;

त्यांचा ध्वनीही ऐकू येत नाही.

 ४ पण त्यांचा आवाज* सबंध पृथ्वीवर;

आणि त्यांचा संदेश पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत पोहोचला आहे.+

देवाने आकाशात सूर्यासाठी तंबू उभारला आहे.

 ५ तो वरासारखा आपल्या शयनगृहातून* बाहेर पडतो;

शूरवीराप्रमाणे आपल्या मार्गावरून धावताना त्याला आनंद होतो.

 ६ तो आकाशाच्या एका टोकावर उगवतो,

आणि दुसऱ्‍या टोकापर्यंत प्रवास करतो;+

त्याच्या उष्णतेपासून काहीच लपू शकत नाही.

 ७ यहोवाचे नियम परिपूर्ण आहेत,+ ते नव्याने ताकद देतात.+

यहोवाच्या स्मरण-सूचना* भरवशालायक आहेत,+ त्या अनुभव नसलेल्यांना बुद्धिमान बनवतात.+

 ८ यहोवाचे आदेश नीतिमान आहेत, ते मनाला आनंद देतात;+

यहोवाच्या आज्ञा निर्मळ* आहेत, त्या डोळ्यांत तेज आणतात.+

 ९ यहोवाचं भय+ शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकतं.

यहोवाचे निर्णय खरे आहेत, ते पूर्णपणे नीतिमान आहेत.+

१० ते सोन्यापेक्षा, भरपूर शुद्ध* सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत;+

आणि मधापेक्षा, पोळ्यातून झिरपणाऱ्‍या मधापेक्षाही गोड आहेत.+

११ ते तुझ्या सेवकाला सावध करतात;+

त्यांचं पालन केल्यामुळे मोठं प्रतिफळ मिळतं.+

१२ स्वतःच्या चुका कोणाला दिसतात?+

मी नकळत केलेल्या पापांपासून मला निर्दोष ठरव.

१३ गर्विष्ठ कृत्यांपासून तुझ्या या सेवकाला आवर;+

त्यांना माझ्यावर सत्ता गाजवू देऊ नकोस.+

तेव्हाच मी निष्कलंक होईन+

आणि पुष्कळ पापांपासून* निर्दोष ठरीन.

१४ हे यहोवा, तू माझा खडक+ आणि माझा सोडवणारा+ आहेस!

माझ्या तोंडातून निघणाऱ्‍या शब्दांमुळे आणि माझ्या मनातल्या विचारांमुळे तुला नेहमी आनंद होवो!+

दावीदचं गीत. संचालकासाठी.

२० संकटाच्या दिवशी यहोवा तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देवो.

याकोबच्या देवाचं नाव तुझं रक्षण करो.+

 २ तो तुला पवित्र ठिकाणावरून मदत पाठवो,+

सीयोनवरून तुझा सांभाळ करो.+

 ३ तुझ्या सर्व अर्पणांची* तो आठवण ठेवो;

तू दिलेल्या होमार्पणाचा तो आनंदाने* स्वीकार करो. (सेला )

 ४ तुझ्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो,+

आणि तुझ्या सर्व योजना सफल करो.

 ५ आम्ही तुझ्या तारणाच्या कार्यांमुळे आनंदाने जल्लोष करू!+

आम्ही आमच्या देवाच्या नावाने ध्वज उंचावू!+

यहोवा तुझ्या सर्व विनंत्या मान्य करो.

 ६ यहोवा आपल्या अभिषिक्‍ताला वाचवतो,+ हे आता मला कळलंय.

तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्याला उत्तर देतो;

तो आपल्या उजव्या हाताने अद्‌भुत रितीने त्याचं तारण करतो.*+

 ७ कोणी रथांवर, तर कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतं,+

पण आम्ही तर आमचा देव यहोवा याच्या नावाची स्तुती करू!+

 ८ ते अडखळून खाली पडले आहेत.

पण आम्ही उठून ताठ उभे आहोत.+

 ९ हे यहोवा, राजाचं तारण कर!+

आम्ही मदतीची याचना करू, त्या दिवशी देव* आम्हाला उत्तर देईल.+

दावीदचं गीत. संचालकासाठी.

२१ हे यहोवा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा आनंदी होतो.+

तुझ्या तारणाच्या कार्यांमुळे तो किती हर्ष करतो!+

 २ तू त्याचा मानस* पूर्ण केला आहेस,+

त्याच्या तोंडून निघालेली विनंती तू नाकारली नाहीस. (सेला )

 ३ तू भरपूर आशीर्वाद घेऊन त्याच्या भेटीला येतोस;

तू त्याच्या डोक्यावर शुद्ध* सोन्याचा मुकुट ठेवतोस.+

 ४ त्याने तुझ्याकडे आयुष्य मागितलं आणि तू ते त्याला दिलंस,+

पुष्कळ वर्षांचं,* सदासर्वकाळाचं जीवन तू त्याला दिलंस.

 ५ तुझ्या तारणाच्या कार्यांमुळे त्याचा मोठा गौरव होतो.+

तू त्याला सन्मान आणि वैभव बहाल करतोस.

 ६ त्याला तुझ्याकडून कायम आशीर्वाद मिळत राहतील;+

तुझ्या सहवासाच्या* आनंदामुळे तू त्याला हर्षित करतोस.+

 ७ कारण राजा यहोवावर भरवसा ठेवतो;+

सर्वोच्च देवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळे तो कधीच डळमळणार नाही.*+

 ८ तुझे सर्व शत्रू तुझ्या हाती लागतील;

तुझा द्वेष करणारे तुझ्या उजव्या हातात सापडतील.

 ९ ठरवलेल्या वेळी तू त्यांच्याकडे लक्ष वळवशील आणि त्यांना जळत्या भट्टीसारखं करशील.

यहोवा आपल्या क्रोधात त्यांना गिळून टाकेल, आग त्यांना भस्म करेल.+

१० त्यांच्या वंशजांना तू पृथ्वीवरून नष्ट करशील;

त्यांच्या संततीला मानवांमधून नाहीसं करशील.

११ कारण तुझं वाईट करण्याचा त्यांचा इरादा होता;+

पण त्यांचे बेत यशस्वी होणार नाहीत.+

१२ कारण तू तुझं धनुष्य* त्यांच्यावर* रोखशील

आणि त्यांना माघार घ्यायला लावशील.+

१३ हे यहोवा, ऊठ आणि आपली ताकद दाखव.

आम्ही तुझ्या सामर्थ्याचा महिमा गाऊ.*

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. “पहाटेची हरिणी”* या चालीवर गायलं जावं.

२२ माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?+

तू मला का वाचवत नाहीस?

मी दुःखाने केलेला आक्रोश तू का ऐकत नाहीस?+

 २ माझ्या देवा, मी दिवसा तुला विनवणी करतो, पण तू उत्तर देत नाहीस;+

रात्रीही मी तुला हाका मारत राहतो.

 ३ पण तू पवित्र आहेस,+

इस्राएलची स्तुती तुझ्या सभोवती आहे.*

 ४ आमच्या वाडवडिलांनी तुझ्यावर भरवसा ठेवला;+

त्यांनी तुझ्यावर विश्‍वास ठेवला आणि तू त्यांना संकटातून सोडवत राहिलास.+

 ५ त्यांनी तुला हाक मारली आणि तू त्यांना वाचवलंस;

त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवला आणि त्यांची निराशा झाली नाही.*+

 ६ पण मी माणूस नाही, तर नुसताच एक किडा आहे,

माणसं माझी थट्टा करतात* आणि लोक मला तुच्छ लेखतात.+

 ७ मला पाहणारे माझी थट्टा करतात;+

ते मला हसतात आणि डोकं हलवून माझी मस्करी करतात.+ ते म्हणतात:

 ८ “त्याला यहोवावर भरवसा आहे, तर आता त्यानेच त्याची सुटका करावी!

त्याचं त्याच्यावर प्रेम आहे ना, मग त्यानेच त्याला वाचवावं!”+

 ९ तूच मला माझ्या आईच्या उदरातून* बाहेर आणलंस,+

मी आईच्या अंगावर पीत होतो, तेव्हापासून तू मला सुरक्षित ठेवलंस.

१० जन्मापासूनच मला तुझ्या हाती सोपवण्यात आलंय;*

मी आईच्या पोटात होतो, तेव्हापासून तू माझा देव आहेस.

११ माझ्यापासून दूर राहू नकोस, कारण संकट जवळ आलंय;+

मला साहाय्य करणारा तुझ्याशिवाय कोणीही नाही.+

१२ पुष्कळ तरण्या बैलांनी मला घेरलंय;+

बाशानच्या दांडग्या बैलांनी मला वेढलंय.+

१३ शिकारीचे तुकडेतुकडे करणाऱ्‍या, एखाद्या गरजणाऱ्‍या सिंहासारखा,+

माझ्या शत्रूंनी मला गिळण्यासाठी जबडा पसरलाय.+

१४ मला पाण्यासारखं ओतण्यात आलंय;

माझी सगळी हाडं सांध्यांतून निखळली आहेत.

माझं हृदय मेणासारखं झालंय,+

ते आतल्या आत वितळतंय.+

१५ एखाद्या खापरीसारखी माझी शक्‍ती सुकून गेली आहे;+

माझी जीभ टाळूला चिकटली आहे;+

तू मला मरणाच्या धुळीत लोळवलं आहेस.+

१६ कुत्र्यांनी मला वेढलंय;+

दुर्जनांच्या टोळीसारखा त्यांनी माझ्याभोवती गराडा घातलाय,+

एखाद्या सिंहासारखे ते माझ्या हातापायांच्या चिंधड्या करतात.+

१७ मी आपली सगळी हाडं मोजू शकतो.+

ते नजर रोखून मला पाहत राहतात.

१८ ते माझी वस्त्रं आपसात वाटून घेतात,

आणि माझ्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकतात.+

१९ पण हे यहोवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.+

तूच माझी ताकद आहेस. माझ्या मदतीला धावून ये.+

२० तलवारीपासून माझा जीव वाचव,

कुत्र्यांच्या पंजांपासून* माझ्या अनमोल जीवनाचं* रक्षण कर.+

२१ सिंहाच्या जबड्यातून+ आणि रानबैलांच्या शिंगांपासून मला वाचव;

माझ्या प्रार्थनेचं उत्तर दे आणि मला सोडव.

२२ मी आपल्या भावांसमोर तुझं नाव घोषित करीन;+

मंडळीत मी तुझी स्तुती करीन.+

२३ यहोवाची भीती बाळगणाऱ्‍यांनो, त्याची स्तुती करा!

याकोबच्या संततीने* त्याचा गौरव करावा.+

इस्राएलच्या संततीने* त्याची भीती बाळगावी.

२४ कारण जुलूम सहन करणाऱ्‍याच्या दुःखाकडे त्याने दुर्लक्ष केलं नाही;

किंवा ते तुच्छ लेखलं नाही.+

त्याने त्या मनुष्यापासून आपलं तोंड फिरवलं नाही.*+

त्याची मदतीची याचना त्याने ऐकली.+

२५ मी मोठ्या मंडळीत तुझी स्तुती करीन;+

तुझी भीती बाळगणाऱ्‍यांसमोर मी आपले नवस फेडीन.

२६ नम्र लोक खातील आणि तृप्त होतील;+

यहोवाचा शोध घेणारे त्याची स्तुती करतील.+

तुम्ही सर्वकाळ जीवनाचा आनंद लुटा!*

२७ पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांतले लोक यहोवाची आठवण करून त्याच्याकडे वळतील.

राष्ट्रांतली सर्व घराणी तुझ्यापुढे नमन करतील.+

२८ कारण राज्य यहोवाचं आहे;+

तो राष्ट्रांवर शासन करतो.

२९ पृथ्वीवरचे सर्व श्रीमंत* लोक मेजवानी करतील आणि त्याला नमन करतील;

धुळीला मिळणारे सर्व त्याच्यापुढे गुडघे टेकतील;

त्यांच्यापैकी कोणीही आपला जीव वाचवू शकत नाही.

३० त्यांचे वंशज* त्याची सेवा करतील;

येणाऱ्‍या पिढीला यहोवाबद्दल सांगितलं जाईल.

३१ ते येतील आणि त्याच्या नीतिमत्त्वाबद्दल सांगतील.

येणाऱ्‍या पिढ्यांना ते त्याच्या कार्यांबद्दल सांगतील.

दावीदचं गीत.

२३ यहोवा माझा मेंढपाळ आहे.+

मला कशाचीच कमी नाही.+

 २ तो मला हिरव्यागार कुरणांत* विसावा घेऊ देतो;

भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी,* तो मला विश्रांतीसाठी नेतो.+

 ३ तो माझा जीव ताजातवाना करतो.+

तो आपल्या नावासाठी मला नीतीच्या मार्गांवर* चालवतो.+

 ४ मी काळोख्या दरीतून चालत असलो,+

तरी मला कशाचीही भीती वाटत नाही,+

कारण तू माझ्यासोबत असतोस;+

तुझ्या काठीने आणि आकड्याने मला सुरक्षित वाटतं.*

 ५ माझ्या शत्रूंसमोर तू माझ्यासाठी मेजवानी तयार करतोस.+

तू माझ्या डोक्याला, तजेला देणारं तेल लावतोस;+

माझा प्याला काठोकाठ भरला आहे.+

 ६ हे यहोवा, तुझा चांगुलपणा आणि तुझं एकनिष्ठ प्रेम जीवनभर मला साथ देईल.+

आणि मी आयुष्यभर तुझ्या घरात राहीन.+

दावीदचं गीत.

२४ पृथ्वी आणि तिच्यावर असलेलं सर्वकाही यहोवाचं आहे;+

उपजाऊ जमीन आणि तिच्यावर राहणारे सर्व त्याचेच आहेत.

 २ कारण त्याने समुद्रांवर तिचा पाया घातलाय;+

त्याने नद्यांवर तिला स्थिर केलंय.

 ३ यहोवाच्या पर्वतावर कोण चढून जाऊ शकतो?+

आणि त्याच्या पवित्र ठिकाणी कोण उभा राहू शकतो?

 ४ ज्याचे हात निर्दोष आणि मन शुद्ध आहे;+

ज्याने माझ्या जिवाची* खोटी शपथ घेतली नाही;

किंवा कपटी मनाने शपथ घेतली नाही,+ असा माणूस.

 ५ त्याला यहोवाकडून आशीर्वाद मिळतील;+

त्याचं तारण करणारा देव त्याला नीतिमान ठरवेल.*+

 ६ ही त्याचा शोध घेणाऱ्‍यांची पिढी आहे.

याकोबच्या देवा, हे तुझी कृपा मिळवण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत. (सेला )

 ७ दरवाजांनो, आपली डोकी वर करा;+

प्राचीन काळातल्या प्रवेशद्वारांनो, उघडा!*

गौरवी राजाला आत येऊ द्या!+

 ८ हा गौरवी राजा कोण?

तो बलवान आणि शक्‍तिशाली यहोवा आहे;+

तो युद्धात पराक्रमी असलेला यहोवा आहे.+

 ९ दरवाजांनो, आपली डोकी वर करा;+

प्राचीन काळातल्या प्रवेशद्वारांनो, उघडा!

गौरवी राजाला आत येऊ द्या!

१० कोण आहे हा गौरवी राजा?

तो गौरवी राजा, सैन्यांचा देव यहोवा आहे.+ (सेला )

दावीदचं गीत.

א [आलेफ ]

२५ हे यहोवा, मी तुझ्याकडे वळतो.

ב [बेथ ]

 २ माझ्या देवा, तुझ्यावर माझा भरवसा आहे;+

मला लज्जित होऊ देऊ नकोस.+

माझ्या संकटांमुळे माझ्या शत्रूंना आनंदी होऊ देऊ नकोस.+

ג [गिमेल ]

 ३ तुझी आशा बाळगणाऱ्‍यांना लज्जित व्हावं लागणार नाही,+

पण, कारण नसताना दगा देणारे लज्जित होतील.+

ד [दालेथ ]

 ४ हे यहोवा, तुझे मार्ग मला दाखव;+

तुझ्या वाटेने चालायला मला शिकव.+

ה [हे ]

 ५ तुझ्या खऱ्‍या मार्गावर मला चालव आणि मला मार्गदर्शन कर,+

कारण तू माझं तारण करणारा देव आहेस.

ו [वाव ]

मी सतत तुझी आशा धरतो.

ז [झाइन ]

 ६ हे यहोवा, तू पूर्वीपासून दाखवलेली*+

तुझी दया आणि तुझं एकनिष्ठ प्रेम आठव.+

ח [हेथ ]

 ७ हे यहोवा, माझ्या तारुण्यातली पापं आणि अपराध लक्षात ठेवू नकोस.

तुझ्या एकनिष्ठ प्रेमानुसार,+

तुझ्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.+

ט [तेथ ]

 ८ यहोवा चांगला आणि खरा आहे.+

म्हणूनच तो पापी लोकांना योग्य मार्ग दाखवतो.+

י [योद ]

 ९ तो नम्र लोकांना नीतीच्या* मार्गाने नेतो,+

तो नम्र लोकांना आपला मार्ग शिकवतो.+

כ [खाफ ]

१० जे यहोवाचा करार+ आणि त्याच्या स्मरण-सूचना+ पाळतात,

त्यांच्याशी तो नेहमी एकनिष्ठ प्रेमाने आणि विश्‍वासूपणे वागतो.

ל [लामेद ]

११ हे यहोवा, माझा अपराध फार मोठा आहे.

तरी, तू आपल्या नावासाठी तो क्षमा कर.+

מ [मेम ]

१२ जो माणूस यहोवाची भीती बाळगतो,+

त्याने कोणता मार्ग निवडावा, हे तो त्याला शिकवेल.+

נ [नून ]

१३ त्याचं भलं होईल;+

त्याचे वंशज* सबंध पृथ्वीवर राहतील.+

ס [सामेख ]

१४ जे यहोवाची भीती बाळगतात, त्यांच्याशी त्याची जवळची मैत्री असते,+

तो त्यांना आपला करार कळवतो.+

ע [आयन ]

१५ माझे डोळे सतत यहोवाकडे लागलेले आहेत,+

कारण तोच माझे पाय जाळ्यातून सोडवेल.+

פ [पे ]

१६ माझ्याकडे लक्ष दे* आणि माझ्यावर कृपा कर

कारण मी एकटा आणि असाहाय्य आहे.

צ [सादे ]

१७ माझ्या मनाला खूप यातना होत आहेत;+

माझ्या दुःखातून मला सोडव.

ר [रेश ]

१८ माझं दुःख, माझ्या यातना बघ;+

माझ्या सर्व पापांची क्षमा कर.+

१९ माझे शत्रू असंख्य झाले आहेत;

ते किती खुनशीपणे माझा द्वेष करतात, ते पाहा.

ש [शिन ]

२० माझ्या जिवाचं रक्षण कर आणि मला वाचव.+

मला लज्जित होऊ देऊ नकोस, कारण मी तुझा आश्रय घेतलाय.

ת [ताव ]

२१ खरेपणा आणि सरळपणा माझं रक्षण करोत,+

कारण मी तुझ्यावर आशा ठेवतो.+

२२ हे देवा, इस्राएलच्या सर्व संकटांतून त्याची सुटका कर.*

दावीदचं गीत.

२६ हे यहोवा, माझा न्याय कर, कारण मी खरेपणाने चाललोय;+

मी यहोवावर भरवसा ठेवलाय; माझा भरवसा कधीही ढळला नाही.+

 २ हे यहोवा, मला पारख आणि माझी परीक्षा घे;

माझ्या मनातले खोल विचार* आणि माझं हृदय शुद्ध कर.+

 ३ कारण तुझं एकनिष्ठ प्रेम सतत माझ्या डोळ्यांपुढे असतं;

मी तुझ्या खऱ्‍या मार्गाने चालतो.+

 ४ फसवणूक करणाऱ्‍यांसोबत मी राहत* नाही,+

ढोंगी लोकांपासून* मी दूर राहतो.

 ५ दुष्टांची संगत मला नकोशी वाटते,+

आणि मी दुर्जनांची सोबत नाकारतो.*+

 ६ हे यहोवा, मी निर्दोषतेने माझे हात धुईन;

मी तुझ्या वेदीभोवती फिरेन.

 ७ मी मोठ्याने तुझी उपकारस्तुती करीन;+

मी तुझ्या सर्व अद्‌भुत कार्यांचं वर्णन करीन.

 ८ हे यहोवा, तू राहत असलेलं घर;+

आणि तुझ्या गौरवाचं ठिकाण मला प्रिय वाटतं.+

 ९ पापी लोकांसोबत माझा नाश करू नकोस;+

हिंसक लोकांसोबत* माझा जीव घेऊ नकोस.

१० त्यांचे हात लाजिरवाणी कृत्यं करतात;

त्यांचा उजवा हात लाचखोरी करतो.

११ पण मी तर नेहमी खरेपणाने चालीन.

मला वाचव* आणि माझ्यावर कृपा कर.

१२ मी सुरक्षित ठिकाणी उभा आहे;+

मी मोठ्या मंडळीत* यहोवाची स्तुती करीन.+

दावीदचं गीत.

२७ यहोवा माझा प्रकाश+ आणि माझं तारण आहे.

मला कोणाची भीती?+

यहोवा माझ्या जिवाचं आश्रयस्थान* आहे.+

मला कोणाचं भय?

 २ माझं मांस खाण्यासाठी दुष्टांनी माझ्यावर हल्ला केला,+

पण माझे विरोधक आणि माझे शत्रू स्वतःच अडखळून पडले.

 ३ संपूर्ण सैन्याने जरी माझ्याविरुद्ध छावणी केली,

तरीही माझं हृदय घाबरणार नाही.+

ते माझ्याशी युद्ध करायला आले,

तरीही मी भरवसा ठेवीन.

 ४ मी यहोवाकडे एकच विनंती केली आहे;

माझी एवढीच इच्छा आहे,

की मी आयुष्यभर यहोवाच्या घरात राहावं,+

म्हणजे मला यहोवाचा चांगुलपणा पाहता येईल

आणि त्याच्या मंदिराकडे बघण्याचं* सुख मला मिळेल.+

 ५ कारण संकटाच्या दिवशी तो मला आपल्या आश्रयात लपवेल;+

तो मला त्याच्या तंबूमध्ये, त्याच्या गुप्त ठिकाणी लपवेल;+

तो मला उंच खडकावर ठेवेल.+

 ६ मला घेरणाऱ्‍या शत्रूंवर, मी आता वर्चस्व मिळवलंय;

मी आनंदाने जल्लोष करत त्याच्या तंबूमध्ये बलिदानं अर्पण करीन;

मी यहोवाची स्तुती गाईन.*

 ७ हे यहोवा, मी हाक मारीन तेव्हा माझं ऐक;+

माझ्यावर कृपा कर आणि मला उत्तर दे.+

 ८ “मला शोधा,” या तुझ्या आज्ञेची आठवण

मला माझं मन करून देतं;

हे यहोवा, मी तुझा शोध घेईन.+

 ९ माझ्यापासून तोंड फिरवू नकोस.*+

आपल्या या सेवकाला रागाने घालवून देऊ नकोस.

तू माझा सहायक आहेस;+

माझं तारण करणाऱ्‍या देवा, माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस.

१० माझ्या स्वतःच्या आईवडिलांनी जरी मला सोडून दिलं,+

तरी यहोवा मला जवळ घेईल.+

११ हे यहोवा, तुझा मार्ग मला शिकव,+

माझ्या शत्रूंपासून वाचण्यासाठी मला सरळ मार्गाने ने.

१२ मला माझ्या विरोधकांच्या हाती देऊ नकोस,+

कारण माझ्याविरुद्ध खोटे साक्षीदार उठले आहेत,+

ते माझा घात करण्याच्या धमक्या देतात.

१३ मी जिवंतांच्या देशात यहोवाचा चांगुलपणा पाहीन, असा विश्‍वास मला नसता,

तर आज मी कुठे असतो?*+

१४ यहोवावर आशा ठेव;+

धैर्यवान हो आणि आपलं मन खंबीर कर.+

हो, यहोवावर आशा ठेव.

दावीदचं गीत.

२८ हे यहोवा, तू माझा खडक आहेस;+ मी तुला हाक मारत राहतो;

माझ्या हाकेकडे दुर्लक्ष करू नकोस.

तू मला उत्तर दिलं नाहीस,

तर कबरेत* जाणाऱ्‍यांसारखी माझी स्थिती होईल.+

 २ तुझ्या घराच्या परमपवित्र स्थानाकडे मी हात उंचावतो;+

माझ्या मदतीच्या याचना ऐक.

 ३ मला दुष्टांसोबत, सतत वाईट कृत्यं करणाऱ्‍यांसोबत ओढून नेऊ नकोस.+

ते मनात कपट ठेवून आपल्या शेजाऱ्‍याशी शांतीच्या गोष्टी करतात.+

 ४ त्यांच्या वाईट कृत्यांप्रमाणे

आणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांची परतफेड कर.+

त्यांच्या वागणुकीप्रमाणे

आणि त्यांनी केलेल्या कार्यांप्रमाणे त्यांना मोबदला दे.+

 ५ कारण ते यहोवाच्या कार्यांकडे;

त्याच्या हाताच्या कार्यांकडे जराही लक्ष देत नाहीत.+

तो त्यांना उभारणार नाही, तर त्यांना पाडून टाकेल.

 ६ यहोवाची स्तुती असो!

कारण त्याने माझ्या मदतीच्या याचना ऐकल्या आहेत.

 ७ यहोवा माझी ताकद+ आणि माझी ढाल आहे;+

मी मनापासून त्याच्यावर भरवसा ठेवतो.+

त्याचं साहाय्य मिळाल्यामुळे माझ्या मनाला आनंद झाला आहे.

म्हणून मी गीत गाऊन त्याची स्तुती करीन.

 ८ यहोवा त्याच्या लोकांचं सामर्थ्य आहे;

तो त्यांचा गड आहे; त्याच्या अभिषिक्‍ताचं तो अद्‌भुत रितीने तारण करतो.+

 ९ आपल्या लोकांचं तारण कर; तुझ्या वारशाच्या लोकांना आशीर्वाद दे.+

मेंढपाळाप्रमाणे त्यांची काळजी घे आणि त्यांना सर्वकाळ आपल्या छातीशी धरून ठेव.+

दावीदचं गीत.

२९ शूरवीरांच्या मुलांनो, यहोवाचा सन्मान करा!

यहोवाचा सन्मान करा, कारण तो गौरवशाली आणि सामर्थ्यशाली आहे!+

 २ यहोवाच्या गौरवशाली नावाचा महिमा करा;

पवित्र वस्त्रं घालून* यहोवाला नमन* करा.

 ३ यहोवाचा आवाज ढगांवरून ऐकू येतो;

गौरवशाली देव गर्जना करतो.+

यहोवा दाट मेघांवर उभा आहे.+

 ४ यहोवाचा आवाज किती प्रभावशाली आहे!+

यहोवाचा आवाज किती भारदस्त आहे!

 ५ यहोवाच्या आवाजाने देवदार वृक्ष खाली पडतात;

यहोवाच्या आवाजाने लबानोनचे देवदार वृक्ष कोसळतात.+

 ६ तो लबानोनला* वासरासारख्या उड्या मारायला लावतो,

तो सिर्योनला+ तरण्या रानबैलासारख्या उड्या मारायला लावतो.

 ७ यहोवाच्या आवाजाने अग्निज्वालांचा वर्षाव होतो.+

 ८ यहोवाच्या आवाजामुळे ओसाड रान भीतीने थरथरू लागतं;+

यहोवा कादेशच्या ओसाड रानाचा+ थरकाप उडवतो.

 ९ यहोवाच्या आवाजाने हरिणी भीतीने थरथरू लागतात आणि अकाली प्रसवतात;*

त्याच्या आवाजाने अरण्यातल्या झाडांची पानं गळून पडतात.+

त्याच्या मंदिरातले सर्व जण म्हणतात: “देवाचा गौरव असो!”

१० यहोवा आकाशातल्या महासागरावर* विराजमान आहे;+

यहोवा आपल्या राजासनावर बसून सर्वकाळ राज्य करतो.+

११ यहोवा आपल्या लोकांना सामर्थ्य देईल.+

यहोवा आपल्या लोकांना शांतीचा आशीर्वाद देईल.+

दावीदचं स्तुतिगीत. घराच्या उद्‌घाटनाचं गीत.

३० हे यहोवा, मी तुझा महिमा करीन, कारण तू मला वर आणलं* आहेस;

माझ्या दुःखाबद्दल तू माझ्या शत्रूंना आनंद करू दिला नाहीस.+

 २ हे यहोवा, माझ्या देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली आणि तू मला बरं केलंस.+

 ३ हे यहोवा, तू मला कबरेतून* वर आणलंस.+

तू मला जिवंत ठेवलंस; तू मला खळग्यात* जाण्यापासून वाचवलंस.+

 ४ यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांनो, त्याची स्तुती करा!*+

त्याच्या पवित्र नावाची* उपकारस्तुती करा!+

 ५ कारण त्याचा क्रोध क्षणभरासाठी असतो,+

पण त्याची कृपा* आयुष्यभरासाठी असते.+

संध्याकाळी दुःखाचे अश्रू आले, तरी सकाळी आनंदाचा जल्लोष होईल.+

 ६ जेव्हा मी सुखात होतो, तेव्हा मी म्हणायचो:

“माझं कधीच काही वाईट होणार नाही.”*

 ७ हे यहोवा, माझ्यावर तुझी कृपा* होती, तेव्हा तू मला पर्वतासारखं खंबीर केलंस.+

पण तू माझ्यापासून तोंड फिरवताच,* मी भयभीत झालो.+

 ८ हे यहोवा, मी तुला हाक मारत राहिलो;+

मी यहोवाला कृपेची याचना करत राहिलो.

 ९ माझा मृत्यू झाला आणि मी कबरेत* गेलो, तर काय उपयोग?+

माती तुझी स्तुती करेल का?+ ती तुझ्या विश्‍वासूपणाचं वर्णन करेल का?+

१० हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्यावर कृपा कर.+

हे यहोवा, माझा सहायक हो.+

११ मी शोक करत होतो, पण तू मला आनंदाने नाचायला लावलंस;

मी पांघरलेलं गोणपाट काढून, तू मला आनंदाचं वस्त्र घातलंस.

१२ मी शांत राहू नये, तर तुझी स्तुती करावी म्हणून तू असं केलंस.

हे यहोवा, माझ्या देवा, मी सर्वकाळ तुझी स्तुती करीन!

दावीदचं गीत. संचालकासाठी.

३१ हे यहोवा, मी तुझा आश्रय घेतलाय.+

मला कधीच लज्जित होऊ देऊ नकोस.+

तुझ्या नीतिमत्त्वामुळे माझी सुटका कर.+

 २ माझी प्रार्थना ऐक.*

माझी सुटका करायला लवकर ये.+

माझ्यासाठी पर्वतावरच्या गडासारखा हो;

सुरक्षित आश्रय होऊन मला वाचव.+

 ३ कारण तू माझा खडक आणि माझा गड आहेस;+

तुझ्या नावासाठी+ तू मला मार्ग दाखवशील आणि सांभाळशील.+

 ४ त्यांनी गुप्तपणे माझ्यासाठी पसरलेल्या जाळ्यातून तू मला सोडवशील,+

कारण तू माझा दुर्ग आहेस.+

 ५ मी आपलं जीवन तुझ्या हातात सोपवतो.+

हे यहोवा, सत्याच्या देवा,*+ तू मला सोडवलं आहेस.

 ६ बिनकामाच्या, निरुपयोगी मूर्तींची उपासना करणाऱ्‍यांचा मी द्वेष करतो;

माझा भरवसा तर यहोवावर आहे.

 ७ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे मी मनापासून आनंदी होईन,

कारण तू माझं दुःख पाहिलं आहेस;+

मला* होणाऱ्‍या यातना तू जाणतोस.

 ८ तू मला शत्रूंच्या हाती दिलं नाहीस;

तर एका सुरक्षित* ठिकाणी तू मला उभं केलं आहेस.

 ९ हे यहोवा, माझ्यावर कृपा कर, कारण मी दुःखी आहे.

शोकाने माझी नजर आणि माझं सगळं शरीर कमजोर झालंय.+

१० दुःखाने माझं जीवन संपवून टाकलंय+

आणि कण्हण्यात माझं आयुष्य गेलंय.+

माझ्या अपराधामुळे मी दुर्बळ झालोय;

माझी हाडं झिजली आहेत.+

११ माझे सर्व शत्रू, खासकरून माझे शेजारी

मला तुच्छ लेखतात.+

माझ्या ओळखीचे लोक मला घाबरतात;

चारचौघांत मला पाहिल्यावर, ते माझ्यापासून दूर पळतात.+

१२ त्यांनी माझी आठवण मनातून काढून टाकली आहे;

मेलेल्या माणसाप्रमाणे ते मला विसरून गेले आहेत.

माझी अवस्था एखाद्या फुटलेल्या रांजणासारखी झाली आहे.

१३ भीतीने मला घेरलंय,+

कारण मी बऱ्‍याच खोट्या अफवा ऐकल्या आहेत.

ते माझ्याविरुद्ध एकत्र येऊन,

मला मारून टाकण्याचा* कट रचतात.+

१४ पण हे यहोवा, माझा तुझ्यावर भरवसा आहे.+

मी म्हणतो, “तू माझा देव आहेस.”+

१५ माझं आयुष्य* तुझ्या हातात आहे.

माझ्या शत्रूंपासून आणि माझा छळ करणाऱ्‍यांपासून माझी सुटका कर.+

१६ तुझ्या या सेवकावर कृपा कर.+

तुझ्या एकनिष्ठ प्रेमापोटी मला वाचव.

१७ हे यहोवा, मी तुला हाक मारीन, तेव्हा मला लज्जित होऊ देऊ नकोस.+

दुष्टांची लाजिरवाणी स्थिती होऊ दे;+

ते कबरेत* कायमचे गप्प होवोत.+

१८ खोटं बोलणारे मुके होऊ दे,+

नीतिमानांना तुच्छ लेखून, त्यांच्याशी गर्विष्ठपणे आणि उद्धटपणे बोलणाऱ्‍यांची वाचा जाऊ दे.

१९ तुझा चांगुलपणा किती विशाल आहे!+

तुझं भय मानणाऱ्‍यांसाठी तू तो साठवून ठेवला आहेस.+

तुझा आश्रय घेणाऱ्‍यांसाठी, तू तो सर्व लोकांसमोर प्रकट करतोस.+

२० तू त्यांना माणसांच्या कटकारस्थानांपासून,

आपल्या जवळ, एका गुप्त ठिकाणी लपवशील;+

तू निंदा करणाऱ्‍यांच्या हल्ल्यांपासून,*

त्यांना आपल्या आश्रयात लपवशील.+

२१ यहोवाची स्तुती असो!

कारण त्याने वेढा पडलेल्या शहरात,+ अद्‌भुत रितीने माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखवलंय.+

२२ मी तर घाबरलो आणि म्हणालो:

“तुझ्या डोळ्यांसमोर मी मरून जाईन.”+

पण मी तुला हाक मारली, तेव्हा तू माझ्या याचना ऐकल्यास.+

२३ यहोवाच्या सर्व एकनिष्ठ सेवकांनो, त्याच्यावर प्रेम करा!+

यहोवा विश्‍वासू लोकांचं रक्षण करतो,+

पण गर्विष्ठपणे वागणाऱ्‍यांची तो चांगलीच परतफेड करतो.+

२४ यहोवाची वाट पाहणाऱ्‍यांनो,+

धैर्यवान व्हा! आपलं मन खंबीर करा!+

दावीदचं गीत. मस्कील.*

३२ सुखी आहे तो माणूस, ज्याच्या अपराधांची क्षमा करण्यात आली आहे आणि ज्याचं पाप झाकण्यात आलं आहे!+

 २ सुखी आहे तो माणूस, ज्याला यहोवा दोषी ठरवत नाही+

आणि ज्याच्या मनात कपट नाही!

 ३ मी गप्प राहिलो, तेव्हा दिवसभर कण्हून कण्हून

माझी हाडं झिजू लागली.+

 ४ कारण रात्रंदिवस तुझ्या नाराजीचं* दडपण माझ्या मनावर होतं.+

उन्हाच्या तापाने पाणी सुकून जातं, तशी माझी ताकद नाहीशी झाली. (सेला )

 ५ शेवटी मी माझं पाप तुझ्याजवळ कबूल केलं;

मी माझी चूक लपवली नाही.+

मी म्हणालो: “मी यहोवाजवळ आपले अपराध कबूल करीन.”+

तेव्हा तू माझ्या चुकांची, माझ्या पापांची क्षमा केलीस.+ (सेला )

 ६ म्हणूनच, तू सापडू शकतोस तोपर्यंत+

प्रत्येक एकनिष्ठ माणसाने तुला प्रार्थना करावी.+

मग महापूर आला, तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही.

 ७ तू माझा आश्रय आहेस;

तू मला संकटापासून सुरक्षित ठेवशील.+

सुटकेच्या जल्लोषाने तू मला वेढशील.+ (सेला )

 ८ तू म्हणालास, “मी तुला सखोल समज देईन आणि ज्या मार्गाने तू गेलं पाहिजे तो तुला दाखवीन.+

मी तुझ्याकडे लक्ष देऊन* तुला सल्ला देईन.+

 ९ बुद्धी नसलेल्या घोड्यासारखे किंवा खेचरासारखे होऊ नका;+

त्यांना आवरण्यासाठी लगाम किंवा दोरी लागते,

तेव्हाच ते तुमच्याजवळ येतात.”

१० दुष्टाला पुष्कळ दुःखं भोगावी लागतात;

पण यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यावर तो आपल्या एकनिष्ठ प्रेमाची पाखर घालतो.*+

११ नीतिमान लोकांनो, यहोवामुळे आनंद करा आणि हर्षित व्हा;

सरळ मनाच्या लोकांनो, आनंदाने जयजयकार करा.

३३ नीतिमान लोकांनो, यहोवामुळे आनंदाने जयजयकार करा!+

सरळ मनाच्या लोकांनी त्याची स्तुती करणं योग्य आहे.

 २ वीणा* वाजवून यहोवाला धन्यवाद द्या;

मोठी वीणा वाजवून त्याची स्तुती गा.*

 ३ कुशलपणे वाद्य वाजवून, आनंदाने जल्लोष करत

त्याच्यासाठी एक नवीन गीत गा.+

 ४ कारण यहोवाचा शब्द खरा आहे,+

आणि त्याची सर्व कार्यं भरवशालायक आहेत.

 ५ न्याय आणि नीती त्याला प्रिय आहेत.+

सबंध पृथ्वी यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाने भरलेली आहे.+

 ६ यहोवाच्या शब्दाने आकाश निर्माण करण्यात आलं,+

त्याच्या श्‍वासाने त्यातलं सर्वकाही* अस्तित्वात आलं.

 ७ बांध घालून अडवावं, तसं तो महासागरांचं पाणी अडवतो;+

तो उसळतं पाणी कोठारांत साठवतो.

 ८ पृथ्वीवरच्या सर्व लोकांनी यहोवाचं भय मानावं.+

जगातल्या रहिवाशांनी त्याचा धाक बाळगावा.

 ९ कारण तो बोलला आणि सर्वकाही अस्तित्वात आलं;+

त्याने आज्ञा दिली आणि ते स्थिर झालं.+

१० यहोवाने राष्ट्रांच्या योजना निष्फळ केल्या आहेत;+

त्याने त्यांचे संकल्प* धुळीला मिळवले आहेत.+

११ पण यहोवाचे निर्णय सर्वकाळ टिकून राहतील;+

त्याच्या मनातले विचार पिढ्या न्‌ पिढ्या कायम राहतात.

१२ ज्या राष्ट्राचा देव यहोवा आहे;

ज्या लोकांना त्याने आपली संपत्ती म्हणून निवडलंय, ते सुखी आहेत!+

१३ यहोवा स्वर्गातून खाली पाहतो;

तो सर्व माणसांना न्याहाळतो.+

१४ आपल्या निवासस्थानातून,

तो पृथ्वीच्या रहिवाशांना पाहतो.

१५ तोच सर्वांचं हृदय घडवतो;

तो त्यांच्या सर्व कार्यांचं परीक्षण करतो.+

१६ मोठ्या सैन्यामुळे राजाचं रक्षण होत नाही;+

अफाट सामर्थ्य शूरवीराला वाचवू शकत नाही.+

१७ विजय मिळवण्यासाठी* घोड्यावर भरवसा ठेवणं व्यर्थ आहे;+

त्याची प्रचंड ताकद सुटकेची खातरी देऊ शकत नाही.

१८ पाहा! यहोवाचं भय मानणाऱ्‍यांवर;

त्याच्या एकनिष्ठ प्रेमाची आस धरणाऱ्‍यांवर त्याची नजर असते.+

१९ तो त्यांना* मृत्यूपासून वाचवतो

आणि दुष्काळातही जिवंत ठेवतो.+

२० आमचे डोळे यहोवाकडे लागले आहेत.

तोच आमचा सहायक आणि आमची ढाल आहे.+

२१ आमच्या मनाला त्याच्यामुळे आनंद होतो,

कारण आम्ही त्याच्या पवित्र नावावर भरवसा ठेवतो.+

२२ हे यहोवा, आम्ही तुझी वाट पाहत आहोत.+

तू नेहमी आमच्यावर एकनिष्ठ प्रेम करत राहा.+

दावीदचं गीत. त्याने अबीमलेखसमोर वेड्याचं सोंग घेतलं+ आणि अबीमलेखने त्याला हाकलून लावल्यावर जेव्हा तो निघून गेला, तेव्हा रचलेलं गीत.

א [आलेफ ]

३४ मी नेहमी यहोवाची स्तुती करीन;

त्याची स्तुती सतत माझ्या ओठांवर असेल.

ב [बेथ ]

 २ मी यहोवाबद्दल बढाई मारीन;+

नम्र लोक ऐकतील आणि त्यांना आनंद होईल.

ג [गिमेल ]

 ३ माझ्यासोबत यहोवाचा महिमा करा;+

आपण सर्व मिळून त्याच्या नावाची स्तुती करू.

ד [दालेथ ]

 ४ मी यहोवाकडे एक विनंती केली आणि त्याने मला उत्तर दिलं.+

माझ्या सर्व भयांपासून त्याने मला सोडवलं.+

ה [हे ]

 ५ त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांचे चेहरे प्रसन्‍न झाले;

त्यांना लज्जित व्हावं लागलं नाही.

ז [झाइन ]

 ६ या तुच्छ माणसाने हाक मारली आणि यहोवाने ती ऐकली.

त्याने त्याला सर्व संकटांतून सोडवलं.+

ח [हेथ ]

 ७ यहोवाची भीती बाळगणाऱ्‍यांभोवती त्याचा स्वर्गदूत छावणी करतो,+

आणि तो त्यांची सुटका करतो.+

ט [तेथ ]

 ८ यहोवा किती चांगला आहे, याची पारख करून पाहा;*+

त्याचा आश्रय घेणारा सुखी असतो!

י [योद ]

 ९ यहोवाच्या सर्व पवित्र सेवकांनो, त्याची भीती बाळगा,

त्याची भीती बाळगणाऱ्‍यांना काहीच कमी पडत नाही.+

כ [खाफ ]

१० तरुण, ताकदवान सिंहांचीही* एकवेळ उपासमार होईल,

पण यहोवाचा शोध घेणाऱ्‍यांना काहीच कमी पडणार नाही.+

ל [लामेद ]

११ माझ्या मुलांनो, या आणि मी सांगतो ते ऐका;

मी तुम्हाला यहोवाची भीती बाळगायला शिकवीन.+

מ [मेम ]

१२ तुमच्यापैकी कोणाला जीवनात सुखी व्हायचंय?

कोणाला आयुष्यात भरपूर आनंदाचे दिवस पाहायचे आहेत?+

נ [नून ]

१३ त्याने आपली जीभ वाईट गोष्टी बोलण्यापासून;+

आणि आपलं तोंड कपटीपणाच्या गोष्टींपासून आवरावं.+

ס [सामेख ]

१४ वाइटापासून वळून, चांगलं ते करा;+

शांती टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करा.+

ע [आयन ]

१५ यहोवाची नजर नीतिमानांवर असते,+

तो त्यांची मदतीची याचना ऐकतो.+

פ [पे ]

१६ पण वाईट गोष्टी करणाऱ्‍यांकडे यहोवा पाठ फिरवतो;

तो पृथ्वीवरून त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकतो.+

צ [सादे ]

१७ नीतिमान लोकांनी हाक मारली आणि यहोवाने ती ऐकली;+

त्यांच्या सर्व संकटांपासून त्याने त्यांना सोडवलं.+

ק [खुफ ]

१८ यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो;+

मनाने खचलेल्यांना* तो वाचवतो.+

ר [रेश ]

१९ नीतिमान माणसावर बरेच कठीण प्रसंग* येतात,+

पण त्या सर्वांतून यहोवा त्याला वाचवतो.+

ש [शिन ]

२० त्याच्या सगळ्या हाडांचं तो रक्षण करतो;

त्यांतलं एकही मोडण्यात आलं नाही.+

ת [ताव ]

२१ संकटामुळे दुष्टाचा मृत्यू होईल,

नीतिमानांचा द्वेष करणाऱ्‍यांना दोषी ठरवलं जाईल.

२२ यहोवा आपल्या सेवकांचा जीव वाचवतो;*

त्याचा आश्रय घेणाऱ्‍या कोणालाही दोषी ठरवलं जाणार नाही.+

दावीदचं गीत.

३५ हे यहोवा, माझ्या विरोधकांशी माझ्या बाजूने वाद कर;+

माझ्याशी लढणाऱ्‍यांविरुद्ध लढ.+

 २ तुझी छोटी ढाल* घे; तुझी मोठी ढालही हाती घे+

आणि माझा बचाव करण्यासाठी ऊठ.+

 ३ माझा पाठलाग करणाऱ्‍यांविरुद्ध तुझा भाला आणि कुऱ्‍हाड* उचल.+

“मी तुझं तारण करणारा आहे,” असं मला म्हण.+

 ४ माझ्या जिवावर उठलेल्यांना लज्जित आणि अपमानित होऊ दे.+

माझा नाश करण्याचं षड्यंत्र रचणाऱ्‍यांना, शरमेने माघार घ्यायला लाव.

 ५ त्यांना वाऱ्‍यावर उडून जाणाऱ्‍या भुशासारखं होऊ दे;

यहोवाचा स्वर्गदूत त्यांना हाकलून लावो.+

 ६ यहोवाचा स्वर्गदूत त्यांचा पाठलाग करेल

तेव्हा त्यांच्या वाटेवर अंधार होऊ दे आणि त्यांचा पाय घसरू दे.

 ७ कारण त्यांनी विनाकारण मला पकडण्यासाठी जाळं लपवून ठेवलंय;

त्यांनी विनाकारण माझ्यासाठी खड्डा खणलाय.

 ८ त्यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांच्यावर संकट कोसळू दे;

त्यांनी लपवलेल्या जाळ्यात त्यांनाच अडकू दे;

त्यात पडून त्यांचा नाश होऊ दे.+

 ९ पण मी* यहोवामुळे आनंद करीन;

त्याच्या तारणाच्या कार्यांमुळे मी हर्षित होईन.

१० माझी सगळी हाडं म्हणतील:

“हे यहोवा, तुझ्यासारखा कोण आहे?

तू बलवानांच्या हातून असाहाय्य लोकांना वाचवतोस,+

निराधार आणि गरीब लोकांना तू लुबाडणाऱ्‍यांपासून वाचवतोस.”+

११ दुष्ट साक्षीदार पुढे येतात,+

मला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल ते मला प्रश्‍न विचारतात.

१२ ते माझ्या चांगल्या वागणुकीची परतफेड वाइटाने करून,+

मला* शोक करायला लावतात.

१३ ते आजारी पडले, तेव्हा मी गोणपाट पांघरलं;

मी उपास करून माझ्या जिवाला त्रास दिला.

आणि मी त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेचं जेव्हा उत्तर मिळालं नाही,

१४ तेव्हा एखादा मित्र किंवा स्वतःचा भाऊ गेल्यासारखा, मी शोक करत फिरलो;

आईसाठी शोक करणाऱ्‍यासारखा मी दुःखाने वाकलो.

१५ पण जेव्हा मी अडखळलो, तेव्हा त्यांनी एकत्र जमून आनंद साजरा केला;

माझ्यावर अचानक हल्ला करण्यासाठी ते सगळे टपून बसले;

त्यांनी माझ्या चिंधड्या उडवल्या; ते गप्प बसले नाहीत.

१६ अधर्मी मला तुच्छ लेखून माझी थट्टा करतात,*

ते माझ्यावर दातओठ खातात.+

१७ हे यहोवा, तू कधीपर्यंत नुसताच बघत राहशील?+

त्यांच्या हल्ल्यांपासून मला* वाचव,+

तरुण सिंहांपासून* माझ्या अनमोल जीवनाचं* रक्षण कर.+

१८ मग मी मोठ्या मंडळीत तुझी उपकारस्तुती करीन;+

आणि लोकांच्या समुदायात तुझं गुणगान करीन.

१९ विनाकारण माझे शत्रू बनलेल्यांना, माझ्या संकटाबद्दल आनंद करू देऊ नकोस;

विनाकारण माझा द्वेष करणाऱ्‍यांना,+ दुष्टपणे डोळे मिचकावू देऊ नकोस.+

२० कारण ते शांतीच्या गोष्टी करत नाहीत,

तर देशातल्या शांतिप्रिय लोकांविरुद्ध दुष्ट योजना करत राहतात.+

२१ ते मोठमोठ्याने हसून माझ्यावर आरोप लावतात,

ते म्हणतात, “हो, तूच केलंस! आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं.”

२२ हे यहोवा, तू हे पाहिलं आहेस. म्हणून गप्प बसू नकोस.+

हे यहोवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.+

२३ ऊठ आणि माझ्या वतीने लढ.

हे यहोवा, माझ्या देवा, माझ्या बाजूने वाद कर.

२४ हे यहोवा, माझ्या देवा, तू नीतिमान आहेस. तूच माझा न्याय कर;+

त्यांना माझ्या संकटाबद्दल आनंद करू देऊ नकोस.

२५ “बरं झालं! आपल्याला हवं होतं, तसंच घडलं,” असं म्हणण्याची त्यांना कधी संधी देऊ नकोस.

“आम्ही त्याला गिळून टाकलं,” असं त्यांना म्हणू देऊ नकोस.+

२६ जे माझ्या संकटाबद्दल आनंद करतात,

त्या सर्वांना लज्जित आणि अपमानित होऊ दे.

माझ्यावर मोठेपणा मिरवणारे शरमेने आणि अपमानाने झाकले जावोत.

२७ पण माझ्या नीतिमत्त्वाबद्दल आनंद करणाऱ्‍यांना जल्लोष करू दे;

त्यांनी सतत असं म्हणावं:

“यहोवाचा गौरव असो. त्याच्या सेवकाला शांती मिळाल्याने त्याला आनंद होतो.”+

२८ मग मी आपल्या जिभेने तुझ्या नीतिमत्त्वाचं वर्णन करीन.*+

मी दिवसभर तुझी स्तुती करीन.+

यहोवाचा सेवक दावीद याचं गीत. संचालकासाठी.

३६ दुष्टाचा अपराध त्याच्या मनाशी बोलतो;

देवाची भीती त्याला माहीतच नाही.+

 २ तो मनातल्या मनात स्वतःची इतकी प्रशंसा करतो,

की त्याला आपला अपराध दिसत नाही आणि त्याबद्दल घृणाही वाटत नाही.+

 ३ त्याच्या तोंडचे शब्द कपटीपणाचे आणि हानिकारक असतात;

चांगलं ते करण्याची सखोल समज त्याच्याजवळ नाही.

 ४ तो बिछान्यावर पडल्या-पडल्या इतरांचं नुकसान करण्याचे बेत आखतो.

त्याने चुकीचा मार्ग धरलाय;

तो वाईट गोष्टी नाकारत नाही.

 ५ हे यहोवा, तुझं एकनिष्ठ प्रेम आकाशाला भिडलंय,+

तुझा विश्‍वासूपणा आभाळापर्यंत पोहोचलाय.

 ६ तुझं नीतिमत्त्व भव्य पर्वतांसारखं* आहे;+

तुझे निर्णय विशाल, अथांग सागरासारखे आहेत.+

हे यहोवा, तू माणसाला आणि प्राण्यांना सांभाळतोस.*+

 ७ हे देवा, तुझं एकनिष्ठ प्रेम किती अनमोल आहे!+

तुझ्या पंखांच्या छायेत माणसं आश्रय घेतात.+

 ८ तुझ्या घरातल्या उत्कृष्ट गोष्टींनी ते तृप्त होतात;+

तुझ्या सुखांच्या भरून वाहणाऱ्‍या नदीतून तू त्यांना पिऊ देतोस.+

 ९ जीवनाचा उगम तुझ्याजवळ आहे;+

तुझ्या प्रकाशानेच आम्हाला प्रकाश दिसतो.+

१० तुला ओळखणाऱ्‍यांना तू नेहमी एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा,+

सरळ मनाच्या लोकांना तुझं नीतिमत्त्व पाहू दे.+

११ मला तुडवण्याची गर्विष्ठ माणसाला संधी देऊ नकोस

मला हाकलून लावण्याची दुष्टाला परवानगी देऊ नकोस.

१२ पाहा! अपराधी तिथे पडले आहेत;

तू त्यांना खाली पाडलं आहेस आणि त्यांना उठता येत नाही.+

दावीदचं गीत.

א [आलेफ ]

३७ दुष्ट माणसांमुळे संतापू नकोस

किंवा दुर्जनांचा हेवा करू नकोस.+

 २ ते पाहता पाहता गवतासारखे सुकून जातील+

आणि कोवळ्या, हिरव्यागार गवतासारखे कोमेजून जातील.

ב [बेथ ]

 ३ यहोवावर भरवसा ठेव आणि चांगलं ते कर;+

देशात* राहा आणि विश्‍वासूपणे वाग.+

 ४ यहोवालाच आपला सर्वात मोठा आनंद मान,

म्हणजे तो तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल.

ג [गिमेल ]

 ५ आपला मार्ग यहोवाच्या हाती सोपवून दे;+

त्याच्यावर विसंबून राहा, म्हणजे तो तुझ्या वतीने कार्य करेल.+

 ६ तो तुझं नीतिमत्त्व पहाटेच्या प्रकाशासारखं

आणि तुझा न्याय दुपारच्या उन्हासारखा चमकू देईल.

ד [दालेथ ]

 ७ यहोवापुढे शांत राहा+

आणि आतुरतेने* त्याची वाट पाहा.

