ईयोब
१ ऊस देशात ईयोब*+ नावाचा एक माणूस राहायचा. तो सरळ मार्गाने आणि खरेपणाने चालणारा होता.*+ तो देवाला भिऊन वागायचा आणि वाईट गोष्टींचा द्वेष करायचा.+ २ त्याला सात मुलं आणि तीन मुली होत्या. ३ त्याच्याकडे ७,००० मेंढरं, ३,००० उंट, १,००० गुरंढोरं* आणि ५०० गाढवं* होती. त्याच्याकडे बरेच नोकरचाकरही होते. त्यामुळे, तो पूर्वेकडच्या लोकांमधला सर्वात श्रीमंत माणूस होता.
४ त्याच्या मुलांपैकी प्रत्येक जण आपल्या ठरलेल्या दिवशी घरी* मेजवानी ठेवायचा. ते त्यांच्या तिन्ही बहिणींनाही आपल्यासोबत खायला-प्यायला बोलवायचे. ५ त्या सगळ्यांच्या घरी मेजवानी झाल्यावर ईयोब त्यांना शुद्ध करण्यासाठी आपल्याकडे बोलावून घ्यायचा. मग तो पहाटे उठून त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी होमार्पणं द्यायचा.+ ईयोब नेहमी असंच करायचा. कारण तो म्हणायचा: “कदाचित माझ्या मुलांनी पाप केलं असेल आणि मनात देवाला शाप दिला असेल.”+
६ मग एक दिवशी सगळे स्वर्गदूत*+ यहोवासमोर* आले+ आणि सैतानही+ त्यांच्यासोबत आला.+
७ तेव्हा यहोवाने सैतानाला विचारलं: “तू कुठून आलास?” सैतानाने यहोवाला उत्तर दिलं: “मी पृथ्वीवर इकडे-तिकडे हिंडून फिरून आलो.”+ ८ मग यहोवा सैतानाला म्हणाला: “माझा सेवक ईयोब याच्याकडे तू लक्ष दिलंस का?* पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो सरळ मार्गाने आणि खरेपणाने चालणारा आहे.*+ तो देवाला भिऊन वागतो आणि वाईट गोष्टींचा द्वेष करतो.” ९ तेव्हा सैतान यहोवाला म्हणाला: “ईयोब उगाच देवाला भिऊन वागतो का?+ १० त्याला, त्याच्या घराला आणि त्याच्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याभोवती तू कुंपण घातलं आहेस ना?+ तू त्याच्या सर्व कामांवर आशीर्वाद दिला आहेस+ आणि सबंध देशात त्याची गुरंढोरं वाढत आहेत. ११ पण आता तू आपला हात पुढे करून त्याचं सर्वकाही काढून घे. मग पाहा, तो नक्की तुझ्या तोंडावर तुझी निंदा करेल.” १२ यावर यहोवा सैतानाला म्हणाला: “पाहा! त्याच्याकडे असलेलं सर्वकाही तुझ्या हातात आहे.* फक्त त्याच्या शरीराला धक्का लावू नकोस!” तेव्हा सैतान यहोवाच्या समोरून* निघून गेला.+
१३ मग एक दिवशी ईयोबची मुलं आणि त्याच्या मुली, हे सर्व त्यांच्या सगळ्यात मोठ्या भावाच्या घरी मेजवानी करत आणि द्राक्षारस पीत होते.+ १४ तेवढ्यात एक माणूस ईयोबकडे ही बातमी घेऊन आला: “गुरं नांगरणी करत होती आणि बाजूला गाढवं चरत होती, १५ तेव्हा शबाई लोकांनी हल्ला केला आणि ते त्यांना घेऊन गेले. त्यांनी सर्व सेवकांना तलवारीने मारून टाकलं. मी एकटाच वाचलो आणि तुम्हाला हे सांगायला आलो.”
१६ तो हे सांगतच होता, इतक्यात आणखी एक जण आला आणि म्हणाला: “आकाशातून देवाची आग* आली आणि तिने मेंढरांना आणि सेवकांना भस्म करून टाकलं! मी एकटाच वाचलो आणि तुम्हाला हे सांगायला आलो.”
१७ तो हे सांगतच होता, इतक्यात आणखी एक जण आला आणि म्हणाला: “खास्द्यांनी+ तीन गट करून उंटांवर हल्ला केला आणि त्यांना पळवून नेलं. त्यांनी सेवकांनाही तलवारीने मारून टाकलं. मी एकटाच वाचलो आणि तुम्हाला हे सांगायला आलो.”
१८ तो हे सांगतच होता, इतक्यात आणखी एक जण आला आणि म्हणाला: “तुमची मुलं आपल्या मोठ्या भावाच्या घरी मेजवानी करत आणि द्राक्षारस पीत होती; १९ तेव्हा अचानक ओसाड रानातून जोराचं वादळ आलं. घराला चारही बाजूंनी वादळाचा तडाखा बसल्यामुळे, ते तुमच्या मुलांवर कोसळलं आणि ती सर्व मरून गेली. मी एकटाच वाचलो आणि तुम्हाला हे सांगायला आलो.”
२० हे ऐकल्यावर ईयोब उठून उभा राहिला आणि त्याने आपला झगा फाडला. त्याने आपल्या डोक्याचं मुंडण केलं; मग तो जमिनीवर पालथा पडला आणि नमन करून २१ म्हणाला:
“मी माझ्या आईच्या पोटातून उघडाच आलो,
आणि उघडाच परत जाईन.+
यहोवाने दिलं+ आणि यहोवानेच परत घेतलं.
यहोवाच्या नावाची स्तुती होत राहो.”
२२ इतकं सर्व होऊनही, ईयोबने पाप केलं नाही किंवा चुकीचं काही केल्याचा देवावर आरोप लावला नाही.
२ मग एक दिवशी सगळे स्वर्गदूत*+ यहोवासमोर आले+ आणि त्यांच्यासोबत सैतानही यहोवासमोर आला.+
२ तेव्हा यहोवाने सैतानाला विचारलं: “तू कुठून आलास?” सैतानाने यहोवाला उत्तर दिलं: “मी पृथ्वीवर इकडे-तिकडे हिंडून फिरून आलो.”+ ३ मग यहोवा सैतानाला म्हणाला: “माझा सेवक ईयोब याच्याकडे तू लक्ष दिलंस का?* पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो सरळ मार्गाने आणि खरेपणाने चालणारा आहे.*+ तो देवाला भिऊन वागतो आणि वाईट गोष्टींचा द्वेष करतो. तू विनाकारण त्याचा नाश करण्यासाठी* मला त्याच्याविरुद्ध भडकवत आहेस,+ पण त्याने अजूनही आपला खरेपणा सोडलेला नाही.”+ ४ पण सैतान यहोवाला म्हणाला: “त्वचेबद्दल त्वचा. माणूस आपल्या जिवाच्या बदल्यात आपल्याकडे असलेलं सर्वकाही देईल. ५ पण आता तू आपला हात पुढे करून त्याच्या शरीराला इजा कर, मग पाहा, तो नक्की तुझ्या तोंडावर तुझी निंदा करेल.”+
६ म्हणून यहोवा सैतानाला म्हणाला: “पाहा! तो तुझ्या हातात आहे.* फक्त त्याचा जीव घेऊ नको!” ७ तेव्हा सैतान यहोवाच्या समोरून* निघून गेला आणि त्याने ईयोबला पायापासून डोक्यापर्यंत भयंकर फोडांनी+ पीडित केलं. ८ तेव्हा ईयोबने अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो राखेत जाऊन बसला.+
९ शेवटी त्याची बायको त्याला म्हणाली: “तुम्ही अजूनही आपला खरेपणा धरून ठेवणार आहात का? देवाची निंदा करा आणि मरा!” १० पण तो तिला म्हणाला: “तू मूर्ख बायकांसारखी बोलत आहेस. आपण खऱ्या देवाकडून फक्त चांगलं तेच घ्यायचं आणि वाईट घ्यायचं नाही का?”+ इतकं सर्व होऊनही ईयोबने आपल्या ओठांनी पाप केलं नाही.+
११ ईयोबवर आलेल्या सर्व संकटांबद्दल त्याच्या तीन मित्रांनी* ऐकलं. तेव्हा ते, म्हणजे अलीफज+ तेमानी, बिल्दद+ शूही+ आणि सोफर+ नामाथी आपापल्या ठिकाणाहून निघाले. त्यांनी ईयोबकडे जाऊन त्याला सहानुभूती दाखवण्यासाठी आणि त्याचं सांत्वन करण्यासाठी एकत्र भेटायचं ठरवलं. १२ जेव्हा त्यांनी त्याला दुरून पाहिलं, तेव्हा त्यांनी त्याला ओळखलं नाही. ते मोठमोठ्याने रडू लागले आणि त्यांनी आपले कपडे फाडले. त्यांनी हवेत धूळ उडवली आणि आपल्या डोक्यावरही धूळ टाकली.+ १३ मग ते त्याच्यासोबत सात दिवस आणि सात रात्री जमिनीवर बसले. त्याचं भयंकर दुःख पाहून+ कोणीही त्याच्याशी एक शब्दसुद्धा बोललं नाही.
३ त्यानंतर ईयोबने बोलायला सुरुवात केली आणि आपल्या जन्माच्या दिवसाला तो शाप देऊ लागला.*+ २ ईयोब म्हणाला:
३ “माझा जन्म झाला तो दिवस नाहीसा होवो,+
‘पुरुष गर्भ राहिला आहे!’ असं म्हणण्यात आलं ती रात्र नष्ट होवो.
४ तो दिवस अंधारात बुडो.
स्वर्गातल्या देवाला त्याचं स्मरण न राहो;
त्या दिवसावर प्रकाशाचा एकही किरण न पडो.
५ दाट काळोख* त्यावर हक्क सांगो.
घनदाट ढगाचं सावट त्यावर येवो.
त्याचा प्रकाश भयानक अंधारात गडप होवो.
६ काळाकुट्ट अंधार त्या रात्रीला काबीज करो;+
वर्षाच्या दिवसांत तो दिवस आनंदी न होवो,
कोणत्याही महिन्यात त्याला मोजलं न जावो.
७ खरंच! ती रात्र निष्फळ ठरो;
तिच्यात आनंदाचा स्वर ऐकू न येवो.
९ तिच्या पहाटेच्या चांदण्या अंधकारमय होवोत.
ती व्यर्थच उजेडाची वाट पाहत राहो,
सूर्योदयाची किरणं तिला न दिसोत.
११ मी जन्मताच का मेलो नाही?
आईच्या पोटातून निघताच माझा जीव का गेला नाही?+
१२ माझ्या आईने मला मांडीवर का घेतलं?
तिने मला दूध का पाजलं?
१४ ज्यांनी बांधलेल्या इमारती आज ओसाड पडल्या आहेत,*
अशा राजांसोबत आणि त्यांच्या मंत्र्यांसोबत मी असतो.
१५ किंवा, ज्यांच्याजवळ भरपूर सोनं होतं,
ज्यांचे महाल चांदीने भरले होते, अशा राजकुमारांसोबत मी असतो.
१६ मी अकाली पडलेल्या गुप्त गर्भासारखा;
कधीच प्रकाश न पाहिलेल्या बाळासारखा का झालो नाही?
१७ तिथे तर दुष्टांनाही त्रासातून सुटका मिळते;
तिथे थकलेल्यांना विश्रांती मिळते.+
१८ तिथे सगळेच कैदी निश्चिंत असतात;
त्यांना कोणीही बळजबरीने कामाला लावत नाही;
१९ तिथे लहानमोठे सगळे सारखेच असतात,+
तिथे गुलामाला आपल्या मालकापासून स्वातंत्र्य मिळतं.
२० देव दुःखी माणसाला प्रकाश का दाखवतो?
दुःखाने व्याकूळ असलेल्यांना जीवन का देतो?+
२१ जे मृत्यूची वाट पाहतात त्यांना मृत्यू का येत नाही?+
ते गुप्त खजिन्यासारखा त्याचा शोध घेतात,
२२ मृत्यू येतो तेव्हा त्यांना आनंद होतो,
ते मोठा आनंद साजरा करतात.
२३ ज्याला देवाने स्वतः कुंपण घालून कोंडलं आहे,
अशा वाट हरवलेल्या माणसाला तो प्रकाश का दाखवतो?+
२५ ज्याची मला भीती होती तेच माझ्या बाबतीत घडलं,
ज्या संकटाचं मला भय होतं तेच माझ्यावर कोसळलं.
२६ मला जराही शांती, स्वस्थता किंवा विश्राम मिळाला नाही,
आणि तरीही माझ्या वाट्याला दुःखं येतच राहतात.”
४ मग अलीफज+ तेमानी याने उत्तर दिलं:
२ “कोणी तुला काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर तू वैतागणार तर नाहीस?
कारण आता मला बोलल्याशिवाय राहवत नाही.
३ हे खरंय की तू बऱ्याच जणांना शिकवलंस
आणि तू दुर्बळांना धीर द्यायचास;
४ अडखळणाऱ्यांना तुझ्या शब्दांनी दिलासा मिळायचा,
आणि पडायच्या मार्गावर असलेल्यांना* तू सावरायचास.
५ पण तीच वेळ तुझ्यावर आली तेव्हा तू खचून गेलास;*
संकट तुझ्यावर येताच तू घाबरून गेलास.
६ देवावरच्या श्रद्धेमुळे तुला हिंमत मिळत नाही का?
तुझ्या खरेपणामुळे+ तुला आशा मिळत नाही का?
७ विचार कर, निर्दोष माणसाचा कधी नाश झाला आहे का?
किंवा सरळ मार्गाने चालणारे कधी नाहीसे झालेत का?
८ मी तर हेच पाहिलंय, की जे वाइटाची नांगरणी* करतात
आणि जे त्रासाची पेरणी करतात, ते त्याचीच कापणी करतील.
९ देवाच्या श्वासाने त्यांचा नाश होईल,
आणि त्याच्या क्रोधाच्या फुंकराने त्यांचा शेवट होईल.
१० सिंह डरकाळी फोडतो, आणि तरुण सिंह गुरगुरतो,
पण ताकदवान सिंहांचेही* दात तुटतात.
११ शिकार न मिळाल्यामुळे सिंह मरून जातो,
आणि त्याच्या छाव्यांची पांगापांग होते.
१२ एकदा कोणीतरी एकांतात मला एक गोष्ट सांगितली,
त्या गोष्टीची कुजबुज माझ्या कानावर आली.
१३ रात्री लोक गाढ झोपेत असताना,
मला दृष्टान्त दिसले आणि माझ्या विचारांनी मला बेचैन केलं.
१४ मी भीतीने थरथर कापू लागलो,
आणि माझी सगळी हाडं लटपटू लागली.
१५ काहीतरी* माझ्या चेहऱ्यावरून गेलं;
माझ्या अंगावर काटा उभा राहिला.
१६ मग ते एकाजागी थांबलं,
ते काय होतं हे मला ओळखता आलं नाही;
फक्त एक आकृती मला दिसत होती.
सगळीकडे शुकशुकाट होता. मग मला एक आवाज ऐकू आला:
१७ ‘नाशवंत माणूस देवापेक्षा नीतिमान असू शकतो का?
तो आपल्या निर्माणकर्त्यापेक्षा शुद्ध असू शकतो का?’
१८ बघ, देवाचा त्याच्या सेवकांवर भरवसा नाही,
तो तर त्याच्या स्वर्गदूतांच्याही चुका काढतो.
१९ मग मातीच्या घरात राहणाऱ्यांबद्दल काय बोलायचं!
त्यांचा पाया तर धुळीत आहे+
आणि ते किड्यांसारखे* सहज चिरडले जातात.
२० सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पूर्णपणे चिरडले जातात.
ते कायमचे नाहीसे होतात, तरी कोणाच्या लक्षात येत नाही.
२१ ते दोरी काढून घेतलेल्या तंबूसारखे नाहीत का?
मरेपर्यंत त्यांना शहाणपण* येत नाही.
५ जरा हाक मारून पाहा! कोणी उत्तर देतं का?
पवित्र जनांपैकी* तू कोणाला मदत मागशील?
२ कारण मूर्खाच्या रागामुळे त्याच्यावर मृत्यू ओढवतो,
आणि भोळ्याच्या मनातला हेवा त्याचा जीव घेतो.
३ मी मूर्खाची भरभराट होताना पाहिली आहे,
पण अचानक त्याच्या घराला शाप लागतो.
४ त्याच्या मुलांना संरक्षण मिळत नाही;
शहराच्या फाटकांजवळ त्यांना चिरडलं जातं,+ पण कोणीही त्यांना वाचवत नाही.
५ त्याने कापणी केलेलं पीक उपाशी माणूस खातो,
तो काट्या-कुसळांतूनही धान्य काढून नेतो,
आणि त्यांची संपत्ती बळकावली जाते.
६ कारण संकटं काही धुळीतून उगवत नाहीत,
आणि विपत्ती काही जमिनीतून निघत नाही.
७ आगीतून ठिणग्या वर उडणारच,
तसंच, माणसाच्या जीवनात संकटं ही येणारच.
८ पण मी तर देवाकडे याचना केली असती,
मी माझा वाद देवासमोर ठेवला असता.
९ तो महान आणि गूढ गोष्टी घडवून आणतो,
त्याची अद्भुत कार्यं मोजण्यापलीकडे आहेत.
१० तो पृथ्वीवर पाऊस पाडतो
आणि शेतांना पाणी पुरवतो.
११ तो गरिबाला वर आणतो,
तो निराश झालेल्याचं तारण करतो.
१२ तो धूर्त लोकांचे कट हाणून पाडतो,
तो त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देत नाही.
१३ तो बुद्धिमानांना त्यांच्याच चलाखीत पकडतो,+
त्यामुळे त्या धूर्तांचे बेत निष्फळ होतात.
१४ दिवसाढवळ्या त्यांना अंधार वेढतो,
आणि भर दुपारी ते रात्र असल्याप्रमाणे चाचपडतात.
१५ तो गरिबांना बलवानांच्या हातून सोडवतो,
ज्यांच्या तोंडात तलवार आहे, त्यांच्यापासून तो त्यांचं रक्षण करतो.
१६ म्हणून दीनदुबळ्यांना आशा आहे,
पण दुष्टांचं तोंड बंद होतं.
१७ पाहा! देव ज्याला ताडन देतो तो सुखी आहे;
म्हणून सर्वशक्तिमान देवाची शिकवण कधीही नाकारू नकोस!
१८ कारण तो जखम करतो, पण तिला पट्टीही बांधतो;
तो घाव करतो, पण आपल्याच हातांनी बरंही करतो.
१९ तो तुला सहा संकटांपासून वाचवेल,
आणि सातव्यानेही तुला काही नुकसान होणार नाही.
२० तो तुला दुष्काळात मृत्यूपासून;
आणि युद्धात तलवारीच्या धारेपासून सोडवेल.
२१ तू जिभेच्या तडाख्यापासून सुरक्षित राहशील,+
आणि विनाश येईल तेव्हा तुला त्याची भीती वाटणार नाही.
२२ तू विध्वंसाला आणि उपासमारीला हसशील,
आणि पृथ्वीवरच्या हिंस्र प्राण्यांना तू भिणार नाहीस.
२३ शेतातले दगडगोटे तुला इजा करणार नाहीत,*
आणि रानातले जंगली पशू तुझ्याशी प्रेमाने वागतील.
२४ तुझा तंबू सुरक्षित आहे याची तुला खातरी असेल,
तू आपल्या कुरणाची* पाहणी करशील,
तेव्हा कळपातला एकही प्राणी कमी झालेला नसेल.
२५ तुला पुष्कळ मुलंबाळं होतील,
जमिनीतून उगवणाऱ्या गवतासारखे तुझे भरपूर वंशज होतील.
२६ कापणीच्या वेळी गोळा केल्या जाणाऱ्या धान्याच्या पेंढ्यांसारखा,
तू कबरेत जाईपर्यंत सुदृढ असशील.
२७ पाहा! आम्ही या गोष्टी पारखल्या आहेत आणि त्या खऱ्या आहेत.
म्हणून तू ऐक आणि त्या मान्य कर.”
६ मग ईयोबने उत्तर दिलं:
२ “जर कोणी माझ्या दुःखाचं+ वजन करून पाहिलं;
माझं संकट तराजूत तोलून पाहिलं,
३ तर ते समुद्रातल्या वाळूपेक्षाही जड असेल.
म्हणून मी वेड्या माणसासारखा बडबडलो.*+
४ कारण सर्वशक्तिमान देवाचे बाण माझ्या शरीरात रुतले आहेत,
त्यांचं विष माझ्या सगळ्या शरीरात पसरत आहे;+
देवाकडून आलेल्या संकटांनी माझ्यावर आक्रमण केलं आहे.
५ रानगाढवाला+ गवत मिळालं तर ते कशाला ओरडेल?
किंवा बैलाला चारा मिळाला तर तो कशासाठी हंबरडा फोडेल?
६ बेचव अन्न मीठ न घालता कोण खाईल?
किंवा चव नसलेला झाडाचा रस कोण आवडीने पिईल?
७ मी अशा गोष्टींना हातही लावत नाही.
त्या मला नासलेल्या अन्नासारख्या वाटतात.
८ देवाने माझी विनंती मान्य केली असती
आणि माझी इच्छा पूर्ण केली असती,
तर किती बरं झालं असतं!