आपल्या दुष्ट योजना सफल करणाऱ्‍या माणसामुळे

संतापू नकोस.+

ה [हे ]

 ८ राग सोडून दे आणि क्रोध झटकून टाक;+

संतापाच्या भरात वाईट गोष्टी करू नकोस.*

 ९ कारण दुष्ट लोकांचा नाश होईल,+

पण जे यहोवाची आशा धरतात त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.+

ו [वाव ]

१० थोड्याच काळाने दुष्ट लोक नाहीसे होतील;+

त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी तू त्यांना शोधलंस,

तरी ते तुला सापडणार नाहीत.+

११ पण नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल,+

भरपूर शांती असल्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.+

ז [झाइन ]

१२ दुष्ट माणूस नीतिमानाविरुद्ध षड्यंत्र करतो;+

तो त्याच्यावर दातओठ खातो.

१३ पण यहोवा त्या दुष्टावर हसेल,

कारण त्याच्या नाशाचा दिवस येणार, हे त्याला माहीत असतं.+

ח [हेथ ]

१४ दीनदुबळ्यांना आणि गोरगरिबांना खाली पाडण्यासाठी;

सरळ मार्गाच्या लोकांची कत्तल करण्यासाठी,

दुष्ट आपल्या तलवारी उपसतात आणि आपली धनुष्यं ताणतात.

१५ पण त्यांची तलवार त्यांच्याच हृदयात शिरेल;+

त्यांची धनुष्यं मोडून टाकली जातील.

ט [तेथ ]

१६ नीतिमानाजवळ थोडं थोडकंच असलं,

तरी बऱ्‍याच दुष्ट लोकांच्या समृद्धीपेक्षा ते चांगलं आहे.+

१७ कारण दुष्टांचे हात तोडून टाकले जातील,

पण नीतिमानांना यहोवा आधार देईल.

י [योद ]

१८ निर्दोष माणसांच्या परिस्थितीची* यहोवाला जाणीव असते,

त्यांचा वारसा सर्वकाळ टिकून राहील.+

१९ संकटाच्या काळात त्यांना लज्जित व्हावं लागणार नाही;

दुष्काळातही त्यांच्याजवळ भरपूर अन्‍न असेल.

כ [खाफ ]

२० पण दुष्टांचा नाश होईल;+

यहोवाचे शत्रू कुरणांतल्या हिरव्यागार गवतासारखे सुकून जातील;

ते धुरासारखे नाहीसे होतील.

ל [लामेद ]

२१ दुष्ट माणूस उसनं घेऊन परत देत नाही,

पण नीतिमान माणूस मोठ्या मनाचा* आणि उदार असतो.+

२२ देव ज्यांना आशीर्वाद देतो त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल,

पण तो ज्यांना शाप देतो त्यांचा नाश होईल.+

מ [मेम ]

२३ यहोवाला एखाद्या माणसाच्या वागणुकीमुळे आनंद होतो,+

तेव्हा तो त्याच्या पावलांना वाट दाखवतो.*+

२४ असा माणूस अडखळला, तरी जमिनीवर आपटणार नाही,+

कारण यहोवा आपल्या हाताने त्याला सावरेल.+

נ [नून ]

२५ मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय,

पण आजपर्यंत मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं,+

किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्‍नासाठी* भीक मागत असलेलं पाहिलं नाही.+

२६ तो गरजूंना नेहमी उदारपणे मदत करतो,+

त्याच्या मुलाबाळांना देवाकडून आशीर्वाद मिळतात.

ס [सामेख ]

२७ वाइटापासून फिरून चांगलं ते कर,+

म्हणजे तू सर्वकाळ टिकून राहशील.

२८ कारण यहोवा न्यायप्रिय आहे,

तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना सोडून देणार नाही.+

ע [आयन ]

ते नेहमी सुरक्षित राहतील;+

पण, दुष्टांच्या वंशजांचा नाश केला जाईल.+

२९ नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल,+

आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.+

פ [पे ]

३० नीतिमान माणसाच्या तोंडून बुद्धीचे बोल निघतात,*

त्याची जीभ न्यायाबद्दल सांगते.+

३१ देवाचं नियमशास्त्र त्याच्या हृदयात असतं.+

त्याची पावलं कधीही अडखळणार नाहीत.+

צ [सादे ]

३२ दुष्ट माणूस नीतिमानावर टपलेला असतो,

त्याचा जीव घेण्याची तो संधी शोधत असतो.

३३ पण यहोवा नीतिमानाला त्याच्या हाती देणार नाही;+

न्याय करताना तो नीतिमानाला दोषी ठरवणार नाही.+

ק [खुफ ]

३४ यहोवाची आशा धर आणि त्याच्या मार्गावर चाल,

म्हणजे तो तुझा गौरव करून तुला पृथ्वीचा वारसा देईल.

दुष्टांचा नाश होईल,+ तेव्हा तू पाहशील.+

ר [रेश ]

३५ मी दुष्ट आणि क्रूर माणसाला,

आपल्या मातीत जोमाने वाढणाऱ्‍या हिरव्यागार झाडासारखं बहरताना पाहिलंय.+

३६ पण तो अचानक गेला आणि कायमचा नाहीसा झाला;+

मी त्याला शोधत राहिलो, तरी तो सापडला नाही.+

ש [शिन ]

३७ निर्दोष माणसाकडे* लक्ष दे

आणि सरळ मनाच्या माणसाला+ पाहा,

कारण त्याला भविष्यात शांती लाभेल.+

३८ पण सर्व अपराध्यांचा नाश केला जाईल;

दुष्टांच्या भविष्याचा अंत होईल.+

ת [ताव ]

३९ यहोवा नीतिमानांचं तारण करतो;+

संकटाच्या काळात तो त्यांचा दुर्ग होतो.+

४० यहोवा त्यांना साहाय्य करेल आणि त्यांची सुटका करेल.+

त्यांना दुष्टांच्या हातून सोडवून, तो त्यांचा बचाव करेल,

कारण ते त्याचा आश्रय घेतात.+

आठवण करून देणारं दावीदचं गीत.

३८ हे यहोवा, रागाच्या भरात मला ताडन करू नकोस,

क्रोधाच्या भरात मला शिक्षा करू नकोस.+

 २ कारण तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत,

तुझ्या नाराजीचं* दडपण माझ्यावर आहे.+

 ३ तुझ्या रागामुळे माझ्या सगळ्या शरीराला रोगांनी ग्रासलंय.*

माझ्या पापामुळे मला* जराही शांती नाही.+

 ४ कारण माझ्या अपराधांची रास माझ्या डोक्याच्याही वर गेली आहे.+

त्यांचं भयानक ओझं आता मला सहन होत नाही.

 ५ माझ्या मूर्खपणामुळे

माझ्या जखमा चिघळल्या आहेत आणि त्यांतून दुर्गंधी येत आहे.

 ६ मी दुःखाने पार खचून गेलोय;

दिवसभर मी खिन्‍नपणे फिरतो.

 ७ माझ्या अंगाची लाही लाही झाली आहे.

माझं संपूर्ण शरीर रोगांनी ग्रासलंय.+

 ८ मी सुन्‍न पडलोय आणि पार चिरडून गेलोय;

माझ्या हृदयाच्या वेदनांमुळे मी तळमळून ओरडतोय.

 ९ हे यहोवा, माझ्या सर्व इच्छा तुझ्यासमोर आहेत

आणि माझे उसासे तुझ्यापासून लपलेले नाहीत.

१० माझं हृदय काळजीमुळे बेचैन झालंय, माझ्यात त्राण उरला नाही,

माझ्या डोळ्यांचा प्रकाश नाहीसा झालाय.+

११ माझ्या पीडेमुळे माझे मित्र आणि साथीदार मला टाळतात;

माझे जवळचे सोबतीसुद्धा माझ्यापासून दूर राहतात.

१२ माझा जीव घेऊ पाहणारे सापळे रचतात;

मला इजा करू पाहणारे, माझा नाश करण्याची भाषा करतात;+

दिवसभर ते कपटी योजना करत राहतात.

१३ पण मी बहिरा असल्यासारखा, ऐकत नाही;+

मुका असल्यासारखा, तोंड उघडत नाही.+

१४ मी ऐकू न येणाऱ्‍या माणसासारखा झालोय;

तो आपला बचाव करण्यासाठी काहीच बोलू शकत नाही.

१५ कारण हे यहोवा, मी तुझी वाट पाहिली,+

हे यहोवा, माझ्या देवा, तू मला उत्तर दिलंस.+

१६ कारण मी म्हणालो: “माझ्या संकटांमुळे त्यांना आनंद करू देऊ नकोस,

किंवा माझा पाय घसरल्यामुळे त्यांना माझ्यावर वरचढ होऊ देऊ नकोस.”

१७ मला सतत वेदना होत होत्या,+

मी कोसळण्याच्या बेतात होतो.

१८ माझ्या पापामुळे मी अस्वस्थ झालो होतो;+

मी माझा अपराध कबूल केला.+

१९ माझे शत्रू शक्‍तिशाली आणि उत्साही* आहेत,

विनाकारण माझा द्वेष करणारे पुष्कळ झाले आहेत.*

२० ते माझ्या चांगल्या वागणुकीची परतफेड वाइटाने करतात;

चांगलं ते करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, ते माझा विरोध करतात.

२१ हे यहोवा, मला सोडून देऊ नकोस.

हे देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.+

२२ हे यहोवा, तू माझं तारण करणारा आहेस.+

माझ्या मदतीला धावून ये.

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. यदूथून*+ याच्या चालीवर गायलं जावं.

३९ मी म्हणालो: “आपल्या जिभेने पाप करू नये+

म्हणून मी सांभाळीन.

दुष्ट माणूस माझ्यासमोर असेपर्यंत,

मी आपल्या तोंडाला लगाम घालीन.”*+

 २ मी गप्प बसलो आणि शांत राहिलो;+

चांगल्या गोष्टींबद्दलही बोललो नाही.

पण माझं दुःख असह्‍य झालं.

 ३ माझं हृदय आतल्या आत धुमसत होतं.*

मी विचार करू लागलो,* तेव्हा माझ्या मनात आग धगधगत होती.

मग मी म्हणालो:

 ४ “हे यहोवा माझं आयुष्य अगदी थोडं आहे;

आणि मला मोजकेच दिवस देण्यात आले आहेत, हे ओळखायला मला मदत कर.+

माझं जीवन किती क्षणभंगुर* आहे हे मला कळू दे.

 ५ खरंच, तू मला अगदी थोडे दिवस* दिले आहेस;+

माझा जीवनकाळ तुझ्यापुढे काहीच नाही.+

माणूस कितीही खंबीर वाटत असला, तरी तो नुसता श्‍वासासारखा आहे.+ (सेला )

 ६ खरंच, माणूस सावलीसारखा फिरत असतो.

तो उगाचच धावपळ* करत राहतो.

तो संपत्ती साठवतो, पण तिचा उपभोग कोण घेईल हे त्याला माहीत नसतं.+

 ७ हे यहोवा, मग मी कशाची आशा बाळगू?

तूच माझी एकमेव आशा आहेस.

 ८ माझ्या सगळ्या अपराधांपासून मला वाचव.+

मला तुच्छ लेखण्याची मूर्ख माणसाला संधी देऊ नकोस.

 ९ मी अबोल झालो;

मला तोंड उघडता येईना,+

कारण हे सर्व तू केलं होतंस.+

१० तू माझ्यावर आणलेली पीडा दूर कर.

तुझ्या हाताच्या तडाख्यांमुळे मी अगदी गळून गेलोय.

११ तू माणसाच्या अपराधाची शिक्षा देऊन त्याला सुधारतोस;+

कपड्यांना जशी कसर लागते, तसा तू, त्याने साठवलेल्या मौल्यवान गोष्टी खाऊन टाकतोस.

खरंच, माणूस फक्‍त श्‍वासासारखा आहे.+ (सेला )

१२ हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक.

माझी मदतीची याचना ऐक.+

माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करू नकोस.

कारण माझ्या सर्व वाडवडिलांसारखाच मीही तुझ्यासमोर एखाद्या विदेश्‍यासारखा,+

तात्पुरत्या आलेल्या एखाद्या प्रवाशासारखा* आहे.+

१३ माझा मृत्यू होऊन मी कायमचा निघून जाण्याआधी,

तुझी निष्ठुर नजर माझ्यावरून हटव, म्हणजे मी आनंदी होईन.”

दावीदचं गीत. संचालकासाठी.

४० मी यहोवाची मनापासून आशा धरली,*

तेव्हा त्याने माझ्याकडे लक्ष दिलं* आणि माझी मदतीची याचना ऐकली.+

 २ त्याने उसळत्या पाण्याच्या खळग्यातून मला वर आणलं,

दलदलीतून मला बाहेर ओढलं.

त्याने मला खडकावर उभं केलं;

त्याने माझी पावलं स्थिर केली.

 ३ मग त्याने मला एक नवीन गीत शिकवलं.*+

देवाच्या स्तुतीचं गीत!

पुष्कळ जण विस्मयाने पाहतील

आणि यहोवावर भरवसा ठेवतील.

 ४ जो माणूस यहोवावर भरवसा ठेवतो;

जो बंडखोरी करणाऱ्‍यांवर किंवा खोटं बोलणाऱ्‍यांवर विसंबून राहत नाही, तो सुखी आहे!

 ५ हे यहोवा, माझ्या देवा,

तू किती महान कार्यं केली आहेस!

तुझी अद्‌भुत कार्यं आणि आमच्याबद्दल तुझे विचार+ अगणित आहेत.

तू अतुल्य आहेस!+

तुझ्या कार्यांबद्दल सांगण्याचा आणि त्यांचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न जरी केला,

तरी मला ते करता येणार नाही, कारण ती असंख्य आहेत!+

 ६ बलिदानं आणि अर्पणं तुला नको होती,*+

पण तू माझे कान ऐकण्यासाठी उघडलेस.+

तू होमार्पणं आणि पापार्पणं मागितली नाहीस.+

 ७ तेव्हा मी म्हणालो: “पाहा! मी आलोय.

गुंडाळीत* माझ्याविषयी लिहिण्यात आलंय.+

 ८ हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करायला मला आनंद वाटतो*+

आणि तुझं नियमशास्त्र माझ्या हृदयावर लिहिलेलं आहे.+

 ९ मी मोठ्या मंडळीत नीतीविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करतो.+

पाहा! मी आपलं तोंड बंद ठेवत नाही,+

हे यहोवा, तुला हे चांगलं माहीत आहे.

१० मी तुझं नीतिमत्त्व आपल्या मनात लपवून ठेवत नाही.

तुझ्या विश्‍वासूपणाबद्दल आणि तारणाबद्दल मी सर्वांना सांगतो.

तुझं एकनिष्ठ प्रेम आणि तुझं सत्य, मी मोठ्या मंडळीत गुप्त ठेवत नाही.”+

११ हे यहोवा, मला दया दाखवण्यापासून स्वतःला आवरू नकोस.

तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे आणि तुझ्या सत्यामुळे माझं नेहमी रक्षण कर.+

१२ मला वेढणारी संकटं मोजण्यापलीकडे आहेत.+

माझ्या असंख्य अपराधांनी मला गाठलंय; माझा मार्गही मला दिसत नाही.+

माझ्या डोक्यावरच्या केसांपेक्षा त्यांची संख्या जास्त आहे,

त्यांमुळे मी अगदी खचून गेलोय.

१३ हे यहोवा, कृपा करून मला वाचव!+

हे यहोवा, माझ्या मदतीला धावून ये.+

१४ माझ्या जिवावर उठलेल्या सर्वांना

लज्जित आणि अपमानित होऊ दे.

माझ्यावर आलेलं संकट पाहून आनंद करणाऱ्‍यांना

शरमेने माघार घ्यायला लाव.

१५ “बरं झालं! बरं झालं!” असं म्हणून जे माझी थट्टा करतात,

त्यांची लाजिरवाणी स्थिती होऊ दे.

१६ पण जे तुझा शोध घेतात,+

त्यांना तुझ्यामुळे आनंदित व हर्षित होऊ दे.+

तुझी तारणाची कार्यं ज्यांना प्रिय वाटतात, ते असं म्हणोत:

“यहोवाचा महिमा होवो!”+

१७ पण मी तर गरीब आणि असाहाय्य आहे.

हे यहोवा, माझ्याकडे लक्ष दे!

माझ्या देवा, उशीर लावू नकोस!+

मला साहाय्य करणारा आणि वाचवणारा तूच आहेस!+

दावीदचं गीत. संचालकासाठी.

४१ जो गरिबाला दया दाखवतो, तो सुखी आहे;+

संकटाच्या दिवशी यहोवा त्याला सोडवेल.

 २ यहोवा त्याचं संरक्षण करेल आणि त्याला जिवंत ठेवेल.

त्याला पृथ्वीवर सुखी म्हटलं जाईल;+

तू त्याला कधीच त्याच्या शत्रूंच्या मर्जीवर* सोपवणार नाहीस.+

 ३ तो अंथरुणाला खिळलेला असताना यहोवा त्याला सांभाळेल;+

त्याच्या आजारात तू त्याचा बिछाना बदलशील.

 ४ मी म्हणालो: “हे यहोवा, माझ्यावर कृपा कर.+

मला* बरं कर,+ कारण मी तुझ्याविरुद्ध पाप केलंय.”+

 ५ माझे शत्रू माझ्याविरुद्ध दुष्टपणे असं म्हणतात:

“हा कधी मरेल आणि याचं नाव कधी नाहीसं होईल?”

 ६ त्यांच्यातला एखादा मला भेटायला आला, तरी तो मनात कपट ठेवून बोलतो.

तो बोलण्यासाठी काहीतरी वाईट शोधतो,

मग बाहेर जाऊन सगळ्यांमध्ये ते पसरवतो.

 ७ माझा द्वेष करणारे सगळे आपसात कुजबुजतात;

माझ्याविरुद्ध कट रचून ते म्हणतात:

 ८ “त्याच्यावर भयानक संकट कोसळलंय;

आता तो खाली पडलाय, तो पुन्हा उठणार नाही.”+

 ९ माझा जवळचा मित्र, ज्याच्यावर माझा खूप भरवसा होता,+

जो माझी भाकर खात होता, त्यानेही माझ्याविरुद्ध लाथ उगारली आहे.*+

१० पण हे यहोवा, तू माझ्यावर कृपा कर आणि मला बरं कर,

म्हणजे मी त्यांची परतफेड करीन.

११ माझा शत्रू माझ्याविरुद्ध विजयाचा जल्लोष करू शकत नाही,+

यावरून मला कळतं, की तू माझ्यावर संतुष्ट आहेस.

१२ माझ्या खरेपणामुळे तू मला सावरतोस;+

तू सर्वकाळ मला आपल्यासमोर ठेवशील.+

१३ इस्राएलचा देव, यहोवा याची

सर्वकाळ स्तुती होत राहो!+

आमेन, आमेन.

दुसरं पुस्तक

(स्तोत्रं ४२-७२)

कोरहच्या मुलांचं+ मस्कील.* संचालकासाठी.

४२ हे देवा, हरिणीला जशी पाण्याच्या झऱ्‍याची ओढ लागते,

तशी माझ्या जिवाला* तुझी ओढ लागली आहे.

 २ माझा जीव* देवासाठी, जिवंत देवासाठी तहानलेला आहे.+

मी कधी एकदा जाऊन देवापुढे उभा राहीन, असं मला झालंय!+

 ३ रात्रंदिवस अश्रूच माझं अन्‍न झाले आहेत.

दिवसभर लोक मला असा टोमणा मारतात: “कुठे आहे तुझा देव?”+

 ४ पूर्वी, मी कसा सर्वांसोबत चालत,

अदबीने* त्यांच्या पुढे-पुढे चालत, देवाच्या घराकडे जायचो;

आम्ही सगळे कसे आनंदाने उपकारस्तुती करत,

सणाच्या वेळी उत्सव साजरा करणाऱ्‍या घोळक्यासारखे जायचो;+

हे सगळं आठवलं, की माझं मन खूप खिन्‍न होतं.

 ५ मी* का असा निराश झालोय?+

माझं मन का असं बेचैन झालंय?

मी तर देवाची वाट पाहीन.+

माझं तारण करणाऱ्‍या महान देवाचं मी गुणगान करत राहीन.+

 ६ माझ्या देवा, मी* निराश झालोय.+

म्हणून मी तुझी आठवण करतोय.+

यार्देन नदीच्या देशात आणि हर्मोन पर्वताच्या शिखरांवर,

मिस्हार पर्वतावर,* मी तुझी आठवण करतोय.

 ७ धबधब्यांच्या जोरदार आवाजाने,

लाटा एकमेकांना हाका मारतात.

तुझ्या या उसळत्या लाटा, माझ्यावर कोसळलेल्या संकटांसारख्या आहेत.+

 ८ दिवसा, यहोवा आपलं एकनिष्ठ प्रेम माझ्यावर प्रकट करेल.

रात्री त्याचं गीत, माझ्या जीवनदात्या देवाला केलेली प्रार्थना, माझ्यासोबत असेल.+

 ९ माझा खडक असलेल्या माझ्या देवाला मी म्हणीन:

“तू मला का विसरलास?+

माझ्या शत्रूच्या जुलमांमुळे मी असा शोक करत का फिरावं?”+

१० माझे शत्रू खुनशीपणे* मला टोमणे मारतात;

दिवसभर ते मला असा टोमणा मारतात: “कुठे आहे तुझा देव?”+

११ मी* का असा निराश झालोय?

माझं मन का असं बेचैन झालंय?

मी तर देवाची वाट पाहीन.+

माझं तारण करणाऱ्‍या महान देवाचं मी गुणगान करत राहीन.+

४३ हे देवा, माझा न्याय कर.+

गद्दार* राष्ट्राविरुद्ध माझ्या बाजूने वाद कर.+

फसवणूक करणाऱ्‍या अनीतिमान माणसापासून माझी सुटका कर.

 २ कारण तू माझा देव, माझा गड आहेस.+

तू मला का सोडून दिलंस?

माझ्या शत्रूच्या जुलमांमुळे मी असा शोक करत का फिरावं?+

 ३ तुझा प्रकाश आणि तुझं सत्य माझ्यावर प्रकट कर.+

त्यांनी मला मार्ग दाखवावा+

तुझ्या पवित्र पर्वताकडे आणि तुझ्या वैभवी उपासना मंडपाकडे त्यांनी मला न्यावं.+

 ४ म्हणजे माझा सर्वात मोठा आनंद असलेल्या देवाजवळ,

त्याच्या वेदीजवळ मी येईन.+

हे देवा, माझ्या देवा, मी वीणा* वाजवून तुझी स्तुती करीन.+

 ५ मी* का असा निराश झालोय?

माझं मन का असं बेचैन झालंय?

मी तर देवाची वाट पाहीन.+

माझं तारण करणाऱ्‍या महान देवाचं मी गुणगान करत राहीन.+

कोरहच्या मुलांचं+ गीत. मस्कील.* संचालकासाठी.

४४ हे देवा, तू पूर्वीच्या दिवसांत,

आमच्या वाडवडिलांच्या काळात केलेल्या कार्यांबद्दल

आम्ही आपल्या कानांनी ऐकलंय,

आमच्या वाडवडिलांनी आम्हाला त्यांबद्दल सांगितलंय.+

 २ तू आपल्या सामर्थ्याने राष्ट्रांना हाकलून लावलंस;+

तू त्यांना चिरडून बाहेर घालवलंस+

आणि आमच्या वाडवडिलांना तो देश दिलास.+

 ३ त्यांनी आपल्या तलवारीने त्या देशाचा ताबा घेतला नाही;+

त्यांच्या स्वतःच्या बळावर त्यांनी विजय मिळवला नाही.+

तर तुझ्या उजव्या हाताने, तुझ्या सामर्थ्याने+ आणि कृपेनेच* त्यांना विजय मिळाला,

कारण तुझं त्यांच्यावर प्रेम होतं.+

 ४ हे देवा, तू माझा राजा आहेस.+

याकोबला मोठा विजय* मिळवून दे.*

 ५ तुझ्या ताकदीने आम्ही आपल्या वैऱ्‍यांना हाकलून लावू;+

तुझ्या नावाने आम्ही आपल्याविरुद्ध उठणाऱ्‍यांना पायाखाली तुडवू.+

 ६ कारण माझा भरवसा माझ्या धनुष्यावर नाही,

माझी तलवार मला वाचवू शकत नाही.+

 ७ तूच आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवलंस,+

आमचा द्वेष करणाऱ्‍यांना तूच लज्जित केलंस.

 ८ आम्ही दिवसभर देवाची स्तुती करू,

तुझ्या नावाची आम्ही सर्वकाळ उपकारस्तुती करू. (सेला )

 ९ पण आता तू आम्हाला सोडून दिलं आहेस आणि आम्हाला लज्जित केलं आहेस,

आता तू आमच्या सैन्यांसोबत लढाईला जात नाहीस.

१० तू आम्हाला आमच्या शत्रूंपासून माघार घ्यायला लावतोस;+

आमचा द्वेष करणारे त्यांना हवं ते लुटून नेतात.

११ मेंढरांसारखं खाऊन टाकण्यासाठी तू आम्हाला त्यांच्या हाती देतोस;

तू राष्ट्रांमध्ये आमची पांगापांग केली आहेस.+

१२ तू आपल्या लोकांना अगदीच कमी भावात विकून टाकतोस;+

त्यांना विकून* तू आपला फायदा करून घेत नाहीस.

१३ आमच्या शेजाऱ्‍यांमध्ये तू आमची लाजिरवाणी स्थिती केली आहेस,

आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला हसतात आणि आमची थट्टा करतात.

१४ राष्ट्रांमध्ये तू आम्हाला हसण्याचा विषय* बनवलं आहेस,+

लोक आम्हाला पाहून तिरस्काराने डोकं हलवतात.

१५ दिवसभर मला अपमानित वाटतं,

मला तोंड दाखवायला जागा उरली नाही.

१६ कारण आमचे शत्रू टोमणे मारतात आणि आमचा अपमान करतात,

ते आमचा सूड घेतात.

१७ ही सगळी संकटं येऊनही, आम्ही तुला विसरलो नाही,

तुझा करार आम्ही मोडला नाही.+

१८ आमचं हृदय भरकटलं नाही;

आमच्या पावलांनी तुझा मार्ग सोडला नाही.

१९ पण तू आम्हाला, कोल्हे राहतात त्या ठिकाणी चिरडलंस;

तू काळ्याकुट्ट अंधाराने आम्हाला झाकून टाकलंस.

२० जर आम्ही आपल्या देवाचं नाव विसरलो असू,

किंवा प्रार्थना करण्यासाठी परक्या देवापुढे हात पसरत असू,

२१ तर देवाला हे समजणार नाही का?

त्याला हृदयातल्या गुप्त गोष्टी माहीत असतात.+

२२ तुझ्यामुळे दिवसभर आम्हाला मृत्यूचा सामना करावा लागतो;

कत्तल केल्या जाणाऱ्‍या मेंढरांसारखी आमची स्थिती झाली आहे.+

२३ हे यहोवा, ऊठ! तू का झोपून राहतोस?+

जागा हो! आम्हाला कायमचं सोडून देऊ नकोस.+

२४ तू आपलं तोंड का फिरवतोस?*

आमचं दुःख आणि आमच्यावर होणारे जुलूम का विसरतोस?

२५ कारण आम्ही जमिनीवर पडलो आहोत;

आम्ही धुळीला मिळालो आहोत.+

२६ आम्हाला साहाय्य करण्यासाठी ऊठ!+

तुझ्या एकनिष्ठ प्रेमापोटी आमची सुटका कर.*+

कोरहच्या मुलांचं गीत.+ मस्कील.* संचालकासाठी सूचना; “भुईकमळं” याच्या चालीवर गायलं जावं. एक प्रेमगीत.

४५ एका चांगल्या बातमीमुळे माझं मन आनंदी आहे.

मी म्हणतो: “माझं गीत* एका राजाबद्दल आहे.”+

माझी जीभ कुशल लेखकाच्या*+ लेखणीसारखी+ व्हावी.

 २ तू मानवांमध्ये सर्वात देखणा आहेस.

तुझ्या ओठांतून मधुर शब्द वाहतात.+

म्हणून देवाने तुला सर्वकाळासाठी आशीर्वाद दिले आहेत.+

 ३ हे शूरा,+ कमरेला तलवार बांध;+

तुझं वैभव आणि तुझा सन्मान धारण कर.+

 ४ तुझ्या वैभवाने विजयाकडे* वाटचाल कर.+

सत्य, नम्रता आणि नीती स्थापन करण्यासाठी स्वारी कर.+

तुझा उजवा हात विस्मयकारक गोष्टी करेल.*

 ५ तुझे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांमुळे राष्ट्रं तुझ्यासमोर पडतात;+

ते राजाच्या शत्रूंच्या हृदयांत शिरतात.+

 ६ देव तुला सदासर्वकाळासाठी राज्याधिकार देतो;*+

तुझा राजदंड न्यायाचा* राजदंड आहे.+

 ७ तू नीतीवर प्रेम केलंस+ आणि वाइटाचा द्वेष केलास.+

म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझा तेलाने अभिषेक केला+ आणि तुझ्या इतर सोबत्यांपेक्षा तुला जास्त आनंदी केलं.+

 ८ तुझी सगळी वस्त्रं गंधरस, अगरू* आणि तज* यांनी सुगंधित आहेत.

हस्तिदंतांच्या आलिशान महालातून येणाऱ्‍या तंतुवाद्यांच्या सुरांनी तुला प्रसन्‍न वाटतं.

 ९ तुझ्या दरबारातल्या प्रतिष्ठित स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत.

ओफीरच्या* सोन्याने+ सजलेली राणी तुझ्या उजव्या हाताला उभी आहे.

१० हे मुली, लक्ष दे आणि कान देऊन ऐक;

आपल्या लोकांना विसर; आपल्या वडिलांचं घर विसर.

११ राजा तुझ्या सौंदर्यावर मोहित होईल.

तो तुझा प्रभू आहे,

म्हणून तू त्याला वाकून नमस्कार कर.

१२ सोरची मुलगी तुझ्यासाठी नजराणा* आणेल.

सर्वात श्रीमंत लोक तुझी कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतील.

१३ राजमहालात* राजकुमारी* अतिशय सुंदर आणि तेजस्वी दिसत आहे;

तिची वस्त्रं सोन्याने* सुशोभित आहेत.

१४ तिला भरजरी वस्त्रं* घालून राजासमोर आणलं जाईल.

तिच्या मागोमाग येणाऱ्‍या कुमारींनासुद्धा तुझ्यासमोर आणलं जाईल.

१५ त्यांना आनंदाने मिरवत आणि जल्लोष करत आणलं जाईल;

त्या राजाच्या महालात प्रवेश करतील.

१६ तुझी मुलं तुझ्या वाडवडिलांची जागा घेतील.

तू त्यांना संपूर्ण पृथ्वीवर प्रधान म्हणून नेमशील.+

१७ येणाऱ्‍या सर्व पिढ्यांना मी तुझ्या नावाची ओळख करून देईन.+

त्यामुळे लोक सदासर्वकाळ तुझी स्तुती करतील.

कोरहच्या मुलांचं गीत.+ संचालकासाठी सूचना. अलामोथ* शैलीनुसार गायलं जावं.

४६ देव आमचा आश्रय आणि आमचं सामर्थ्य आहे,+

संकटाच्या वेळी साहाय्य करण्यासाठी तो नेहमी तयार असतो.+

 २ म्हणून पृथ्वी जरी हादरली;

किंवा पर्वत कोसळून सागराच्या तळाला गेले, तरी आम्ही घाबरणार नाही.+

 ३ समुद्र जरी गर्जना करून फेसाळू लागला;+

किंवा त्याच्या खवळण्यामुळे पर्वत हादरू लागले, तरी आम्ही घाबरणार नाही. (सेला )

 ४ एका नदीच्या प्रवाहांमुळे, देवाचं शहर आनंदी होतं;+

सर्वोच्च देवाचा महान आणि पवित्र उपासना मंडप आनंदी होतो.

 ५ देव त्या शहरात आहे;+ त्या शहराचा कधीही नाश होणार नाही.

सूर्योदय होण्याआधीच तो त्या शहराच्या मदतीला धावून येईल.+

 ६ राष्ट्रं खवळली होती आणि राज्यं उलथून टाकण्यात आली होती,

पण देवाने आवाज चढवताच पृथ्वी विरघळली.+

 ७ सैन्यांचा देव यहोवा आपल्यासोबत आहे;+

याकोबचा देव आपला सुरक्षित आश्रय* आहे. (सेला )

 ८ या आणि यहोवाची कार्यं पाहा,

बघा, त्याने पृथ्वीवर किती अद्‌भुत कार्यं केली आहेत!

 ९ तो सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत करतो.+

तो धनुष्यं मोडून टाकतो आणि भाले तोडून टाकतो.

तो लढाईचे रथ* आगीत जाळून टाकतो.

१० तो म्हणाला, “मला शरण या आणि मीच देव आहे हे ओळखा.

राष्ट्रांमध्ये माझा महिमा केला जाईल;+

सबंध पृथ्वीवर माझा महिमा केला जाईल.”+

११ सैन्यांचा देव यहोवा आपल्यासोबत आहे;+

याकोबचा देव आपला सुरक्षित आश्रय आहे.+ (सेला )

कोरहच्या मुलांचं गीत.+ संचालकासाठी.

४७ सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा!

आनंदाने देवाचा जयजयकार करा!

 २ कारण सर्वोच्च देव यहोवा, विस्मयकारक देव आहे;+

तो सबंध पृथ्वीचा महान राजा आहे.+

 ३ तो आपल्याला राष्ट्रांवर विजय मिळवून देतो;

तो राष्ट्रांना आपल्या पायांशी आणतो.+

 ४ तो आपल्यासाठी वारसा निवडतो;+

एक असा देश, ज्याच्यावर त्याच्या लाडक्या याकोबला गर्व आहे.+ (सेला )

 ५ लोक जल्लोष करत असताना देव येतो;*

ते शिंग* वाजवत असताना यहोवा येतो.

 ६ देवाचं गुणगान करा,* त्याची स्तुती करा!

आपल्या राजाचं गुणगान करा, त्याची स्तुती करा!

 ७ देव सबंध पृथ्वीचा राजा आहे;+

म्हणून सखोल समज दाखवा आणि त्याची स्तुती करा.

 ८ देव राष्ट्रांचा राजा बनलाय.+

देव त्याच्या पवित्र राजासनावर बसलाय.

 ९ लोकांचे प्रधान एकत्र जमले आहेत;

अब्राहामच्या देवाच्या लोकांसोबत ते एकत्र जमले आहेत.

कारण पृथ्वीचे शासक* देवाचे आहेत.

तो अतिशय महान आहे.+

कोरहच्या मुलांचं गीत.+ स्तुतिगीत.

४८ आमच्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर,

यहोवा महान आणि सगळ्यात स्तुतिपात्र आहे.

 २ उत्तरेच्या टोकावर सीयोन पर्वत,

महान राजाची नगरी आहे.+

उंचावर वसलेली ती सुंदर नगरी, सबंध पृथ्वीचा आनंद आहे.+

 ३ तिच्या मजबूत बुरुजांमध्ये,

देवाने स्वतःला एक सुरक्षित आश्रय* म्हणून प्रकट केलंय.+

 ४ कारण पाहा! राजे एकत्र जमले;*

ते सोबत मिळून पुढे सरसावले.

 ५ त्यांनी तिला पाहिलं, तेव्हा ते चकित झाले.

ते भयभीत झाले आणि घाबरून पळून गेले.

 ६ ते तिथे भीतीने थरथर कापू लागले,

प्रसूतिवेदना होणाऱ्‍या स्त्रीसारखी त्यांची स्थिती झाली.

 ७ पूर्वेकडच्या वाऱ्‍याने तू तार्शीशची जहाजं तोडतोस.

 ८ पूर्वी ज्याबद्दल ऐकलं होतं, ते आता आम्ही,

सैन्यांचा देव यहोवा याच्या नगरीत, आमच्या देवाच्या नगरीत

आपल्या डोळ्यांनी पाहिलंय;

देव सर्वकाळ या नगरीचं रक्षण करतो.+ (सेला )

 ९ हे देवा, तुझ्या मंदिरामध्ये

आम्ही तुझ्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल विचार* करतो.+

१० हे देवा, तुझ्या नावाप्रमाणेच तुझा महिमा

पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत पोहोचलाय.+

तुझा उजवा हात नीतीने परिपूर्ण आहे.+

११ सीयोन पर्वत+ आनंद करो!

यहूदाची शहरं* तुझ्या न्याय-निर्णयांमुळे हर्ष करोत!+

१२ सीयोनभोवती फिरा; तिला फेरा घाला;

तिचे बुरूज मोजा.+

१३ तिच्याभोवती असलेल्या भिंतींकडे* लक्ष द्या.+

तिच्या मजबूत बुरुजांची पाहणी करा.

म्हणजे पुढच्या पिढ्यांना तुम्हाला या गोष्टी सांगता येतील.

१४ कारण हा देव, आमचा सदासर्वकाळाचा देव आहे.+

तो शेवटपर्यंत* आम्हाला मार्ग दाखवेल.+

कोरहच्या मुलांचं गीत.+ संचालकासाठी.

४९ सर्व लोकांनो, ऐका!

जगात* राहणाऱ्‍या लोकांनो, लक्ष द्या!

 २ लहानांनो व मोठ्यांनो;

श्रीमंतांनो व गरिबांनो, ऐका!

 ३ मी आपल्या तोंडाने बुद्धीच्या गोष्टी सांगीन

आणि माझ्या हृदयातले विचार,*+ समजबुद्धी प्रकट करतील.

 ४ मी एका म्हणीकडे लक्ष देईन;

मी वीणेवर* माझं कोडं उलगडून सांगीन.

 ५ माझा नाश करू पाहणाऱ्‍यांची दुष्टता* मला घेरते;

अशा संकटांच्या काळात मी का घाबरू?+

 ६ ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात+

आणि आपल्या श्रीमंतीची बढाई मारतात.+

 ७ पण त्यांच्यापैकी कोणीही आपल्या भावाला कधीच सोडवू शकत नाही,

किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देऊ शकत नाही.+

 ८ (त्यांच्या जिवाच्या* खंडणीचं* मोल इतकं मोठं आहे,

की ते भरणं त्यांना कधीच शक्य होणार नाही);

 ९ त्यांच्या भावाने सर्वकाळ जगावं आणि कबर* पाहू नये,+

म्हणून त्यांच्यापैकी कोणीही त्याला सोडवू शकत नाही.

१० ते बुद्धिमान लोकांनाही मरताना पाहतात;

मूर्ख आणि अविचारी लोकही सोबत नाश होतात,+

आणि त्यांना आपली संपत्ती इतरांसाठी सोडून जावी लागते.+

११ आपली घरं कायम टिकून राहावीत;

आपले तंबू पिढ्या न्‌ पिढ्या राहावेत, असं त्यांना मनोमन वाटत असतं.

आपल्या जमिनीला ते स्वतःचं नाव देतात.

१२ पण माणसाला सन्मान मिळाला, तरी त्याचं जीवन कायम टिकत नाही;+

नाश होणाऱ्‍या पशूंपेक्षा तो काही चांगला नाही.+

१३ जे मूर्ख असतात;

तसंच, जे त्यांच्यामागे जातात आणि त्यांच्या पोकळ शब्दांनी खूश होतात, त्यांचीही हीच गत होते.+ (सेला )

१४ त्यांना मेंढरांसारखं कबरेसाठी* नेमण्यात आलंय.

मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल;

सकाळ झाल्यावर नीतिमान त्यांच्यावर सत्ता चालवतील.+

त्यांचं नामोनिशाण पूर्णपणे मिटून जाईल.+

राजवाड्याऐवजी कबर*+ त्यांचं घर होईल.+

१५ पण मला* मात्र देव कबरेच्या* तावडीतून* सोडवेल;+

तोच मला सावरेल. (सेला )

१६ एखादा माणूस धनवान झाला,

किंवा त्याच्या घराचं वैभव वाढलं, तरी भिऊ नकोस.

१७ कारण जेव्हा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा तो आपल्यासोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही;+

त्याचं वैभव त्याच्यासोबत जात नाही.+

१८ जिवंत असताना तो स्वतःला* धन्य म्हणतो.+

(माणसाची भरभराट होते तेव्हा लोक त्याची प्रशंसा करतात.)+

१९ पण शेवटी तोही आपल्या वाडवडिलांच्या पिढीला जाऊन मिळतो.

त्यांना पुन्हा कधी उजेड दिसणार नाही.

२० जो माणूस ही गोष्ट समजून घेत नाही, त्याचा सन्मान जरी झाला,+

तरी तो माणूस, नाश होणाऱ्‍या पशूंपेक्षा काही चांगला नाही.

आसाफचं+ गीत.

५० सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ देव यहोवा+ बोलला आहे;

तो पूर्वेपासून पश्‍चिमेपर्यंत राहणाऱ्‍या

पृथ्वीच्या सर्व रहिवाशांना बोलावतो.

 २ सौंदर्याने परिपूर्ण अशा सीयोनमधून+ देवाचं तेज चमकतं.

 ३ आपला देव येईल; तो शांत राहू शकत नाही.+

त्याच्यापुढे भस्म करणारा अग्नी आहे+

आणि त्याच्यासभोवती मोठं वादळ घोंघावतं.+

 ४ आपल्या लोकांचा न्याय करण्यासाठी+

तो उंच आकाशाला आणि पृथ्वीला बोलावून म्हणतो:+

 ५ “बलिदानाच्या आधारावर माझ्याशी करार करणाऱ्‍या,+

माझ्या एकनिष्ठ लोकांना माझ्यापुढे जमवा.”

 ६ आकाश देवाचं नीतिमत्त्व घोषित करतं,

कारण देव स्वतः न्याय करणारा आहे.+ (सेला )

 ७ “माझ्या लोकांनो, ऐका. मी तुमच्याशी बोलेन;

हे इस्राएल, मी तुझ्याविरुद्ध साक्ष देईन.+

मी देव, तुझा देव आहे.+

 ८ मी काही तुझ्या बलिदानांमुळे,

किंवा सतत माझ्यापुढे असलेल्या तुझ्या होमार्पणांमुळे तुला ताडन करत नाही.+

 ९ तुझ्या घरचा बैल घेण्याची,

किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बकरे घेण्याची मला गरज नाही.+

१० कारण, रानातले सर्व जंगली पशू माझे आहेत;+

हजारो पर्वतांवरचे प्राणीही माझेच आहेत.

११ पर्वतांवरच्या प्रत्येक पक्ष्याबद्दल मला माहीत आहे;+

रानात राहणारे असंख्य प्राणी माझेच आहेत.

१२ मला भूक लागली, तर मी तुला थोडंच सांगेन?

कारण, उपजाऊ जमीन आणि तिच्यावर असलेलं सगळं काही माझं आहे.+

१३ मी बैलांचं मांस खाईन का?

मी बकऱ्‍यांचं रक्‍त पिईन का?+

१४ देवाला उपकारस्तुतीचं बलिदान दे;+

सर्वोच्च देवाला केलेले नवस फेड.+

१५ संकटाच्या काळात मला हाक मार.+

म्हणजे मी तुझी सुटका करीन आणि तू माझा गौरव करशील.”+

१६ पण देव दुष्टाला म्हणेल:

“माझ्या नियमांबद्दल सांगण्याचा,+

किंवा माझ्या कराराबद्दल+ बोलण्याचा तुला काय हक्क?

१७ कारण तू शिक्षेचा* तिरस्कार करतोस,

आणि माझ्या शब्दांकडे तू सतत पाठ फिरवतोस.*+

१८ एखाद्या चोराला पाहिल्यावर, तू त्याला चांगला समजतोस,*+

तू व्यभिचार करणाऱ्‍यांची संगत धरतोस.

१९ तू आपल्या तोंडाने वाईट गोष्टी पसरवतोस,

तुझ्या जिभेवर सतत फसवणुकीच्या गोष्टी असतात.+

२० तू बसून आपल्याच भावाविरुद्ध बोलतोस;+

आपल्या सख्ख्या भावाचे दोष तू दुसऱ्‍यांना सांगतोस.*

२१ तू या गोष्टी केल्या, तेव्हा मी गप्प राहिलो;

त्यामुळे तुला वाटलं, की मीही तुझ्यासारखाच आहे.

पण आता मी तुला ताडन करीन,

मी तुझ्याविरुद्ध माझा वाद मांडीन.+

२२ देवाला विसरणाऱ्‍यांनो, जरा या गोष्टीकडे लक्ष द्या;+

नाहीतर, मी तुमचे फाडून तुकडे करीन, तेव्हा तुम्हाला सोडवणारा कोणीही नसेल.

२३ जो उपकारस्तुतीचं बलिदान अर्पण करतो तोच माझा गौरव करतो,+

आणि जो योग्य मार्गाने चालत राहील,

त्याचं मी तारण करीन.”+

दावीदचं गीत. संचालकासाठी. दावीदने बथशेबासोबत+ संबंध ठेवल्यावर संदेष्टा नाथान त्याच्याकडे आला, त्या घटनेनंतर दावीदने हे गीत रचलं.

५१ हे देवा, तुझ्या एकनिष्ठ प्रेमापोटी माझ्यावर कृपा कर.+

तुझ्या अपार दयेमुळे माझे अपराध पुसून टाक.+

 २ माझा दोष अगदी पूर्णपणे धुऊन टाक+

आणि माझ्या पापापासून मला शुद्ध कर.+

 ३ कारण माझ्या चुका मी चांगल्या ओळखून आहे,

माझं पाप सतत माझ्या डोळ्यांपुढे असतं.*+

 ४ मी तुझ्याविरुद्ध, हो इतर कोणाहीपेक्षा* तुझ्याविरुद्ध पाप केलंय;+

तुझ्या नजरेत जे वाईट, ते मी केलंय.+

म्हणून तुझं बोलणं नीतीचं

आणि तुझा न्याय योग्य आहे.+

 ५ पाहा! मी तर जन्मतःच दोषी आहे;

माझ्या आईला गर्भ राहिला, त्या क्षणापासूनच मी पापी आहे.+

 ६ हे देवा, प्रामाणिक हृदय पाहून तुला आनंद होतो;+

माझ्या हृदयाला बुद्धीची शिकवण दे.

 ७ मला माझ्या पापापासून शुद्ध कर,* म्हणजे मी शुद्ध होईन.+

मला धुऊन स्वच्छ कर, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.+

 ८ मला सौख्याचे आणि आनंदाचे शब्द ऐकू दे,

म्हणजे तू चिरडलेली माझी हाडं हर्ष करतील.+

 ९ माझ्या पापांपासून आपलं तोंड फिरव,+

माझे सर्व अपराध पुसून टाक.+

१० हे देवा, माझ्यात शुद्ध मन उत्पन्‍न कर,+

माझ्यात एक नवीन, स्थिर मनोवृत्ती निर्माण कर.+

११ आपल्यापुढून मला घालवून देऊ नकोस;

तुझी पवित्र शक्‍ती* माझ्यापासून काढून घेऊ नकोस.

१२ तुझ्या तारणाचा आनंद मला पुन्हा अनुभवू दे;+

तुझ्या आज्ञा पाळण्याची इच्छा माझ्यात जागृत कर.*

१३ मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन,+

म्हणजे पापी लोक तुझ्याकडे परत येतील.

१४ हे देवा, माझं तारण करणाऱ्‍या देवा,+ मला रक्‍ताच्या दोषापासून मुक्‍त कर,+

म्हणजे मी आनंदाने सर्वांना तुझ्या नीतीबद्दल सांगीन.+

१५ हे यहोवा, माझे ओठ उघड,

म्हणजे मी आपल्या तोंडाने तुझी स्तुती गाईन.+

१६ तुला बलिदान नकोय, नाहीतर मी ते दिलं असतं;+

होमार्पणाने तुला आनंद होत नाही.+

१७ देवाला आवडणारं बलिदान, म्हणजे पश्‍चात्तापी मन.

हे देवा, दुःखी आणि हताश झालेलं हृदय तू झिडकारणार नाहीस.*+

१८ तू आपल्या कृपेमुळे सीयोनचं भलं कर;

यरुशलेमच्या भिंती मजबूत कर.

१९ मग तुला नीतीच्या बलिदानांमुळे,

होमार्पणांमुळे आणि पूर्णपणे दिलेल्या अर्पणांमुळे आनंद होईल;

मग तुझ्या वेदीवर बैलांची अर्पणं दिली जातील.+

दावीदचं गीत. मस्कील.* संचालकासाठी सूचना. दावीद अहीमलेखच्या+ घरी आला आहे, हे जेव्हा अदोमी दवेगने शौलला सांगितलं, तेव्हा दावीदने हे गीत रचलं.

५२ हे बलवान माणसा, तू आपल्या दुष्ट कृत्यांबद्दल बढाई का मारतोस?+

देवाचं एकनिष्ठ प्रेम दिवसभर टिकून राहतं,+ हे तुला माहीत नाही का?

 २ तुझी जीभ धारदार वस्तऱ्‍यासारखी आहे;+

ती कारस्थानं रचते आणि फसवणूक करते.+

 ३ तुझं चांगल्यापेक्षा वाइटावर;

आणि योग्य ते बोलण्यापेक्षा खोटं बोलण्यावर, जास्त प्रेम आहे. (सेला )

 ४ तू आपल्या जिभेने किती खोटं बोलतोस!

दुसऱ्‍यांचं नुकसान करणारे शब्द तुला आवडतात.

 ५ म्हणूनच, देव तुला कायमचं खाली ओढेल;+

तो तुला धरून तुझ्या तंबूमधून खेचून काढेल;+

जिवंतांच्या देशातून तो तुला उपटून टाकेल.+ (सेला )

 ६ नीतिमान हे पाहतील तेव्हा त्यांना विस्मय वाटेल,+

ते त्या दुष्टाला पाहून हसतील+ आणि म्हणतील:

 ७ “या माणसाने देवाला आपला आश्रय* बनवलं नाही,+

त्याने आपल्या भरपूर श्रीमंतीवर भरवसा ठेवला+

आणि तो आपल्या दुष्ट योजनांवर* अवलंबून राहिला.”*

 ८ पण मी देवाच्या घरात असलेल्या हिरव्यागार जैतुनाच्या झाडासारखा होईन;

माझा भरवसा देवाच्या एकनिष्ठ प्रेमावर+ सदासर्वकाळ राहील.

 ९ तू केलेल्या कार्यांमुळे मी सतत

तुझ्या एकनिष्ठ सेवकांसमोर तुझी स्तुती करीन.+

तुझं नाव चांगलं आहे, म्हणून मी तुझ्या नावावर आशा ठेवीन.+

दावीदचं गीत. मस्कील.* संचालकासाठी सूचना. महलथ* शैलीनुसार गायलं जावं.

५३ मूर्ख* माणूस आपल्या मनात म्हणतो:

“यहोवा अस्तित्वात नाही.”+

त्यांची कामं वाईट आणि घृणास्पद आहेत;

चांगली कामं करणारा एकही नाही.+

 २ पण देव स्वर्गातून खाली मानवांकडे पाहतो.+

सखोल समज दाखवणारा आणि यहोवाचा शोध घेणारा कोणी आहे का,+ हे तो पाहतो.

 ३ ते सगळे भरकटले आहेत;

सगळेच्या सगळे भ्रष्ट आहेत.

चांगली कामं करणारा एकही नाही,

एकसुद्धा नाही!+

 ४ दुर्जनांपैकी कोणालाही कळत नाही का?

भाकर खावी तसे ते माझ्या लोकांना खाऊन टाकतात.

ते यहोवाला हाक मारत नाहीत.+

 ५ पण ते भीतीने कावरेबावरे होतील,

पूर्वी कधीही घाबरले नव्हते इतके ते घाबरतील,*

कारण तुझ्यावर हल्ला करणाऱ्‍यांची* हाडं देव विखरून टाकेल.

तू त्यांना लज्जित करशील, कारण यहोवाने त्यांना नाकारलंय.

 ६ सीयोनवरून इस्राएलचं तारण होवो!+

बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांना यहोवा गोळा करेल,

तेव्हा याकोब आनंदी होवो, इस्राएल हर्ष करो!

दावीदचं गीत. मस्कील.* संचालकासाठी सूचना. हे गीत तंतुवाद्यांसोबत गायलं जावं. जीफच्या लोकांनी शौलकडे येऊन, “दावीद आमच्यामध्ये लपलाय,”+ असं सांगितलं तेव्हा दावीदने हे गीत रचलं.

५४ हे देवा, तुझ्या नावाने मला वाचव,+

तुझ्या शक्‍तीने माझं समर्थन कर.*+

 २ हे देवा, माझी प्रार्थना ऐक;+

माझ्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांकडे लक्ष दे.

 ३ कारण अनोळखी लोक माझ्याविरुद्ध उठतात,

क्रूर माणसं माझा जीव घ्यायला पाहतात.+

त्यांना देवाबद्दल जराही आदर नाही.*+ (सेला )

 ४ पाहा! देव माझा सहायक आहे;+

मला साहाय्य करणाऱ्‍यांसोबत यहोवा आहे.

 ५ तो माझ्या शत्रूंची त्यांच्याच दुष्टाईने परतफेड करेल;+

तुझ्या विश्‍वासूपणामुळे त्यांचा नाश कर.*+

 ६ हे यहोवा, मी तुला आनंदाने बलिदान देईन.+

मी तुझ्या नावाची स्तुती करीन, कारण तुझं नाव चांगलं आहे.+

 ७ देव माझ्या प्रत्येक संकटातून मला सोडवतो.+

मी माझ्या शत्रूंचा पराभव पाहीन.+

दावीदचं गीत. मस्कील.* संचालकासाठी सूचना. तंतुवाद्यांसोबत गायलं जावं.

५५ हे देवा, माझी प्रार्थना ऐक.+

माझ्या दयेच्या याचनेकडे दुर्लक्ष करू नकोस.*+

 २ माझ्याकडे लक्ष दे आणि मला उत्तर दे.+

काळजीमुळे माझं मन बेचैन झालंय.+

मला काहीच सुचत नाही.

 ३ कारण शत्रू मला धमक्या देत आहेत.

दुष्ट लोक माझ्यावर दबाव आणत आहेत.

ते माझ्यावर एकापाठोपाठ एक संकटं आणतात.

ते रागाने माझा विरोध करतात.+

 ४ माझ्या हृदयाला वेदना होत आहेत+

आणि मृत्यूच्या भीतीने मला घेरलंय.+

 ५ मला धडकी भरली आहे,

भीतीने मी थरथर कापत आहे.

 ६ माझ्या मनात सारखा विचार येतो: “मला कबुतरासारखे पंख असते तर!

मी उडून गेलो असतो आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन राहिलो असतो.

 ७ मी दूर कुठेतरी उडून गेलो असतो;+

ओसाड रानात जाऊन राहिलो असतो.+ (सेला )

 ८ सोसाट्याच्या वाऱ्‍यापासून आणि वादळापासून वाचण्यासाठी,

मी लगेच आश्रयाचं ठिकाण शोधलं असतं.”