९ देवाने मला चिरडून टाकलं असतं,
आणि त्याचा हात पुढे करून मला मारून टाकलं असतं,
तर किती बरं झालं असतं!+
१० कारण त्यामुळे माझी दुःखातून सुटका झाली असती;
भयंकर वेदना होऊनही मी आनंदाने मृत्यूला कवटाळलं असतं,
कारण पवित्र देवाचे+ शब्द मी कधीही नाकारले नाहीत.
११ आणखी वाट पाहण्याची ताकद मी कुठून आणू?+
आता माझ्यासाठी उरलंच काय आहे, की मी आणखी जगू?
१२ मी काय दगडाचा बनलोय?
की, माझं शरीर तांब्याचं आहे?
१३ मी अगदी असाहाय्य झालोय.
मला अगदी निराधार करून टाकण्यात आलंय.
१४ जो आपल्या मित्राला एकनिष्ठ प्रेम दाखवत नाही+
तो सर्वशक्तिमान देवाचं भय मानण्याचं सोडून देतो.+
१५ माझे स्वतःचे भाऊ* हिवाळ्यातल्या ओढ्यासारखे धोकेबाज+ निघाले आहेत,
हिवाळ्यातल्या कोरड्या पडणाऱ्या ओढ्यांसारखे ते आहेत.
१६ वितळणाऱ्या बर्फामुळे आणि हिमामुळे,
ते ओढे गढूळ झाले आहेत.
१७ पण काही काळाने ते कोरडे पडतात आणि नाहीसे होतात;
उष्णता वाढल्यावर ते सुकून जातात.
१८ ते वळसे घेत वाहत राहतात;
वाळवंटात वाहत जाऊन ते दिसेनासे होतात.
२० त्यांच्यावर विनाकारण भरवसा ठेवल्यामुळे त्यांची फजिती होते;
तिथे येऊन फक्त निराशा त्यांच्या पदरी पडते.
२२ ‘मला अमुक द्या,’ असं मी तुम्हाला म्हणालो का?
किंवा तुमच्या दौलतीतून मला काही भेट देण्याची विनंती केली का?
२३ तुम्ही एखाद्या शत्रूपासून माझं संरक्षण करावं;
किंवा जुलूम करणाऱ्यांपासून मला वाचवावं,* अशी मी अपेक्षा केली का?
२४ मी काय केलंय ते सांगा, मी शांतपणे तुमचं ऐकीन;+
माझं काय चुकलं हे मला समजावून सांगा.
२५ प्रामाणिक शब्द मनावर घाव करत नाहीत!+
पण तुमच्या ताडनाचा काय फायदा?+
२६ तुम्ही मला शब्दांत पकडण्याच्या प्रयत्नात आहात का?
हे तर वाऱ्यासोबत विरून जाणारे; एका असाहाय्य माणसाचे बोल आहेत.+
२८ म्हणून आता माझ्याकडे निरखून पाहा.
मी तुमच्या तोंडावर खोटं कसं बोलीन?
२९ कृपा करून पुन्हा विचार करा; मला विनाकारण दोषी ठरवू नका.
हो, पुन्हा विचार करा, कारण मी अजूनही नीतिमान आहे.
३० मी खोटं बोलतोय का?
काही चुकीचं असतं, तर माझ्या जिभेला ते जाणवलं नसतं का?
७ पृथ्वीवर माणसाचं जीवन सक्तीच्या मजुरीपेक्षा काय वेगळं आहे?
त्याचं आयुष्य मजुरासारखंच नाही का?+
२ गुलामासारखा तो सावलीची आस धरतो,
मजुरासारखा आपल्या मजुरीची वाट पाहतो.+
३ तसंच, मलाही व्यर्थतेचे कित्येक महिने नेमून देण्यात आले आहेत.
आणि दुःखाच्या कित्येक रात्री मला मोजून देण्यात आल्या आहेत.+
४ मी बिछान्यावर पडतो, तेव्हा मला वाटतं, ‘मी कधी उठेन?’+
रात्र सरत जाते, तसा मी पहाटेपर्यंत बेचैन होऊन कूस बदलत राहतो.
८ आज जे मला पाहतात, त्यांना मी पुन्हा दिसणार नाही;
तुझी नजर मला शोधेल, पण मी नसेन.+
११ म्हणूनच मी माझं तोंड आवरणार नाही.
माझ्या मनातली व्याकूळता मी बोलून दाखवीन;
माझ्या भयानक दुःखाची मी तक्रार करीन!+
१२ मी काय समुद्र किंवा समुद्रातला महाकाय प्राणी आहे,
की तू माझ्यावर पहारा ठेवावास?
१३ ‘मला माझ्या पलंगावर विश्रांती मिळेल;
माझ्या बिछान्यावर माझं दुःख थोडं कमी होईल,’ असा जेव्हा मी विचार करतो,
१४ तेव्हा तू मला स्वप्नं दाखवून घाबरवतोस
आणि दृष्टान्त दाखवून भयभीत करतोस.
१६ मला माझ्या जीवनाचा वीट आलाय;+ मला आता आणखी जगायचं नाही.
मला सोडून दे, कारण माझे दिवस श्वासासारखे आहेत.+
१८ तू दररोज सकाळी त्याला का तपासतोस?
क्षणोक्षणी त्याची परीक्षा का घेतोस?+
१९ तू क्षणभरही माझ्यावरून तुझी नजर हटवणार नाहीस का?
आवंढा* गिळण्याचीही मला संधी देणार नाहीस का?+
२० मानवांवर नजर ठेवणाऱ्या देवा,+ मी पाप केलं असलं,
तरी मी तुझं काय नुकसान करू शकतो?
तू मला आपलं निशाण का बनवलं आहेस?
तुला माझं ओझं झालंय का?
२१ तू माझ्या अपराधाची क्षमा का करत नाहीस?
माझी चूक माफ का करत नाहीस?
कारण लवकरच मी धुळीत पडेन,+
तू मला शोधशील, पण मी नसेन.”
२ “कधीपर्यंत तू असाच बोलत राहणार?+
तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे आहेत!
३ देव अन्याय करेल का?
किंवा सर्वशक्तिमान देव अनीतीने वागेल का?
४ तुझ्या मुलांनी त्याच्याविरुद्ध पाप केलं असेल,
आणि त्यांच्या बंडामुळे त्याने त्यांना शिक्षा दिली असेल;
५ पण तरीही जर तू देवाकडे मदत मागितलीस+
आणि सर्वशक्तिमान देवाकडे कृपेसाठी याचना केलीस,
६ आणि जर तू खरोखर शुद्ध आणि प्रामाणिक असशील,+
तर तो नक्की तुझ्याकडे लक्ष देईल
आणि तुझ्या हक्काचं स्थान तुला परत मिळवून देईल.
७ आणि जरी तुझी सुरुवात लहान असली,
तरी तुझं भविष्य महान असेल.+
८ तुझ्या आधीच्या पिढीच्या लोकांना विचार,
त्यांच्या वाडवडिलांनी ज्या गोष्टी शोधून काढल्या, त्यांकडे लक्ष दे.+
९ कारण आपला जन्म तर काल-परवाचा आहे, आणि आपल्याला काहीच माहीत नाही,
पृथ्वीवरचं आपलं आयुष्य सावलीसारखं आहे.
१० ते तुला शिकवणार नाहीत का?
त्यांना माहीत असलेल्या गोष्टी ते तुला सांगणार नाहीत का?*
११ दलदल नसेल तर लव्हाळं* उंच वाढेल का?
पाण्याशिवाय गवत उंच वाढेल का?
१२ जरी त्यांना कळ्या आल्या असल्या,
तरी ते इतर झाडांच्या आधी सुकून जातील.
१४ तो व्यर्थ गोष्टींवर भरवसा ठेवतो
त्याचा भरवसा कोळ्याच्या जाळ्यासारखा* नाजूक आहे.
१५ तो त्याच्या घराला टेकेल, पण ते तुटून जाईल;
तो त्याला पकडण्याचा प्रयत्न करेल, पण ते टिकणार नाही.
१६ तो सूर्यप्रकाशातल्या एखाद्या कोवळ्या झाडासारखा आहे,
त्याच्या फांद्या बागेत सगळीकडे पसरतात.+
१७ त्याची मुळं दगडाच्या ढिगाऱ्यांमध्ये गुंततात;
तो आपलं घर दगडांमध्ये शोधतो.
१८ पण जेव्हा त्याला त्याच्या ठिकाणावरून उपटलं जाईल,
तेव्हा ते ठिकाण त्याला नाकारून म्हणेल, ‘मी तुला कधीच पाहिलं नाही.’+
१९ हो, तो अशाच प्रकारे नाहीसा होईल;+
मग त्याच्या जागी मातीतून इतर झाडं उगवतील.
२१ तो तुला पुन्हा हसवेल
आणि तू पुन्हा आनंदाने जयजयकार करशील.
२२ तुझा द्वेष करणारे लज्जित होतील,
दुष्टांच्या तंबूचा नाश केला जाईल.”
९ तेव्हा ईयोबने उत्तर दिलं:
२ “मला खातरीने माहीत आहे, की हे असंच आहे.
पण नाशवंत माणूस देवापुढे योग्य कसा ठरू शकतो?+
३ एखाद्याने देवाशी वाद करायचं ठरवलं,*+
तरी त्याला त्याच्या हजारातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही.
४ तो बुद्धिमान* आहे आणि त्याच्याकडे अफाट शक्ती आहे.+
त्याचा विरोध करणारा जखमी झाल्याशिवाय राहील का?+
५ तो पर्वत हलवतो* आणि कोणाला कळतही नाही;
तो रागात त्यांना उलथून टाकतो.
६ तो पृथ्वीला तिच्या जागेवरून हलवतो,
आणि तिचे खांब थरथरू लागतात.+
७ त्याची आज्ञा झाली तर सूर्य चमकत नाही,
तो ताऱ्यांचा प्रकाश झाकून टाकतो.+
९ त्याने सप्तऋषी, मृगशीर्ष आणि कृत्तिका* ही नक्षत्रं बनवली,+
आणि दक्षिणेकडच्या आकाशातली* सर्व नक्षत्रंही त्याचीच निर्मिती आहेत.
११ तो माझ्या जवळून जातो, पण मी त्याला पाहू शकत नाही;
तो माझ्यासमोरून जातो, पण मी त्याला ओळखू शकत नाही.
१२ त्याने एखादी गोष्ट हिसकावून घेतली, तरी त्याला विरोध कोण करणार?
‘तू हे काय करतोस?’ असं त्याला कोण म्हणणार?+
१४ त्यामुळे त्याला उत्तर देताना मला सांभाळून बोलावं लागेल;
त्याच्याशी वादविवाद करताना शब्द जपून वापरावे लागतील!
१५ मी योग्य जरी असलो, तरी मी त्याला उत्तर देणार नाही.+
माझ्या न्यायाधीशाकडे* मी फक्त दयेची याचना करू शकतो.
१६ मी त्याला हाक मारली, तर तो उत्तर देईल का?
१८ तो मला श्वासही घेऊ देत नाही;
माझी संकटं तो वाढवतच राहतो.
१९ ताकदीविषयी म्हणाल, तर तोच जास्त शक्तिशाली आहे.+
आणि न्यायाविषयी म्हणाल, तर तो म्हणतो: ‘माझ्याकडून कोण हिशोब मागेल?’*
२० मी योग्य जरी असलो, तरी माझं तोंड मला दोषी ठरवेल;
२२ शेवटी काय, एकूण एकच! म्हणून मी म्हणतो,
‘दुष्ट आणि निर्दोष* या दोघांचाही तो नाश करतो.’
२३ जर अचानक पूर येऊन लोकांचा मृत्यू झाला,
तर निर्दोष लोकांची वाईट अवस्था पाहून तो हसेल.
हे जर त्याने नाही, तर मग कोणी केलं?
२६ वेताच्या होड्यांसारखे,
शिकारीवर झेप घेणाऱ्या गरुडांसारखे, ते वेगाने निघून जातात.
२७ जरी मी म्हणालो, ‘मी तक्रार करणार नाही,
चेहरा उदास दिसू देणार नाही आणि आनंदी राहीन,’
२८ तरी माझ्या सगळ्या दुःखांमुळे माझ्या मनात भीती असेल,+
आणि मला माहीत आहे, की तू मला निर्दोष ठरवणार नाहीस.
३० मी जर स्वतःला वितळणाऱ्या बर्फाच्या पाण्याने धुतलं,
आणि आपले हात राखेच्या पाण्याने धुतले,+
३१ तर तू मला चिखलाच्या खड्ड्यात बुडवशील,
आणि माझ्या कपड्यांनाही माझी घृणा वाटेल.
३२ देव काही माणूस नाही, की मी त्याला उत्तर द्यावं,
आणि त्याच्याविरुद्ध खटला लढावा.+
३३ त्याच्यात व माझ्यात न्यायाधीश होऊन*
न्याय करेल असा कोणीही* नाही.
३४ जर त्याने मला मारणं बंद केलं*
आणि मला घाबरवण्याचं सोडून दिलं,+
३५ तर मी न घाबरता त्याच्याशी बोलीन,
कारण त्याला घाबरणं माझ्या स्वभावात नाही.
१० मला माझ्या जीवनाची घृणा वाटते.+
मी माझ्या तक्रारी बोलून दाखवीन;
माझं भयंकर दुःख मी व्यक्त करीन!
२ मी देवाला म्हणीन: ‘मला दोषी ठरवू नकोस.
तू माझ्याशी का भांडत आहेस, ते तरी सांग.
३ तू माझ्यावर अत्याचार करतोस;
आपल्याच हाताच्या निर्मितीला+ तुच्छ लेखतोस,
आणि दुष्टांचा सल्ला मान्य करतोस,
असं करून तुला काय मिळेल?
४ तुझे डोळे माणसासारखेच आहेत का?
तुझी दृष्टी नाशवंत मानवांसारखीच आहे का?
५ तुझे दिवस मनुष्यांच्या दिवसांसारखे;
किंवा तुझी वर्षं मानवांच्या वर्षांसारखी आहेत का?+
६ माझा अपराध सापडावा म्हणून तू माझी झडती का घेतोस?
आणि माझ्यात पाप का शोधत राहतोस?+
८ तू स्वतःच्या हातांनी मला आकार देऊन घडवलंस,+
आणि आता तूच माझा सर्वनाश करणार?
१० तू मला दुधासारखं ओतलं नाहीस का?
आणि दह्यासारखं विरजवलं नाहीस का?
११ तू मला मांसाने आणि त्वचेने झाकलंस;
हाडांनी आणि स्नायूंनी मला एकत्र जोडलंस.+
१३ तरी या सर्व गोष्टी करायचं तू मनात ठरवलं होतंस.*
या गोष्टी तूच केल्या आहेस हे मला माहीत आहे.
१४ मी पाप केलं असतं, तर तुझ्या नजरेतून ते सुटलं नसतं,+
तू माझ्या अपराधाची क्षमा केली नसतीस.
१५ मी दोषी असेन, तर माझी दुर्दशा होईल!
आणि मी निर्दोष असलो, तरी मान वर करून चालू शकणार नाही,+
कारण माझं जीवन अपमानाने आणि दुःखाने भरलं आहे.+
१६ मी मान वर केली, तर तू सिंहासारखा+ माझा पाठलाग करतोस
आणि पुन्हा माझ्याविरुद्ध आपली ताकद दाखवतोस.
१७ तू माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार उभे करतोस,
आणि माझ्यावर आणखी संतापतोस.
माझ्यावर एकापाठोपाठ एक संकटं येतच राहतात.
१८ मग तू मला माझ्या आईच्या पोटातून बाहेर का आणलंस?+
कोणी मला पाहायच्या आधीच मी मरून जायला हवं होतं.
१९ म्हणजे मला जन्मताच कबरेकडे नेण्यात आलं असतं,
मी कधी अस्तित्वातच नव्हतो, असं झालं असतं.’
२० माझे थोडेच दिवस उरले आहेत ना?+ मग त्याने मला सोडून द्यावं;
त्याने माझ्यावरून आपली नजर हटवावी, म्हणजे मला थोडा तरी आराम मिळेल.*+
२१ लवकरच मी निघून जाईन आणि कधीच परत येणार नाही.+
मी गडद अंधकाराच्या* देशात निघून जाईन.+
२२ तो घोर अंधकाराचा;
काळोखाचा आणि गोंधळाचा देश आहे.
तिथे प्रकाशही अंधारासारखा आहे.”
११ मग सोफर+ नामाथी याने उत्तर दिलं:
२ “तुझ्या या सर्व शब्दांना कोणी उत्तर देऊ नये का?
खूप बोलल्यामुळे एखादा खरा ठरेल का?*
३ तुझ्या या बडबडीमुळे लोक गप्प बसतील का?
तू चालवलेल्या या थट्टेमुळे तुला कोणी खडसावणार नाही का?+
५ पण जर देव तुझ्याशी बोलला असता
आणि त्याने आपलं तोंड उघडलं असतं,+
६ तर त्याने बुद्धीची रहस्यं तुझ्यापुढे प्रकट केली असती,
कारण व्यावहारिक बुद्धीचे बरेच पैलू असतात.
देव तुझ्या काही अपराधांकडे दुर्लक्ष करतो, हे तेव्हा तुला कळलं असतं.
७ देवाच्या गूढ गोष्टी तू जाणू शकतोस का?
सर्वशक्तिमान देवाचं सगळं ज्ञान* तू शोधू शकतोस का?
८ ते आकाशापेक्षा उंच आहे, तू तिथे कसा पोहोचणार?
ते कबरेपेक्षाही* खोल आहे, ते तू कसं जाणणार?
९ त्याची लांबी पृथ्वीपेक्षा
आणि रुंदी समुद्रापेक्षा जास्त आहे.
१० जर त्याने जाताजाता एखाद्याला धरून त्याच्यावर खटला चालवला,
तर त्याला कोण अडवणार?
११ कारण माणसांनी केलेली फसवणूक तो ओळखतो.
दुष्टपणा पाहिल्यावर, तो त्याच्या लक्षात येणार नाही का?
१२ जर कधी रानगाढवाने माणसाला जन्म दिला,
तरच मूर्ख माणसाला शहाणपण येईल.
१३ पण जर तू योग्य मनोवृत्ती दाखवलीस
आणि देवापुढे हात पसरलेस, तर बरं होईल.
१४ जर तू काही चुकीचं करत असशील, तर ते सोडून दे,
तुझ्या तंबूंमध्ये अनीती राहू देऊ नकोस.
१५ तेव्हा तू लाज न बाळगता आपली मान वर करू शकशील;
आणि न घाबरता, स्थिर उभा राहू शकशील.
१६ तेव्हा तू आपली दुःखं विसरशील;
वाहून गेलेल्या पाण्यासारखा तुला त्यांचा विसर पडेल.
१७ तुझं आयुष्य दुपारच्या उन्हापेक्षा प्रकाशमान होईल;
तुझ्या जीवनातला अंधारही सकाळसारखा असेल.
१८ आशेमुळे तू भरवसा ठेवशील,
तू आपल्या सगळ्या संपत्तीवर नजर फिरवशील आणि निर्धास्तपणे आराम करशील.
१९ तू निश्चिंत झोपशील आणि तुला कोणीही घाबरवणार नाही,
बरेच लोक तुझी कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतील.
२० पण दुष्टांची नजर कमजोर होईल;
सुटकेसाठी त्यांना कोणतंही ठिकाण सापडणार नाही,
मृत्यूच त्यांची शेवटची आशा असेल.”+
१२ मग ईयोबने उत्तर दिलं:
२ “खरोखर, तुम्ही लोकच फक्त शहाणे आहात,
तुम्ही जिवंत असेपर्यंतच जगात बुद्धी राहील!
३ पण माझ्याजवळही समजशक्ती* आहे.
मी काही तुमच्यापेक्षा कमी नाही.
या गोष्टी सगळ्यांनाच कळतात.
४ मी देवाला हाक मारतो आणि त्याच्या उत्तराची अपेक्षा करतो,+
म्हणून माझ्या मित्रांसाठी मी थट्टेचा विषय बनलोय.+
नीतिमान आणि निर्दोष माणसाला लोक हसतात.
५ बिनधास्त राहणारा माणूस संकटाला तुच्छ लेखतो,
ज्यांचे पाय लटपटतात* त्यांच्यावरच संकट येतं, असं तो मानतो.
ते आपल्या दैवतांना हातांत नेतात.
७ पण, कृपा करून प्राण्यांना विचार, म्हणजे ते तुला शिकवतील;
आकाशातल्या पक्ष्यांना विचार, म्हणजे ते तुला सांगतील.
८ किंवा पृथ्वीकडे लक्ष दे,* म्हणजे ती तुला शिकवेल;
आणि समुद्रातले मासे तुला सांगतील.
९ हे यहोवाच्याच हाताचं कार्य आहे,
हे यांपैकी कोणाला माहीत नाही?
१० प्रत्येक प्राण्याचा जीव,
आणि प्रत्येक माणसाचा श्वास त्याच्याच हातात आहे.+
१२ म्हाताऱ्या माणसांजवळ बुद्धी नसते का?+
आणि बरंच आयुष्य जगल्यावर समजशक्ती येत नाही का?
१४ तो जे मोडतो, ते पुन्हा बांधलं जाऊ शकत नाही;+
तो जे बंद करतो, ते कोणताही माणूस उघडू शकत नाही.
१६ त्याच्याजवळ ताकद आणि व्यावहारिक बुद्धी आहे;+
वाट चुकणारा आणि वाट चुकायला लावणारा, दोघंही त्याच्याच हातात आहेत.
१८ राजांनी घातलेल्या बेड्या तो मोकळ्या करतो,+
आणि त्यांच्या कंबरेला तो पट्टा बांधतो.
२० तो भरवशाच्या सल्लागारांचं तोंड बंद करतो,
आणि वडीलधाऱ्यांचा* समंजसपणा काढून घेतो.
२१ तो गर्विष्ठ शासकांना तुच्छ लेखतो,+
आणि बलवानांना निर्बल बनवतो.
२२ तो अंधारातल्या गुप्त गोष्टी उजेडात आणतो,+
आणि घोर अंधकाराला प्रकाशात आणतो;
२३ राष्ट्रांचा नाश करण्यासाठी तो त्यांना शक्तिशाली बनवतो;
त्यांना बंदिवासात नेण्यासाठी तो त्यांच्या सीमा वाढवतो.
२४ तो लोकांच्या पुढाऱ्यांची समजशक्ती* काढून घेतो
आणि वाट नसलेल्या ओसाड वाळवंटांतून त्यांना वणवण फिरायला लावतो.+
१३ खरंच, मी आपल्या डोळ्यांनी हे सर्व पाहिलं आहे,
आणि कानांनी ते ऐकून, समजून घेतलं आहे.
२ तुम्हाला जे कळतं, ते मलाही कळतं;
मी काही तुमच्यापेक्षा कमी नाही.
३ त्यापेक्षा मी सर्वशक्तिमान देवाशी बोलीन;
मी माझा वाद देवासमोर मांडीन.+
४ तुम्ही खोटं बोलून माझ्या नावाला कलंक लावत आहात;
तुम्ही सगळे बिनकामाचे वैद्य आहात.+
५ तुम्ही जर अगदी गप्प बसलात,
तरच तुमचं शहाणपण दिसून येईल.+
६ कृपा करून मी मांडलेला वाद ऐकून घ्या,
माझ्या याचनांकडे लक्ष द्या.
७ देवाच्या वतीने तुम्ही अन्यायीपणे बोलाल का?
त्याच्या वतीने तुम्ही कपटीपणे बोलाल का?
८ तुम्ही त्याची बाजू घ्याल का?
तुम्ही खऱ्या देवाची वकिली कराल का?
९ देवाने पारखलं, तर तुम्ही निर्दोष ठराल का?+
माणसाला फसवता, तसं तुम्ही देवाला फसवाल का?
१० जर तुम्ही गुप्तपणे पक्षपात करण्याचा प्रयत्न केला,
तर तो तुम्हाला नक्की ताडन करेल.+
११ त्याच्या गौरवाचं तुम्हाला भय वाटणार नाही का?
तुम्हाला त्याची धास्ती वाटणार नाही का?
१२ तुमची बुद्धीची वचनं मातीमोल आहेत;*
तुमचे वाद* मातीच्या ढालींसारखे कमजोर आहेत.
१३ आता शांत राहा आणि मला बोलू द्या.
पुढे माझं काय व्हायचं ते होईल!
१४ मी आपणहून मरण का ओढवून घ्यावं?*
मी आपला जीव धोक्यात का घालावा?
१७ माझे शब्द कान देऊन ऐका;
माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या.
१८ पाहा, मी माझ्या दाव्याची तयारी केली आहे;
मी निर्दोष आहे, हे मला माहीत आहे.
१९ माझ्याशी कोण वाद करेल?
शांत राहिलो तर मी मरून जाईन!*
२० हे देवा, माझ्या फक्त दोन विनंत्या मान्य कर,*
म्हणजे मी स्वतःला तुझ्यापासून लपवणार नाही.
२१ तुझा बलवान हात माझ्यापासून दूर कर,
आणि मला घाबरवू नकोस.+
२२ एकतर तू बोल आणि मी उत्तर देईन,
किंवा मला बोलू दे आणि तू उत्तर दे.
२३ माझ्या हातून कोणत्या चुका आणि पापं घडली आहेत?
माझे अपराध आणि माझं पाप काय ते मला सांग.
२४ तू आपलं तोंड का फिरवतोस?+
आणि मला आपला वैरी का समजतोस?+
२५ वाऱ्याने उडणाऱ्या पानाला तू घाबरवशील का?
किंवा सुक्या गवताच्या मागे धावशील का?
२६ तू माझ्याविरुद्ध भयानक आरोपांची नोंद करत राहतोस,
आणि माझ्या तरुणपणातल्या पापांचा हिशोब घेतोस.
२७ तू माझे पाय खोड्यांत* अडकवले आहेस,
तू माझ्या सर्व मार्गांवर पाळत ठेवतोस
आणि माझ्या पाऊलखुणांवर नजर ठेवतोस.
२८ त्यामुळे माणूस* एखाद्या कुजणाऱ्या वस्तूसारखा;
कसर लागलेल्या कापडासारखा खराब होत जातो.
४ जो अशुद्ध आहे, त्याच्यापासून शुद्ध माणूस उत्पन्न होऊ शकतो का?+
हे शक्यच नाही!
५ त्याचे दिवस ठरलेले आहेत.
त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या हातात आहे.
तू आखलेल्या सीमेपलीकडे तो जाऊ शकत नाही.+
६ त्याच्यापासून आपली नजर हटव, म्हणजे तो विश्रांती घेईल.
मजुराप्रमाणे आपलं दिवसभराचं काम पूर्ण करून तो सुखी राहील.+
७ कारण झाडासाठीही आशा असते.
ते कापून टाकलं तरी त्याला पुन्हा पालवी फुटते,
आणि त्याच्या फांद्या वाढत जातात.
८ त्याचं मूळ जमिनीत जुनाट झालं
आणि त्याचं खोड मातीत सुकून गेलं,
९ तरी पाण्याचा गंध येताच त्याला अंकुर फुटेल;
आणि नवीन रोपासारख्या त्याला फांद्या येतील.
११ समुद्रातलं पाणी नाहीसं होतं,
आणि नदीचं पाणी आटून ती कोरडी पडते.
१२ तसंच, मृत्यूनंतर माणूस पुन्हा उठत नाही.+
आकाश नाहीसं होईपर्यंत, तो उठणार नाही,
त्याच्या झोपेतून तो जागा होणार नाही.+
१३ कृपा करून, मला कबरेत* लपव,+
तुझा राग शांत होईपर्यंत मला नजरेआड ठेव;
माझ्यासाठी एक निश्चित वेळ ठरवून माझी आठवण कर!+
१४ माणसाचा मृत्यू झाल्यावर तो पुन्हा जगू शकेल का?+
१५ तू हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन.+
मला पुन्हा पाहण्यासाठी तू आतुर होशील,*
कारण तू मला आपल्या हातांनी निर्माण केलंस.
१६ पण आता तू माझ्या प्रत्येक पावलावर नजर ठेवतोस;
तू फक्त माझ्या पापावर लक्ष ठेवतोस.
१७ तू माझा अपराध थैलीत बांधून ठेवतोस,
तू माझ्या चुका सांभाळून ठेवतोस.
१८ जसा पर्वत कोसळून त्याची माती होते,
आणि जसा खडक आपल्या जागेवरून निखळून पडतो,
१९ जसे पाण्याच्या प्रवाहाने खडक झिजतात,
आणि जसे पाण्याचे लोंढे मातीला वाहून नेतात,
तशी तू नाशवंत मानवाची आशा नष्ट केली आहेस.
२० त्याचा नाश होईपर्यंत तू त्याला चिरडत राहतोस,+
त्याचं स्वरूप बदलून तू त्याला पाठवून देतोस.
२१ त्याच्या मुलांचा सन्मान होतो, पण त्याला याची जाणीव नसते;
त्यांची दुर्दशा होते, पण त्याला ते समजत नाही.+
२२ शरीरात प्राण असेपर्यंतच त्याला दुःख जाणवतं;
तो जिवंत असेपर्यंतच शोक करतो.”
१५ मग अलीफज+ तेमानी याने उत्तर दिलं:
२ “बुद्धिमान माणूस पोकळ वाद करेल का?
किंवा आपलं मन चुकीच्या विचारांनी* भरेल का?
३ फक्त शब्दांचा मार काही कामाचा नाही,
आणि नुसतंच बोलून काही उपयोग नाही.
४ कारण तुझ्यामुळे देवाचं भय नाहीसं झालं आहे,
आणि तू इतरांना देवाबद्दल मनन करू देत नाहीस.
५ तुझा अपराध तुला असं बोलायला लावतो,*
तू धूर्त माणसांसारखा बोलतोस.
६ तुला मी नाही, तर तुझंच तोंड दोषी ठरवतं;
तुझे स्वतःचे ओठ तुझ्याविरुद्ध साक्ष देतात+
७ तू काय जन्माला आलेला पहिला माणूस आहेस?
तुझा जन्म पर्वतांच्याही आधी झाला का?
८ तू देवाच्या गुप्त गोष्टी ऐकतोस की काय?
आणि बुद्धी काय फक्त तुझ्याजवळच आहे?
९ तुला असं काय माहीत आहे, जे आम्हाला माहीत नाही?+
आणि तुला असं काय समजतं, जे आम्हाला समजत नाही?
१० आमच्यामध्ये पिकलेल्या केसांचे आणि वयस्क लोक आहेत;+
ते तुझ्या वडिलांपेक्षाही वयाने मोठे आहेत.
११ देवाने दिलेलं सांत्वन;
आणि प्रेमाने बोललेले शब्द तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का?
१२ तू आपल्याच कल्पनांनी असा का वाहवत जातोस?
आणि तुझे डोळे रागाने लाल का होतात?
१३ तू देवाचा विरोध करतोस
म्हणून तू आपल्या तोंडून असे शब्द काढतोस.
१४ शेवटी नाशवंत मानव शुद्ध कसा असू शकतो?
किंवा स्त्रीपासून जन्मलेला, नीतिमान कसा असू शकतो?+
१६ मग एका घृणास्पद आणि वाईट माणसाबद्दल काय बोलायचं!+
तो तर दुष्टपणा पाण्यासारखा पितो.
१७ मी बोलत आहे, ते तू ऐक!
मी जे पाहिलं आहे, ते तुला सांगतो,
१८ बुद्धिमान माणसांनी ते आपल्या वाडवडिलांकडून ऐकलंय,+
त्यांनी त्या गोष्टी लपवून ठेवल्या नाहीत.
१९ त्यांचा देश फक्त त्यांनाच देण्यात आला होता,
आणि त्यांच्यामध्ये कोणीही परका माणूस गेला नव्हता.
२० दुष्ट, निर्दयी माणसाला आयुष्यभर यातना होत राहतात,
त्याच्या आयुष्याची सगळी वर्षं संकटांनी भरलेली असतात.
२१ भयानक आवाज त्याच्या कानात घुमत राहतात;+
आणि शांतीच्या काळात त्याच्यावर दरोडेखोर हल्ला करतात.
२२ अंधारापासून सुटण्याची त्याला आशा वाटत नाही;+
त्याला तलवारीसाठी राखून ठेवलेलं असतं.
२३ ‘अन्न* कुठे मिळेल?’ असं विचारत तो वणवण फिरतो,
अंधाराचा दिवस जवळ आहे, हे त्याला चांगलं माहीत असतं.
२४ दुःख आणि चिंता त्याला सतावत राहतात;
हल्ला करायला सज्ज झालेल्या राजासारख्या, त्या त्याच्यावर मात करतात.
२५ कारण तो खुद्द देवाच्या विरोधात हात उगारतो;
तो सर्वशक्तिमान देवाशी लढण्याचं धाडस करतो.
२६ आपली जाडजूड, मजबूत ढाल घेऊन,
तो हट्टीपणे देवावर धावून जातो.
२७ त्याचं तोंड चरबीमुळे फुगलं आहे,
त्याच्या कमरेवर चरबी चढली आहे;
२८ नाश होण्याच्या मार्गावर असलेल्या शहरांमध्ये,
ओसाड पडतील अशा घरांमध्ये तो राहतो,
तिथे फक्त दगडांचे ढिगारे उरतील.
२९ तो श्रीमंत होणार नाही, त्याची मालमत्ता वाढणार नाही;
त्याची संपत्ती देशात पसरणार नाही.
३० अंधारापासून त्याची सुटका नाही;
एका ज्वालेने त्याची फांदी* होरपळून जाईल,
३१ निरुपयोगी गोष्टींवर भरवसा ठेवून त्याने स्वतःला फसवू नये,
कारण बदल्यात त्याला निरुपयोगी गोष्टीच मिळतील.
३२ त्याचा दिवस येण्याआधी हे घडेल,
त्याच्या फांद्या कधीच फोफावणार नाहीत.+
३३ द्राक्षवेलासारखी त्याची कच्ची द्राक्षं गळून पडतील,
जैतुनाच्या झाडासारखा त्याचा मोहर झडून जाईल.
३५ त्यांना विपत्तीचा गर्भ राहतो आणि ते वाईट गोष्टींना जन्म देतात,
त्यांच्या पोटी फसवणूक जन्माला येते.”
१६ मग ईयोबने उत्तर दिलं:
२ “मी पूर्वीही अशा भरपूर गोष्टी ऐकल्या आहेत.
तुमचं सांत्वन मला त्रासदायक वाटतं!+
३ तुमच्या या पोकळ शब्दांना* अंत आहे का?
तुम्ही कशामुळे माझ्याशी असं बोलत आहात?
४ मीसुद्धा तुमच्यासारखाच बोलू शकतो.
५ पण नाही, त्याऐवजी मी माझ्या शब्दांनी तुम्हाला धीर दिला असता,
म्हणजे माझ्या ओठांच्या सांत्वनाने तुमचं दुःख हलकं झालं असतं.+
६ मी बोललो, तरी माझा त्रास कमी होत नाही,+
आणि मी बोलायचा थांबलो, तरी माझ्या वेदना कुठे कमी होतात?
८ तू मला ताब्यात घेतलं आहेस; माझी अवस्थाच साक्ष देते,
माझं अशक्त शरीर माझ्याविरुद्ध साक्ष देतं.
९ त्याच्या क्रोधामुळे माझ्या चिंधड्या झाल्या आहेत;
त्याच्या मनात माझ्याबद्दल वैर आहे.+
तो माझ्यावर दातओठ खातो.
माझा शत्रू क्रूर नजरेने माझ्याकडे पाहतो.+
१० लोक आपले जबडे उघडून मला गिळायला पाहतात.+
ते माझ्या थोबाडीत मारून माझा अपमान करतात.
ते जमाव करून माझ्याविरुद्ध येतात.+
११ देव मला पोरांच्या हाती देतो,
तो मला दुष्टांच्या ताब्यात देतो.+
१२ मी सुखात होतो, पण त्याने माझा चुराडा केला;+
त्याने माझं मानगूट धरून मला चिरडून टाकलं;
त्याने मला निशाण बनवलंय.
१३ त्याच्या तिरंदाजांनी मला घेरलंय.+
तो दयामाया न दाखवता माझ्या शरीरात खोलवर घाव करतो;+
तो माझं पित्त जमिनीवर ओततो.
१४ जागोजागी पडलेल्या भिंतीसारखी त्याने माझी अवस्था केली आहे;
तो योद्ध्यासारखा माझ्यावर धावून येतो.
१६ रडून रडून माझं तोंड लाल झालं आहे,+
माझ्या पापण्यांवर अंधाराची छाया* पडली आहे;
१७ खरंतर, मी कधीच कोणाचं काही नुकसान केलं नाही,
आणि माझी प्रार्थना शुद्ध आहे.
१८ हे पृथ्वी, माझं रक्त झाकू नकोस!+
माझ्या आक्रोशाला विश्रांतीचं ठिकाण न मिळो!
१९ या क्षणी माझा साक्षीदार;
माझ्या बाजूने साक्ष देणारा स्वर्गात आहे.
२१ दोन माणसांत न्याय केला जातो,
तसा कोणीतरी माझ्यात आणि देवात न्याय करावा.+
१७ माझी शक्ती नाहीशी झाली आहे, माझे दिवस संपले आहेत;
कबर माझी वाट पाहत आहे.+
२ थट्टा करणाऱ्यांनी मला घेरलंय.+
माझ्या डोळ्यांना त्यांचा बंडखोरपणा पाहावा लागतोय.*
३ कृपा करून, माझ्यासाठी जामीन राहा.
कारण दुसरा कोण माझ्याशी हात मिळवून माझ्यासाठी जामीन राहील?+
४ तू त्यांच्या हृदयापासून समंजसपणा लपवून ठेवला आहेस;+
म्हणून तू त्यांना वरचढ होऊ देत नाहीस.
५ असे लोक आपली संपत्ती मित्रांमध्ये वाटत फिरतात,
पण त्यांच्या मुलांची नजर अंधूक होते.
७ चिंतेमुळे माझे डोळे कमजोर झाले आहेत,+
माझं शरीर हाडांचा सापळा झालंय.
८ हे पाहून प्रामाणिक लोकांना आश्चर्य वाटतं,
निर्दोष माणसाला दुष्टामुळे* राग येतो.
१० तुम्ही सगळे या आणि तुमचा वादविवाद पुन्हा सुरू करा,
मला तर तुमच्यापैकी कोणीही बुद्धिमान वाटत नाही.+
१२ ‘काळोख आहे तर लवकरच दिवस उजाडेल,’ असं म्हणून,
ते रात्रीला दिवस म्हणत राहतात.
१४ मी खड्ड्याला*+ म्हणीन, ‘तू माझा बाप आहेस!’
मी अळीला म्हणीन, ‘तू माझी आई आणि बहीण आहेस!’
१५ मग माझ्यासाठी आशाच कुठे आहे?+
कोणाला माझ्यासाठी काही आशा दिसते का?
१८ मग बिल्दद+ शूही याने उत्तर दिलं:
२ “तुमची ही भाषणं कधी थांबणार?
थोडा तरी समजूतदारपणा दाखवा, म्हणजे आपण बोलू.
४ तुम्ही जरी रागाने स्वतःचे तुकडेतुकडे केले,
तरी तुमच्यासाठी पृथ्वी ओसाड पडेल का?
आणि खडक आपल्या जागेवरून हलेल का?
५ दुष्ट माणसाचा प्रकाश विझून जाईल,
त्याच्या ज्वालेचं तेज नाहीसं होईल.+
६ त्याच्या तंबूतला प्रकाश अंधूक होईल,
त्याचा दिवा विझून जाईल.
७ त्याला भरभर पावलं टाकता येणार नाहीत,
तो स्वतःच्याच योजनांमुळे अडखळून पडेल.+
८ कारण त्याची पावलं त्याला जाळ्याकडे नेतील,
आणि चालता-चालता त्याचा पाय अडकेल.
९ त्याची टाच सापळ्यात अडकेल;
आणि तो पाशात पकडला जाईल.+
१० त्याच्यासाठी जमिनीवर दोरी लपवलेली असते;
त्याच्या वाटेवर सापळा रचून ठेवलेला असतो.
११ भय त्याला सर्व बाजूंनी घेरतं;+
भीती त्याचा पाठलाग करते.
१३ त्याची त्वचा सडून जाते;
त्याच्या हातापायांना अतिशय भयानक रोग* जडतो.
१६ त्याची मुळं सुकून जातील,
त्याच्या फांद्या कोमेजून जातील.
१७ पृथ्वीवर त्याची आठवण राहणार नाही,
कोणालाही त्याचं नाव लक्षात राहणार नाही.*
१८ त्याला उजेडातून अंधारात हाकलून दिलं जाईल
सुपीक देशातून त्याला घालवून दिलं जाईल.
१९ त्याला मुलंबाळं किंवा वंशज नसतील,
त्याच्या देशात* त्याचा कोणीही वारस उरणार नाही.
२० त्याच्या संकटाच्या दिवशी पश्चिमेकडचे लोक सुन्न होतील
आणि पूर्वेकडचे लोक भीतीने थरथर कापतील.
२१ देवाला न ओळखणाऱ्या माणसाच्या ठिकाणाची
आणि दुष्टाच्या तंबूंची हीच दशा होईल.”
१९ यावर ईयोबने उत्तर दिलं:
२ “तुम्ही कुठपर्यंत माझ्या जिवाला* असं डिवचत राहणार?+
आणि तुमच्या शब्दांनी मला चिरडत राहणार?+
३ आतापर्यंत दहादा तुम्ही मला फटकारलंय.*
माझ्याशी कठोरपणे वागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही?+
४ मी जर खरोखर चूक केली असेल,
तर मी शिक्षा भोगायला तयार आहे.
५ जर तुम्ही स्वतःला माझ्यापेक्षा श्रेष्ठ समजत असाल;
माझा झालेला अपमान योग्यच आहे, असा दावा करत असाल,
६ तर लक्षात ठेवा, देवानेच मला फसवलंय,
त्यानेच मला त्याच्या जाळ्यात पकडलंय.
८ त्याने माझा मार्ग भिंतीने अडवलाय, मला पुढे जाता येत नाही;
माझ्या मार्गांवर त्याने काळोख पसरवलाय.+
९ त्याने माझं वैभव हिरावून घेतलंय,
माझ्या डोक्यावरचा मुकुट त्याने काढून घेतलाय.
१० मी कोलमडून पडेपर्यंत, तो चारही बाजूंनी माझ्यावर घाव घालतो;
तो माझी आशा एखाद्या झाडासारखी उपटून टाकतो.
११ त्याचा क्रोध माझ्यावर भडकतो,
तो मला आपला शत्रू समजतो.+
१२ त्याचं सगळं सैन्य येऊन मला वेढा घालतं;
ते माझ्या तंबूभोवती छावणी करतात.
१३ माझ्या भावांनासुद्धा त्याने माझ्यापासून दूर केलंय,
मला ओळखणाऱ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली आहे.+
१४ माझ्या जिवलग मित्रांनी* मला सोडून दिलंय.