 ९ हे यहोवा, त्यांना गोंधळात टाक आणि त्यांच्या योजना असफल कर.*+

कारण मी शहरात हिंसाचार आणि भांडणतंटे होताना पाहिले आहेत.

१० ते रात्रंदिवस शहराच्या तटबंदीवरून फेऱ्‍या मारतात;

शहरात दुष्टाई आणि गुन्हेगारी माजली आहे.+

११ त्यावर संकट ओढवलंय;

अत्याचार आणि फसवणूक चौकात ठाण मांडून बसले आहेत.+

१२ मला टोमणे मारणारा कोणी शत्रू नाही;+

नाहीतर, मी ते सहन केलंही असतं.

माझ्याविरुद्ध उठलेला कोणी वैरी नाही;

नाहीतर, मी त्याच्यापासून लपलो असतो.

१३ पण तो तू आहेस; माझ्यासारखाच एक माणूस.*+

माझा सोबती, ज्याला मी चांगलं ओळखतो.+

१४ पूर्वी आपण जिवाभावाचे मित्र होतो;

आपण सर्व लोकांसोबत मिळून देवाच्या घराकडे चालत जायचो.

१५ त्यांचा अचानक नाश होऊ दे!+

त्यांना जिवंतच कबरेत* जाऊ दे!

कारण त्यांच्यात दुष्टाई आहे.

१६ पण मी तर देवाला हाक मारीन.

यहोवा मला वाचवेल.+

१७ सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मी दुःखाने आक्रोश करत असतो,*+

देव माझा आवाज ऐकतो.+

१८ पुष्कळ जण माझ्याविरुद्ध उठले आहेत.+

पण देव माझी सुटका करेल* आणि माझ्याविरुद्ध* लढणाऱ्‍यांपासून मला वाचवेल.

१९ देव माझं ऐकेल आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल.+

तो तर प्राचीन काळापासून राजासनावर बसलाय.+ (सेला )

पण, ते बदलायला तयार होणार नाहीत.

त्यांना देवाची भीती वाटत नाही.+

२० त्याने* आपल्याच मित्रांवर हल्ला केला;+

त्याने आपला करार मोडला.+

२१ त्याचे शब्द लोण्याहून मऊ आहेत,+

पण त्याच्या मनात खोट आहे.

त्याचे शब्द तेलापेक्षा गुळगुळीत आहेत,

पण ते उपसलेल्या तलवारींसारखे आहेत.+

२२ तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे,+

म्हणजे तो तुला सांभाळेल.+

नीतिमान माणसाला तो कधीच पडू* देणार नाही.+

२३ पण हे देवा, तू त्यांना सगळ्यात खोल खळग्यात टाकून देशील.+

रक्‍तपात आणि फसवणूक करणारी ही माणसं, अर्धं आयुष्यही जगणार नाहीत.+

पण मी तर तुझ्यावरच भरवसा ठेवीन!

दावीदचं गीत. मिक्‍ताम.* संचालकासाठी सूचना. “दूरचा मुका पारवा” याच्या चालीवर गायलं जावं. पलिष्टी लोकांनी गथमध्ये दावीदला ताब्यात घेतलं,+ तेव्हा त्याने हे गीत रचलं.

५६ हे देवा, माझ्यावर कृपा कर, कारण माणसं माझ्यावर हल्ला करत आहेत.

ती दिवसभर माझ्याविरुद्ध लढतात आणि माझा छळ करतात.

 २ माझे वैरी दिवसभर माझ्यावर हल्ला करतात;

पुष्कळ जण गर्विष्ठपणे माझ्याविरुद्ध लढतात.

 ३ मला भीती वाटते,+ तेव्हा मी तुझ्यावर भरवसा ठेवतो.+

 ४ मी देवावर भरवसा ठेवतो, त्याच्या अभिवचनांची मी स्तुती करतो.

मी देवावर भरवसा ठेवतो, मी घाबरणार नाही.

माणूस माझं काय बिघडवू शकतो?+

 ५ ते दिवसभर माझ्या प्रयत्नांवर पाणी फिरवतात;

माझं नुकसान कसं करता येईल, याचाच ते विचार करत असतात.+

 ६ ते हल्ला करण्यासाठी लपून बसतात;

माझा जीव घेण्यासाठी,+

ते माझ्या प्रत्येक पावलावर नजर ठेवतात.+

 ७ त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांच्याकडे पाठ फिरव.

हे देवा, तू आपल्या क्रोधाने राष्ट्रांचा नाश कर.+

 ८ मी वणवण फिरतो, तेव्हा तू माझ्यावर लक्ष ठेवतोस.+

माझे अश्रू तुझ्या बुधलीत* जमा कर.+

तुझ्या वहीत तू त्यांचा हिशोब लिहून ठेवला आहेस.+

 ९ मी मदतीसाठी देवाला हाक मारीन, त्या दिवशी माझे शत्रू माघार घेतील.+

देव माझ्या बाजूने आहे,+ याची मला पूर्ण खातरी आहे.

१० मी देवावर भरवसा ठेवतो, त्याच्या अभिवचनांची मी स्तुती करतो.

मी यहोवावर भरवसा ठेवतो, त्याच्या अभिवचनांची मी स्तुती करतो.

११ मी देवावर भरवसा ठेवतो; मी घाबरणार नाही.+

माणूस माझं काय बिघडवू शकतो?+

१२ हे देवा, तुला दिलेली वचनं मला पूर्ण करायची आहेत;+

मी तुला उपकारस्तुतीची अर्पणं देईन.+

१३ कारण मी जिवंत राहावं आणि तुझी सेवा करत राहावी,+

म्हणून तू मला* मृत्यूपासून वाचवलं आहेस+

आणि अडखळण्यापासून मला सावरलं आहेस.+

दावीदचं गीत. मिक्‍ताम.* संचालकासाठी सूचना. “नाश करू नकोस” याच्या चालीवर गायलं जावं. दावीद शौलपासून पळून गेला आणि गुहेत जाऊन लपला,+ तेव्हा त्याने हे गीत रचलं.

५७ माझ्यावर कृपा कर, हे देवा, माझ्यावर कृपा कर.

कारण मी* तुझा आश्रय घेतला आहे.+

संकटं सरून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीत आसरा घेईन.+

 २ मी सर्वोच्च देवाला हाक मारतो.

माझ्यावर आलेली संकटं दूर करणाऱ्‍या खऱ्‍या देवाला मी हाक मारतो.

 ३ तो स्वर्गातून साहाय्य पाठवून मला वाचवेल.+

माझ्यावर हल्ला करणाऱ्‍याची तो फजिती करेल. (सेला )

देव आपलं एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा दाखवेल.+

 ४ सिंहांनी मला* घेरलंय;+

मला फाडून खायला टपलेल्यांमध्ये मला झोपावं लागतं.

त्यांचे दात म्हणजे भाले आणि बाण.

त्यांची जीभ म्हणजे तीक्ष्ण तलवार.+

 ५ हे देवा, तुझा सन्मान आकाशापेक्षाही उंच आहे;

सबंध पृथ्वीवर तुझा गौरव होवो!+

 ६ माझे पाय अडकावेत, म्हणून त्यांनी जाळं पसरवून ठेवलंय;+

मी* दुःखाने अगदी वाकून गेलोय.+

त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणून ठेवलाय,

पण ते स्वतःच त्याच्यात पडले आहेत.+ (सेला )

 ७ माझं मन खंबीर आहे, हे देवा,+

माझं मन खंबीर आहे.

मी संगीत वाजवून तुझी स्तुती गाईन.

 ८ माझ्या मना, ऊठ.

तंतुवाद्यांनो, जागे व्हा; वीणा, तूही ऊठ.

मी पहाटेला जागं करीन.+

 ९ हे यहोवा, मी सर्व लोकांमध्ये तुझी स्तुती करीन;+

मी राष्ट्रांमध्ये तुझा महिमा गाईन.*+

१० कारण तुझं एकनिष्ठ प्रेम आकाशाइतकं उंच आहे.+

तुझा विश्‍वासूपणा आभाळापर्यंत पोहोचला आहे.

११ हे देवा, तुझा सन्मान आकाशापेक्षाही उंच आहे;

सबंध पृथ्वीवर तुझा गौरव होवो!+

दावीदचं गीत. मिक्‍ताम.* संचालकासाठी सूचना. “नाश करू नकोस” याच्या चालीवर गायलं जावं.

५८ माणसांनो, तुम्ही शांत राहिलात, तर नीतीबद्दल बोलू शकाल का?+

तुम्ही गप्प बसलात तर योग्य न्याय करू शकाल का?+

 २ तुम्ही तर आपल्या मनात अनीतीच्या योजना आखता+

आणि आपल्या हातांनी देशात हिंसाचार करता.+

 ३ दुष्ट जन्मापासूनच* वाईट मार्गाने जातात;*

ते जन्मापासूनच बहकलेले आणि खोटं बोलणारे असतात.

 ४ त्यांचं विष सापांच्या विषासारखं असतं;+

ते आपले कान झाकून घेणाऱ्‍या नागासारखे बहिरे असतात.

 ५ मांत्रिकांनी कितीही कुशलपणे मंत्र म्हटले,

तरीही तो त्यांचं ऐकत नाही.

 ६ हे देवा, त्या दुष्टांचे दात पाडून टाक!

हे यहोवा, या सिंहांचे* जबडे फोडून टाक!

 ७ ते वाहून जाणाऱ्‍या पाण्यासारखे नाहीसे होवोत.

देव आपलं धनुष्य ताणून त्यांना बाणांनी खाली पाडो.

 ८ चालता चालता विरघळून जाणाऱ्‍या गोगलगाईसारखे ते होवोत.

जे मूल मेलेलं जन्माला येतं, जे कधीच सूर्याचा प्रकाश पाहत नाही, अशा मुलासारखे ते होवोत.

 ९ तुमच्या पातेल्यांना काट्यांच्या जळणाची उष्णता लागण्याआधीच,

देव त्या ओल्या आणि सुक्या फांद्या, वादळी वाऱ्‍याने उडवाव्यात तशा उडवून नेईल.+

१० देवाने सूड घेतला आहे, हे पाहून नीतिमान माणसाला आनंद होईल;+

त्याचे पाय दुष्टांच्या रक्‍तात भिजतील.+

११ तेव्हा लोक म्हणतील: “नीतिमानाला चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही.+

खरोखरच पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे.”+

दावीदचं गीत. मिक्‍ताम.* संचालकासाठी सूचना. “नाश करू नकोस” याच्या चालीवर गायलं जावं. शौलने दावीदच्या घरावर पाळत ठेवण्यासाठी आणि त्याला मारून टाकण्यासाठी माणसं पाठवली,+ तेव्हा दावीदने हे गीत रचलं.

५९ हे माझ्या देवा, माझ्या शत्रूंपासून माझी सुटका कर.+

माझ्याविरुद्ध उठणाऱ्‍यांपासून माझं संरक्षण कर.+

 २ दुष्टपणे वागणाऱ्‍यांपासून माझी सुटका कर,

आणि क्रूर* माणसांपासून मला वाचव.

 ३ बघ! ते माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसतात;+

बलवान माणसं माझ्यावर हल्ला करतात.

हे यहोवा, मी कोणताही अपराध किंवा गुन्हा केलेला नसताना ते असं वागतात.+

 ४ माझा काहीही दोष नसताना, ते माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीने धावून येतात.

माझी हाक ऐकून तू ऊठ आणि त्यांच्याकडे पाहा.

 ५ कारण हे यहोवा, सैन्यांच्या देवा, तू इस्राएलचा देव आहेस.+

जागा हो आणि सर्व राष्ट्रांकडे आपलं लक्ष वळव.

दुष्टपणे दगा देणाऱ्‍यांना दया दाखवू नकोस.+ (सेला )

 ६ ते दररोज संध्याकाळी परत येतात;+

ते कुत्र्यांसारखे गुरगुरत*+ शहरात फिरतात.+

 ७ त्यांच्या तोंडून शिव्याशाप निघतात.

त्यांचे ओठ तलवारींसारखे आहेत.+

कारण ते म्हणतात: “कोण ऐकणार आहे?”+

 ८ पण हे यहोवा, तू त्यांच्यावर हसशील.+

तू सर्व राष्ट्रांवर तुच्छतेने हसशील.+

 ९ हे माझ्या देवा, तू माझी ताकद आहेस, मी तुझी वाट पाहीन;+

कारण देव माझा सुरक्षित आश्रय* आहे.+

१० माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखवणारा देव माझ्या मदतीला धावून येईल;+

देव माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मला दाखवेल.+

११ त्यांना ठार मारू नकोस, नाहीतर माझे लोक हे विसरतील.

तुझ्या सामर्थ्याने त्यांना इकडे तिकडे भटकायला लाव;

हे यहोवा, तू आमची ढाल आहेस,+ त्यांना खाली पाड.

१२ ते आपल्या तोंडाने, आपल्या ओठांनी पाप करतात.

त्यांना त्यांच्याच गर्वामुळे अडचणीत सापडू दे.+

कारण ते लोकांना शाप देतात आणि त्यांची फसवणूक करतात.

१३ तुझ्या क्रोधात त्यांचा नाश कर;+

त्यांचा अंत कर; ते नाहीसे होवोत.

याकोबवर आणि पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत देव राज्य करतो+ हे त्यांना कळू दे. (सेला )

१४ त्यांना संध्याकाळी परत येऊ दे;

त्यांना कुत्र्यांप्रमाणे गुरगुरत* शहरात फिरू दे.+

१५ त्यांना अन्‍नाच्या शोधात वणवण फिरायला लाव;+

त्यांना पोटभर खायला न मिळो, डोकं टेकायला जागा न मिळो.

१६ पण मी तर तुझ्या सामर्थ्याचं गुणगान करीन;+

मी पहाटेच तुझ्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल आनंदाने सांगीन.

कारण, तू माझा सुरक्षित आश्रय आहेस.+

तू माझ्यासाठी संकटाच्या काळात पळून जायचं ठिकाण आहेस.+

१७ माझ्या देवा, तू माझी ताकद आहेस, मी तुझी स्तुती गाईन,*+

कारण देव माझा सुरक्षित आश्रय आहे, तो मला एकनिष्ठ प्रेम दाखवतो.+

दावीदचं गीत. मिक्‍ताम.* संचालकासाठी सूचना. “साक्षीचं भुईकमळ” याच्या चालीवर गायलं जावं. शिकवण्यासाठी. दावीद अराम-नहराईम आणि अराम-सोबा यांच्यासोबत लढला आणि यवाबने परत येऊन क्षार खोऱ्‍यात १२,००० अदोमी लोकांना ठार मारलं,+ तेव्हा दावीदने हे गीत रचलं.

६० हे देवा, तू आमच्याकडे पाठ फिरवलीस; तू आम्हाला चिरडलंस.+

तू आमच्यावर रागावला होतास; पण आता आमचा पुन्हा स्वीकार कर!

 २ तू पृथ्वीला हादरवलंस; तू तिला दुभंगून टाकलंस.

तिची खिंडारं बुजव, कारण ती पडणार आहे.

 ३ तू तुझ्या लोकांना संकट सोसायला लावलंस.

तू आम्हाला द्राक्षारस प्यायला लावलास, त्यामुळे आमचे पाय अडखळू लागले.+

 ४ तुझं भय मानणाऱ्‍यांसाठी ध्वज उभार,*

म्हणजे ते त्याच्याकडे धावतील आणि बाण चुकवतील. (सेला )

 ५ तुझ्या प्रिय लोकांची सुटका व्हावी,

म्हणून तुझ्या उजव्या हाताने आम्हाला वाचव आणि आमची प्रार्थना ऐक.+

 ६ देव त्याच्या पवित्रतेमुळे* बोलला आहे:

“मी आनंदित होऊन शखेम वारसा म्हणून देईन,+

मी सुक्कोथचं खोरं* मोजून देईन.+

 ७ गिलाद माझा आहे आणि मनश्‍शेही माझा आहे,+

एफ्राईम माझ्या डोक्यावरचा टोप* आहे.

यहूदा माझा राजदंड आहे.+

 ८ मवाब माझ्यासाठी पाय धुण्याचं पात्र आहे.+

अदोमवर मी माझा जोडा फेकीन.+

पलेशेथला हरवल्यामुळे मी आनंदाने जल्लोष करीन.”+

 ९ वेढा पडलेल्या शहरात* मला कोण नेईल?

अदोमपर्यंत मला कोण घेऊन जाईल?+

१० हे देवा, तूच नाही का? पण तू तर आमच्याकडे पाठ फिरवली आहेस.

आता तू आमच्या सैन्यांसोबत लढाईला जात नाहीस.+

११ आमच्या संकटात आम्हाला साहाय्य कर,

कारण मानवांकडून मिळणारं तारण व्यर्थ आहे.+

१२ देवच आम्हाला ताकद देईल.+

तोच आमच्या शत्रूंना पायांखाली तुडवेल.+

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. तंतुवाद्यांसोबत गायलं जावं.

६१ हे देवा, माझी मदतीची याचना ऐक!

माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे!+

 २ माझं हृदय दुःखाने व्याकूळ असेल,*

तेव्हा मी पृथ्वीच्या टोकावरून तुला हाक मारीन.+

मला उंच खडकावर ने.+

 ३ कारण तू माझा आश्रय आहेस,

तू मला शत्रूंपासून सुरक्षित ठेवणारा मजबूत बुरूज आहेस.+

 ४ मी सर्वकाळ तुझ्या तंबूमध्ये राहीन;+

तुझ्या पंखांच्या सावलीत मी आश्रय घेईन.+ (सेला )

 ५ कारण हे देवा, मी केलेले नवस तू ऐकले आहेस.

तुझ्या नावाचं भय मानणाऱ्‍यांसाठी असलेला वारसा तू मला दिला आहेस.+

 ६ तू राजाच्या आयुष्याचे दिवस वाढवशील.+

तो पुष्कळ पिढ्या पाहील.

 ७ तो देवासमोर सर्वकाळ राजासनावर बसेल.*+

त्याला एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा दाखव, म्हणजे ते त्याचं रक्षण करतील.+

 ८ मग मी सर्वकाळ तुझ्या नावाची स्तुती गाईन,*+

आणि दररोज माझे नवस फेडीन.+

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. यदूथून* याच्या चालीवर गायलं जावं.

६२ मी* शांतपणे देवाची वाट पाहीन.

तो माझं तारण करेल.+

 २ तो माझा खडक, माझं तारण आणि माझा सुरक्षित आश्रय* आहे;+

मी कधीच डळमळून पडणार नाही.+

 ३ एखाद्या माणसाचा जीव घेण्यासाठी तुम्ही कधीपर्यंत त्याच्यावर हल्ला करत राहाल?+

तुम्ही सर्व जण झुकलेल्या भिंतीसारखे; पडायला आलेल्या भिंतीसारखे धोकादायक आहात.*

 ४ कारण हे लोक त्याला त्याच्या उच्च स्थानावरून खाली पाडण्यासाठी एकत्र मिळून कट रचतात.

त्यांना खोटं बोलायला आवडतं.

तोंडाने तर ते आशीर्वाद देतात, पण मनातल्या मनात ते शाप देत असतात.+ (सेला )

 ५ मी शांतपणे देवाची वाट पाहीन.*+

कारण माझी आशा त्याच्यावर आहे.+

 ६ तो माझा खडक, माझं तारण आणि माझा सुरक्षित आश्रय आहे;

मी कधीच डळमळणार नाही.+

 ७ माझं तारण आणि माझा गौरव देवावर अवलंबून आहे.

तोच माझा मजबूत खडक, माझा आश्रय आहे.+

 ८ अहो लोकांनो, तुम्ही नेहमी त्याच्यावर भरवसा ठेवा.

त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करा.+

देवच आपला आश्रय आहे.+ (सेला )

 ९ मानव म्हणजे फक्‍त एक श्‍वास!

मानव म्हणजे नुसताच एक भ्रम!+

तराजूमध्ये ठेवलं, तर ते सर्व वाफेपेक्षाही हलके भरतील.+

१० लुबाडणूक करून आपण यशस्वी होऊ, असा विचार करू नका;

चोरीने मिळवलेल्या संपत्तीवर खोटी आशा लावू नका.

तुमचं वैभव वाढलं, तरी त्यावर भरवसा ठेवू नका.+

११ मी दोनदा देवाला असं म्हणताना ऐकलं:

सामर्थ्य देवाचं आहे.+

१२ हे यहोवा, एकनिष्ठ प्रेमही तुझंच आहे,+

कारण तू प्रत्येकाला त्याच्या कार्यांप्रमाणे फळ देतोस.+

दावीदने यहूदाच्या ओसाड रानात असताना+ रचलेलं गीत.

६३ हे देवा, माझ्या देवा, मी तुला शोधत राहतो.+

माझा जीव* तुझ्यासाठी तहानलेला आहे.+

कोरड्या, रुक्ष आणि निर्जल देशात,

तुझ्या ओढीने माझा जीव कासावीस झालाय.+

 २ मी तुला तुझ्या पवित्र ठिकाणी पाहिलंय;

तुझं सामर्थ्य आणि तुझं वैभव मी पाहिलंय.+

 ३ कारण तुझं एकनिष्ठ प्रेम जीवनापेक्षाही मौल्यवान आहे,+

माझे ओठ तुझं गुणगान करतील.+

 ४ मी आयुष्यभर तुझी स्तुती करीन;

मी आपले हात उंचावून तुला हाक मारीन.

 ५ सगळ्यात चांगला आणि उत्तम वाटा मिळाल्यामुळे मी* तृप्त आहे,

म्हणून माझे ओठ आनंदाने तुझी स्तुती गातील.+

 ६ मी बिछान्यावर पडलेलो असताना तुझी आठवण करतो,

रात्रीच्या प्रहरी मी तुझ्याबद्दल विचार* करतो.+

 ७ कारण मला साहाय्य करणारा तू आहेस,+

तुझ्या पंखांच्या सावलीत आनंदी होऊन, मी मोठ्याने तुझी स्तुती करतो.+

 ८ मी सतत तुला धरून राहतो;

तुझा उजवा हात मला आधार देतो.+

 ९ पण जे माझ्या जिवावर* उठले आहेत,

ते मृत्यूच्या खोल खळग्यात जातील.

१० त्यांना तलवारीच्या स्वाधीन केलं जाईल;

कोल्हे त्यांना खाऊन टाकतील.

११ पण राजा देवामुळे आनंदी होईल.

देवाची शपथ घेणारा प्रत्येक जण हर्ष करेल,*

पण खोटं बोलणाऱ्‍यांचं तोंड कायमचं बंद केलं जाईल.

दावीदचं गीत. संचालकासाठी.

६४ हे देवा, मी याचना करतो तेव्हा माझं ऐक!+

शत्रूंच्या भयानक हल्ल्यांपासून माझ्या जीवनाचं रक्षण कर.

 २ दुष्टांच्या गुप्त कारस्थानांपासून मला वाचव,+

अपराध्यांच्या समुदायापासून मला सोडव.

 ३ ते आपली जीभ तलवारीसारखी धारदार करतात;

आपल्या क्रूर शब्दांच्या बाणांनी ते नेम धरतात.

 ४ आपल्या लपण्याच्या ठिकाणाहून ते निर्दोष माणसावर बाण चालवतात;

ते न घाबरता, अचानक त्याच्यावर हल्ला करतात.

 ५ आपले दुष्ट इरादे ते सोडत नाहीत;*

सापळे कसे रचायचे यावर ते चर्चा करतात.

ते म्हणतात: “हे कोणाला दिसतील?”+

 ६ ते वाईट कृत्यं करण्याचे नवनवीन मार्ग शोधतात;

गुप्तपणे ते चतुर योजना करतात;+

त्यांच्या मनातल्या विचारांचा थांगपत्ता लागत नाही.

 ७ पण देव त्यांच्यावर बाण चालवेल;+

ते अचानक बाणाने जखमी होतील.

 ८ त्यांची जीभच त्यांच्या नाशाचं कारण बनेल;+

त्यांना पाहणारे सर्व जण तुच्छतेने डोकं हलवतील.

 ९ तेव्हा सगळी माणसं भयभीत होतील,

ती देवाची कार्यं जाहीर करतील,

त्याच्या कार्यांबद्दल त्यांना सखोल समज मिळेल.+

१० नीतिमान माणूस यहोवामुळे आनंद करेल आणि त्याचा आश्रय घेईल;+

सरळ मनाचे सर्व लोक हर्ष करतील.*

दावीदचं गीत. स्तुतिगीत. संचालकासाठी.

६५ हे देवा, सीयोनमध्ये+ तुझी स्तुती होईल;

आम्ही तुला केलेले नवस फेडू.+

 २ हे प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवा, सर्व प्रकारचे लोक तुझ्याजवळ येतील.+

 ३ माझ्या चुकांनी मला घेरलंय,+

पण तू आमचे अपराध क्षमा करतोस.+

 ४ तुझ्या अंगणांत राहण्यासाठी+

तू ज्याला निवडतोस आणि आपल्याजवळ येऊ देतोस,

तो माणूस सुखी आहे!

तुझ्या मंदिराच्या,

तुझ्या पवित्र मंदिराच्या+ उत्तम गोष्टींनी आम्ही तृप्त होऊ.+

 ५ हे आमच्या तारण करणाऱ्‍या देवा,

तू नीतीने विस्मयकारक गोष्टी करून आमच्या प्रार्थनांचं उत्तर देशील.+

तू सबंध पृथ्वीवरच्या लोकांचा आणि

दूर समुद्रांपलीकडे राहणाऱ्‍यांचा भरवसा आहेस.+

 ६ तू* आपल्या शक्‍तीने पर्वतांना स्थिर केलंस;

तू* खूप सामर्थ्यशाली आहेस.+

 ७ तू* खवळलेल्या समुद्राला शांत करतोस,+

त्याच्या लाटांची गर्जना आणि राष्ट्रांचा गोंधळ तू शांत करतोस.+

 ८ दूरदूरच्या ठिकाणी राहणारे तुझी चिन्हं पाहून विस्मित होतील;+

सूर्य उगवतो तिथपासून, तो मावळतो तिथपर्यंत, तू सर्व लोकांना आनंदाने जल्लोष करायला लावशील.

 ९ तू पृथ्वीची काळजी घेतोस,

तिला सुपीक आणि फलदायी करतोस.*+

देवाची नदी पाण्याने भरून वाहत आहे;

तू लोकांना अन्‍नधान्य पुरवतोस,+

कारण तू पृथ्वीला फलदायी केलं आहेस.

१० तू तिच्या शेतांना पाणी पुरवतोस आणि त्यांची नांगरलेली जमीन सपाट करतोस;

पाऊस पाडून तू मातीला मऊ करतोस आणि तिने उपज द्यावा म्हणून तिला आशीर्वाद देतोस.+

११ तू आपल्या आशीर्वादांनी वर्ष सजवलं आहेस;*

तुझ्या सर्व मार्गांवर भरपूर चांगल्या गोष्टी ओसंडून वाहत आहेत.+

१२ रानातली कुरणं हिरव्यागार गवताने समृद्ध झाली आहेत,*+

डोंगर आनंदाने झाकून गेले आहेत.+

१३ कुरणं कळपांनी भरून गेली आहेत,

दऱ्‍याखोऱ्‍यांवर* धान्याचा गालीचा पसरला आहे.+

ते सर्व आनंदाने जल्लोष करत आहेत आणि गात आहेत.+

संचालकासाठी. गीत. स्तुतिगीत.

६६ पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, देवाचा जयजयकार करा!+

 २ त्याच्या गौरवशाली नावाची स्तुती गा!*

स्तुती करून त्याचा गौरव करा!+

 ३ देवाला म्हणा: “तुझी कार्यं किती विस्मयकारक आहेत!+

तुझ्या महान सामर्थ्यामुळे,

तुझे शत्रू दबकत तुझ्यापुढे येतील.+

 ४ पृथ्वीवरचे सगळे लोक तुझ्यासमोर नमन करतील;+

ते तुझं गुणगान करतील;

ते तुझ्या नावाचं गुणगान करतील.”+ (सेला )

 ५ या आणि देवाची कार्यं पाहा!

त्याने मानवांसाठी किती अद्‌भुत कार्यं केली आहेत!+

 ६ त्याने समुद्राची कोरडी जमीन केली;+

त्यांनी पायी नदी पार केली.+

तिथे आम्ही त्याच्यामुळे आनंद साजरा केला.+

 ७ तो आपल्या ताकदीने सर्वकाळ राज्य करतो.+

तो राष्ट्रांवर नजर ठेवतो.+

हेकेखोर लोकांनी स्वतःचा गौरव करू नये.+ (सेला )

 ८ अहो लोकांनो, आमच्या देवाची स्तुती करा!+

मोठ्याने त्याचा जयजयकार करा!

 ९ तो आमच्या जिवाचं रक्षण करतो;+

तो आमची पावलं अडखळू* देत नाही.+

१० हे देवा! तू आम्हाला पारखलं आहेस;+

चांदी शुद्ध करतात, तसं तू आम्हाला शुद्ध केलं आहेस.

११ तू आम्हाला शिकाऱ्‍याच्या जाळ्यात अडकवलंस;

चिरडून टाकणारं ओझं तू आमच्यावर* लादलंस.

१२ तू नाशवंत माणसांना आमच्यावर* स्वारी करू दिलीस.

आम्ही आगीतून आणि पाण्यातून गेलो.

मग तू आम्हाला विश्रांतीच्या ठिकाणी आणलंस.

१३ मी तुझ्या घरात होमार्पणं घेऊन येईन;+

तुला केलेले नवस मी फेडीन.+

१४ मी संकटात असताना त्यांबद्दल बोललो होतो;

मी आपल्या ओठांनी वचन दिलं होतं.+

१५ मी तुला धष्टपुष्ट पशूंची होमार्पणं देईन.

मेंढ्यांच्या बलिदानांचं हवन करीन.

मी तुला बैल आणि बकरे अर्पण करीन. (सेला )

१६ देवाचं भय मानणाऱ्‍या सर्वांनो, या आणि ऐका!

म्हणजे त्याने माझ्यासाठी कायकाय केलंय, हे मी तुम्हाला सांगीन.+

१७ मी त्याला हाक मारली

आणि आपल्या जिभेने त्याचा गौरव केला.

१८ जर माझ्या मनात खोट असती,

तर यहोवाने माझं ऐकलं नसतं.+

१९ पण देवाने माझं ऐकलं;+

माझ्या प्रार्थनेकडे त्याने लक्ष दिलं.+

२० देवाची स्तुती करा, कारण त्याने माझ्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष केलं नाही,

किंवा माझ्यावर एकनिष्ठ प्रेम करायचं सोडलं नाही.

संचालकासाठी सूचना. गीत. स्तुतिगीत. तंतुवाद्यांसोबत गायलं जावं.

६७ देव आपल्यावर कृपा करेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल;

तो त्याच्या चेहऱ्‍याचा प्रकाश आपल्यावर चमकवेल.+ (सेला )

 २ म्हणजे तुझा मार्ग सबंध पृथ्वीवर प्रकट होईल,+

तुझी तारणाची कार्यं सर्व राष्ट्रांना कळतील.+

 ३ हे देवा, लोकांनी तुझी स्तुती करावी;

सर्व लोकांनी तुझं गुणगान करावं.

 ४ राष्ट्रं हर्ष करोत आणि आनंदाने जयजयकार करोत!+

कारण तू पक्षपात न करता त्यांचा न्याय करशील.+

तू पृथ्वीवरच्या राष्ट्रांना मार्ग दाखवशील. (सेला )

 ५ हे देवा, लोकांनी तुझी स्तुती करावी;

सर्व लोकांनी तुझं गुणगान करावं.

 ६ पृथ्वी आपला उपज देईल;+

देव, आपला देव, आपल्याला आशीर्वाद देईल.+

 ७ देव आपल्याला आशीर्वाद देईल,

आणि पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांतले लोक त्याचं भय मानतील.*+

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. स्तुतिगीत.

६८ देवाने उठावं, त्याच्या शत्रूंची पांगापांग व्हावी

आणि त्याचा द्वेष करणारे त्याच्यासमोरून पळून जावेत.+

 २ वाऱ्‍याने वाहून जाणाऱ्‍या धुराप्रमाणे, तू त्यांना आपल्यापुढून घालवून दे;

आगीत मेण वितळतं,

तसा दुष्टांचा देवासमोर नाश व्हावा.+

 ३ पण नीतिमान लोक आनंद करोत;+

ते देवासमोर हर्षित होवोत;

ते आनंदाने जल्लोष करोत.

 ४ देवासाठी गीत गा; त्याच्या नावाचं गुणगान करा.*+

ओसाड रानांतून* स्वारी करणाऱ्‍या देवासाठी गीत गा.

याह* त्याचं नाव आहे!+ त्याच्यासमोर आनंद करा!

 ५ आपल्या पवित्र निवासस्थानात राहणारा देव,+

अनाथांचा* पिता आणि विधवांचा रक्षक* आहे.+

 ६ ज्याचं कोणी नाही, त्याला तो राहायला घर देतो;+

तो बंदिवानांना सोडवतो आणि त्यांना समृद्ध करतो.+

पण अडेल वृत्तीच्या* लोकांना रुक्ष प्रदेशात राहावं लागेल.+

 ७ हे देवा, तू जेव्हा तुझ्या लोकांना नेलंस,*+

जेव्हा वाळवंटातून तू त्यांच्यापुढे चाललास, (सेला )

 ८ तेव्हा पृथ्वीचा थरकाप उडाला;+

देवामुळे आकाशातून पाऊस पडला;*

देवामुळे, इस्राएलच्या देवामुळे, हा सीनाय पर्वत थरथरू लागला.+

 ९ हे देवा, तू भरपूर पाऊस पाडलास,

तुझ्या थकलेल्या लोकांना* तू ताजंतवानं केलंस.

१० ते तुझ्या छावणीत राहिले;+

हे देवा, तुझ्या चांगुलपणामुळे तू गरिबांच्या गरजा भागवल्यास.

११ यहोवा आपल्या लोकांना आज्ञा देतो;

आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्‍या स्त्रियांची मोठी सेना आहे.+

१२ राजे आपल्या सैन्यांसोबत पळून जातात;+ ते पळून जातात!

घरी राहिलेल्या स्त्रीलाही लुटीतला वाटा मिळतो.+

१३ तुम्हा माणसांना छावणीतल्या शेकोट्यांजवळ* पडून राहावं लागलं,

तरी तिथे चांदीने सजलेल्या पंखांचं;

शुद्ध* सोन्याची झाक असलेल्या पिसांचं कबुतर असेल.

१४ सर्वशक्‍तिमान देवाने देशातल्या राजांची पांगापांग केली,+

तेव्हा सल्मोनमध्ये बर्फ पडला.*

१५ बाशानचा पर्वत+ देवाचा पर्वत* आहे;

बाशानचा पर्वत शिखरांचा पर्वत आहे.

१६ शिखरांच्या पर्वतांनो, देवाने ज्याला आपलं निवासस्थान म्हणून निवडलं,*+

त्या पर्वताकडे तुम्ही ईर्ष्येने का पाहता?

यहोवा खरोखर तिथे सर्वकाळ निवास करेल.+

१७ देवाकडे लढाईचे हजारो-लाखो रथ आहेत.+

यहोवा सीनायमधून पवित्र ठिकाणी आला आहे.+

१८ हे याह, हे देवा, तू उंचावर चढून गेलास;+

तू आपल्यासोबत बंदिवानांना नेलंस;

तू माणसांच्या रूपात भेटी नेल्यास,+

तू अडेल वृत्तीच्या लोकांनाही नेलंस;+

त्यांच्यामध्ये राहावं, म्हणून तू त्यांना नेलंस.

१९ यहोवाची स्तुती करा; तो दररोज आमचं ओझं वाहतो,+

तो आमचं तारण करणारा खरा देव आहे! (सेला )

२० खरा देव आम्हाला संकटांतून वाचवणारा देव आहे;+

सर्वोच्च प्रभू यहोवा आम्हाला मृत्यूपासून सोडवतो.+

२१ देव आपल्या शत्रूंची डोकी फोडेल,

जे दुष्टपणा सोडत नाहीत,* त्यांच्या कवट्या तो फोडेल.+

२२ यहोवा म्हणाला: “मी त्यांना बाशानमधून परत आणीन;+

मी त्यांना खोल समुद्रातून परत आणीन.

२३ म्हणजे तुमचे पाय रक्‍तात भिजतील+

आणि तुमची कुत्री शत्रूंचं रक्‍त चाटतील.”

२४ हे देवा, ते तुझ्या मिरवणुका पाहतात.

ते पवित्र ठिकाणी जाणाऱ्‍या माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका पाहतात.+

२५ गायक पुढे चालतात, तंतुवाद्यं वाजवणारे त्यांच्यामागे चालतात;+

त्यांच्यामध्ये तरुणी डफ वाजवत जातात.+

२६ मोठ्या मंडळीत देवाची स्तुती करा;

इस्राएलच्या स्रोतापासून आलेल्यांनो, यहोवाची स्तुती करा.+

२७ तिथे सगळ्यात धाकटा बन्यामीन+ त्यांच्यावर सत्ता गाजवतो,

यहूदाचे अधिकारी आणि त्यांचा जल्लोष करणारा समुदाय,

जबुलूनचे अधिकारी आणि नफतालीचे अधिकारी हेसुद्धा सत्ता गाजवतात.

२८ तू शक्‍तिशाली व्हावं, असा आदेश तुझ्या देवाने दिलाय.

हे देवा, तू आमच्या वतीने कारवाई केली आहेस; तुझं सामर्थ्य दाखव.+

२९ यरुशलेममध्ये असलेल्या तुझ्या मंदिरासाठी,+

राजे तुझ्याकडे नजराणे* आणतील.+

३० लोक नमन करून चांदीचे तुकडे आणत* नाहीत तोपर्यंत,

तू लव्हाळ्यांमध्ये* राहणाऱ्‍या जंगली पशूंना,

बैलांना+ आणि त्यांच्या वासरांच्या कळपांना दम दे.

पण ज्यांना लढाईची आवड आहे, अशा लोकांची तू दाणादाण करतोस.

३१ इजिप्तमधून* कांस्य धातूच्या वस्तू आणल्या जातील;*+

कूश देवासाठी भेटी आणण्याची घाई करेल.

३२ पृथ्वीवरच्या राज्यांनो, देवासाठी गीत गा.+

यहोवाचं गुणगान करा.* (सेला )

३३ तो प्राचीन काळापासून असलेल्या उंचच उंच आकाशावर स्वारी करतो.+

तो आपल्या दमदार आवाजात गर्जना करतो.

३४ देवाचं सामर्थ्य ओळखा.+

इस्राएलवर त्याची सत्ता आहे,

त्याचं सामर्थ्य आकाशात* आहे.

३५ देव आपल्या* गौरवशाली मंदिरात विस्मयकारक आहे.+

तो इस्राएलचा देव आहे.

तो आपल्या लोकांना शक्‍ती आणि बळ देतो.+

देवाची स्तुती असो!

दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. “भुईकमळं” याच्या चालीवर गायलं जावं.

६९ हे देवा, मला वाचव कारण पाणी माझ्या गळ्यापर्यंत आलंय.+

 २ मी चिखलात खोल बुडालोय, मला उभं राहायला आधार नाही.+

मी खोल पाण्यात आलोय,

पाण्याच्या जोरदार प्रवाहाने मला वाहून नेलंय.+

 ३ मी आक्रोश करून दमलोय;+

माझा घसा कोरडा पडलाय.

माझ्या देवाची वाट पाहून माझे डोळे थकले आहेत.+

 ४ विनाकारण माझा द्वेष करणारे,+

माझ्या केसांपेक्षा जास्त झाले आहेत.

माझा नाश करू पाहणारे,

माझे विश्‍वासघातकी शत्रू,* पुष्कळ झाले आहेत.

मी जे चोरलं नाही, तेही त्यांनी मला बळजबरीने परत द्यायला लावलं.

 ५ हे देवा, माझा मूर्खपणा तू जाणतोस,

आणि माझा दोष तुझ्यापासून लपलेला नाही.

 ६ हे सर्वोच्च प्रभू, सैन्यांच्या यहोवा,

तुझ्यावर आशा ठेवणाऱ्‍यांना माझ्यामुळे लज्जित होऊ देऊ नकोस.

हे इस्राएलच्या देवा,

तुझा शोध घेणाऱ्‍यांना माझ्यामुळे अपमानित होऊ देऊ नकोस.

 ७ तुझ्यामुळे मला निंदा सहन करावी लागते;+

मी खूप अपमानित झालोय.+

 ८ माझे भाऊ मला परक्यासारखे वागवतात,

माझ्या सख्ख्या भावांसाठी मी विदेश्‍यासारखा झालोय.+

 ९ तुझ्या मंदिरासाठी असलेल्या आवेशाने मला झपाटून टाकलंय,+

तुझी निंदा करणाऱ्‍यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे.+

१० मी उपास करून स्वतःला* नम्र केलं,*

तेव्हा माझी निंदा करण्यात आली.

११ मी जेव्हा गोणपाट घातलं,

तेव्हा ते माझी थट्टा करू लागले.

१२ शहराच्या फाटकांमध्ये बसलेल्या लोकांसाठी मी चर्चेचा विषय बनलोय.

दारुडे लोक माझ्यावर गाणी रचतात.

१३ पण हे यहोवा, तुला मान्य असलेल्या वेळी,

माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.+

हे देवा, तुझ्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे,

तुझ्या भरवशालायक तारणाच्या कार्यांनी मला उत्तर दे.+

१४ मला दलदलीतून बाहेर काढ;

मला बुडू देऊ नकोस.

माझा द्वेष करणाऱ्‍यांपासून

आणि खोल पाण्यातून माझी सुटका कर.+

१५ मला पुराच्या लोंढ्यांसोबत वाहून जाऊ देऊ नकोस;+

खोल पाण्यात मला बुडू देऊ नकोस,

किंवा विहिरीत* गडप होऊ देऊ नकोस.+

१६ हे यहोवा, मला उत्तर दे कारण तुझं एकनिष्ठ प्रेम चांगलं आहे.+

तुझ्या अपार दयेमुळे माझ्याकडे लक्ष दे.+

१७ तुझ्या या सेवकापासून आपलं तोंड फिरवू नकोस.+

मला लवकर उत्तर दे, कारण मी संकटात सापडलोय.+

१८ माझ्याजवळ येऊन माझी सुटका कर;

माझ्या शत्रूंपासून मला सोडव.

१९ माझी होणारी निंदा, अपमान आणि अनादर तुला माहीत आहे.+

तू माझ्या सर्व शत्रूंना पाहतोस.

२० निंदेमुळे माझं हृदय भंग झालं आहे आणि ती जखम बरी होत नाही.*

मला सहानुभूतीची अपेक्षा होती, पण माझी निराशा झाली,+

मला वाटलं कोणी माझं सांत्वन करेल, पण कोणीच आलं नाही.+

२१ त्यांनी अन्‍नाऐवजी मला विष* दिलं,+

मला तहान लागली, तेव्हा त्यांनी मला आंबट द्राक्षारस दिला.+

२२ त्यांचं मेज त्यांच्यासाठी सापळा होईल

आणि त्यांची समृद्धी त्यांच्यासाठी पाश ठरेल.+

२३ त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येऊन त्यांना आंधळं होऊ दे,

त्यांचे पाय सतत थरथर कापू दे.

२४ तुझा क्रोध त्यांच्यावर ओत,

तुझ्या भयानक क्रोधाने त्यांचा नाश कर.+

२५ त्यांची छावणी ओसाड पडो;

त्यांच्या तंबूंमध्ये एकही माणूस न उरो.+

२६ कारण ज्याला तू मारलंस, त्याचा ते पाठलाग करतात,

आणि ज्याला तू जखमी केलंस, त्याचं दुःख ते उगाळत राहतात.

२७ त्यांच्या दोषांत तू आणखी दोषांची भर घाल,

तुझ्या दृष्टीने ते नीतिमान न ठरोत.

२८ जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावं पुसून टाकली जावीत;+

नीतिमानांच्या सोबत त्यांची नावं लिहिली जाऊ नयेत.+

२९ पण मी दुःखात आणि त्रासात आहे.+

हे देवा, मला वाचव आणि माझं रक्षण कर.

३० मी देवाच्या नावाचं गुणगान करीन,

मी त्याची उपकारस्तुती करून त्याचा महिमा गाईन.

३१ कारण बैलाच्या बलिदानापेक्षा, यामुळे यहोवाला जास्त आनंद होईल,

शिंगं आणि खुरं असलेल्या गोऱ्ह्याच्या* बलिदानापेक्षा, यामुळे त्याला जास्त आनंद होईल.+

३२ नम्र लोक हे पाहतील आणि त्यांना आनंद होईल.

देवाचा शोध घेणाऱ्‍यांनो, तुमच्या मनाला बळ मिळो.

३३ कारण यहोवा गरिबांच्या विनंत्या ऐकतो,+

बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांकडे तो दुर्लक्ष करणार नाही.+

३४ आकाश आणि पृथ्वी;

समुद्र आणि त्यांतले सर्व जीव त्याची स्तुती करोत!+

३५ कारण देव सीयोनला वाचवेल,+

तो यहूदाची शहरं पुन्हा बांधेल

आणि त्याचे लोक या देशाचा ताबा घेऊन इथे राहतील.

३६ त्याच्या सेवकांच्या वंशजांना देशाचा वारसा मिळेल,+

त्याच्या नावावर प्रेम करणारे+ तिथे राहतील.

संचालकासाठी सूचना. आठवणीसाठी असलेलं दावीदचं गीत.

७० हे देवा, मला वाचव;

हे यहोवा, माझ्या मदतीला धावून ये.+

 २ माझ्या जिवावर उठलेल्या सर्वांना

लज्जित आणि अपमानित होऊ दे.

माझ्यावर आलेलं संकट पाहून आनंद करणाऱ्‍यांना

शरमेने माघार घ्यायला लाव.

 ३ “बरं झालं! बरं झालं!” असं म्हणून जे माझी थट्टा करतात,

त्यांना लज्जित होऊन परत जायला लाव.

 ४ पण जे तुझा शोध घेतात,

त्यांना तुझ्यामुळे आनंदित व हर्षित होऊ दे.+

तुझी तारणाची कार्यं ज्यांना प्रिय वाटतात, ते नेहमी असं म्हणोत:

“देवाचा महिमा होवो!”

 ५ पण मी तर गरीब आणि असाहाय्य आहे;+

हे देवा, माझ्यासाठी लवकरात लवकर कार्य कर.+

हे यहोवा, उशीर लावू नकोस;+

मला साहाय्य करणारा आणि वाचवणारा तूच आहेस!+

७१ हे यहोवा, मी तुझा आश्रय घेतला आहे.

मला कधीही लज्जित होऊ देऊ नकोस.+

 २ तुझ्या नीतीमुळे मला वाचव आणि माझी सुटका कर.

माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे* आणि मला वाचव.+

 ३ माझ्यासाठी तू खडकावर असलेल्या अशा गडासारखा हो,

ज्यात मी कधीही जाऊ शकेन.

मला वाचवलं जावं अशी आज्ञा दे,

कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस.+

 ४ हे माझ्या देवा, दुष्टाच्या हातून माझी सुटका कर,+

अन्याय आणि जुलूम करणाऱ्‍याच्या तावडीतून मला सोडव.

 ५ कारण हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तूच माझी आशा आहेस;

मी तरुण होतो, तेव्हापासून मी तुझ्यावरच भरवसा ठेवलाय.*+

 ६ माझा जन्म झाला, तेव्हापासूनच मी तुझ्यावर विसंबून राहिलोय.

तूच मला माझ्या आईच्या उदरातून* काढलंस.+

मी सतत तुझी स्तुती करतो.

 ७ माझ्यासोबत जे घडलं, ते पाहून बऱ्‍याच लोकांना आश्‍चर्य वाटतं,

पण तू माझं मजबूत आश्रयस्थान आहेस.

 ८ मी नेहमी तुझी स्तुती करतो;+

दिवसभर मी तुझ्या गौरवाचं वर्णन करतो.

 ९ माझ्या म्हातारपणी मला सोडून देऊ नकोस;+

माझं शरीर थकल्यावर मला टाकून देऊ नकोस.+

१० माझे शत्रू माझ्याविरुद्ध बोलतात,

माझ्या जिवावर उठलेले आपसात मिळून कट रचतात.+

११ ते म्हणतात: “देवाने त्याला सोडून दिलंय.

त्याचा पाठलाग करा आणि त्याला पकडा, कारण त्याला वाचवायला कोणीही नाही.”+

१२ हे देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.

हे माझ्या देवा, माझ्या मदतीला धावून ये.+

१३ माझा विरोध करणाऱ्‍यांना

लज्जित होऊ दे; त्यांचा नाश होऊ दे.+

माझ्यावर संकट आणणाऱ्‍यांचा

अपमान आणि अनादर होऊ दे.+

१४ पण मी तर वाट पाहत राहीन;

मी तुझी आणखीनच स्तुती करीन.

१५ मी आपल्या तोंडाने तुझ्या नीतिमत्त्वाचं वर्णन करीन;+

तुझी तारणाची कार्यं अगणित* असली,+ तरी

मी दिवसभर त्यांचं वर्णन करत राहीन.

१६ हे सर्वोच्च प्रभू यहोवा,

मी तुझ्या पराक्रमांबद्दल सांगीन.

मी तुझ्या, फक्‍त तुझ्याच नीतिमत्त्वाचं वर्णन करीन.

१७ हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस,+

आणि मी अजूनही तुझी अद्‌भुत कार्यं घोषित करत आहे.+

१८ हे देवा, मी म्हातारा झाल्यावर आणि माझे केस पांढरे झाल्यावरही मला सोडू नकोस.+

मला पुढच्या पिढीला तुझ्या सामर्थ्याबद्दल;*

येणाऱ्‍या सर्वांना तुझ्या पराक्रमांबद्दल सांगू दे.+

१९ हे देवा, तुझं नीतिमत्त्व आभाळापर्यंत पोहोचलंय;+

तू महान कार्यं केली आहेस;

हे देवा, तुझ्यासारखा कोण आहे?+

२० तू माझ्यावर पुष्कळ संकटं आणि दुःखं येऊ दिलीस,+

पण आता मला पुन्हा सावर;

मला खोल पाण्यातून बाहेर काढ.+

२१ माझा सन्मान मला परत मिळू दे

तुझ्या संरक्षणाने मला वेढ आणि माझं सांत्वन कर.

२२ मग मी तंतुवाद्यावर तुझी स्तुती गाईन,

कारण हे माझ्या देवा, तू विश्‍वासू आहेस.+

हे इस्राएलच्या पवित्र देवा, मी वीणेवर* तुझं गुणगान करीन.*

२३ मी तुझं गुणगान करीन आणि माझे ओठ आनंदाने तुझा जयजयकार करतील,+

कारण तू माझा जीव वाचवला आहेस.+

२४ दिवसभर माझी जीभ तुझ्या नीतिमत्त्वाबद्दल बोलेल,*+

कारण माझा नाश करू पाहणारे लज्जित आणि अपमानित होतील.+

शलमोनबद्दल.

७२ हे देवा, राजाला तुझे न्याय-निर्णय कळव;

त्याला* तुझ्या नीतीबद्दल शिकव.+

 २ तो तुझ्या लोकांचं नीतीने समर्थन करो

आणि तुझ्या गोरगरिबांचा योग्य न्याय करो.+

 ३ पर्वत लोकांना शांती देवोत

आणि टेकड्या नीती आणोत.

 ४ त्याने लोकांमधल्या दीनदुबळ्यांचं समर्थन करावं.*

गोरगरिबांच्या मुलाबाळांना वाचवावं,

आणि फसवणूक करणाऱ्‍याला चिरडून टाकावं.+

 ५ हे देवा, जोपर्यंत सूर्य आहे,

आणि जोपर्यंत चंद्र राहील,

तोपर्यंत तुझे लोक पिढ्या न्‌ पिढ्या तुझं भय मानतील.+

 ६ तो कापलेल्या गवतावर पडणाऱ्‍या पावसाप्रमाणे

आणि पृथ्वीवर बरसणाऱ्‍या सरींप्रमाणे असेल.+

 ७ त्याच्या शासनकाळात नीतिमानांची भरभराट होईल,*+

आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल.+

 ८ एका समुद्रापासून दुसऱ्‍या समुद्रापर्यंत

आणि नदीपासून* पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत त्याची प्रजा असेल.*+

 ९ वाळवंटात राहणारे राजाला नमन करतील,

आणि तो आपल्या शत्रूंना धूळ चारेल.+

१० तार्शीशचे आणि बेटांचे राजे नजराणे आणतील.+

शबाचे आणि सबाचे राजे भेटी घेऊन येतील.+

११ सर्व राजे त्याला नमन करतील,

आणि सगळी राष्ट्रं त्याची सेवा करतील.

१२ कारण साहाय्यासाठी हाक मारणाऱ्‍या गरिबांची;

दीनदुबळ्या आणि असाहाय्य लोकांची तो सुटका करेल.

१३ दीनदुबळ्यांवर आणि गरिबांवर तो दया करेल;

गोरगरिबांचे जीव तो वाचवेल.

१४ तो त्यांची अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल.

त्यांचं रक्‍त त्याच्या नजरेत मौल्यवान असेल.

१५ त्याला मोठं आयुष्य लाभो आणि त्याला शबाचं सोनं दिलं जावो.+

लोक सतत त्याच्यासाठी प्रार्थना करोत,

आणि त्याला दिवसभर आशीर्वाद देवोत.

१६ पृथ्वी भरपूर उपज देईल;+

पर्वतांच्या शिखरांवरही पुष्कळ धान्य उगवेल.

लबानोनच्या पिकासारखं राजाचं पीक असेल,+

आणि शहरांमध्ये लोक जमिनीवरच्या गवतासारखे वाढतील.+

१७ त्याचं नाव सर्वकाळ राहो,+

सूर्य असेपर्यंत त्याची भरभराट होवो.

लोक त्याच्या नावाने एकमेकांना आशीर्वाद देवोत;+

सर्व राष्ट्रं त्याला धन्य म्हणोत!

१८ इस्राएलचा देव यहोवा याची स्तुती असो!+

तोच अद्‌भुत कार्यं करतो.+

१९ त्याच्या गौरवशाली नावाची सर्वकाळ स्तुती होवो!+

त्याच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी भरून जावो!+

आमेन, आमेन.

२० इशायचा मुलगा दावीद+ याच्या प्रार्थना इथे संपतात.

तिसरं पुस्तक

(स्तोत्रं ७३-८९)

आसाफचं गीत.+

७३ देव इस्राएलला, शुद्ध मनाच्या लोकांना खरोखर चांगुलपणा दाखवतो.+

 २ पण माझी पावलं तर जवळजवळ भरकटलीच होती;

मी पडण्याच्या बेतात होतो.+

 ३ कारण, दुष्ट लोक किती आरामात राहतात,+

हे पाहून मला त्या गर्विष्ठांचा* हेवा वाटू लागला.