माझे जवळचे सोबती मला विसरून गेले आहेत.+
१५ घरातले पाहुणे+ आणि माझ्या दासी मला परकं समजतात;
त्यांच्या दृष्टीने मी परदेशी आहे.
१६ मी माझ्या दासाला हाक मारतो, तरी तो उत्तर देत नाही.
मी गयावया करत राहतो, तरी तो ऐकत नाही.
१७ माझ्या बायकोला माझ्या श्वासाचीही किळस येते,+
माझ्या भावांना मी दुर्गंधीसारखा झालोय!
१८ लहान मुलंही मला तुच्छ समजतात,
मी उठलो, की ते माझी टिंगल करतात.
१९ माझे सगळे जवळचे मित्र माझा द्वेष करतात.+
मी ज्यांच्यावर प्रेम केलं, तेच माझ्याविरुद्ध उठले आहेत.+
२१ दया करा माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा,
कारण देवाच्या हाताने मला तडाखा दिलाय.+
२२ देवाप्रमाणेच तुम्हीही का माझा छळ करता?+
२३ जर माझे शब्द लिहून ठेवण्यात आले असते;
पुस्तकात नोंदवून ठेवण्यात आले असते, तर किती बरं झालं असतं!
२४ लोखंडाच्या लेखणीने कोरून आणि शिसं ओतून,
ते दगडावर कायमचे लिहिण्यात आले असते, तर किती बरं झालं असतं!
२६ माझ्या त्वचेचा असा नाश झाल्यावरही
मी जिवंतपणी देवाला पाहीन.
२७ मी स्वतः त्याला पाहीन;
इतरांच्या नाही, तर स्वतःच्या डोळ्यांनी पाहीन.+
पण सध्या माझ्या जिवाची घालमेल होत आहे.*
२८ कारण तुम्ही म्हणता, ‘आम्ही कुठे याला छळतोय?’+
तुमच्या मते, मुळात दोष माझाच आहे.
२९ पण तलवारीचा धाक असू द्या,+
कारण अपराधांसाठी तलवारीने शिक्षा मिळते;
सर्वांवर एक न्यायाधीश आहे,+ हे लक्षात ठेवा.”
२० मग सोफर+ नामाथी उत्तर देत म्हणाला:
२ “माझं मन खूप अस्वस्थ झालंय;
बेचैन करणाऱ्या विचारांमुळे आता मला उत्तर दिल्याशिवाय राहवत नाही.
३ तू माझं ताडन करून माझा अपमान केला आहेस,
आता माझी समजशक्ती मला उत्तर द्यायला भाग पाडत आहे.
६ त्याचा अंहकार जरी आकाशाला भिडला,
आणि त्याचं डोकं जरी आभाळापर्यंत पोहोचलं,
७ तरी स्वतःच्या विष्ठेसारखा* त्याचा कायमचा नाश होईल;
त्याच्या ओळखीचे लोक, ‘तो कुठे गेला?’ असं विचारतील.
८ पण तो त्यांना सापडणार नाही, कारण तो स्वप्नासारखा विरून जाईल,
रात्रीच्या दृष्टान्तासारखा तो नाहीसा होईल.
९ जे त्याला पाहायचे, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही,
आणि त्याच्या वस्तीत तो सापडणार नाही.+
१० त्याची मुलं गरिबांच्या हातापाया पडतील,
इतरांकडून बळकावलेली संपत्ती तो आपल्या हातांनी परत करेल.+
१२ जर त्याला दुष्टपणा गोड लागला,
आणि त्याने तो जिभेखाली दाबून ठेवला,
१३ जर थुंकून टाकण्याऐवजी तो त्याला चघळत राहिला,
आणि त्याने तो तोंडातच धरून ठेवला,
१४ तर त्याचं अन्न पोटात गेल्यावर आंबून जाईल;
ते त्याच्या शरीरात नागाच्या विषासारखं* होईल.
१५ त्याने धनसंपत्ती गिळून टाकली आहे, पण त्याला ती ओकावी लागेल;
देव ती त्याच्या पोटातून बाहेर काढेल.
१६ तो नागांचं विष चोखेल;
विषारी सापाच्या दंशाने* त्याचा जीव जाईल.
१७ पाण्याचे झरे त्याला कधीही दिसणार नाहीत,
मधाच्या आणि लोण्याच्या नद्या तो पाहू शकणार नाही.
१८ आपल्या मालमत्तेचा उपभोग घेण्याआधीच* त्याला ती परत करावी लागेल;
व्यापारातून मिळवलेल्या संपत्तीचा तो आनंद घेऊ शकणार नाही.+
१९ कारण गोरगरिबांवर अत्याचार करून त्याने त्यांना निराधार सोडलंय;
दुसऱ्याने बांधलेलं घर त्याने बळकावलंय.
२० पण त्याच्या मनाला जराही शांती मिळणार नाही;
त्याची संपत्ती त्याला वाचवू शकणार नाही.
२१ हिसकावून घेण्यासारखं काहीच न उरल्यामुळे,
त्याची श्रीमंती टिकणार नाही.
२२ भरभराटीच्या काळात त्याला चिंता सतावू लागतील;
सर्व प्रकारची संकटं त्याच्यावर येतील.
२३ तो आपलं पोट भरत असताना,
देव* त्याच्यावर क्रोधाचा वर्षाव करेल,
त्याचा क्रोध त्याच्या आतड्यांपर्यंत जाईल.
२४ जेव्हा तो लोखंडाच्या शस्त्रांपासून पळेल,
तेव्हा तांब्याच्या धनुष्यातून निघालेले बाण त्याला जखमी करतील.
२५ तो आपल्या पाठीत खुपसलेला बाण;
आपल्या पित्ताशयात घुसलेला चकाकता बाण ओढून काढेल,
भीतीने त्याचा थरकाप उडेल.+
२६ त्याची सगळी संपत्ती अंधारात गडप होईल;
कोणी वारा घातला नसतानाही, आग भडकून त्याला भस्म करेल.
त्याच्या तंबूत जे उरतील त्यांच्यावर संकट येईल.
२७ आकाश त्याचा अपराध उघड करेल;
पृथ्वी त्याच्याविरुद्ध उठेल.
२८ त्याचं घर पुरात वाहून जाईल;
देवाच्या* क्रोधाच्या दिवशी महापूर येईल.
२९ दुष्टाला देवाकडून मिळणारा वाटा
आणि देवाने त्याच्या नावावर केलेला वारसा हाच आहे.”
२१ तेव्हा ईयोबने उत्तर दिलं:
२ “मी बोलतोय ते लक्ष देऊन ऐका;
इतकं केलंत तरी माझं सांत्वन होईल.
३ धीर धरा आणि माझं ऐकून घ्या;
मग माझी वाटेल तेवढी चेष्टा करा.+
४ मी माणसाकडे तक्रार करतोय का?
तसं असतं, तर मी केव्हाच धीर सोडला असता.
५ चकित होऊन माझ्याकडे बघा
आणि आपल्या तोंडावर आपला हात ठेवा.
६ आठवण आली, की मी बेचैन होतो,
माझ्या सगळ्या अंगाचा थरकाप उडतो.
७ दुष्ट लोक म्हातारे होईपर्यंत का जिवंत राहतात?+
८ त्यांची मुलंबाळं नेहमी त्यांच्या डोळ्यांसमोर असतात.
त्यांना आपली नातवंडं-पतवंडं पाहायला मिळतात.
९ त्यांची घरं सुरक्षित असतात, त्यांना कसलीही भीती नसते,+
देव त्यांना शिक्षा करत नाही.
१० त्यांचे बैल निष्फळ होत नाहीत;
त्यांच्या गायींचे गर्भपात होत नाहीत, त्या वासरांना जन्म देतात.
११ त्यांचे मुलगे कळपासारखे मैदानात खेळतात.
त्यांची मुलंबाळं आनंदाने बागडतात.
१४ पण ते देवाला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा!
आम्हाला तुझे मार्ग जाणून घ्यायची अजिबात इच्छा नाही.+
१५ सर्वशक्तिमान देव कोण आहे, की आम्ही त्याची उपासना करावी?+
त्याला जाणून आम्हाला काय मिळणार?’+
१६ पण त्यांची समृद्धी त्यांच्या हातात नाही, हे मला माहीत आहे.+
मी त्या दुष्टांसारखा विचार करत नाही.+
१७ दुष्टांचा दिवा विझून गेला;+
त्यांच्यावर संकट कोसळलं;
किंवा देवाने आपल्या रागात त्यांचा नाश केला, असं किती वेळा होतं?
१८ वाऱ्याने उडणाऱ्या गवताच्या काडीसारखी,
सोसाट्याच्या वाऱ्यासोबत उडून जाणाऱ्या भुशासारखी, कधी त्यांची दशा होते का?
१९ माणसाच्या अपराधांची शिक्षा देव त्याच्या मुलांसाठी राखून ठेवतो.
पण देवाने त्यालाही शिक्षा द्यावी, म्हणजे त्याला जाणीव होईल.+
२० त्याने आपल्या डोळ्यांनी आपला नाश पाहावा,
आणि सर्वशक्तिमान देवाच्या क्रोधाचा घोट त्याने स्वतः प्यावा.+
२१ कारण त्याच्या आयुष्यातले महिने जरी कमी करण्यात आले,+
तरी आपल्यानंतर आपल्या घरादाराचं काय होईल, याची त्याला काय पर्वा?
तो तर मोठ्यातल्या मोठ्या लोकांचाही न्याय करतो!+
२३ एखादा माणूस धडधाकट असताना;
अगदी सुखासमाधानात असताना त्याचा मृत्यू होतो;+
२४ त्याच्या मांड्या भरदार असतात
आणि त्याची हाडं मजबूत असतात.
२५ पण दुसरा एखादा कोणत्याही चांगल्या गोष्टींचा आनंद न घेता,
दुःखी आयुष्य जगून मरतो.
२७ तुम्ही काय विचार करत आहात,
आणि मला त्रास देण्यासाठी* कोणत्या योजना करत आहात,+
हे मला चांगलं माहीत आहे.
२८ कारण तुम्ही म्हणता, ‘प्रतिष्ठित माणसाचं घर कुठे आहे?
आणि दुष्ट माणूस राहत होता, तो तंबू कुठे आहे?+
२९ पण तुम्ही कधी प्रवाशांना विचारलं नाही का?
त्यांच्या पाहण्यात काय आलंय,* त्याकडे लक्ष द्या.
३० म्हणजे तुम्हाला कळेल, की संकटाच्या दिवशी दुष्ट माणूस सुखरूप बचावतो,
आणि क्रोधाच्या दिवशी त्याची सुटका होते.
३१ त्याच्या वागणुकीबद्दल कोण त्याला जाब विचारेल?
आणि कोण त्याला त्याच्या कृत्यांचं फळ देईल?
३२ त्याला दफनभूमीकडे नेलं जाईल,
तेव्हा त्याच्या कबरेवर पहारा ठेवला जाईल.
३३ दरीतल्या मातीची ढेकळं त्याला गोड लागतील.+
३४ मग तुम्ही का उगाच मला सांत्वन देताय?+
कपटीपणे उत्तर देऊन तुम्ही माझी फसवणूक करताय!”
२२ तेव्हा अलीफज+ तेमानी याने उत्तर दिलं:
२ “माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?
सखोल समज असलेल्या माणसामुळे देवाला काही फायदा होतो का?+
३ तू नीतिमान असल्यामुळे, सर्वशक्तिमान देवाला काही फरक पडतो का?*
तू खरेपणाने चालल्यामुळे त्याला काही लाभ होतो का?+
४ तो काय तुझी श्रद्धा पाहून
तुला न्यायालयात नेईल आणि शिक्षा देईल?
५ तुझ्या मोठ्या दुष्टपणामुळे;
आणि तुझ्या भरमसाट अपराधांमुळेच तो असं करत नाही का?+
६ तू अन्यायाने आपल्या भावांकडून त्यांच्या वस्तू तारण म्हणून घेतोस,
आणि लोकांकडून त्यांची वस्त्रं हिसकावून, त्यांना उघडं सोडून देतोस.*+
७ थकलेल्या माणसाला तू घोटभर पाणी देत नाहीस,
भुकेल्या माणसाला तू खायला भाकर देत नाहीस.+
८ ताकदवान असल्यामुळे तू खूप जमीन बळकावलीस,+
तिच्यावर फक्त तुझ्या मर्जीतले लोक राहतात.
९ पण तू विधवांना रिकाम्या हाती पाठवलंस,
आणि अनाथ मुलांना* चिरडलंस.
१० म्हणूनच तुझ्याभोवती पाश* पसरले आहेत+
आणि भीती अचानक तुझ्यावर झडप घालते;
११ म्हणूनच तुला भयानक अंधारामुळे काही दिसत नाही,
आणि तू महापुरात बुडत आहेस.
१२ देव उंच आकाशात नाही का?
पाहा, सर्व तारे किती उंचावर आहेत.
१३ पण तू म्हणतोस, ‘देवाला काय कळतं?
गडद अंधारातून तो कसा काय न्याय करेल?
१४ जेव्हा तो आकाशाच्या घुमटावर* चालतो,
तेव्हा मेघांच्या पडद्यामुळे त्याला काहीच दिसत नाही.’
१५ पूर्वीच्या काळात दुष्ट ज्या मार्गावर चालले,
त्याच मार्गावर तूही चालणार का?
१७ ते देवाला म्हणाले: ‘आमच्यापासून दूर जा!’
आणि ‘सर्वशक्तिमान देव आमचं काय बिघडवू शकतो?’
१८ पण, त्यानेच त्यांची घरं चांगल्या गोष्टींनी भरली.
(असे दुष्ट विचार कधीच माझ्या मनात आले नाहीत.)
१९ नीतिमान लोक हे पाहून आनंद करतील,
आणि निर्दोष त्यांची थट्टा करत म्हणतील:
२० ‘आमच्या विरोधकांचा नाश झालाय,
त्यांचं जे काही उरलं असेल, ते आगीत भस्म होईल.’
२१ देवाला जाणून घे, म्हणजे तू शांतीने राहशील;
आणि चांगल्या गोष्टी तुझ्या वाट्याला येतील.
२२ त्याच्या तोंडून निघालेल्या नियमांचं पालन कर,
त्याचे शब्द तुझ्या हृदयात साठवून ठेव.+
२३ सर्वशक्तिमान देवाकडे परत ये, म्हणजे तो तुला पुन्हा समृद्ध करेल.+
जर तू आपल्या तंबूमधून अनीती काढून टाकलीस,
२४ जर तू आपलं सोनं धुळीत फेकून दिलंस;
आणि ओफीरचं* सोनं+ दरीत टाकून दिलंस,
२५ तर सर्वशक्तिमान देव तुझ्यासाठी सोन्यासारखा;
आणि सर्वात मौल्यवान चांदीसारखा होईल.
२६ मग सर्वशक्तिमान देवामुळे तू आनंदी होशील,
आणि मान वर करून देवाकडे बघू शकशील.
२७ तू याचना करशील आणि तो तुझं ऐकेल;
त्याला केलेले नवस तू फेडशील.
२८ तू जे काही हाती घेशील ते यशस्वी होईल,
तुझा मार्ग उजळून जाईल.
२९ जर तू उद्धटपणे बोललास, तर तुझा अपमान होईल,
पण तो नम्र लोकांना वाचवेल.
३० तो निर्दोष लोकांना सोडवतो;
जर तुझे हात शुद्ध असतील, तर तुझी नक्कीच सुटका होईल.”
२३ मग ईयोबने उत्तर दिलं:
२ “उसासे टाकून मी गळून गेलोय,
पण आजही मी गप्प बसणार नाही, मी तक्रार करत राहीन.+
३ देव कुठे सापडेल हे मला माहीत असतं, तर किती बरं झालं असतं!+
म्हणजे तो जिथे राहतो, तिथे मी गेलो असतो.+
४ मी त्याच्यासमोर माझी बाजू मांडली असती,
आणि बरेच तर्क* केले असते.
५ मग तो काय उत्तर देतो, हे मला कळलं असतं;
त्याने सांगितलेल्या गोष्टी मी लक्ष देऊन ऐकल्या असत्या.
६ माझ्याशी वाद घालताना त्याने त्याची अफाट शक्ती दाखवली असती का?
नाही, मला खातरी आहे, त्याने माझं ऐकून घेतलं असतं.+
७ मग त्याच्यासमोर प्रामाणिक माणूस आपला वाद सोडवू शकला असता,
आणि माझ्या न्यायाधीशाने मला कायमचं निर्दोष ठरवलं असतं.
८ पण मी पूर्वेकडे गेलो, तर तो तिथे नसतो,
आणि मी पश्चिमेला गेलो, तरी तो मला सापडत नाही;
९ तो उत्तरेकडे आपलं काम करत असला, तर मी त्याला पाहू शकत नाही;
आणि तो दक्षिणेकडे वळला, तरी तो मला दिसत नाही.
१० पण मी कोणत्या वाटेने जातोय, हे त्याला माहीत आहे.+
त्याने मला पारखल्यावर मी शुद्ध सोन्यासारखा निघेन.+
११ मी नेहमी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो;
मी कधीही उजवीडावीकडे वळलो नाही.+
१२ त्याच्या तोंडातून निघालेली आज्ञा मी कधीच मोडली नाही.
माझ्याकडून केलेल्या अपेक्षेपलीकडे,* मी त्याच्या शब्दांचं पालन केलं.+
१३ त्याने जर निश्चय केला, तर त्याला कोण अडवू शकतं?+
त्याने जर काही ठरवलं, तर ते केल्याशिवाय तो राहत नाही.+
१४ माझ्या बाबतीत त्याने जे काही ठरवलंय,* ते तो नक्कीच करेल;
अशा बऱ्याच गोष्टी त्याने ठरवल्या आहेत.
१५ म्हणून मला त्याची भीती वाटते;
मी जितका त्याच्याबद्दल विचार करतो, तितकंच माझं भय वाढत जातं.
१६ सर्वशक्तिमान देवाने मला भयभीत केलंय,
माझ्या काळजाचं पाणी पाणी झालंय!
१७ अंधाराने मला घेरलंय आणि काळोखाने मला झाकून टाकलंय,
पण तरी मी शांत राहणार नाही.
२४ सर्वशक्तिमान देव एक वेळ का ठरवत नाही?+
त्याला जाणणारे त्याचा दिवस* का पाहू शकत नाहीत?
४ ते गरिबांना मार्गावरून बाजूला करतात;
दीनदुबळ्यांना त्यांच्यापासून लपावं लागतं.+
५ गोरगरीब जंगलातल्या रानगाढवांसारखे+ अन्न शोधत फिरतात;
मुलाबाळांसाठी अन्न शोधत ते वाळवंटात भटकतात.
६ त्यांना दुसऱ्यांच्या शेतात कापणी करावी लागते*
आणि ते दुष्टांच्या मळ्यात उरलेली द्राक्षं गोळा करतात.
७ ते कपड्यांशिवाय, उघडेच रात्र घालवतात.+
त्यांच्याजवळ थंडीत पांघरायला काहीच नसतं.
८ पर्वतावरून येणाऱ्या पावसाने ते ओलेचिंब होतात;
आसरा नसल्यामुळे ते खडकांना बिलगून बसतात.
९ दुष्ट लोक वडील नसलेल्या मुलाला* आईच्या छातीपासून ओढून नेतात;+
गोरगरिबांचे कपडे ते कर्जासाठी तारण म्हणून घेतात.+
१० त्यामुळे गोरगरिबांना उघडंच फिरावं लागतं;
ते धान्याच्या पेंढ्या वाहून नेतात, पण स्वतः उपाशीच राहतात.
११ द्राक्षमळ्याच्या भिंतींमागे ते भर दुपारी राबतात;*
द्राक्षकुंडांमध्ये ते द्राक्ष तुडवतात, पण स्वतः तहानलेलेच राहतात.+
१२ शहरातून मरायला टेकलेल्यांचं कण्हणं ऐकू येतं;
जखमी झालेले मदतीसाठी आक्रोश करतात,+
पण देवाला याची काहीच पर्वा नाही.*
१३ दुष्ट प्रकाशाविरुद्ध बंड करतात;+
त्यांना त्याचे मार्ग माहीत नाहीत,
आणि ते त्याच्या मार्गांवर चालत नाहीत.
१५ व्यभिचारी माणूस संध्याकाळची वाट पाहतो,+
‘मला कोणी पाहणार नाही,’ असं म्हणून,+
तो आपलं तोंड झाकून घेतो.
१६ दुष्ट रात्री घरं फोडतात;*
दिवसा ते आपल्या घरांमध्ये लपतात.
त्यांना प्रकाश माहीतच नसतो.+
१७ सकाळ त्यांना गडद अंधारासारखी वाटते;
भयाण काळोख त्यांना ओळखीचा वाटतो.
१८ पण ते पाण्यासोबत वेगाने वाहून जातील.*
त्यांचा जमिनीचा वाटा शापित होईल.+
आपल्या द्राक्षमळ्यांकडे ते परत येणार नाहीत.
२० दुष्टाची आई* त्याला विसरेल; किडे त्याला फस्त करतील.
कोणालाही त्याची आठवण राहणार नाही.+
त्याला झाडाप्रमाणे तोडून टाकलं जाईल.
२१ तो वांझ स्त्रीवर अन्याय करतो,
आणि विधवेवर अत्याचार करतो.
२२ देव* आपल्या ताकदीने शक्तिशाली लोकांचा नाश करेल;
त्यांची भरभराट झाली, तरी त्यांना आपल्या जीवाचा भरवसा नसेल.