 ४ त्यांचं शरीर अगदी धडधाकट असतं*

आणि त्यांना सुखाने मरण येतं.+

 ५ इतर लोकांसारख्या समस्या त्यांना नसतात,+

इतर माणसांसारखे त्रास त्यांना सोसावे लागत नाहीत.+

 ६ त्यामुळे गर्व त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे;+

हिंसा ते वस्त्रासारखी पांघरतात.

 ७ लठ्ठपणामुळे* त्यांचे डोळे सुजले आहेत;

त्यांनी कल्पनाही केली नव्हती इतकं त्यांनी मिळवलंय.

 ८ ते तुच्छतेने हसतात आणि दुष्टपणे बोलतात.+

ते उद्धटपणे इतरांना छळण्याच्या धमक्या देतात.+

 ९ ते आकाशाइतके उंच असल्यासारखे बोलतात,

ते पृथ्वीवर बढाया मारत फिरतात.

१० म्हणून, देवाचे* लोक त्यांच्याकडे वळतात,

त्यांच्याजवळ असलेल्या भरपूर पाण्यातून ते पितात.

११ ते म्हणतात: “देवाला कसं कळेल?+

सर्वोच्च देवाला या गोष्टी खरंच माहीत आहेत का?”

१२ तर दुष्ट हे असे असतात; त्यांचं सगळं सुरळीत चालतं.+

ते आपली संपत्ती वाढवत राहतात.+

१३ खरंच, मी उगाचच माझं हृदय शुद्ध ठेवलं

आणि निर्दोषतेने आपले हात धुतले.+

१४ मी दिवसभर चिंतेत असायचो;+

रोज सकाळी देव माझं ताडन करायचा.+

१५ पण जर मी मनातल्या या गोष्टी बोलून दाखवल्या असत्या,

तर ते तुझ्या लोकांचा* विश्‍वासघात करण्यासारखं ठरलं असतं.

१६ मी या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला,

तेव्हा मला मनस्ताप झाला.

१७ शेवटी, मी देवाच्या महान उपासना मंडपात आलो

आणि त्यांच्या भविष्याबद्दल विचार केला.

१८ खरंच, तू त्यांना निसरड्या जमिनीवर ठेवलं आहेस.+

तू त्यांना खाली पाडून, त्यांचा नाश होऊ देतोस.+

१९ ते एका क्षणात धुळीला मिळतात!+

अगदी अचानक त्यांचा भयंकर अंत होतो!

२० जागा झाल्यावर जसा माणूस स्वप्न विसरून जातो,

तसा हे यहोवा, तू उठशील तेव्हा त्यांना झिडकारशील.*

२१ पण माझं मन निराश झालं होतं,+

माझ्या मनाला खूप यातना होत होत्या.

२२ मी अविचारी आणि मूर्ख माणसासारखा विचार करत होतो;

तुझ्यापुढे मी एखाद्या बुद्धिहीन पशूसारखा झालो होतो.

२३ पण आता मी सतत तुझ्यासोबत आहे;

तू माझा उजवा हात धरला आहेस.+

२४ तू सल्ला देऊन मला मार्ग दाखवशील+

आणि पुढे माझ्यावर कृपा करशील.+

२५ स्वर्गात मला तुझ्याशिवाय कोण आहे?

तुझ्याशिवाय या पृथ्वीवर मला आणखी काहीही नको.+

२६ माझं शरीर आणि मन जरी थकलं,

तरी देव माझा खडक आहे, तो माझ्या मनाला बळ देतो.

तोच माझा सर्वकाळाचा वाटा आहे.+

२७ तुझ्यापासून दूर राहणाऱ्‍यांचा नक्कीच नाश होईल.

तुझ्याशी अविश्‍वासूपणे वागून, तुला सोडून देणाऱ्‍यांचा* तू सर्वनाश करशील.*+

२८ पण, माझ्यासाठी तर देवाच्या जवळ जाणं हेच हिताचं आहे.+

मी सर्वोच्च प्रभू यहोवा याचा आश्रय घेतला आहे;

मी त्याची सगळी कार्यं घोषित करीन.+

आसाफचं गीत.+ मस्कील.*

७४ हे देवा, तू आमच्याकडे कायमची पाठ का फिरवलीस?+

तुझ्या कुरणातल्या कळपावर तू का क्रोधित झाला आहेस?+

 २ ज्या लोकांना* तू फार पूर्वी निवडलं होतंस त्यांची आठवण कर,+

ज्या लोकांना तू आपला वारसा होण्यासाठी सोडवलंस त्यांना आठव.+

ज्या सीयोन पर्वतावर तू राहिलास त्याची आठवण कर.+

 ३ कायमच्या नाश झालेल्या ठिकाणाकडे तुझी पावलं वळव.+

शत्रूने पवित्र ठिकाणातल्या सर्व गोष्टी उद्ध्‌वस्त केल्या आहेत.+

 ४ तुझ्या शत्रूंनी तुझ्या उपासनेच्या ठिकाणी* जयघोष केला.+

त्यांनी तिथे खुणा म्हणून स्वतःचे झेंडे उभारले आहेत.

 ५ कुऱ्‍हाडींनी दाट जंगल तोडून टाकणाऱ्‍या माणसांसारखे ते होते.

 ६ त्यांनी कुऱ्‍हाडींनी आणि लोखंडी दांड्यांनी सगळ्या नक्षीकामाची+ नासधूस केली.

 ७ त्यांनी तुझ्या मंदिराला आग लावली.+

त्यांनी तुझ्या नावाच्या निवासस्थानाचा अनादर केला, त्याला जमीनदोस्त केलं.

 ८ ते आणि त्यांची मुलं मनात म्हणाली:

“देशात देवाच्या उपासनेची जितकी ठिकाणं आहेत, ती सर्व जाळून टाकली पाहिजेत.”

 ९ आम्हाला कोणतीही चिन्हं दिसत नाहीत;

आमच्यात आता कोणीही संदेष्टा नाही,

आणि हे अजून किती काळ चालेल, हे आमच्यापैकी कोणालाही माहीत नाही.

१० हे देवा, वैरी अजून कुठवर टोमणे मारत राहील?+

शत्रू कायम तुझ्या नावाचा अनादर करत राहील का?+

११ तू तुझा हात, तुझा उजवा हात का आवरतोस?+

तो तुझ्या छातीवरून* काढ आणि त्यांचा नाश कर.

१२ देव तर फार पूर्वीपासून माझा राजा आहे,

तो पृथ्वीवर तारणाची कार्यं करतो.+

१३ तू आपल्या सामर्थ्याने समुद्रात खळबळ माजवलीस;+

तू समुद्रातल्या महाकाय प्राण्यांची डोकी फोडलीस.

१४ तू लिव्याथानाची* डोकी चिरडून टाकलीस;

तू ती लोकांना, वाळवंटात राहणाऱ्‍या लोकांना अन्‍न म्हणून दिलीस.

१५ तू जमीन उघडून झरे आणि नद्या वाहायला लावल्यास;+

सतत वाहणाऱ्‍या नद्या तू कोरड्या केल्यास.+

१६ दिवस तुझा आणि रात्रही तुझीच आहे.

तू प्रकाशाला* आणि सूर्याला निर्माण केलंस.+

१७ तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठरवल्यास;+

उन्हाळा आणि हिवाळाही तूच केलास.+

१८ हे यहोवा, शत्रूंचे टोमणे आठव;

एक मूर्ख राष्ट्र तुझ्या नावाचा कसा अनादर करतं, ते आठव.+

१९ तुझ्या पारव्याचा* जीव हिंस्र पशूंच्या हाती देऊ नकोस.

तुझ्या पीडित लोकांना कायमचं विसरू नकोस.

२० तू आमच्याशी केलेला करार आठव,

कारण पृथ्वीवरच्या प्रत्येक अंधाऱ्‍या ठिकाणी, हिंसाचार करणारे टपून बसले आहेत.

२१ चिरडलेला माणूस निराश होऊन परत जाऊ नये;+

दीनदुबळ्यांनी तुझ्या नावाचा जयजयकार करावा.+

२२ हे देवा, ऊठ आणि तुझा वाद मांड.

मूर्ख कसे दिवसभर तुला टोमणे मारतात, ते आठव.+

२३ तुझे शत्रू काय म्हणत आहेत हे विसरू नकोस.

तुझा विरोध करणाऱ्‍यांचा आरडाओरडा आकाशापर्यंत जात आहे.

आसाफचं गीत.+ संचालकासाठी सूचना. “नाश करू नकोस” याच्या चालीवर गायलं जावं.

७५ आम्ही तुला धन्यवाद देतो. हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो.

तुझं नाव आमच्यासोबत आहे.+

सर्व लोक तुझ्या अद्‌भुत कार्यांचं वर्णन करतात.

 २ तू म्हणतोस: “मी जेव्हा एक वेळ ठरवतो,

तेव्हा मी निःपक्षपणे न्याय करतो.

 ३ पृथ्वी आणि तिचे रहिवासी थरथर कापू लागले,*

तेव्हा मीच तिचे पाये स्थिर केले.” (सेला )

 ४ बढाया मारणाऱ्‍यांना मी म्हणतो, “बढाई मारू नका,”

आणि दुष्टांना म्हणतो, “आपल्या ताकदीचा* तोरा मिरवू नका.

 ५ तुमच्या ताकदीचा* जास्त तोरा मिरवू नका,

आणि उद्धटपणे बोलू नका.

 ६ कारण माणसाला प्रतिष्ठा

पूर्वेकडून, पश्‍चिमेकडून किंवा दक्षिणेकडून मिळत नाही.

 ७ देवच न्यायाधीश आहे.+

तो एका माणसाला खाली आणतो, तर दुसऱ्‍याला वर चढवतो.+

 ८ कारण यहोवाच्या हातात एक प्याला आहे;+

त्यात फेसाळणारा आणि मसाले घालून तयार केलेला द्राक्षारस आहे.

तो हा प्याला नक्कीच ओतेल

आणि पृथ्वीवरचे सर्व दुष्ट लोक त्यातल्या गाळासहित त्यातून पितील.”+

 ९ पण मी तर सर्वकाळ याविषयी लोकांना सांगत राहीन;

मी याकोबच्या देवाचं गुणगान करीन.*

१० कारण तो म्हणतो, “दुष्टांची ताकद* मी नाहीशी करीन,

पण नीतिमानांची ताकद* आणखी वाढेल.”

आसाफचं गीत.+ संचालकासाठी सूचना. स्तुतिगीत. हे गीत तंतुवाद्यांच्या साथीने गायलं जावं.

७६ यहूदामध्ये देवाला ओळखलं जातं;+

इस्राएलमध्ये त्याचं नाव महान आहे.+

 २ त्याचा तंबू शालेममध्ये;+

आणि त्याचं निवासस्थान सीयोनमध्ये आहे.+

 ३ तिथे त्याने धनुष्याचे जळते बाण,

ढाल, तलवार आणि युद्धाची सर्व शस्त्रं मोडून टाकली.+ (सेला )

 ४ तू तेज पांघरलं आहेस;*

शिकारीच्या पर्वतांपेक्षाही तू वैभवशाली आहेस.

 ५ धैर्यवान मनाच्या लोकांना लुटण्यात आलं.+

ते झोपी गेले आहेत.

सर्व योद्धे अगदी असाहाय्य होते.+

 ६ हे याकोबच्या देवा, तुझ्या धमकावण्याने

रथ चालवणारा आणि घोडा या दोघांनीही कायमचे डोळे मिटले आहेत.+

 ७ तू एकटाच विस्मयकारक आहेस.+

तुझ्या तीव्र क्रोधापुढे कोण उभं राहू शकतं?+

 ८ तू स्वर्गातून आपला न्याय-निर्णय घोषित केलास;+

पृथ्वी भयभीत आणि शांत झाली.+

 ९ देव न्याय करण्यासाठी

आणि पृथ्वीच्या सर्व नम्र लोकांना वाचवण्यासाठी उठला.+ (सेला )

१० कारण माणसाच्या रागामुळे तुझी स्तुती होईल;+

त्यांच्या उरल्यासुरल्या रागाने तू स्वतःचा गौरव करून घेशील.

११ तुमचा देव यहोवा याला नवस करा आणि ते फेडा,+

त्याच्या अवतीभवती असलेल्यांनी, त्याचं भय मानून आपल्या भेटी आणाव्यात.+

१२ तो अधिकाऱ्‍यांना नमवतो;

तो पृथ्वीच्या राजांना घाबरवून सोडतो.

आसाफचं गीत.+ संचालकासाठी सूचना. यदूथूनच्या* चालीवर गायलं जावं.

७७ मी देवाला मोठ्याने हाक मारीन;

मी देवाला हाक मारीन आणि तो माझं ऐकेल.+

 २ माझ्या संकटाच्या दिवशी मी यहोवाला शोधतो.+

रात्रीही मी सतत माझे हात त्याच्यापुढे पसरून ठेवतो,*

तरीही माझं* सांत्वन होत नाही.

 ३ मला देवाची आठवण येते, तेव्हा मी कण्हतो;+

मी व्याकूळ होतो आणि माझी शक्‍ती नाहीशी होते.+ (सेला )

 ४ तू मला डोळे मिटू देत नाहीस;

मी बेचैन झालोय आणि माझ्या तोंडून शब्द निघत नाहीत.

 ५ फार पूर्वीच्या दिवसांबद्दल

आणि गतकाळातल्या वर्षांबद्दल मी विचार करू लागतो.+

 ६ रात्रीच्या प्रहरी मी माझं गीत* आठवतो;+

मी आपल्या मनाशी विचार करतो;+

मी सर्व गोष्टींचा अगदी कसून शोध घेतो.

 ७ यहोवा आपल्याला कायमचं टाकून देईल का?+

तो पुन्हा कधीही आपल्यावर कृपा करणार नाही का?+

 ८ त्याचं एकनिष्ठ प्रेम कायमचं आटलं आहे का?

येणाऱ्‍या सर्व पिढ्यांसाठी त्याचं अभिवचन व्यर्थ ठरेल का?

 ९ देव कृपा करायला विसरलाय का?+

की आपल्या रागामुळे त्याने दया दाखवायचं सोडून दिलंय? (सेला )

१० मी असं म्हणत राहतो: “सर्वोच्च देवाने आपल्याला पाठिंबा* द्यायचं सोडून दिलंय,

याचं मला फार दुःख होतं.”+

११ मी याहची कार्यं आठवीन;

तू फार पूर्वी केलेल्या पराक्रमांची मी आठवण करीन.

१२ मी तुझ्या सर्व कार्यांवर मनन करीन,

त्यांच्यावर मी खोल विचार करीन.+

१३ हे देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत.

हे देवा, तुझ्यासारखा महान देव दुसरा कोण आहे?+

१४ तू अद्‌भुत गोष्टी करणारा खरा देव आहेस.+

तू राष्ट्रांना आपलं सामर्थ्य दाखवलं आहेस.+

१५ तुझ्या शक्‍तीने* तू तुझ्या लोकांची सुटका केलीस,+

तू याकोबच्या आणि योसेफच्या मुलांना सोडवलंस. (सेला )

१६ हे देवा, समुद्राने तुला पाहिलं;

त्याने तुला पाहिलं आणि तो भयभीत झाला.+

खोल समुद्रात खळबळ माजली.

१७ मेघांनी पाण्याचा वर्षाव केला.

आभाळातून गर्जना होऊ लागली

आणि सर्व दिशांना तुझे बाण सुटले.+

१८ तुझ्या गर्जनेचा आवाज+ रथाच्या चाकांसारखा होता;

चकाकणाऱ्‍या विजांमुळे पृथ्वी उजळून गेली;+

तिला हादरे बसले आणि ती थरथर कापू लागली.+

१९ तुझा मार्ग समुद्रातून,+

तुझी वाट महासागरांतून गेली;

पण तुझ्या पावलांच्या खुणा सापडल्या नाहीत.

२० मोशे आणि अहरोन यांच्या देखरेखीखाली*+

तू आपल्या लोकांना कळपासारखं नेलंस.+

आसाफचं गीत.+ मस्कील.*

७८ माझ्या लोकांनो, माझा उपदेश* ऐका;

माझ्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांकडे लक्ष द्या.

 २ मी आपलं तोंड उघडून नीतिवचन बोलीन.

मी पूर्वीच्या काळातली कोडी सांगीन.+

 ३ ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या आहेत आणि ज्या आम्हाला माहीत आहेत,

ज्या आमच्या वाडवडिलांनी आम्हाला सांगितल्या,+

 ४ त्या आम्ही आपल्या मुलांपासून लपवणार नाही.

येणाऱ्‍या पिढ्यांना आम्ही त्यांबद्दल सांगू.+

यहोवाची स्तुतिपात्र कार्यं आणि त्याचं सामर्थ्य+

आणि त्याने केलेल्या अद्‌भुत गोष्टी+ यांबद्दल आम्ही त्यांना सांगू.

 ५ त्याने याकोबला एक स्मरण-सूचना* दिली

आणि इस्राएलमध्ये एक नियम घालून दिला;

त्याने आमच्या वाडवडिलांना अशी आज्ञा दिली,

की त्यांनी या गोष्टी आपल्या मुलाबाळांना सांगाव्यात.+

 ६ म्हणजे पुढच्या पिढीला,

पुढे जन्माला येणाऱ्‍या मुलांना त्या कळतील+

आणि मग ते लोकसुद्धा आपल्या मुलाबाळांना त्यांबद्दल सांगतील.+

 ७ यामुळे ते देवावर भरवसा ठेवतील

आणि देवाची कार्यं विसरून जाणार नाहीत.+

उलट, ते त्याच्या आज्ञांचं पालन करतील.+

 ८ मग ते आपल्या वाडवडिलांसारखे होणार नाहीत,

कारण ती तर एक हट्टी आणि बंडखोर पिढी होती.+

अस्थिर* मनाच्या लोकांची+

आणि देवाला विश्‍वासू नसलेल्या लोकांची ती पिढी होती.

 ९ एफ्राईमचे लोक धनुष्य घेऊन सज्ज होते,

पण लढाईच्या दिवशी त्यांनी माघार घेतली.

१० त्यांनी देवाचा करार मोडला+

आणि ते त्याच्या नियमाप्रमाणे चालायला तयार झाले नाहीत.+

११ त्याने आपल्यासाठी काय काय केलंय, हे त्यांनी आठवणीत ठेवलं नाही;+

त्याने त्यांच्यासमोर केलेली अद्‌भुत कार्यं ते विसरून गेले.+

१२ त्याने इजिप्तच्या देशात, सोअनच्या प्रदेशात+

त्यांच्या वाडवडिलांच्या देखत आश्‍चर्यकारक गोष्टी केल्या.+

१३ त्यांना पलीकडे जाता यावं म्हणून त्याने समुद्राला दुभागलं,

त्याने पाण्याला भिंतीसारखं* उभं केलं.+

१४ त्याने दिवसा ढगाच्या साहाय्याने

आणि रात्रभर अग्नीच्या प्रकाशाने त्यांना मार्ग दाखवला.+

१५ त्याने ओसाड रानात खडक फोडले,

त्याने महासागरांच्या पाण्याप्रमाणे त्यांना भरपूर पाणी प्यायला दिलं.+

१६ त्याने खडकातून झरे वाहायला लावले

आणि नद्यांप्रमाणे पाणी वाहायला लावलं.+

१७ पण तरीही ते ओसाड रानात सर्वोच्च देवाविरुद्ध बंड करून,

त्याच्याविरुद्ध पाप करत राहिले.+

१८ त्यांना हव्या असलेल्या अन्‍नाची* मागणी करून,

त्यांनी आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली.*+

१९ ते देवाच्या विरोधात बोलले

आणि म्हणाले: “देव ओसाड रानात आपल्याला अन्‍न देऊ शकतो का?”+

२० पाहा! त्याने खडकाला मारलं

तेव्हा पाणी वाहू लागलं आणि झरे उफाळून आले.+

तरीसुद्धा ते म्हणाले: “तो आपल्याला भाकरही देऊ शकेल का,

किंवा आपल्या लोकांना मांस देऊ शकेल का?”+

२१ यहोवाने त्यांचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याला संताप आला;+

याकोबविरुद्ध अग्नी+ पेटला

आणि इस्राएलविरुद्ध त्याचा क्रोध भडकला.+

२२ कारण त्यांनी देवावर विश्‍वास ठेवला नाही;+

देव आपल्याला वाचवू शकतो, असा भरवसा त्यांनी बाळगला नाही.

२३ म्हणून त्याने आकाशातल्या मेघांना आज्ञा दिली

आणि आकाशाची दारं उघडली.

२४ त्याने त्यांच्यासाठी मान्‍नाचा वर्षाव केला;

त्याने त्यांना स्वर्गातलं धान्य दिलं.+

२५ माणसांनी स्वर्गदूतांचं*+ अन्‍न खाल्लं;

ते खाऊन तृप्त होतील इतकं अन्‍न त्याने त्यांना दिलं.+

२६ त्याने आकाशात पूर्वेकडचा वारा;

आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा वाहायला लावला.+

२७ मग त्याने धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा वर्षाव केला,

त्याने समुद्रकिनारी असलेल्या वाळूच्या कणांसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला.

२८ त्याने आपल्या छावणीच्या मधोमध;

आपल्या तंबूंच्या अवतीभवती त्यांना पाडलं.

२९ तेव्हा त्यांनी ते अधाश्‍यासारखं खाल्लं.

त्यांना जे हवं होतं, ते देवाने त्यांना दिलं.+

३० पण त्यांना आणखी हाव सुटली;

तेव्हा, अन्‍न अजून त्यांच्या तोंडातच असताना,

३१ देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला.+

त्याने त्यांच्यातल्या सर्वात शक्‍तिशाली पुरुषांना ठार मारलं.+

त्याने इस्राएलच्या तरुणांना खाली पाडलं.

३२ तरीसुद्धा, ते आणखी जास्त पाप करत राहिले+

आणि त्याच्या अद्‌भुत कार्यांवर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही.+

३३ म्हणून, त्याने त्यांचे दिवस श्‍वासाप्रमाणे संपवले.+

त्याने त्यांची वर्षं, अचानक आलेल्या संकटांनी संपवून टाकली.

३४ पण जितक्या वेळा तो त्यांना ठार मारायचा, तितक्या वेळा ते त्याचा शोध घ्यायचे;+

ते परत फिरून देवाला शोधायचे.

३५ देव आपला खडक आहे+

आणि सर्वोच्च देव आपला सोडवणारा* आहे,+ हे त्यांना आठवायचं.

३६ पण त्यांनी आपल्या तोंडाने त्याची फसवणूक करायचा प्रयत्न केला

आणि ते आपल्या जिभेने त्याच्याशी खोटं बोलले.

३७ त्याची सेवा करण्यासाठी त्यांचं मन स्थिर नव्हतं.+

त्याच्या कराराशी ते विश्‍वासू राहिले नाहीत.+

३८ पण तो दयाळू होता;+

त्याने त्यांच्या अपराधाची क्षमा केली* आणि त्यांचा नाश केला नाही.+

त्याने बऱ्‍याचदा आपला राग आवरला;+

आपला सगळा संताप त्याने व्यक्‍त केला नाही.

३९ कारण ते केवळ मानव आहेत;+

एकदा वाहून गेल्यावर परत न येणाऱ्‍या वाऱ्‍यासारखे ते आहेत, हे त्याने लक्षात ठेवलं.

४० त्यांनी ओसाड रानात कित्येकदा त्याच्याविरुद्ध बंड केलं+

आणि वाळवंटात त्याचं मन दुखावलं!+

४१ त्यांनी पुन्हा पुन्हा देवाची परीक्षा पाहिली+

आणि इस्राएलच्या पवित्र देवाला त्यांनी दुःख दिलं.

४२ त्याचं सामर्थ्य* त्यांनी आठवणीत ठेवलं नाही,

त्याने शत्रूपासून त्यांना वाचवलं*+ तो दिवस ते विसरले.

४३ त्याने इजिप्तमध्ये आपली चिन्हं दाखवली+

आणि सोअनच्या प्रदेशात आपले चमत्कार दाखवले.

४४ त्याने नाईलच्या कालव्यांतल्या पाण्याचं रक्‍त केलं+

त्यामुळे लोक आपल्या पाटांतलं पाणी पिऊ शकले नाहीत.

४५ त्याने त्यांना खाऊन टाकण्यासाठी गोमाश्‍यांचे थवे;+

त्यांचा नाश करण्यासाठी बेडूक पाठवले.+

४६ त्याने त्यांची पिकं अधाशी टोळांना दिली;

त्यांच्या कष्टाचं फळ त्याने टोळांच्या झुंडींना दिलं.+

४७ त्याने गारपिटीने+ त्यांच्या द्राक्षमळ्यांची नासधूस केली

आणि गारा पाडून त्यांची उंबराची झाडं नष्ट केली.

४८ त्याने त्यांच्या ओझी वाहणाऱ्‍या प्राण्यांना गारांच्या

आणि त्यांच्या गुराढोरांना विजांच्या* हवाली केलं.+

४९ त्याने आपल्या क्रोधाच्या अग्नीने,

संताप, रोष आणि विपत्ती यांनी त्यांना पीडित केलं.

त्यांच्यावर संकटं आणण्यासाठी त्याने स्वर्गदूतांच्या दलांना पाठवलं.

५० त्याने आपल्या रागाला मोकळी वाट करून दिली.

त्याने त्यांना मृत्यूपासून वाचवलं नाही

आणि भयंकर रोगाने त्यांना मारलं.

५१ शेवटी, त्याने इजिप्तच्या सर्व प्रथमपुत्रांना ठार मारलं;+

हामच्या तंबूंत जन्मलेल्या त्यांच्या पुरुषत्वाच्या पहिल्या फळांना त्याने मारून टाकलं.

५२ मग त्याने आपल्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणलं

आणि मेंढरांप्रमाणे त्यांना ओसाड रानातून नेलं.+

५३ त्याने त्यांना अगदी सुखरूप नेलं,

त्यांना अजिबात भीती वाटली नाही;+

समुद्राने त्यांच्या शत्रूंना गडप केलं.+

५४ मग त्याने त्यांना आपल्या पवित्र देशात आणलं,+

आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या या डोंगराळ प्रदेशात त्याने त्यांना आणलं.+

५५ त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना घालवून दिलं;+

त्याने मोजायच्या दोरीने त्यांना वारशाची जमीन वाटून दिली.+

इस्राएलच्या वंशांना त्याने आपापल्या घरांत वसवलं.+

५६ पण ते सर्वोच्च देवाची परीक्षा पाहत राहिले* आणि त्याच्याविरुद्ध बंड करत राहिले;+

त्याच्या स्मरण-सूचनांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही.+

५७ त्यांनीही पाठ फिरवली आणि ते आपल्या वाडवडिलांइतकेच विश्‍वासघातकी निघाले.+

सैल पडलेल्या धनुष्यासारखे ते बेभरवशाचे होते.+

५८ उच्च स्थानांवर खोट्या देवांची उपासना करून ते त्याला क्रोधित करत राहिले,+

आपल्या कोरलेल्या मूर्तींनी त्यांनी त्याला ईर्ष्येला पेटवलं.*+

५९ हे सर्व पाहून देवाला संताप आला,+

म्हणून त्याने इस्राएलला पूर्णपणे सोडून दिलं.

६० शेवटी त्याने शिलोच्या उपासना मंडपाचा त्याग केला,+

ज्या तंबूत तो माणसांमध्ये राहिला होता, त्याचा त्याने त्याग केला.+

६१ आपल्या सामर्थ्याचं प्रतीक त्याने बंदिवासात जाऊ दिलं;

आपलं वैभव त्याने शत्रूच्या हाती दिलं.+

६२ त्याने आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केलं.+

तो आपल्या वारशाच्या लोकांवर संतप्त झाला.

६३ आगीने त्याच्या तरुणांना भस्म केलं,

त्याच्या कुमारींसाठी कोणीही लग्नाची गाणी म्हटली नाहीत.*

६४ त्याच्या याजकांना तलवारीने ठार मारण्यात आलं,+

त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.+

६५ मग झोपेतून उठावं तसा यहोवा उठला,+

द्राक्षारसाच्या नशेतून जागा होणाऱ्‍या योद्ध्याप्रमाणे+ तो उठला.

६६ त्याने त्याच्या शत्रूंना हाकलून लावलं;+

त्याने त्यांना सर्वकाळासाठी लज्जित केलं.

६७ त्याने योसेफच्या तंबूला झिडकारलं;

एफ्राईमच्या वंशाला त्याने निवडलं नाही.

६८ तर त्याने यहूदाच्या वंशाला निवडलं,+

त्याला प्रिय असलेला सीयोन पर्वत त्याने निवडला.+

६९ त्याने आपलं उपासनेचं ठिकाण स्वर्गासारखं स्थिर केलं.*+

त्याने सर्वकाळासाठी स्थापित केलेल्या पृथ्वीसारखं त्याला स्थिर केलं.+

७० त्याने आपला सेवक दावीद याला निवडलं.+

त्याने त्याला मेंढवाड्यांतून घेतलं.+

७१ दूध पाजणाऱ्‍या मेंढ्यांची काळजी घेणाऱ्‍याला

त्याने याकोबचा, आपल्या लोकांचा मेंढपाळ बनवलं.+

त्याने त्याला आपला वारसा असलेल्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ बनवलं.+

७२ त्याने* अगदी खऱ्‍या मनाने त्यांचा सांभाळ केला,+

निपुण हातांनी त्याने त्यांचं मार्गदर्शन केलं.+

आसाफचं गीत.+

७९ हे देवा, राष्ट्रांनी तुझ्या मालमत्तेवर* हल्ला केलाय;+

त्यांनी तुझ्या पवित्र मंदिराला दूषित केलंय;+

यरुशलेमला त्यांनी दगडमातीचा ढिगारा करून टाकलंय.+

 २ तुझ्या सेवकांचे मृतदेह त्यांनी आकाशातल्या पक्ष्यांना, अन्‍न म्हणून दिले आहेत

आणि तुझ्या एकनिष्ठ सेवकांचं मांस, त्यांनी पृथ्वीच्या जंगली पशूंना दिलंय.+

 ३ त्यांचं रक्‍त त्यांनी यरुशलेमभोवती पाण्यासारखं ओतलंय;

त्यांना पुरायला कोणीही राहिलं नाही.+

 ४ आमच्या शेजारची राष्ट्रं आमची निंदा करतात;+

आमच्या आसपासचे लोक आमची थट्टा करतात आणि आम्हाला टोमणे मारतात.

 ५ हे यहोवा, तू कुठवर रागावलेला राहशील? कायमचा?+

तुझा क्रोध कुठवर आगीसारखा जळत राहील?+

 ६ तुला न ओळखणाऱ्‍या राष्ट्रांवर

आणि तुझ्या नावाचा आदर न करणाऱ्‍या राज्यांवर तुझ्या क्रोधाचा वर्षाव कर.+

 ७ कारण त्यांनी याकोबला गिळून टाकलंय,

त्याचा देश त्यांनी उद्ध्‌वस्त केलाय.+

 ८ आमच्या पूर्वजांच्या अपराधांसाठी आम्हाला जबाबदार धरू नकोस.+

लवकरात लवकर आमच्यावर दया कर+

कारण आम्ही अगदी असाहाय्य आहोत.

 ९ तारण करणाऱ्‍या आमच्या देवा,

तुझ्या वैभवी नावामुळे आम्हाला साहाय्य कर+

आणि तुझ्या नावामुळे आमची सुटका करून आमच्या पापांची क्षमा कर.*+

१० “कुठे आहे यांचा देव?”+ असं राष्ट्रांनी का म्हणावं?

आमच्यादेखत या राष्ट्रांना दाखवून दे,

की तुझ्या सेवकांच्या रक्‍ताचा बदला घेण्यात आलाय.+

११ कैद्यांचं कण्हणं तुला ऐकू येवो.+

ज्यांना मृत्युदंड सुनावण्यात आलाय,* त्यांना तू आपल्या महान सामर्थ्याने* वाचव.*+

१२ हे यहोवा, आमच्या शेजारच्या राष्ट्रांनी तुला जे टोमणे मारले,+

त्यांबद्दल तू त्यांना सातपट शिक्षा दे.+

१३ मग आम्ही, म्हणजे तुझ्या कुरणातला कळप असलेले तुझे लोक+

सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ;

आम्ही पिढ्या न्‌ पिढ्या तुझी उपकारस्तुती करू.+

संचालकासाठी सूचना. आठवणीसाठी असलेलं आसाफचं+ गीत. “भुईकमळं” याच्या चालीवर गायलं जावं.

८० हे इस्राएलच्या मेंढपाळा, ऐक,

तू योसेफला कळपाप्रमाणे मार्ग दाखवतोस.+

तू करुबांवर* विराजमान आहेस.+

तुझं तेज चमकू दे.

 २ एफ्राईम, बन्यामीन आणि मनश्‍शे यांच्यापुढे

आपलं सामर्थ्य प्रकट कर.+

ये आणि आम्हाला वाचव.+

 ३ हे देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर;+

तुझ्या चेहऱ्‍याचं तेज आमच्यावर चमकू दे, म्हणजे आमचा बचाव होईल.+

 ४ हे यहोवा, सैन्यांच्या देवा, तू कधीपर्यंत आपल्या लोकांच्या प्रार्थना रागाने झिडकारशील?*+

 ५ त्यांचे अश्रू तू त्यांना अन्‍न म्हणून खायला घालतोस,

तू त्यांना प्रमाणाबाहेर अश्रू प्यायला लावतोस.

 ६ तू आमच्या शेजारच्या राष्ट्रांना आमच्यावरून आपसात भांडू देतोस;

आमचे शत्रू आमची वाटेल तशी थट्टा करतात.+

 ७ हे सैन्यांच्या देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर;

तुझ्या चेहऱ्‍याचं तेज आमच्यावर चमकू दे, म्हणजे आमचा बचाव होईल.+

 ८ तू इजिप्तमधून एक द्राक्षवेल+ काढून आणलास.

तू राष्ट्रांना हाकलून लावलंस आणि तो द्राक्षवेल जमिनीत लावलास.+

 ९ तू त्याच्यासाठी जागा मोकळी केली;

तेव्हा त्याने मूळ धरलं आणि तो देशभर पसरला.+

१० त्याच्या सावलीने डोंगरांना

आणि त्याच्या फांद्यांनी देवदार वृक्षांना* झाकून टाकलं.

११ त्याच्या फांद्या समुद्रापर्यंत

आणि त्याचे फाटे महानदीपर्यंत* पोहोचले.+

१२ तू त्या द्राक्षमळ्याच्या भोवती असलेल्या भिंती का पाडून टाकल्यास?+

त्यामुळे ये-जा करणारे सगळे त्याची फळं तोडतात.+

१३ रानडुकरं त्याची नासधूस करतात

आणि रानातले जंगली प्राणी त्याला खाऊन टाकतात.+

१४ हे सैन्यांच्या देवा, कृपा करून परत ये.

स्वर्गातून खाली पाहा!

या द्राक्षवेलाची काळजी घे.+

१५ याचा बुंधा* तूच आपल्या उजव्या हाताने लावला होतास.+

ज्या फांदीला* तू आपल्यासाठी मजबूत केलंस, तिच्याकडे लक्ष दे.+

१६ तो द्राक्षवेल जाळून,+ तोडून टाकण्यात आलाय.

तुझ्या खडसावण्याने लोकांचा नाश होतो.

१७ तुझ्या उजवीकडे असलेल्या माणसाला;

तू ज्याला आपल्यासाठी मजबूत केलंस, त्या मनुष्याच्या मुलाला साहाय्य कर.+

१८ मग आम्ही तुझ्याकडे पाठ फिरवणार नाही.

आम्हाला मृत्यूपासून वाचव, म्हणजे आम्ही तुझ्या नावाने तुला हाक मारू.

१९ हे यहोवा, सैन्यांच्या देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर.

तुझ्या चेहऱ्‍याचं तेज आमच्यावर चमकू दे, म्हणजे आमचा बचाव होईल.+

आसाफचं गीत.+ संचालकासाठी सूचना: गित्तीथ* याच्या चालीवर गायलं जावं.

८१ देव आपली ताकद आहे.+ त्याचा जयजयकार करा!

जल्लोष करून याकोबच्या देवाची स्तुती करा!

 २ संगीत वाजवायला सुरुवात करा आणि हातात डफ,

सुरेल वीणा आणि तंतुवाद्य घ्या.

 ३ नवचंद्राच्या दिवशी*

आणि पौर्णिमेला आपल्या उत्सवाच्या दिवशी शिंग फुंका.+

 ४ कारण हा इस्राएलसाठी एक नियम आहे,

याकोबच्या देवाचा हा आदेश आहे.+

 ५ जेव्हा तो इजिप्तचा देश ओलांडून गेला,+

तेव्हा त्याने योसेफला एक स्मरण-सूचना म्हणून तो दिला होता.+

मी एक आवाज* ऐकला, पण मी तो ओळखू शकलो नाही.

 ६ देव म्हणतो: “मी त्याच्या खांद्यावरचं ओझं काढलं;+

त्याच्या हातातली टोपली मी घेतली.

 ७ तुझ्या संकटात तू मला हाक मारलीस आणि मी तुझी सुटका केली;+

गरजणाऱ्‍या ढगातून* मी तुला उत्तर दिलं.+

मरीबाच्या* पाण्याजवळ मी तुझी परीक्षा पाहिली.+ (सेला )

 ८ माझ्या लोकांनो, ऐका, म्हणजे मी तुमच्याविरुद्ध साक्ष देईन.

हे इस्राएल, तू माझं ऐकलंस तर किती बरं होईल!+

 ९ मग तुझ्यात कोणताच अनोळखी देव असणार नाही,

आणि तू परक्या देवाला नमन करणार नाहीस.+

१० मी यहोवा तुझा देव आहे.

मीच तुला इजिप्तच्या देशातून बाहेर आणलं.+

तुझं तोंड चांगलं उघड, म्हणजे तू तृप्त होईपर्यंत मी तुला अन्‍न भरवीन.+

११ पण माझ्या लोकांनी माझं ऐकलं नाही;

इस्राएलने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.+

१२ म्हणून मी त्यांना त्यांच्या हट्टी मनाप्रमाणे वागू दिलं;

त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं.*+

१३ जर माझ्या लोकांनी माझं ऐकलं,

आणि इस्राएलने माझ्या मार्गांचं पालन केलं, तर किती बरं होईल!+

१४ मग मी लगेच त्यांच्या शत्रूंना त्यांच्या हाती देईन;

मी त्यांच्या वैऱ्‍यांचा पराभव करीन.+

१५ यहोवाचा द्वेष करणारे त्याच्यापुढे भीतीने थरथर कापत येतील,

त्यांचा नाश* कायमचा असेल.

१६ पण तुला* मात्र तो सगळ्यात उत्तम गहू खायला देईल+

तो खडकातल्या मधाने तुला तृप्त करेल.”+

आसाफचं गीत.+

८२ देव आपल्या सभेत आपलं स्थान घेतो;+

दैवतांच्या* मध्ये तो न्याय करतो आणि म्हणतो:+

 २ “तुम्ही कुठपर्यंत अन्याय करत राहाल?+

आणि कुठपर्यंत दुष्टांचा पक्ष घेत राहाल?+ (सेला )

 ३ दीनांच्या आणि अनाथांच्या वतीने वाद करा.*+

असाहाय्य आणि निराधार लोकांना न्याय द्या.+

 ४ दीनदुबळ्यांना आणि गोरगरिबांना संकटातून वाचवा;

दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.”

 ५ या न्यायाधीशांना माहीत नाही आणि त्यांना कळतही नाही;+

ते अंधारात फिरत आहेत;

पृथ्वीचे सगळे पाये ढासळले आहेत.+

 ६ “मी म्हणालो, ‘तुम्ही देव* आहात,+

तुम्ही सगळे सर्वोच्च देवाची मुलं आहात.

 ७ पण इतर माणसांसारखाच तुम्हालाही मृत्यू येईल;+

इतर शासकांप्रमाणेच, तुमचाही अंत होईल!’”+

 ८ हे देवा, ऊठ आणि पृथ्वीचा न्याय कर,+

कारण सगळी राष्ट्रं तुझ्याच मालकीची आहेत.

आसाफचं गीत.+ स्तुतिगीत.

८३ हे देवा, शांत राहू नकोस!+

हे देवा, गप्प बसून नुसताच पाहत राहू नकोस!

 २ कारण बघ, तुझ्या शत्रूंनी कसा गोंधळ माजवलाय!+

तुझा द्वेष करणारे उद्धटपणे वागतात.*

 ३ ते गुप्तपणे तुझ्या लोकांविरुद्ध दुष्ट योजना करतात;

तुझ्या मौल्यवान लोकांविरुद्ध* ते कटकारस्थानं रचतात.

 ४ ते म्हणतात: “चला, आपण या राष्ट्राचा असा सर्वनाश करू,+

की इस्राएलच्या नावाची कोणाला आठवणही राहणार नाही.”

 ५ ते सर्व एकमताने योजना आखतात;*

तुझा विरोध करण्यासाठी त्यांनी आपसात मैत्री केली आहे*+—

 ६ अदोमी, इश्‍माएली, मवाबी+ आणि हागारी+ लोक;

 ७ गबाल, अम्मोन,+ अमालेक

आणि पलेशेथ,+ तसंच सोरचे+ रहिवासी.

 ८ अश्‍शूरही+ त्यांच्यात सामील झालंय;

ते सर्व लोटच्या मुलांना+ पाठिंबा देतात.* (सेला )

 ९ तू मिद्यानसोबत+ जसं केलं होतंस;

कीशोनच्या+ ओढ्याजवळ सीसरा आणि याबीन यांच्यासोबत तू जसं केलं होतंस,

तसंच या सर्वांसोबत कर.

१० एन-दोर+ इथे त्यांचा सर्वनाश झाला होता;

ते जमिनीसाठी खत झाले.

११ त्यांच्या प्रतिष्ठित लोकांना ओरेब आणि जेब+ यांच्यासारखं;

आणि त्यांच्या राजकुमारांना* जेबह आणि सलमुन्‍ना+ यांच्यासारखं कर.

१२ कारण ते म्हणाले: “देव ज्या देशात राहतो, त्या देशाचा आपण ताबा घेऊ या.”

१३ हे माझ्या देवा, त्यांना वाऱ्‍यासोबत उडणाऱ्‍या पाल्यापाचोळ्यासारखं कर,+

वाऱ्‍याने उडवलेल्या सुक्या गवतासारखं त्यांना कर.

१४ वणव्यामुळे जसं उभं रान जळून जातं;

आणि आगीने जसे डोंगर होरपळून जातात,+

१५ तसा तू आपल्या तुफानाने त्यांचा पाठलाग कर+

आणि तुझ्या वादळाने त्यांना घाबरवून सोड.+

१६ हे यहोवा, त्यांची तोंडं अपमानाने झाकून टाक,*

म्हणजे ते तुझ्या नावाचा शोध घेतील.

१७ ते कायमचे लज्जित आणि भयभीत होवोत;

त्यांना शरमेने खाली पाहायला लाव आणि त्यांचा नाश होऊ दे;

१८ लोकांना कळू दे, की तुझं नाव यहोवा आहे+

आणि या संपूर्ण पृथ्वीवर फक्‍त तूच सर्वोच्च देव आहेस.+

कोरहच्या मुलांचं गीत.+ संचालकासाठी सूचना: गित्तीथ* याच्या चालीवर गायलं जावं.

८४ हे सैन्यांच्या देवा यहोवा,

तुझं निवासस्थान किती सुंदर आहे!*+

 २ माझ्या जिवाला यहोवाच्या अंगणांची

ओढ लागली आहे.

हो, तिथे जायला माझा जीव कासावीस झाला आहे.+

माझं तन-मन जिवंत देवाचा आनंदाने जयजयकार करतं.

 ३ हे सैन्यांच्या देवा यहोवा,

माझ्या राजा आणि माझ्या देवा,

तुझ्या महान वेदीजवळ पक्ष्यालाही थारा मिळतो.

पाकोळी तिथे घरटं बांधून

आपल्या पिल्लांची काळजी घेते.

 ४ तुझ्या घरात राहणारे खरंच सुखी आहेत!+

ते सतत तुझी स्तुती करतात.+ (सेला )

 ५ ज्यांना तुझ्याकडून ताकद मिळते;+

ज्यांचं मन तुझ्या मंदिराकडे जाणाऱ्‍या मार्गांकडे लागलं आहे, ते सुखी आहेत!

 ६ बाका झुडपांच्या रखरखीत खोऱ्‍यातून जाताना,

त्यांना तो झऱ्‍यांचा प्रदेश वाटतो;

सुरुवातीचा पाऊस त्याच्यावर* आशीर्वादांचं वस्त्र पांघरतो.

 ७ ते चालतील तरी त्यांची शक्‍ती कमी होणार नाही;+

त्यांच्यातला प्रत्येक जण सीयोनमध्ये देवापुढे उभा राहील.

 ८ हे यहोवा, सैन्यांच्या देवा, माझी प्रार्थना ऐक;

हे याकोबच्या देवा, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. (सेला )

 ९ आमची ढाल+ असलेल्या आमच्या देवा,*

तुझ्या अभिषिक्‍ताकडे पाहा.+

१० कारण तुझ्या अंगणांतला एक दिवस, इतर ठिकाणी घालवलेल्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे!+

दुष्टांच्या तंबूंमध्ये राहण्यापेक्षा,

मी आपल्या देवाच्या घराच्या उंबरठ्याजवळ उभं राहणं पसंत करीन.

११ कारण यहोवा आपल्यासाठी सूर्यासारखा+ आणि ढालीसारखा+ आहे;

तो कृपा आणि सन्मान देणारा देव आहे.

जे खरेपणाने चालतात,

त्यांच्यापासून यहोवा कोणतीही चांगली गोष्ट राखून ठेवणार नाही.+

१२ हे सैन्यांच्या देवा यहोवा,

तुझ्यावर भरवसा ठेवणारा माणूस सुखी आहे!+

कोरहच्या मुलांचं गीत.+ संचालकासाठी.

८५ हे यहोवा, तू तुझ्या देशावर कृपा केली आहेस;+

याकोबच्या वंशजांपैकी बंदिवासात नेलेल्यांना तू परत आणलं आहेस.+

 २ तू आपल्या लोकांचा अपराध माफ केला आहेस;

तू त्यांच्या सर्व पापांची क्षमा केली* आहेस.+ (सेला )

 ३ तू आपला संताप आवरलास;

तू आपला क्रोध सोडून दिलास.+

 ४ आमचं तारण करणाऱ्‍या देवा, आम्हाला परत आण*

आणि आमच्यावरचा तुझा राग विसर.+

 ५ तू कायमचा आमच्यावर क्रोधित राहशील का?+

पिढ्या न्‌ पिढ्या आमच्यावर रागावलेला राहशील का?

 ६ तुझ्या लोकांनी तुझ्यामुळे आनंद करावा,+

म्हणून तू आम्हाला पुन्हा बळ देणार नाहीस का?

 ७ हे यहोवा, आमच्यावर असलेलं तुझं एकनिष्ठ प्रेम दाखव,+

आमचं तारण कर.

 ८ खरा देव यहोवा जे सांगतो, ते मी ऐकेन,

कारण तो आपल्या लोकांशी, आपल्या एकनिष्ठ सेवकांशी शांतीबद्दल बोलेल.+

पण त्यांनी फाजील आत्मविश्‍वास बाळगण्याची चूक पुन्हा करायला नको.+

 ९ देवाचं वैभव आपल्या देशात राहावं,

म्हणून तो त्याचं भय मानणाऱ्‍यांना वाचवायला तयार असतो.+

१० एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा एकमेकांना भेटतील;

नीतिमत्त्व आणि शांती एकमेकांचं चुंबन घेतील.+

११ पृथ्वीतून विश्‍वासूपणा अंकुरेल

आणि नीतिमत्त्व आकाशातून खाली पाहील.+

१२ यहोवा नक्कीच आपल्याला चांगल्या गोष्टी* देईल+

आणि आपल्या देशाची जमीन तिचा उपज देईल.+

१३ नीतिमत्त्व त्याच्यापुढे चालेल+

आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करेल.

दावीदची प्रार्थना.

८६ हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक* आणि मला उत्तर दे,

कारण मी असाहाय्य आणि गरीब आहे.+

 २ माझ्या जिवाचं रक्षण कर, कारण मी एकनिष्ठ आहे.+

तुझ्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या तुझ्या या सेवकाला वाचव,

कारण तू माझा देव आहेस.+

 ३ हे यहोवा, माझ्यावर कृपा कर+

कारण मी दिवसभर तुला हाक मारतो.+

 ४ हे यहोवा, तुझ्या या सेवकाला* आनंदी होऊ दे

कारण तुझ्याकडे माझे डोळे लागले आहेत.

 ५ हे यहोवा, तू चांगला+ आणि क्षमाशील आहेस;+

तुला हाक मारणाऱ्‍या सर्वांवर तुझं अपार प्रेम* आहे.+

 ६ हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक;

आणि माझ्या मदतीच्या याचनांकडे लक्ष दे.+

 ७ संकटाच्या दिवशी मी तुला हाक मारतो,+

कारण तू मला नक्की उत्तर देशील.+

 ८ हे यहोवा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोणीही नाही.+

तुझ्यासारखी कार्यं करणारा दुसरा कोणीही नाही.+

 ९ तू निर्माण केलेली सगळी राष्ट्रं

तुझ्यापुढे येऊन तुला नमन करतील.+

हे यहोवा, ती तुझ्या नावाचा गौरव करतील.+

१० कारण तू महान आणि अद्‌भुत गोष्टी करतोस;+

तू, फक्‍त तूच देव आहेस.+

११ हे यहोवा, मला तुझ्या मार्गाचं शिक्षण दे.+

मी तुझ्या सत्याच्या मार्गाने चालीन.+

मला तुझ्या नावाचं मनापासून* भय बाळगायला शिकव.+

१२ हे यहोवा, माझ्या देवा, मी अगदी पूर्ण मनाने+ तुझी स्तुती करतो

आणि मी सर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.

१३ कारण तू माझ्यावर भरभरून एकनिष्ठ प्रेम केलं आहेस;

तू अगदी खोल कबरेतून* माझा जीव वाचवला आहेस.+

१४ हे देवा, गर्विष्ठ माणसं माझ्याविरुद्ध उठतात;+

क्रूर माणसांची टोळी माझा जीव घ्यायला टपून बसली आहे,

त्यांना तुझ्याबद्दल जराही आदर नाही.*+

१५ पण हे यहोवा, तू दयाळू आणि करुणामय* देव आहेस.

तू सहनशील, एकनिष्ठ प्रेमाने भरलेला आणि विश्‍वासू देव आहेस.+

१६ माझ्याकडे लक्ष दे आणि माझ्यावर कृपा कर.+

तुझ्या या सेवकाला ताकद दे+

आणि तुझ्या दासीच्या या मुलाला वाचव.

१७ मला तुझ्या चांगुलपणाची एखादी खूण* दाखव,

म्हणजे माझा द्वेष करणारे ती पाहून लज्जित होतील.

कारण हे यहोवा, मला मदत करणारा आणि माझं सांत्वन करणारा तूच आहेस.

कोरहच्या मुलांचं गीत.+ स्तुतिगीत.

८७ देवाच्या नगरीचा पाया पवित्र डोंगरांवर आहे.+

 २ याकोबच्या सर्व तंबूंपेक्षा

सीयोनची फाटकं, यहोवाला जास्त प्रिय वाटतात.+

 ३ हे खऱ्‍या देवाच्या नगरी,+ तुझ्याबद्दल अद्‌भुत गोष्टी बोलल्या जात आहेत. (सेला )

 ४ मला ओळखणाऱ्‍यांमध्ये मी राहाब*+ आणि बाबेल यांचा उल्लेख करीन;

पाहा, पलेशेथ आणि सोर, तसंच कूशसुद्धा आहे.

त्या प्रत्येकाबद्दल मी म्हणीन: “याचा जन्म सीयोनमध्ये झाला.”

 ५ शिवाय, सीयोनबद्दल लोक असं म्हणतील:

“तिच्यात प्रत्येकाचा जन्म झाला.”

सर्वोच्च देव या नगरीला मजबूत करेल.

 ६ लोकांची नोंदणी करताना यहोवा म्हणेल:

“याचा जन्म तिथे झाला.” (सेला )

 ७ गीत गाणारे+ आणि नृत्य+ करणारे म्हणतील:

“माझ्या सर्व आशीर्वादांचा स्रोत तू आहेस.”*+

कोरहच्या मुलांचं गीत.+ स्तुतिगीत. संचालकासाठी सूचना. महलथ* शैलीप्रमाणे आळीपाळीने गायलं जावं. एज्राही हेमान+ याचं मस्कील.*

८८ हे यहोवा, माझं तारण करणाऱ्‍या देवा,+

दिवसभर मी आक्रोश करतो

आणि रात्री मी तुझ्यापुढे विनवणी करतो.+

 २ माझी प्रार्थना तुझ्यासमोर येऊ दे.+

माझ्या मदतीच्या याचनेकडे लक्ष दे.*+

 ३ कारण माझा जीव* संकटांनी त्रस्त झालाय;+

मी कबरेच्या* उंबरठ्याशी आलोय.+

 ४ खळग्यात* जाणाऱ्‍यांमध्ये मला मोजलं जातंय;+

मी एक असाहाय्य माणूस* आहे.+

 ५ मला मेलेल्यांमध्ये टाकून देण्यात आलंय.

तू ज्यांची आठवण करत नाहीस

आणि ज्यांना तुझ्याकडून कोणतीही मदत मिळत नाही,

अशा कबरेत पडलेल्या प्रेतांसारखा मी झालोय.

 ६ तू मला सगळ्यात खोल खळग्यात;

अंधाऱ्‍या ठिकाणी, एका अथांग डोहात टाकून दिलं आहेस.

 ७ तुझ्या क्रोधाच्या भाराखाली मी दबून गेलोय,+

तुझ्या भयानक लाटा माझ्यावर आदळतात. (सेला )

 ८ माझ्या ओळखीच्या लोकांना तू माझ्यापासून दूर केलं आहेस;+

त्यांना माझी घृणा वाटेल, अशी तू माझी स्थिती केली आहेस.

मी अशा जाळ्यात सापडलोय, ज्यातून सुटण्याचा मार्ग नाही.

 ९ माझ्या दुःखामुळे माझे डोळे निस्तेज झाले आहेत.+

हे यहोवा, मी दिवसभर तुला हाक मारतो;+

तुझ्यापुढे मी आपले हात पसरतो.

१० तू मेलेल्यांसाठी अद्‌भुत कार्यं करशील का?

मृत्यूमुळे शक्‍तिहीन झालेले, उठून तुझी स्तुती करू शकतात का?+ (सेला )

११ कबरेत कोणी तुझ्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल सांगेल का?

नाशाच्या ठिकाणी कोणी तुझ्या विश्‍वासूपणाचं वर्णन करेल का?