२४ ते थोड्या काळासाठी समृद्ध होतात, मग ते नाहीसे होतात.+
त्यांना खाली ओढलं जातं;+
आणि कणसांप्रमाणे कापून, इतरांप्रमाणेच गोळा केलं जातं.
२५ आता सांगा, मला कोण खोटं ठरवू शकतं?
माझे शब्द चुकीचे आहेत, असं कोण म्हणू शकतं?”
२५ बिल्दद+ शूही याने उत्तर दिलं:
२ “राज्य देवाचं आहे, तो शक्तिशाली आणि भीतिदायक आहे;
तोच स्वर्गात* शांती स्थापन करतो.
३ त्याचं सैन्य कोणी मोजू शकतं का?
त्याचा प्रकाश कोणावर चमकत नाही?
४ मग नाशवंत माणूस देवासमोर नीतिमान कसा असू शकतो?+
स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष* कसा असू शकतो?+
५ त्याच्या दृष्टीने तर चंद्रालाही तेज नाही
आणि त्याला तारेही अशुद्ध वाटतात.
६ मग किड्यासारख्या माणसाबद्दल;
कीटकासारख्या मानवाबद्दल काय बोलायचं!”
२६ मग ईयोबने उत्तर दिलं:
२ “व्वा! दुर्बळ माणसाला तू चांगलीच मदत केलीस!
असाहाय्य माणसाला किती चांगला आधार दिलास!+
३ ज्याला बुद्धी नाही त्याला तू फार छान सल्ला दिलास!+
अगदी उदारपणे* आपलं शहाणपण* वाटलंस!
४ तू हे सगळं कोणाला सांगत आहेस?
कोणाच्या प्रेरणेने बोलत आहेस?*
५ मेलेले थरथर कापतात;
ते समुद्र आणि त्यातल्या जीवांपेक्षाही खोलवर आहेत.
९ तो आपल्या राजासनावर ढग पसरून,
ते दृष्टिआड करतो.+
११ आकाशाचे स्तंभ थरथर कापतात,
त्याने आवाज चढवताच ते हादरून जातात.
१२ तो आपल्या सामर्थ्याने समुद्रात खळबळ माजवतो,+
आपल्या समजशक्तीने समुद्रातल्या महाकाय प्राण्याचे* तुकडेतुकडे करतो.+
१४ पाहा! ही तर त्याच्या कार्यांची फक्त किनार आहे;+
त्याच्या सामर्थ्याची फक्त एक पुसटशी चाहूल आपल्याला ऐकू येते!
मग त्याच्या भयानक गर्जनेचा अर्थ कोण सांगू शकेल?”+
२७ ईयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:
२ “मला न्याय नाकारणाऱ्या जिवंत देवाची शपथ,+
मला* दुःख देणाऱ्या सर्वशक्तिमान देवाची शपथ,+
३ जोपर्यंत माझ्यात श्वास आहे
आणि देवाने घातलेला श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे,+
४ तोपर्यंत माझ्या ओठांवर वाईट बोल येणार नाहीत;
आणि माझी जीभ खोटं बोलणार नाही.
५ तुम्हाला नीतिमान म्हणण्याचा मी विचारही करू शकत नाही!
मरेपर्यंत मी माझा खरेपणा सोडणार नाही!*+
७ माझ्या शत्रूची स्थिती दुष्टासारखी,
आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्याची स्थिती, अनीतीने वागणाऱ्यांसारखी होऊ दे!
९ त्याच्यावर संकट येईल,
तेव्हा देव त्याचा आक्रोश ऐकेल का?+
१० किंवा दुष्टाला सर्वशक्तिमान देवामुळे आनंद होईल का?
आणि तो नेहमी देवाला प्रार्थना करेल का?
११ देवाच्या सामर्थ्याबद्दल* मी तुम्हाला शिकवीन;
सर्वशक्तिमान देवाबद्दल कोणतीही गोष्ट मी लपवून ठेवणार नाही.
१२ जर तुम्ही सगळ्यांनी दृष्टान्त पाहिले आहेत,
तर मग तुमची भाषणं इतकी अर्थहीन का वाटतात?
१३ दुष्टाला देवाकडून हाच वाटा मिळेल,+
अत्याचार करणाऱ्यांना सर्वशक्तिमान देवाकडून हाच वारसा मिळेल.
१४ त्याला खूप मुलं झाली, तर ती तलवारीने मरतील,+
त्याच्या वंशजांना खायला पुरेसं अन्न मिळणार नाही.
१५ त्याच्यामागे जे उरतील त्यांना महामारीमुळे पुरलं जाईल,
त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी अश्रू गाळणार नाहीत.
१६ त्याने जरी धुळीसारखी चांदीची रास रचली
आणि मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे उत्तम वस्त्रं साठवून ठेवली,
१७ तरी त्याने जमवलेली ती वस्त्रं,
नीतिमान माणूस घालेल,+
आणि निर्दोष माणसं त्याची चांदी आपसात वाटून घेतील.
१८ त्याने बांधलेलं घर किड्याच्या कोशासारखं;*
आणि पहारेकऱ्याने बनवलेल्या झोपडीसारखं+ नाजूक असतं.
१९ तो झोपताना श्रीमंत असेल, पण त्याच्या हाती काहीच लागणार नाही;
तो डोळे उघडेल, तेव्हा त्याच्याजवळ काहीच नसेल.
२० संकटं त्याला पुरासारखी गाठतील;
रात्री त्याला वादळ उडवून नेईल.+
२१ पूर्वेकडचा वारा त्याला उचलून नेईल आणि तो नाहीसा होईल;
तो वारा त्याला त्याच्या ठिकाणाहून वाहून नेईल.+
२२ त्या जोरदार वाऱ्यापासून वाचण्याचा तो खूप प्रयत्न करेल,+
पण वारा दयामाया न दाखवता त्याला झोडपून काढेल.+
२३ तो त्याला पाहून टाळ्या वाजवतो
आणि आपल्या ठिकाणाहून शिट्ट्या मारून+ त्याची थट्टा करतो.*
२८ चांदी खणून काढण्याचं ठिकाण असतं
आणि जिथे सोनं सापडतं अशीही जागा असते;
२ लोखंड जमिनीतून काढलं जातं,
४ लोकवस्तीपासून दूर तो जमिनीत खाण खणतो;
लोकांची ये-जा नसलेल्या ओसाड भागांत,
माणसं जमिनीत उतरून लोंबकळत असतात.
५ पृथ्वीवर अन्न उगवतं,
पण खाली जणू अग्नीने पृथ्वीची उलथापालथ होत असते.*
६ तिथे दगडांत नीलमणी सापडतात,
आणि धुळीच्या कणांत सोनं असतं.
७ शिकारी पक्ष्यांना तिथला मार्ग माहीत नाही;
काळ्या घारीच्या डोळ्याला ती वाट दिसत नाही.
८ कोणताही हिंस्र प्राणी तिथे पाऊल ठेवत नाही;
तरुण सिंह कधी तिथे शिकार शोधत फिरत नाही.
९ माणूस हाताने कठीण खडक* फोडतो;
तो पर्वतांचा पाया उलथून टाकतो.
११ तो नदीच्या उगमातून येणारं पाणी अडवतो
आणि जे गुप्त होतं, ते उजेडात आणतो.
१२ पण बुद्धी—ती कुठे शोधावी?+
आणि समजशक्ती कुठे सापडेल?+
१३ माणसांना तिची किंमत कळत नाही,+
आणि जिवंतांच्या देशात ती पाहायला मिळत नाही.
१४ सागर म्हणतो, ‘ती माझ्यात नाही!’
आणि समुद्र म्हणतो, ‘ती माझ्याजवळ नाही!’+
१५ ती शुद्ध सोन्याने विकत घेता येत नाही;
चांदीच्या मोबदल्यातही मिळत नाही.+
१९ कूशचं पुष्कराज+ रत्नही तिच्या तोडीचं नाही;
शुद्ध सोन्यानेही ती विकत घेता येत नाही.
२० पण मग बुद्धी येते कुठून?
आणि समजशक्ती कुठे सापडते?+
२१ प्रत्येक सजीव प्राण्यापासून ती लपलेली आहे+
आणि आकाशातल्या पक्ष्यांपासून ती गुप्त आहे.
२२ विनाश आणि मृत्यू म्हणतात,
‘आम्ही तर तिच्याबद्दल फक्त ऐकलंय.’
२३ तिला शोधायचा मार्ग देवालाच माहीत आहे;
ती कुठे राहते हे फक्त तोच सांगू शकतो,+
२४ कारण त्याची नजर पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत जाते,
आकाशाखालचं सर्वकाही त्याला दिसतं.+
२५ जेव्हा त्याने वाऱ्याचा जोर* ठरवला+
आणि पाण्याचं मोजमाप केलं;+
२६ जेव्हा त्याने पावसासाठी नियम घालून दिला+
आणि गरजणाऱ्या ढगाला मार्ग आखून दिला,+
२७ तेव्हा त्याने बुद्धीला पाहून, तिचं वर्णन केलं;
तिचा पाया रचून तिला पारखलं.
२८ आणि तो मानवाला म्हणाला:
२९ ईयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:
२ “ते पूर्वीचे दिवस परत आले तर किती बरं होईल!
तेव्हा देव माझा सांभाळ करत होता,
३ त्याचा दिवा माझ्या डोक्यावर चमकायचा,
आणि त्याचा प्रकाश मला अंधारातही वाट दाखवायचा,+
४ तेव्हा मी तारुण्यात* होतो,
आणि माझ्या तंबूवर देवाच्या मैत्रीची छाया होती,+
५ तेव्हा मला सर्वशक्तिमान देवाची साथ होती,
आणि माझी सगळी मुलं* माझ्या अवतीभवती होती,
६ तेव्हा माझी पावलं लोण्याने भिजलेली असायची,
आणि माझ्यासाठी खडकांतून तेलाच्या धारा वाहायच्या.+
९ अधिकारी माझ्यापुढे गप्प बसायचे
आणि ते आपला हात तोंडावर ठेवायचे.
१० प्रतिष्ठित माणसांच्या तोंडून शब्दही निघायचा नाही;
त्यांची जीभ टाळूला चिकटलेली असायची.
११ जो कोणी माझं बोलणं ऐकायचा, तो माझी प्रशंसा करायचा
आणि मला पाहणारे माझ्या बाजूने साक्ष द्यायचे.
१३ जो मरायच्या बेतात होता, तो मला आशीर्वाद द्यायचा,+
मी केलेल्या साहाय्यामुळे विधवांना आनंद व्हायचा.+
१४ नीतीने वागणं माझ्यासाठी वस्त्रासारखं होतं;
न्याय माझ्यासाठी अंगरख्यासारखा* आणि पगडीसारखा होता.
१५ मी आंधळ्यांसाठी डोळे;
आणि लंगड्यांसाठी पाय झालो.
१७ मी दुष्टाचा जबडा तोडायचो+
आणि त्याच्या तावडीत सापडलेल्या लोकांना सोडवायचो.
१९ माझी मुळं पाण्यापर्यंत पसरतील,
आणि माझ्या फांद्या रात्रभर दवाने भिजलेल्या असतील.
२० माझी प्रतिष्ठा कधीच ढळणार नाही,
आणि मी आपलं धनुष्य चालवत राहीन.’
२१ लोक उत्सुकतेने माझं बोलणं ऐकायचे;
माझ्या सल्ल्याची शांतपणे वाट पाहायचे.+
२२ मी बोलल्यावर, ते आणखी काही बोलायचे नाहीत;
माझे शब्द त्यांना पावसाच्या मंद सरींसारखे वाटायचे.*
२३ पावसासारखी ते माझी वाट पाहायचे;
शेवटच्या पावसासारखी, ते आतुरतेने माझ्या शब्दांची वाट पाहायचे.+
२४ मी हसून त्यांच्याकडे पाहिलं, तर त्यांचा विश्वासच बसायचा नाही;
माझा प्रसन्न चेहरा पाहून त्यांना धीर यायचा.*
२५ त्यांचा प्रमुख म्हणून मी त्यांना मार्गदर्शन करायचो,
आपल्या सैन्यासोबत राहणाऱ्या राजासारखा;+
दुःखी लोकांचं सांत्वन करणाऱ्यासारखा मी होतो.+
३० पण ज्यांच्या वडिलांना, माझे कळप राखणाऱ्या कुत्र्यांसोबतही ठेवण्याचा
मी कधी विचार केला नसता,
असे तरुण आता मला हसतात;+
२ त्यांच्या हातांचं बळ माझ्या काय कामाचं?
त्यांची ताकद संपली आहे.
३ गरिबीने आणि उपासमारीने ते खंगले आहेत;*
आधीच उद्ध्वस्त झालेल्या आणि ओसाड पडलेल्या
कोरड्या जमिनीवरून, मिळेल ते खाऊन ते पोट भरतात.
४ ते झाडाझुडपांतून खारट पानं गोळा करतात;
झाडांची कडवट मुळं त्यांचं अन्न आहे.
५ त्यांना त्यांच्या वस्तीतून हाकलून लावण्यात आलंय;+
चोराच्या मागून ओरडावं तसं लोक त्यांच्यावर ओरडतात.
६ ते दऱ्याखोऱ्यांत; जमिनीतल्या खड्ड्यांत
आणि कडेकपारींत राहतात.
७ ते झुडपांमधून ओरडत राहतात;
खाजकुइलीच्या झुडपांत ते घोळक्याने बसलेले असतात.
८ मूर्ख आणि नालायक माणसांच्या मुलांसारखं,
त्यांना देशातून हुसकावून लावण्यात* आलंय.
१० ते माझ्यापासून चार हात लांब राहतात;+
त्यांना माझी घृणा वाटते;
माझ्या तोंडावर थुंकायलाही ते कमी करत नाहीत.+
१२ उजवीकडून ते टोळीने माझ्यावर उठतात;
ते मला सळो की पळो करून सोडतात,
आणि माझ्या मार्गावर विनाशाचे अडसर उभे करतात.
१४ भिंतीतल्या मोठ्या फटीतून* आत यावं, तसे ते येतात;
माझ्या संकटांत ते माझ्यावर तुटून पडतात.
१५ मला दहशत बसली आहे;
माझी प्रतिष्ठा वाऱ्यासारखी उडून गेली आहे,
माझी सुटकेची आशा ढगासारखी विरून गेली आहे.
१९ देवाने मला चिखलात फेकून दिलंय;
धुळीसारखी आणि राखेसारखी माझी अवस्था झाली आहे.
२० मी मदतीची याचना करतो, पण तू माझं ऐकत नाहीस;+
मी उभा राहतो, पण तू माझ्याकडे नुसताच पाहत राहतोस.
२१ तू निर्दयीपणे माझ्याविरुद्ध उठला आहेस;+
तुझ्या हाताच्या पूर्ण शक्तीने तू माझ्यावर प्रहार करतोस.
२२ तू मला उचलून वाऱ्याने उडवून लावतोस
आणि मग वादळात इकडेतिकडे भिरकावतोस.*
२३ मला माहीत आहे, की तू मला मृत्यूच्या दारात नेशील;
जिवंत असलेल्या सगळ्यांचीच त्या घरात भेट होणार आहे.
२५ ज्यांचे वाईट दिवस आले, त्यांच्यासाठी मी रडलो नाही का?
मी गरिबांसाठी हळहळलो नाही का?+
२६ मी चांगल्याची अपेक्षा केली, पण माझ्यासोबत वाईट घडलं;
मी उजेडाची वाट पाहत होतो, पण माझ्या वाट्याला अंधारच आला.
२७ माझी घालमेल संपतच नाही;
दुःखाचे दिवस माझ्यापुढे उभे आहेत.
२८ मी निराशेच्या अंधारात फिरतो;+ कुठेही प्रकाश दिसत नाही.
मी मंडळीत उठून मदतीसाठी विनवणी करतो.
२९ कोल्हे जणू माझे भाऊबंद;
आणि शहामृग माझे सोबती झाले आहेत.+
३१ माझ्या वीणेतून* फक्त शोकाचे स्वर येतात;
माझ्या बासरीतून फक्त दुःखाचेच सूर निघतात.
३१ मी आपल्या डोळ्यांसोबत करार केला आहे.+
मग एखाद्या तरुणीकडे मी वाईट नजरेने कसा पाहू?+
२ असं केलं, तर स्वर्गातल्या देवाकडून मला काय वाटा मिळेल?
आणि उंचावर राहणाऱ्या सर्वशक्तिमान देवाकडून मला काय वारसा मिळेल?
३ दुष्टावर विपत्ती येणार नाही का?
वाईट कृत्यं करणारा संकटात सापडणार नाही का?+
४ देवाची नजर माझ्या मार्गांवर आहे;+
तो माझी सर्व पावलं मोजतो.
५ मी कधी खोट्या मार्गाने* चाललोय का?
किंवा फसवणूक करण्यासाठी माझे पाय कधी धावले का?+
७ जर माझी पावलं भरकटली असतील,+
किंवा माझ्या डोळ्यांनी माझ्या मनाला मोहात पाडलं असेल,+
किंवा माझे हात अशुद्ध झाले असतील,
८ तर मी पेरलेलं पीक दुसऱ्याने खावं+
आणि जे मी लावलं, ते उपटून टाकलं जावं.*
९ जर माझं मन दुसऱ्या स्त्रीमुळे भुलवलं गेलं असेल+
आणि मी माझ्या शेजाऱ्याच्या दाराजवळ टपून बसलो असेन,+
१० तर माझ्या बायकोने दुसऱ्या पुरुषाचं दळण दळावं,
आणि इतर माणसांनी तिच्यासोबत संबंध ठेवावेत.+
११ कारण ते माझ्याकडून घडलेलं लाजिरवाणं कृत्य असेल,
आणि त्या अपराधासाठी मला न्यायाधीशांकडून शिक्षा मिळावी.+
१२ ती उद्ध्वस्त करणारी आग असेल;+
ती माझ्या सर्व उत्पन्नाचा अगदी मुळापासून नाश करेल.
तो हिशोब मागेल, तेव्हा मी काय उत्तर देईन?+
१५ ज्याने गर्भाशयात माझी रचना केली, त्यानेच त्यांचीही रचना केली नाही का?+
त्या एकाच देवाने आम्हाला जन्माआधी* घडवलं नाही का?+
१६ जर मी गरिबांची इच्छा पूर्ण केली नसेल,+
किंवा जर माझ्यामुळे विधवांचे डोळे पाणावले असतील;*+
१७ जर मी अनाथांना माझ्या घासातला घास दिला नसेल
आणि माझं अन्न एकट्यानेच खाल्लं असेल;+
१८ (कारण मी तर माझ्या तरुणपणापासून, अनाथाला* पित्यासारखं सांभाळलं आहे,
१९ जर मी एखाद्याला कपड्यांशिवाय थंडीने मरताना पाहिलं असेल,
किंवा गरिबाकडे पांघरायला काही नाही, असं पाहिलं असेल;+
२० जर माझ्या मेंढरांच्या लोकरीची ऊब घेत,
त्याने मला आशीर्वाद दिला नसेल;+
२१ शहराच्या फाटकाजवळ,+ माझ्या मदतीची गरज असलेल्या* अनाथावर,
जर मी हात उगारला असेल;+
२२ तर माझा हात खांद्यापासून निखळू दे,
आणि माझा हात कोपरापासून तुटू दे.
२३ कारण देवाकडून येणाऱ्या संकटाचं मला भय होतं;
त्याच्या गौरवापुढे मी उभा राहू शकलो नसतो.
२४ जर मी सोन्यावर भरवसा ठेवला असेल,
आणि ‘तूच मला संरक्षण देशील!’ असं शुद्ध सोन्याला म्हटलं असेल;+
२५ माझ्याजवळ असलेली अमाप संपत्ती
आणि मी मिळवलेल्या मौल्यवान वस्तू यांतच जर मी आनंदी राहिलो असेन;+
किंवा आकाशात चंद्राचं वैभव पाहून;+
२७ माझं मन गुप्तपणे मोहित झालं असेल
आणि मी माझ्या हाताचं चुंबन घेऊन त्यांची उपासना केली असेल;+
२८ तर माझ्या या अपराधाची मला न्यायाधीशांकडून शिक्षा मिळावी,
कारण हे स्वर्गातल्या देवाला नाकारण्यासारखं आहे.
२९ माझ्या शत्रूचा नाश झाल्यामुळे मला कधी आनंद झालाय का?+
किंवा त्याचं वाईट झाल्यावर मी कधी खूश झालोय का?
३१ माझ्या तंबूतली माणसं असं म्हणाली नाहीत का,
‘त्याच्या अन्नाने* तृप्त न झालेला माणूस शोधून सापडणार नाही’?+
३२ प्रवाशांसाठी माझ्या घराची दारं नेहमी उघडी असायची;
कोणत्याही परदेशी* माणसाला उघड्यावर रात्र घालवावी लागली नाही.+
३३ मी कधी इतर माणसांसारखे माझे अपराध झाकायचा प्रयत्न केलाय का?+
माझ्या चुका मी कधी अंगरख्यात लपवल्या आहेत का?
३४ लोक काय म्हणतील या भीतीने,
आणि शेजाऱ्यांच्या धाकाने,
मी कधी घाबरून घरात गुपचूप बसलोय का?
३५ कोणी माझं ऐकून घेतलं, तर किती बरं होईल!+
माझा प्रत्येक शब्द खरा आहे, असं मी शपथ घेऊन सांगीन.*
सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावं!+
माझ्या विरोधकाने त्याचे आरोप लिहून दिले, तर किती बरं होईल!
३६ मी ते माझ्या खांद्यावर घेऊन फिरेन,
आणि माझ्या डोक्यावर मुकुटासारखे घालीन.
३७ मी त्याला माझ्या प्रत्येक पावलाचा हिशोब देईन;
एखाद्या राजकुमारासारखा मी धैर्याने त्याच्यासमोर जाईन.
३८ जर माझ्या जमिनीने माझ्याविरुद्ध तक्रार केली असेल
आणि नांगराने ओढलेल्या रेघा एकत्र मिळून रडल्या असतील;
३९ जर मी मोबदला न देता तिचा उपज खाल्ला असेल,+
किंवा मी तिच्या मालकांना* त्रास दिला असेल;+
४० तर माझ्या जमिनीतून गव्हाच्या ऐवजी काटे उगवावेत
आणि जवाच्या ऐवजी उग्र वासाची झुडपं उगवावीत.”
ईयोबचे शब्द इथे संपतात.
३२ त्या तीन माणसांनी ईयोबला पुढे काहीच उत्तर दिलं नाही, कारण ईयोबला आपण नीतिमान असल्याची पूर्ण खातरी होती.*+ २ पण रामच्या घराण्यातल्या बरखेल बूजीचा+ मुलगा अलीहू याला खूप राग आला. देवाऐवजी ईयोब स्वतःला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तो ईयोबवर संतापला.+ ३ तसंच, ईयोबच्या तीन मित्रांनी त्याला योग्य उत्तर देण्याऐवजी, देवाला दुष्ट म्हटल्यामुळे तो त्यांच्यावरही चिडला.+ ४ पण ते वयाने मोठे असल्यामुळे, ईयोबला उत्तर देण्याची आपल्याला कधी संधी मिळते, याची तो वाट पाहत होता.+ ५ त्या तिघांजवळ बोलायला काहीही नाही, हे पाहून अलीहूचा राग भडकला. ६ म्हणून बरखेल बूजीचा मुलगा अलीहू याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला:
तुमच्याबद्दल आदर असल्यामुळे मी गप्प बसलो,+
आणि मला जे कळतं ते सांगायचं मी धैर्य केलं नाही.
७ मी विचार केला, ‘मोठ्या माणसांना* बोलू द्यावं.
ज्यांनी जास्त दिवस पाहिलेत त्यांना बुद्धीच्या गोष्टी सांगू द्याव्या.’
८ पण माणसाला समजबुद्धी ही देवाच्या पवित्र शक्तीमुळे;*
सर्वशक्तिमान देवाच्या श्वासामुळेच मिळते.+
९ फक्त वयामुळे* माणसाला शहाणपण* येत नाही,
आणि योग्य काय ते फक्त म्हाताऱ्या माणसांनाच समजतं, असं नाही.+
१० म्हणून म्हणतो, ‘माझं ऐका,
म्हणजे मला जे कळतं ते मीही तुम्हाला सांगीन.’
११ तुमचं बोलणं संपेपर्यंत मी थांबलो;+
तुम्ही उत्तरं शोधत होता
आणि वादविवाद करत होता, तेव्हा मी ऐकत होतो.+
१२ तुमचं बोलणं मी लक्ष देऊन ऐकलं,
पण ईयोबला खोटं ठरवणं;*
किंवा त्याचा तर्क खोडून काढणं एकालाही जमलं नाही.
१३ म्हणून, ‘आम्हीच बुद्धिमान आहोत,
आणि माणूस नाही, तर देवच ईयोबला ताडन करतोय’ असं म्हणू नका.
१४ तो काही माझ्याविरुद्ध बोलला नाही;
त्यामुळे मी त्याला तुमच्यासारखी उत्तरं देणार नाही.
१५ ही माणसं कावरीबावरी झाली आहेत, काय बोलावं हे त्यांना सुचत नाही;
आता त्यांच्याजवळ द्यायला उत्तरच नाही.
१६ मी वाट पाहतोय, पण ते काही बोलतच नाहीत;
ते नुसतेच गप्प उभे आहेत.
१७ म्हणून आता मी उत्तर देईन;
मला जे कळतं ते मीही सांगीन.
१८ मला खूप काही बोलायचंय;
पवित्र शक्ती मला बोलायला भाग पाडत आहे.
२० मला बोलू द्या; तरच मला चैन पडेल!
मी आपलं तोंड उघडून उत्तर देईन.
२१ मी कोणाचीही बाजू घेणार नाही;+
माणसांची खोटी प्रशंसा करणार नाही,*
२२ कारण खोटी प्रशंसा करणं मला जमतच नाही;
आणि जर मी केली, तर माझा निर्माणकर्ता लगेच माझा नाश करेल.
३३ पण ईयोब, आता माझे शब्द लक्ष देऊन ऐक;
मी जे काही सांगतो ते ऐक.
२ मला माझं तोंड उघडावंच लागेल;
माझ्या जिभेला* बोलावंच लागेल.
३ माझ्या शब्दांतून माझा प्रामाणिकपणा दिसून येईल,+
मला जे कळतं ते मी मनापासून सांगीन.
५ तुला उत्तर देता येत असेल तर दे;
तुझे वाद माझ्यापुढे मांडायला तयार हो.
६ बघ! देवापुढे मीही तुझ्यासारखाच आहे;
मलाही मातीपासूनच घडवण्यात आलंय.+
७ म्हणून मला घाबरू नकोस,
माझ्या शब्दांमुळे तुला दडपण येणार नाही.
८ पण मी तुला असं बोलताना ऐकलं,
आणि तू सारखंसारखं असं म्हणत होतास,
९ ‘मी शुद्ध आहे, मी अपराध केला नाही;+
मी निर्दोष आहे, मी काहीच चुकीचं केलेलं नाही.+
१० पण देव माझा विरोध करायला निमित्तं शोधतो;
तो मला आपला शत्रू समजतो.+
१२ पण तू चुकीचं बोलत आहेस, म्हणून मी तुला सांगतो:
देव नाशवंत माणसापेक्षा फार महान आहे.+
१३ तू त्याच्याविरुद्ध का तक्रार करतोस?+
त्याने तुला काही उत्तर दिलं नाही म्हणून?+
१४ देव एकदा बोलतो, मग दुसऱ्यांदा बोलतो,
पण माणूस लक्ष देत नाही.
१५ लोक जेव्हा गाढ झोपेत असतात,
जेव्हा ते आपल्या बिछान्यावर झोपलेले असतात,
तेव्हा स्वप्नात, रात्रीच्या दृष्टान्तात,+
१६ तो त्यांचे कान उघडतो+
आणि त्यांच्या मनात आपलं शिक्षण रुजवतो.*
१९ एखादा अंथरुणात वेदनेने तळमळतो;
हाडांच्या सतत दुखण्याने तो कण्हतो, तेव्हा तो धडा शिकतो,
२० त्याच्या जिवाला अन्न नकोसं वाटतं;
२१ त्याचं शरीर अशक्त होत जातं,
पूर्वी न दिसणारी त्याची सगळी हाडं दिसू लागतात.*
२२ तो* कबरेच्या जवळ जाऊ लागतो;
नाश करणारे त्याच्या जीवनाचा ताबा घेतात.
२३ जर त्याच्याकडे कोणी दूत* आला;
त्याच्यासाठी मध्यस्थी करणारा हजारातला एक, असा कोणी आला,
आणि त्याने त्याला योग्य मार्ग दाखवला,
२४ तर देव त्याच्यावर कृपा करेल आणि म्हणेल,
‘याला कबरेत जाऊ देऊ नका!+
मला खंडणी मिळाली आहे!+
२५ त्याचं शरीर तरुणपणात होतं त्यापेक्षा ताजंतवानं* व्हावं;+
त्याच्या तारुण्यातला उत्साह त्याला परत मिळावा.’+
२६ तो देवाकडे विनंती करेल,+ आणि ती स्वीकारली जाईल,
देवाचा चेहरा पाहून तो आनंदाने ओरडेल,
देव त्याला पुन्हा नीतिमान ठरवेल.
२७ मग तो इतरांना सांगेल,*
‘माझ्या हातून पाप घडलं;+ मी चुकीच्या मार्गाने गेलो,
पण ज्या शिक्षेच्या मी लायक होतो, ती मला मिळाली नाही.*
२९ देव माणसासाठी या गोष्टी
दोनदा, तर कधी तीनदा करतो.
३० त्याला त्या माणसाला,* कबरेत जाण्यापासून वाचवायचं असतं;
त्याला जीवनाचा प्रकाश मिळावा अशी देवाची इच्छा असते.+
३१ म्हणून ईयोब, माझं ऐक! माझ्या बोलण्याकडे लक्ष दे!
शांत राहा, म्हणजे मी पुढे बोलीन.
३२ तुला काही बोलायचं असेल, तर जरूर बोल.
मला उत्तर दे, कारण तुला निर्दोष ठरवण्याचीच माझी इच्छा आहे.
३३ पण तुझ्याजवळ बोलायला काहीच नसेल, तर माझं ऐक.
शांत राहून ऐक, म्हणजे मी तुला बुद्धीच्या गोष्टी सांगीन.”
३४ मग अलीहू पुढे म्हणाला:
२ “बुद्धिमान माणसांनो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या;
पुष्कळ ज्ञान असलेल्यांनो, माझं ऐका.
३ जशी जिभेला* चव कळते,
तसेच कान शब्दांची पारख करतात.
४ योग्य काय आहे, हे आपण तपासून पाहू;
चांगलं काय आहे, ते आपसात ठरवू.
६ माझा न्याय कसा व्हावा, याबद्दल मी खोटं बोलीन का?
काहीच चूक केलेली नसताना, माझा घाव बरा होत नाही.’+
७ अपमानाचे घोट पाण्याप्रमाणे पिणारा,
ईयोबसारखा दुसरा कोणी आहे का?
८ तो वाईट कामं करणाऱ्यांच्या सोबत राहतो
आणि दुष्टांशी मैत्री करतो.+
९ तो म्हणतो, ‘देवाच्या इच्छेप्रमाणे वागल्याने
माणसाला काहीच फायदा होत नाही.’+
१० म्हणून समजशक्ती* असलेल्यांनो माझं ऐका:
११ कारण माणसाच्या कार्यांप्रमाणे देव त्याला प्रतिफळ देईल;+
आणि त्याच्या वागणुकीचे परिणाम त्याला भोगायला लावेल.
१३ त्याला सर्व पृथ्वीचा अधिकार कोणी दिला?
आणि सबंध जगावर त्याला कोणी नेमलं?
१४ जर त्याने मानवांवर आपली नजर* रोखली,
आणि त्यांची जीवन-शक्ती व श्वास आपल्याकडे परत घेतला,+
१५ तर सर्व मानवांचा एकाच वेळी नाश होईल
आणि संपूर्ण मानवजात मातीला मिळेल.+
१६ म्हणून, तुमच्याजवळ समजशक्ती असेल, तर लक्ष द्या;
मी काय म्हणतोय, ते नीट ऐका.
१७ जो न्यायाचा द्वेष करतो, त्याच्याकडे अधिकार असू शकतो का?
तुम्ही नीतिमान असलेल्या एका शक्तिशाली अधिकाऱ्याला दोषी ठरवाल का?
१८ ‘तू काहीच कामाचा नाहीस,’ असं तुम्ही एका राजाला म्हणाल का?
किंवा ‘तुम्ही दुष्ट आहात,’ असं अधिकाऱ्यांना म्हणाल का?+
१९ देव अधिकाऱ्यांचा पक्ष घेत नाही
आणि गरिबांपेक्षा श्रीमंतांवर* जास्त कृपा करत नाही,+
कारण त्या सर्वांनाच त्याने आपल्या हातांनी घडवलंय.+
२० मध्यरात्री अचानक त्यांचा मृत्यू होतो;+
त्यांचा थरकाप उडतो आणि ते नाहीसे होतात;
ताकदवान लोकही, मानवाचा हात न लागता नष्ट होतात.+
२१ कारण मानवाच्या मार्गांवर देवाची नजर असते,+
त्याच्या प्रत्येक पावलाकडे त्याचं लक्ष असतं.
२३ कारण कोणत्याही मानवासाठी, आपल्या न्यायासनासमोर येण्याची
निश्चित वेळ देवाने ठरवलेली नाही.
२४ तो ताकदवान लोकांना त्यांच्या पदावरून खाली पाडून
त्यांच्या जागी इतरांना नेमतो;+ त्याला तपास करावा लागत नाही.
२५ कारण ते काय करत आहेत, हे त्याला चांगलं माहीत असतं;+
तो एका रात्रीत त्यांना उलथून टाकतो आणि त्यांचा चुराडा होतो.+
२६ त्यांच्या दुष्टपणामुळे,
तो सर्वांच्या देखत त्यांचा नाश करतो.+
२७ कारण त्यांनी त्याच्या मार्गांवर चालायचं सोडून दिलंय;+
त्याच्या आज्ञांबद्दल त्यांना जराही आदर वाटत नाही.+
२८ ते गोरगरिबांना त्याच्याकडे तक्रार करायला भाग पाडतात,
म्हणून तो त्या असाहाय्य माणसांचा आक्रोश ऐकतो.+
२९ देव गप्प राहिला, तर त्याला कोण दोषी ठरवू शकतं?
तो आपलं तोंड झाकून घेतो, तेव्हा कोण त्याला पाहू शकतं?
राष्ट्र असो किंवा एखादा माणूस, परिणाम एकसारखाच असतो.
३० जो लोकांना पाशात अडकवू शकतो,
अशा दुष्टाला तो सत्ता चालवू देत नाही.+
३१ कोणीही देवाला असं म्हणू शकतं का:
‘मी कोणतीही चूक केलेली नसताना, मला शिक्षा देण्यात आली.+
३२ माझ्या नजरेतून काही सुटलं असेल, तर ते माझ्या लक्षात आणून दे;
मी जर काही चुकीचं केलं असेल, तर ते मी पुन्हा करणार नाही.’
३३ तुला त्याचा निर्णय मान्य नाही, म्हणून त्याने तुझ्या इच्छेप्रमाणे तुझी भरपाई करावी का?
हे मी नाही, तर तूच ठरव.
तुला माहीत आहे, तर तूच मला सांग.
३४ समजशक्ती* असलेले लोक;
माझं बोलणं ऐकणारे बुद्धिमान लोक मला म्हणतील,
३५ ‘ईयोबला काही माहीत* नसूनही तो बोलतो,+
त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही.’*
३६ ईयोबची अगदी पूर्णपणे परीक्षा झाली पाहिजे,*
कारण तो दुष्ट माणसांसारखी उत्तरं देतो.
३७ तो त्याच्या पापात बंडखोरीची भर घालतो;+
तो आपल्यासमोर टाळ्या वाजवून थट्टा करतो
आणि सतत देवाविरुद्ध बोलत राहतो!”+
३५ अलीहू पुढे म्हणाला:
२ “‘मी देवापेक्षा जास्त नीतिमान आहे,’
हे तुझं म्हणणं योग्य असल्याची तुला खातरी आहे का?+
३ कारण तू म्हणतोस, ‘तुला* काय फरक पडतो?
मी पाप केलं नाही, तरी मला काय फायदा झाला?’+
४ मी तुला उत्तर देईन,
आणि तुझ्या सोबत्यांनाही.+
५ वर आकाशाकडे पाहा!
तुझ्यापेक्षा फार उंचावर असलेले ढग निरखून पाहा.+
६ तू पाप केलंस, तरी देवाचं काय नुकसान होईल?+
तू कितीही अपराध केलेस, तरी त्याचं काय बिघडवशील?+
७ तू नीतीने वागल्यामुळे त्याला काय मिळेल?
तुझ्याकडून त्याला काय फायदा होईल?+
८ तुझ्या दुष्टतेमुळे फक्त तुझ्यासारख्या मानवाचं नुकसान होतं
आणि तू नीतीने वागल्यामुळे एखाद्या माणसाचाच फायदा होऊ शकतो.
१० पण ‘ज्याच्यासाठी रात्रीही स्तुतिगीतं गायली जातात,+
तो माझा देव, माझा महान निर्माणकर्ता कुठे आहे?’ असं कोणीच म्हणत नाही.+
११ पृथ्वीवरच्या पशूंपेक्षा+ तो आपल्याला जास्त शिकवतो,+
आणि आकाशातल्या पक्ष्यांपेक्षा तो आपल्याला जास्त बुद्धिमान बनवतो.
१३ कपटी मनाने केलेली प्रार्थना देव नक्कीच ऐकत नाही;*+
सर्वशक्तिमान देव अशा प्रार्थनेकडे लक्ष देत नाही.
१४ मग, तू त्याला पाहू शकत नाही, या तुझ्या तक्रारीकडे तो लक्ष देईल का?+
तुझा खटला त्याच्यासमोर आहे, तेव्हा तू त्याची भीतभीत वाट पाहा.+
१५ कारण त्याने रागाच्या भरात तुझ्याकडून हिशोब मागितला नाही;
आणि तुझ्या अहंकाराकडे लक्ष दिलं नाही.+
१६ ईयोब विनाकारण बडबड करतो;
आणि ज्ञान नसताना बोलत सुटतो.”+
३६ अलीहू पुढे म्हणाला:
२ “अजून थोडा वेळ धीर धरून माझं ऐक,
देवाच्या वतीने मला आणखी काही बोलायचंय.
३ मला जे कळतं ते मी सविस्तर सांगीन,
मी माझ्या निर्माणकर्त्याचं नीतिमत्त्व घोषित करीन.+
७ तो नीतिमान लोकांवरून आपली नजर हटवत नाही;+
त्यांना शासकांसोबत राजासनावर बसवून,*+ तो सर्वकाळासाठी त्यांचा गौरव करतो.
८ पण जेव्हा ते साखळदंडांनी बांधलेले असतात
आणि दुःखाच्या बंधनांत अडकलेले असतात,
९ तेव्हा तो त्यांना त्यांची चूक दाखवून देतो,
आणि त्यांनी गर्वामुळे केलेले अपराध त्यांच्या लक्षात आणून देतो.
१० ताडनाकडे लक्ष देण्यासाठी तो त्यांचे कान उघडतो
आणि त्यांना वाईट वागणूक सोडून द्यायला सांगतो.+
११ त्यांनी त्याचं ऐकलं आणि त्याची उपासना केली,
तर ते समृद्ध जीवन जगतील
आणि सुखासमाधानाने आयुष्य घालवतील.+
१२ पण जर त्यांनी ऐकलं नाही, तर त्यांचा तलवारीने* नाश होईल+
आणि ज्ञान मिळवण्याआधीच त्यांचा मृत्यू होईल.
१३ दुष्ट हृदयाचे लोक* मनात राग बाळगतात.
तो त्यांना शिक्षा देतो, तेव्हाही ते मदतीसाठी हाक मारत नाहीत.
१५ पण देव* दुःखी लोकांची त्यांच्या दुःखातून सुटका करतो;
त्यांच्यावर जुलूम होत असताना तो त्यांचं मार्गदर्शन करतो.
तुझ्या सांत्वनासाठी तो तुझ्या मेजावर चमचमीत पदार्थ सजवतो.+
१७ जेव्हा न्यायदंड सुनावला जाईल आणि न्यायाचा विजय होईल,+
तेव्हा दुष्टांना शिक्षा मिळालेली पाहून तुला समाधान वाटेल.
१९ तू जरी मदतीसाठी आक्रोश केलास,
आणि कितीही हातपाय मारलेस, तरी तुला दुःखापासून सुटका मिळेल का?+
२० लोक आपल्या ठिकाणावरून नाहिसे होतात,
अशा रात्रीची वाट पाहू नकोस.
२१ सांभाळ! आपल्या दुःखापासून सुटका मिळवण्यासाठी
चुकीच्या मार्गाने जाऊ नकोस.+
२२ पाहा, देव आपल्या शक्तीने महान कार्यं करतो;
त्याच्यासारखा शिक्षक कोण आहे?
२३ त्याला कोण मार्ग दाखवू शकतं?*+
‘तुझं चुकलं,’ असं त्याला कोण म्हणू शकतं?+
२५ सर्व मानवांनी त्याची कार्यं पाहिली आहेत,
नाशवंत माणूस दुरून त्याची कार्यं फक्त पाहू शकतो.
२६ देव किती महान आहे, याची कल्पनाही आपण करू शकत नाही!+
त्याच्या वर्षांची संख्या आपल्या समजण्यापलीकडे आहे!*+
३१ त्यांच्याद्वारे तो लोकांचं पोषण करतो;*
त्यांना भरपूर अन्नधान्य देऊन तृप्त करतो.+
३२ तो आपल्या हाताने विजेला झाकतो
आणि निशाणावर प्रहार करण्याची तिला आज्ञा देतो.+
३३ विजेची गर्जना त्याच्या येण्याची खबर देते,
कोण* येत आहे, हे गुरंढोरंही सांगतात.
३७ या विचारांनी माझ्या हृदयाचा थरकाप उडतो;
ते धडधडू लागतं.
२ त्याच्या तोंडून निघणारी गर्जना;
त्याच्या आवाजाचा गडगडाट, लक्ष देऊन ऐका.
३ तो त्याला सबंध आकाशाखाली पाठवतो;
तो पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत वीज चमकवतो.+
४ मग मोठी गर्जना ऐकू येते;
तो आपल्या भरदार आवाजात गरजतो,+
त्याचा आवाज ऐकू येतो, तेव्हाही विजा चमकत असतात.
६ तो हिमकणांना म्हणतो, ‘पृथ्वीवर पडा,’+
आणि पावसाच्या सरींना म्हणतो, ‘जोरात कोसळा.’+
८ जंगली प्राणी आपल्या गुहांमध्ये जातात;
ते आपापल्या घरात दडी मारून बसतात.