१२ अंधारात तुझे पराक्रम प्रकट होतील का?

विस्मरणाच्या देशात तुझं नीतिमत्त्व जाहीर होईल का?+

१३ तरीही, हे यहोवा, मी तुला मदतीची याचना करतो,+

दररोज पहाटे मी तुला प्रार्थना करतो.+

१४ हे यहोवा, तू मला का झिडकारतोस?+

तू माझ्यापासून तोंड का फिरवतोस?+

१५ लहानपणापासूनच

मी दुःखीकष्टी आहे आणि मृत्यूच्या सावलीत राहतोय;+

तू माझ्यावर येऊ दिलेली संकटं सोसून मी अगदी बधिर झालोय.

१६ तुझ्या संतापाने मला दडपून टाकलंय;+

तुझ्या धाकाने माझा नाश होत आहे.

१७ दिवसभर तो मला समुद्राच्या लाटांसारखा घेरतो.

चारही बाजूंनी* त्याने मला वेढलंय.

१८ तू माझ्या मित्रांना आणि सोबत्यांना माझ्यापासून दूर केलं आहेस;+

आता मला फक्‍त अंधाराची सोबत आहे.

एज्राही एथान+ याचं गीत. मस्कील.*

८९ मी यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचं सदासर्वकाळ गुणगान करीन.

तुझ्या विश्‍वासूपणाबद्दल मी सर्व पिढ्यांना सांगीन.

 २ कारण मी म्हणालो: “एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ स्थिर* राहील;+

तू स्वर्गात तुझा विश्‍वासूपणा स्थापित केला आहेस.”

 ३ तू म्हणालास, “मी दावीदसोबत, माझ्या निवडलेल्या सेवकासोबत एक करार केलाय;+

मी त्याला वचन दिलंय:+

 ४ ‘मी तुझ्या संततीला* कायम टिकवून ठेवीन,+

मी पिढ्या न्‌ पिढ्या तुझं राजासन स्थिर ठेवीन.’”+ (सेला )

 ५ हे यहोवा, स्वर्ग तुझ्या अद्‌भुत कार्यांची स्तुती करतो;

पवित्र जनांच्या मंडळीत तुझ्या विश्‍वासूपणाची प्रशंसा केली जाते.

 ६ कारण आकाशात यहोवासारखा दुसरा कोण आहे?+

देवाच्या मुलांमध्ये+ यहोवासारखा कोण आहे?

 ७ पवित्र जनांच्या सभेत देवाकडे विस्मयाने पाहिलं जातं;+

त्याच्या सभोवती असलेल्यांमध्ये तो सर्वात महान आणि विस्मयकारक आहे.+

 ८ हे यहोवा, सैन्यांच्या देवा,

हे याह, तुझ्यासारखा शक्‍तिशाली कोण आहे?+

तुझा विश्‍वासूपणा तुझ्या सभोवती आहे.+

 ९ खवळलेल्या समुद्रावर तुझं नियंत्रण आहे;+

त्याच्या लाटा अनावर होतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.+

१० तू राहाबचा* पूर्णपणे पराभव करून+ त्याला ठार मारलंस.+

तू आपल्या शक्‍तिशाली बाहूने आपल्या शत्रूंची पांगापांग केलीस.+

११ आकाश तुझं आणि पृथ्वीही तुझीच आहे;+

उपजाऊ जमीन आणि तिच्यातल्या सर्व गोष्टी+ तूच बनवल्या आहेत.

१२ उत्तर आणि दक्षिण दिशा तूच निर्माण केल्यास;

ताबोर+ आणि हर्मोन+ आनंदाने तुझ्या नावाचा जयजयकार करतात.

१३ तुझा बाहू सामर्थ्यवान आहे;+

तुझा हात शक्‍तिशाली आहे;+

तुझा उजवा हात उंचावलेला आहे.+

१४ नीतिमत्त्व आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत;+

एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा तुझ्यापुढे उभे राहतात.+

१५ आनंदाने तुझा जयजयकार करणारे सुखी आहेत!+

हे यहोवा, ते तुझ्या चेहऱ्‍याच्या प्रकाशात चालतात.

१६ ते दिवसभर तुझ्या नावामुळे आनंदी असतात,

तुझ्या नीतिमत्त्वाने त्यांचा सन्मान होतो.

१७ कारण त्यांचा गौरव आणि त्यांचं बळ तूच आहेस.+

तुझ्या कृपेमुळे आमची ताकद* वाढत जाते.+

१८ कारण आमची ढाल यहोवाकडून आहे.

आमचा राजा आम्हाला इस्राएलच्या पवित्र देवाने दिला आहे.+

१९ त्या वेळी तू दृष्टान्तातून आपल्या एकनिष्ठ सेवकांशी बोललास आणि म्हणालास:

“मी एका शक्‍तिशाली पुरुषाला सामर्थ्य दिलंय;+

मी लोकांमधून निवडलेल्या आपल्या सेवकाला श्रेष्ठ केलंय.+

२० मला माझा सेवक दावीद सापडलाय;+

मी आपल्या पवित्र तेलाने त्याचा अभिषेक केलाय.+

२१ मी आपल्या हाताने त्याला आधार देईन+

आणि आपल्या सामर्थ्याने त्याला बळ देईन.

२२ कोणताही शत्रू त्याच्यावर जुलूम करणार नाही

आणि कोणताही दुष्ट माणूस त्याला छळणार नाही.+

२३ मी त्याच्या शत्रूंचा त्याच्यादेखत चुराडा करीन+

आणि त्याचा द्वेष करणाऱ्‍यांना मी मारून टाकीन.+

२४ माझा विश्‍वासूपणा आणि एकनिष्ठ प्रेम त्याच्यासोबत आहे+

आणि माझ्या नावामुळे त्याची ताकद* वाढत जाईल.

२५ मी त्याला समुद्रावर अधिकार देईन

आणि मी त्याला नद्यांवर अधिकार देईन.+

२६ तो मला हाक मारून म्हणेल: ‘तू माझा पिता आहेस,

माझा देव आणि माझ्या तारणाचा खडक आहेस.’+

२७ मी त्याला प्रथमपुत्र ठरवीन,+

पृथ्वीवरच्या राजांमध्ये मी त्याला सर्वश्रेष्ठ ठरवीन.+

२८ मी त्याच्यावर सर्वकाळ एकनिष्ठ प्रेम करीन+

त्याच्यासोबत केलेला माझा करार कधीही व्यर्थ ठरणार नाही.+

२९ मी त्याच्या संततीला* सर्वकाळ टिकवून ठेवीन

आणि त्याचं राजासन आकाशासारखं कायम राहील.+

३० जर त्याच्या वंशजांनी माझे नियम मोडले

आणि जर ते माझ्या आदेशांप्रमाणे* चालले नाहीत,

३१ जर त्यांनी माझे कायदे पाळले नाहीत

आणि माझ्या आज्ञा मानल्या नाहीत,

३२ तर मी छडीने त्यांच्या या बंडाची;

आणि फटके मारून त्यांच्या या अपराधाची शिक्षा देईन.+

३३ पण त्याच्यावरचं माझं एकनिष्ठ प्रेम कधीही आटणार नाही+

आणि दिलेल्या वचनापासून मी कधीही मागे फिरणार नाही.*

३४ मी आपला करार मोडणार नाही+

किंवा जे मी बोललो ते कधीही बदलणार नाही.+

३५ पवित्र देव या नात्याने मी एकदाच सर्वकाळासाठी शपथ घेतली;

मी दावीदशी खोटं बोलणार नाही.+

३६ त्याची संतती* कायम टिकून राहील;+

माझ्यापुढे त्याचं राजासन सूर्यासारखं कायम राहील.+

३७ चंद्रासारखं, आकाशातल्या विश्‍वसनीय साक्षीदारासारखं

त्याचं राजासन कायम स्थिर राहील.” (सेला )

३८ पण तू स्वतःच त्याचा त्याग करून त्याला झिडकारलं आहेस;+

तुझ्या अभिषिक्‍तावर तू संतापला आहेस.

३९ तू आपल्या सेवकासोबत केलेला करार तुच्छ लेखला आहेस;

तू त्याचा मुकुट जमिनीवर टाकून त्याचा तिरस्कार केला आहेस.

४० तू त्याच्या सगळ्या भिंती* पाडून टाकल्या आहेत;

तू त्याच्या तटबंद्या जमीनदोस्त केल्या आहेत.

४१ येणाऱ्‍या जाणाऱ्‍या सर्वांनी त्याला लुबाडलंय;

त्याचे शेजारी त्याची निंदा करतात.+

४२ तू त्याच्या वैऱ्‍यांना विजयी केलं आहेस;*+

त्याच्या सर्व शत्रूंना तू आनंदित केलं आहेस.

४३ तू त्याची तलवार निकामी केली आहेस

आणि लढाईत तू त्याला जिंकू दिलं नाहीस.

४४ तू त्याचं वैभव नाहीसं केलं आहेस

आणि त्याचं राजासन तू खाली पाडलं आहेस.

४५ त्याच्या तारुण्याचे दिवस तू कमी केले आहेत;

त्याच्यावर तू अपमानाचं वस्त्र पांघरलं आहेस. (सेला )

४६ हे यहोवा, तू कधीपर्यंत तोंड फिरवशील? सर्वकाळ?+

तुझा क्रोध कधीपर्यंत आगीसारखा जळत राहील?

४७ माझं जीवन किती कमी काळाचं आहे याची आठवण कर!+

तू सर्व मानवांना विनाकारण* निर्माण केलं होतंस का?

४८ असा कोण माणूस आहे, जो कधीही मरणार नाही?+

कबरेच्या* तावडीतून तो स्वतःला* सोडवू शकतो का? (सेला )

४९ हे यहोवा, तू पूर्वीच्या काळात दाखवलेलं एकनिष्ठ प्रेम आता कुठे आहे?

तू आपल्या विश्‍वासूपणामुळे दावीदला या प्रेमाबद्दल वचन दिलं होतंस.+

५० हे यहोवा, तुझ्या सेवकांना मारले जाणारे टोमणे आठव;

मला सर्व लोकांचे टोमणे ऐकावे लागतात.*

५१ हे यहोवा, तुझे शत्रू तुझ्या लोकांची निंदा करतात;

पावलापावलावर त्यांनी तुझ्या अभिषिक्‍ताचा अपमान केलाय.

५२ यहोवाची सदासर्वकाळ स्तुती असो. आमेन, आमेन.+

चौथं पुस्तक

(स्तोत्रं ९०-१०६)

खऱ्‍या देवाचा सेवक मोशे+ याची प्रार्थना.

९० हे यहोवा, आमच्या सर्व पिढ्यांमध्ये तूच आमचं निवासस्थान* होतास.+

 २ तू पर्वत उत्पन्‍न केले त्याच्या आधीपासून;

आणि तू ही पृथ्वी, ही उपजाऊ जमीन निर्माण केलीस,+

त्याच्याही आधीपासून तू आहेस;

अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत* तूच देव आहेस.+

 ३ तू नाशवंत माणसाला मातीत परत पाठवतोस.

तू म्हणतोस: “मानवांनो, परत जा.”+

 ४ कारण तुझ्या दृष्टीने हजार वर्षं, कालच्या दिवसासारखी;+

रात्रीच्या एका प्रहरासारखी आहेत.

 ५ तू क्षणात त्यांचा अंत करतोस;+ ते रात्रीच्या झोपेसारखे होतात;

सकाळी, ते जमिनीतून उगवणाऱ्‍या गवतासारखे असतात.+

 ६ गवत सकाळी उगवतं आणि जोमाने वाढतं,

पण संध्याकाळपर्यंत ते कोमेजतं आणि सुकून जातं.+

 ७ कारण तुझा क्रोध आम्हाला भस्म करतो;+

तुझ्या संतापाने आम्ही भयभीत होतो.

 ८ आमचे अपराध तू तुझ्यापुढे ठेवतोस;*+

तुझ्या चेहऱ्‍याच्या प्रकाशाने, आमच्या गुप्त गोष्टी उघड्या पडतात.+

 ९ तुझ्या क्रोधामुळे आमचे दिवस हळूहळू नाहीसे होत जातात*

आणि आमची वर्षं सुसकाऱ्‍याप्रमाणे* लगेच संपून जातात.

१० आमचं आयुष्य ७० वर्षांचं

आणि एखाद्याला खूप शक्‍ती असेल,* तर ८० वर्षांचं+ असतं.

पण ही सगळी वर्षं त्रासाने आणि दुःखाने भरलेली असतात;

ती पाहता पाहता सरून जातात आणि आम्ही निघून जातो.+

११ तुझ्या रागात किती ताकद आहे हे कोण सांगू शकतं?

आणि तुझा क्रोध कोण जाणू शकतं?

जितका तुझा क्रोध मोठा आहे, तितकं आम्ही तुझं भय मानलं पाहिजे.+

१२ आयुष्याचे दिवस कसे मोजावेत हे आम्हाला शिकव,+

म्हणजे आम्हाला सुज्ञ मन* उत्पन्‍न करता येईल.

१३ हे यहोवा, परत ये!+ हे असं कधीपर्यंत चालेल?+

तुझ्या सेवकांवर दया कर.+

१४ पहाटेच आम्हाला तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने तृप्त कर,+

म्हणजे आम्ही आयुष्यभर आनंदाने जयजयकार करू.+

१५ तू जितके दिवस आम्हाला दुःख सोसू दिलंस

आणि जितकी वर्षं आम्ही संकटांचा सामना केला,+ तितकाच काळ तू आम्हाला आनंदी कर.+

१६ तुझ्या सेवकांना तुझी अद्‌भुत कार्यं पाहू दे,

त्यांच्या मुलांना तुझा महिमा पाहू दे.+

१७ हे यहोवा, आमच्या देवा, आमच्यावर तुझी कृपा असू दे;

आमच्या हाताच्या कार्यांना यश दे.*

हे देवा, आमच्या हाताच्या कार्यांना यश दे.*+

९१ जो सर्वोच्च देवाच्या गुप्त ठिकाणी आश्रय घेतो,+

तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.+

 २ मी यहोवाला म्हणीन: “तू माझा आश्रय, माझा दुर्ग आहेस,+

तू माझा देव आहेस, तुझ्यावर मी भरवसा ठेवतो.”+

 ३ कारण तो तुला फासेपारध्याच्या सापळ्यापासून;

जीवघेण्या रोगापासून वाचवेल.

 ४ तो आपल्या पंखांनी तुला झाकेल

आणि त्याच्या पंखांखाली तुला संरक्षण मिळेल.+

त्याचा विश्‍वासूपणा+ तुझ्यासाठी मोठ्या ढालीसारखा+

आणि संरक्षण देणाऱ्‍या भिंतीसारखा* असेल.

 ५ तुला रात्रीच्या वेळी घडणाऱ्‍या भयानक गोष्टींची,+

किंवा दिवसा सुटणाऱ्‍या बाणाची भीती वाटणार नाही.+

 ६ काळोखात पाठलाग करणाऱ्‍या साथीच्या रोगाला,

किंवा भरदुपारी होणाऱ्‍या नाशाला तू भिणार नाहीस.

 ७ तुझ्या बाजूला हजार माणसं

आणि तुझ्या उजव्या हाताला दहा हजार माणसं मरून पडतील,

पण तुझ्यावर मात्र यांपैकी कोणतंही संकट येणार नाही.+

 ८ तू फक्‍त आपल्या डोळ्यांनी हे पाहशील;

दुष्टांना तुझ्या डोळ्यांदेखत शिक्षा* मिळालेली तू पाहशील.

 ९ कारण “यहोवा माझा आश्रय आहे,” असं तू म्हणालास;

सर्वोच्च देवाला तू आपलं निवासस्थान* मानलं आहेस.+

१० तुझ्यावर कोणतंही संकट कोसळणार नाही+

आणि कोणतीही पीडा तुझ्या तंबूजवळ येणार नाही.

११ कारण तू जिथेही जाशील, तिथे तुझं संरक्षण करावं,+

अशी तो आपल्या स्वर्गदूतांना+ तुझ्याबद्दल आज्ञा देईल.

१२ तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये,+

म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून घेतील.+

१३ तू तरुण सिंहावर आणि नागावर पाय देशील;

तू आयाळ असलेल्या सिंहाला आणि मोठ्या सापाला पायांखाली तुडवशील.+

१४ देव म्हणाला: “मी त्याला वाचवीन, कारण त्याला माझ्याबद्दल जिव्हाळा आहे.*+

मी त्याचं रक्षण करीन, कारण त्याला माझ्या नावाची ओळख आहे.*+

१५ तो मला हाक मारेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन.+

संकटाच्या वेळी मी त्याच्यासोबत असेन.+

मी त्याला वाचवीन आणि त्याचा सन्मान करीन.

१६ मी त्याला मोठं आयुष्य देऊन तृप्त करीन+

आणि माझी तारणाची कार्यं* त्याला दाखवीन.”+

स्तुतिगीत. शब्बाथाच्या दिवशी गाण्याचं गीत.

९२ हे यहोवा, सर्वोच्च देवा, तुझे आभार मानणं+

आणि तुझ्या नावाचं गुणगान करणं* चांगलं आहे.

 २ पहाटे तुझ्या एकनिष्ठ प्रेमाचं+

आणि रात्री तुझ्या विश्‍वासूपणाचं वर्णन करणं;

 ३ दहा तारांचं तंतुवाद्य आणि सरोद यांच्या साथीने,

वीणेच्या* सुरेल स्वरांवर तुझं गुणगान करणं चांगलं आहे.+

 ४ कारण हे यहोवा, तुझ्या कार्यांमुळे तू मला आनंदित केलं आहेस;

तुझ्या हाताच्या कार्यांमुळे मी आनंदाने जयजयकार करतो.

 ५ हे यहोवा, तुझी कार्यं किती महान आहेत!+

तुझे विचार खरंच किती खोल आहेत!+

 ६ अविचारी माणूस ते जाणून घेऊ शकत नाही.

मूर्ख माणूस हे समजू शकत नाही:+

 ७ जेव्हा दुष्ट लोक जंगली गवतासारखे वाढतात

आणि वाईट कृत्यं करणाऱ्‍यांची भरभराट होते,

तेव्हा त्यांचा कायमचा सर्वनाश ठरलेला असतो!+

 ८ पण हे यहोवा, तू सर्वकाळासाठी सर्वोच्च देव आहेस.

 ९ हे यहोवा, तुझ्या शत्रूंना पाहा,

तुझ्या शत्रूंचा नक्कीच नाश होईल.

वाईट कृत्यं करणाऱ्‍या सर्वांची पांगापांग होईल.+

१० पण तू माझी ताकद* वाढवून मला रानबैलासारखं ताकदवान करशील;

मी आपल्या अंगाला ताजं तेल लावीन.+

११ मी आपल्या वैऱ्‍यांचा पराभव झालेला पाहीन;+

माझ्यावर हल्ला करणाऱ्‍या दुष्ट माणसांच्या नाशाबद्दल मला ऐकायला मिळेल.

१२ पण नीतिमान लोक खजुराच्या झाडांसारखे बहरतील.*

आणि लबानोनच्या उंच देवदार वृक्षांसारखे वाढतील.+

१३ त्यांना यहोवाच्या मंदिरात लावण्यात आलंय;

आपल्या देवाच्या अंगणांत ते जोमाने वाढतात.+

१४ म्हातारपणीही* ते फळ देत राहतील;+

ते उत्साही आणि टवटवीत राहतील.+

१५ ते यहोवाच्या खरेपणाचं वर्णन करत राहतील.

तो माझा खडक आहे,+ त्याच्यात कोणतीही अनीती नाही.

९३ यहोवा राजा बनलाय!+

त्याने वैभव पांघरलंय;

यहोवाने सामर्थ्याचं वस्त्र घातलंय;

ते त्याने पट्ट्यासारखं बांधलंय.

पृथ्वीला कायमचं स्थापित करण्यात आलंय,

तिला हलवलं जाऊ शकत नाही.*

 २ तुझं राजासन फार पूर्वी स्थिर करण्यात आलं होतं;+

तू अनादिकाळापासून आहेस.+

 ३ हे यहोवा, नद्या उसळून वाहत आहेत;

त्या मोठा आवाज करत, उसळून वाहत आहेत;

त्यांच्या लाटांची गर्जना दूरपर्यंत ऐकू येते.

 ४ यहोवा उंच आकाशात वैभवशाली आहे.+

महासागरांच्या आवाजापेक्षा;

समुद्रात आदळणाऱ्‍या लाटांपेक्षा तो सामर्थ्यवान आहे.+

 ५ हे यहोवा, तुझ्या स्मरण-सूचना खूप भरवशालायक आहेत.+

पवित्रता ही सर्वकाळासाठी तुझ्या घराची शोभा आहे.+

९४ दुष्टांचा बदला घेणाऱ्‍या देवा, यहोवा,+

दुष्टांचा बदला घेणाऱ्‍या देवा, तुझं तेज चमकू दे!

 २ हे पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ.+

गर्विष्ठांना त्यांच्या कार्यांप्रमाणे मोबदला दे.+

 ३ हे यहोवा, दुष्ट लोकांची कधीपर्यंत भरभराट होत राहील?

कधीपर्यंत?+

 ४ ते बडबडत राहतात आणि उद्धटपणे बोलतात;

वाईट कृत्यं करणारे सर्व जण स्वतःची बढाई मारतात.

 ५ हे यहोवा, ते तुझ्या लोकांना पायाखाली तुडवतात,+

ते तुझ्या वारशाच्या लोकांवर जुलूम करतात.

 ६ ते विधवेला आणि देशात राहायला आलेल्या विदेश्‍याला मारून टाकतात.

ते अनाथ* मुलांचा खून करतात.

 ७ ते म्हणतात: “याह पाहत नाही;+

याकोबचा देव याकडे लक्ष देत नाही.”+

 ८ अविचारी माणसांनो, हे समजून घ्या;

मूर्ख माणसांनो, तुम्ही शहाणपणाने कधी वागाल?+

 ९ ज्याने माणसाला कान दिले, तो ऐकू शकत नाही का?

ज्याने त्याला डोळे दिले, तो पाहू शकत नाही का?+

१० जो राष्ट्रांना सुधारतो, तो ताडन करू शकत नाही का?+

लोकांना ज्ञान देणारा तोच आहे!+

११ यहोवा माणसांचे विचार जाणतो,

त्यांचे विचार व्यर्थ आहेत हे त्याला माहीत आहे.+

१२ हे याह, ज्या माणसाला तू सुधारतोस;+

ज्याला तू आपले नियम शिकवतोस, तो सुखी आहे!+

१३ दुष्टांसाठी खड्डा खोदला जात नाही तोपर्यंत,+

तू त्या माणसाला संकटाच्या काळात शांती देशील.

१४ कारण यहोवा आपल्या लोकांना सोडून देणार नाही,+

तो आपल्या वारशाचा त्याग करणार नाही.+

१५ कारण पुन्हा एकदा नीतिमत्त्वाने न्याय केला जाईल

आणि सरळ मनाचे सर्व लोक त्याचं पालन करतील.

१६ दुष्टांच्या विरोधात माझ्या वतीने कोण उभं राहील?

वाईट कृत्यं करणाऱ्‍यांविरुद्ध कोण माझ्या बाजूने उभं राहील?

१७ यहोवा माझा सहायक नसता,

तर माझा* कधीच नाश झाला असता.+

१८ “माझा पाय घसरतोय,” असं मी म्हणालो,

तेव्हा हे यहोवा, तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने सतत मला आधार दिला.+

१९ चिंतांनी* मला सर्व बाजूंनी घेरलं,

तेव्हा तू मला दिलासा आणि सांत्वन दिलंस.+

२० दुष्ट शासकांचा* तुझ्याशी काय संबंध?

ते कायद्याच्या नावाखाली अत्याचार करण्याच्या योजना आखतात.+

२१ ते नीतिमान माणसावर* क्रूरपणे हल्ला करतात+

आणि निर्दोष माणसाला मृत्युदंड देतात.*+

२२ पण यहोवा माझ्यासाठी सुरक्षित आश्रय* होईल,

माझा देव मला आश्रय देणारा खडक आहे.+

२३ तो त्यांची दुष्ट कामं त्यांच्यावरच उलटवेल.+

त्यांच्या दुष्टपणानेच तो त्यांचा नाश करेल.*

आपला देव यहोवा त्यांचा सर्वनाश करेल.*+

९५ या, आपण जल्लोष करून यहोवाची स्तुती करू!

आपलं तारण करणाऱ्‍या खडकाचा आपण जयजयकार करू!+

 २ आपण उपकारस्तुती करत त्याच्यासमोर* येऊ;+

आपण त्याचं गुणगान करू आणि त्याचा जयजयकार करू.

 ३ कारण यहोवा महान देव आहे.

सर्व देवांमध्ये तो एक महान राजा आहे!+

 ४ पृथ्वीची सर्वात खोलवर असलेली ठिकाणं त्याच्या हातात आहेत;

पर्वतांची शिखरंही त्याचीच आहेत.+

 ५ समुद्र त्याचा आहे; त्यानेच तो बनवला.+

कोरडी जमीन त्याने आपल्या हातांनी निर्माण केली.+

 ६ या, आपण त्याला नमन करून त्याची उपासना करू;

आपला निर्माणकर्ता यहोवा याच्यापुढे आपण गुडघे टेकू.+

 ७ कारण तो आपला देव आहे.

आपण त्याचे लोक आहोत;

कुरणातल्या मेंढरांप्रमाणे तो आपली काळजी घेतो.+

आज तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल:+

 ८ तुमच्या पूर्वजांनी मरीबा* इथे केलं त्याप्रमाणे,

आणि ओसाड रानात मस्साच्या* दिवशी केलं त्याप्रमाणे आपलं हृदय कठोर करू नका.+

 ९ तेव्हा तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली;+

माझी सगळी महान कार्यं पाहिलेली असूनही, त्यांनी मला आव्हान केलं.+

१० मला त्या पिढीची ४० वर्षं घृणा वाटत राहिली आणि मी म्हणालो:

“या लोकांचं हृदय नेहमीच भरकटतं;

त्यांनी माझे मार्ग जाणून घेतले नाहीत.”

११ म्हणून मी माझ्या रागात अशी शपथ घेतली:

“ते माझ्या विसाव्यात येऊ शकणार नाहीत.”+

९६ यहोवासाठी एक नवीन गीत गा.+

पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, यहोवासाठी गीत गा!+

 २ यहोवासाठी गीत गा; त्याच्या नावाची स्तुती करा.

त्याच्याकडून मिळणाऱ्‍या तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश दररोज घोषित करा.+

 ३ सर्व राष्ट्रांना त्याच्या गौरवाबद्दल सांगा,

सगळ्या लोकांना त्याच्या अद्‌भुत कार्यांबद्दल सांगा.+

 ४ यहोवा महान आहे, तोच सर्वात जास्त स्तुतिपात्र आहे.

इतर सर्व देवांपेक्षा तोच जास्त विस्मयकारक आहे.

 ५ राष्ट्रांचे सगळे देव निरुपयोगी आहेत,+

पण यहोवा तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.+

 ६ वैभव* आणि ऐश्‍वर्य त्याच्यासमोर आहेत;+

त्याच्या पवित्र ठिकाणात सामर्थ्य आणि सौंदर्य आहे.+

 ७ राष्ट्रा-राष्ट्रांतल्या कुटुंबांनो, यहोवाचा सन्मान करा!

यहोवाचा सन्मान करा, कारण तो गौरवशाली आणि सामर्थ्यशाली आहे!+

 ८ यहोवाच्या गौरवशाली नावाचा महिमा करा;+

भेट घेऊन त्याच्या अंगणांत या.

 ९ पवित्र वस्त्रं घालून* यहोवाला नमन करा;*

पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, त्याच्यासमोर थरथर कापा!

१० राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा: “यहोवा राजा बनला आहे!+

पृथ्वी* कायमची स्थिर करण्यात आली आहे, ती हलवता येणार नाही.*

तो लोकांचा योग्य न्याय करेल.”*+

११ आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित होवो;

समुद्र आणि त्यातलं सर्वकाही गर्जना करो;+

१२ कुरणं आणि त्यांतलं सर्वकाही आनंदित होवो.+

जंगलातली सर्व झाडंही जल्लोष करोत.+

१३ ती यहोवासमोर जल्लोष करोत, कारण तो येत आहे,*

तो पृथ्वीचा न्याय करायला येत आहे.

तो सबंध पृथ्वीचा नीतिमत्त्वाने+

आणि सर्व लोकांचा विश्‍वासूपणे न्याय करेल.+

९७ यहोवा राजा बनला आहे!+

पृथ्वी आनंदित होवो.+

समुद्रातली सर्व बेटं हर्ष करोत.+

 २ त्याच्या सभोवती ढग आणि दाट काळोख आहे;+

नीतिमत्त्व आणि न्याय त्याच्या राजासनाचा पाया आहेत.+

 ३ अग्नी त्याच्यापुढे जातो+

आणि त्याच्या सभोवती असलेल्या शत्रूंना भस्म करतो.+

 ४ त्याच्या विजांमुळे उजेड पसरतो;

पृथ्वी हे पाहून थरथर कापते.+

 ५ यहोवासमोर, संपूर्ण पृथ्वीच्या प्रभूसमोर

पर्वत मेणासारखे वितळून जातात.+

 ६ आकाश त्याचं नीतिमत्त्व प्रकट करतं,

सगळी राष्ट्रं त्याचं तेज पाहतात.+

 ७ सर्व देवांनो, तुम्ही त्याला नमन करा.*+

कोरलेल्या मूर्तीची उपासना करणारे

आणि आपल्या निरुपयोगी देवांबद्दल+ बढाई मारणारे सगळे लज्जित होवोत.+

 ८ सीयोन याबद्दल ऐकून जल्लोष करते.+

हे यहोवा, तुझ्या न्याय-निर्णयांमुळे

यहूदाची नगरं* हर्षित झाली आहेत.+

 ९ कारण हे यहोवा, संपूर्ण पृथ्वीवर तू सर्वोच्च देव आहेस;

इतर सर्व देवांपेक्षा तू खूप महान आहेस.+

१० यहोवावर प्रेम करणाऱ्‍या सर्व लोकांनो, वाईट गोष्टींचा द्वेष करा.+

तो आपल्या एकनिष्ठ सेवकांच्या जिवांचं रक्षण करतो;+

तो त्यांना दुष्टांच्या हातून* सोडवतो.+

११ नीतिमान लोकांसाठी प्रकाश चमकलाय+

आणि सरळ मनाच्या लोकांना आनंद झालाय.

१२ नीतिमान लोकांनो, यहोवामुळे आनंदित व्हा!

त्याच्या पवित्र नावाची* उपकारस्तुती करा!

गीत.

९८ यहोवासाठी एक नवीन गीत गा,+

कारण त्याने अद्‌भुत गोष्टी केल्या आहेत.+

त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र बाहूने तारण केलंय.*+

 २ यहोवाने तारण करण्याचं त्याचं सामर्थ्य प्रकट केलंय;+

त्याने राष्ट्रांसमोर आपलं नीतिमत्त्व जाहीर केलंय.+

 ३ इस्राएल घराण्यावरच्या आपल्या एकनिष्ठ प्रेमाची आणि विश्‍वासूपणाची त्याने आठवण केली आहे.+

आपल्या देवाने केलेलं तारण* सबंध पृथ्वीने पाहिलंय.+

 ४ पृथ्वीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांनो, यहोवाचा जयजयकार करा!

आनंदित व्हा, जल्लोष करा आणि त्याचं गुणगान करा!*+

 ५ वीणेवर* यहोवाची स्तुती गा,*

वीणा* वाजवून आणि सुरेल गीत गाऊन;

 ६ कर्णे आणि शिंग फुंकून+

आपल्या राजासमोर, यहोवासमोर जयजयकार करा!

 ७ समुद्र आणि त्यातलं सर्वकाही;

पृथ्वी आणि तिच्यावर राहणारे सर्व लोक जल्लोष करोत.

 ८ नद्यांनो, टाळ्या वाजवा;

पर्वतांनो, तुम्ही सर्व मिळून जल्लोष करा!+

 ९ यहोवासमोर जल्लोष करा, कारण तो पृथ्वीचा न्याय करायला येत आहे.*

तो सबंध पृथ्वीचा नीतिमत्त्वाने+

आणि सर्व लोकांचा विश्‍वासूपणे न्याय करेल.+

९९ यहोवा राजा बनला आहे.+ सर्व लोक थरथर कापोत.

तो करुबांवर* विराजमान आहे.+ पृथ्वी थरथर कापो.

 २ सीयोनमध्ये यहोवा महान आहे,

तो सर्व राष्ट्रांपेक्षा उच्च आहे.+

 ३ त्यांनी तुझ्या महान नावाची स्तुती करावी+

कारण ते विस्मयकारक आणि पवित्र आहे.

 ४ तो सामर्थ्यवान राजा आहे आणि त्याला न्याय प्रिय आहे.+

तू प्रामाणिकपणा स्थापित केला आहेस.

तू याकोबमध्ये न्याय आणि नीतिमत्त्व आणलं आहेस.+

 ५ आपला देव यहोवा याचा महिमा करा+

आणि त्याच्या पायांच्या आसनासमोर नमन* करा;+

तो पवित्र आहे.+

 ६ मोशे आणि अहरोन त्याच्या याजकांपैकी होते+

आणि शमुवेल त्याच्या नावाने प्रार्थना करणाऱ्‍यांपैकी होता.+

ते यहोवाला हाक मारायचे

आणि तो त्यांना उत्तर द्यायचा.+

 ७ तो ढगाच्या खांबातून त्यांच्याशी बोलायचा.+

त्याने दिलेल्या स्मरण-सूचना आणि आदेश त्यांनी पाळले.+

 ८ हे यहोवा, आमच्या देवा, तू त्यांच्या प्रार्थना ऐकल्यास.+

तू त्यांना क्षमा करणारा देव होतास.+

पण त्यांच्या दुष्टपणामुळे तू त्यांना शिक्षा दिलीस.*+

 ९ आपला देव यहोवा याचा महिमा करा+

आणि त्याच्या पवित्र पर्वतासमोर नमन* करा.+

कारण आपला देव यहोवा पवित्र आहे.+

उपकारस्तुतीचं गीत.

१०० पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, यहोवाचा जयजयकार करा!+

 २ आनंदाने यहोवाची सेवा करा.+

जल्लोष करत त्याच्यासमोर या.

 ३ यहोवाच देव आहे हे ओळखा.*+

त्यानेच आपल्याला बनवलं आणि आपण त्याचेच आहोत.*+

आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातली मेंढरं आहोत.+

 ४ उपकारस्तुती करत त्याच्या फाटकांमधून या,+

स्तुती करत त्याच्या अंगणांत या.+

त्याला धन्यवाद द्या; त्याच्या नावाची स्तुती करा.+

 ५ कारण यहोवा चांगला आहे;+

त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ

आणि त्याचा विश्‍वासूपणा पिढ्या न्‌ पिढ्या टिकून राहतो.+

दावीदचं गीत. स्तुतिगीत.

१०१ हे यहोवा, मी तुझं गुणगान करीन.*

एकनिष्ठ प्रेम आणि न्याय यांबद्दल मी गीत गाईन.

 २ मी समंजसपणे आणि निर्दोषतेने* कार्य करीन.

तू मला साहाय्य करायला कधी येशील?

मी आपल्या घरातसुद्धा खऱ्‍या मनाने वागीन.+

 ३ मी कोणत्याही निरुपयोगी गोष्टीकडे पाहणार नाही.

जे खरा मार्ग सोडून देतात, त्यांच्या कृत्यांची मला घृणा वाटते.+

मी त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही.

 ४ कपटी मनाच्या लोकांशी माझं काही घेणंदेणं नाही;

मी वाइटाचा स्वीकार करणार* नाही.

 ५ शेजाऱ्‍याच्या पाठीमागे त्याची बदनामी करणाऱ्‍याला+

मी गप्प करीन.*

गर्वाने भरलेली नजर आणि अहंकारी मन

मी खपवून घेणार नाही.

 ६ पृथ्वीवरच्या विश्‍वासू लोकांकडे मी कृपेने पाहीन,

ते माझ्यासोबत राहतील.

निर्दोषपणे* वागणारा माझी सेवा करेल.

 ७ फसवेगिरी करणारा कोणीही माझ्या घरात राहणार नाही,

खोटं बोलणाऱ्‍याला मी आपल्यापुढे* उभं करणार नाही.

 ८ रोज सकाळी मी पृथ्वीवरच्या सर्व दुष्टांना गप्प करीन,*

वाईट कृत्यं करणाऱ्‍या सर्वांना मी यहोवाच्या शहरातून नाहीसं करीन.+

जुलूम सहन करणाऱ्‍या एका दुःखी* माणसाची प्रार्थना. तो यहोवासमोर आपल्या चिंता व्यक्‍त करतो.+

१०२ हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक;+

माझी मदतीची याचना तुझ्याजवळ पोहोचू दे.+

 २ माझ्या संकटाच्या काळात माझ्यापासून तोंड फिरवू नकोस.+

माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.*

मी तुला हाक मारतो, मला लवकर उत्तर दे.+

 ३ कारण माझं आयुष्य धुरासारखं नाहीसं होत आहे,

माझी हाडं भट्टीतल्या लाकडांसारखी जळून गेली आहेत.+

 ४ माझं हृदय गवतासारखं कोमेजून, वाळून गेलंय.+

कारण मला अन्‍न खायचीही आठवण राहत नाही.

 ५ मोठ्याने कण्हून कण्हून+

माझी हाडं दिसू लागली आहेत.+

 ६ मी ओसाड रानातल्या पाणकोळ्यासारखा;

पडीक घरांमध्ये राहणाऱ्‍या घुबडासारखा झालोय.

 ७ मला झोप लागत नाही, मी तसाच पडून राहतो;*

मी छपरावर राहणाऱ्‍या एकट्या पक्ष्यासारखा आहे.+

 ८ माझे शत्रू दिवसभर मला टोमणे मारतात.+

माझी थट्टा करणारे* माझ्या नावाने शाप देतात.

 ९ मी भाकर म्हणून राख खातो.+

मी जे काही पितो, त्यात माझे अश्रू मिसळलेले असतात.+

१० कारण तुझ्या रागामुळे आणि तुझ्या संतापामुळे

तू मला वर उचलून फेकून दिलं आहेस.

११ माझं आयुष्य विरून जाणाऱ्‍या सावलीसारखं* आहे,+

गवतासारखा मी कोमेजून जातोय.+

१२ पण हे यहोवा, तू तर सर्वकाळासाठी आहेस.+

तुझी ख्याती* पिढ्या न्‌ पिढ्या कायम राहील.+

१३ तू नक्कीच उठून सीयोनवर दया करशील,+

कारण तिच्यावर कृपा करण्याची वेळ आली आहे;+

नेमलेली वेळ आली आहे.+

१४ कारण तुझ्या सेवकांना तिचे दगड प्रिय आहेत,+

तिच्या मातीवरही त्यांचं प्रेम आहे.+

१५ सगळी राष्ट्रं यहोवाच्या नावाचं भय मानतील,

पृथ्वीचे सर्व राजे तुझं तेज पाहून तुझं भय मानतील.+

१६ कारण यहोवा सीयोन नगरी पुन्हा बांधेल;+

तो आपलं तेज प्रकट करेल.+

१७ तो दीनदुबळ्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष देईल;+

त्यांची प्रार्थना तो तुच्छ लेखणार नाही.+

१८ हे पुढच्या पिढीसाठी लिहिण्यात आलंय;+

ज्यांना अजून जन्म देण्यात* आला नाही, ते याहची स्तुती करतील.

१९ कारण तो उंचावर असलेल्या त्याच्या पवित्र ठिकाणातून खाली पाहतो,+

यहोवा स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहतो

२० आणि बंदिवानांचं कण्हणं ऐकतो.+

ज्यांना मृत्युदंड सुनावण्यात आलाय, त्यांना तो मुक्‍त करतो.+

२१ यामुळे सीयोनमध्ये यहोवाचं नाव घोषित केलं जाईल.+

यरुशलेममध्ये त्याची स्तुती केली जाईल,

२२ कारण राष्ट्रा-राष्ट्रांतले आणि राज्या-राज्यांतले लोक

यहोवाची सेवा करण्यासाठी एकत्र जमतील.+

२३ त्याने अकाली माझी शक्‍ती हिरावून घेतली;

त्याने माझं आयुष्य कमी केलं.

२४ मी म्हणालो: “हे माझ्या देवा,

माझं आयुष्य संपण्याआधीच माझा नाश करू नकोस.

तू पिढ्या न्‌ पिढ्या अस्तित्वात आहेस.+

२५ तू फार पूर्वी पृथ्वीचा पाया घातलास,

तू आपल्या हाताने आकाश बनवलंस.+

२६ ते नाहीसे होतील, पण तू सदासर्वकाळ राहशील;

एखाद्या वस्त्राप्रमाणे ते जुने होतील.

कपड्यांप्रमाणे तू त्यांना बदलून टाकशील आणि ते नाहीसे होतील.

२७ पण तू बदलत नाहीस आणि तुझं आयुष्य कधीही संपणार नाही.+

२८ तुझ्या सेवकांची मुलं सुरक्षित राहतील,

त्यांचे वंशज तुझ्यासमोर टिकून राहतील.”+

दावीदचं गीत.

१०३ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर!

मी अगदी अंतःकरणापासून त्याच्या पवित्र नावाची स्तुती करीन.

 २ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर!

त्याचे सगळे उपकार मी कधीही विसरणार नाही.+

 ३ तो तुझे सर्व अपराध क्षमा करतो+

आणि तुझी सगळी दुखणी बरी करतो.+

 ४ तो तुला खळग्यातून* सोडवतो+

आणि त्याच्या एकनिष्ठ प्रेमाचा आणि दयेचा मुकुट तुला घालतो.+

 ५ तो तुला आयुष्यभर चांगल्या गोष्टी देऊन तृप्त करतो;+

त्यामुळे तू गरुडासारखा तरुण आणि जोमदार राहतोस.+

 ६ जुलूम सहन करणाऱ्‍या सर्वांसाठी,

यहोवा नीतिमत्त्वाने+ आणि न्यायाने कार्य करतो.+

 ७ त्याने मोशेला आपले मार्ग दाखवले,+

इस्राएलच्या सर्व मुलांना त्याने आपली कार्यं दाखवली.+

 ८ यहोवा दयाळू आणि करुणामय* आहे;+

तो सहनशील आणि एकनिष्ठ प्रेमाने* भरलेला देव आहे.+

 ९ तो कायम दोष दाखवत राहणार नाही+

आणि सर्वकाळ मनात राग ठेवणार नाही.+

१० त्याने आपल्या पापांप्रमाणे आपल्याला शिक्षा दिली नाही+

आणि आपल्या अपराधांच्या मानाने आपल्याला मोबदला दिला नाही.+

११ कारण आकाश पृथ्वीपेक्षा जितकं उंच आहे,

तितकंच त्याचं भय मानणाऱ्‍यांसाठी, त्याचं एकनिष्ठ प्रेम मोठं आहे.+

१२ पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,

तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.+

१३ पिता ज्याप्रमाणे आपल्या मुलांना दया दाखवतो,

त्याचप्रमाणे यहोवाने त्याचं भय मानणाऱ्‍यांवर दया केली आहे.+

१४ कारण आपली रचना कशी करण्यात आली, हे त्याला चांगलं माहीत आहे,+

आपण फक्‍त माती आहोत, हे तो आठवणीत ठेवतो.+

१५ नाशवंत माणसाचं आयुष्य गवतासारखं असतं;+

तो रानातल्या फुलाप्रमाणे उमलतो.+

१६ पण वारा वाहिला, की ते नाहीसं होतं,

जणू ते तिथे नव्हतंच.*

१७ पण जे यहोवाची भीती बाळगतात,

त्यांच्याबद्दल त्याचं एकनिष्ठ प्रेम+

आणि त्यांच्या नातवंडांबद्दल त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ* टिकून राहतं.+

१८ जे त्याचा करार पाळतात;+

जे त्याच्या आदेशांचं काळजीपूर्वक पालन करतात, त्यांच्यासाठी ते सर्वकाळ टिकून राहतं.

१९ यहोवाने स्वर्गात आपलं राजासन स्थापन केलंय.+

त्याचं राज्य सर्वांवर आहे.+

२० यहोवाच्या आज्ञेप्रमाणे चालणाऱ्‍या+ आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणाऱ्‍या*

त्याच्या सर्व शक्‍तिशाली स्वर्गदूतांनो,+ त्याची स्तुती करा!

२१ यहोवाच्या सर्व सैन्यांनो,

त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करणाऱ्‍या त्याच्या सेवकांनो,+ त्याची स्तुती करा!+

२२ यहोवा राज्य करत असलेल्या सर्व ठिकाणांत,*

त्याने निर्माण केलेल्या सर्व जिवांनो, त्याची स्तुती करा!

मी अगदी अंतःकरणापासून यहोवाची स्तुती करीन.

१०४ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर.+

हे यहोवा माझ्या देवा, तू खूप महान आहेस.+

तू ऐश्‍वर्याचं* आणि वैभवाचं वस्त्र घातलं आहेस.+

 २ तू प्रकाशाने स्वतःला पांघरलं आहेस;+

तंबू ताणावा तसं तू आकाश ताणलं आहेस.+

 ३ तो आपल्या माडीवरच्या खोल्यांच्या तुळया* आकाशातल्या पाण्यात बसवतो,+

तो ढगांच्या रथावर स्वार होऊन,+

वाऱ्‍याच्या पंखांवरून जातो.+

 ४ तो आपल्या स्वर्गदूतांना खूप शक्‍तिशाली बनवतो;

आपल्या सेवकांना भस्म करणाऱ्‍या आगीसारखं बनवतो.+

 ५ त्याने पृथ्वीला तिच्या पायांवर स्थिर केलंय;+

आपल्या ठिकाणावरून ती कधीच हलवली जाणार नाही.*+

 ६ तू तिच्यावर खोल पाण्याचं वस्त्र पांघरलंस.+

पर्वत जलाशयांनी झाकलेले होते.

 ७ तू धमकावलंस तेव्हा जलाशय पळून गेले;+

तुझ्या गर्जनेने ते घाबरून पळून गेले.

 ८ तू त्यांच्यासाठी ठरवलेल्या ठिकाणी ते गेले.

पर्वत वर आले+ आणि दऱ्‍या खोल गेल्या.

 ९ तू जलाशयांना मर्यादा घालून दिलीस.

त्यांनी ती पार करू नये आणि पृथ्वीला पुन्हा झाकू नये,+

म्हणून तू असं केलंस.

१० तो दऱ्‍यांमधून झरे वाहायला लावतो;

ते पर्वतांच्या मधून वाहतात.

११ ते रानातल्या सर्व जंगली प्राण्यांना पाणी पुरवतात;

रानगाढवं त्यांतलं पाणी पिऊन आपली तहान भागवतात.

१२ आकाशातले पक्षी त्यांच्या जवळपास घरटी बांधतात;

ते दाट वृक्षांमध्ये किलबिल करतात.

१३ तो आपल्या माडीवरच्या खोल्यांमधून पर्वतांना पाणी देतो.+

तुझ्या कार्यांच्या फळाने पृथ्वी तृप्त होते.+

१४ तो गुराढोरांसाठी गवत उगवायला लावतो;

आणि माणसांसाठी झाडंझुडपं उगवायला लावतो.+

त्यामुळे त्यांना जमिनीतून अन्‍न मिळतं;

१५ मनाला आनंद देणारा द्राक्षारस,+

चेहऱ्‍यावर चमक आणणारं तेल

आणि माणसाच्या हृदयाचं पोषण करणारी भाकर मिळते.+

१६ यहोवाच्या वृक्षांना, त्याने लावलेल्या लबानोनच्या देवदारांना

भरपूर पाणी मिळतं.

१७ त्यांच्यावर पक्षी आपली घरटी बांधतात.

करकोच्याचं+ घर गंधसरूच्या झाडांत असतं.

१८ उंच पर्वत पहाडी रानशेळ्यांसाठी असतात;+

बिजू* डोंगरांच्या कडेकपारींत राहतात.+

१९ ऋतू ठरवण्यासाठी त्याने चंद्र बनवला;

कधी मावळायचं, हे सूर्याला चांगलं माहीत असतं.+

२० तू अंधार करतोस तेव्हा रात्र होते+

आणि रानातले सर्व जंगली प्राणी इकडे तिकडे फिरतात.

२१ तरुण सिंह* आपल्या शिकारीसाठी डरकाळी फोडतात,+

ते देवाकडे आपलं अन्‍न मागतात.+

२२ जेव्हा सूर्य उगवतो,

तेव्हा ते आपल्या गुहेत जाऊन पडून राहतात.

२३ माणूस आपल्या कामाला जातो,

तो संध्याकाळपर्यंत कष्ट करतो.

२४ हे यहोवा, तू किती अद्‌भुत गोष्टी निर्माण केल्या आहेत!+

त्या सर्व तू बुद्धीने निर्माण केल्या आहेत.+

तू बनवलेल्या गोष्टींनी ही पृथ्वी भरलेली आहे.

२५ समुद्र किती मोठा, किती अफाट आहे!

त्यात लहानमोठे असंख्य जीव राहतात.+

२६ त्यातून जहाजं प्रवास करतात आणि लिव्याथानसुद्धा;*+

त्याला तू समुद्रात खेळण्यासाठी बनवलंस.

२७ तू त्यांना वेळच्या वेळी अन्‍न देशील,

म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात.+

२८ तू दिलेलं अन्‍न ते गोळा करतात.+

तू आपली मूठ उघडतोस, तेव्हा ते चांगल्या गोष्टींनी तृप्त होतात.+

२९ तू आपलं तोंड फिरवतोस, तेव्हा ते अस्वस्थ होतात.

तू त्यांचा श्‍वास काढून घेतोस, तेव्हा ते मरून जातात आणि मातीला मिळतात.+

३० तू आपली पवित्र शक्‍ती* पाठवतोस तेव्हा ते निर्माण होतात,+

तू पृथ्वीला नवजीवन देतोस.

३१ यहोवाचा गौरव सर्वकाळ टिकेल.

यहोवा त्याच्या कार्यांमुळे आनंद करेल.+

३२ तो पृथ्वीकडे पाहतो तेव्हा तिला हादरे बसतात;

तो पर्वतांना स्पर्श करतो तेव्हा ते धुमसतात.*+

३३ मी आयुष्यभर यहोवाचं गुणगान करीन;*+

माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या देवाची स्तुती गाईन.+

३४ माझ्या मनातले विचार त्याला आनंद देवोत.*

मी यहोवामुळे हर्ष करीन.

३५ पापी लोक पृथ्वीवरून नाहीसे होतील

आणि दुष्टांचं अस्तित्व राहणार नाही.+

माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर. याहची स्तुती कर!*

१०५ यहोवाचे आभार माना,+ त्याचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करा,

राष्ट्रा-राष्ट्रांतल्या लोकांना त्याच्या कार्यांबद्दल सांगा!+

 २ त्याच्यासाठी गीत गा, त्याच्या स्तुतीसाठी गीत गा,*

त्याच्या सर्व अद्‌भुत कार्यांवर मनन करा.*+

 ३ त्याच्या पवित्र नावाचा अभिमानाने गौरव करा.+

यहोवाचा शोध घेणाऱ्‍यांचं मन हर्षित होवो.+

 ४ यहोवाचा आणि त्याच्या सामर्थ्याचा शोध घ्या.+

आपले डोळे सतत त्याच्याकडे लावा.

 ५ त्याने केलेली अद्‌भुत कार्यं आठवा,

त्याचे चमत्कार आणि त्याने जाहीर केलेले न्याय-निर्णय आठवा.+

 ६ त्याचा सेवक अब्राहाम याच्या वंशजांनो,+

याकोबच्या मुलांनो, त्याच्या निवडलेल्या लोकांनो, तुम्ही ते आठवा.+

 ७ तो आपला देव यहोवा आहे.+

त्याचे न्याय-निर्णय संपूर्ण पृथ्वीसाठी आहेत.*+

 ८ त्याचा करार तो सर्वकाळ आठवणीत ठेवतो,+

त्याने दिलेलं अभिवचन* तो हजारो पिढ्यांपर्यंत लक्षात ठेवतो.+

 ९ त्याने अब्राहामसोबत केलेला करार+

आणि शपथ घेऊन इसहाकला दिलेलं वचन तो लक्षात ठेवतो.+

१० त्याने ती शपथ, याकोबसाठी एक नियम म्हणून

आणि इस्राएलसाठी कायमचा करार म्हणून स्थापन केली.

११ तो म्हणाला होता, “मी तुम्हाला कनान देश देईन,+

वारसा म्हणून मी तो तुम्हाला देईन.”+

१२ त्या वेळी त्यांची संख्या कमी होती,+

हो, ते संख्येने अगदीच कमी होते आणि विदेशी म्हणून त्या देशात राहत होते.+

१३ ते एका राज्यातून दुसऱ्‍या राज्यात,

एका राष्ट्रातून दुसऱ्‍या राष्ट्रात भटकत राहिले.+

१४ त्याने कोणत्याही माणसाला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही,+

उलट त्यांच्यासाठी त्याने राजांना फटकारलं.+

१५ तो म्हणाला, “माझ्या अभिषिक्‍त जनांना हात लावू नका,

माझ्या संदेष्ट्यांना कसलाही त्रास देऊ नका.”+

१६ त्याने देशात दुष्काळ आणला;+

त्याने त्यांचा अन्‍नपुरवठा थांबवला.*

१७ त्याने त्यांच्यापुढे एका माणसाला, योसेफला पाठवलं;

त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं.+

१८ त्याच्या पायात बेड्या घालण्यात आल्या;*+

त्याच्या गळ्यात लोखंडी साखळ्या घालण्यात आल्या.

१९ यहोवाचे शब्द खरे ठरेपर्यंत,+

त्याच्या वचनांनी त्याला शुद्ध केलं.

२० राजाने त्याची सुटका करायला माणसं पाठवली,+

लोकांच्या शासकाने त्याला मुक्‍त केलं.

२१ त्याने त्याला आपल्या घराण्याचा मालक

आणि आपल्या सगळ्या संपत्तीवर अधिकारी म्हणून नेमलं.+

२२ त्याने त्याला आपल्या अधिकाऱ्‍यांशी मनाप्रमाणे वागण्याचा;

आणि आपल्या वडीलजनांना बुद्धी शिकवण्याचा अधिकार दिला.+

२३ मग इस्राएल इजिप्तला आला;+

हामच्या देशात याकोब विदेशी म्हणून राहिला.

२४ देवाने आपल्या लोकांना खूप फलदायी केलं;+

त्यांच्या शत्रूंपेक्षा त्याने त्यांना शक्‍तिशाली केलं.+

२५ त्याने शत्रूंची मनं बदलू दिली;

त्यांना आपल्या लोकांचा द्वेष करू दिला

आणि आपल्या सेवकांविरुद्ध कटकारस्थानं करू दिली.+

२६ त्याने आपला सेवक मोशे याला पाठवलं+

आणि आपण ऩिवडलेल्या अहरोनलाही पाठवलं.+

२७ त्यांनी लोकांसमोर* त्याची चिन्हं दाखवली;

हामच्या देशात त्यांनी त्याचे चमत्कार दाखवले.+

२८ त्याने अंधार पाठवला तेव्हा देशात काळोख झाला;+

त्यांनी* त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केलं नाही.

२९ त्याने त्यांच्या पाण्याचं रक्‍त केलं

आणि त्यातले मासे मारून टाकले.+

३० त्यांचा देश बेडकांनी भरून गेला,+

राजाच्या महालातही बेडकं शिरली.

३१ त्याने गोमाश्‍यांना त्यांच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला

आणि त्यांच्या सगळ्या प्रदेशांत चिलटं पाठवली.+

३२ त्याने त्यांच्यावर पावसाऐवजी गारा पाडल्या

आणि त्यांच्या देशात विजा* पाठवल्या.+

३३ त्याने त्यांचे द्राक्षवेल आणि अंजिराची झाडं नष्ट केली

आणि त्यांच्या प्रदेशातल्या झाडांचा नाश केला.

३४ टोळांनी हल्ला करावा असा त्याने आदेश दिला,

तेव्हा असंख्य टोळ आले.+

३५ त्यांनी देशातली सगळी झाडंझुडपं

आणि जमिनीचं पीक फस्त केलं.

३६ मग त्यांच्या देशातल्या प्रत्येक प्रथम जन्मलेल्या,

त्यांच्या पुरुषत्वाच्या पहिल्या फळाला त्याने मारून टाकलं.+

३७ त्याने आपल्या लोकांना सोनंचांदी घेऊन बाहेर आणलं;+

त्याच्या वंशांपैकी कोणीही अडखळलं नाही.

३८ ते गेले तेव्हा इजिप्तच्या लोकांना आनंद झाला,

कारण त्यांना इस्राएली लोकांची* दहशत बसली होती.+

३९ त्याने ढगाचा पडदा पसरवून आपल्या लोकांचं संरक्षण केलं+

आणि त्याने रात्री आगीने त्यांना उजेड दिला.+

४० त्यांनी मागणी केली तेव्हा त्याने लावे* आणले;+

आकाशातल्या भाकरीने तो त्यांना तृप्त करत राहिला.+

४१ त्याने खडक फोडला तेव्हा पाणी बाहेर आलं;+

वाळवंटात नदीसारखं पाणी वाहू लागलं.+

४२ कारण त्याने आपला सेवक, अब्राहाम याला दिलेलं पवित्र वचन आठवणीत ठेवलं.+

४३ त्यामुळे त्याने आपल्या लोकांना जयजयकार करत बाहेर आणलं,+

त्याने आपल्या निवडलेल्या लोकांना जल्लोष करत बाहेर आणलं.

४४ त्याने त्यांना राष्ट्रांचे प्रदेश दिले;+

इतरांच्या कष्टाचं फळ त्यांना वारसा म्हणून मिळालं.+

४५ त्याच्या लोकांनी त्याचे आदेश आणि कायदे पाळावेत,+

म्हणून त्याने असं केलं.

याहची स्तुती करा!*

१०६ याहची स्तुती करा!*

यहोवाचे आभार माना, कारण तो चांगला आहे;+

त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.+

 २ यहोवाच्या पराक्रमांचं पूर्णपणे वर्णन कोण करू शकतं?

त्याच्या सगळ्या अद्‌भुत कार्यांबद्दल कोण सांगू शकतं?+

 ३ जे न्यायाने वागतात;

जे नेहमी योग्य ते करतात ते सुखी!+

 ४ हे यहोवा, तू आपल्या लोकांवर कृपा* करशील तेव्हा माझी आठवण ठेव.+

माझी काळजी घे आणि मला वाचव.

 ५ म्हणजे तुझ्या निवडलेल्या लोकांना तू दाखवत असलेला चांगुलपणा मला अनुभवता येईल;+

तुझ्या राष्ट्रासोबत मी आनंद करू शकेन

आणि तुझ्या वारशाच्या लोकांसोबत मी अभिमानाने तुझी स्तुती करू शकेन.*

 ६ आमच्या वाडवडिलांप्रमाणेच आम्हीही पाप केलंय;+

आम्ही अपराध केले आहेत आणि दुष्टपणे वागलो आहोत.+

 ७ आमच्या वाडवडिलांनी इजिप्तमध्ये तुझ्या अद्‌भुत कार्यांची कदर केली नाही.*

तू दाखवलेल्या अपार एकनिष्ठ प्रेमाची त्यांनी आठवण ठेवली नाही;

उलट त्यांनी समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ बंड केलं.+

 ८ पण देवाने आपल्या नावासाठी;+

आपलं सामर्थ्य प्रकट करण्यासाठी त्यांना वाचवलं.+

 ९ त्याने तांबड्या समुद्राला दटावलं आणि तो सुकून गेला.

वाळवंटातून* न्यावं, तसं त्याने खोल समुद्रातून त्यांना नेलं.+

१० त्याने शत्रूच्या हातून त्यांना वाचवलं;+

त्याने वैऱ्‍याच्या हातून त्यांना सोडवलं.+

११ पाण्याने त्यांच्या शत्रूंना गडप केलं;

त्यांच्यातला एकही जण वाचला* नाही.+

१२ मग त्याच्या अभिवचनावर त्यांचा विश्‍वास बसला.+

ते त्याची स्तुती गाऊ लागले.+

१३ पण ते त्याची कार्यं लगेच विसरले;+

त्याच्या मार्गदर्शनाची त्यांनी वाट पाहिली नाही.

१४ ओसाड रानात ते आपल्या स्वार्थी इच्छांच्या मागे लागले;+

त्यांनी वाळवंटात देवाची परीक्षा पाहिली.+

१५ त्यांनी जे मागितलं, ते त्याने दिलं;

पण मग त्याने एका भयंकर रोगाने त्यांना पीडित केलं,

त्यामुळे ते अशक्‍त होऊन मेले.+

१६ छावणीत ते मोशेवर जळफळू लागले.

यहोवाचा निवडलेला सेवक अहरोन+ याच्यावरही ते जळफळू लागले.+

१७ तेव्हा पृथ्वीने तोंड उघडून दाथानला गिळून टाकलं

अबीरामसोबत जमलेल्यांना तिने गडप केलं.+

१८ त्यांच्या जमावात आग भडकली;

आगीच्या ज्वालांनी त्या दुष्टांना भस्म केलं.+

१९ होरेबमध्ये त्यांनी एक वासरू बनवलं;

त्यांनी धातूच्या* मूर्तीला नमन केलं.+

२० माझा गौरव त्यांनी गवत खाणाऱ्‍या बैलाच्या प्रतिमेला दिला.+

२१ इजिप्तमध्ये ज्याने महान कार्यं केली,+

त्या आपल्या तारण करणाऱ्‍या देवाला ते विसरले.+

२२ त्याने हामच्या देशात अद्‌भुत कार्यं केली;+

तांबड्या समुद्राजवळ त्याने विस्मयकारक गोष्टी घडवून आणल्या.+

२३ तो तर त्यांचा सर्वनाश करणार होता;

पण त्याचा विनाशकारी क्रोध शांत करण्यासाठी

त्याचा निवडलेला सेवक मोशे, याने त्यांच्या वतीने याचना केली.*+

२४ मग त्यांनी उत्तम देशाला तुच्छ लेखलं;+

त्याच्या अभिवचनावर त्यांना जराही विश्‍वास नव्हता.+

२५ ते आपल्या तंबूंमध्ये कुरकुर करत राहिले;+

त्यांनी यहोवाचं ऐकलं नाही.+

२६ म्हणून, त्याने ओसाड रानातच त्यांचा नाश करण्याची,

हात वर करून शपथ घेतली.+

२७ त्याने देशादेशांत त्यांची पांगापांग करण्याची

आणि परक्या राष्ट्रांमध्ये त्यांचा नाश करण्याची शपथ घेतली.+

२८ नंतर, ते पौरच्या बआलची पूजा करू लागले,+

मेलेल्यांना* वाहिलेली बलिदानं त्यांनी खाल्ली.

२९ त्यांनी आपल्या कृत्यांनी देवाला चीड आणली,+

त्यामुळे त्यांच्यामध्ये पीडा आली.+

३० शेवटी, फिनहासने उठून कार्य केलं

तेव्हा कुठे पीडा थांबली.+

३१ त्याच्या या कार्यामुळे पिढ्या न्‌ पिढ्या सर्वकाळासाठी

त्याला नीतिमान ठरवण्यात आलं.+

३२ मरीबाच्या* पाण्याजवळ त्यांनी देवाला संताप आणला,

तेव्हा त्यांच्यामुळे मोशेवर संकट आलं.+

३३ त्यांच्या वागण्यामुळे मोशेला मनस्वी चीड आली

आणि रागाच्या भरात तो अविचारीपणे बोलला.+

३४ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे+

त्यांनी इतर राष्ट्रांच्या लोकांचा पूर्णपणे नाश केला नाही.+

३५ उलट, त्या राष्ट्रांच्या लोकांमध्ये मिसळून+

त्यांच्या चालीरिती त्यांनी स्वीकारल्या.*+

३६ ते त्यांच्या मूर्तींची उपासना करत राहिले+

आणि त्या त्यांच्यासाठी पाश ठरल्या.+

३७ ते दुष्ट स्वर्गदूतांना

आपल्या मुलांचा आणि मुलींचा बळी द्यायचे.+

३८ ते निर्दोष रक्‍त सांडत राहिले;+

कनानच्या मूर्तींसमोर बळी देण्यासाठी,

त्यांनी आपल्याच मुलामुलींचं रक्‍त सांडलं.+

यामुळे देश रक्‍तपाताने दूषित झाला.

३९ ते आपल्या कृत्यांमुळे अशुद्ध झाले;

आपल्या कामांमुळे ते देवाशी अविश्‍वासूपणे वागले.*+

४० त्यामुळे यहोवाचा राग त्याच्या लोकांवर भडकला,

आपल्या वारशाच्या लोकांची त्याला घृणा वाटू लागली.

४१ त्याने पुन्हापुन्हा त्यांना इतर राष्ट्रांच्या हाती दिलं;+

त्यांचा द्वेष करणाऱ्‍यांना त्याने त्यांच्यावर राज्य करू दिलं.+

४२ त्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर अत्याचार केले,

त्यांना त्यांच्या सत्तेखाली* राहावं लागलं.

४३ त्याने कित्येकदा त्यांना सोडवलं,+

पण ते पुन्हा बंड करून त्याच्या आज्ञा मोडायचे+

आणि त्यांच्या अपराधामुळे त्यांची दुर्दशा व्हायची.+

४४ पण मग तो त्यांच्यावर आलेलं संकट पाहायचा+

आणि मदतीसाठी केलेला त्यांचा आक्रोश ऐकायचा.+

४५ त्यांच्यासाठी तो आपला करार आठवायचा

आणि त्याच्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे त्याला त्यांची दया यायची.*+

४६ त्यांना बंदी बनवणाऱ्‍यांच्या मनात

तो त्यांच्याबद्दल दया उत्पन्‍न करायचा.+

४७ हे यहोवा, आमच्या देवा, आम्हाला वाचव+

आणि सर्व राष्ट्रांतून आम्हाला एकत्र कर,+

म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देऊ

आणि खूप आनंदाने तुझी स्तुती करू.+

४८ इस्राएलचा देव यहोवा याची

सर्वकाळ* स्तुती होत राहो!+

आणि सर्व लोक ‘आमेन’* म्हणोत

याहची स्तुती करा!*

पाचवं पुस्तक

(स्तोत्रं १०७-१५०)

१०७ यहोवाचे आभार माना, कारण तो चांगला आहे;+

त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.+

 २ यहोवाने ज्यांना परत मिळवलं,*

ज्यांना त्याने शत्रूच्या हातून* परत मिळवलं,+ त्यांनी असं म्हणावं.

 ३ त्याने त्यांना देशादेशांतून गोळा केलं,+

पूर्वेपासून आणि पश्‍चिमेपासून,*

उत्तरेपासून आणि दक्षिणेपासून त्याने त्यांना गोळा केलं.+

 ४ ते ओसाड रानात आणि वाळवंटात भटकत राहिले;

राहता येईल असं शहर त्यांना सापडलं नाही.

 ५ ते भुकेने आणि तहानेने व्याकूळ झाले होते;

ते* थकल्यामुळे अगदी गळून गेले होते.

 ६ ते आपल्या संकटात यहोवाला हाक मारत राहिले;+

त्यांच्या दयनीय स्थितीतून त्याने त्यांना सोडवलं.+

 ७ त्याने त्यांना योग्य मार्ग दाखवला+

आणि राहता येईल अशा शहरात आणलं.+

 ८ यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल लोकांनी त्याला धन्यवाद द्यावेत,+

कारण त्याने मानवांसाठी अद्‌भुत कार्यं केली आहेत.+

 ९ त्याने तहानलेल्यांना* तृप्त केलंय.

आणि भुकेल्यांना* भरपूर चांगल्या गोष्टी दिल्या आहेत.+

१० काही जण दाट काळोखात राहत होते,

ते साखळ्यांनी बांधलेले आणि पीडित कैदी होते.

११ कारण त्यांनी देवाच्या शब्दाविरुद्ध बंड केलं होतं;

त्यांनी सर्वोच्च देवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केलं होतं.+

१२ तेव्हा त्याने त्यांचं हृदय संकटाने नम्र केलं;+

ते अडखळले पण त्यांना सावरणारं कोणी नव्हतं.

१३ ते आपल्या संकटात यहोवाला मदतीसाठी हाक मारत राहिले;

त्यांच्या दयनीय स्थितीतून त्याने त्यांना सोडवलं.

१४ त्याने दाट काळोखातून त्यांना बाहेर आणलं;

त्यांच्या बेड्या त्याने तोडून टाकल्या.+

१५ यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल+ लोकांनी त्याला धन्यवाद द्यावेत,

कारण त्याने मानवांसाठी अद्‌भुत कार्यं केली आहेत.

१६ त्याने तांब्याचे दरवाजे तोडून टाकले आहेत

आणि लोखंडाचे अडसर कापून टाकले आहेत.+

१७ जे मूर्ख होते त्यांना पीडा सहन कराव्या लागल्या,+

कारण त्यांनी अपराध आणि चुका केल्या होत्या.+

१८ त्यांना अन्‍न नकोसं वाटू लागलं;

ते मृत्यूच्या फाटकांजवळ पोहोचले.

१९ ते आपल्या संकटात यहोवाला हाक मारायचे;

त्यांच्या दयनीय स्थितीतून तो त्यांना सोडवायचा.

२० त्यांनी बरं व्हावं अशी तो आज्ञा द्यायचा+

आणि ज्या खड्ड्यांत ते अडकून पडले होते, त्यांतून त्यांना सोडवायचा.

२१ यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल लोकांनी त्याला धन्यवाद द्यावेत,

कारण त्याने मानवांसाठी अद्‌भुत कार्यं केली आहेत.

२२ त्यांनी उपकारस्तुतीची बलिदानं द्यावीत+

आणि आनंदाने त्याची अद्‌भुत कार्यं घोषित करावीत.

२३ जे समुद्रावर जहाजाने प्रवास करतात,

महासागरांत आपला व्यवसाय चालवतात,+

२४ त्यांनी यहोवाची कार्यं पाहिली आहेत,

सागरातली त्याची विस्मयकारक कार्यं पाहिली आहेत.+

२५ त्याच्या शब्दाने वादळ उठतं+

आणि सागराच्या लाटा उसळू लागतात.

२६ खलाशी आकाशापर्यंत वर जातात;

आणि तळापर्यंत खाली जातात.

पुढे दिसणाऱ्‍या संकटामुळे त्यांच्या जिवाचं पाणी पाणी होतं.

२७ दारुड्या माणसासारखे ते अडखळतात आणि झोकांड्या खातात,

त्यांचं सगळं कौशल्य व्यर्थ ठरतं.+

२८ मग ते आपल्या संकटात यहोवाला हाक मारतात;+

त्यांच्या दयनीय स्थितीतून तो त्यांना सोडवतो.

२९ तो वादळ शमवतो;

सागराच्या लाटा शांत होतात.+

३० त्या शांत झाल्यावर ते आनंद करतात,

तो त्यांना हव्या असलेल्या बंदरात घेऊन जातो.

३१ यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल लोकांनी त्याला धन्यवाद द्यावेत,

कारण त्याने मानवांसाठी अद्‌भुत कार्यं केली आहेत.+

३२ त्यांनी लोकांच्या मंडळीत त्याचा गौरव करावा,+

आणि वडिलांच्या बैठकीत त्याची स्तुती करावी.

३३ तो नद्यांचं वाळवंट करतो,

आणि पाण्याचे झरे कोरडे पाडतो.+

३४ तो सुपीक जमिनीची खारट, ओसाड जमीन करतो,+

कारण तिच्यावर राहणारे दुष्टपणे वागतात.

३५ तो वाळवंटाचं तळं बनवतो

आणि कोरड्या जमिनीत झरे वाहायला लावतो.+

३६ भुकेल्यांना तो तिथे वस्ती करू देतो,+

त्यामुळे ते तिथे राहण्यासाठी शहर वसवतात.+

३७ ते शेती करतात आणि द्राक्षमळे लावतात,+

त्यांतून त्यांना भरपूर पीक मिळतं.+

३८ तो लोकांना आशीर्वाद देतो आणि त्यांची संख्या भरपूर वाढते;

तो त्यांची गुरंढोरं कमी होऊ देत नाही.+

३९ पण जुलूम, विपत्ती आणि दुःख यांमुळे

त्यांची संख्या पुन्हा कमी होते आणि ते लज्जित होतात.

४० तो गर्विष्ठ शासकांना तुच्छ लेखतो,

आणि वाट नसलेल्या ओसाड वाळवंटांतून त्यांना वणवण फिरायला लावतो.+

४१ पण तो दीनदुबळ्यांचं जुलमांपासून संरक्षण करतो*+

आणि त्यांची कुटुंबं कळपासारखी वाढवतो.

४२ सरळ मनाचे लोक हे पाहून आनंद करतात;+

पण सर्व अनीतिमान लोकांची तोंडं बंद होतात.+

४३ शहाणा या गोष्टींकडे लक्ष देईल;+

यहोवाने एकनिष्ठ प्रेमाने केलेल्या कार्यांवर तो मनन करेल.+

दावीदचं गीत. स्तुतिगीत.

१०८ हे देवा, माझं मन खंबीर आहे,

मी संगीत वाजवून अंतःकरणापासून* तुझी स्तुती गाईन.+

 २ तंतुवाद्यांनो, जागे व्हा; वीणा,+ तूही ऊठ.

मी पहाटेला जागं करीन.

 ३ हे यहोवा, मी सर्व लोकांमध्ये तुझी स्तुती करीन;*

मी राष्ट्रांमध्ये तुझा महिमा गाईन.

 ४ कारण तुझं एकनिष्ठ प्रेम आकाशाइतकं उंच आहे.+

तुझा विश्‍वासूपणा आभाळापर्यंत पोहोचला आहे.

 ५ हे देवा, तुझा सन्मान आकाशापेक्षाही उंच आहे;

सबंध पृथ्वीवर तुझा गौरव होवो!+

 ६ तुझ्या प्रिय लोकांची सुटका व्हावी,

म्हणून तुझ्या उजव्या हाताने आम्हाला वाचव आणि माझी प्रार्थना ऐक.+

 ७ देव त्याच्या पवित्रतेमुळे* बोलला आहे:

“मी आनंदित होऊन शखेम+ वारसा म्हणून देईन,

मी सुक्कोथचं खोरं* मोजून देईन.+

 ८ गिलाद+ माझा आहे आणि मनश्‍शेही माझा आहे,

एफ्राईम माझ्या डोक्यावरचा टोप* आहे.+

यहूदा माझा राजदंड आहे.+

 ९ मवाब माझ्यासाठी पाय धुण्याचं पात्र आहे.+

अदोमवर मी माझा जोडा फेकीन.+

पलेशेथला हरवल्यामुळे मी आनंदाने जल्लोष करीन.”+

१० तटबंदी असलेल्या शहरात मला कोण नेईल?

अदोमपर्यंत मला कोण घेऊन जाईल?+

११ हे देवा, तूच नाही का? पण तू तर आमच्याकडे पाठ फिरवली आहेस.

आता तू आमच्या सैन्यांसोबत लढाईला जात नाहीस.+

१२ आमच्या संकटात आम्हाला साहाय्य कर,+

कारण मानवांकडून मिळणारं तारण व्यर्थ आहे.+

१३ देवच आम्हाला ताकद देईल.+

तोच आमच्या शत्रूंना पायांखाली तुडवेल.+

दावीदचं गीत. संचालकासाठी.

१०९ हे स्तुतिपात्र देवा,+ शांत राहू नकोस.

 २ कारण दुष्ट आणि कपटी लोक माझ्याविरुद्ध बोलतात.

ते आपल्या जिभेने माझ्याबद्दल खोटं बोलतात.+

 ३ ते माझ्यावर द्वेषपूर्ण शब्दांचा भडिमार करतात,

ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात.+

 ४ माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझा विरोध करतात;+

पण मी तुला प्रार्थना करत राहतो.

 ५ मी केलेल्या चांगल्याची परतफेड ते वाइटाने+

आणि माझ्या प्रेमाची परतफेड ते द्वेषाने करतात.+

 ६ माझ्या शत्रूवर* एका दुष्ट माणसाला नियुक्‍त कर;

त्याच्या उजव्या हाताला विरोधी* उभा राहो.

 ७ त्याचा न्याय होईल तेव्हा तो दोषी* ठरो;

त्याची प्रार्थनाही पाप समजली जावो.+

 ८ त्याच्या आयुष्याचे दिवस कमी होवोत;+

देखरेख करण्याची त्याची जबाबदारी दुसऱ्‍याला मिळो.+

 ९ त्याची मुलंबाळं* अनाथ होवोत,

त्याची बायको विधवा होवो.

१० त्याची मुलं* भीक मागत वणवण फिरोत,

आपल्या उद्ध्‌वस्त घरांमध्ये ती अन्‍न शोधत फिरोत.

११ त्याला कर्ज देणारा त्याच्याकडून सर्वकाही जप्त करो,*

अनोळखी माणसं त्याची संपत्ती लुटून नेवोत.

१२ कोणीही त्याला दया* न दाखवो,

त्याच्या अनाथ मुलांवर कोणीही कृपा न करो.

१३ त्याच्या वंशजांचा नाश होवो;+

एकाच पिढीत त्यांचं नामोनिशाण मिटून जावो.

१४ यहोवा त्याच्या वाडवडिलांचे अपराध आठवणीत ठेवो,+

त्याच्या आईचं पाप पुसलं न जावो.

१५ त्यांचे अपराध यहोवा नेहमी लक्षात ठेवो;

तो पृथ्वीवरून त्यांची आठवण नाहीशी करो.+

१६ कारण त्याने दया* दाखवली नाही,+

पण पीडित, गरीब आणि खचलेल्या मनाच्या माणसाला मारून टाकण्यासाठी,+

तो त्याचा पाठलाग करत राहिला.+

१७ त्याला शाप द्यायला आवडायचं, म्हणून त्याच्यावर शाप आला;

आशीर्वाद देण्याची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्यालाही आशीर्वाद मिळाला नाही.

१८ त्याने शापांचं वस्त्र घातलं होतं;

त्याचे शाप त्याच्या शरीरात पाण्यासारखे ओतले गेले

आणि ते तेलासारखे त्याच्या हाडांत भिनले.

१९ त्याने पांघरलेल्या कपड्यांसारखे ते होवोत;+

त्याने कंबरेला बांधलेल्या पट्ट्यासारखे ते होवोत.

२० माझा विरोध करणाऱ्‍याला

आणि माझ्याविरुद्ध वाईट गोष्टी बोलणाऱ्‍याला यहोवाकडून हाच मोबदला मिळेल.+

२१ पण हे सर्वोच्च प्रभू यहोवा,

तुझ्या नावासाठी माझ्या वतीने कार्य कर.+

मला वाचव कारण तुझं एकनिष्ठ प्रेम चांगलं आहे.+

२२ मी असाहाय्य आणि गरीब आहे;+

माझं हृदय घायाळ झालंय.+

२३ सावलीसारखा मी विरून चाललोय;

टोळासारखं मला झटकून टाकण्यात आलंय.

२४ उपासामुळे माझे गुडघे लटपटत आहेत.

माझं शरीर कमजोर झालंय आणि मी खंगत चाललोय.

२५ ते मला सतत टोमणे मारतात.+

मला पाहून ते डोकं हलवतात.+

२६ हे यहोवा, माझ्या देवा, मला मदत कर.

तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे मला वाचव.

२७ हे तुझ्या हाताने घडून आलंय, हे त्यांना कळू दे;

हे यहोवा, तूच माझं तारण केलंस हे त्यांना समजू दे.

२८ त्यांनी शाप दिला, तरी तू मला आशीर्वाद दे.

ते जरी माझ्याविरुद्ध उठले, तरी त्यांना लज्जित होऊ दे.

पण, तुझ्या या सेवकाला मात्र आनंदी होऊ दे.

२९ माझा विरोध करणाऱ्‍यांवर अपमानाचं वस्त्र पांघरलं जावं;

त्यांना त्यांच्या लज्जेचा झगा घातला जावो.+

३० मी आपल्या तोंडाने यहोवाची भरभरून स्तुती करीन;

मी पुष्कळ लोकांसमोर त्याचं गुणगान करीन.+

३१ कारण गरिबाला दोषी ठरवणाऱ्‍यापासून त्याला वाचवण्यासाठी,

देव त्याच्या उजव्या हाताला उभा राहील.

दावीदचं गीत.

११० यहोवा माझ्या प्रभूला म्हणाला:

“मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत,+

माझ्या उजव्या हाताला बस.”+

 २ यहोवा तुझी सत्ता* सीयोनमधून बाहेर पसरवेल.

तो तुला म्हणेल: “जा आणि आपल्या शत्रूंवर विजय मिळव.”+

 ३ तू आपलं सैन्य घेऊन युद्धाला निघशील,

त्या दिवशी* तुझे लोक स्वेच्छेने पुढे येतील.

तुझे तरुण पहाटेच्या दवासारखे आहेत.

ते पावित्र्याने आणि वैभवाने सुशोभित आहेत.

 ४ यहोवाने शपथ घेऊन वचन दिलं आहे आणि तो आपलं मन बदलणार नाही:*

“तू मलकीसदेकसारखा याजक आहेस+

आणि तू सर्वकाळासाठी याजक राहशील.”+

 ५ यहोवा तुझ्या उजव्या हाताशी असेल;+

त्याच्या क्रोधाच्या दिवशी तो राजांना चिरडून टाकेल.+

 ६ तो राष्ट्रांवर न्यायदंड आणेल+

आणि देश प्रेतांनी भरून टाकेल.+

मोठ्या देशाच्या* पुढाऱ्‍याला* तो चिरडून टाकेल.

 ७ तो* रस्त्याच्या कडेला असलेल्या झऱ्‍याचं पाणी पिईल.

म्हणून तो आपलं डोकं वर करून चालेल.

१११ याहची स्तुती करा!*+

א [आलेफ ]

मी पूर्ण मनाने यहोवाची स्तुती करीन.+

ב [बेथ ]

मंडळीत आणि सरळ मनाच्या लोकांच्या बैठकीत मी त्याचं गुणगान करीन.

ג [गिमेल ]

 २ यहोवाची कार्यं महान आहेत;+

ד [दालेथ ]

ज्यांना ती आवडतात, ते सर्व त्यांचं परीक्षण करतात.+

ה [हे ]

 ३ त्याची कार्यं गौरवशाली आणि वैभवशाली आहेत;

ו [वाव ]

त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळासाठी आहे.+

ז [झाइन ]

 ४ तो त्याची अद्‌भुत कार्यं लक्षात ठेवायला लावतो.+

ח [हेथ ]

यहोवा करुणामय* आणि दयाळू देव आहे.+

ט [तेथ ]

 ५ त्याचं भय मानणाऱ्‍यांना तो अन्‍न देतो.+

י [योद ]

तो आपला करार सर्वकाळ लक्षात ठेवतो.+

כ [खाफ ]

 ६ राष्ट्रांचा वारसा आपल्या लोकांना देऊन,+

ל [लामेद ]

त्याने आपली शक्‍तिशाली कार्यं त्यांच्यापुढे प्रकट केली आहेत.

מ [मेम ]

 ७ त्याच्या हातांची कार्यं खरी आणि न्यायाची आहेत;+

נ [नून ]

त्याच्या सर्व आज्ञा भरवशालायक आहेत.+

ס [सामेख ]

 ८ त्या आज आणि सर्वकाळासाठी भरवशालायक* आहेत;

ע [आयन ]

सत्य आणि नीतिमत्त्व यांच्या पायावर त्या उभ्या आहेत.+

פ [पे ]

 ९ त्याने आपल्या लोकांना सोडवलंय.+

צ [सादे ]

आपला करार सर्वकाळ टिकावा, अशी त्याने आज्ञा दिली आहे.

ק [खुफ ]

त्याचं नाव पवित्र आणि विस्मयकारक आहे.+

ר [रेश ]

१० यहोवाची भीती बाळगणं ही बुद्धीची सुरुवात आहे.+

ש [शिन ]

त्याच्या आज्ञा* पाळणारे सर्व सखोल समज दाखवतात.+

ת [ताव ]

त्याची स्तुती सर्वकाळ होत राहते.

११२ याहची स्तुती करा!*+

א [आलेफ ]

यहोवाची भीती बाळगणारा,

ב [बेथ ]

त्याच्या आज्ञा आनंदाने पाळणारा सुखी असतो.+

ג [गिमेल ]

 २ त्याचे वंशज पृथ्वीवर शक्‍तिशाली होतील,

ד [दालेथ ]

सरळ मन असलेल्या लोकांच्या पिढीला आशीर्वाद मिळेल.+

ה [हे ]

 ३ त्याच्या घरात धनसंपत्ती आहे,

ו [वाव ]

त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ टिकेल.

ז [झाइन ]

 ४ सरळ मनाच्या लोकांसाठी, त्याचा प्रकाश अंधारात उजेडासारखा चमकतो.+

ח [हेथ ]

तो करुणामय,* दयाळू+ आणि नीतिमान आहे.

ט [तेथ ]

 ५ उदार मनाने* उसनं देणाऱ्‍याचं भलं होतं.+

י [योद ]

तो आपली कार्यं न्यायाने करतो.

כ [खाफ ]

 ६ तो कधीही डळमळणार नाही.+

ל [लामेद ]

नीतिमानाची आठवण सर्वकाळ केली जाईल.+

מ [मेम ]

 ७ तो वाईट बातमीला घाबरणार नाही.+

נ [नून ]

यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे, त्याचं मन स्थिर असतं.+

ס [सामेख ]

 ८ त्याचं मन डगमगत नाही* आणि तो भीत नाही;+

ע [आयन ]

शेवटी, तो आपल्या शत्रूंचा पराभव झालेला पाहील.+

פ [पे ]

 ९ त्याने उदारतेने वाटलं आणि गरिबांना दिलं.+

צ [सादे ]

त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ टिकेल.+

ק [खुफ ]

त्याची ताकद* गौरवाने वाढवली जाईल.

ר [रेश ]

१० दुष्ट हे पाहून दुःखी होईल.

ש [शिन ]

तो आपले दातओठ खाईल आणि नाहीसा होईल.

ת [ताव ]

दुष्टांच्या इच्छा नष्ट होतील.+

११३ याहची स्तुती करा!*

यहोवाच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा,

यहोवाच्या नावाचं गुणगान करा.

 २ आतापासून सर्वकाळापर्यंत,

यहोवाच्या नावाची स्तुती होवो!+

 ३ सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत,

यहोवाच्या नावाचं गुणगान होवो!+

 ४ यहोवा सर्व राष्ट्रांपेक्षा उच्च स्थानावर आहे;+

त्याचा गौरव आकाशाहून उंच आहे.+

 ५ आमचा देव यहोवा, याच्यासारखा कोण आहे?+

तो उच्च स्थानावर राहतो.*

 ६ आकाश आणि पृथ्वी यांना पाहण्यासाठी तो खाली वाकतो.+

 ७ तो दीनदुबळ्याला धुळीतून उठवतो;

तो गरिबाला राखेच्या ढिगाऱ्‍यातून* उचलतो.+

 ८ तो त्याला उच्च घराण्यातल्या लोकांसोबत बसवतो,

तो त्याला आपल्या प्रतिष्ठित लोकांसोबत बसवतो.

 ९ तो वांझ स्त्रीला आई होण्याचं सुख देतो,

ती आपल्या घरात मुलाबाळांसोबत* आनंदाने राहते.+

याहची स्तुती करा!*

११४ जेव्हा इस्राएल इजिप्तमधून बाहेर निघाला;+

जेव्हा विदेशी भाषा बोलणाऱ्‍या लोकांमधून, याकोबचं घराणं बाहेर निघालं,

 २ तेव्हा यहूदा हे देवाचं पवित्र ठिकाण बनलं

आणि इस्राएल देवाचं राज्य बनलं.+

 ३ सागराने हे पाहिलं आणि तो पळून गेला;+

यार्देन हे पाहून मागे वळली.+

 ४ तेव्हा पर्वत मेंढ्यांप्रमाणे,

आणि टेकड्या कोकरांप्रमाणे उड्या मारू लागल्या.+

 ५ हे सागरा, तू का पळालास?+

हे यार्देन, तू का मागे वळलीस?+

 ६ हे पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांप्रमाणे

आणि हे टेकड्यांनो, तुम्ही कोकरांप्रमाणे उड्या का मारायला लागलात?

 ७ हे पृथ्वी, प्रभूमुळे,

याकोबच्या देवामुळे थरथर काप!+

 ८ तो खडकाचं तळं करतो;

गारगोटी खडकातून झरे वाहायला लावतो.+

११५ आमचा नाही, हे यहोवा, आमचा नाही,*

तर तुझ्या नावाचा गौरव कर.+

तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे आणि विश्‍वासूपणामुळे तुझ्या नावाचा गौरव कर.+

 २ “त्यांचा देव कुठे आहे,”

असं इतर राष्ट्रांनी का म्हणावं?+

 ३ आमचा देव स्वर्गात आहे;

त्याला आवडतं ते तो करतो.

 ४ त्यांच्या मूर्ती तर सोन्याचांदीच्या आहेत;

त्या माणसांच्या हातांनी घडवलेल्या आहेत.+

 ५ त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही;+

डोळे आहेत, पण पाहता येत नाही.

 ६ त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही;

नाक आहे, पण वास घेता येत नाही.

 ७ त्यांना हात आहेत, पण स्पर्श करता येत नाही;

पाय आहेत, पण चालता येत नाही;+

त्यांच्या गळ्यातून आवाज फुटत नाही.+

 ८ त्यांना घडवणारे त्यांच्यासारखेच होतील,+

त्यांच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांचीही, त्यांच्यासारखीच स्थिती होईल.+

 ९ हे इस्राएल, यहोवावर भरवसा ठेव.+

तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे.+

१० हे अहरोनच्या घराण्या,+ यहोवावर भरवसा ठेव.

तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे.

११ यहोवाची भीती बाळगणाऱ्‍या लोकांनो, यहोवावर भरवसा ठेवा.+

तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे.+

१२ यहोवा आपली आठवण ठेवतो;

तो आपल्याला आशीर्वाद देईल.

तो इस्राएलच्या घराण्याला;+

अहरोनच्या घराण्याला आशीर्वाद देईल.

१३ यहोवाची भीती बाळगणाऱ्‍या लोकांना;

लहानमोठ्यांना तो आशीर्वाद देईल.

१४ यहोवा तुमची संख्या वाढवेल;

तो तुमची आणि तुमच्या मुलांची* संख्या वाढवेल.+

१५ आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा+

यहोवा देव तुम्हाला आशीर्वाद देवो!+

१६ स्वर्ग तर यहोवाचा आहे,+

पण त्याने पृथ्वी मानवांना दिली आहे.+

१७ मेलेले लोक याहची स्तुती करू शकत नाहीत;+

खाली कबरेत जाणारे कोणीही त्याची स्तुती करू शकत नाहीत.+

१८ पण आम्ही याहची स्तुती करू;

आतापासून सर्वकाळापर्यंत, आम्ही त्याचं गुणगान करू.

याहची स्तुती करा!*

११६ माझं यहोवावर प्रेम आहे

कारण तो माझी हाक, माझ्या मदतीच्या याचना ऐकतो.*+

 २ तो माझ्याकडे लक्ष देतो*+

आणि मी जिवंत असेपर्यंत* त्याला हाक मारत राहीन.

 ३ मृत्यूच्या दोरांनी मला वेढलं;

कबरेने मला आपल्या विळख्यात घेतलं.+

संकटांनी आणि दुःखांनी मला घेरलं.+

 ४ पण मी यहोवाच्या नावाने हाक मारून म्हणालो:+

“हे यहोवा, मला* वाचव!”

 ५ यहोवा करुणामय* आणि नीतिमान आहे;+

आपला देव दयाळू आहे.+

 ६ यहोवा अनुभव नसलेल्यांचं रक्षण करतो.+

मी अगदी खचून गेलो होतो, पण त्याने मला वाचवलं.

 ७ माझा जीव* पुन्हा निश्‍चिंत होईल,

कारण यहोवाने माझ्यावर दया केली आहे.

 ८ तू मृत्यूपासून माझं रक्षण केलंस,

माझ्या डोळ्यांतले अश्रू पुसलेस

आणि माझ्या पायांना अडखळण्यापासून वाचवलंस.+

 ९ मी जिवंतांच्या देशात यहोवापुढे चालत राहीन.

१० मला विश्‍वास होता, म्हणून मी बोललो;+

पण खरंतर मी खूप दुःखी होतो.

११ मी तर घाबरून गेलो आणि म्हणालो:

“प्रत्येक माणूस खोटा आहे.”+

१२ यहोवाने माझ्यावर जे उपकार केले आहेत,

त्या सर्वांच्या बदल्यात मी त्याला काय देऊ?

१३ मी तारणाचा* प्याला हाती घेईन,

मी यहोवाचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करीन.

१४ मी यहोवाला केलेले नवस,

त्याच्या सर्व लोकांच्या देखत फेडीन.+

१५ आपल्या एकनिष्ठ सेवकांचा मृत्यू

यहोवा खूप मौल्यवान लेखतो.*+

१६ हे यहोवा, मी तुझ्याकडे भीक मागतो,

कारण मी तुझा सेवक आहे.

मी तुझा सेवक, तुझ्या दासीचा मुलगा आहे.

तू मला माझ्या बंधनांतून मोकळं केलं आहेस.+

१७ मी तुला उपकारस्तुतीचं बलिदान देईन.+

मी यहोवाचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करीन.

१८ मी यहोवाला केलेले नवस,+

त्याच्या सर्व लोकांच्या देखत फेडीन.+

१९ यहोवाच्या घराच्या अंगणांत,+

यरुशलेममध्ये मी ते फेडीन.

याहची स्तुती करा!*+

११७ सर्व राष्ट्रांनो, यहोवाची स्तुती करा;+

सर्व लोकांनो, त्याचा गौरव करा.+

 २ कारण त्याचं आपल्यावर अपार एकनिष्ठ प्रेम आहे.+

यहोवाचा विश्‍वासूपणा+ सर्वकाळाचा आहे.+

याहची स्तुती करा!*+

११८ यहोवाचे आभार माना, कारण तो चांगला आहे;+

त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

 २ आता इस्राएलने म्हणावं:

“त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.”

 ३ आता अहरोनच्या घराण्याने म्हणावं:

“त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.”

 ४ आता यहोवाची भीती बाळगणाऱ्‍या लोकांनी म्हणावं:

“त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.”

 ५ माझ्या संकटात मी याहला* हाक मारली;

याहने मला उत्तर दिलं आणि एका सुरक्षित ठिकाणी* आणलं.+

 ६ यहोवा माझ्या बाजूने आहे; मी घाबरणार नाही.+

माणूस माझं काय बिघडवू शकतो?+

 ७ यहोवा, माझं साहाय्य करणारा,* माझ्या बाजूने आहे;+

माझा द्वेष करणाऱ्‍यांचा पराभव झालेला मी पाहीन.+

 ८ माणसांवर भरवसा ठेवण्यापेक्षा,

यहोवाचा आश्रय घेणं चांगलं आहे.+

 ९ अधिकाऱ्‍यांवर भरवसा ठेवण्यापेक्षा,

यहोवाचा आश्रय घेणं चांगलं आहे.+

१० मला सर्व राष्ट्रांनी वेढलं,

पण यहोवाच्या नावाने,

मी त्यांना हाकलून लावलं.+

११ त्यांनी मला वेढलं, हो, सर्व बाजूंनी वेढलं,

पण यहोवाच्या नावाने,

मी त्यांना हाकलून लावलं.

१२ त्यांनी मला माश्‍यांसारखं घेरलं,

पण आगीत काटे जळून जावेत, तशी ती राष्ट्रं लगेच भस्म झाली.

यहोवाच्या नावाने,

मी त्यांना हाकलून लावलं.+

१३ मी पडावं, म्हणून मला जोरात ढकलण्यात आलं,*

पण यहोवाने मला सावरलं.

१४ याह माझा आश्रय आणि माझी ताकद आहे,

तो माझ्यासाठी तारण ठरला आहे.+

१५ नीतिमानांचं तारण* झालंय,

म्हणून त्यांच्या तंबूंमधून आनंदाचा जल्लोष ऐकू येतोय.

यहोवाचा उजवा हात आपलं सामर्थ्य दाखवतोय.+

१६ यहोवाचा उजवा हात उंचावलाय;

यहोवाचा उजवा हात आपलं सामर्थ्य दाखवतोय.+

१७ मी मरणार नाही, मी जगेन,

याहच्या कार्यांचं वर्णन करण्यासाठी मी जगेन.+

१८ याहने मला कठोर शिक्षा दिली,+

पण त्याने मला मृत्यूच्या हाती दिलं नाही.+

१९ माझ्यासाठी नीतिमत्त्वाची दारं उघडा;+

म्हणजे मी आत जाऊन याहची स्तुती करीन.

२० हे यहोवाचं दार आहे.

नीतिमान त्यातून आत जातील.+

२१ मी तुझी स्तुती करीन, कारण तू मला उत्तर दिलंस+

आणि तू माझ्यासाठी तारण ठरलास.

२२ बांधकाम करणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला,

तो कोपऱ्‍याचा मुख्य दगड बनलाय.+

 २३ हे यहोवाने घडवून आणलंय;+

हे आमच्या दृष्टीने अद्‌भुत आहे.+

 २४ हा यहोवाने ठरवलेला दिवस आहे;

यात आम्ही आनंदाने जल्लोष करू.

 २५ हे यहोवा, आम्ही याचना करतो, कृपा करून आम्हाला वाचव!

हे यहोवा, कृपा करून आम्हाला विजयी कर!

 २६ यहोवाच्या नावाने येणारा आशीर्वादित असो;+

आम्ही यहोवाच्या घरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.

 २७ यहोवा देव आहे;

तो आपल्याला प्रकाश देतो.+

वेदीच्या शिंगांपर्यंत+ जाणाऱ्‍या सणाच्या मिरवणुकीत,

हातात फांद्या घेऊन सामील व्हा.+

 २८ तू माझा देव आहेस, मी तुझी स्तुती करीन;

माझ्या देवा, मी तुझा महिमा करीन.+

 २९ यहोवाचे आभार माना,+ कारण तो चांगला आहे;

त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.+

א [आलेफ ]

११९ जे निर्दोष मार्गाने चालतात;*

जे यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे वागतात, ते सुखी आहेत!+

 २ जे त्याच्या स्मरण-सूचना* पाळतात;+

जे पूर्ण मनाने त्याचा शोध घेतात, ते सुखी आहेत!+

 ३ ते कधीही अनीतीने वागत नाहीत;

ते त्याच्या मार्गांवर चालतात.+

 ४ तुझ्या आदेशांचं काळजीपूर्वक पालन केलं जावं,

अशी तू आज्ञा दिली आहेस.+

 ५ मी नेहमी स्थिर मनाने+

तुझ्या कायद्यांचं पालन करू शकलो, तर किती बरं होईल!*

 ६ मग, तुझ्या सर्व आज्ञांवर मनन करताना

मला लज्जित व्हावं लागणार नाही.+

 ७ तुझे नीतिमान न्याय-निर्णय* समजल्यावर,

मी खऱ्‍या मनाने तुझी प्रशंसा करीन.

 ८ मी तुझ्या कायद्यांचं पालन करीन;

मला कधीही कायमचं सोडून देऊ नकोस.

ב [बेथ ]

 ९ एक तरुण आपला मार्ग शुद्ध कसा ठेवू शकतो?

तुझ्या शब्दांप्रमाणे वागून आणि नेहमी सावध राहून.+

१० मी अगदी पूर्ण मनाने तुझा शोध घेतो.

तुझ्या आज्ञांपासून मला भरकटू देऊ नकोस.+

११ तुझ्याविरुद्ध मी पाप करू नये,+

म्हणून मी तुझे शब्द हृदयात जपून ठेवतो.+

१२ हे यहोवा, तुझी स्तुती असो!

मला तुझे कायदे शिकव.

१३ तुझ्या तोंडून निघालेल्या सर्व न्याय-निर्णयांचं,

मी आपल्या ओठांनी वर्णन करतो.

१४ इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूंपेक्षा+

मला तुझ्या स्मरण-सूचनांमुळे आनंद होतो.+

१५ मी तुझ्या आदेशांवर मनन* करीन+

आणि तुझ्या मार्गांवर लक्ष देईन.+

१६ तुझे कायदे मला प्रिय आहेत

तुझे शब्द मी विसरणार नाही.+

ג [गिमेल ]

१७ आपल्या या सेवकावर दया कर,

म्हणजे मी जिवंत राहीन आणि तुझ्या शब्दांचं पालन करीन.+

१८ तुझ्या नियमशास्त्रातल्या सुंदर गोष्टी स्पष्टपणे दिसाव्यात,

म्हणून माझे डोळे उघड.

१९ या देशात मी एक विदेशी म्हणून राहतोय.+

तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस.

२० तुझ्या न्याय-निर्णयांच्या ओढीने,

माझा जीव सतत व्याकूळ असतो.

२१ जे गर्विष्ठ आहेत आणि जे तुझ्या आज्ञांपासून भरकटतात,

अशा शापित लोकांचं तू ताडन करतोस.+

२२ माझ्यापासून अपमान आणि तिरस्कार दूर कर,

कारण मी तुझ्या स्मरण-सूचना पाळल्या आहेत.

२३ अधिकारी एकत्र बसून माझ्याविरुद्ध बोलतात,

तेव्हासुद्धा तुझा हा सेवक तुझ्या कायद्यांवर मनन* करतो.

२४ मला तुझ्या स्मरण-सूचना आवडतात;+

त्या माझ्या सल्लागार आहेत.+

ד [दालेथ ]

२५ मी धुळीत पडलोय.+

तू दिलेल्या वचनाप्रमाणे मला जिवंत ठेव.+

२६ माझ्या सर्व कार्यांबद्दल मी तुला सांगितलं आणि तू मला मार्गदर्शन केलंस;

मला तुझे कायदे शिकव.+

२७ मला तुझ्या आदेशांचा अर्थ* कळू दे,

म्हणजे मी तुझ्या अद्‌भुत कार्यांवर मनन* करीन.+

२८ दुःखामुळे मी रात्रभर जागा राहतो.

तुझ्या शब्दांनी मला बळ दे.

२९ कपटी मार्गापासून मला दूर ठेव,+

आणि तुझं नियमशास्त्र मला शिकवून माझ्यावर कृपा कर.

३० मी विश्‍वासूपणाचा मार्ग निवडलाय.+

तुझे न्याय-निर्णय योग्य आहेत हे मला माहीत आहे.

३१ मी तुझ्या स्मरण-सूचनांना जडून राहतो.+

हे यहोवा, माझी निराशा* होऊ देऊ नकोस.+

३२ तुझ्या आज्ञांचं मी आतुरतेने पालन करीन*

कारण तू माझ्या मनात त्यांच्यासाठी जागा निर्माण केली आहेस.*

ה [हे ]

३३ हे यहोवा, तुझ्या कायद्यांचा मार्ग मला शिकव,+

म्हणजे मी शेवटपर्यंत त्यावर चालीन.+

३४ मी तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे चालावं

आणि अगदी पूर्ण मनाने त्याचं पालन करावं,

म्हणून मला समजबुद्धी दे.

३५ मला तुझ्या आज्ञांच्या वाटेने चालव,+

कारण यामुळे मला आनंद होतो.

३६ माझ्या मनाला स्वतःच्या फायद्याकडे नाही,+

तर तुझ्या स्मरण-सूचनांकडे लक्ष द्यायला शिकव.

३७ माझे डोळे निरुपयोगी गोष्टींपासून वळव;+

तुझ्या मार्गात मला जिवंत ठेव.

३८ तुझ्या या सेवकाला दिलेलं वचन* पूर्ण कर,

म्हणजे लोक तुझं भय मानतील.*

३९ मला ज्याची भीती वाटते, तो अपमान माझ्यापासून दूर कर,

कारण तुझे न्याय-निर्णय चांगले आहेत.+

४० पाहा, मला तुझ्या आज्ञांची किती ओढ लागली आहे!

तुझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे मला जिवंत ठेव.

ו [वाव ]

४१ हे यहोवा, तुझं एकनिष्ठ प्रेम+

आणि तुझ्या अभिवचनाप्रमाणे* तुझ्याकडून मिळणारं तारण मला अनुभवू दे.+

४२ मग मला टोमणे मारणाऱ्‍याला मी उत्तर देईन,

कारण मी तुझ्या शब्दांवर भरवसा ठेवतो.

४३ सत्याचे शब्द माझ्या तोंडातून काढून टाकू नकोस,

कारण मी तुझ्या न्याय-निर्णयाची आशा धरली आहे.*

४४ मी तुझ्या नियमशास्त्राचं नेहमी,

सदासर्वकाळ पालन करीन.+

४५ आणि मी सुरक्षित ठिकाणी* चालीन+

कारण मी तुझ्या आदेशांचा शोध घेतो.

४६ मी राजांसमोर तुझ्या स्मरण-सूचनांबद्दल बोलीन,

मला लाज वाटणार नाही.+

४७ मला तुझ्या आज्ञा आवडतात,

खरंच, मला त्या प्रिय आहेत.+

४८ तुझ्या आज्ञा मला प्रिय वाटतात;+

त्यांमुळे मी हात उंचावून तुला प्रार्थना करीन

आणि तुझ्या कायद्यांवर मनन* करीन.+

ז [झाइन ]

४९ तुझ्या या सेवकाला दिलेलं अभिवचन आठवणीत ठेव,

त्याद्वारे तू मला आशा देतोस.*

५० माझ्या दुःखात मला यामुळे सांत्वन मिळतं,+

कारण तुझ्या शब्दांनी मला जिवंत ठेवलंय.

५१ गर्विष्ठ लोक मला अगदी तुच्छ लेखतात,

पण तरीही मी तुझ्या नियमशास्त्रापासून भरकटत नाही.+

५२ हे यहोवा, मला जुन्या काळातले तुझे न्याय-निर्णय आठवतात+

आणि त्यांमुळे मला सांत्वन मिळतं.+

५३ तुझ्या नियमशास्त्राच्या विरोधात वागणाऱ्‍या दुष्टांचा

मला संताप येतो.+

५४ मी जिथे जिथे विदेशी म्हणून राहिलो,*

तिथे तिथे तुझे कायदे माझ्यासाठी गीतांसारखे होते.

५५ हे यहोवा, मला तुझ्या नियमशास्त्राचं पालन करता यावं,

म्हणून मी रात्री तुझं नाव आठवतो.+

५६ ही माझी सवय आहे,

कारण मी तुझ्या आदेशांचं पालन करत आलोय.

ח [हेथ ]

५७ हे यहोवा, तू माझा वाटा आहेस;+

मी तुझ्या शब्दांचं पालन करण्याचा निश्‍चय केलाय.+

५८ मी मनापासून तुला विनवणी करतो,+

तू दिलेल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर.+

५९ तुझ्या स्मरण-सूचनांकडे माझी पावलं पुन्हा वळवण्यासाठी,

मी आपल्या मार्गांचं परीक्षण केलंय.+

६० मी लगेच तुझ्या आज्ञा पाळतो;

मी उशीर करत नाही.+

६१ दुष्टांच्या दोरांनी मला घेरलंय,

पण मी तुझं नियमशास्त्र विसरलो नाही.+

६२ तुझ्या नीतिमान न्याय-निर्णयांबद्दल

मी मध्यरात्री उठून तुझी उपकारस्तुती करतो.+

६३ जे तुझं भय मानतात आणि तुझ्या आज्ञा पाळतात,

त्या सर्वांचा मी मित्र आहे.+

६४ हे यहोवा, पृथ्वी तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने भरलेली आहे;+

मला तुझे कायदे शिकव.

ט [तेथ ]

६५ हे यहोवा, तुझ्या अभिवचनाप्रमाणे

तू आपल्या या सेवकाचं भलं केलं आहेस.

६६ मला शहाणपण आणि ज्ञान दे,+

कारण मी तुझ्या आज्ञांवर भरवसा ठेवलाय.

६७ माझ्यावर संकट येण्याआधी, मी भरकटायचो,*

पण आता मी तुझ्या सांगण्याप्रमाणे वागतो.+

६८ तू चांगला आहेस+ आणि तुझी कार्यंही चांगली आहेत.

मला तुझे कायदे शिकव.+

६९ गर्विष्ठ लोक माझ्यावर खोटे आरोप लावतात,

पण मी अगदी मनापासून तुझ्या आदेशांचं पालन करतो.

७० त्यांचं मन कोडगं* आहे,+

पण मला तुझं नियमशास्त्र प्रिय आहे.+

७१ माझ्यावर संकटं आली ते बरं झालं,+

कारण त्यामुळे मी तुझे कायदे शिकलो.

७२ तू दिलेलं नियमशास्त्र माझ्या भल्यासाठी आहे;+

ते भरपूर सोन्याचांदीपेक्षाही मौल्यवान आहे.+

י [योद ]

७३ तू आपल्या हातांनी मला निर्माण केलंस आणि घडवलंस.

मला समजबुद्धी दे,

म्हणजे मला तुझ्या आज्ञा समजतील.+

७४ तुझं भय मानणारे मला पाहून आनंद करतात,

कारण तुझ्या शब्दांवर मी भरवसा ठेवलाय.*+

७५ हे यहोवा, तुझे न्याय-निर्णय नीतिमान आहेत याची मला जाणीव आहे;+

तुझ्या विश्‍वासूपणामुळेच तू मला शिक्षा दिली आहेस.+

७६ मला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे,

तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने+ माझं सांत्वन कर.