११ तो पावसाच्या पाण्याने ढगांचा भार वाढवतो;
तो मेघांमध्ये विजांना विखुरतो;+
१२ तो सांगेल तसे ते वळतात;
पृथ्वीच्या पाठीवर,* त्याने सांगितलेल्या सर्व आज्ञा ते पूर्ण करतात.+
१३ कोणाला शिक्षा* द्यायची असो,+ जमिनीवर पाऊस पाडायचा असो,
किंवा एकनिष्ठ प्रेम दाखवायचं असो, तो त्यांच्याद्वारे हे घडवून आणतो.+
१५ देव ढगांना कशी आज्ञा देतो*
आणि मेघांतून विजा कशा चमकायला लावतो, हे तुला माहीत आहे का?
१६ ढग कसे तरंगतात हे तू सांगू शकतोस का?+
ही परिपूर्ण ज्ञान असलेल्या देवाची आश्चर्यकारक कार्यं आहेत.+
१७ दक्षिणेकडच्या वाऱ्याने पृथ्वी स्तब्ध होते,
तेव्हा तुझी वस्त्रं का तापतात?+
१९ बोल, आम्ही त्याला काय सांगू?
आम्ही तर अंधारात आहोत; आमच्याजवळ उत्तर नाही.
२० मला काही बोलायचंय, असं त्याला सांगावं का?
त्याला सांगण्यासारखी एखादी गोष्ट कोणी बोललंय का?+
२२ उत्तरेकडून सोनेरी किरणं पसरतात;
देवाचं वैभव+ खरंच विस्मयकारक आहे!
२३ सर्वशक्तिमान देवाला पूर्णपणे समजून घेणं आपल्या आवाक्याबाहेर आहे;+
त्याची शक्ती अफाट आहे,+
तो कधीही आपल्या न्यायाच्या+ आणि महान नीतिमत्त्वाच्या+ विरोधात जात नाही.
२४ म्हणून लोकांनी त्याचं भय मानलं पाहिजे,+
३८ मग यहोवाने वादळातून ईयोबला उत्तर दिलं:+
३ चल, आता मर्दासारखी कंबर कस;
मी प्रश्न विचारतो आणि तू मला उत्तर दे.
४ मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास?+
तुला समजत असेल, तर सांग.
५ तिची लांबी-रुंदी कोणी ठरवली, हे तुला माहीत आहे का?
दोरी ताणून तिचं मोजमाप कोणी केलं?
६ तिचे खांब कशात बसवले आहेत?
तिच्या मुख्य दगडाची* स्थापना कोणी केली?+
७ पहाटेच्या ताऱ्यांनी+ एकत्र मिळून आनंदाने जयजयकार केला,
आणि देवाची सर्व मुलं*+ जल्लोष करू लागली, तेव्हा तू कुठे होतास?
९ जेव्हा मी त्याला दाट मेघांमध्ये गुंडाळून*
ढगांचं पांघरूण घातलं;
१० जेव्हा मी त्याची सीमा आखून दिली
आणि त्याला दरवाजे आणि अडसर लावले;+
११ जेव्हा मी त्याला म्हणालो, ‘फक्त इथपर्यंत ये, याच्यापुढे येऊ नकोस;
तुझ्या मगरूर* लाटा इथेच थांबल्या पाहिजेत,’+ तेव्हा तू कुठे होतास?
१२ तू कधी* पहाटेला आज्ञा दिली आहेस का?
किंवा तिला तिचं ठिकाण दाखवलं आहेस का?+
१३ पृथ्वीची टोकं हातात धरून,
तिच्यावरून दुष्टांना झटकून टाकायला, तू कधी तिला सांगितलंस का?+
१४ मातीवर मुद्रेचा ठसा उमटावा, तसं पृथ्वीचं रूप बदलतं;
वस्त्रावरच्या नक्षीकामासारख्या, तिच्यावरच्या सर्व गोष्टी स्पष्ट दिसू लागतात.
१५ पण दुष्टांचा प्रकाश हिरावून घेतला जातो
आणि त्यांचा उगारलेला हात तोडून टाकला जातो.
१६ तू कधी सागराच्या उगमापर्यंत गेला आहेस का?
किंवा खोल समुद्रात शोध घेत फिरला आहेस का?+
१७ मृत्यूची फाटकं+ तू बघितली आहेस का?
तू घोर अंधकाराची फाटकं*+ पाहिली आहेस का?
१८ पृथ्वी किती विशाल आहे,+ याची तुला कल्पना आहे का?
तुला हे सगळं कळत असेल, तर सांग मला.
१९ प्रकाशाचं घर कोणत्या दिशेला असतं?+
आणि अंधाराचं ठिकाण कुठे आहे?
२० तू त्यांना त्यांच्या ठिकाणी नेऊ शकतोस का?
त्यांच्या घरांचे रस्ते तुझ्या ओळखीचे आहेत का?
२१ तुझा जन्म आधीच झाला होता, म्हणून तुला हे सगळं कळतं का?
तुझं वय* खूप जास्त असल्यामुळे तुला हे समजतं का?
२२ बर्फाच्या+ कोठारांत तू कधी पाऊल ठेवलं आहेस का?
गारांचं+ गोदाम तू पाहिलं आहेस का?
२४ उजेड* कोणत्या मार्गाने पसरतो?
आणि पूर्वेकडचा वारा पृथ्वीवर कुठून येतो?+
२५ मुसळधार पावसासाठी मार्ग कोणी तयार केला?
वादळात गरजणाऱ्या ढगाची वाट कोणी ठरवली?+
२६ जिथे कोणीही राहत नाही अशा ठिकाणी;
मानवांची वस्ती नसलेल्या ओसाड रानात पाऊस कोण पाडतं?+
२७ उद्ध्वस्त झालेल्या वैराण भूमीची तहान कोण भागवतं?
तिथे कोवळ्या गवताच्या पाती कोण उगवायला लावतं?+
दवबिंदूंना कोणी जन्माला घातलं?+
२९ हिम कोणाच्या उदरातून* जन्माला आलं?
आकाशातल्या हिमकणांना कोणी जन्म दिला?+
३० त्यांमुळे पाणी जणू खडकाने झाकलं जातं;
खोल पाण्यावर कठीण बर्फाचा थर पसरतो.+
३१ तू कृत्तिका नक्षत्रातल्या* ताऱ्यांचा गुच्छ बांधून ठेवू शकतोस का?
किंवा मृगशीर्ष नक्षत्राचे+ बंध सोडू शकतोस का?
३२ तू एखाद्या नक्षत्राला* योग्य वेळी उगवायला लावू शकशील का?
किंवा सप्तऋषी नक्षत्राला* मार्ग दाखवू शकशील का?
३३ आकाशावर नियंत्रण करणारे कायदे तुला माहीत आहेत का?+
ते कायदे* तू पृथ्वीवर लागू करू शकतोस का?
३४ तू ढगांशी आवाज चढवून बोलू शकतोस का?
त्यांना तुझ्यावर धो-धो बरसायला लावू शकतोस का?+
३५ तुझ्या सांगण्यावरून विजा कडाडतील का?
तू बोलावल्यावर, ‘आम्ही आलो,’ असं त्या म्हणतील का?
आणि आकाशाला* समजशक्ती कोणी दिली?+
३७ मेघांना मोजण्याइतका बुद्धिमान कोण आहे?
आकाशातल्या घागरी कोण ओतू शकतं?+
३८ त्यांच्यामुळे धुळीचा चिखल होतो
आणि मातीचे गोळे एकमेकांना चिकटतात.
३९ तू एखाद्या सिंहासाठी शिकार करू शकतोस का?
किंवा त्याच्या छाव्यांची भूक भागवू शकतोस का?+
४० ते आपल्या गुहांमध्ये टपून बसतात
तिथे ते शिकारीची वाट पाहत राहतात.
४१ कावळ्याची पिल्लं जेव्हा देवाला हाक मारतात,
आणि भुकेने तळमळत इकडेतिकडे फिरतात,
तेव्हा कावळ्याला अन्न कोण देतं?+
३९ पहाडी रानशेळ्या कधी प्रसवतात* हे तुला माहीत आहे का?+
हरिणींना आपल्या पाडसाला* जन्म देताना तू पाहिलं आहेस का?+
२ त्यांचे महिने कधी भरतील हे तू मोजतोस का?
त्यांची जन्म देण्याची वेळ तुला माहीत आहे का?
३ त्या खाली वाकून पिल्लांना जन्म देतात
आणि प्रसूतीच्या वेदनांतून मुक्त होतात.
४ त्यांची पिल्लं मोकळ्या रानात वाढतात आणि धष्टपुष्ट होतात;
ती निघून जातात आणि त्यांच्याकडे परत येत नाहीत.
५ रानगाढवाला कोणी मोकळं सोडलं?+
त्याचे दोर कोणी सोडले?
६ मी वाळवंटाला त्याचं घर केलं आहे;
खाऱ्या जमिनीवर त्याला राहायला जागा दिली आहे.
७ शहराची गजबज त्याला नकोशी वाटते.
प्राणी हाकणाऱ्याचं ओरडणं त्याला ऐकू येत नाही.
८ ते टेकड्यांवर गवतासाठी भटकत राहतं
आणि हिरवी झुडपं शोधत फिरतं.
९ रानबैल तुझी चाकरी करायला तयार होईल का?+
तुझ्या गोठ्यात* तो रात्र घालवेल का?
१० तू त्याला बांधून आपलं शेत नांगरायला लावू शकतोस का?
खोऱ्यातली जमीन नांगरायला तो तुझ्यामागे येईल का?
११ त्याच्याजवळ प्रचंड ताकद आहे,
म्हणून तू त्याच्याकडून कष्टाची कामं करून घेऊ शकतोस का?
१३ शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते,
पण तिच्या पंखांची आणि पिसाऱ्याची तुलना,
करकोच्याच्या पंखांशी होऊ शकते का?+
१४ ती तर आपली अंडी जमिनीवर टाकून जाते,
आणि त्यांना मातीतच उबू देते.
१५ कुणाचा पाय पडून ती फुटतील;
किंवा एखादा प्राणी त्यांना पायाखाली तुडवेल, याचंही तिला भान नसतं.
१६ ती आपल्या पिल्लांशी कठोरपणे वागते, जणू ती तिची नाहीतच!+
आपले कष्ट वाया जातील याचीही तिला पर्वा नसते.
१७ कारण देवाने तिला बुद्धी दिली नाही;
त्याने तिला समजशक्तीचं वरदान दिलं नाही.
१८ पण जेव्हा ती उठून आपले पंख फडफडवते,
तेव्हा ती घोड्यावर आणि त्याच्या स्वारावर हसते.
१९ घोड्याला ताकद देणारा तू आहेस का?+
त्याच्या मानेवर सळसळती आयाळ तू पांघरलीस का?
२० तू त्याला टोळासारखी उडी मारायला लावू शकतोस का?
त्याच्या नुसत्या फुरफुरण्याने लोकांना दहशत बसते.+
२१ तो खोऱ्यात जमिनीवर टापा आपटतो आणि जोराने उसळ्या मारतो;+
२२ तो भीतीवर हसतो; त्याला कशाचंच भय नसतं.+
तलवार पाहून तो मागे फिरत नाही.
२३ भात्यातले बाण त्याच्या पाठीवर खणखणतात,
स्वाराच्या हातात भाला आणि बरची लकाकत असते.
२४ उत्साह अनावर होऊन तो बेफाम वेगाने धावतो;*
रणशिंगाचा आवाज ऐकल्यावर तो थांबू शकत नाही.*
२५ शिंगाचा नाद ऐकून तो मोठ्याने खिंकाळतो;
त्याला दुरूनच लढाईचा वास येतो.
युद्धाच्या ललकाऱ्या आणि सेनापतींच्या आरोळ्या त्याच्या कानात घुमू लागतात.+
२६ ससाणा आकाशात झेप घेतो
आणि दक्षिणेकडे जायला पंख पसरतो, ते काय तुझ्या बुद्धीच्या जोरावर?
२७ गरुड भरारी मारतो+
आणि उंच ठिकाणी घरटं बांधतो,+ ते काय तुझ्या आज्ञेने?
२८ तो डोंगराच्या कड्यावर रात्र घालवतो
आणि पर्वताच्या सुळक्यावर* आपला गड बनवतो.
३० त्याची पिल्लं रक्त पितात;
जिथे प्रेतं असतील, तिथे तो असतो.”+
४० यहोवा ईयोबला पुढे म्हणाला:
२ “दोष लावणाऱ्याने सर्वशक्तिमान देवाशी वाद घालावा का?+
ज्याला देवाची चूक दाखवायची असेल, त्याने उत्तर द्यावं.”+
३ तेव्हा ईयोब यहोवाला म्हणाला:
४ “माझी काहीच लायकी नाही.+
मी तुला काय उत्तर देणार?
मी आपला हात तोंडावर ठेवतो.+
५ मी एकदा बोललो, पण पुन्हा उत्तर देणार नाही;
मी दुसऱ्यांदाही बोललो, पण आता मी काही बोलणार नाही.”
६ मग यहोवाने वादळातून ईयोबला उत्तर दिलं:+
७ “चल, आता मर्दासारखी कंबर कस;
मी प्रश्न विचारतो आणि तू मला उत्तर दे.+
८ तू माझ्या न्यायीपणावर शंका घेतोस का?*
स्वतःला निर्दोष ठरवण्यासाठी, तू मला दोषी ठरवतोस का?+
९ तुझा हात देवाइतका ताकदवान आहे का?+
तू त्याच्यासारखी गर्जना करू शकतोस का?+
१० तुझं तेज आणि ऐश्वर्य दाखव;
तुझा महिमा आणि वैभव प्रकट कर.
११ तुझ्या क्रोधाची आग भडकू दे;
प्रत्येक गर्विष्ठ माणसाकडे बघ आणि त्याला धूळ चार.
१२ प्रत्येक गर्विष्ठ माणसाकडे बघ आणि त्याला नमव,
दुष्टाला जागच्या जागी चिरडून टाक.
१३ त्या सर्वांना मातीला मिळव;
त्यांना* बांधून काळोख्या जागी टाक.
१४ मग, तुझा उजवा हात तुला वाचवू शकतो,
हे मीही मान्य करीन.*
१५ हा बेहेमोथ* बघ; तुझ्याप्रमाणेच मी त्यालाही बनवलं.
तो बैलासारखा गवत खातो.
१६ त्याच्या पायात किती ताकद आहे!
बघ, त्याच्या पोटाचे स्नायू किती बळकट आहेत!
१७ त्याची शेपटी देवदार वृक्षासारखी कडक आहे;
त्याच्या मांड्यांचे स्नायू किती पीळदार आहेत!
१८ त्याची हाडं तांब्याच्या नळ्यांसारखी आहेत;
त्याचे पाय लोखंडाच्या गजांसारखे आहेत.
१९ शक्तिशाली प्राण्यांमध्ये देवाने त्याला सर्वातआधी निर्माण केलं;
त्याच्यापुढे तलवार घेऊन फक्त त्याचा निर्माणकर्ता जाऊ शकतो.
२० जिथे सर्व जंगली प्राणी बागडतात,
त्या पर्वतांवरून त्याला अन्न मिळतं.
२१ तो कमळाच्या वेलींखाली पडून असतो;
दलदलीतल्या लव्हाळ्यांखाली* राहतो.
२२ कमळाच्या वेली त्याला सावली देतात
आणि दऱ्याखोऱ्यांतली झाडं त्याच्या अवतीभवती असतात.
२३ नदीला पूर आला तरी तो घाबरत नाही.
यार्देनच्या+ जोरदार प्रवाहाला तो धीटपणे तोंड देतो.
२४ तो सावध असताना कोणी त्याला पकडू शकतं का?
किंवा त्याच्या नाकात आकडा* घालून त्याला धरू शकतं का?
४१ तू लिव्याथानला*+ गळाने पकडू शकतोस का?
त्याची जीभ तू दोरीने बांधू शकतोस का?
२ त्याच्या नाकात तू वेसण* घालू शकतोस का?
किंवा त्याच्या जबड्यांमध्ये आकडा* टोचू शकतोस का?
३ तो तुझ्यापुढे गयावया करेल का?
किंवा तुझ्याशी प्रेमाने बोलेल का?
४ आयुष्यभर तुझा गुलाम बनून राहण्यासाठी,
तो तुझ्याशी करार करेल का?
५ पक्ष्यासोबत खेळावं, तसं तू त्याच्याशी खेळशील का?
तुझ्या लहान मुलींना खेळण्यासाठी, त्याला दोरीने बांधशील का?
६ व्यापारी त्याचा सौदा करतील का?
ते त्याला आपसात वाटून घेतील का?
७ तू त्याच्या कातडीत बरच्या* भोसकशील का?+
किंवा त्याच्या डोक्यात भाले खुपसशील का?
८ त्याला हात लावून तर पाहा!
ती झुंज कायम तुझ्या लक्षात राहील; तू पुन्हा तसं धाडस करणार नाहीस!
९ त्याला काबीज करण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.
त्याला नुसतं पाहिलंस, तरी तुला धडकी भरेल.*
१० त्याला डिवचण्याचं धैर्य कोणीच करू शकत नाही.
मग माझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?+
११ मला कोणी काय दिलंय, की मी त्याची परतफेड करावी?+
आकाशाखाली जे काही आहे, ते सर्व माझंच आहे.+
१२ मी त्याच्या पायांबद्दल, त्याच्या ताकदीबद्दल,
आणि त्याच्या बांधेसूद शरीराबद्दल सांगतो.
१३ त्याची कातडी कोण काढू शकतं?
त्याच्या जबड्यांमध्ये कोण शिरू शकतं?
१४ कोण त्याचं तोंड* बळजबरीने उघडू शकतं?
त्याचे दात भीतिदायक असतात.
१५ त्याच्या पाठीवर खवल्यांच्या रांगा असतात*
ती सोबत घट्ट बसवलेली असतात.
१६ ती एकमेकांच्या इतकी जवळजवळ असतात,
की त्यांच्यातून हवासुद्धा जाऊ शकत नाही.
१७ ती एकमेकांना चिकटलेली असतात;
ती अशी घट्ट जोडलेली असतात, की त्यांना वेगळं करता येत नाही.
१८ तो फुरफुरतो तेव्हा प्रकाश चमकतो,
त्याचे डोळे पहाटेच्या किरणांसारखे दिसतात.
१९ त्याच्या तोंडातून जणू चमकणाऱ्या विजा निघतात;
आणि आगीच्या ठिणग्या उडतात.
२० गवताने पेटवलेल्या भट्टीतून निघावा,
तसा धूर त्याच्या नाकपुड्यांतून निघतो.
२१ त्याच्या श्वासाने कोळसे पेटतात,
आणि त्याच्या तोंडातून ज्वाला निघते.
२२ त्याच्या मानेत प्रचंड ताकद असते;
त्याला पाहून सर्व भीतीने कावरेबावरे होतात.
२३ त्याच्या कातडीचे थर एकमेकांवर घट्ट बसलेले असतात;
धातू ओतून तयार केल्याप्रमाणे, ते अगदी मजबूत आणि भक्कम असतात.
२४ त्याचं हृदय दगडासारखं;
जात्याच्या तळीसारखं* कठीण असतं.
२५ तो उठतो तेव्हा शूरवीरसुद्धा भयभीत होतात;
तो हालचाल करतो तेव्हा ते गांगरून जातात.
२६ तलवार त्याला हरवू शकत नाही;
भाला, बाण किंवा कोणतंही शस्त्र त्याला लागत नाही.+
२७ लोखंड त्याला पेंढ्यासारखं;
आणि तांबं कुजलेल्या लाकडासारखं वाटतं.
२८ तो बाणाच्या भीतीने पळून जात नाही;
गोफणीतले दगड त्याला भुशासारखे वाटतात.
२९ सोटा त्याला गवताच्या पेंढीसारखा वाटतो;
सळसळत येणाऱ्या भाल्याला तो हसतो.
३१ तो समुद्रात उतरतो तेव्हा पाण्याला फेस येतो;
ते भांड्यातल्या उकळत्या तेलासारखं दिसतं.
३२ तो पुढे जातो तेव्हा त्याच्यामागे पाणी चमकतं.
जणू समुद्राचे पांढरे केस!
३३ पृथ्वीवर त्याच्यासारखा प्राणी नाही;
देवाने त्याला निर्भय बनवलंय.
३४ तो सर्व गर्विष्ठ प्राण्यांकडे नजर रोखून पाहतो.
तो सगळ्या शक्तिशाली जंगली पशूंचा राजा आहे.”
४२ मग ईयोब यहोवाला म्हणाला:
हो, समज नसताना बोलणारा तो मीच होतो,
मी अशा अद्भुत गोष्टींबद्दल बोललो, ज्यांबद्दल मला काही कळत नाही!+
४ तू म्हणालास, ‘मी बोलतो ते कृपा करून ऐक.
आता मी प्रश्न विचारतो आणि तू मला उत्तर दे.’+
५ मी आपल्या कानांनी तुझ्याबद्दल ऐकलं होतं,
पण आता मी प्रत्यक्ष तुला डोळ्यांनी पाहतोय.