७७ मला दया दाखव म्हणजे मी जिवंत राहीन,+

कारण तुझं नियमशास्त्र मला प्रिय आहे.+

७८ गर्विष्ठांना लज्जित कर,

कारण ते विनाकारण* माझं वाईट करतात.

पण मी तर तुझ्या आदेशांवर मनन* करीन.+

७९ जे तुझं भय मानतात आणि ज्यांना तुझ्या स्मरण-सूचना माहीत आहेत,

त्यांना माझ्याकडे परत येऊ दे.

८० मला निर्दोष मनाने तुझ्या कायद्यांचं पालन करायला साहाय्य कर,+

म्हणजे मला लज्जित व्हावं लागणार नाही.+

כ [खाफ ]

८१ तुझ्याकडून मिळणाऱ्‍या तारणाची मला आस लागली आहे,*+

कारण तुझ्या शब्दांवर मी भरवसा ठेवलाय.*

८२ “तू कधी माझं सांत्वन करशील?” असं म्हणताना,+

माझे डोळे तुझ्या अभिवचनाची वाट पाहतात.+

८३ मी धुराने वाळून गेलेल्या बुधलीसारखा* झालोय,

पण तुझे कायदे मी विसरत नाही.+

८४ तुझ्या या सेवकाला किती दिवस वाट पाहावी लागेल?

माझा छळ करणाऱ्‍यांविरुद्ध तू कधी न्यायदंड आणशील?+

८५ तुझं नियमशास्त्र मोडणारे गर्विष्ठ लोक

माझ्यासाठी खड्डे खणतात.

८६ तुझ्या सर्व आज्ञा भरवशालायक आहेत.

लोक उगाच माझा छळ करतात; मला मदत कर!+

८७ त्यांनी पृथ्वीवरून मला जवळजवळ नाहीसं केलं होतं,

पण तुझ्या आदेशांचं पालन करण्याचं मी सोडलं नाही.

८८ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे मला जिवंत ठेव,

म्हणजे तू दिलेल्या स्मरण-सूचना मी पाळीन.

ל [लामेद ]

८९ हे यहोवा, तुझे शब्द स्वर्गात कायम राहतील;

ते सर्वकाळ टिकून राहतील.+

९० तुझा विश्‍वासूपणा पिढ्या न्‌ पिढ्या टिकून राहतो.+

तू पृथ्वीची स्थापना केली आहेस, म्हणून ती स्थिर आहे.+

९१ ते* सर्व तुझे सेवक आहेत,

तुझ्या न्याय-निर्णयांमुळे ते आजपर्यंत अस्तित्वात आहेत.

९२ तुझं नियमशास्त्र मला प्रिय नसतं,

तर माझ्या दुःखामुळे माझा कधीच नाश झाला असता.+

९३ तुझे आदेश मी कधीही विसरणार नाही,

कारण त्यांमुळेच तू मला जिवंत ठेवलं आहेस.+

९४ मी तुझा आहे; मला वाचव,+

कारण मी तुझ्या आदेशांचा शोध घेतो.+

९५ दुष्ट लोक माझा नाश करण्याची संधी शोधतात,

पण मी तुझ्या स्मरण-सूचनांकडे बारकाईने लक्ष देतो.

९६ मी बऱ्‍याच परिपूर्ण गोष्टी पाहिल्या आहेत,

पण तुझ्या आज्ञा त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ* आहेत.

מ [मेम ]

९७ तुझ्या नियमशास्त्रावर माझं मनापासून प्रेम आहे!+

दिवसभर मी त्यावर मनन* करतो.+

९८ तुझ्या आज्ञा सतत माझ्या डोळ्यांसमोर असतात,

त्यामुळे मी आपल्या शत्रूंपेक्षा बुद्धिमान ठरतो.+

९९ माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा माझ्याकडे जास्त सखोल समज आहे,+

कारण मी तुझ्या स्मरण-सूचनांवर मनन* करतो.

१०० मी वयस्क माणसांपेक्षा समजदारपणे वागतो,

कारण मी तुझे आदेश पाळतो.

१०१ मला तुझ्या शब्दांचं पालन करायचंय,

म्हणून मी कोणत्याही दुष्ट मार्गावर चालायला तयार होत नाही.+

१०२ तुझ्या न्याय-निर्णयांपासून मी दूर जात नाही,

कारण तू मला मार्गदर्शन दिलं आहेस.

१०३ तुझे शब्द माझ्या जिभेला गोड लागतात,

ते माझ्या तोंडाला मधापेक्षाही गोड लागतात!+

१०४ तुझ्या आदेशांमुळे मी समजदारीने वागतो.+

म्हणूनच मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.+

נ [नून ]

१०५ तुझे शब्द माझ्या पायांसाठी दिव्यासारखे,

आणि माझ्या मार्गासाठी प्रकाशासारखे आहेत!+

१०६ तुझे नीतिमान न्याय-निर्णय पाळण्याची मी शपथ घेतली आहे

आणि मी ती पूर्ण करीन.

१०७ मी खूप दुःखं सोसली आहेत.+

हे यहोवा, तुझ्या अभिवचनाप्रमाणे मला जिवंत ठेव.+

१०८ हे यहोवा, स्वेच्छेने दिलेल्या माझ्या स्तुतीच्या अर्पणांचा* स्वीकार कर+

आणि मला तुझे न्याय-निर्णय शिकव.+

१०९ माझं जीवन सतत धोक्यात आहे,

पण मी तुझं नियमशास्त्र विसरलो नाही.+

११० दुष्टांनी माझ्यासाठी सापळा रचलाय,

पण मी तुझ्या आदेशांपासून भरकटलो नाही.+

१११ तुझ्या स्मरण-सूचनांना मी आपला सर्वकाळाचा वारसा* समजतो,

कारण त्या माझ्या मनाला आनंद देतात.+

११२ मी तुझ्या कायद्यांचं नेहमी, अगदी शेवटपर्यंत

पालन करण्याचा निश्‍चय केलाय.*

ס [सामेख ]

११३ चंचल मनाच्या* लोकांचा मी द्वेष करतो,+

पण तुझं नियमशास्त्र मला प्रिय आहे.+

११४ तू माझा आश्रय आणि माझी ढाल आहेस,+

कारण तुझ्या शब्दांवर मी भरवसा ठेवलाय.*+

११५ दुष्ट लोकांनो, माझ्यापासून दूर राहा,+

म्हणजे मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळू शकेन.

११६ हे देवा, तू वचन दिल्याप्रमाणे मला साहाय्य कर,+

म्हणजे मी जिवंत राहीन;

माझ्या आशेची निराशा* होऊ देऊ नकोस.+

११७ माझा बचाव व्हावा म्हणून मला मदत कर;+

मग मी नेहमी तुझ्या कायद्यांकडे लक्ष देईन.+

११८ तुझ्या कायद्यांपासून भरकटणाऱ्‍यांना तू नाकारतोस,+

कारण ते खोटे आणि कपटी आहेत.

११९ पृथ्वीवरच्या सर्व दुष्टांना तू निरुपयोगी गाळासारखं फेकून देतोस.+

म्हणून मला तुझ्या स्मरण-सूचना प्रिय आहेत.

१२० तुझ्या भयाने माझा थरकाप उडतो;

मला तुझ्या न्याय-निर्णयांची भीती वाटते.

ע [आयन ]

१२१ मी न्यायाला आणि नीतीला धरून वागलोय.

माझ्यावर जुलूम करणाऱ्‍यांच्या हाती मला देऊ नकोस.

१२२ तुझ्या या सेवकाचं भलं होईल अशी हमी दे;

गर्विष्ठांना माझ्यावर अत्याचार करू देऊ नकोस.

१२३ तुझ्याकडून मिळणाऱ्‍या तारणाची

आणि तुझ्या नीतिमान अभिवचनाची वाट पाहून+ माझे डोळे थकले आहेत.+

१२४ तुझ्या या सेवकावर असलेलं तुझं एकनिष्ठ प्रेम दाखव+

आणि मला तुझे कायदे शिकव.+

१२५ मी तुझा सेवक आहे; तुझ्या स्मरण-सूचना कळाव्यात,

म्हणून मला समजबुद्धी दे.+

१२६ हे यहोवा, तुझी कार्य करण्याची वेळ आली आहे,+

कारण त्यांनी तुझे नियम मोडले आहेत.

१२७ मी तर तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा,

अगदी शुद्ध सोन्यापेक्षाही मौल्यवान समजतो.+

१२८ म्हणून तुझ्याकडून येणाऱ्‍या सर्व सूचना* मला योग्य वाटतात;+

प्रत्येक खोट्या मार्गाची मला चीड येते.+

פ [पे ]

१२९ तुझ्या स्मरण-सूचना अद्‌भुत आहेत.

म्हणून मी त्या पाळतो.

१३० तुझ्या शब्दांचा अर्थ उघड झाल्याने प्रकाश मिळतो,+

अनुभव नसलेल्यांना त्यामुळे समजबुद्धी मिळते.+

१३१ मी तुझ्या आज्ञांसाठी तहानलेलो आहे,*

मला त्यांची खूप ओढ लागली आहे.+

१३२ तुझ्या नावावर प्रेम करणाऱ्‍यांसाठी असलेल्या तुझ्या न्याय-निर्णयाप्रमाणे,+

माझ्याकडे लक्ष दे आणि माझ्यावर कृपा कर.+

१३३ तुझ्या शब्दांनी माझ्या पावलांना सुरक्षित मार्ग दाखव;*

कोणत्याही दुष्ट गोष्टीला माझ्यावर अधिकार गाजवू देऊ नकोस.+

१३४ जुलूम करणाऱ्‍यांपासून मला वाचव;*

मी तुझे आदेश पाळीन.

१३५ तुझ्या या सेवकावर तुझ्या चेहऱ्‍याचा प्रकाश पडू दे+

आणि मला तुझे कायदे शिकव.

१३६ लोक तुझं नियमशास्त्र पाळत नाहीत,

हे पाहून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहतात.+

צ [सादे ]

१३७ हे यहोवा, तू नीतिमान आहेस+

आणि तुझे न्याय-निर्णय योग्य आहेत.+

१३८ तुझ्या स्मरण-सूचना नीतिमान आहेत;

त्या पूर्णपणे विश्‍वसनीय आहेत.

१३९ माझ्या आवेशाने मला झपाटून टाकलंय,+

कारण माझे शत्रू तुझे शब्द विसरले आहेत.

१४० तुझे शब्द पूर्णपणे शुद्ध आहेत+

आणि तुझ्या या सेवकाला ते प्रिय वाटतात.+

१४१ मी अगदी क्षुल्लक आणि तुच्छ आहे;+

पण तुझे आदेश मी विसरलो नाही.

१४२ तुझं नीतिमत्त्व सर्वकाळाचं आहे+

आणि तुझं नियमशास्त्र खरं आहे.+

१४३ माझ्यावर संकटं आणि दुःखं आली,

तरी तुझ्या आज्ञा मला प्रिय वाटतात.

१४४ तुझ्या स्मरण-सूचना सर्वकाळासाठी नीतिमान आहेत.

मला समजबुद्धी दे,+ म्हणजे मी जिवंत राहीन.

ק [खुफ ]

१४५ मी पूर्ण मनाने हाक मारतोय. हे यहोवा, मला उत्तर दे.

मी तुझ्या कायद्यांचं पालन करीन.

१४६ मी तुला प्रार्थना करतो, मला वाचव!

मी तुझ्या स्मरण-सूचना पाळीन.

१४७ मी पहाट होण्याआधीच* उठून तुला मदतीची याचना करतो,+

कारण तुझे शब्द मला आशा देतात.*

१४८ तुझ्या शब्दांवर मनन* करण्यासाठी,+

रात्रीच्या प्रहरीच माझे डोळे उघडतात.

१४९ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे माझी प्रार्थना ऐक.+

हे यहोवा, तुझ्या न्यायाप्रमाणे मला जिवंत ठेव.

१५० लाजिरवाणी कामं* करणारे माझ्याजवळ येतात;

तुझ्या नियमशास्त्रापासून ते खूप दूर गेले आहेत.

१५१ हे यहोवा, तू माझ्या जवळ आहेस,+

तुझ्या सर्व आज्ञा खऱ्‍या आहेत.+

१५२ तू तुझ्या स्मरण-सूचना सर्वकाळासाठी स्थिर केल्या आहेस,

हे मी फार पूर्वी शिकलो.+

ר [रेश ]

१५३ माझं दुःख पाहा आणि माझी सुटका कर,+

कारण मी तुझं नियमशास्त्र विसरलो नाही.

१५४ माझी बाजू घे* आणि मला वाचव;+

तुझ्या अभिवचनाप्रमाणे मला जिवंत ठेव.

१५५ तारण दुष्टांपासून खूप दूर आहे,

कारण त्यांनी तुझ्या कायद्यांचा शोध घेतला नाही.+

१५६ हे यहोवा, तुझी दया महान आहे.+

तुझ्या न्यायाप्रमाणे मला जिवंत ठेव.

१५७ माझा छळ करणारे आणि माझे वैरी पुष्कळ आहेत;+

पण मी तुझ्या स्मरण-सूचनांपासून भरकटलो नाही.

१५८ विश्‍वासघात करणाऱ्‍यांकडे पाहून मला घृणा वाटते

कारण ते तुझ्या शब्दांप्रमाणे चालत नाहीत.+

१५९ पाहा, मला तुझे आदेश किती प्रिय आहेत!

हे यहोवा, तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे मला जिवंत ठेव.+

१६० तुझे शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत,+

आणि तुझे सगळे नीतिमान न्याय-निर्णय सर्वकाळासाठी आहेत.

ש [शिन ]

१६१ अधिकारी उगाच मला छळतात,+

पण माझं हृदय तुझ्या शब्दांनी विस्मित होतं.+

१६२ मोठा खजिना सापडलेल्या माणसासारखा,

मी तुझ्या शब्दांमुळे आनंदित होतो.+

१६३ खोटेपणा मला अजिबात आवडत नाही, मला त्याची घृणा वाटते,+

पण तुझं नियमशास्त्र मला प्रिय वाटतं.+

१६४ तुझ्या नीतिमान न्याय-निर्णयांमुळे,

मी दिवसातून सात वेळा तुझी स्तुती करतो.

१६५ तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्‍यांना खूप शांती मिळते;+

ते कोणत्याही गोष्टीमुळे अडखळणार नाहीत.

१६६ हे यहोवा, मी तुझ्या तारणाच्या कार्यांची आशा धरली आहे

आणि मी तुझ्या आज्ञा पाळतो.

१६७ मी तुझ्या स्मरण-सूचनांप्रमाणे वागतो;

माझं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे.+

१६८ मी तुझे आदेश आणि तुझ्या स्मरण-सूचना पाळतो,

मी जे काही करतो, ते तुला माहीत आहे.+

ת [ताव ]

१६९ हे यहोवा, माझी मदतीची याचना तुझ्यापर्यंत पोहोचू दे.+

तुझ्या शब्दांतून मिळणारी समजबुद्धी मला दे.+

१७० माझी कृपेची याचना तुझ्यापुढे येऊ दे.

तू वचन दिल्याप्रमाणे* मला वाचव.

१७१ माझ्या ओठांतून तुझी स्तुती ओसंडून वाहू दे,+

कारण तू मला तुझे कायदे शिकवतोस.

१७२ माझ्या जिभेला तुझ्या शब्दांचं गुणगान करू दे,+

कारण तुझ्या सर्व आज्ञा नीतिमान आहेत.

१७३ तुझा हात मला मदत करण्यासाठी नेहमी तयार असो,+

कारण तुझ्या आदेशांचं पालन करण्याची मी निवड केली आहे.+

१७४ हे यहोवा, तुझ्याकडून मिळणाऱ्‍या तारणाची मी वाट पाहतोय;

मला तुझं नियमशास्त्र प्रिय आहे.+

१७५ मला जिवंत राहू दे, म्हणजे मी तुझी स्तुती करीन;+

तुझे न्याय-निर्णय मला साहाय्य करोत.

१७६ वाट चुकलेल्या मेंढरासारखा मी भरकटलोय.+

तुझ्या या सेवकाला शोध,

कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.+

चढणीचं गीत.*

१२० मी माझ्या संकटात यहोवाला हाक मारली,+

आणि त्याने मला उत्तर दिलं.+

 २ हे यहोवा, मला* खोटं बोलणाऱ्‍या ओठांपासून

आणि फसवणाऱ्‍या जिभेपासून वाचव.

 ३ अगं फसवणाऱ्‍या जिभे!+

तो तुझं काय करेल? तुला कोणती शिक्षा देईल?

 ४ योद्ध्याच्या तीक्ष्ण बाणांनी+

आणि जळत्या निखाऱ्‍यांनी+ तो तुला शिक्षा देईल.

 ५ हाय हाय! मी मेशेखमध्ये+ विदेशी म्हणून राहिलो;

मी केदारमधल्या+ तंबूंमध्ये राहिलो.

 ६ शांतीचा द्वेष करणाऱ्‍यांसोबत,

मी खूप काळ राहिलो.+

 ७ मी शांतिप्रिय आहे; पण जेव्हा मी बोलतो,

तेव्हा ते युद्ध करायला येतात.

चढणीचं गीत.

१२१ मी वर पर्वतांकडे पाहतो.+

मला साहाय्य कुठून मिळेल?

 २ ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली,

त्या यहोवाकडून मला साहाय्य मिळेल.+

 ३ तो तुझं पाऊल घसरू* देणार नाही.+

तुझ्या रक्षकाला कधीच डुलकी येणार नाही.

 ४ पाहा, इस्राएलच्या रक्षकाला

कधी डुलकी येणार नाही, तो झोपणार नाही.+

 ५ यहोवा तुझं रक्षण करतो.

यहोवा तुझ्या उजव्या हाताला आहे,+ तो तुला सावली देतो.+

 ६ दिवसा तुला सूर्याची झळ लागणार नाही,+

रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.+

 ७ यहोवा सर्व संकटांपासून तुझं रक्षण करेल.+

तो तुझ्या जिवाचं रक्षण करेल.+

 ८ आजपासून सर्वकाळापर्यंत,

तुझ्या सर्व कार्यांत यहोवा तुझं रक्षण करेल.

चढणीचं गीत. दावीदचं स्तुतिगीत.

१२२ “चला, आपण यहोवाच्या घरी जाऊ या,”

असं ते म्हणाले, तेव्हा मला खूप आनंद झाला.+

 २ हे यरुशलेम, पाहा, आमची पावलं

तुझ्या फाटकांतून आत आली आहेत.+

 ३ हे यरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखं

तुला बांधण्यात आलंय.+

 ४ याहचे* वंश, वर यरुशलेमला गेले आहेत;

इस्राएलला दिलेल्या आज्ञेप्रमाणे,*

यहोवाच्या नावाची उपकारस्तुती करण्यासाठी ते गेले आहेत.+

 ५ कारण न्यायाची राजासनं;+

दावीदच्या घराण्याची राजासनं, तिथेच स्थापन झाली.+

 ६ यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा.+

हे नगरी, तुझ्यावर प्रेम करणारे सुरक्षित राहतील.

 ७ तुझ्या भिंतींच्या आत सदैव शांती नांदो!

तुझ्या तटबंदी बुरुजांमध्ये सुरक्षा वस्ती करो!

 ८ माझ्या भावांसाठी आणि माझ्या सोबत्यांसाठी मी म्हणेन:

“तुझ्यात सदैव शांती नांदो!”

 ९ आपला देव यहोवा याच्या घरासाठी,+

तुझं भलं व्हावं, अशी मी प्रार्थना करीन.

चढणीचं गीत.

१२३ स्वर्गात विराजमान असलेल्या देवा,

मी तुझ्याकडे डोळे लावतो.+

 २ जसे सेवकांचे डोळे मालकाच्या हाताकडे;

आणि दासीचे डोळे मालकिणीच्या हाताकडे लागलेले असतात,

तसेच आमचे डोळे, आमचा देव यहोवा याच्याकडे लागलेले आहेत.+

आम्ही त्याच्या कृपेची वाट पाहत आहोत.+

 ३ आमच्यावर कृपा कर, हे यहोवा, आमच्यावर कृपा कर,

कारण भयंकर अपमान आमच्या वाट्याला आलाय.+

 ४ अहंकारी लोकांकडून अतोनात निंदा

आणि गर्विष्ठ लोकांकडून भयंकर अपमान, आमच्या वाट्याला आलाय.

चढणीचं गीत. दावीदचं स्तुतिगीत.

१२४ “जर यहोवा आपल्या पाठीशी नसता,”+

​—आता इस्राएलने म्हणावं​—

 २ “जर यहोवा आपल्या पाठीशी नसता,+

तर जेव्हा माणसं आपल्यावर हल्ला करायला उठली;+

 ३ जेव्हा त्यांचा क्रोध आपल्यावर भडकला,+

तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळून टाकलं असतं.+

 ४ पाण्याने आपल्याला वाहून नेलं असतं,

महापुराने आपल्याला गडप केलं असतं.+

 ५ आणि उसळतं पाणी आपल्या डोक्यावरून गेलं असतं.

 ६ यहोवाची स्तुती असो!

कारण शत्रूंनी फाडून खाल्लेल्या शिकारीसारखं, त्याने आपल्याला होऊ दिलं नाही.

 ७ फासेपारध्याच्या सापळ्यातून बचावलेल्या पक्ष्यासारखे आपण आहोत;+

सापळा तोडून टाकण्यात आला

आणि आपण निसटलो.+

 ८ ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली,

त्या यहोवाच्या नावामुळे आपल्याला साहाय्य मिळतं.”+

चढणीचं गीत.

१२५ जे यहोवावर भरवसा ठेवतात+ ते सीयोन पर्वतासारखे आहेत.

तो पर्वत कधीही डळमळणार नाही;

तो सर्वकाळ टिकून राहील.+

 २ पर्वतांनी जसं यरुशलेमला घेरलंय,+

तसं आतापासून सर्वकाळापर्यंत,

यहोवा आपल्या लोकांच्या सभोवती आहे.+

 ३ नीतिमान लोकांनी वाईट मार्गाला लागू नये,+

म्हणून दुष्टतेचा राजदंड, नीतिमानांना दिलेल्या देशात टिकून राहणार नाही.+

 ४ हे यहोवा, जे चांगले आहेत;

जे सरळ मनाचे आहेत, त्यांचं भलं कर.+

 ५ पण दुष्ट मार्गांकडे वळणाऱ्‍यांना,

यहोवा वाईट कामं करणाऱ्‍यांसोबत शिक्षा देईल.+

इस्राएलवर शांती असो!

चढणीचं गीत.

१२६ सीयोनमधून नेलेल्या बंदिवानांना यहोवाने परत आणलं,+

तेव्हा आम्ही स्वप्न पाहत आहोत असं आम्हाला वाटलं.

 २ त्या वेळी आम्ही आनंदाने हसून

जल्लोष करू लागलो.+

इतर राष्ट्रांतले लोक एकमेकांना म्हणाले:

“यहोवाने त्यांच्यासाठी अद्‌भुत कार्यं केली आहेत.”+

 ३ यहोवाने आपल्यासाठी अद्‌भुत कार्यं केली आहेत.+

त्यामुळे आपल्या आनंदाला सीमा राहिली नाही.

 ४ हे यहोवा, नेगेबच्या झऱ्‍यांसारखं,

आम्हाला बंदिवासातून परत आण.

 ५ जे अश्रू गाळत पेरणी करतात

ते आनंदाने कापणी करतील.

 ६ जो बियाण्याची पिशवी घेऊन

रडत बाहेर जातो,

तो नक्कीच आपल्या पेंढ्या घेऊन+

जयघोष करत परत येईल.+

चढणीचं गीत. शलमोनचं स्तुतिगीत.

१२७ जर यहोवाने घर बांधलं नाही,

तर बांधकाम करणाऱ्‍यांची मेहनत व्यर्थ आहे.+

जर यहोवाने शहराचं रक्षण केलं नाही,+

तर पहारेकऱ्‍यांचं जागं राहणं व्यर्थ आहे.

 २ तुम्ही लवकर उठता,

आणि उशिरापर्यंत जागून

अन्‍न मिळवण्यासाठी धडपड करता, हेही व्यर्थच आहे.

कारण तो आपल्या प्रिय सेवकांच्या गरजा भागवतो;

तो त्यांना चांगली झोपही देतो.+

 ३ पाहा! मुलं* यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत;+

पोटचं फळ देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे.+

 ४ तरुणपणी झालेली मुलं,

शूरवीराच्या हातातल्या बाणांसारखी असतात.+

 ५ ज्याचा भाता अशा बाणांनी भरलेला असतो, तो माणूस सुखी आहे!+

त्यांना* लज्जित व्हावं लागणार नाही.

कारण शहराच्या फाटकांत ती* शत्रूंशी बोलतील.

चढणीचं गीत.

१२८ जो कोणी यहोवाची भीती बाळगतो,+

जो त्याच्या मार्गांनी चालतो, तो सुखी आहे!+

 २ तू आपल्या कष्टाचं फळ खाशील.

तू आनंदी होशील आणि तुझी भरभराट होईल.+

 ३ तुझ्या घरात तुझी बायको, भरपूर फळ देणाऱ्‍या द्राक्षवेलीसारखी असेल;+

तुझ्या मेजाभोवती तुझी मुलं, जैतुनाच्या रोपांसारखी असतील.

 ४ पाहा! यहोवाची भीती बाळगणाऱ्‍या माणसाला

असा आशीर्वाद मिळेल.+

 ५ यहोवा तुला सीयोनमधून आशीर्वाद देईल.

तुला आयुष्यभर यरुशलेमची भरभराट पाहायला मिळो.+

 ६ तुला तुझ्या मुलांची मुलं पाहायला मिळोत!

इस्राएलवर शांती असो!

चढणीचं गीत.

१२९ “माझ्या लहानपणापासून ते सतत माझ्यावर हल्ला करत राहिले”+

​—आता इस्राएलने म्हणावं​—

 २ “माझ्या लहानपणापासून ते सतत माझ्यावर हल्ला करत राहिले;+

पण तरी ते मला हरवू शकले नाहीत.+

 ३ नांगरणाऱ्‍यांनी माझ्या पाठीवर नांगर चालवला;+

त्यांनी लांबलांब रेघा ओढल्या.”

 ४ पण यहोवा नीतिमान आहे;+

त्याने दुष्टांचे दोर कापून टाकले आहेत.+

 ५ सीयोनचा द्वेष करणारे सर्व जण लज्जित होतील

आणि अपमानित होऊन माघार घेतील.+

 ६ छतावर उगवणारं गवत जसं उपटून टाकण्याआधीच सुकून जातं;

तसे ते होतील.

 ७ त्याने कापणी करणाऱ्‍यांची मूठ

आणि पेंढ्या गोळा करणाऱ्‍यांचे हात भरत नाहीत.

 ८ येणारे-जाणारे असं म्हणणार नाहीत:

“यहोवाचा आशीर्वाद तुमच्यावर असो;

आम्ही तुम्हाला यहोवाच्या नावाने आशीर्वाद देतो.”

चढणीचं गीत.

१३० हे यहोवा, दुःखाच्या सागरातून मी तुला हाक मारतो.+

 २ हे यहोवा, माझी हाक ऐक.

माझ्या मदतीच्या याचनांकडे लक्ष दे.

 ३ हे यहोवा देवा, तू फक्‍त अपराध पाहिले असतेस,*

तर हे याह,* तुझ्यापुढे कोण उभं राहू शकलं असतं?+

 ४ लोकांनी तुझं भय मानावं म्हणून,+

तू खरोखर त्यांच्या पापांची क्षमा करतोस.+

 ५ मी यहोवाची आशा धरली आहे,

मी अंतःकरणापासून त्याची आशा धरली आहे;

त्याचं अभिवचन पूर्ण होण्याची मी वाट पाहतोय.

 ६ पहारेकरी सकाळ व्हायची जितकी वाट पाहतात;+

हो, पहारेकरी सकाळ व्हायची जितकी वाट पाहतात,

त्यापेक्षा जास्त आतुरतेने मी यहोवाची वाट पाहतो.+

 ७ इस्राएलने यहोवाची वाट पाहावी,

कारण यहोवाचं प्रेम एकनिष्ठ आहे.+

आपल्या लोकांना सोडवण्यासाठी त्याच्याकडे अफाट सामर्थ्य आहे.

 ८ तो इस्राएलची त्याच्या सर्व अपराधांपासून सुटका करेल.

चढणीचं गीत. दावीदचं स्तुतिगीत.

१३१ हे यहोवा, माझं मन गर्विष्ठ नाही,

माझे डोळे घमेंडी नाहीत;+

मोठमोठ्या गोष्टी करण्याची;

किंवा माझ्या आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी करण्याची,

मी इच्छा बाळगत नाही.+

 २ उलट, मी माझं मन शांत आणि स्थिर ठेवलंय.+

दूध तुटलेलं बाळ जसं आईजवळ असतं;

तसा मी समाधानी आहे.

 ३ आतापासून सर्वकाळापर्यंत,

इस्राएलने यहोवाची वाट पाहावी.+

चढणीचं गीत.

१३२ हे यहोवा, दावीदला आठव.

त्याने सोसलेलं दुःख आठव.+

 २ त्याने शपथ घेऊन यहोवाला वचन दिलं होतं;

त्याने याकोबच्या शक्‍तिशाली देवाला वचन दिलं होतं:+

 ३ “मी आपल्या घरी, आपल्या तंबूमध्ये जाणार नाही,+

मी आपल्या पलंगावर, आपल्या बिछान्यावर झोपणार नाही;

 ४ मी आपल्या डोळ्यांना झोप घेऊ देणार नाही,

मी आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही;

 ५ जोपर्यंत मी यहोवासाठी एक ठिकाण शोधत नाही,

याकोबच्या शक्‍तिशाली देवासाठी एक सुंदर निवासस्थान* शोधत नाही,

तोपर्यंत मी असंच करीन.”+

 ६ पाहा! आम्ही कराराच्या पेटीबद्दल* एफ्राथामध्ये+ ऐकलं;

आम्हाला ती रानावनांत+ सापडली.

 ७ चला, आपण त्याच्या निवासस्थानात* जाऊ या;+

त्याच्या पायांच्या आसनासमोर नमन करू या.+

 ८ हे यहोवा, ऊठ आणि तुझ्या विसाव्याच्या ठिकाणी ये.+

तुझ्या सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या तुझ्या कराराच्या पेटीसोबत ये.+

 ९ तुझ्या याजकांनी नीतिमत्त्वाची वस्त्रं घालावीत;

तुझ्या एकनिष्ठ सेवकांनी आनंदाने जयजयकार करावा.

१० तुझा सेवक दावीद याला दिलेल्या वचनामुळे,

तू आपल्या अभिषिक्‍ताला नाकारू नकोस.+

११ यहोवा आपला शब्द मोडणार नाही;

त्याने शपथ घेऊन दावीदला वचन दिलं होतं;

“तुझ्या संततीपैकी* एकाला,

मी तुझ्या राजासनावर बसवीन.+

१२ जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला

आणि मी शिकवलेल्या स्मरण-सूचना* पाळल्या,+

तर त्यांची मुलंही

तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.”+

१३ कारण यहोवाने सीयोनला निवडलंय;+

आपलं निवासस्थान म्हणून त्याने तिला निवडलंय.+

१४ तो म्हणाला, “हे माझं सर्वकाळाचं विसाव्याचं ठिकाण आहे;

मी इथे राहीन,+ कारण माझी अशी इच्छा आहे.

१५ मी तिला भरपूर अन्‍नधान्य देऊन आशीर्वादित करीन;

तिच्या गरिबांना मी अन्‍नाने तृप्त करीन.+

१६ मी तिच्या याजकांना तारणाची वस्त्रं घालीन,+

तिचे एकनिष्ठ जन आनंदाने जयजयकार करतील.+

१७ तिथे मी दावीदचं सामर्थ्य* वाढवीन.

माझ्या अभिषिक्‍तासाठी मी एक दिवा तयार केलाय.+

१८ मी त्याच्या शत्रूंना लज्जेने झाकून टाकीन,

पण त्याच्या डोक्यावर त्याचा मुकुट चमकेल.”+

चढणीचं गीत. दावीदचं स्तुतिगीत.

१३३ पाहा! भावांनी सोबत मिळून ऐक्याने राहणं,

किती चांगलं आणि आनंददायक आहे!+

 २ ते डोक्यावर ओतलेल्या त्या उत्तम तेलासारखं आहे,+

जे दाढीवरून खाली ओघळतं;

जे अहरोनच्या दाढीवरून,+

त्याच्या वस्त्रांपर्यंत ओघळतं.

 ३ ते हर्मोन पर्वतावरच्या+ त्या दवासारखं आहे,

जे सीयोनच्या डोंगरांवर+ उतरतं.

तिथेच यहोवाने त्याचा आशीर्वाद, म्हणजे सर्वकाळाचं जीवन मिळेल,

असा आदेश दिला आहे.

चढणीचं गीत.

१३४ यहोवाच्या सर्व सेवकांनो,

रात्रीच्या वेळी यहोवाच्या घरात उभं राहणाऱ्‍या त्याच्या सेवकांनो,+

यहोवाची स्तुती करा!+

 २ पवित्रतेने* आपले हात उंच करा+

आणि यहोवाची स्तुती करा!

 ३ आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा यहोवा देव,

तुम्हाला सीयोनमधून आशीर्वाद देवो!

१३५ याहची स्तुती करा!*

यहोवाच्या नावाची स्तुती करा;

यहोवाच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा,+

 २ यहोवाच्या घरात उभं राहणाऱ्‍यांनो,

आपल्या देवाच्या घराच्या अंगणांत उभं राहणाऱ्‍यांनो,+

 ३ याहची स्तुती करा, कारण यहोवा चांगला आहे.+

त्याच्या नावाचं गुणगान करा,* कारण ते सुंदर आहे.

 ४ कारण याहने याकोबला स्वतःसाठी निवडलंय;

इस्राएलला त्याने आपली खास प्रजा* म्हणून निवडलंय.+

 ५ यहोवा महान आहे याची मला जाणीव आहे;

आपला प्रभू इतर सगळ्या देवांपेक्षा महान आहे.+

 ६ आकाशात आणि पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरांत,

यहोवा आपल्या इच्छेप्रमाणे सर्वकाही करतो.+

 ७ तो पृथ्वीच्या टोकांवरून ढग* वर चढवतो;

तो पावसासाठी विजा चमकवतो.*

आपल्या कोठारांतून तो वाऱ्‍याला बाहेर आणतो.+

 ८ त्याने इजिप्तच्या पहिल्या जन्मलेल्यांना;

माणसांच्या आणि पशूंच्या पहिल्या जन्मलेल्यांना ठार मारलं.+

 ९ हे इजिप्त, त्याने तुझ्यामध्ये,

फारो आणि त्याच्या सर्व सेवकांविरुद्ध+ चिन्हं आणि चमत्कार केले.+

१० त्याने बऱ्‍याच राष्ट्रांना धुळीला मिळवलं+

आणि शक्‍तिशाली राजांना ठार मारलं.+

११ अमोरी लोकांचा राजा सीहोन,+

बाशानचा राजा ओग+

आणि कनानच्या सर्व राज्यांना त्याने हरवलं.

१२ त्याने त्यांचा देश वारसा म्हणून

इस्राएलला, आपल्या लोकांना दिला.+

१३ हे यहोवा, तुझं नाव सर्वकाळाचं आहे.

हे यहोवा, तुझी ख्याती* पिढ्या न्‌ पिढ्या टिकून राहील.+

१४ यहोवा आपल्या लोकांचं समर्थन करेल,*+

त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल.*+

१५ राष्ट्रांच्या मूर्ती तर सोन्याचांदीच्या आहेत;

त्या माणसांच्या हातांनी घडवलेल्या आहेत.+

१६ त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही;+

डोळे आहेत, पण पाहता येत नाही.

१७ त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही;

त्यांच्या नाकपुड्यांत श्‍वास नाही.+

१८ त्यांना घडवणारे त्यांच्यासारखेच होतील,+

त्यांच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांचीही, त्यांच्यासारखीच स्थिती होईल.+

१९ हे इस्राएलच्या घराण्या, यहोवाची स्तुती कर!

हे अहरोनच्या घराण्या, यहोवाचं गुणगान कर!

२० हे लेवीच्या घराण्या, यहोवाची स्तुती कर!+

यहोवाची भीती बाळगणाऱ्‍यांनो, यहोवाचं गुणगान करा!

२१ सीयोनमधून यहोवाची स्तुती होवो!+

यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या देवाची स्तुती होवो!+

याहची स्तुती करा!+

१३६ यहोवाचे आभार माना, कारण तो चांगला आहे;+

त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.+

 २ जो देवांचा देव, त्याचे आभार माना,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

 ३ जो प्रभूंचा प्रभू, त्याचे आभार माना,

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

 ४ अद्‌भुत पराक्रम करणारा तो एकटाच आहे,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.+

 ५ त्याने कुशलतेने* आकाश निर्माण केलं,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

 ६ त्याने पृथ्वीला पाण्यावर पसरवलं,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

 ७ त्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

 ८ दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्य घडवला,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

 ९ रात्रीवर राज्य करण्यासाठी त्याने चंद्र आणि तारे घडवले,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

१० त्याने इजिप्तच्या प्रथमपुत्राला ठार मारलं,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

११ त्याने इस्राएलला इजिप्तमधून बाहेर आणलं,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

१२ त्याने आपल्या महान सामर्थ्याने+ त्यांना बाहेर आणलं,

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

१३ तांबड्या समुद्राचे त्याने दोन भाग केले,*+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

१४ त्याने इस्राएलला त्यातून पलीकडे नेलं,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

१५ त्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात बुडवून टाकलं.+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

१६ त्याने ओसाड रानातून आपल्या लोकांना मार्ग दाखवला,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

१७ त्याने मोठमोठ्या राजांना हरवलं,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

१८ त्याने शक्‍तिशाली राजांना मारून टाकलं,

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

१९ अमोरी लोकांचा राजा सीहोन,+ याला त्याने ठार मारलं,

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

२० बाशानचा राजा ओग,+ याला त्याने मारून टाकलं,

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

२१ त्यांचा देश त्याने आपल्या लोकांना वारसा म्हणून दिला,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

२२ त्याने आपल्या सेवकाला, इस्राएलला तो दिला,

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

२३ आपली दुर्दशा झाली, तेव्हा त्याने आपली आठवण केली,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.+

२४ आपल्या शत्रूंपासून तो आपल्याला सोडवत राहिला,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

२५ तो सर्व जिवांना अन्‍न देतो,+

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

२६ स्वर्गातल्या देवाचे आभार माना,

कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.

१३७ बाबेलमधल्या नद्यांच्या+ काठांवर बसून,

आम्ही सीयोनच्या आठवणीने रडलो.+

 २ तिथल्या* झाडांवर आम्ही,

आपल्या वीणा* टांगल्या.+

 ३ कारण बंदी बनवणाऱ्‍यांनी, आम्हाला गाणं गायला सांगितलं,+

आमची थट्टा करणाऱ्‍यांना करमणूक हवी होती. ते म्हणाले:

“आमच्यासाठी सीयोनचं एखादं गाणं गा.”

 ४ पण एका परक्या देशात,

आम्ही यहोवाचं गीत कसं गाणार?

 ५ हे यरुशलेम, जर मी तुला विसरलो,

तर माझा उजवा हात त्याचं कौशल्य विसरो.*+

 ६ जर मी तुझी आठवण केली नाही,

किंवा यरुशलेमला माझा सर्वात मोठा आनंद मानला नाही,+

तर माझी जीभ टाळूला चिकटो.

 ७ हे यहोवा, ज्या दिवशी यरुशलेम पडली,

त्या दिवशी अदोमी लोक काय म्हणाले ते आठव:

“पाडून टाका! तिला जमीनदोस्त करा!”+

 ८ हे बाबेलच्या मुली, तुझा लवकरच नाश होणार आहे;+

तू आमच्यावर जे जुलूम केलेस,

तसेच तुझ्यावर करून, जो तुझी परतफेड करेल,+

तो सुखी होईल.

 ९ जो तुझ्या मुलांना तुझ्यापासून हिरावून घेईल,

आणि त्यांना खडकांवर आपटेल,+ तो सुखी होईल.

दावीदचं स्तुतिगीत.

१३८ मी अगदी मनापासून तुझी स्तुती करीन.+

मी इतर देवांच्या देखत,

तुझं गुणगान गाईन.*

 २ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे आणि विश्‍वासूपणामुळे,

मी तुझ्या पवित्र मंदिराकडे* वळून दंडवत घालीन+

आणि तुझ्या नावाची स्तुती करीन.+

कारण तू आपले शब्द आणि आपलं नाव,

इतर सर्व गोष्टींपेक्षा महान केलं आहेस.*

 ३ मी हाक मारली, त्या दिवशी तू मला उत्तर दिलंस;+

तू मला धैर्यवान आणि ताकदवान बनवलंस.+

 ४ हे यहोवा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी स्तुती करतील;+

कारण तू दिलेली अभिवचनं त्यांनी ऐकली आहेत.

 ५ ते यहोवाच्या अद्‌भुत कार्यांचं गुणगान करतील,

कारण यहोवा अत्यंत गौरवशाली आहे.+

 ६ यहोवा उच्च स्थानावर असूनही, नम्र लोकांकडे लक्ष देतो,+

पण गर्विष्ठ लोकांना तो जवळ करत नाही.*+

 ७ मी संकटात सापडलो, तरी तू माझ्या जिवाचं रक्षण करशील.+

माझ्या संतापलेल्या शत्रूंविरुद्ध तू आपला हात उगारशील;

तुझा उजवा हात मला वाचवेल.

 ८ यहोवा माझ्यासाठी असलेले त्याचे सर्व संकल्प पूर्ण करेल.

हे यहोवा, तुझं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं;+

तू आपल्या हातांनी केलेली कार्यं सोडून देऊ नकोस.+

दावीदचं गीत. स्तुतिगीत. संचालकासाठी.

१३९ हे यहोवा, तू मला तपासून पाहिलं आहेस आणि तू मला ओळखतोस.+

 २ माझं बसणं आणि माझं उठणं तुला माहीत आहे.+

माझे विचार तू दुरूनच ओळखतोस.+

 ३ मी प्रवास करतो आणि विश्रांती घेतो, तेव्हा तू मला पाहतोस;*

माझे सर्व मार्ग तू जाणतोस.+

 ४ हे यहोवा, माझ्या तोंडातून शब्द फुटण्याआधीच

तुला तो माहीत असतो.+

 ५ माझ्या मागे आणि पुढे, सर्व बाजूंनी तू माझं रक्षण करतोस,

तू आपला हात माझ्यावर ठेवतोस.

 ६ हे ज्ञान माझ्या समजण्यापलीकडे;*

माझ्या आवाक्याबाहेरचं आहे.*+

 ७ मी तुझ्या पवित्र शक्‍तीपासून* निसटून कुठे जाऊ शकतो?

तुझ्यासमोरून मी कुठे पळून जाऊ शकतो?+

 ८ जर मी आकाशात चढून गेलो, तर तू तिथे असशील,

आणि जर मी कबरेत* अंथरूण घातलं, तर पाहा! तिथेही तू असशील.+

 ९ जर मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन,

सर्वात दूरच्या समुद्राजवळ राहायला गेलो,

१० तर, तिथेही तुझा हात मला मार्ग दाखवेल

आणि तुझा उजवा हात मला सांभाळेल.+

११ “अंधार मला नक्कीच लपवू शकेल,” असं जर मी म्हणालो,

तर माझ्याभोवती रात्रीचा अंधार, प्रकाशात बदलेल.

१२ काळोखही तुझ्यासाठी पुरेसा दाट नसेल;

उलट, रात्रसुद्धा दिवसाइतकीच लख्ख असेल.+

तुझ्यासाठी काळोख आणि प्रकाश सारखाच!+

१३ कारण तूच माझे अवयव* निर्माण केलेस;

माझ्या आईच्या पोटात,* तू मला पडद्याआड ठेवलंस.+

१४ तू मला किती अद्‌भुत रितीने बनवलंस,+ हे पाहून मी विस्मित होतो

आणि म्हणून मी तुझी स्तुती करतो!

तुझी कार्यं अद्‌भुत आहेत,+

याची मला जाणीव आहे.

१५ जेव्हा मला गुप्त ठिकाणी बनवण्यात आलं

आणि पृथ्वीच्या सगळ्यात खोल भागांत मी आकार घेत होतो,*

तेव्हा माझी हाडं तुझ्यापासून लपलेली नव्हती.+

१६ मी गर्भात होतो, तेव्हा तुझ्या डोळ्यांनी मला पाहिलं;

माझ्या शरीराच्या भागांपैकी एकही अस्तित्वात येण्याआधी,

त्या सर्वांबद्दल आणि त्यांची रचना झाली त्या दिवसांबद्दल,

तुझ्या पुस्तकात लिहिलेलं होतं.

१७ म्हणूनच, हे देवा, तुझे विचार मला फार मौल्यवान वाटतात!+

त्यांची बेरीज करता येणार नाही!+

१८ मी ते मोजू लागलो, तर त्यांची संख्या वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.+

सकाळी जाग आल्यावरही, मी ते मोजतच असेन.*+

१९ हे देवा, कृपा करून दुष्टांचा नाश कर!+

म्हणजे हिंसाचार करणारे* माझ्यापासून दूर होतील.

२० जे दुष्ट हेतूने* तुझ्याविरुद्ध बोलतात,

ते तुझे शत्रू आहेत; ते तुझ्या नावाचा गैरवापर करतात.+

२१ हे यहोवा, जे तुझा द्वेष करतात, त्यांचा मी द्वेष करत नाही का?+

जे तुझ्याविरुद्ध बंड करतात, त्यांची मला घृणा वाटत नाही का?+

२२ हो, अगदी मनापासून मी त्यांचा द्वेष करतो.+

ते खरोखर माझे शत्रू आहेत.

२३ हे देवा, मला तपासून पाहा आणि माझं मन ओळख.+

माझी पारख कर आणि माझ्या चिंता* जाणून घे.+

२४ चुकीच्या मार्गावर नेणारी एखादी गोष्ट तर माझ्यात नाही ना, हे पाहा+

आणि मला सर्वकाळाच्या मार्गावर चालव.+

दावीदचं गीत. संचालकासाठी.

१४० हे यहोवा, दुष्ट माणसांपासून मला सोडव;

हिंसाचार करणाऱ्‍यांपासून माझं रक्षण कर.+

 २ ते आपल्या मनात दुष्ट योजना आखतात+

आणि दिवसभर भांडणं उकरून काढतात.

 ३ ते आपल्या जिभा सापासारख्या धारदार करतात;+

त्यांच्या तोंडात विषारी सापांचं जहर असतं.+ (सेला )

 ४ हे यहोवा, दुष्टांच्या हातून मला सोडव;+

हिंसाचार करणाऱ्‍यांपासून माझं रक्षण कर.

मी अडखळून पडावं, म्हणून ते कट रचतात.

 ५ गर्विष्ठ माझ्यासाठी पाश लपवून ठेवतात;

रस्त्याच्या कडेला ते दोरांनी जाळं पसरवून ठेवतात.+

ते माझ्यासाठी सापळे रचतात.+ (सेला )

 ६ मी यहोवाला म्हणतो: “तू माझा देव आहेस.

हे यहोवा, माझ्या मदतीच्या याचना ऐक.”+

 ७ हे सर्वोच्च प्रभू यहोवा, माझं तारण करणाऱ्‍या शक्‍तिशाली देवा,

युद्धाच्या दिवशी तू माझ्या डोक्याचं रक्षण करतोस.+

 ८ हे यहोवा, दुष्टांच्या इच्छा पूर्ण होऊ देऊ नकोस.

त्यांनी बढाई मारू नये, म्हणून त्यांच्या योजना सफल होऊ देऊ नकोस.+ (सेला )

 ९ मला घेरणाऱ्‍या लोकांचे शिव्याशाप,

त्यांच्याच माथी येऊ दे.+

१० त्यांच्यावर निखाऱ्‍यांचा वर्षाव होवो.+

ते आगीत फेकले जावोत.

वर येता येणार नाही, अशा खोल खड्ड्यांत* ते पडोत.+

११ बदनामी करणाऱ्‍याला पृथ्वीवर* थारा न मिळो.+

हिंसाचार करणाऱ्‍यांच्या मागे संकटं लागोत

आणि ती त्यांचा नाश करोत.

१२ यहोवा दीनदुबळ्यांची बाजू घेईल

आणि गोरगरिबांना न्याय देईल, हे मला माहीत आहे.+

१३ नीतिमान लोक नक्कीच तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील;

सरळ मनाचे लोक तुझ्यासमोर राहतील.+

दावीदचं स्तुतिगीत.

१४१ हे यहोवा, मी तुला हाक मारतो.+

लवकर येऊन मला मदत कर.+

मी तुला हाक मारीन, तेव्हा माझ्याकडे लक्ष दे.+

 २ माझी प्रार्थना तुझ्यासमोर चांगल्या प्रकारे तयार केलेल्या+ धूपाप्रमाणे असो.+

माझे उंचावलेले हात, संध्याकाळच्या अन्‍नार्पणासारखे असोत.+

 ३ हे यहोवा, माझ्या तोंडावर पहारा ठेव,

माझ्या ओठांच्या दारावर लक्ष ठेव.+

 ४ माझं मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस;+

म्हणजे मी दुष्ट लोकांच्या नीच कामांत सामील होणार नाही.

मी कधीही त्यांची पक्वान्‍नं खाणार नाही.

 ५ नीतिमान माणसाने मला मारलं, तरी तो त्याच्या एकनिष्ठ प्रेमाचाच पुरावा असेल;+

त्याने माझं ताडन केलं, तरी ते माझ्या डोक्यावर तेल ओतण्यासारखं असेल,+

आणि मी ते कधीच नाकारणार नाही.+

त्यांच्या संकटांतही मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहीन.

 ६ त्यांच्या न्यायाधीशांना कड्यावरून लोटून देण्यात आलं,

तरी मी सांगितलेल्या गोष्टींकडे लोक लक्ष देतील, कारण त्या चांगल्या आहेत.

 ७ एखादा जसा शेत नांगरून ढेकळं फोडतो आणि माती भुसभुशीत करतो,

तशी आमची हाडं कबरेच्या* तोंडाजवळ विखरण्यात आली आहेत.

 ८ पण हे सर्वोच्च प्रभू यहोवा, माझे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत.+

मी तुझा आश्रय घेतलाय.

माझ्या जिवाचा नाश होऊ देऊ नकोस.

 ९ त्यांनी माझ्यासाठी ठेवलेल्या पाशांपासून माझं रक्षण कर;

दुष्टांच्या सापळ्यांपासून मला वाचव.

१० सगळे दुष्ट लोक, आपल्याच जाळ्यांत सापडतील,+

पण, मी मात्र सुखरूपपणे आपल्या मार्गाने जाईन.

दावीदचं मस्कील.* गुहेत असताना+ लिहिलेलं गीत. एक प्रार्थना.

१४२ मी यहोवाला मदतीसाठी हाक मारतो.+

मी यहोवाकडे कृपेची याचना करतो.

 २ मी त्याच्याजवळ आपल्या चिंता व्यक्‍त करतो;

मी त्याला माझी दुःखं सांगतो.+

 ३ माझं मन* खचून जातं,

तेव्हा तू माझ्या मार्गावर लक्ष ठेवतोस.+

मी ज्या वाटेवर चालतो,

त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी सापळा रचलाय.

 ४ माझ्या आजूबाजूला पाहा,

कोणालाही माझ्याबद्दल काळजी नाही.*+

मी कुठेच पळून जाऊ शकत नाही;+

कोणालाच माझी* पर्वा नाही.

 ५ हे यहोवा, मी तुला मदतीसाठी हाक मारतो.

मी म्हणतो: “तूच माझा आश्रय आहेस,+

जिवंतांच्या देशात, तुला सोडून माझ्याजवळ काहीही* नाही.”

 ६ माझ्या मदतीच्या याचनेकडे लक्ष दे,

कारण माझी फार दुर्दशा झाली आहे.

माझा छळ करणाऱ्‍यांपासून मला सोडव,+

कारण ते माझ्यापेक्षा ताकदवान आहेत.

 ७ मला तुरुंगातून बाहेर काढ

म्हणजे मी तुझ्या नावाची स्तुती करीन.

तू माझ्यावर दया केल्यामुळे

नीतिमान लोक माझ्याभोवती गोळा होऊ दे.

दावीदचं गीत.

१४३ हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक;+

माझ्या मदतीच्या याचनेकडे लक्ष दे.

तुझ्या विश्‍वासूपणामुळे आणि नीतिमत्त्वामुळे मला उत्तर दे.

 २ तुझ्या या सेवकाला तुझ्या न्यायासनापुढे आणू नकोस,

कारण कोणीही जिवंत माणूस तुझ्यासमोर नीतिमान ठरू शकत नाही.+

 ३ शत्रू माझा पाठलाग करतोय;

त्याने मला पायांखाली तुडवून धुळीला मिळवलंय.

फार पूर्वी मेलेल्या लोकांसारखं, त्याने मला अंधारात राहायला लावलंय.

 ४ माझं मन* खचलंय,+

माझं हृदय सुन्‍न झालंय.+

 ५ मला पूर्वीचे दिवस आठवतात;

मी तुझ्या सर्व कार्यांवर मनन* करतो;+

तुझ्या हाताच्या कार्यांबद्दल मी विचार करतो.

 ६ मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो;

कोरड्या पडलेल्या जमिनीसारखा, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे.+ (सेला )

 ७ हे यहोवा, माझ्या प्रार्थनेचं लवकर उत्तर दे,+

कारण माझी ताकद संपली आहे.+

माझ्यापासून तोंड फिरवू नकोस,+

नाहीतर, मीही कबरेत* जाणाऱ्‍यांसारखा होईन.+

 ८ पहाटे मला तुझ्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल ऐकू दे,

कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवतो.

ज्या मार्गावर मी चाललं पाहिजे तो मला दाखव,+

कारण मी तुझ्याकडे वळतो.

 ९ हे यहोवा, माझ्या शत्रूंपासून माझी सुटका कर,

मी तुझ्या आश्रयाला आलोय.+

१० मला तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला शिकव,+

कारण तू माझा देव आहेस.

तुझी पवित्र शक्‍ती* चांगली आहे;

तिने मला सपाट जमिनीवर* न्यावं.

११ हे यहोवा, तुझ्या नावासाठी मला जिवंत ठेव.

तुझ्या नीतिमत्त्वामुळे मला* संकटातून सोडव.+

१२ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे, माझ्या शत्रूंचा नाश कर;*+

माझा* छळ करणाऱ्‍या सर्वांचा नाश कर,+

कारण मी तुझा सेवक आहे.+

दावीदचं गीत.

१४४ यहोवा माझा खडक आहे,+ त्याची स्तुती असो!