६ म्हणून मी आपले शब्द मागे घेतो+
आणि धूळराखेत बसून पश्चात्ताप करतो.”+
७ यहोवाचं ईयोबशी बोलणं झाल्यावर, यहोवा अलीफज तेमानी याला म्हणाला:
“तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा मला खूप संताप आलाय.+ कारण, माझा सेवक ईयोब याच्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल खरं बोलला नाहीत.+ ८ म्हणून, आता सात बैल आणि सात मेंढे घेऊन माझा सेवक ईयोब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमार्पण द्या. मग तो तुमच्यासाठी प्रार्थना करेल.+ कारण, माझा सेवक ईयोब याच्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल खरं बोलला नाहीत. पण, मी त्याची विनंती मान्य करीन* आणि तुम्हाला तुमच्या मूर्खपणाची शिक्षा देणार नाही.”
९ म्हणून, अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथी यांनी जाऊन यहोवाच्या सांगण्याप्रमाणे केलं. तेव्हा, यहोवाने ईयोबची प्रार्थना ऐकली.
१० ईयोबने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केल्यावर+ यहोवाने ईयोबवर आलेली संकटं दूर करून+ त्याला पूर्वीसारखंच वैभव दिलं.* त्याच्याकडे पूर्वी जे काही होतं, त्याच्या दुप्पट यहोवाने त्याला दिलं.+ ११ मग त्याचे सर्व भाऊ आणि बहिणी, तसंच पूर्वीचे त्याचे सर्व मित्र+ त्याच्या घरी जेवायला आले. यहोवाने त्याच्यावर जे संकट येऊ दिलं होतं, त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि त्याचं सांत्वन केलं. प्रत्येकाने त्याला चांदीचा एक तुकडा आणि सोन्याची एक अंगठी दिली.
१२ अशा रितीने, यहोवाने ईयोबच्या सुरुवातीच्या दिवसांपेक्षा त्याच्या आयुष्यातल्या नंतरच्या दिवसांत त्याला जास्त आशीर्वाद दिले.+ ईयोबकडे १४,००० मेंढरं, ६,००० उंट, गुराढोरांच्या १,००० जोड्या आणि १,००० गाढव्या झाल्या.+ १३ तसंच, त्याला आणखी सात मुलं आणि आणखी तीन मुलीही झाल्या.+ १४ त्याने आपल्या पहिल्या मुलीचं नाव यमीमा, दुसरीचं कसीया आणि तिसरीचं केरेनहप्पूक ठेवलं. १५ संपूर्ण देशात ईयोबच्या मुलींइतक्या सुंदर स्त्रिया नव्हत्या. ईयोबने आपल्या मुलांसोबतच, आपल्या मुलींनाही संपत्तीचा वाटा दिला.
१६ यानंतर ईयोब आणखी १४० वर्षं जगला. त्याने एकूण चार पिढ्यांपर्यंत आपली मुलं आणि नातवंडं-पतवंडं पाहिली. १७ शेवटी, बरीच वर्षं जगल्यावर ईयोब सुखाने* मरण पावला.
म्हणजे कदाचित, “ज्याचा द्वेष करण्यात आला.”
किंवा “निर्दोष होता आणि सरळ मार्गाने चालायचा.”
शब्दशः “गुराढोरांच्या ५०० जोड्या.”
शब्दशः “गाढव्या.”
किंवा “आळीपाळीने आपापल्या घरी.”
शब्दशः “देवाची मुलं.” हिब्रू भाषेत स्वर्गदूतांना सूचित करणारा वाक्यांश.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “आपलं हृदय लावलंस का?”
किंवा “निर्दोष आहे आणि सरळ मार्गाने चालतो.”
किंवा “तुझ्या ताब्यात आहे.”
शब्दशः “चेहऱ्यासमोरून.”
किंवा कदाचित, “वीज.”
शब्दशः “देवाची मुलं.” हिब्रू भाषेत स्वर्गदूतांना सूचित करणारा वाक्यांश.
शब्दशः “आपलं हृदय लावलंस का?”
किंवा “निर्दोष आहे आणि सरळ मार्गाने चालतो.”
शब्दशः “गिळण्यासाठी.”
किंवा “तुझ्या ताब्यात आहे.”
शब्दशः “चेहऱ्यासमोरून.”
किंवा “ओळखीच्या लोकांनी.”
शब्दशः “त्याच्या दिवसाला शाप देऊ लागला.”
किंवा “अंधाराची आणि मृत्यूची सावली.”
हा शब्द मगरीला किंवा पाण्यात राहणाऱ्या दुसऱ्या एखाद्या मोठ्या, शक्तिशाली प्राण्याला सूचित करतो असं समजलं जातं.
किंवा “गर्भाशयाची.”
किंवा कदाचित, “ज्यांनी स्वतःसाठी ओसाड इमारती बांधल्या आहेत.”
शब्दशः “ज्यांचे गुडघे लटपटत आहे अशांना.”
शब्दशः “तू दमून जातोस.”
किंवा “योजना.”
किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहांचेही.”
किंवा “एक अदृश्य व्यक्ती.”
शब्दशः “पतंग.” फुलपाखरासारखा एक किडा.
किंवा “बुद्धी.”
हे कदाचित स्वर्गदूतांना सूचित करत असावं.
किंवा “शेतातल्या दगडगोट्यांचा तुझ्याशी करार (ठराव) असेल.”
किंवा “गुरं चारण्याच्या जमिनीची.”
किंवा “विचार न करता, बेपर्वाईने बोललो.”
किंवा “मित्र.”
किंवा “शबाई लोकांचा काफिला.”
शब्दशः “सोडवावं.”
किंवा “विकून टाकाल.”
शब्दशः “चांगलं काही दिसणार नाही.”
इथे ईयोब देवाशी बोलत आहे असं दिसतं.
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “माझ्या हाडांपेक्षा.”
शब्दशः “तुझं हृदय लावावं?”
किंवा “थुंकी.”
शब्दशः “त्यांच्या हृदयातून शब्द बाहेर काढणार नाहीत का?”
किंवा “पपायरस गवत.” शब्दार्थसूचीत “पपायरस गवत” पाहा.
शब्दशः “मार्ग असे असतात.”
किंवा “देवाला सोडून जाणाऱ्यांची.”
शब्दशः “घरासारखा.”
किंवा “निर्दोष असलेल्यांना.”
शब्दशः “त्यांचा हात धरणार नाही.”
किंवा “देवाला न्यायालयात न्यायचं ठरवलं.”
शब्दशः “हृदयाचा बुद्धिमान.”
किंवा “काढून टाकतो.”
कदाचित वृषभ नक्षत्रातले प्लिएडस तारे.
शब्दशः “दक्षिणेकडच्या आतल्या खोल्यांमधली.”
कदाचित समुद्रातला एक महाकाय प्राणी.
किंवा कदाचित, “खटल्यातल्या माझ्या विरोध्याकडे.”
शब्दशः “मला कोण बोलावेल?”
किंवा “निर्दोष जरी असलो.”
शब्दशः “कपटी.”
किंवा “निर्दोष जरी असलो.”
किंवा “मला हे जीवन तुच्छ वाटतं; मी हे जीवन नाकारतो.”
किंवा “विश्वासू राहणारा.”
शब्दशः “चेहरे.”
किंवा “निरोप घेऊन जाणाऱ्यापेक्षाही.”
शब्दशः “दुष्टच.”
शब्दशः “आम्हा दोघांवर त्याचा हात ठेवून.”
किंवा “मध्यस्थ.”
शब्दशः “आपली काठी माझ्यावरून काढली.”
किंवा “श्वासाचं; जीवनाचं.”
शब्दशः “आणि या गोष्टी तू आपल्या हृदयात लपवून ठेवल्या आहेस.”
किंवा “मी थोडा तरी आनंदी होईन.”
किंवा “अंधाराच्या आणि मृत्यूच्या सावलीच्या.”
किंवा “बढाई मारणारा खरा ठरेल का?”
किंवा “सीमा.”
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “हृदय.”
किंवा “घसरतात.”
किंवा कदाचित, “बोल.”
किंवा “शब्दांचं परीक्षण.”
किंवा “सल्लागारांकडून सर्वकाही हिसकावून घेतो.”
किंवा “वडीलजनांचा.”
शब्दशः “हृदय.”
शब्दशः “राखेची सुवचनं.”
शब्दशः “ढाली.”
शब्दशः “मी आपलं मांस दातात का धरावं?”
किंवा “माझ्या वागण्याचं समर्थन करीन.”
किंवा “देवाला सोडून देणारा माणूस.”
किंवा कदाचित, “कोणी राहू शकत असेल, तर मीही शांत राहीन आणि मरून जाईन.”
शब्दशः “फक्त दोन गोष्टी माझ्यासोबत करू नकोस.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “तो.” हे कदाचित ईयोबला सूचित करत असावं.
किंवा कदाचित, “त्याला कापून टाकलं जातं.”
शब्दशः “मला.”
शब्दशः “तो कुठे असतो?”
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “सक्तीच्या मजुरीचे.”
किंवा “तू तळमळशील.”
शब्दशः “आपलं पोट पूर्वेकडच्या वाऱ्याने.”
किंवा “तुझा अपराध तुझ्या तोंडाला शिकवतो.”
शब्दशः “पवित्र जनांवरही.”
शब्दशः “भाकर.”
म्हणजे, संकटातून वाचण्याची आशा.
शब्दशः “त्याच्या.”
किंवा “देवाला सोडून देणाऱ्यांचा.”
किंवा “दमदाटीला.”
किंवा “माझ्यासोबत जमणाऱ्यांना.”
किंवा “शक्ती.” शब्दशः “शिंग.”
किंवा “मृत्यूची सावली.”
किंवा कदाचित, “जागरण झालेल्या डोळ्यांनी पाहतात.”
किंवा “लक्ष द्यावं लागतंय.”
शब्दशः “म्हण; वाक्प्रचार.”
किंवा “देवाला सोडून देणाऱ्यामुळे.”
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कबरेला.”
म्हणजे, माझी आशा.
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा कदाचित, “अशुद्ध.”
किंवा “तो लंगडत चालतो.”
शब्दशः “मृत्यूचा प्रथम जन्मलेला.”
किंवा “भयानक मृत्यूकडे.”
शब्दशः “जे त्याचं नाही.”
शब्दशः “त्याला नाव नसेल.”
किंवा “तात्पुरत्या राहण्याच्या ठिकाणी.”
किंवा “मला.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “अपमान केलाय.”
किंवा “नातेवाइकांनी.”
शब्दशः “का माझ्या मांसाने तृप्त होत नाही?”
किंवा “माझं तारण करणारा.”
शब्दशः “धुळीवर.”
किंवा “माझे गुरदे निकामी झाले आहेत.”
किंवा “मानवजातीला; आदामला.”
किंवा “देवाला सोडून देणाऱ्याचा.”
किंवा “घाणीसारखा.”
शब्दशः “हाडांत.”
म्हणजे, त्याचा उत्साह.
किंवा “पित्तासारखं.”
शब्दशः “जिभेने.”
शब्दशः “आणि तो गिळणार नाही.”
शब्दशः “तो.”
शब्दशः “त्याच्या.”
किंवा “शक्तिशाली.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “एका क्षणात,” म्हणजे कोणत्याही वेदना न होता लगेच त्यांना मृत्यू येतो.
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कोणी काही शिकवू शकतो का?”
किंवा कदाचित, “मला मारहाण करण्यासाठी.”
शब्दशः “त्यांची चिन्हं.”
शब्दशः “आणि तो आपल्यासोबत सबंध मानवजातीला ओढून नेईल.”
किंवा “आनंद होतो का?”
शब्दशः “तू उघड्यानागड्यांची वस्त्रं हिसकावतोस.”
किंवा “वडील नसलेल्या मुलांना.”
शब्दशः “पक्षी पकडण्याचे सापळे.”
किंवा “गोलावर.”
किंवा “अकाली मृत्यू आला.”
शब्दशः “नदी.”
ओफीर हे सर्वात उत्कृष्ट प्रतीचं सोनं मिळण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण होतं.
किंवा “युक्तिवाद.”
किंवा “मला सांगण्यात आलं होतं त्याच्यापलीकडे.”
किंवा “सांगितलंय.”
म्हणजे, त्याचा न्यायाचा दिवस.
किंवा “वडील नसलेल्या मुलांचं.”
किंवा “गहाण ठेवून घेतात.”
किंवा कदाचित, “शेतामध्ये चारा गोळा करावा लागतो.”
किंवा “अनाथाला.”
किंवा कदाचित, “टेकड्यांमधल्या भिंतींमागे तेल काढतात.”
किंवा कदाचित, “देव कोणालाच दोषी ठरवत नाही.”
शब्दशः “खणतात.”
शब्दशः “तो पाण्याच्या पृष्ठभागावर वेगवान असतो.”
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “गर्भाशय.”
शब्दशः “तो.”
शब्दशः “तो.”
शब्दशः “त्यांच्या मार्गांवर.”
शब्दशः “आपल्या उंच स्थानांवर.”
किंवा “शुद्ध.”
किंवा “भरभरून.”
किंवा “व्यावहारिक बुद्धी.”
शब्दशः “तुझ्यातून कोणाचा श्वास बाहेर आलाय?”
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “त्याच्यापुढे.”
शब्दशः “शून्यता.”
शब्दशः “उत्तर दिशा.”
शब्दशः “गोल.”
शब्दशः “राहाब.”
किंवा “वाऱ्याने.”
किंवा “सरपटणाऱ्या.”
किंवा “माझ्या जिवाला.”
किंवा “टिकवून ठेवीन.”
किंवा “टोमणे मारणार नाही.”
किंवा “देवाला सोडून देणाऱ्याचा.”
किंवा “जिवाचा.”
किंवा कदाचित, “हाताने.”
किंवा “घरासारखं.”
किंवा कदाचित, “ते त्याला पाहून टाळ्या वाजवतात आणि आपल्या ठिकाणाहून शिट्ट्या मारून त्याची थट्टा करतात.”
शब्दशः “ओतलं.”
शब्दशः “दगड.”
हे कदाचित खाणकामाला सूचित करत असावं.
किंवा “गारगोटीचा खडक.”
किंवा “खडकातून.”
किंवा “नाले.”
ओफीर हे सर्वात उत्कृष्ट प्रतीचं सोनं मिळण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण होतं.
किंवा “शुद्ध केलेलं.”
शब्दशः “वजन.”
शब्दशः “तारुण्याच्या दिवसांत.”
किंवा “सेवक.”
शब्दशः “लपायची.”
किंवा “बिनबाह्यांच्या झग्यासारखा.”
शब्दशः “घरट्यात.”
शब्दशः “झिरपायचे.”
किंवा कदाचित, “त्यांच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही.”
किंवा “अशक्त झाले आहेत.”
शब्दशः “फटके मारणं.”
शब्दशः “म्हण; वाक्प्रचार.”
शब्दशः “माझ्या धनुष्याची दोरी सैल केली.”
किंवा “मर्यादा सोडून.”
किंवा कदाचित, “मदत करणारा.”
किंवा “खिंडारातून.”
शब्दशः “माझ्या हाडांना छिद्रं पडली आहेत.”
हे कदाचित त्याच्या त्वचेला सूचित करत असावं.
किंवा कदाचित, “तीव्र वेदनांमुळे मी विद्रूप झालोय.”
किंवा कदाचित, “आपटून चुराडा करतोस.”
शब्दशः “दगडमातीच्या ढिगाऱ्यावर.”
किंवा कदाचित, “तापाने.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा कदाचित, “कपटी माणसांसोबत.”
किंवा “माझ्या वंशजांचा समूळ नाश व्हावा.”
किंवा “न्यायालयात दाद मागितल्यावर.”
शब्दशः “उठेल.”
शब्दशः “गर्भाशयात.”
शब्दशः “माझ्यामुळे विधवेचे डोळे कमजोर झाले असतील.”
शब्दशः “त्याला.”
शब्दशः “माझ्या आईच्या गर्भाशयापासून.”
शब्दशः “तिला.”
किंवा कदाचित, “शहराच्या फाटकामध्ये मला पाठिंबा आहे, असं पाहून.”
शब्दशः “प्रकाश.”
शब्दशः “मांसाने.”
किंवा “परक्या.”
किंवा “ही घ्या माझी सही.”
किंवा “मालकांच्या जिवाला.”
किंवा “कारण ईयोब स्वतःच्या दृष्टीने नीतिमान होता.”
शब्दशः “दिवसांत लहान.”
शब्दशः “दिवसांना.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “पुष्कळ दिवस पाहिल्यामुळे.”
किंवा “बुद्धी.”
किंवा “ईयोबची चूक दाखवणं.”
किंवा “माझ्या आतड्या घट्ट बंद केलेल्या द्राक्षारसाच्या बुधलीसारख्या आहेत.”
किंवा “माझ्या आतड्या फुटायला आलेल्या द्राक्षारसाच्या नवीन बुधल्यांसारख्या आहेत.”
किंवा “मानाची पदवी देणार नाही.”
शब्दशः “माझ्या टाळूसोबत माझ्या जिभेला.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “मोहर लावतो.”
किंवा “जीवन.”
किंवा “एखाद्या शस्त्राने.”
किंवा “त्याच्या जिवाला.”
किंवा “उघडी पडतात.”
किंवा “त्याचा जीव.”
किंवा “स्वर्गदूत.”
किंवा “सुदृढ.”
शब्दशः “गाईल.”
किंवा कदाचित, “मला तिचा लाभ झाला नाही.”
किंवा “माझ्या जिवाला.”
किंवा “त्याच्या जिवाला.”
शब्दशः “टाळूला.”
शब्दशः “हृदय.”
शब्दशः “आपलं हृदय.”
किंवा “दीनदुबळ्यांपेक्षा प्रतिष्ठित लोकांवर.”
शब्दशः “हृदय.”
किंवा “ज्ञान.”
किंवा “बोलण्यात सखोल समज नाही.”
किंवा कदाचित, “माझ्या बापा, ईयोबची परीक्षा होऊ दे.”
हे कदाचित देवाला सूचित करत असावं.
शब्दशः “हातापासून.”
किंवा “देव लबाडी नक्कीच ऐकत नाही.”
हे देवाला सूचित करतं.
शब्दशः “हृदय.”
किंवा कदाचित, “शासकांना राजासनावर बसवून.”
किंवा “एखाद्या शस्त्राने.”
किंवा “देवाला सोडून देणारे.”
किंवा कदाचित, “संपवतात.”
शब्दशः “तो.”
किंवा “तिरस्काराने टाळ्या वाजवू नकोस.”
किंवा कदाचित, “टीका करू शकतं; हिशोब मागू शकतं?”
किंवा “शोध घेण्यापलीकडे आहे.”
शब्दशः “मंडपातून.”
शब्दशः “प्रकाश.”
शब्दशः “समुद्राची मुळं.”
किंवा कदाचित, “त्यांच्या वतीने याचना करतो.”
किंवा कदाचित, “काय.”
शब्दशः “प्रत्येक माणसाच्या हातावर मोहर लावतो.”
किंवा “पृथ्वीवरच्या उपजाऊ जमिनीवर.”
शब्दशः “काठी.”
किंवा “ढगांवर नियंत्रण कसं करतो.”
किंवा “ठोकून तयार करतात.”
म्हणजे, सूर्याचा.
शब्दशः “बुद्धिमान हृदयाचे.”
किंवा “कोपऱ्याच्या मुख्य दगडाची.”
स्वर्गदूतांना सूचित करणारा एक हिब्रू वाक्प्रचार.
किंवा “बाळाला कापडात गुंडाळतात तसं गुंडाळून.”
किंवा “गर्विष्ठ.”
शब्दशः “तुझ्या दिवसांत.”
किंवा “मृत्यूची सावली.”
शब्दशः “दिवस.”
किंवा कदाचित, “वीज.”
किंवा “गर्भाशयातून.”
कदाचित वृषभ नक्षत्रातले प्लिएडस तारे.
शब्दशः “मझारोथ.” २रा २३:५ इथे या शब्दाचं जे अनेकवचनी रूप वापरलं आहे, ते राशीचक्रातल्या नक्षत्रांना सूचित करतं.
शब्दशः “सप्तऋषी नक्षत्राला त्याच्या मुलांसोबत.”
किंवा कदाचित, “त्याचा अधिकार.”
किंवा कदाचित, “माणसाला.”
किंवा कदाचित, “मनाला.”
किंवा “जन्म देतात.”
किंवा “पिल्लाला.”
किंवा “तबेल्यात.”
शब्दशः “बियाणं.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “शस्त्रांना भेटायला जातो.”
शब्दशः “जमिनीला (पृथ्वीला) गिळून टाकतो.”
किंवा कदाचित, “तो विश्वास ठेवत नाही.”
शब्दशः “खडकाच्या दातावर.”
किंवा “माझा न्याय रद्द करतोस का?”
शब्दशः “त्यांची तोंडं.”
किंवा “याबद्दल मीही तुला शाबासकी देईन.”
कदाचित पाणघोडा.
शब्दार्थसूचीत “पपायरस गवत” पाहा.
शब्दशः “पाश.”
कदाचित मगर.
किंवा “दोर.” शब्दशः “लव्हाळं.”
शब्दशः “काटा.”
भाल्यासारखं शस्त्र. कदाचित याला गळासारखी मागच्या बाजूला वळलेली टोकं असावीत.
किंवा “तू खाली आपटशील.”
शब्दशः “तोंडाचे दरवाजे.”
किंवा कदाचित, “खवल्यांच्या रांगा त्याचं भूषण आहेत.”
किंवा “खालच्या दगडासारखं.”
म्हणजे, मळणीसाठी वापरला जाणारा ओंडका.
शब्दशः “मी नक्की त्याचा चेहरा वर करीन.”
शब्दशः “यहोवाने ईयोबचा बंदिवास संपवला.”
शब्दशः “म्हातारा आणि भरपूर दिवसांचा होऊन.”