तो मला लढाईचं प्रशिक्षण देतो

आणि युद्धासाठी सज्ज करतो.+

 २ तो माझा गड आहे; तो माझ्यावर एकनिष्ठ प्रेम करतो.

तो माझा सुरक्षित आश्रय* आणि माझा सोडवणारा आहे.

तो माझी ढाल आहे; मी त्याचा आश्रय घेतलाय.+

त्याने लोकांना माझ्या अधीन केलंय.+

 ३ हे यहोवा, शेवटी माणूस काय आहे, की तू त्याच्याकडे पाहावं?

नाशवंत मानव काय आहे, की तू त्याच्याकडे लक्ष द्यावं?+

 ४ माणूस तर फक्‍त श्‍वासासारखा आहे;+

त्याचं आयुष्य* विरून जाणाऱ्‍या सावलीसारखं आहे.+

 ५ हे यहोवा, तुझं आकाश झुकव* आणि खाली उतर;+

पर्वतांना स्पर्श कर आणि त्यांना धुमसू दे.+

 ६ विजा चमकव आणि शत्रूंची पांगापांग कर;+

तुझे बाण चालव आणि त्यांचा गोंधळ उडव.+

 ७ आकाशातून तुझे हात लांब कर

आणि उसळत्या पाण्यातून मला वाचव,

विदेश्‍यांच्या तावडीतून* मला सोडव.+

 ८ ते खोटं बोलतात

आणि आपला उजवा हात उंचावून खोटी शपथ घेतात.

 ९ हे देवा, मी तुझ्यासाठी एक नवीन गीत गाईन.+

दहा तारांच्या तंतुवाद्यावर मी तुझं गुणगान करीन.*

१० कारण तू राजांना विजयी करतोस,*+

तू आपला सेवक दावीद याला भयानक तलवारीपासून सोडवतोस.+

११ मला विदेश्‍यांच्या हातून सोडव,

आणि खोटं बोलणाऱ्‍यांपासून माझी सुटका कर.

ते आपला उजवा हात उंचावून खोटी शपथ घेतात.

१२ मग आमची तरुण मुलं भराभर वाढणाऱ्‍या रोपांसारखी असतील,

आणि आमच्या मुली, महालाच्या कोपऱ्‍यासाठी कोरलेल्या नक्षीदार खांबांसारख्या होतील.

१३ आमची कोठारं सर्व प्रकारच्या अन्‍नधान्याने ओसंडून वाहतील;

आमच्या शेतांतले कळप हजारो-लाखो पटींनी वाढतील.

१४ पोटात गर्भ असलेल्या आमच्या गुराढोरांना इजा होणार नाही,

किंवा त्यांचा गर्भपात होणार नाही;

आमच्या चौकांमध्ये कोणीही दुःखामुळे आक्रोश करणार नाही.

१५ ज्या लोकांची अशी स्थिती आहे, ते सुखी आहेत!

यहोवा ज्यांचा देव आहे, ते लोक सुखी आहेत!+

दावीदचं स्तुतिगीत.

א [आलेफ ]

१४५ हे माझ्या देवा, माझ्या राजा, मी तुझा महिमा करीन,+

मी सदासर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.+

ב [बेथ ]

 २ मी दिवसभर तुझी स्तुती करीन;+

मी सदासर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.+

ג [गिमेल ]

 ३ यहोवा महान आणि सर्वात स्तुतिपात्र आहे;+

त्याची महानता कल्पनेपलीकडे* आहे.+

ד [दालेथ ]

 ४ लोक पिढ्या न्‌ पिढ्या तुझ्या कार्यांची स्तुती करतील;

ते तुझ्या पराक्रमांचं वर्णन करतील.+

ה [हे ]

 ५ तुझ्या वैभवाच्या गौरवी ऐश्‍वर्याचं ते वर्णन करतील+

आणि मी तुझ्या अद्‌भुत कार्यांवर मनन करीन.

ו [वाव ]

 ६ ते तुझ्या विस्मयकारक कार्यांबद्दल* सांगतील,

आणि मी तुझी महानता घोषित करीन.

ז [झाइन ]

 ७ तुझा अपार चांगुलपणा आठवून, ते तुझी भरभरून स्तुती करतील,+

तुझ्या नीतिमत्त्वामुळे ते आनंदाने जल्लोष करतील.+

ח [हेथ ]

 ८ यहोवा दयाळू, करुणामय* आणि सहनशील आहे;+

त्याचं एकनिष्ठ प्रेम अपार आहे.+

ט [तेथ ]

 ९ यहोवा सर्वांना चांगुलपणा दाखवतो,+

त्याची दया त्याच्या सर्व कार्यांतून दिसून येते.

י [योद ]

१० हे यहोवा, तुझी सर्व कार्यं तुझा महिमा करतील,+

तुझे एकनिष्ठ सेवक तुझं गुणगान करतील.+

כ [खाफ ]

११ ते तुझ्या राज्याचा गौरव घोषित करतील+

आणि तुझ्या सामर्थ्याबद्दल सर्वांना सांगतील.+

ל [लामेद ]

१२ ते लोकांना तुझ्या पराक्रमांबद्दल;+

तुझ्या राज्याच्या गौरवी ऐश्‍वर्याबद्दल सांगतील.+

מ [मेम ]

१३ तुझं राज्य सर्वकाळाचं आहे

आणि तुझी सत्ता पिढ्या न्‌ पिढ्या टिकून राहते.+

ס [सामेख ]

१४ पडत असलेल्या सर्वांना यहोवा सावरतो;+

तो वाकलेल्या सर्वांना उभं करतो.+

ע [आयन ]

१५ सर्व जीव आशेने तुझ्याकडे पाहतात;

तू त्यांना योग्य वेळी अन्‍न पुरवतोस.+

פ [पे ]

१६ तू आपली मूठ उघडून,

प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण करतोस.+

צ [सादे ]

१७ यहोवाचे सर्व मार्ग नीतिमान आहेत+

त्याच्या सर्व कार्यांत तो एकनिष्ठ आहे.+

ק [खुफ ]

१८ यहोवा त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे;+

प्रामाणिकपणे* त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या तो जवळ आहे.+

ר [रेश ]

१९ त्याचं भय मानणाऱ्‍या सर्वांची इच्छा तो पूर्ण करतो;+

तो त्यांची मदतीची याचना ऐकून त्यांना सोडवतो.+

ש [शिन ]

२० यहोवा आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचं रक्षण करतो,+

पण सगळ्या दुष्टांचा तो सर्वनाश करेल.+

ת [ताव ]

२१ मी यहोवाची स्तुती गाईन;+

प्रत्येक जिवाने त्याच्या पवित्र नावाची सदासर्वकाळ स्तुती करावी.+

१४६ याहची स्तुती करा!*+

मी अगदी अंतःकरणापासून यहोवाची स्तुती करीन.+

 २ मी आयुष्यभर यहोवाची स्तुती करीन.

जिवात जीव असेपर्यंत, मी माझ्या देवाचं गुणगान करीन.*

 ३ शासकांवर* भरवसा ठेवू नका.

माणसावर भरवसा ठेवू नका, कारण तो तारण करू शकत नाही.+

 ४ त्याचा श्‍वास निघून जातो, तो मातीला मिळतो;+

त्याच दिवशी त्याच्या विचारांचा शेवट होतो.+

 ५ याकोबचा देव ज्याला साहाय्य करतो;+

जो आपला देव यहोवा याची आशा धरतो, तो सुखी आहे!+

 ६ ज्याने आकाश आणि पृथ्वी,

समुद्र आणि त्यातलं सर्वकाही निर्माण केलं,+

तो नेहमी विश्‍वासू राहतो.+

 ७ तो लुबाडण्यात आलेल्यांना न्याय मिळवून देतो,

तो भुकेल्यांना अन्‍न देतो.+

यहोवा कैद्यांची* सुटका करतो.+

 ८ यहोवा आंधळयांचे डोळे उघडतो;+

यहोवा वाकलेल्यांना उभं करतो;+

यहोवा नीतिमानांवर प्रेम करतो.

 ९ यहोवा विदेशी रहिवाशांचं रक्षण करतो;

तो अनाथांना* आणि विधवांना सांभाळतो,+

पण दुष्टांचे कट तो हाणून पाडतो.*+

१० यहोवा सर्वकाळ राज्य करेल.+

हे सीयोन, तुझा देव पिढ्या न्‌ पिढ्या राज्य करेल.

याहची स्तुती करा!*

१४७ याहची स्तुती करा!*

आपल्या देवाची स्तुती करणं* चांगलं आहे;

त्याची स्तुती करणं आनंद देणारं आणि योग्यच आहे!+

 २ यहोवा यरुशलेमची बांधणी करतो;+

इस्राएलच्या विखुरलेल्यांना तो पुन्हा गोळा करतो.+

 ३ तो दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो;

तो त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतो.

 ४ तो ताऱ्‍यांची संख्या मोजतो.

तो त्या सर्वांना नावाने हाक मारतो.+

 ५ आपला प्रभू महान आणि खूप सामर्थ्यशाली आहे;+

त्याची बुद्धी* अमर्याद आहे.+

 ६ यहोवा दीनदुबळ्यांना उठवतो,+

पण तो दुष्टांना धुळीला मिळवतो.

 ७ यहोवासाठी उपकारस्तुतीचं गीत गा;

वीणेवर* आपल्या देवाच्या स्तुतीचं गीत गा.

 ८ तो आकाशाला ढगांनी झाकतो,

तो पृथ्वीवर पाऊस पाडतो,+

तो पर्वतांवर गवत उगवायला लावतो.+

 ९ तो प्राण्यांची भूक भागवतो,+

कावळ्याच्या काव-काव करणाऱ्‍या पिल्लांना, तो अन्‍न देतो.+

१० घोड्याच्या ताकदीमुळे त्याला आनंद होत नाही;+

माणसाच्या दणकट पायांचं त्याला काहीच विशेष वाटत नाही.+

११ यहोवाची भीती बाळगणारे;+

त्याच्या एकनिष्ठ प्रेमाची वाट पाहणारे, त्याला प्रिय आहेत.+

१२ हे यरुशलेम, यहोवाचा गौरव कर.

हे सीयोन, आपल्या देवाची स्तुती कर.

१३ तो तुझ्या शहराच्या फाटकांचे अडसर मजबूत करतो.

तो तुझ्या मुलांना आशीर्वाद देतो.

१४ तो तुझ्या प्रदेशात शांती आणतो;+

तो तुला सर्वात उत्तम गहू देऊन तृप्त करतो.+

१५ तो पृथ्वीवर आपली आज्ञा पाठवतो;

त्याचा शब्द वेगाने धावतो.

१६ तो लोकरीसारखा बर्फ पाडतो;+

तो राखेसारखे हिमकण विखुरतो.+

१७ तो गारा,* भाकरीच्या तुकड्यांसारख्या खाली पाडतो.+

त्याने पाठवलेली थंडी कोण सोसू शकतं?+

१८ तो आपला शब्द पाठवतो, तेव्हा बर्फ वितळतो.

तो वारा पाठवतो,+ तेव्हा पाणी वाहू लागतं.

१९ त्याने आपले शब्द याकोबला सांगितले,

त्याने इस्राएलला आपले कायदे आणि न्याय-निर्णय* दिले.+

२० इतर कोणत्याही राष्ट्रासोबत त्याने असं केलं नाही;+

त्यांना त्याच्या न्याय-निर्णयांबद्दल काहीच माहीत नाही.

याहची स्तुती करा!*+

१४८ याहची स्तुती करा!*

आकाशातून यहोवाची स्तुती करा!+

उंच आकाशात त्याची स्तुती करा!

 २ त्याच्या स्वर्गदूतांनो, त्याची स्तुती करा!+

त्याच्या सैन्यांनो, त्याची स्तुती करा!+

 ३ सूर्याने आणि चंद्राने त्याची स्तुती करावी.

सर्व चमकणाऱ्‍या ताऱ्‍यांनो, त्याची स्तुती करा!+

 ४ सर्वात उंच आकाशांनो*

आणि आकाशांवरच्या जलाशयांनो, त्याची स्तुती करा!

 ५ त्या सर्वांनी यहोवाच्या नावाची स्तुती करावी

कारण त्याने आज्ञा दिली आणि ते निर्माण झाले.+

 ६ त्याने त्यांना सदासर्वकाळासाठी स्थिर केलंय;+

त्याने दिलेला आदेश कधीही रद्द होणार नाही.+

 ७ पृथ्वीवर यहोवाची स्तुती करा!

समुद्रात राहणाऱ्‍या महाकाय प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो,

 ८ विजांनो आणि गारांनो, हिम आणि घनदाट मेघांनो,

त्याच्या आज्ञेचं पालन करणाऱ्‍या वादळी वाऱ्‍यांनो,+

 ९ पर्वतांनो आणि सर्व टेकड्यांनो,+

फळं देणाऱ्‍या झाडांनो आणि सर्व देवदार वृक्षांनो,+

१० जंगली पशूंनो+ आणि पाळीव प्राण्यांनो,

जमिनीवर रांगणाऱ्‍या जिवांनो आणि आकाशात उडणाऱ्‍या पक्ष्यांनो,

११ पृथ्वीवरच्या राजांनो आणि सर्व राष्ट्रांनो,

अधिकाऱ्‍यांनो आणि पृथ्वीवरच्या सर्व न्यायाधीशांनो,+

१२ तरुणांनो आणि तरुणींनो,*

वृद्धांनो आणि लहान मुलांनो, तुम्ही सर्व त्याची स्तुती करा.

१३ त्यांनी यहोवाच्या नावाची स्तुती करावी,

कारण त्याचं नाव सर्वांपेक्षा महान आहे.+

त्याचं वैभव पृथ्वी आणि आकाशाहून उंच आहे.+

१४ आपल्या सर्व एकनिष्ठ सेवकांची स्तुती व्हावी;

इस्राएलच्या मुलांची, त्याला प्रिय असलेल्या लोकांची स्तुती व्हावी,

म्हणून तो आपल्या लोकांचं सामर्थ्य वाढवेल.*

याहची स्तुती करा!*

१४९ याहची स्तुती करा!*

यहोवासाठी एक नवीन गीत गा;+

त्याच्या एकनिष्ठ सेवकांच्या मंडळीत त्याची स्तुती करा.+

 २ इस्राएल आपल्या महान निर्माणकर्त्यामुळे आनंद करो;+

सीयोनची मुलं आपल्या राजामुळे हर्षित होवोत.

 ३ ते नाचत त्याच्या नावाची स्तुती करोत;+

ते डफ आणि वीणा वाजवून त्याचं गुणगान करोत.*+

 ४ कारण यहोवाला आपले लोक प्रिय आहेत.+

तो नम्र लोकांचं तारण करून त्यांचा गौरव करतो.+

 ५ देवाच्या एकनिष्ठ सेवकांनी आपल्या गौरवाबद्दल आनंद करावा;

त्यांनी आपल्या अंथरुणावर आनंदाने गावं.+

 ६ त्यांच्या ओठांवर देवाची स्तुतिगीतं असावीत

आणि त्यांच्या हातात दुधारी तलवार असावी,

 ७ म्हणजे ते राष्ट्रांचा सूड उगवू शकतील

आणि त्यांना शिक्षा देऊ शकतील;

 ८ त्यांच्या राजांना ते साखळ्यांनी बांधतील

आणि त्यांच्या शासकांना लोखंडी बेड्या घालतील.

 ९ त्या राष्ट्रांसाठी लिहून ठेवण्यात आलेला न्यायदंड, ते त्यांच्यावर बजावतील.+

देवाच्या सर्व एकनिष्ठ सेवकांना हा सन्मान मिळेल.

याहची स्तुती करा!*

१५० याहची स्तुती करा!*+

देवाच्या पवित्र मंदिरातून त्याची स्तुती करा.+

त्याच्या सामर्थ्याची साक्ष देणाऱ्‍या आकाशाखाली, त्याची स्तुती करा.+

 २ त्याच्या पराक्रमांबद्दल त्याची स्तुती करा.+

त्याच्या असीम वैभवाबद्दल त्याची स्तुती करा.+

 ३ शिंग फुंकून त्याची स्तुती करा.+

तंतुवाद्य आणि वीणा* वाजवून त्याची स्तुती करा.+

 ४ डफ+ वाजवून आणि फेर धरून नाचत त्याची स्तुती करा.

तंतुवाद्यं+ आणि बासरी+ वाजवून त्याची स्तुती करा.

 ५ खणखणत्या झांजांनी त्याची स्तुती करा.

झणझणत्या झांजांनी त्याची स्तुती करा.+

 ६ श्‍वास घेणारा प्रत्येक जीव याहची स्तुती करो.

याहची स्तुती करा!*+

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “ते हळू आवाजात वाचतो.”

किंवा “विचार करत आहेत?”

किंवा “त्याच्या ख्रिस्ताच्या.”

किंवा “आपसात चर्चा करतात.”

किंवा “सखोल समज दाखवा.”

किंवा “ताडन स्वीकारा.”

शब्दशः “मुका घ्या.”

शब्दशः “तो.”

किंवा “माझ्या जिवाबद्दल.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वाचवणारा.”

शब्दशः “मोकळी जागा तयार कर.”

किंवा “आपल्या एकनिष्ठ सेवकाला वेगळं करेल; स्वतःसाठी राखून ठेवेल.”

किंवा “नीतिमत्त्वाने.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “रक्‍तपात आणि फसवणूक करणाऱ्‍या माणसाची.”

किंवा “गोडगोड बोलतात.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दया.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “माझ्या जिवाची.”

किंवा “तुझी आठवण.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मानहानीमुळे.”

किंवा कदाचित, “जर कारण नसताना माझा विरोध करणाऱ्‍याला मी सोडून दिलं असेन.”

किंवा “हृदयांचं आणि गुरद्यांचं.”

किंवा “नावाच्या स्तुतीसाठी संगीत तयार करीन.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “स्वर्गाच्याही वरती तुझ्या वैभवाचं वर्णन केलं जातं.”

शब्दशः “स्वर्ग.”

किंवा “तू सर्वकाही त्याच्या अधीन केलंस.”

शब्दशः “रानातले पशू.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “संगीत रचीन.”

किंवा “उपजाऊ जमिनीचा.”

किंवा “उंच आश्रयस्थान.”

शब्दार्थसूची पाहा.

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “लोभी माणूस स्वतःला आशीर्वाद देतो.”

किंवा “डळमळणार नाही.”

किंवा “झुडपात.”

किंवा “मजबूत पंजांत.”

किंवा “वडील नसलेल्याला.”

किंवा “न्यायाचा पायाच.”

किंवा “त्याची सावध नजर.”

शब्दशः “पाश.” किंवा कदाचित, “पेटलेले कोळसे.”

किंवा “उष्ण.”

शब्दशः “त्याचा चेहरा पाहतील.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दुटप्पी.”

किंवा कदाचित, “जमिनीवर मांडलेली धातू गाळण्याची भट्टी.”

शब्दशः “आपला चेहरा लपवशील?”

शब्दशः “मरणात झोपी जाईन.”

किंवा “अक्कलशून्य.”

शब्दशः “पिढीसोबत.”

किंवा “खरेपणाने.”

किंवा “लज्जित करत नाही.”

शब्दशः “शपथ.”

किंवा “डगमगणार नाही.”

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, खोट्या दैवतांची.

शब्दशः “मोजून देण्यात आल्या आहेत.”

किंवा “मनातल्या खोल भावना.” शब्दशः “माझे गुरदे.”

किंवा “डगमगणार.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “माझ्या जिवाला कबरेत त्यागणार नाहीस.”

किंवा “खड्ड्यात.”

किंवा कदाचित, “कुजू देणार नाहीस.”

शब्दशः “तुझ्या चेहऱ्‍यासोबत.”

किंवा “सुख.”

किंवा “खाली वाकून ऐक.”

किंवा “मला झाक.”

किंवा “त्यांना चरबी चढली आहे.”

किंवा “माझ्या जिवाची.”

किंवा “जगाच्या व्यवस्थेतल्या.”

किंवा “तुझं स्वरूप.”

किंवा “माझा शक्‍तिशाली तारणकर्ता.” शब्दार्थसूचीत “शिंग” पाहा.

किंवा “उंच आश्रयस्थान.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पाण्याचे पाट.”

किंवा “मोकळ्या जागी.”

शब्दशः “शुद्धतेप्रमाणे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दुःखीकष्टी लोकांना.”

शब्दशः “गर्विष्ठ डोळे.”

किंवा “सांभाळतो.”

शब्दशः “गप्प करीन.”

किंवा “नावासाठी संगीत रचीन.”

किंवा “राजाला मोठे विजय मिळवून देतो.”

शब्दशः “बीज.”

किंवा “हाताची कार्यं.”

किंवा कदाचित, “मोजण्याची दोरी.”

किंवा “झोपण्याच्या खोलीतून.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “शुद्ध.”

किंवा “उत्कृष्ट.”

किंवा “बऱ्‍याच अपराधांपासून.”

किंवा “भेट म्हणून आणलेल्या अर्पणांची.”

शब्दशः “चरबी समजून.”

किंवा “त्याला विजय मिळवून देतो.”

किंवा कदाचित, “राजा.”

किंवा “मनातली इच्छा.”

किंवा “उत्कृष्ट.”

शब्दशः “दिवसांची लांबी.”

शब्दशः “चेहरा.”

किंवा “डगमगणार नाही.”

शब्दशः “धनुष्याच्या दोऱ्‍या.”

शब्दशः “त्यांच्या चेहऱ्‍यांवर.”

शब्दशः “गाऊ आणि संगीत रचू.”

कदाचित एक चाल किंवा संगीताची शैली.

किंवा “तू इस्राएलच्या स्तुतीमध्ये (स्तुतीवर) विराजमान आहेस.”

किंवा “ते लज्जित झाले नाहीत.”

किंवा “मी माणसांच्या दृष्टीत कलंक आहे.”

किंवा “गर्भाशयातून.”

शब्दशः “तुझ्यावर टाकण्यात आलंय.”

शब्दशः “हातापासून.”

शब्दशः “एकुलत्या एका.” हे त्याच्या जिवाला किंवा जीवनाला सूचित करतं.

शब्दशः “बीज.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “चेहरा लपवला नाही.”

शब्दशः “तुमचं हृदय जगो.”

शब्दशः “लठ्ठ.”

शब्दशः “एक बीज.”

किंवा “गवतात.”

किंवा कदाचित, “संथ पाण्याजवळ.”

शब्दशः “पायवाटांवर.”

किंवा “सांत्वन मिळतं.”

किंवा “माझ्या जीवनाची.” शपथ घेणारी व्यक्‍ती यहोवाच्या जीवनाची शपथ घेते, असं यावरून सूचित होतं.

किंवा “न्याय देईल.”

किंवा “उठा.”

किंवा “प्राचीन काळापासून असलेली.”

शब्दशः “न्यायाच्या.”

शब्दशः “बीज.”

किंवा “तुझा चेहरा माझ्याकडे वळव.”

शब्दशः “सोडव.”

किंवा “माझ्या मनातल्या खोल भावना.” शब्दशः “माझे गुरदे.”

शब्दशः “बसत.”

किंवा “जे स्वतःचं खरं रूप लपवतात त्यांच्यापासून.”

शब्दशः “बसत नाही.”

किंवा “रक्‍त सांडणाऱ्‍यांसोबत.”

शब्दशः “सोडव.”

शब्दशः “सभांमध्ये.”

किंवा “गड.”

किंवा “बघून मनन करण्याचं.”

किंवा “यहोवासाठी संगीत रचीन.”

शब्दशः “चेहरा लपवू नकोस.”

किंवा कदाचित, “जिवंतांच्या देशात मी यहोवाचा चांगुलपणा पाहीन, असा मला पूर्ण विश्‍वास आहे.”

किंवा “खड्ड्यात; खळग्यात.”

किंवा कदाचित, “त्याच्या पावित्र्याच्या गौरवामुळे.”

किंवा “यहोवाची उपासना.”

हे लबानोनच्या पर्वतरांगेला सूचित करतं.

किंवा “जन्म देतात.”

किंवा “महापुरावर.”

किंवा “ओढून काढलं.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “कबरेत.”

किंवा “त्याच्यासाठी संगीत रचा.”

शब्दशः “स्मारकाची.”

किंवा “अनुग्रह.”

किंवा “मी कधीच डगमगणार नाही.”

किंवा “तुझा अनुग्रह.”

शब्दशः “चेहरा लपवताच.”

किंवा “खड्ड्यात; खळग्यात.”

किंवा “खाली वाकून ऐक.”

किंवा “विश्‍वासू देवा.”

किंवा “माझ्या जिवाला.”

किंवा “मोकळ्या.”

किंवा “माझा जीव घेण्याचा.”

शब्दशः “माझे काळ.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “जिभांच्या भांडणांपासून.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “हाताचं.”

किंवा “दृष्टी लावून.”

किंवा “एकनिष्ठ प्रेमाच्या सावलीत ठेवतो; एकनिष्ठ प्रेमाने वेढतो.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “त्याच्यासाठी संगीत रचा.”

किंवा “त्याचं सगळं सैन्य.”

किंवा “विचार.”

किंवा “तारणासाठी.”

किंवा “त्यांचा जीव.”

शब्दशः “हे चाखून पाहा.”

किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहांचीही.”

किंवा “निराश असलेल्यांना.”

किंवा “संकटं.”

शब्दशः “सोडवतो.”

ही ढाल सहसा तिरंदाज वापरायचे.

किंवा “दोन पात्यांची कुऱ्‍हाड.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “माझ्या जिवाला.”

किंवा कदाचित, “अधर्मी थोड्याशा अन्‍नासाठी माझी थट्टा करतात.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहांपासून.”

शब्दशः “एकुलत्या एका.” हे त्याच्या जिवाला किंवा जीवनाला सूचित करतं.

किंवा “मनन करीन.”

शब्दशः “देवाच्या पर्वतांसारखं.”

किंवा “वाचवतोस.”

किंवा “पृथ्वीवर.”

किंवा “धीराने.”

किंवा कदाचित, “संतापू नकोस, कारण त्यामुळे वाईटच परिणाम होईल.”

शब्दशः “निर्दोष माणसांच्या दिवसांची.”

किंवा “कृपाळू.”

किंवा “स्थिर करतो.”

किंवा “भाकरीसाठी.”

किंवा “नीतिमान माणूस हळू आवाजात बुद्धीच्या गोष्टी बोलतो.”

किंवा “खरेपणाने चालणाऱ्‍याकडे.”

किंवा “हाताचं.”

शब्दशः “माझ्या शरीरात एकही निरोगी जागा नाही.”

शब्दशः “माझ्या हाडांमध्ये.”

शब्दशः “जिवंत.”

किंवा कदाचित, “पुष्कळ जण विनाकारण माझे शत्रू बनले आहेत.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “आपलं मुस्कट बांधीन.”

शब्दशः “गरम झालं.”

किंवा “उसासे टाकत होतो.”

किंवा “कमी काळाचं.”

शब्दशः “चार बोटांची रुंदी.”

शब्दशः “गोंगाट.”

किंवा “परक्या माणसासारखा.”

किंवा “धीराने वाट पाहिली.”

किंवा “खाली वाकून माझं ऐकलं.”

शब्दशः “माझ्या तोंडात एक नवीन गीत घातलं.”

किंवा “यांत तुला आनंद वाटला नाही.”

शब्दशः “पुस्तकाच्या गुंडाळीत.”

किंवा “करण्याची माझी इच्छा आहे.”

किंवा “इच्छेवर.”

किंवा “माझ्या जिवाला.”

किंवा “माझ्याविरुद्ध उठला आहे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मला.”

किंवा “मी.”

किंवा “हळूहळू.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “छोट्याशा डोंगरावर.”

किंवा कदाचित, “माझ्या हाडांचा चुराडा करत असल्यासारखे.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “विश्‍वासघातकी.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “माझा जीव.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “तुझ्या चेहऱ्‍याच्या प्रकाशाने.”

किंवा “महान तारण.”

किंवा “मिळावा असा आदेश दे.”

किंवा “त्यांच्या मोबदल्यात मिळणाऱ्‍या किमतीने.”

शब्दशः “म्हण.”

शब्दशः “चेहरा का लपवतोस?”

शब्दशः “सोडव.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “माझी कार्यं.”

किंवा “प्रती बनवणाऱ्‍याच्या; शास्त्र्याच्या.”

किंवा “यशाकडे.”

शब्दशः “तुला शिकवेल.”

शब्दशः “देव सदासर्वकाळ तुझं राजासन आहे.”

किंवा “सरळपणाचा.”

गण २४:६ इथली तळटीप पाहा.

निर्ग ३०:२४ इथली तळटीप पाहा.

ओफीर हे सर्वात उत्कृष्ट प्रतीचं सोनं मिळण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण होतं.

किंवा “भेट.”

शब्दशः “आतमध्ये.”

म्हणजे, नवरी. वचन १० पाहा.

शब्दशः “सोन्याच्या कोंदणांनी.”

किंवा कदाचित, “भरतकाम केलेले झगे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “उंच आश्रयस्थान.”

किंवा कदाचित, “ढाली.”

किंवा “वर चढतो.”

किंवा “मेंढ्याचं शिंग; कर्णा.”

किंवा “देवासाठी संगीत रचा.”

शब्दशः “ढाली.”

किंवा “उंच आश्रयस्थान.”

किंवा “ठरवून भेटले.”

किंवा “मनन.”

शब्दशः “मुली.”

किंवा “तटबंदीकडे.”

किंवा कदाचित, “आम्ही मरेपर्यंत.”

किंवा “जगाच्या व्यवस्थेत.”

किंवा “मनन.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “अपराध.”

किंवा “जीवनाच्या.”

किंवा “सुटकेचं.”

किंवा “खळगा.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “माझ्या जिवाला.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “हातातून.”

किंवा “आपल्या जिवाला.”

किंवा “शिक्षणाचा.”

शब्दशः “माझे शब्द मागे टाकून देतोस.”

किंवा कदाचित, “त्याच्यासोबत जातोस.”

किंवा “बदनामी करतोस.”

किंवा “मी सतत आपल्या पापाबद्दल विचार करतो.”

शब्दशः “फक्‍त तुझ्याविरुद्ध.”

शब्दशः “माझ्या पापापासून मला एजोबने शुद्ध कर.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “उत्सुक मनोवृत्तीने मला साहाय्य कर.”

किंवा “तुच्छ लेखणार नाहीस.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “गड.”

शब्दशः “त्याने आणलेल्या संकटांवर.”

किंवा “आश्रय घेतला.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “अविचारी.”

किंवा कदाचित, “घाबरण्यासाठी काही नव्हतं तिथे ते घाबरतील.”

शब्दशः “तुझ्याविरुद्ध छावणी करणाऱ्‍यांची.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “माझ्या बाजूने वाद कर.”

किंवा “ते देवाला आपल्या डोळ्यांपुढे ठेवत नाहीत.”

शब्दशः “शांत कर.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मी मदतीसाठी प्रार्थना करतो, तेव्हा माझ्यापासून तोंड फिरवू नकोस.”

शब्दशः “त्यांची जीभ दुभंगून टाक.”

किंवा “एक माणूस, माझ्या बरोबरीचा माणूस.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “कण्हत असतो.”

शब्दशः “मला सोडवेल.”

किंवा “माझ्या जिवाविरुद्ध.”

म्हणजे १३ व्या आणि १४ व्या वचनांत उल्लेख केलेला पूर्वीचा मित्र.

किंवा “अडखळू; डळमळू.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “कातडी पिशवीत.”

किंवा “माझ्या जिवाला.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “माझ्या जिवाने.”

किंवा “माझ्या जिवाला.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “तुझ्यासाठी संगीत रचीन.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “गर्भाशयापासूनच.”

किंवा “दुष्ट असतात.”

किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहांचे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “रक्‍तपात करणाऱ्‍या.”

किंवा “भुंकत.”

किंवा “उंच आश्रयस्थान.”

किंवा “भुंकत.”

किंवा “संगीत रचीन.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “तू ध्वज दिला आहेस.”

किंवा कदाचित, “त्याच्या पवित्र ठिकाणात.”

किंवा “खालचं मैदान.”

शब्दशः “किल्ला.”

किंवा कदाचित, “तटबंदीच्या शहरात.”

किंवा “खचून जाईल.”

किंवा “राहील.”

किंवा “नावासाठी संगीत रचीन.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “माझा जीव.”

किंवा “उंच आश्रयस्थान.”

किंवा कदाचित, “तो झुकलेल्या भिंतीसारखा, पडायला आलेल्या भिंतीसारखा असल्याप्रमाणे, तुम्ही सर्व जण.”

किंवा “माझ्या जिवा, शांतपणे वाट पाहा.”

किंवा “मी.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “मनन.”

किंवा “मला ठार मारायला.”

किंवा “बढाई मारेल.”

किंवा “ते दुष्टपणा करण्याचं एकमेकांना प्रोत्साहन देतात;”

किंवा “बढाई मारतील.”

शब्दशः “तो.”

शब्दशः “तो.”

शब्दशः “तो.”

शब्दशः “ओसंडून वाहायला लावतोस.”

शब्दशः “मुकुट घातला आहेस.”

शब्दशः “झिरपत आहेत.”

किंवा “खालच्या मैदानांवर.”

किंवा “नावासाठी संगीत रचा.”

किंवा “डळमळू.”

शब्दशः “आमच्या कंबरेवर.”

शब्दशः “आमच्या डोक्यावर”

किंवा “आदर करतील.”

किंवा “नावासाठी संगीत रचा.”

किंवा कदाचित, “ढगांवरून.”

“याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “वडील नसलेल्या मुलांचा.”

शब्दशः “न्यायाधीश.”

किंवा “बंडखोर.”

शब्दशः “लोकांच्या पुढे गेलास.”

शब्दशः “झिरपला.”

शब्दशः “वारसा.”

किंवा कदाचित, “मेंढवाड्यांजवळ.”

किंवा “पिवळट-हिरव्या.”

किंवा “जणू बर्फ पडला.”

किंवा “विशाल पर्वत.”

किंवा “देवाला जे आपलं निवासस्थान म्हणून हवं आहे.”

किंवा “दुष्ट मार्गाने चालत राहतात.”

किंवा “भेटवस्तू.”

किंवा कदाचित, “तुडवत.”

शब्दार्थसूचीत “पपायरस गवत” पाहा.

किंवा “मिसरमधून.”

किंवा कदाचित, “राजदूत येतील.”

किंवा “यहोवासाठी संगीत रचा.”

शब्दशः “ढगांत.”

शब्दशः “तुझ्या.”

किंवा “विनाकारण माझे शत्रू बनलेले.”

किंवा “माझ्या जिवाला.”

किंवा कदाचित, “जेव्हा मी रडलो आणि उपास केला.”

किंवा “खड्ड्यात.”

किंवा “मी पूर्णपणे खचून गेलोय.”

किंवा “विषारी वनस्पती.”

किंवा “तरण्या बैलाच्या.”

किंवा “खाली वाकून ऐक.”

किंवा “तू माझा भरवसा आहेस.”

किंवा “पोटातून.”

किंवा “माझ्या समजण्यापलीकडे.”

शब्दशः “हात.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तुझ्यासाठी संगीत रचीन.”

किंवा “विचार करेल; मनन करेल.”

शब्दशः “राजाच्या मुलाला.”

शब्दशः “न्याय करावा.”

शब्दशः “कोंब फुटतील.”

म्हणजे, फरात नदी.

किंवा “तो राज्य करेल.”

किंवा “बढाई मारणाऱ्‍यांचा.”

किंवा “पोट वाढलेलं असतं.”

किंवा “श्रीमंतीमुळे.”

शब्दशः “त्याचे.”

शब्दशः “तुझ्या मुलांच्या पिढीचा.”

शब्दशः “त्यांचं रूप तुच्छ लेखशील.”

शब्दशः “व्यभिचार करून तुला सोडून देणाऱ्‍यांचा.”

शब्दशः “गप्प करशील.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “तुझी मंडळी.”

किंवा “तुझ्या मंडळीच्या जागेत.”

किंवा “तुझ्या वस्त्राच्या घड्यांतून.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “ज्योतीला.”

किंवा “कबुतराचा.”

शब्दशः “विरघळले.”

शब्दशः “शिंग.”

शब्दशः “शिंग.”

किंवा “संगीत रचीन.”

शब्दशः “शिंगं.”

शब्दशः “शिंगं.”

किंवा “तू तेजस्वीपणे चमकतोस.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “सुन्‍न पडले.”

किंवा “माझ्या जिवाचं.”

किंवा “तंतुवाद्याचं संगीत.”

शब्दशः “उजवा हात.”

शब्दशः “हाताने.”

शब्दशः “हाताने.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “नियम.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “तयार नसलेल्या.”

किंवा “बांधासारखं.”

किंवा “आपल्या जिवासाठी अन्‍नाची.”

किंवा “देवाला आव्हान केलं.”

किंवा “ताकदवानांचं.”

किंवा “आपल्यासाठी सूड घेणारा.”

शब्दशः “झाकला.”

शब्दशः “हात.”

शब्दशः “सोडवलं.”

किंवा कदाचित, “तापाच्या.”

किंवा “आव्हान करत राहिले.”

किंवा “क्रोधित केलं.”

शब्दशः “त्याच्या कुमारींची प्रशंसा करण्यात आली नाही.”

शब्दशः “त्याने आपलं उपासनेचं ठिकाण उंच ठिकाणांसारखं बांधलं.”

म्हणजे, दावीदने.

शब्दशः “वारशावर.”

शब्दशः “झाक.”

शब्दशः “मृत्यूची मुलं.”

शब्दशः “हाताने.”

किंवा कदाचित, “मुक्‍त कर.”

किंवा कदाचित, “मधोमध.”

शब्दशः “प्रार्थनांविरुद्ध जळफळशील.”

किंवा “देवाने लावलेल्या देवदार वृक्षांना.”

म्हणजे, फरात नदी.

किंवा “द्राक्षवेलाची मुख्य फांदी.”

किंवा “मुलाला.”

शब्दार्थसूची पाहा.

चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.

किंवा “भाषा.”

शब्दशः “मेघगर्जनेच्या गुप्त ठिकाणातून.”

म्हणजे, “भांडण.”

शब्दशः “आपल्या इच्छेप्रमाणे चालले.”

शब्दशः “काळ.”

शब्दशः “त्याला.” म्हणजे, देवाच्या लोकांना.

किंवा “जे देवासारखे आहेत त्यांच्या.”

किंवा “न्याय करा.”

किंवा “देवासारखे.”

किंवा “आपली डोकी वर करतात.”

शब्दशः “लपवलेल्या लोकांविरुद्ध.”

शब्दशः “ते एकदिलाने विचारविनिमय करतात.”

किंवा “करार केला आहे.”

शब्दशः “हात बनले आहेत.”

किंवा “प्रधानांना.”

शब्दशः “भर.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मला मनापासून प्रिय आहे!”

किंवा कदाचित, “आणि उपदेशक स्वतःवर.”

किंवा कदाचित, “हे देवा, आमच्या ढालीकडे पाहा.”

शब्दशः “झाकली.”

किंवा “आम्हाला पुन्हा एकत्र कर.”

किंवा “समृद्धी.”

किंवा “खाली वाकून ऐक.”

किंवा “तुझ्या या सेवकाचा जीव.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

किंवा “एकाग्र मनाने.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “त्यांनी तुला आपल्यापुढे ठेवलं नाही.”

किंवा “कृपाळू.”

किंवा “पुरावा.”

हे कदाचित इजिप्तला सूचित करत असावं.

किंवा “माझ्यासाठी सर्व गोष्टींचा उगम तू आहेस.” शब्दशः “माझे सगळे झरे तुझ्यात आहेत.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “खाली वाकून ऐक.”

शब्दार्थसूची पाहा.

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “कबरेत.”

किंवा “शक्‍ती नसलेल्या माणसासारखा.”

किंवा कदाचित, “अचानक.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “टिकून.”

शब्दशः “बीज.”

हे कदाचित इजिप्तला किंवा तिथल्या फारोला सूचित करत असावं.

शब्दशः “शिंग.”

शब्दशः “शिंग.”

शब्दशः “बीज.”

किंवा “न्याय-निर्णयांप्रमाणे.”

शब्दशः “माझा विश्‍वासूपणा खोटा ठरू देणार नाही.”

शब्दशः “बीज.”

किंवा “दगडी आश्रय.”

शब्दशः “त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहेस.”

किंवा “उद्देशाशिवाय.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “आपला जीव.”

शब्दशः “उरावर घेऊन फिरावं लागतं.”

किंवा कदाचित, “आमचा आश्रय.”

किंवा “सर्वकाळापासून सर्वकाळापर्यंत.”

किंवा “तुला आमचे अपराध माहीत आहेत.”

किंवा “आमचं जीवन सरून जातं.”

किंवा “दीर्घ श्‍वासाप्रमाणे.”

किंवा “असामान्य ताकद असेल.”

किंवा “बुद्धीने भरलेलं हृदय.”

किंवा “स्थापित कर.”

किंवा “स्थापित कर.”

किंवा “तटबंदीसारखा.”

शब्दशः “प्रतिफळ.”

किंवा कदाचित, “गड; आश्रय.”

शब्दशः “तो मला जडून राहतो.”

किंवा “माझं नाव कबूल करतो.”

किंवा “माझ्याकडून मिळणारं तारण.”

किंवा “संगीत रचणं.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “शिंग.”

किंवा “भरभरून वाढतील.”

किंवा “केस पिकल्यावरही.”

किंवा “ती डळमळणार नाही.”

किंवा “वडील नसलेल्या.”

किंवा “माझ्या जिवाचा.”

किंवा “अस्वस्थ करणाऱ्‍या विचारांनी.”

किंवा “न्यायाधीशांचा.” शब्दशः “राजासनाचा.”

किंवा “नीतिमान माणसाच्या जिवावर.”

शब्दशः “निर्दोषाच्या रक्‍ताला ते दोषी (दुष्ट) ठरवतात.”

किंवा “उंच आश्रयस्थान.”

शब्दशः “त्यांना गप्प करेल.”

शब्दशः “त्यांना गप्प करेल.”

शब्दशः “त्याच्या चेहऱ्‍यासमोर.”

म्हणजे, “भांडण.”

म्हणजे, “परीक्षा घेणं; परीक्षा.”

किंवा “सन्मान.”

किंवा कदाचित, “त्याच्या पवित्रतेच्या वैभवामुळे.”

किंवा “उपासना करा.”

किंवा “उपजाऊ जमीन.”

किंवा “डळमळणार नाही.”

किंवा “लोकांची बाजू मांडेल.”

किंवा “आला आहे.”

किंवा “त्याची उपासना करा.”

शब्दशः “मुली.”

किंवा “सत्तेपासून.”

शब्दशः “स्मारकाची.”

किंवा “त्याला विजय मिळवून दिला आहे.”

किंवा “आपल्या देवाला मिळालेला विजय.”

किंवा “संगीत रचा.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “यहोवासाठी संगीत रचा.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “आला आहे.”

किंवा कदाचित, “मधोमध.”

किंवा “उपासना.”

शब्दशः “बदला घेतलास.”

किंवा “उपासना.”

किंवा “कबूल करा.”

किंवा कदाचित, “आपण स्वतः नाही.”

किंवा “तुझ्यासाठी संगीत रचीन.”

किंवा “खरेपणाने.”

शब्दशः “जाणून घेणार.”

किंवा “संपवून टाकीन.”

किंवा “खरेपणाने.”

शब्दशः “माझ्या डोळ्यांसमोर.”

किंवा “संपवून टाकीन.”

किंवा “दुर्बळ झालेल्या.”

किंवा “खाली वाकून ऐक.”

किंवा कदाचित, “मी अशक्‍त झालोय.”

किंवा “मला मूर्ख बनवणारे.”

किंवा “लांब होत जाणाऱ्‍या सावलीसारखं.”

किंवा “नाव.” शब्दशः “स्मारक.”

शब्दशः “निर्माण करणं.”

किंवा “कबरेतून.”

किंवा “कृपाळू.”

किंवा “प्रेमदयेने.”

शब्दशः “आणि त्याचं ठिकाण त्यापुढे त्याला ओळखत नाही.”

किंवा “सर्वकाळापासून सर्वकाळापर्यंत.”

शब्दशः “त्याच्या शब्दाचा आवाज ऐकणाऱ्‍या.”

किंवा “त्याच्या सर्वोच्च अधिकाराच्या सर्व ठिकाणांत.”

किंवा “सन्मानाचं.”

किंवा “छताची लाकडं.”

किंवा “डळमळणार नाही.”

खडकांमध्ये राहणारा सशासारखा एक प्राणी.

किंवा “आयाळ असलेले तरुण सिंह.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “त्यांतून धूर निघतो.”

किंवा “संगीत रचीन.”

किंवा कदाचित, “त्याच्याबद्दलचं माझं मनन त्याला आवडो.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “संगीत रचा.”

किंवा कदाचित, “कार्यांबद्दल बोला.”

किंवा “पृथ्वीवर लागू होतात.”

शब्दशः “त्याने आज्ञा दिलेला शब्द.”

शब्दशः “भाकरींची प्रत्येक सळई मोडली.” हे कदाचित भाकरी अडकवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या सळयांना सूचित करत असावं.

शब्दशः “पीडित केलं.”

हे इजिप्तच्या लोकांना सूचित करतं.

हे कदाचित मोशे आणि अहरोन यांना सूचित करत असावं.

किंवा “अग्निज्वाला.”

शब्दशः “त्यांची.”

एक लहानसा १८ सें.मी. (७ इंच) लांबीचा गुबगुबीत पक्षी, ज्याचं मांस खूप चविष्ट असतं.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “अनुग्रह.”

किंवा “मी बढाई मारू शकेन.”

किंवा “कार्यांचा अर्थ समजून घेतला नाही.”

किंवा “ओसाड प्रदेशातून.”

किंवा “उरला.”

किंवा “ओतीव.”

शब्दशः “त्याच्यासमोर खिंडारात उभा राहिला.”

म्हणजे, मेलेल्या लोकांना किंवा निर्जीव देवांना अर्पण केलेली बलिदानं.

म्हणजे, “भांडण.”

किंवा “शिकून घेतल्या.”

किंवा “त्यांनी इतर देवांसोबत वेश्‍येसारखी कृत्यं केली.”

शब्दशः “हाताखाली.”

किंवा “पस्तावा व्हायचा.”

किंवा “सर्वकाळापासून सर्वकाळापर्यंत.”

किंवा “असंच व्हावं.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “सोडवलं.”

किंवा “अधिकारातून.”

किंवा “सूर्याच्या उगवतीपासून आणि मावळतीपासून”

किंवा “त्यांचा जीव.”

किंवा “तहानलेल्या जिवाला.”

किंवा “भुकेल्या जिवाला.”

किंवा “उंचावर ठेवतो.” म्हणजे हात पोहोचणार नाही अशा ठिकाणी.

शब्दशः “माझा गौरवसुद्धा.”

किंवा “संगीत रचीन.”

किंवा कदाचित, “त्याच्या पवित्र ठिकाणात.”

किंवा “खालचं मैदान.”

शब्दशः “किल्ला.”

शब्दशः “त्याच्यावर.”

किंवा “दोष लावणारा.”

किंवा “दुष्ट.”

शब्दशः “पुत्र.”

शब्दशः “पुत्र.”

किंवा “लुबाडणूक करणारे त्याच्यासाठी सापळे रचोत.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

शब्दशः “तुझ्या शक्‍तीचा राजदंड.”

किंवा “तुझं सैन्य सज्ज होईल, त्या दिवशी.”

किंवा “त्याला पस्तावा होणार नाही.”

किंवा “संपूर्ण पृथ्वीच्या.”

शब्दशः “डोक्याला.”

हे पहिल्या वचनातल्या “माझ्या प्रभूला” सूचित करतं.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “कृपाळू.”

किंवा “भक्कम.”

शब्दशः “त्या.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “कृपाळू.”

किंवा “कृपाळूपणे.”

किंवा “ठाम असतं; स्थिर असतं.”

शब्दशः “शिंग.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “विराजमान आहे.”

किंवा कदाचित, “कचऱ्‍याच्या ढिगाऱ्‍यातून.”

शब्दशः “पुत्रांसोबत.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “आमचं काही नाही, हे यहोवा, आमचं काही नाही.”

शब्दशः “पुत्रांची.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा कदाचित, “यहोवा ऐकतो म्हणून मी प्रेम करतो.”

किंवा “ऐकायला खाली वाकतो.”

शब्दशः “माझ्या दिवसांत.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “कृपाळू.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “महान तारणाचा.”

किंवा “यहोवा गंभीर गोष्ट समजतो.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

“याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “मोकळ्या जागी.”

किंवा कदाचित, “माझी मदत करणाऱ्‍यांसोबत.”

किंवा कदाचित, “तू मला जोरात ढकललंस.”

किंवा “नीतिमानांचा विजय.”

किंवा “जे खरेपणाने वागतात.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “माझे मार्ग स्थिर झाले, तर किती बरं होईल!”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “आदेशांचं परीक्षण.”

किंवा “कायद्यांचं परीक्षण.”

शब्दशः “मार्ग.”

किंवा “कार्यांचं परीक्षण.”

किंवा “मला लज्जित.”

शब्दशः “आज्ञांच्या मार्गावर धावीन.”

किंवा कदाचित, “तू माझ्या मनाला आत्मविश्‍वास देतोस.”

किंवा “दिलेला शब्द.”

किंवा कदाचित, “जे तू आपलं भय मानणाऱ्‍यांना दिलंस.”

किंवा “शब्दाप्रमाणे.”

किंवा “वाट पाहतोय.”

किंवा “मोकळ्या जागी.”

किंवा “कायद्यांचं परीक्षण.”

किंवा “ज्यासाठी तू मला थांबायला लावलंस.”

किंवा “ज्या घरात मी विदेशी म्हणून राहिलो.”

किंवा “मी नकळत पाप करायचो.”

शब्दशः “असंवेदनशील, चरबीसारखं.”

किंवा “मी तुझ्या शब्दांसाठी थांबलो.”

किंवा कदाचित, “खोटं बोलून.”

किंवा “आदेशांचं परीक्षण.”

किंवा “तारणासाठी माझा जीव झुरतो.”

किंवा “मी तुझ्या शब्दांसाठी थांबतो.”

किंवा “चामड्याच्या पिशवीसारखा.”

म्हणजे, त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी.

शब्दशः “खूप रुंद आहेत.”

किंवा “त्याचं परीक्षण.”

किंवा “स्मरण-सूचनांचं परीक्षण.”

शब्दशः “मी स्वेच्छेने दिलेल्या माझ्या तोंडाच्या अर्पणांचा.”

किंवा “कायमची संपत्ती.”

शब्दशः “माझं हृदय वळवलं आहे.”

किंवा “जे पूर्ण मनाने देवाची उपासना करत नाहीत अशा; विभाजित मनाच्या.”

किंवा “मी तुझ्या शब्दांची वाट पाहतो.”

किंवा “आशेला लज्जित.”

किंवा “आदेश.”

शब्दशः “धापा टाकतो.”

किंवा “स्थिर कर.”

शब्दशः “सोडव.”

किंवा “पहाटेच्या संधिप्रकाशात.”

किंवा “मी तुझ्या शब्दांसाठी थांबतो.”

किंवा “शब्दांचं परीक्षण.”

किंवा “अश्‍लील वर्तन.”

किंवा “माझा खटला चालव.”

किंवा “तुझ्या शब्दांप्रमाणे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “माझा जीव.”

किंवा “डळमळू.”

“याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “स्मरण-सूचनेप्रमाणे.”

किंवा “पुत्र.”

हे कदाचित मुलांच्या वडिलांना सूचित करत असावं.

हे कदाचित मुलांना सूचित करत असावं.

किंवा “अपराधांचा हिशोब ठेवला असतास.”

“याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “महान मंडप.”

किंवा “उपासना मंडपाबद्दल.”

किंवा “त्याच्या महान उपासना मंडपात.”

शब्दशः “तुझ्या पोटच्या फळाला.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “शिंग.”

किंवा कदाचित, “पवित्र ठिकाणात.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “नावासाठी संगीत रचा.”

किंवा “मौल्यवान संपत्ती.”

किंवा “वाफा.”

किंवा कदाचित, “कालवे तयार करतो.”

किंवा “नाव.” शब्दशः “स्मारक.”

किंवा “लोकांच्या बाजूने वाद करेल.”

किंवा “सेवकांबद्दल पस्तावा वाटेल.”

किंवा “समजबुद्धीने.”

शब्दशः “तुकडे केले.”

हे बाबेलला सूचित करतं.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “वाळून जावो.”

किंवा कदाचित, “इतर देवांना झुगारून मी तुझ्यासाठी संगीत तयार करीन.”

किंवा “पवित्र ठिकाणाकडे.”

किंवा कदाचित, “तू तुझे शब्द तुझ्या नावाहूनही महान केले आहेत.”

शब्दशः “दुरून ओळखतो.”

शब्दशः “मापतोस.”

किंवा “माझ्यासाठी खूपच अद्‌भुत.”

किंवा “माझ्या मोजण्यापलीकडे आहे.”

शब्दार्थसूची पाहा.

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “गुरदे.”

किंवा “उदरात.”

शब्दशः “विणला जात होतो.”

शब्दशः “मी अजूनही तुझ्यासोबत आहे.”

किंवा “रक्‍तपाताचे दोषी.”

किंवा “स्वतःच्या कल्पनेप्रमाणे.”

किंवा “मला अस्वस्थ करणारे विचार.”

किंवा “पाणी असलेल्या खड्ड्यांत.”

किंवा “देशात.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “धैर्य.”

शब्दशः “ओळखत नाही.”

किंवा “माझ्या जिवाची.”

शब्दशः “माझा वाटा.”

किंवा “धैर्य.”

किंवा “कार्यांचं परीक्षण.”

किंवा “खड्ड्यात.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “सरळपणाच्या देशात.”

किंवा “माझा जीव.”

शब्दशः “गप्प कर.”

किंवा “माझ्या जिवाचा.”

किंवा “उंच आश्रयस्थान.”

किंवा “त्याचे दिवस.”

किंवा “वाकव.”

किंवा “हातून.”

किंवा “संगीत रचीन.”

किंवा “राजांचं तारण करतोस.”

किंवा “समजण्यापलीकडे.”

किंवा “सामर्थ्याबद्दल.”

किंवा “कृपाळू.”

किंवा “खऱ्‍या मनाने.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “संगीत तयार करीन.”

किंवा “अधिकाऱ्‍यांवर.”

शब्दशः “बांधलेल्यांची.”

किंवा “वडील नसलेल्या मुलांना.”

किंवा “दुष्टांच्या मार्गात तो अडथळे आणतो.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “देवासाठी संगीत रचणं.”

किंवा “समजबुद्धी.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “बर्फ.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

शब्दशः “आकाशांच्या आकाशांनो.”

शब्दशः “कुमारींनो.”

शब्दशः “शिंग उंचावेल.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “संगीत रचोत.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा