वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt २ इतिहास १:१-३६:२३
  • २ इतिहास

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २ इतिहास
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास

२ इतिहास

१ दावीदचा मुलगा शलमोन याचं राज्य दिवसेंदिवस मजबूत होत गेलं. त्याचा देव यहोवा* त्याच्यासोबत असल्यामुळे तो अतिशय शक्‍तिशाली होत गेला.+

२ शलमोनने सगळ्या इस्राएलला, म्हणजे हजारांवर व शंभरांवर प्रमुख असलेल्यांना, न्यायाधीशांना आणि घराण्यांचे प्रमुख असलेल्या इस्राएलच्या सगळ्या प्रधानांना बोलावून घेतलं. ३ मग शलमोन आणि इस्राएलची सर्व मंडळी गिबोनमधल्या उच्च स्थानाकडे*+ गेली. कारण, यहोवाचा सेवक मोशे याने ओसाड रानात बनवलेला खऱ्‍या देवाचा भेटमंडप तिथे होता. ४ पण दावीदने मात्र खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी किर्याथ-यारीम इथून आणून,+ यरुशलेममध्ये आपण उभारलेल्या तंबूत ठेवली होती.+ ५ हूरचा नातू, म्हणजे उरीचा मुलगा बसालेल+ याने बनवलेली तांब्याची वेदी+ यहोवाच्या उपासना मंडपासमोर ठेवण्यात आली होती. आणि शलमोन व इस्राएलची मंडळी त्यापुढे प्रार्थना करायची.* ६ शलमोनने तिथे यहोवापुढे अर्पणं दिली. त्याने भेटमंडपाजवळ असलेल्या तांब्याच्या वेदीवर १,००० जनावरांची होमार्पणं दिली.+

७ त्या रात्री देवाने शलमोनला दर्शन दिलं. देव त्याला म्हणाला: “तुला जे काही हवंय ते माग, मी तुला ते देईन.”+ ८ त्यावर शलमोन देवाला म्हणाला: “तू माझे वडील दावीद यांच्यावर अपार प्रेम* केलंस,+ आणि त्यांच्या जागी मला राजा बनवलंस.+ ९ आता हे यहोवा देवा! तू माझे वडील दावीद यांना जे वचन दिलं होतंस, ते पूर्ण कर.+ तू ज्या लोकांवर मला राजा बनवलंस, त्यांची संख्या पृथ्वीवरच्या धुळीच्या कणांइतकी अगणित आहे.+ १० म्हणून आता या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी मला बुद्धी आणि ज्ञान दे.+ कारण तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करणं कोणाला शक्य आहे?”+

११ तेव्हा देव शलमोनला म्हणाला: “तू धनसंपत्ती, श्रीमंती आणि मानसन्मान मागितला नाहीस; तुझा द्वेष करणाऱ्‍यांचा जीव मागितला नाहीस किंवा स्वतःसाठी दीर्घायुष्यही मागितलं नाहीस. याउलट, ज्या लोकांवर मी तुला राजा बनवलं त्या लोकांचा न्याय करण्यासाठी तू बुद्धी आणि ज्ञान मागितलंस.+ तुझी अशी इच्छा असल्यामुळे, १२ मी तुला बुद्धी आणि ज्ञान तर देईनच; पण त्यासोबतच, तुझ्याआधी होऊन गेलेल्या कोणत्याही राजाला मिळाली नाही आणि तुझ्यानंतर होणाऱ्‍या कोणत्याही राजाला मिळणार नाही इतकी धनसंपत्ती, श्रीमंती आणि मानसन्मानही मी तुला देईन.”+

१३ मग शलमोन गिबोनमधल्या+ उच्च स्थानावर असलेल्या भेटमंडपाकडून यरुशलेमला आला; आणि त्याने इस्राएलवर राज्य केलं. १४ शलमोन स्वतःसाठी रथ आणि घोडे* जमा करत राहिला. त्याच्याकडे १,४०० रथ आणि १२,००० घोडे* होते.+ त्यातले काही त्याने, रथांसाठी बांधलेल्या शहरांत+ आणि काही स्वतःजवळ यरुशलेममध्ये ठेवले.+ १५ शलमोन राजाने यरुशलेममध्ये सोन्या-चांदीचं प्रमाण दगडांइतकं+ आणि देवदाराच्या लाकडाचं प्रमाण शेफीलातल्या उंबराच्या झाडांइतकं मुबलक केलं.+ १६ शलमोनसाठी इजिप्तमधून* घोडे मागवले जायचे.+ राजाचे व्यापारी घोड्यांच्या कळपाची किंमत ठरवून कळपचे कळप विकत घ्यायचे.*+ १७ इजिप्तमधून मागवलेल्या प्रत्येक रथाची किंमत ६०० चांदीचे तुकडे आणि प्रत्येक घोड्याची किंमत १५० चांदीचे तुकडे इतकी होती; मग राजाचे व्यापारी हे रथ व घोडे हित्ती लोकांच्या सर्व राजांना आणि सीरियाच्या सर्व राजांना विकायचे.

२ शलमोनने मग यहोवाच्या नावाच्या गौरवासाठी एक मंदिर+ आणि स्वतःसाठी एक राजमहाल बांधण्याचा हुकूम दिला.+ २ त्याने ओझी वाहण्यासाठी ७०,००० मजुरांना आणि डोंगरांवर दगड फोडण्यासाठी ८०,००० मजुरांना नेमलं;+ तसंच, त्यांच्या कामाची देखरेख करण्यासाठी त्याने ३,६०० जणांना मुकादम म्हणून नेमलं.+ ३ नंतर, शलमोनने सोरचा राजा हीराम+ याला असा निरोप पाठवला: “तुम्ही माझ्या वडिलांना राजमहाल बांधायला देवदाराची लाकडं पाठवली होती, तशी आता मलासुद्धा पाठवा.+ ४ माझा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी मी एक मंदिर बांधतोय. म्हणजे मला ते देवाला समर्पित करता येईल आणि तिथे त्याच्यासमोर सुगंधी धूप जाळता येईल+ व नेहमी भाकरीची थप्पी* ठेवता येईल.+ तसंच रोज सकाळी व संध्याकाळी,+ शब्बाथाच्या+ व नवचंद्राच्या दिवशी*+ आणि आमचा देव यहोवा याच्यासाठी साजऱ्‍या केल्या जाणाऱ्‍या सणांच्या वेळी मला तिथे होमार्पणं जाळता येतील.+ या सगळ्या गोष्टी नेहमी करत राहणं हे इस्राएली लोकांचं कर्तव्य आहे. ५ मी जे मंदिर बांधतोय, ते अतिशय भव्य असणार आहे; कारण आमचा देव इतर सर्व देवांपेक्षा महान आहे. ६ खरंतर, त्याच्यासाठी मंदिर बांधायची ताकद कोणातही नाही. कारण तो आकाशात आणि आकाशांच्या आकाशातही मावू शकत नाही.+ मग त्याच्यासाठी मंदिर बांधणारा मी कोण? मी फार तर त्याच्यासमोर बलिदानांचं हवन करण्यासाठी एक जागा तयार करू शकतो. ७ तर आता अशा एका कारागिराला पाठवा जो सोनं, चांदी, तांबं+ व लोखंड; तसंच जांभळी लोकर, गडद लाल व निळ्या रंगाचं सूत यांचं काम करण्यात आणि कोरीव काम करण्यातही कुशल असेल. तो माझ्या कुशल कारागिरांसोबत, म्हणजे माझे वडील दावीद यांनी नेमलेल्या कारागिरांसोबत यहूदामध्ये व यरुशलेममध्ये काम करेल.+ ८ यासोबतच, मला लबानोनमधली देवदाराची, गंधसरूची+ आणि रक्‍तचंदनाची लाकडंही+ पाठवा. कारण मला चांगलं माहीत आहे, की तुमच्या सेवकांना लबानोनची झाडं+ कापण्याचा खूप अनुभव आहे. माझे सेवक तुमच्या सेवकांसोबत काम करून,+ ९ माझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लाकडं तयार करतील. कारण मी जे मंदिर बांधणार आहे ते अतिशय भव्य असणार आहे. १० आणि पाहा! झाडं कापणाऱ्‍या तुमच्या सेवकांसाठी मी अन्‍नसामग्री+ म्हणून २०,००० कोर* मापं गहू, २०,००० कोर मापं जव, २०,००० बथ* मापं द्राक्षारस आणि २०,००० बथ मापं तेल पुरवीन.”

११ तेव्हा सोरचा राजा हीराम याने शलमोनला पत्र लिहून असा संदेश कळवला: “यहोवाला त्याचे लोक प्रिय आहेत आणि म्हणून त्याने तुला त्यांचा राजा बनवलंय.” १२ हीराम पुढे म्हणाला: “ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी बनवली त्या इस्राएलच्या देवाची, यहोवाची स्तुती होवो. कारण त्याने दावीद राजाला एक बुद्धिमान मुलगा दिलाय;+ एक असा मुलगा ज्याच्याकडे न्यायबुद्धी व समजशक्‍ती आहे,+ आणि जो यहोवासाठी मंदिर व स्वतःसाठी राजमहाल बांधेल. १३ आता मी हूराम-अबी याला तुझ्याकडे पाठवतोय. तो एक कुशल कारागीर असून त्याला कामाचं चांगलं ज्ञान आहे.+ १४ त्याची आई दान वंशातली असून त्याचे वडील सोरचे राहणारे होते. त्याला सोनं, चांदी, तांबं, लोखंड, दगड, लाकूड, जांभळी लोकर, निळं व गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीचं कापड यांवर काम करण्याचा बराच अनुभव आहे.+ तो सगळ्या प्रकारचं कोरीव काम आणि दिलेल्या नमुन्यांनुसार कोणतंही काम करू शकतो.+ तो माझ्या प्रभूच्या, म्हणजे तुझे वडील दावीद यांच्या कुशल कारागिरांसोबत, तसंच तुझ्या कुशल कारागिरांसोबत काम करेल. १५ तर आता, माझ्या प्रभूने शब्द दिल्याप्रमाणे गहू, जव, तेल आणि द्राक्षारस आपल्या सेवकांसाठी पाठवावा.+ १६ आम्ही तुमच्यासाठी लबानोनमधली हवी तेवढी झाडं कापू+ आणि त्यांचे तराफे* बांधून ते समुद्रमार्गे यापोला+ पाठवून देऊ. मग तिथून तुम्ही ती यरुशलेमला घेऊन जाऊ शकता.”+

१७ नंतर शलमोननेही आपले वडील दावीद यांच्याप्रमाणेच+ इस्राएल देशात राहणाऱ्‍या सर्व विदेशी माणसांची संख्या मोजली.+ तेव्हा ती १,५३,६०० इतकी असल्याचं दिसून आलं. १८ मग त्याने त्यांच्यापैकी ७०,००० जणांना ओझी वाहण्यासाठी आणि ८०,००० जणांना डोंगरांवर दगड फोडण्यासाठी मजूर म्हणून नेमलं;+ तसंच, त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्याने ३,६०० जणांना त्यांच्यावर मुकादम म्हणून नेमलं.+

३ मग शलमोनने यरुशलेममध्ये मोरिया डोंगरावर+ यहोवाच्या मंदिराचं बांधकाम सुरू केलं;+ त्याचे वडील दावीद यांनी अर्णान यबूसीच्या खळ्यात* जी जागा तयार केली होती,+ तिथे त्याने मंदिराचं बांधकाम सुरू केलं. याच डोंगरावर यहोवाने दावीदला दर्शन दिलं होतं.+ २ शलमोनने मंदिराचं बांधकाम आपल्या शासनकाळाच्या, चौथ्या वर्षाच्या दुसऱ्‍या महिन्यातल्या दुसऱ्‍या दिवशी सुरू केलं. ३ त्याने खऱ्‍या देवाच्या मंदिराचा जो पाया घातला, तो जुन्या मापाप्रमाणे* ६० हात लांब आणि २० हात रुंद होता.+ ४ मंदिरासमोरच्या द्वारमंडपाची लांबी २० हात, म्हणजे मंदिराच्या रुंदीइतकीच होती आणि त्याची उंची २०* हात होती. शलमोनने त्याची आतली बाजू शुद्ध सोन्याने मढवली.+ ५ त्याने मोठ्या खोलीला* गंधसरूच्या लाकडांचे तक्‍ते बसवले* आणि ते शुद्ध सोन्याने मढवले.+ त्यानंतर त्याने ते खजुराच्या झाडांच्या आकृत्यांनी+ व साखळ्यांनी सजवले.+ ६ मग त्याने सुंदर अशी मौल्यवान रत्नं बसवून मंदिर सुशोभित केलं.+ आणि त्याने जे सोनं+ वापरलं होतं, ते पर्वाइम इथलं होतं. ७ त्याने संपूर्ण मंदिर, म्हणजे त्याच्या तुळया, उंबरठे, भिंती आणि दारं हे सगळं सोन्याने मढवलं;+ आणि भिंतींवर करुबांच्या आकृत्या कोरल्या.+

८ त्यानंतर त्याने परमपवित्र स्थान बनवलं.+ त्याची रुंदी २० हात होती, आणि त्याची लांबी मंदिराच्या रुंदीइतकीच, म्हणजे २० हात होती. त्याने ते ६०० तालान्त* शुद्ध सोन्याने मढवलं.+ ९ सोन्याच्या खिळ्यांचं वजन ५० शेकेल* होतं; त्याने छतावरच्या खोल्याही सोन्याने मढवल्या.

१० मग त्याने परमपवित्र स्थानासाठी दोन करूब बनवले आणि ते सोन्याने मढवले.+ ११ करुबांच्या पंखांची+ एकूण लांबी २० हात होती. पहिल्या करुबाच्या एका पंखाची लांबी पाच हात असून तो पंख मंदिराच्या एका भिंतीला लागायचा; आणि त्याच्या दुसऱ्‍या पंखाची लांबी पाच हात असून तो पंख दुसऱ्‍या करुबाच्या एका पंखाला लागायचा. १२ आणि दुसऱ्‍या करुबाच्या एका पंखाची लांबी पाच हात असून तो पंख मंदिराच्या दुसऱ्‍या भिंतीला लागायचा; आणि त्याच्या दुसऱ्‍या पंखाची लांबी पाच हात असून तो पंख पहिल्या करुबाच्या एका पंखाला लागायचा. १३ या करुबांचे पंख पसरलेले होते आणि त्या पंखांची एकूण लांबी २० हात होती. ते करूब उभे असून त्यांची तोंडं आतल्या बाजूला होती.*

१४ यासोबतच, त्याने निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीचं कापड वापरून मंदिराचा पडदाही+ बनवला आणि त्यावर भरतकाम करून करूब बनवले.+

१५ मग त्याने मंदिरासमोर उभे करायला ३५ हात उंचीचे दोन स्तंभ+ बनवले. स्तंभांवरचा प्रत्येक कळस पाच हात उंचीचा होता.+ १६ तसंच, त्याने साखळ्या तयार करून त्या कळसांभोवती लटकवल्या. आणि डाळिंबांच्या १०० आकृत्या बनवून त्या साखळ्यांना लावल्या. १७ मग त्याने ते दोन्ही स्तंभ मंदिराच्या समोर ठेवले; त्याने एक स्तंभ उजवीकडे* आणि एक डावीकडे* ठेवला. त्याने उजवीकडच्या स्तंभाला याखीन,* तर डावीकडच्या स्तंभाला बवाज* असं नाव दिलं.

४ मग त्याने तांब्याची वेदी+ बनवली. तिची लांबी २० हात, रुंदी २० हात आणि उंची १० हात होती.

२ मग त्याने धातूचा एक मोठा ओतीव गंगाळ-सागर*+ तयार केला. तो गोलाकार असून त्याचा व्यास १० हात आणि त्याची उंची ५ हात होती. त्याचा घेर मोजायला ३० हात लांब दोरी लागायची.+ ३ गंगाळाच्या काठाच्या खाली असलेल्या घेरावर सर्व बाजूंनी खरबुजाच्या आकृत्यांच्या+ दोन रांगा होत्या. एकेका हाताच्या अंतरात दहा-दहा खरबुजांची सजावट केलेली होती. गंगाळाचं ओतीव काम करतानाच त्या रांगा गंगाळासोबत अखंड तयार करण्यात आल्या होत्या. ४ तो गंगाळ-सागर १२ बैलांवर+ ठेवण्यात आला होता. त्यांपैकी तीन बैलांची तोंडं उत्तरेकडे, तीन बैलांची पश्‍चिमेकडे, तीन बैलांची दक्षिणेकडे आणि तीन बैलांची तोंडं पूर्वेकडे होती. त्या बैलांचे मागचे भाग आतल्या बाजूला होते, आणि त्यांच्या पाठींवर गंगाळ-सागर आधारलेला होता. ५ त्या गंगाळाची जाडी चार बोटं* होती. त्याचा काठ एखाद्या प्याल्याच्या काठासारखा, उमललेल्या भुईकमळासारखा* होता. आणि त्यात ३,००० बथ* पाणी मावायचं.

६ मग त्याने दहा छोटी गंगाळं बनवली. त्यांतली पाच त्याने मंदिराच्या उजवीकडे आणि पाच डावीकडे ठेवली.+ त्यांत याजक होमार्पणासाठी वापरल्या जाणाऱ्‍या वस्तू धुवायचे.+ पण मोठा गंगाळ-सागर मात्र याजकांसाठी हातपाय धुवायला होता.+

७ पुढे त्याने, दिलेल्या तपशिलांप्रमाणे+ सोन्याचे दहा दीपवृक्ष* बनवले,+ आणि ते मंदिरात उजवीकडे पाच, तर डावीकडे पाच असे ठेवले.+

८ त्याने दहा मेजंही बनवली आणि ती मंदिरात उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी ठेवली.+ तसंच, त्याने सोन्याच्या १०० वाट्याही बनवल्या.

९ मग त्याने याजकांचं+ अंगण,+ मोठं अंगण+ आणि अंगणांचे दरवाजे बनवले, आणि ते दरवाजे तांब्याने मढवले. १० आणि मोठा गंगाळ-सागर मंदिराच्या उजवीकडे, म्हणजे दक्षिणपूर्वेकडे ठेवला.+

११ हीरामने राख काढायच्या बादल्या, फावडी आणि कटोरेसुद्धा बनवले.+

अशा प्रकारे, हीरामने शलमोन राजासाठी खऱ्‍या देवाच्या मंदिराचं सगळं काम पूर्ण केलं. त्याने बनवलेल्या सर्व वस्तू या होत्या:+ १२ दोन स्तंभ+ आणि त्यांच्या वर असलेले कटोऱ्‍याच्या आकाराचे दोन कळस; स्तंभांच्या टोकांवर असलेल्या या कळसांना सजवण्यासाठी दोन नक्षीदार जाळ्या;+ १३ स्तंभांवरचे कळस सजवण्याकरता असलेल्या या दोन जाळ्यांसाठी ४०० डाळिंबं+ (प्रत्येक जाळीवर डाळिंबांच्या दोन रांगा होत्या); १४ हाताने ढकलता येतील अशा दहा गाड्या* आणि त्यांवरची दहा गंगाळं;+ १५ मोठा गंगाळ-सागर आणि त्याच्या खाली असलेले १२ बैल;+ १६ आणि राख काढायच्या बादल्या, फावडी, काटे+ आणि सर्व भांडी. हूराम-अबीव+ याने शलमोन राजाच्या सांगण्यानुसार, यहोवाच्या मंदिरासाठी बनवलेल्या या सर्व वस्तू चकाकी दिलेल्या तांब्याच्या होत्या. १७ राजाने या सर्व वस्तू यार्देन प्रांतात, सुक्कोथच्या+ आणि सरेदाच्या मधल्या प्रदेशात मातीच्या साच्यात ओतून तयार केल्या होत्या. १८ शलमोनने खूप मोठ्या प्रमाणात ही सर्व भांडी बनवली. म्हणून त्यांसाठी नेमकं किती तांबं वापरण्यात आलं ते समजू शकलं नाही.+

१९ शलमोनने खऱ्‍या देवाच्या मंदिरासाठी लागणाऱ्‍या या सर्व वस्तू तयार केल्या:+ सोन्याची वेदी;+ अर्पणाची भाकर+ ठेवण्यासाठी मेजं;+ २० नियमाप्रमाणे आतल्या खोलीसमोर जळत ठेवण्यासाठी शुद्ध सोन्याचे दीपवृक्ष आणि त्यांचे दिवे;+ २१ शुद्ध सोन्याच्या पाकळ्या, दीप आणि चिमटे. २२ शुद्ध सोन्याचे कटोरे, प्याले, धूप जाळण्याची पात्रं आणि आग विझवण्याच्या कातरी; परमपवित्र स्थानाची सोन्याची दोन्ही दारं+ आणि मंदिराची सोन्याची प्रवेशद्वारं.+

५ अशा रितीने, शलमोन राजाने यहोवाच्या मंदिराचं सगळं काम संपवलं.+ मग त्याने आपले वडील दावीद यांनी पवित्र केलेल्या वस्तू+ आत आणल्या; त्याने सोनं, चांदी आणि सगळ्या वस्तू खऱ्‍या देवाच्या मंदिराच्या भांडारांत आणल्या.+ २ मग शलमोनने इस्राएलच्या वडीलजनांना, म्हणजे इस्राएल वंशांच्या सगळ्या प्रधानांना आणि घराण्यांच्या प्रमुखांना बोलावून घेतलं. ते सगळे दावीदपुरातून, म्हणजे सीयोनमधून+ यहोवाच्या कराराची पेटी आणण्यासाठी+ यरुशलेममध्ये एकत्र जमले. ३ इस्राएलचे हे सर्व पुरुष सातव्या महिन्यात,+ सणाच्या* वेळी राजासमोर एकत्र जमले.

४ इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा लेव्यांनी कराराची पेटी उचलली.+ ५ याजक आणि लेवी हे कराराची पेटी, भेटमंडप+ आणि मंडपातली सर्व पवित्र भांडी घेऊन आले. ६ शलमोन राजा आणि इस्राएलच्या ज्या लोकांना त्याने बोलावलं होतं ते सर्व कराराच्या पेटीपुढे उभे होते. त्या वेळी, इतक्या मोठ्या प्रमाणात मेंढरांची आणि गाय-बैलांची बलिदानं दिली जात होती,+ की त्यांची संख्या मोजणं शक्य नव्हतं. ७ याजकांनी मग यहोवाच्या कराराची पेटी तिच्या जागेवर आणून ठेवली; त्यांनी ती मंदिराच्या आतल्या खोलीत, म्हणजे परमपवित्र स्थानात करुबांच्या पंखांखाली ठेवली.+ ८ कराराच्या पेटीच्या जागेवर करुबांचे पंख अशा प्रकारे पसरले होते, की कराराची पेटी आणि तिचे दांडे+ करुबांमुळे वरून झाकले गेले होते. ९ कराराच्या पेटीचे दांडे इतके मोठे होते, की त्यांची टोकं आतल्या खोलीसमोर असलेल्या पवित्र स्थानातूनही दिसायची. पण बाहेरून मात्र ती दिसायची नाहीत. आणि आजपर्यंत ते तिथे तसेच आहेत. १० कराराच्या पेटीत दोन दगडी पाट्यांशिवाय दुसरं काहीच नव्हतं; इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आले,+ तेव्हा यहोवाने त्यांच्याशी एक करार केला होता.+ आणि त्या वेळी होरेब इथे मोशेने त्या दगडी पाट्या कराराच्या पेटीत ठेवल्या होत्या.+

११ याजक जेव्हा पवित्र स्थानातून बाहेर आले (कारण तिथे असलेल्या सर्व याजकांनी स्वतःला पवित्र केलं होतं;+ मग ते कोणत्याही गटातले असोत),+ १२ तेव्हा आसाफ,+ हेमान,+ यदूथून,+ त्यांची मुलं आणि भाऊबंद यांच्या नेतृत्वाखाली असलेले सर्व लेवी गायक+ वेदीच्या पूर्वेकडे उभे होते. त्या सगळ्यांनी चांगल्या प्रतीचे कपडे घातले असून त्यांच्या हातांत झांजा, तंतुवाद्यं व वीणा होत्या. आणि त्यांच्यासोबत १२० याजक कर्णे फुंकत होते.+ १३ कर्णे फुंकणारे आणि गीत गाणारे एकसुरात यहोवाची स्तुती करत होते व त्याचे आभार मानत होते. ते कर्णे, झांजा व इतर संगीत वाद्यं मोठ्याने वाजवून यहोवाची अशी स्तुती करत होते, की “तो चांगला आहे आणि त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम राहतं.”+ त्या वेळी, यहोवाचं मंदिर ढगाने भरून गेलं.+ १४ या ढगामुळे याजक तिथे उभे राहून सेवा करू शकले नाहीत, कारण खऱ्‍या देवाचं मंदिर यहोवाच्या तेजाने भरून गेलं होतं.+

६ त्या वेळी शलमोन म्हणाला: “यहोवाने म्हटलं होतं, की तो गडद अंधारात राहील.+ २ पण मी तुझ्यासाठी एक भव्य मंदिर बांधलंय, तुझ्यासाठी एक कायमचं निवासस्थान बांधलंय.”+

३ मग राजा मागे वळला आणि तिथे उभ्या असलेल्या इस्राएलच्या संपूर्ण मंडळीला त्याने आशीर्वाद दिला.+ ४ तो म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा याची स्तुती होवो. त्याने स्वतः आपल्या मुखाने माझे वडील दावीद यांना वचन दिलं होतं आणि स्वतःच्या हातांनी त्याने ते पूर्णही केलंय. त्याने म्हटलं होतं: ५ ‘ज्या दिवशी मी माझ्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणलं, त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या नावाच्या गौरवासाठी घर बांधायला मी इस्राएलच्या कोणत्याही वंशातलं शहर निवडलं नाही.+ शिवाय माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी होण्यासाठी मी कोणत्याही माणसाला निवडलं नाही. ६ पण आता, मी माझ्या नावाच्या गौरवासाठी यरुशलेम शहर+ निवडलंय आणि माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करायला दावीदला निवडलंय.’+ ७ इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी एक घर* बांधायची माझे वडील दावीद यांची मनापासून इच्छा होती.+ ८ पण यहोवा माझ्या वडिलांना, दावीदला म्हणाला, ‘तुला माझ्या नावाच्या गौरवासाठी एक घर बांधायची मनापासून इच्छा आहे आणि तुझी ही इच्छा चांगलीच आहे. ९ असं असलं, तरी तू माझ्यासाठी घर बांधणार नाहीस; तर तुला जो मुलगा होईल तो माझ्या नावाच्या गौरवासाठी घर बांधेल.’+ १० यहोवाने दिलेलं हे वचन त्याने पूर्ण केलंय. कारण यहोवाने वचन दिल्याप्रमाणे+ मी माझ्या वडिलांच्या, दावीदच्या जागी इस्राएलच्या राजासनावर बसलो.+ आणि इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी मी मंदिरही बांधलं. ११ तसंच, यहोवाने इस्राएली लोकांसोबत जो करार केला होता, तो करार असलेली पेटी+ मी तिथे ठेवली आहे.”

१२ मग शलमोन इस्राएलच्या संपूर्ण मंडळीपुढे यहोवाच्या वेदीसमोर उभा राहिला. आणि त्याने आपले हात वर आकाशाकडे पसरले.+ १३ (शलमोनने तांब्याचं एक व्यासपीठ बनवून ते अंगणाच्या+ मधे ठेवलं होतं, आणि तो त्यावर उभा होता. ते व्यासपीठ पाच हात* लांब, पाच हात रुंद आणि तीन हात उंच होतं.) इस्राएलच्या सर्व मंडळीसमोर गुडघे टेकून त्याने आपले हात वर आकाशाकडे पसरले.+ १४ आणि तो म्हणाला: “हे इस्राएलच्या देवा यहोवा! स्वर्गात आणि पृथ्वीवर तुझ्यासारखा कोणीही देव नाही; तू आपला करार पाळतोस आणि तुझ्या मार्गांवर पूर्ण मनाने चालणाऱ्‍या आपल्या सेवकांवर एकनिष्ठ प्रेम करतोस.+ १५ तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं वचन पूर्ण केलंस.+ तू स्वतः आपल्या मुखाने वचन दिलं होतं आणि आज तू स्वतःच्या हाताने ते पूर्ण केलंस.+ १६ आता हे इस्राएलच्या देवा यहोवा तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं हे वचन पूर्ण कर. तू म्हणाला होतास: ‘तुझ्या मुलांनी जर आपल्या वागणुकीकडे लक्ष दिलं आणि ते तुझ्यासारखंच माझ्या नियमांनुसार माझ्यासमोर चालत राहिले,+ तर इस्राएलच्या राजासनावर बसायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+ १७ तर आता हे इस्राएलच्या देवा यहोवा! तू तुझ्या सेवकाला, दावीदला दिलेलं हे वचन खरं ठरो.

१८ पण देव खरोखर पृथ्वीवर माणसांसोबत राहील काय?+ पाहा! आकाशात आणि आकाशांच्या आकाशातही तू मावू शकत नाहीस,+ तर मी बांधलेल्या या मंदिरात तू कसा मावणार!+ १९ आता हे माझ्या देवा यहोवा, तुझ्या या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि तो कृपेसाठी करत असलेल्या विनंतीकडे लक्ष दे. तुझा हा सेवक मदतीसाठी करत असलेला धावा आणि तो तुझ्यासमोर करत असलेली प्रार्थना ऐक. २० ज्या स्थानाविषयी तू म्हणाला होतास, की ते तुझ्या नावाने ओळखलं जाईल त्या स्थानावर,+ म्हणजे या मंदिरावर दिवसरात्र तुझी नजर असू दे. आणि तुझा सेवक या स्थानाकडे वळून प्रार्थना करेल, तेव्हा तू ती ऐक. २१ तुझा सेवक जेव्हा मदतीसाठी विनंती करेल आणि तुझे इस्राएली लोक या स्थानाकडे वळून कळकळीची प्रार्थना करतील,+ तेव्हा तू ती ऐक; स्वर्गातल्या आपल्या निवासस्थानातून तू ती विनंती ऐक+ आणि त्यांना क्षमा कर.+

२२ एखाद्या माणसाला, आपल्या सोबत्याविरुद्ध पाप केल्याबद्दल शपथ* घ्यायला लावण्यात आली आणि त्या शपथेच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारलेली असताना जर तो या मंदिरात तुझ्या वेदीसमोर आला,+ २३ तर तू स्वर्गातून ऐक आणि आपल्या सेवकांचा न्याय कर. दुष्टाला त्याच्या दुष्ट कामांबद्दल शिक्षा कर व त्याचा गुन्हा त्याच्याच माथ्यावर मार.+ आणि नीतिमानाला निर्दोष घोषित करून त्याच्या नीतिमान कार्यांप्रमाणे त्याला प्रतिफळ दे.+

२४ आणि तुझे इस्राएली लोक तुझ्याविरुद्ध पाप करत राहिल्यामुळे शत्रूंकडून त्यांचा पराभव झाला,+ आणि त्यांनी पुन्हा तुझ्याकडे वळून जर तुझ्या नावाचा गौरव केला+ आणि तुझ्या या मंदिरात प्रार्थना करून+ तुझ्याकडे कृपेची भीक मागितली,+ २५ तर तू स्वर्गातून आपल्या इस्राएली लोकांचं ऐक+ आणि त्यांच्या पापांची क्षमा कर आणि जो देश तू त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला होता त्यात त्यांना परत आण.+

२६ ते तुझ्याविरुद्ध पाप करत राहिल्यामुळे+ जर आकाशाची दारं बंद होऊन पाऊस पडला नाही,+ पण तू त्यांना नम्र व्हायला* लावल्यामुळे त्यांनी या स्थानाकडे वळून प्रार्थना केली व तुझ्या नावाचा गौरव केला आणि त्यांनी आपला पापी मार्ग सोडून दिला,+ २७ तर तू स्वर्गातून त्यांचं ऐक आणि तुझ्या सेवकांच्या, तुझ्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा कर. ज्या चांगल्या मार्गाने त्यांनी चाललं पाहिजे तो मार्ग त्यांना शिकव;+ आणि तुझ्या लोकांना तू वारसा म्हणून दिलेल्या तुझ्या देशात पाऊस पाड.+

२८ देशात जर दुष्काळ पडला,+ रोगाची साथ+ पसरली, पिकांना करपून टाकणारा उष्ण वारा आला, पिकांना बुरशी लागली,+ टोळधाड किंवा पीक फस्त करणारे नाकतोडे+ आले, किंवा देशातल्या एखाद्या शहराला त्यांच्या शत्रूंनी वेढा घातला,+ त्यांच्यावर इतर कुठलीही पीडा आली किंवा रोगराई पसरली,+ २९ आणि त्यांच्यापैकी कोणत्याही माणसाने किंवा तुझ्या सगळ्या इस्राएली लोकांनी या मंदिराकडे आपले हात पसरून प्रार्थना+ किंवा कृपेसाठी कोणतीही विनंती+ केली (कारण प्रत्येकाला आपल्या यातना आणि आपलं दुःख माहीत असतं),+ ३० तर तू स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून+ ती ऐक. त्यांना क्षमा कर+ आणि प्रत्येकाला आपल्या कामांप्रमाणे प्रतिफळ दे; कारण तू प्रत्येकाचं मन ओळखू शकतोस (तूच फक्‍त माणसाचं मन खऱ्‍या अर्थाने ओळखू शकतोस).+ ३१ म्हणजे मग तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात ते जोपर्यंत राहतील, तोपर्यंत ते तुझ्या मार्गांवर चालत राहून तुझं भय बाळगतील.

३२ तसंच, तुझ्या इस्राएली लोकांपैकी नसलेला विदेशी माणूस जर तुझ्या महान नावाविषयी,* तुझ्या सामर्थ्यशाली हाताविषयी आणि तुझ्या पराक्रमी बाहूविषयी ऐकून दूरच्या देशातून आला,+ आणि त्याने तुझ्या या मंदिराकडे वळून प्रार्थना केली,+ ३३ तर तू स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून ती ऐक. आणि तो विदेशी जी काही विनंती करेल ती तू पूर्ण कर. म्हणजे तुझ्या इस्राएली लोकांप्रमाणेच पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना तुझं नाव समजेल+ आणि ते तुझं भय बाळगतील. तसंच, मी बांधलेल्या या मंदिराला तुझं नाव देण्यात आलंय हेसुद्धा त्यांना समजेल.

३४ तू आपल्या लोकांना त्यांच्या शत्रूंशी लढायला कुठेही पाठवलं+ आणि त्यांनी जर तू निवडलेल्या या शहराकडे आणि मी तुझ्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून+ तुला प्रार्थना केली,+ ३५ तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना आणि कृपेसाठी त्यांनी केलेली विनंती ऐक आणि त्यांना मदत कर.*+

३६ त्यांनी जर तुझ्याविरुद्ध पाप केलं (कारण असा कोणताही माणूस नाही जो पाप करत नाही),+ आणि तुझा राग त्यांच्यावर भडकला व तू त्यांना शत्रूच्या हाती दिलं, आणि शत्रूने त्यांना बंदी करून एखाद्या जवळच्या किंवा दूरच्या देशात नेलं;+ ३७ आणि बंदी करून नेलेल्या देशात ते जर भानावर आले आणि शत्रूंच्या देशात ते तुझ्याकडे वळले आणि ‘आम्ही पाप केलं आणि चुकीचं वागलो; आम्ही दुष्टपणे वागलो,’ असं म्हणून त्यांनी तुझ्याकडे कृपेची भीक मागितली,+ ३८ आणि ज्या देशात त्यांना बंदी करून नेण्यात आलं, त्या देशात असताना+ ते जर पूर्ण मनाने आणि जिवाने तुझ्याकडे वळले,+ आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे व तू निवडलेल्या शहराकडे आणि मी तुझ्या नावाच्या गौरवासाठी बांधलेल्या मंदिराकडे वळून त्यांनी प्रार्थना केली,+ ३९ तर स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व कृपेसाठी त्यांनी केलेली विनंती ऐक आणि त्यांना मदत कर.*+ तुझ्याविरुद्ध पाप केलेल्या तुझ्या लोकांना क्षमा कर.

४० आता हे माझ्या देवा, या ठिकाणी* केल्या जाणाऱ्‍या प्रार्थना कृपा करून ऐक आणि त्यांकडे तुझं लक्ष असू दे.*+ ४१ तर आता हे यहोवा देवा, तू तुझ्या या विसाव्याच्या ठिकाणी ये!+ तू तुझ्या सामर्थ्याच्या प्रतिकासह, म्हणजे तुझ्या कराराच्या पेटीसह ये! हे यहोवा देवा, तुझे याजक तारणाचं वस्त्र धारण करोत, आणि तुझ्या चांगुलपणामुळे तुझे विश्‍वासू जण आनंद करोत.+ ४२ हे यहोवा देवा, तुझ्या अभिषिक्‍तापासून तोंड फिरवू नकोस!+ तुझा सेवक दावीद याच्यावर असलेल्या तुझ्या एकनिष्ठ प्रेमाची तुला नेहमी आठवण राहो.”+

७ शलमोनची प्रार्थना संपली+ तेव्हा लगेच स्वर्गातून अग्नी आला,+ आणि त्या अग्नीने होमार्पण व बलिदानं भस्म केली. आणि मंदिर यहोवाच्या तेजाने भरून गेलं.+ २ यहोवाचं मंदिर यहोवाच्या तेजाने भरून गेल्यामुळे याजक यहोवाच्या मंदिरात जाऊ शकले नाहीत.+ ३ ज्या वेळी स्वर्गातून अग्नी आला आणि मंदिर यहोवाच्या तेजाने भरून गेलं, त्या वेळी सगळे इस्राएली लोक ते पाहत होते. तेव्हा त्यांनी खाली फरशीवर डोकं टेकवून दंडवत घातला आणि यहोवाचे आभार मानले, “कारण तो चांगला आहे; त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम राहतं.”

४ मग राजाने आणि सगळ्या लोकांनी यहोवासमोर बलिदानं अर्पण केली.+ ५ शलमोन राजाने २२,००० गाय-बैल आणि १,२०,००० मेंढरं अर्पण केली. अशा प्रकारे, राजाने आणि सगळ्या लोकांनी खऱ्‍या देवाच्या मंदिराचं उद्‌घाटन केलं.+ ६ याजक आपल्या नेमलेल्या ठिकाणी उभे होते. आणि यहोवासाठी गीत गायलं जात असताना, लेवीसुद्धा संगीत वाद्यं वाजवण्यासाठी आपल्या जागी उभे होते.+ (दावीद राजाने ही वाद्यं यहोवाचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्यासोबत* त्याची स्तुती करण्यासाठी बनवली होती​—“कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम राहतं.”) लेव्यांसमोर उभे असलेले याजक मोठ्याने कर्णे वाजवत होते.+ आणि सर्व इस्राएली लोकही उभे होते.

७ मग, शांती-अर्पणांची चरबी आणि होमार्पणं वाहण्यासाठी+ शलमोनने यहोवाच्या मंदिरासमोर असलेल्या अंगणाचा मधला भाग पवित्र केला. कारण होमार्पणं, चरबी+ आणि अन्‍नार्पणं वाहण्यासाठी+ शलमोनने बनवलेली तांब्याची वेदी+ लहान पडत होती. ८ त्या वेळी, शलमोनने संपूर्ण इस्राएलसोबत, म्हणजे लेबो-हमाथपासून* ते थेट इजिप्तच्या ओढ्यापर्यंतच्या+ मोठ्या मंडळीसोबत सात दिवस सण साजरा केला.+ ९ आणि आठव्या दिवशी* त्यांनी एक पवित्र सभा भरवली.+ कारण त्यांनी सात दिवस वेदीचं समर्पण* केलं होतं आणि सात दिवस सण साजरा केला होता. १० मग सातव्या महिन्याच्या २३ व्या दिवशी शलमोनने लोकांना निरोप दिला. आणि लोक मोठा जल्लोष करत आपापल्या घरी गेले.+ यहोवाने दावीदला, शलमोनला आणि आपल्या इस्राएली लोकांना जो चांगुलपणा दाखवला होता, त्यामुळे त्यांची मनं आनंदाने भरून गेली होती.+

११ अशा प्रकारे, शलमोनने यहोवाच्या मंदिराचं आणि आपल्या राजमहालाचं+ बांधकाम पूर्ण केलं. तसंच, यहोवाच्या मंदिराविषयी आणि आपल्या राजमहालाविषयी त्याच्या मनात जे काही होतं ते सगळं त्याने यशस्वीपणे पूर्ण केलं.+ १२ यहोवाने मग शलमोनला रात्री दर्शन दिलं.+ तो त्याला म्हणाला: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. आणि मी हे स्थान, बलिदानं अर्पण करण्याची जागा म्हणून निवडलंय.+ १३ मी आकाशाची दारं बंद केल्यामुळे जर पाऊस पडला नाही; किंवा मी नाकतोड्यांना आज्ञा दिल्यामुळे जर त्यांनी देशातलं पीक फस्त केलं; किंवा मी जर लोकांवर रोगाची साथ पाठवली, १४ आणि त्यामुळे माझ्या नावाने ओळखल्या+ जाणाऱ्‍या लोकांनी जर स्वतःला नम्र केलं,+ मला प्रार्थना केली, मला शोधलं आणि आपले वाईट मार्ग सोडून दिले,+ तर मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करीन, आणि त्यांची जमीन पुन्हा सुपीक करीन.+ १५ या ठिकाणी केल्या जाणाऱ्‍या प्रार्थनेकडे माझे डोळे आणि कान लागलेले असतील.+ १६ हे मंदिर कायम माझ्या नावाने ओळखलं जावं, म्हणून मी ते निवडलंय+ आणि पवित्र केलंय. माझी दृष्टी आणि माझं मन नेहमी इथे राहील.+

१७ आणि तुझे वडील दावीद यांच्यासारखंच जर तू माझ्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केलंस, माझे न्याय-निर्णय आणि कायदे पाळलेस,+ १८ तर मी तुझ्या वडिलांशी, दावीदशी केलेल्या कराराप्रमाणे तुझं राजासन कायमचं स्थापन करीन.+ मी दावीदशी असा करार केला होता:+ ‘इस्राएलवर राज्य करायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+ १९ पण जर तू माझ्या मार्गांपासून भरकटलास, मी दिलेल्या आज्ञांचं व कायद्यांचं तू पालन केलं नाहीस आणि जाऊन दुसऱ्‍या दैवतांची उपासना केलीस व त्यांच्या पाया पडलास,+ २० तर मी इस्राएली लोकांना जो देश दिलाय त्यातून मी त्यांना मुळासकट उपटून टाकीन.+ आणि माझ्या नावाच्या गौरवासाठी पवित्र केलेलं हे मंदिर मी माझ्या नजरेपासून दूर करीन; आणि हे मंदिर सर्व राष्ट्रांतल्या लोकांमध्ये थट्टेचा आणि निंदेचा विषय बनेल.+ २१ हे मंदिर उद्ध्‌वस्त होऊन त्याचा ढिगारा बनेल. येणारा-जाणारा प्रत्येक जण ते पाहून चकित होईल+ आणि म्हणेल: ‘यहोवाने या देशाची आणि या मंदिराची अशी दशा का केली?’+ २२ मग ते म्हणतील, ‘कारण ज्या देवाने त्यांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणलं,+ त्या यहोवा देवाला त्यांनी सोडून दिलं.+ त्यांनी इतर दैवतांना जवळ केलं आणि त्यांच्या पाया पडून त्यांची उपासना केली.+ म्हणूनच त्याने हे संकट त्यांच्यावर आणलंय.’”+

८ शलमोनला यहोवाचं मंदिर आणि आपला राजमहाल बांधून पूर्ण करायला २० वर्षं लागली.+ २ त्यानंतर, त्याने हीरामकडून+ मिळालेली शहरं पुन्हा बांधली आणि इस्राएली लोकांना तिथे वसवलं. ३ पुढे शलमोनने हमाथ-सोबावर हल्ला करून त्यावर कब्जा केला. ४ मग त्याने ओसाड रानातल्या तदमोर शहराची आणि हमाथमध्ये+ आपण बांधलेली कोठारांची सगळी शहरं+ मजबूत केली.* ५ त्याचप्रमाणे त्याने वरचं बेथ-होरोन+ आणि खालचं बेथ-होरोन+ या शहरांभोवती भिंती बांधल्या आणि त्यांना दरवाजे व अडसर बसवून ती शहरंही मजबूत केली. ६ याशिवाय, त्याने बालाथ+ शहरसुद्धा मजबूत केलं. तसंच त्याने कोठारांसाठी, रथांसाठी+ आणि घोडेस्वारांसाठी बांधलेली आपली शहरंही मजबूत केली. यासोबतच शलमोनने यरुशलेममध्ये, लबानोनमध्ये आणि त्याच्या अधिकाराखाली असलेल्या संपूर्ण देशात त्याला जे काही बांधायचं होतं ते बांधलं.

७ इस्राएली लोकांपैकी नसलेले+ हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांच्यापैकी उरलेल्या सर्व लोकांना,+ ८ म्हणजे देशात उरलेल्या त्यांच्या वंशजांना (ज्यांचा इस्राएली लोकांनी पूर्णपणे नाश केला नव्हता),+ शलमोनने सक्‍तीची मजुरी करायला लावली आणि आजपर्यंत ते हेच काम करत आहेत.+ ९ पण शलमोनने इस्राएली लोकांपैकी कोणालाही आपल्या कामासाठी दास बनवलं नाही.+ कारण ते त्याचे योद्धे, सहायक सेना अधिकारी आणि त्याच्या रथस्वारांचे व घोडेस्वारांचे प्रमुख होते.+ १० शलमोन राजाच्या कामाची देखरेख करणारे २५० प्रमुख अधिकारी होते; ते काम करणाऱ्‍या लोकांवर देखरेख करायचे.+

११ नंतर शलमोनने फारोच्या मुलीला+ दावीदपुरातून आणलं आणि त्याने तिच्यासाठी जो महाल बांधला होता तिथे तिला ठेवलं.+ तो म्हणाला: “ती जरी माझी बायको असली, तरी तिने इस्राएलचा राजा दावीद याच्या महालात राहायला नको. कारण, यहोवाच्या कराराची पेटी ज्या-ज्या ठिकाणी आली होती, ती सर्व ठिकाणं पवित्र आहेत.”+

१२ मग शलमोनने मंदिराच्या द्वारमंडपासमोर+ यहोवासाठी जी वेदी बांधली होती,+ तिच्यावर त्याने यहोवाला होमार्पणं दिली.+ १३ त्याने शब्बाथांसाठी,+ नवचंद्राच्या दिवसांसाठी+ आणि तीन वार्षिक सणांसाठी,+ म्हणजे बेखमीर भाकरींचा सण,+ सप्ताहांचा सण+ व मंडपांचा* सण+ यांसाठी मोशेच्या आज्ञेनुसार नित्यक्रमाप्रमाणे अर्पणं दिली. १४ पुढे शलमोनने आपले वडील दावीद यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे याजकांच्या गटांची त्यांच्या सेवेसाठी नेमणूक केली;+ तसंच, त्याने लेव्यांनासुद्धा आपल्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यासाठी, म्हणजे दररोजच्या नियमाप्रमाणे देवाची स्तुती करण्यासाठी+ आणि याजकांसमोर सेवा करण्यासाठी नेमलं. याशिवाय, त्याने वेगवेगळ्या दरवाजांसाठी द्वारपालांच्या गटांची नेमणूक केली;+ कारण, हे सर्व करण्याची आज्ञा खऱ्‍या देवाचा माणूस दावीद याने दिली होती. १५ राजाने याजकांना आणि लेव्यांना, कोठारांच्या बाबतीत किंवा दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत जी काही आज्ञा दिली होती, ती त्यांनी जशीच्या तशी पाळली. १६ यहोवाच्या मंदिराचा पाया घालण्यात आला+ त्या दिवसापासून ते मंदिर बांधून पूर्ण झालं त्या दिवसापर्यंत शलमोनने केलेलं सर्व काम अगदी सुव्यवस्थित* होतं. अशा प्रकारे, यहोवाच्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं.+

१७ यानंतर शलमोन अदोम देशाच्या+ समुद्राजवळ असलेल्या एस्योन-गेबेर+ आणि एलोथ+ या ठिकाणी गेला. १८ मग हीरामने+ आपल्या सेवकांच्या नेतृत्वाखाली शलमोनकडे जहाजं आणि अनुभवी खलाशी पाठवले. ते शलमोनच्या सेवकांसोबत ओफीर+ इथे गेले आणि तिथून शलमोन राजासाठी+ ४५० तालान्त* सोनं घेऊन आले.+

९ शबाच्या राणीने+ शलमोनच्या कीर्तीबद्दल ऐकलं, तेव्हा ती त्याला अतिशय कठीण प्रश्‍न विचारून* त्याची परीक्षा पाहायला यरुशलेमला आली. ती एक भला-मोठा काफिला* घेऊन आली. येताना तिने अतिशय मोठ्या प्रमाणात सोनं,+ मौल्यवान रत्नं आणि बाल्सम* तेल उंटांवर लादून आणलं. मग ती शलमोनकडे गेली आणि तिला जे काही जाणून घ्यायचं होतं ते सर्व तिने त्याला विचारलं.+ २ शलमोनने तिच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरं दिली. असा एकही प्रश्‍न नव्हता जो तिला समजावून सांगणं त्याला कठीण गेलं.

३ शबाच्या राणीने जेव्हा शलमोनची बुद्धिमत्ता,+ त्याने बांधलेला राजमहाल,+ ४ त्याच्या मेजावरची पक्वान्‍नं,+ त्याच्या सेवकांची बसण्याची व्यवस्था, जेवण वाढणाऱ्‍यांचा पोशाख आणि त्यांची सेवा, त्याचे प्यालेबरदार आणि त्यांचा पोशाख पाहिला; तसंच, तो यहोवाच्या मंदिरात नियमितपणे अर्पण करत असलेली बलिदानं+ तिने पाहिली तेव्हा ती अगदी थक्क झाली. ५ ती राजाला म्हणाली: “तुम्ही केलेल्या मोठमोठ्या गोष्टींबद्दल* आणि तुमच्या बुद्धीबद्दल मी माझ्या देशात जे काही ऐकलं होतं ते अगदी खरंय. ६ पण प्रत्यक्ष येऊन स्वतःच्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी पाहण्याआधी मी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला नव्हता.+ आणि खरंतर मी जे काही पाहिलंय, त्याचं अर्धंसुद्धा मला सांगण्यात आलं नव्हतं!+ मी ऐकलं होतं त्यापेक्षा तुमची बुद्धी कितीतरी पटीने जास्त आहे.+ ७ तुमच्या सर्व माणसांना आणि तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर असलेल्या तुमच्या सेवकांना तुमच्याकडून बुद्धीचे शब्द ऐकायला मिळतात, ही त्यांच्यासाठी किती सन्मानाची गोष्ट आहे! ८ तुमचा देव यहोवा याचा गौरव होवो! कारण तुमच्या देवाने, यहोवाने तुम्हाला त्याच्या वतीने राज्य करायला मोठ्या आनंदाने त्याच्या राजासनावर विराजमान केलंय! तुमचा देव इस्राएलवर प्रेम करतो+ आणि त्याचं हे प्रेम कायम टिकून राहावं, म्हणून त्याने तुम्हाला न्यायनीतीने शासन करण्यासाठी राजा म्हणून नियुक्‍त केलंय.”

९ मग शबाच्या राणीने शलमोन राजाला १२० तालान्त* सोनं+ आणि अतिशय मोठ्या प्रमाणात बाल्सम* तेल व मौल्यवान रत्नं दिली. तिने राजाला जितक्या प्रमाणात बाल्सम तेल दिलं, तितकं पुन्हा कधीही कोणी दिलं नाही.+

१० याशिवाय, ओफीर+ इथून सोनं आणणाऱ्‍या हीरामच्या आणि शलमोनच्या सेवकांनी रक्‍तचंदनाची लाकडं आणि मौल्यवान रत्नंही आणली.+ ११ राजाने रक्‍तचंदनाच्या लाकडांपासून यहोवाच्या मंदिरासाठी+ आणि राजमहालासाठी पायऱ्‍या बनवल्या.+ तसंच, त्याने त्यांपासून गायकांसाठी वीणा आणि तंतुवाद्यंही बनवली.+ या प्रकारचं लाकूड संपूर्ण यहूदा देशात कधीही पाहायला मिळालं नव्हतं.

१२ शलमोन राजानेसुद्धा शबाच्या राणीला जे काही हवं होतं आणि तिने जे काही मागितलं ते सगळं तिला दिलं. तिने राजासाठी जितक्या भेटवस्तू आणल्या होत्या, त्यांपेक्षा जास्त त्याने तिला दिल्या.* त्यानंतर ती आपल्या सेवकांसोबत आपल्या देशात परत गेली.+

१३ शलमोनला दरवर्षी ६६६ तालान्त सोनं मिळायचं.+ १४ यासोबतच व्यापारी, सौदा करणारे, तसंच अरबचे सर्व राजे आणि देशातले सगळे राज्यपालही त्याला सोनं-चांदी आणून द्यायचे.+

१५ शलमोन राजाने मिश्र सोन्याच्या २०० मोठ्या ढाली बनवल्या+ (प्रत्येक ढाल बनवायला ६०० शेकेल* मिश्र सोनं लागलं).+ १६ तसंच, त्याने मिश्र सोन्याच्या ३०० छोट्या ढालीही* बनवल्या (प्रत्येक छोटी ढाल बनवायला तीन मिना* सोनं लागलं). मग राजाने त्या सर्व ढाली लबानोन-वनगृहात+ ठेवल्या.

१७ राजाने हस्तिदंतांचं एक भव्य राजासनसुद्धा बनवलं आणि ते शुद्ध सोन्याने मढवलं.+ १८ राजासनापर्यंत चढून जाण्यासाठी सहा पायऱ्‍या होत्या आणि पाय ठेवण्यासाठी राजासनाला जोडूनच एक सोन्याचं आसनही होतं. राजासनाच्या दोन्ही बाजूंना हात ठेवण्यासाठी आधार असून त्यांच्या बाजूला सिंहांचे+ दोन पुतळे उभे करण्यात आले होते. १९ सहा पायऱ्‍यांवर दोन्ही बाजूंना एकेक असे १२ सिंहांचे+ पुतळे उभे करण्यात आले होते. अशा प्रकारचं राजासन दुसऱ्‍या कोणत्याही राज्यात बनवण्यात आलं नव्हतं. २० शलमोन राजाकडे असलेले पिण्याचे सर्व प्याले सोन्याचे होते. तसंच, लबानोन-वनगृहातली सर्व भांडीसुद्धा शुद्ध सोन्याची होती. कुठलीही वस्तू चांदीची नव्हती. कारण शलमोनच्या काळात चांदीला कोणीही विचारत नव्हतं.+ २१ हीरामचे सेवक+ राजाच्या जहाजांतून तार्शीशला+ जायचे. आणि तार्शीशची जहाजं तीन वर्षांतून एकदा सोनं, चांदी, हस्तिदंत,+ वानरं आणि मोर घेऊन यायची.

२२ संपूर्ण पृथ्वीवर शलमोन राजाइतका श्रीमंत आणि बुद्धिमान राजा दुसरा कोणीही नव्हता.+ २३ खऱ्‍या देवाने शलमोनला अफाट बुद्धी दिली होती. आणि त्याच्या तोंडून बुद्धीचे बोल ऐकण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्‍यांतून राजे त्याच्याकडे यायचे.+ २४ येताना ते राजासाठी काही ना काही नजराणा घेऊन यायचे. ते आपल्यासोबत सोन्या-चांदीच्या वस्तू, तसंच वस्त्रं,+ शस्त्रं, बाल्सम तेल, घोडे आणि खेचरं आणायचे; असं वर्षानुवर्षं चालत राहिलं. २५ शलमोनकडे त्याच्या घोड्यांसाठी व रथांसाठी ४,००० तबेले होते; तसंच त्याच्याकडे १२,००० घोडेसुद्धा*+ होते. त्यातले काही त्याने रथांसाठी बांधलेल्या शहरांत आणि काही स्वतःजवळ यरुशलेममध्ये ठेवले.+ २६ शलमोनने नदीपासून* ते पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत सर्व राजांवर अधिकार गाजवला.+ २७ शलमोन राजाने यरुशलेममध्ये चांदीचं प्रमाण दगडांइतकं मुबलक केलं; आणि देवदाराच्या लाकडांचं प्रमाण शेफीलातल्या उंबराच्या झाडांइतकं मुबलक केलं.+ २८ शलमोनसाठी इजिप्तमधून आणि इतर देशांतून घोडे मागवले जायचे.+

२९ शलमोनबद्दल बाकीची माहिती,+ म्हणजे त्याची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सर्व माहिती ही नाथान+ संदेष्ट्याच्या लिखाणांत, शिलोमधल्या अहीयाच्या+ भविष्यवाणीत आणि इद्दोच्या लिखाणांत,+ म्हणजे नबाटचा मुलगा यराबाम+ याच्याविषयीच्या दृष्टान्त-ग्रंथात लिहिलेली आहे. ३० शलमोनने यरुशलेममधून संपूर्ण इस्राएलवर एकूण ४० वर्षं राज्य केलं. ३१ मग शलमोनचा मृत्यू झाला* आणि त्यांनी त्याला त्याच्या वडिलांच्या शहरात, म्हणजे दावीदपुरात+ दफन केलं. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा रहबाम हा राजा बनला.+

१० रहबाम शखेम+ इथे गेला, कारण सर्व इस्राएली लोक त्याला राजा बनवण्यासाठी तिथे जमले होते.+ २ ही गोष्ट नबाटचा मुलगा यराबाम+ याला समजली, तेव्हा तो इजिप्तहून परत आला (तो शलमोन राजाच्या भीतीमुळे इजिप्तला पळून गेला होता आणि अजूनही तिथेच राहत होता).+ ३ मग लोकांनी त्याला बोलावून घेतलं, आणि यराबाम व सर्व इस्राएली लोक रहबामकडे येऊन म्हणाले: ४ “तुझ्या वडिलांनी आमच्यावर फार जड जू* लादलंय.+ त्यांनी आम्हाला कामाच्या ओझ्याखाली भरडून काढलंय. पण तू जर आमच्या कामाचा भार कमी केलास आणि हे जड जू हलकं केलंस तर आम्ही तुझी सेवा करू.”

५ त्यावर रहबाम त्यांना म्हणाला: “तुम्ही तीन दिवसांनी परत या.” म्हणून ते लोक निघून गेले.+ ६ मग रहबाम राजाने वडीलधाऱ्‍यांशी* सल्लामसलत केली; या वडीलधाऱ्‍या माणसांनी त्याचा पिता शलमोन याची सेवा केली होती. रहबामने त्यांना विचारलं: “तुम्हाला काय वाटतं, या लोकांना काय उत्तर द्यावं?” ७ ते त्याला म्हणाले: “तू या लोकांशी प्रेमळपणे वागलास आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करून त्यांना खूश केलंस, तर ते आयुष्यभर तुझे सेवक होऊन राहतील.”

८ पण वडीलधाऱ्‍यांनी दिलेला हा सल्ला त्याने धुडकावून लावला. आणि ज्यांच्यासोबत तो लहानाचा मोठा झाला होता त्या आपल्या तरुण सेवकांशी त्याने सल्लामसलत केली.+ ९ त्याने त्यांना विचारलं: “जे लोक मला म्हणाले की ‘तुझ्या वडिलांनी आमच्यावर लादलेलं जू हलकं कर,’ त्या लोकांना आपण काय उत्तर द्यावं असं तुम्हाला वाटतं?” १० तेव्हा, त्याच्यासोबत लहानाचे मोठे झालेले तरुण त्याला म्हणाले: “जे लोक तुला असं म्हणाले की ‘तुझ्या वडिलांनी आमच्यावर लादलेलं जू फार जड आहे, ते हलकं कर,’ त्यांना तू असं सांग: ‘माझ्या हाताची करंगळी माझ्या वडिलांच्या कमरेपेक्षा जाड होईल. ११ माझ्या वडिलांनी तुमच्यावर जड जू लादलं; पण मी ते आणखी जड करीन. माझ्या वडिलांनी तुम्हाला चाबकाचे फटके देऊन शिक्षा केली; पण मी तुम्हाला काटेरी चाबकाचे फटके देऊन शिक्षा करीन.’”

१२ “तिसऱ्‍या दिवशी परत या” असं जे रहबामने सांगितलं होतं, त्याप्रमाणे यराबाम आणि सर्व लोक तिसऱ्‍या दिवशी त्याच्याकडे आले.+ १३ पण रहबाम राजा त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला; आणि त्याने वडीलधाऱ्‍या माणसांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे केलं नाही. १४ याउलट, तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो लोकांना म्हणाला: “तुमच्यावर लादलेलं जू मी आणखी जड करीन. माझ्या वडिलांनी तुम्हाला चाबकाचे फटके देऊन शिक्षा केली; पण मी तुम्हाला काटेरी चाबकाचे फटके देऊन शिक्षा करीन.” १५ अशा प्रकारे राजाने लोकांचं म्हणणं ऐकलं नाही. खऱ्‍या देवाने नबाटचा मुलगा यराबाम याला शिलोतल्या अहीयाद्वारे जे सांगितलं होतं,+ ते पूर्ण व्हावं म्हणून यहोवानेच हे सगळं घडवून आणलं होतं.+

१६ राजा आपलं म्हणणं ऐकत नाही हे सर्व इस्राएली लोकांनी पाहिलं, तेव्हा ते त्याला म्हणाले: “दावीदशी आमचं काहीही घेणंदेणं नाही. इशायच्या मुलाच्या वारशात आम्हाला काहीच हिस्सा नाही. हे इस्राएलच्या लोकांनो! चला आपापल्या देवांकडे! हे दावीद! आता तुझं घराणं तूच सांभाळ!”+ असं बोलून सर्व इस्राएली लोक आपापल्या घरी निघून गेले.+

१७ पण रहबाम यहूदाच्या शहरांमध्ये राहणाऱ्‍या इस्राएली लोकांवर राज्य करत राहिला.+

१८ मग रहबाम राजाने, सक्‍तीची मजुरी करणाऱ्‍या लोकांवर अधिकारी असलेल्या हदोरामला+ इस्राएली लोकांकडे पाठवलं. पण त्यांनी त्याला दगडमार करून मारून टाकलं. रहबाम राजा कसाबसा आपल्या रथावर चढून यरुशलेमला पळून गेला.+ १९ आणि आजपर्यंत इस्राएली लोक दावीदच्या राजघराण्याविरुद्ध बंड करत आहेत.

११ रहबाम यरुशलेमला आला तेव्हा त्याने लगेच यहूदाच्या आणि बन्यामीनच्या+ घराण्याला एकत्र केलं. इस्राएलविरुद्ध लढाई करून आपलं राज्य परत मिळवायला रहबामने १,८०,००० प्रशिक्षित* योद्धे जमवले.+ २ मग यहोवा शमाया+ संदेष्ट्याला* म्हणाला: ३ “यहूदाचा राजा, म्हणजे शलमोनचा मुलगा रहबाम याला आणि यहूदा व बन्यामीन इथल्या सगळ्या इस्राएली लोकांना असं सांग, की ४ ‘यहोवा म्हणतो: “आपल्या भावांशी जाऊन लढू नका. प्रत्येकाने आपापल्या घरी परत जावं. कारण मीच हे घडवून आणलंय.”’”+ तेव्हा लोकांनी यहोवाचं म्हणणं ऐकलं आणि ते सर्व आपापल्या घरी निघून गेले. ते यराबामशी लढायला गेले नाहीत.

५ रहबाम यरुशलेममध्ये राहू लागला आणि त्याने यहूदामधली शहरं मजबूत केली. ६ त्याने या शहरांची मजबुती केली: बेथलेहेम,+ एटाम, तकोवा,+ ७ बेथ-सूर, सोखो,+ अदुल्लाम,+ ८ गथ,+ मारेशा, जीफ,+ ९ अदोरइम, लाखीश,+ अजेका,+ १० सरा, अयालोन+ आणि हेब्रोन;+ त्याने मजबूत केलेली ही सर्व शहरं यहूदाच्या आणि बन्यामीनच्या प्रदेशांतली होती. ११ त्याने या तटबंदीच्या* शहरांमध्ये सेनाधिकारी नेमून आणि त्यांना अन्‍नसामग्री, तेल व द्राक्षारस पुरवून ती शहरं बळकट केली. १२ तसंच, प्रत्येक शहर आणखी मजबूत करण्यासाठी त्याने त्यांना मोठमोठ्या ढाली व भालेही पुरवले. आणि यहूदाचे व बन्यामीनचे लोक त्याच्या अधिकाराखाली राहिले.

१३ रहबामला पाठिंबा द्यायला संपूर्ण इस्राएलमधले याजक आणि लेवी आपापले प्रदेश सोडून त्याच्याकडे आले. १४ यहोवासाठी याजक म्हणून सेवा करणाऱ्‍या या लेव्यांना, यराबामने आणि त्याच्या मुलांनी याजक पदावरून काढून टाकलं होतं.+ त्यामुळे ते आपापली मालमत्ता आणि कुरणं सोडून+ यहूदा आणि यरुशलेमला आले. १५ मग यराबामने बकऱ्‍यांसारख्या दैवतांची+ आणि आपण बनवलेल्या वासरांच्या मूर्तींची+ सेवा करण्यासाठी उच्च स्थानांवर* स्वतःचे याजक नेमले.+ १६ पण इस्राएलच्या वंशांतल्या ज्या सगळ्या लोकांनी इस्राएलचा देव यहोवा याची उपासना करण्याचा निश्‍चय केला होता, ते सगळे आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याला बलिदान अर्पण करायला लेव्यांमागे यरुशलेमला आले.+ १७ त्यांनी तीन वर्षं यहूदाच्या राज्याला बळकटी दिली आणि शलमोनचा मुलगा रहबाम याला पाठिंबा दिला. कारण तीन वर्षं ते दावीद आणि शलमोन यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिले.

१८ मग रहबामने महलथ हिच्याशी लग्न केलं. महलथ ही यरीमोथ आणि अबीहईल यांची मुलगी होती. यरीमोथ हा दावीदचा मुलगा होता, तर अबीहईल ही इशायचा मुलगा अलीयाब+ याची मुलगी होती. १९ काही काळाने रहबामला महलथपासून यऊश, शमरयाह आणि जाहम ही मुलं झाली. २० महलथनंतर, त्याने माकासोबत लग्न केलं. माका ही अबशालोमची+ नात होती. काही काळाने रहबामला माकापासून अबीया,+ अत्तय, जीजा आणि शलोमीथ ही मुलं झाली. २१ रहबामला १८ बायका आणि ६० उपपत्नी होत्या.+ त्याला २८ मुलं आणि ६० मुली झाल्या. आपल्या सगळ्या बायका आणि उपपत्नी यांच्यापेक्षा रहबामचं अबशालोमची मुलगी माका हिच्यावर सर्वात जास्त प्रेम होतं. २२ म्हणून रहबामने माकाचा मुलगा अबीया याला त्याच्या सगळ्या भावांवर प्रमुख आणि पुढारी नेमलं. कारण रहबामला त्याला राजा बनवायचं होतं. २३ रहबाम मोठ्या हुशारीने वागला. त्याने आपल्या मुलांपैकी काहींना यहूदा आणि बन्यामीन प्रदेशांत असलेल्या तटबंदीच्या वेगवेगळ्या शहरांत पाठवलं.*+ त्याने त्यांना भरपूर अन्‍नसामग्री पुरवली आणि बऱ्‍याच बायका करून दिल्या.

१२ रहबामचं राज्यपद स्थिर झालं+ आणि तो सामर्थ्यशाली झाला. त्यानंतर काही काळातच त्याने यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चालायचं सोडून दिलं.+ आणि त्याच्यासोबत सर्व इस्राएली लोकांनीही तसंच केलं. २ इस्राएली लोक यहोवाला विश्‍वासू राहिले नाहीत. म्हणून रहबाम राजाच्या शासनकाळाच्या पाचव्या वर्षी इजिप्तचा राजा शिशक+ यरुशलेमवर हल्ला करायला आला. ३ तो १,२०० रथ आणि ६०,००० घोडेस्वार घेऊन आला. तसंच, इजिप्तमधून आलेल्या त्याच्या सैन्यात लिबियाचे, सुक्कीचे आणि इथियोपियाचे+ असंख्य सैनिकही होते. ४ त्याने यहूदातली तटबंदीची शहरं काबीज केली आणि शेवटी तो यरुशलेमला पोहोचला.

५ शिशकच्या भीतीमुळे रहबाम आणि यहूदाचे अधिकारी यरुशलेममध्ये एकत्र जमले. तेव्हा शमाया+ संदेष्टा त्यांच्याकडे आला आणि म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, की ‘तुम्ही मला सोडून दिलं, म्हणून मीही तुम्हाला सोडून दिलंय+ आणि शिशकच्या हवाली केलंय.’” ६ हे ऐकून राजा व इस्राएलचे अधिकारी नम्र झाले+ आणि म्हणाले: “यहोवाने जे केलं ते योग्यच आहे.” ७ ते नम्र झाले आहेत ही गोष्ट जेव्हा यहोवाने पाहिली, तेव्हा शमायाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: “त्यांनी स्वतःला नम्र केलंय, म्हणून मी त्यांचा नाश करणार नाही.+ मी लवकरच त्यांची सुटका करीन. मी शिशकद्वारे यरुशलेमवर माझा राग व्यक्‍त करणार नाही. ८ पण ते त्याचे दास बनतील. म्हणजे मग त्यांना कळून येईल, की माझी सेवा करण्यात आणि इतर राष्ट्रांच्या राजांची सेवा करण्यात किती फरक आहे.”

९ मग इजिप्तचा राजा शिशक याने यरुशलेमवर हल्ला केला. त्याने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालात असलेला खजिना लुटला.+ त्याने सगळं काही लुटलं; शलमोनने बनवलेल्या सोन्याच्या ढालीसुद्धा त्याने लुटल्या.+ १० म्हणून रहबाम राजाने त्यांच्याऐवजी तांब्याच्या ढाली बनवल्या. आणि त्याने त्या ढाली राजमहालाच्या प्रवेशद्वाराची राखण करणाऱ्‍या रक्षकांच्या* प्रमुखांच्या हवाली केल्या. ११ राजा यहोवाच्या मंदिरात यायचा तेव्हा हे रक्षक ढाली घेऊन यायचे आणि त्याच्यासोबत चालायचे. आणि नंतर त्या पुन्हा रक्षकांच्या चौकीत आणून ठेवायचे. १२ राजा नम्र झाल्यामुळे यहोवाचा क्रोध त्याच्यावर भडकला नाही.+ आणि देवाने त्याचा व त्याच्या लोकांचा पूर्णपणे नाश केला नाही.+ शिवाय, यहूदाच्या लोकांमध्ये काही चांगल्या गोष्टीही दिसून आल्या होत्या.+

१३ रहबाम राजाने यरुशलेममध्ये आपलं राज्यपद आणखी बळकट केलं आणि तो तिथे राज्य करत राहिला. रहबाम यहूदाचा राजा बनला तेव्हा तो ४१ वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये, म्हणजे यहोवाने आपल्या नावाच्या गौरवासाठी इस्राएल वंशांच्या प्रदेशातून निवडलेल्या शहरामध्ये १७ वर्षं राज्य केलं. रहबामची आई अम्मोनी असून तिचं नाव नामा होतं.+ १४ रहबाम वाईट कामं करत राहिला. कारण त्याने यहोवाला शोधण्याचा आपल्या मनात निश्‍चय केला नव्हता.+

१५ रहबामबद्दलची सगळी माहिती, म्हणजे त्याची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी माहिती, वंशावळींच्या अहवालातल्या शमाया+ संदेष्ट्याच्या आणि दृष्टान्त पाहणाऱ्‍या इद्दोच्या+ लिखाणांत दिली आहे. रहबाम आणि यराबाम यांच्यात सतत लढाया होत राहिल्या.+ १६ मग रहबामचा मृत्यू झाला आणि त्याला दावीदपुरात+ आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. रहबामच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अबीया+ हा राजा बनला.

१३ यराबाम राजाच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी, अबीया हा यहूदाचा राजा बनला.+ २ त्याने यरुशलेममधून तीन वर्षं राज्य केलं. त्याच्या आईचं नाव मीखाया+ असून ती गिबामध्ये+ राहणाऱ्‍या उरीयेलची मुलगी होती. मग अबीया आणि यराबाम यांच्यात युद्ध सुरू झालं.+

३ अबीया आपल्यासोबत ४,००,००० शूर व प्रशिक्षित* योद्धे घेऊन लढायला गेला.+ आणि त्याचा सामना करण्यासाठी यराबामने ८,००,००० शूर व प्रशिक्षित* योद्ध्यांचं सैन्यदल तैनात केलं. ४ मग अबीया, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातल्या समाराइम पर्वतावर उभा राहिला आणि म्हणाला: “हे यराबाम आणि सर्व इस्राएली लोकांनो! मी काय म्हणतो ते ऐका. ५ इस्राएलचा देव यहोवा याने दावीदशी आणि त्याच्या मुलांशी+ मिठाचा करार*+ केला आणि त्यांना इस्राएलवर कायम राज्य करण्याचा अधिकार दिला.+ ही गोष्ट तुम्हाला माहीत नाही का? ६ पण दावीदचा मुलगा शलमोन याचा सेवक, म्हणजे नबाटचा मुलगा यराबाम+ हा आपल्या प्रभूच्या विरोधात उठला आणि त्याने त्याच्याविरुद्ध बंड केलं.+ ७ आणि काही रिकामटेकडी व दुष्ट माणसं त्याला जाऊन मिळाली. ते सगळे शलमोनच्या मुलापेक्षा, म्हणजे रहबामपेक्षा प्रबळ ठरले, कारण रहबाम वयाने लहान व भित्रा होता. आणि म्हणून तो त्यांच्यासमोर टिकाव धरू शकला नाही.

८ आणि आता तुम्ही असा विचार करताय, की तुम्ही दावीदच्या मुलांच्या हाती असलेल्या यहोवाच्या राज्यासमोर टिकाव धरू शकता; कारण तुम्ही संख्येने जास्त आहात आणि यराबामने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरं तुमच्याकडे आहेत.+ ९ तुम्ही तर यहोवाच्या याजकांना, म्हणजे अहरोनच्या वंशजांना आणि लेव्यांना हाकलून दिलंत,+ आणि इतर देशांप्रमाणेच स्वतःचे याजक नेमले.+ जो कोणी तुमच्याकडे एखादा गोऱ्‍हा* आणि सात एडके घेऊन येतो तो याजक बनतो; आणि तेही अशा देवांचा याजक जे मुळात देवच नाहीत. १० पण आमच्याविषयी म्हणाल, तर यहोवा आमचा देव आहे!+ आणि आम्ही त्याला सोडलेलं नाही. अहरोनचे वंशज, आमचे याजक आजही यहोवाची सेवा करत आहेत आणि लेवी त्यांना मदत करत आहेत. ११ ते रोज सकाळ-संध्याकाळ यहोवासाठी सुगंधी धूप+ आणि होमार्पणं जाळतात;+ शुद्ध सोन्याच्या मेजावर भाकरीची थप्पी*+ ठेवतात आणि रोज संध्याकाळी सोन्याचा दीपवृक्ष*+ व त्यावरचे दिवे पेटवतात.+ हे सर्व करून आम्ही आमचा देव यहोवा याच्या बाबतीत असलेली आमची सगळी कर्तव्यं पार पाडतोय; पण तुम्ही मात्र त्याला सोडून दिलंय. १२ तर आता बघा! खरा देव आमच्यासोबत असून तो आमचं नेतृत्व करतोय. तुमच्याविरुद्ध युद्धाची घोषणा करायला त्याचे याजकही हातात कर्णे घेऊन आमच्यासोबत आहेत. तेव्हा हे इस्राएलच्या लोकांनो! तुमच्या पूर्वजांच्या देवाविरुद्ध, यहोवाविरुद्ध लढू नका. तुम्ही कधीही जिंकणार नाहीत.”+

१३ पण यराबामने त्यांच्यावर मागून हल्ला करण्यासाठी सैनिक पाठवले. अशा रितीने, यहूदाच्या लोकांसमोर यराबामचं मुख्य सैन्य होतं, आणि त्यांच्या मागेसुद्धा काही सैनिक हल्ला करण्यासाठी लपून बसले होते. १४ यहूदाच्या लोकांनी मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की आपल्याला समोरून आणि मागून अशा दोन्ही बाजूंनी लढावं लागणार आहे. म्हणून ते मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले+ आणि याजक मोठ्याने कर्णे फुंकू लागले. १५ मग यहूदाच्या लोकांनी मोठ्याने युद्धाची घोषणा केली. युद्धाची घोषणा होत असताना, खऱ्‍या देवाने अबीयाला आणि यहूदाच्या लोकांना यराबामवर आणि सर्व इस्राएली लोकांवर विजय मिळवून दिला. १६ त्या वेळी सर्व इस्राएली लोकांनी यहूदापुढून पळ काढला आणि देवाने त्यांना यहूदाच्या हाती दिलं. १७ अबीयाने आणि त्याच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात इस्राएली लोकांची कत्तल केली. त्या दिवशी इस्राएलचे ५,००,००० प्रशिक्षित योद्धे मरून पडले. १८ अशा प्रकारे, इस्राएलच्या लोकांचा पराभव होऊन ते अपमानित झाले. पण यहूदाचे लोक प्रबळ ठरले; कारण त्यांनी आपल्या पूर्वजांच्या देवावर, यहोवावर भरवसा ठेवला होता.+ १९ अबीयाने यराबामचा पाठलाग केला आणि त्याची काही शहरं काबीज केली. त्याने बेथेल,+ यशाना आणि एफ्रान+ ही शहरं व त्यांच्या आसपासची नगरं काबीज केली. २० अबीया जिवंत होता तोपर्यंत यराबाम कधीच पहिल्यासारखा शक्‍तिशाली होऊ शकला नाही. मग यहोवाने त्याला शिक्षा दिली आणि तो मेला.+

२१ पण अबीया मात्र शक्‍तिशाली होत गेला. काही काळाने, त्याने १४ बायका केल्या+ आणि त्याला २२ मुलं व १६ मुली झाल्या. २२ अबीयाबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे तो जे काही म्हणाला आणि त्याने जे काही केलं, ते सगळं इद्दो संदेष्ट्याच्या लिखाणांत नमूद करण्यात आलं आहे.+

१४ मग अबीयाचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात+ दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा आसा हा राजा बनला. आसाच्या शासनकाळात देशात दहा वर्षं शांती टिकून राहिली.

२ आसाने आपला देव यहोवा याच्या नजरेत जे चांगलं आणि योग्य तेच केलं. ३ त्याने परक्या दैवतांच्या वेदी पाडून टाकल्या+ आणि उच्च स्थानं* काढून टाकली. तसंच, त्याने पूजेच्या स्तंभांचा चुराडा केला+ आणि पूजेचे खांबही* तोडून टाकले.+ ४ शिवाय, त्याने यहूदाच्या लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या देवाची, यहोवाची उपासना करायला आणि त्याच्या आज्ञा व नियमशास्त्र पाळायला सांगितलं. ५ अशा प्रकारे, त्याने यहूदाच्या सगळ्या शहरांमधून उच्च स्थानं व धूपस्तंभ काढून टाकले;+ त्याच्या शासनकाळात राज्यात शांती टिकून राहिली. ६ देशात शांती असल्यामुळे त्याने यहूदामध्ये तटबंदी असलेली शहरं बांधली.+ या काळात त्याच्याशी कोणीही युद्ध करायला आलं नाही. कारण यहोवाने त्याला त्याच्या सगळ्या शत्रूंपासून विसावा दिला होता.+ ७ आसा यहूदाच्या लोकांना म्हणाला होता: “चला आपण ही शहरं बांधू. त्यांच्याभोवती भिंती व बुरूज बांधू+ आणि त्यांना दरवाजे व त्या दरवाजांना अडसर बसवू. आपण आपला देव यहोवा याचा शोध केल्यामुळे हा देश अजूनही आपल्या अधिकाराखाली आहे. आपण देवाचा शोध केला म्हणून त्याने सर्व शत्रूंपासून आपल्याला विसावा दिलाय.” त्यामुळे शहरांचं बांधकाम करण्यात ते यशस्वी झाले.+

८ आसाच्या सैन्यात यहूदातली ३,००,००० माणसं होती; त्यांच्याकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. तसंच, त्याच्या सैन्यात बन्यामीन वंशातले २,८०,००० शूर योद्धेही होते आणि त्यांच्याकडे धनुष्यं आणि छोट्या ढाली* होत्या.+

९ नंतर, इथियोपियाचा जेरह हा १०,००,००० सैनिक आणि ३०० रथ घेऊन त्यांच्याशी लढायला आला.+ तो मारेशा+ इथे पोहोचला, १० तेव्हा आसा त्याचा सामना करायला गेला. आणि त्याने मारेशातल्या सफाथा खोऱ्‍यात आपलं सैन्यदल तैनात केलं. ११ मग आसाने आपला देव यहोवा याला अशी प्रार्थना केली:+ “हे यहोवा! तू कोणालाही मदत करू शकतोस, मग ते शक्‍तिशाली* असोत किंवा कमजोर असोत.+ हे आमच्या देवा यहोवा! आम्हाला मदत कर, कारण आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवलाय.+ आणि आम्ही तुझ्या नावाने या मोठ्या सैन्याशी लढायला आलो आहोत.+ हे यहोवा! तूच आमचा देव आहेस. नश्‍वर माणसाला तुझ्यावर विजय मिळवू देऊ नकोस.”+

१२ तेव्हा यहोवाने आसा आणि यहूदासमोर इथोपियाच्या सैन्याचा पराभव केला, आणि इथोपियाच्या लोकांनी पळ काढला.+ १३ आसाने आणि त्याच्या लोकांनी गरारपर्यंत+ त्यांचा पाठलाग केला. त्या वेळी इथोपियाच्या सैन्याचा पूर्णपणे नाश झाला, त्यातला एकही जिवंत राहिला नाही. कारण, यहोवाने आणि त्याच्या सैन्याने त्यांना पूर्णपणे चिरडून टाकलं होतं. त्यानंतर यहूदाचे लोक खूप मोठ्या प्रमाणात लुटीचा माल घेऊन गेले. १४ गरारच्या आसपासच्या सगळ्या शहरांनाही यहोवाची मोठी दहशत बसली होती. म्हणून ते त्या शहरांचाही नाश करू शकले. तिथे लुटण्यासारखं बरंच काही असल्यामुळे त्यांनी ती सगळी शहरं लुटली. १५ याशिवाय, त्यांनी गुरंढोरं राखणाऱ्‍यांच्या तंबूंवरही हल्ला केला आणि मेंढरांचे पुष्कळ कळप आणि उंट लुटले. त्यानंतर ते यरुशलेमला परत गेले.

१५ मग ओदेदचा मुलगा अजऱ्‍या याच्यावर देवाची पवित्र शक्‍ती* आली. २ तेव्हा तो आसाला भेटायला गेला आणि त्याला म्हणाला: “हे आसा! आणि यहूदाच्या व बन्यामीनच्या सर्व लोकांनो! मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही जोपर्यंत यहोवासोबत राहाल, तोपर्यंत तो तुमच्यासोबत राहील.+ आणि तुम्ही त्याला शोधलं, तर तो तुम्हाला सापडेल.+ पण जर तुम्ही त्याला सोडून दिलं, तर तोही तुम्हाला सोडून देईल.+ ३ इस्राएली लोक बऱ्‍याच काळापर्यंत खऱ्‍या देवाशिवाय होते. त्यांना शिकवण्यासाठी कोणी याजक नव्हता आणि त्यांच्याकडे नियमशास्त्रही नव्हतं.+ ४ पण संकटात सापडल्यावर ते जेव्हा इस्राएलचा देव यहोवा याच्याकडे आले आणि जेव्हा त्यांनी त्याला शोधलं, तेव्हा त्यांना तो सापडला.+ ५ त्या काळात, सर्व प्रदेशांतल्या लोकांमध्ये इतकी खळबळ माजली होती, की कोणीही सुरक्षितपणे प्रवास करू शकत नव्हतं. ६ एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्राला आणि एक शहर दुसऱ्‍या शहराला चिरडून टाकत होतं. कारण देवाने त्यांच्यावर सर्व प्रकारची संकटं आणून त्यांना गोंधळात राहू दिलं होतं.+ ७ पण तुम्ही मात्र हिंमत धरा! खचून जाऊ नका,*+ कारण तुम्हाला तुमच्या कामाचं प्रतिफळ मिळेल.”

८ अजऱ्‍याचे हे शब्द व ओदेद संदेष्ट्याची भविष्यवाणी ऐकताच, आसाला हिंमत मिळाली. आणि त्याने यहूदा व बन्यामीनच्या संपूर्ण प्रदेशातून, तसंच एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्याने काबीज केलेल्या शहरांतून सगळ्या घृणास्पद मूर्ती काढून टाकल्या.+ आणि त्याने यहोवाच्या मंदिराच्या द्वारमंडपासमोर असलेली यहोवाची वेदी दुरुस्त केली.+ ९ मग त्याने यहूदा व बन्यामीन इथल्या सर्व लोकांना आणि एफ्राईम, मनश्‍शे व शिमोन यांच्या प्रदेशांत राहणाऱ्‍या विदेशी लोकांना एकत्र जमवलं;+ आसाचा देव यहोवा त्याच्यासोबत आहे, ही गोष्ट पाहून हे विदेशी लोक खूप मोठ्या संख्येने इस्राएल सोडून आले होते आणि आसाच्या बाजूने झाले होते. १० ते सर्व, आसाच्या शासनकाळाच्या १५ व्या वर्षातल्या तिसऱ्‍या महिन्यात यरुशलेममध्ये एकत्र जमले. ११ मग, लुटून आणलेल्या मालातून त्या दिवशी त्यांनी यहोवाला ७०० गुरंढोरं आणि ७,००० मेंढरं अर्पण केली. १२ यासोबतच त्यांनी असा एक करार केला, की ते आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याला पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने शोधतील.+ १३ आणि जो कोणी इस्राएलचा देव यहोवा याला शोधणार नाही, त्याला मारून टाकलं जाईल; मग तो छोटा असो किंवा मोठा, स्त्री असो किंवा पुरुष.+ १४ त्यांनी मोठ्या आवाजात यहोवासमोर शपथ घेतली आणि कर्णे वाजवून व शिंगं फुंकून आनंदाने जयघोष केला. १५ आपण घेतलेल्या शपथेमुळे सर्व यहूदाने जल्लोष केला. कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने शपथ घेतली होती. त्यांनी देवाला मनापासून शोधलं होतं आणि म्हणून तो त्यांना सापडला होता.+ यहोवा त्यांना सर्व शत्रूंपासून विसावा देत राहिला.+

१६ आसा राजाने आपल्या आजीला, म्हणजे माका+ हिलासुद्धा राजमातेच्या पदावरून काढून टाकलं. कारण तिने पूजेच्या खांबाची* उपासना करण्यासाठी एक अश्‍लील मूर्ती बनवली होती.+ तिने बनवलेली ही मूर्ती आसाने फोडली आणि तिचा चुराडा करून ती किद्रोन खोऱ्‍यात जाळून टाकली.+ १७ पण इस्राएलमधून+ उपासनेची उच्च स्थानं मात्र काढून टाकण्यात आली नव्हती.+ असं असलं, तरी आसाने आयुष्यभर पूर्ण मनाने* देवाची सेवा केली.+ १८ तसंच, त्याने आणि त्याच्या वडिलांनी पवित्र केलेल्या वस्तू, म्हणजे सोनं, चांदी आणि वेगवेगळी भांडी या सर्व वस्तू त्याने खऱ्‍या देवाच्या मंदिरात आणल्या.+ १९ आसा राजाच्या शासनकाळाच्या ३५ व्या वर्षापर्यंत देशात युद्ध झालं नाही.+

१६ आसा राजाच्या शासनकाळाच्या ३६ व्या वर्षी, इस्राएलचा राजा बाशा+ याने यहूदावर हल्ला केला. आणि यहूदाचा राजा आसा याच्या प्रदेशात लोकांचं येणं-जाणं होऊ नये, म्हणून तो रामा+ शहर बांधू लागला.*+ २ तेव्हा, आसाने यहोवाच्या मंदिरातल्या व राजमहालातल्या भांडारांत असलेलं सोनं-चांदी घेतलं,+ आणि ते दिमिष्कमध्ये राहणारा सीरियाचा राजा बेन-हदाद याच्याकडे पाठवलं.+ आसाने त्याला असा संदेश पाठवला: ३ “माझे वडील आणि तुझे वडील यांच्यामध्ये जसा एक करार होता, तसाच करार आपण आपसात करू या. मी तुला सोनं-चांदी पाठवतोय. तर आता, इस्राएलचा राजा बाशा याच्याशी तू जो करार केलाय तो मोडून टाक, म्हणजे तो माझा पिच्छा सोडेल.”

४ बेन-हदादने आसा राजाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने आपल्या सेनापतींना इस्राएलच्या शहरांवर हल्ला करायला पाठवलं. त्यांनी जाऊन ईयोन,+ दान,+ आबेल-मईम, तसंच नफतालीच्या+ प्रदेशात असलेली कोठारांची सगळी शहरं जिंकली. ५ बाशाने हे ऐकलं तेव्हा त्याने रामा शहर बांधायचं* लगेच थांबवलं आणि ते काम तसंच सोडून दिलं. ६ मग आसा राजाने यहूदातल्या सर्व लोकांना बोलावलं आणि रामा+ शहर बांधण्यासाठी बाशा जी लाकडं व जे दगड वापरत होता ते त्यांनी उचलून नेले.+ त्यांचा उपयोग करून आसा राजाने मिस्पा+ व गेबा+ ही शहरं बांधली.*

७ तेव्हा हनानी+ द्रष्टा* हा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला: “तू तुझा देव यहोवा याच्यावर भरवसा ठेवण्याऐवजी सीरियाच्या राजावर भरवसा ठेवलास, म्हणून सीरियाचा राजा तुझ्या हातून निसटून गेला.+ ८ इथियोपियाचं आणि लिबियाचं सैन्य अफाट नव्हतं का? आणि त्यांच्याकडे बरेचसे रथ आणि घोडेस्वार नव्हते का? पण तरीसुद्धा यहोवाने त्या सगळ्यांना तुझ्या हाती दिलं, कारण तू त्याच्यावर भरवसा ठेवला होतास.+ ९ ज्यांचं मन पूर्णपणे यहोवाकडे लागलेलं असतं,*+ त्यांच्यासाठी आपली शक्‍ती प्रकट करायला* त्याची नजर संपूर्ण पृथ्वीवर असते.+ पण या बाबतीत तू मूर्खपणे वागलास. म्हणून आतापासून तुला सतत युद्धांना तोंड द्यावं लागेल.”+

१० हनानी द्रष्ट्याचे हे शब्द ऐकून आसा खूप चिडला. त्याला त्याचा इतका राग आला, की त्याने त्याला तुरुंगात टाकलं. तसंच, त्या काळात आसा लोकांना वाईट वागणूक देऊ लागला. ११ आसाबद्दलचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा सगळा इतिहास यहूदामधल्या आणि इस्राएलमधल्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आला आहे.+

१२ आसाच्या शासनकाळाच्या ३९ व्या वर्षी, त्याच्या पायांना एक रोग झाला आणि त्यामुळे तो खूप आजारी पडला. पण आपल्या आजारपणातसुद्धा त्याने यहोवावर भरवसा ठेवला नाही; तो मदतीसाठी वैद्यांकडे गेला. १३ नंतर, आपल्या शासनकाळाच्या ४१ व्या वर्षी आसाचा मृत्यू झाला.*+ १४ तेव्हा त्यांनी त्याचा मृतदेह बाल्सम तेलाने, तसंच वेगवेगळ्या मसाल्यांच्या व सुगंधी तेलांच्या मिश्रणाने भरलेल्या पलंगावर ठेवला.+ आणि त्याला एका भव्य कबरेत दफन केलं. ही कबर आसाने स्वतःसाठी दावीदपुरात+ खोदून घेतली होती. याशिवाय, त्यांनी त्याच्या सन्मानासाठी एक मोठी आगही पेटवली.*

१७ मग आसाच्या जागी त्याचा मुलगा यहोशाफाट+ हा राजा बनला. त्याने इस्राएलमध्ये आपलं राज्यपद मजबूत केलं. २ त्याने यहूदातल्या सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये सैन्यदल तैनात केलं. तसंच, त्याचे वडील आसा यांनी काबीज केलेल्या एफ्राईमच्या सगळ्या शहरांत+ आणि यहूदाच्या प्रदेशात त्याने सैनिकांच्या चौक्या उभारल्या. ३ त्याचा पूर्वज दावीद पूर्वी ज्या मार्गांवर चालला,+ त्याच मार्गांवर यहोशाफाटसुद्धा चालत राहिला, म्हणून यहोवा त्याच्यासोबत होता. यहोशाफाट बआल दैवतांच्या नादी लागला नाही, ४ तर तो आपल्या वडिलांच्या देवाकडे वळला.+ त्याने देवाच्या आज्ञा पाळल्या; इस्राएलचे रितीरिवाज पाळले नाहीत.+ ५ म्हणून यहोवाने त्याचं राज्य मजबूत केलं.+ यहूदातले सगळे लोक त्याच्यासाठी नजराणा आणायचे आणि त्याला भरपूर धनसंपत्ती आणि मानसन्मान मिळाला.+ ६ तो मोठ्या धैर्याने यहोवाच्या मार्गांवर चालत राहिला. त्याने यहूदातली उच्च स्थानं* काढून टाकली+ आणि पूजेचे खांबही* तोडून टाकले.+

७ आपल्या शासनकाळाच्या तिसऱ्‍या वर्षी यहोशाफाटने त्याच्या अधिकाऱ्‍यांना, म्हणजे बेन-हईल, ओबद्या, जखऱ्‍या, नथनेल आणि मीखाया यांना बोलावून घेतलं आणि त्यांना यहूदाच्या शहरांमध्ये शिक्षण देण्यासाठी पाठवलं. ८ त्यांच्यासोबत हे लेवीसुद्धा होते: शमाया, नथन्या, जबद्याह, असाएल, शमीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीयाह आणि तोब-अदोनीया. तसंच अलीशामा आणि यहोराम हे याजकही+ त्यांच्यासोबत होते. ९ ते यहूदातल्या लोकांना यहोवाच्या नियमशास्त्राच्या पुस्तकातून शिकवू लागले.+ त्यांनी यहूदाच्या सर्व शहरांमध्ये जाऊन लोकांना शिकवलं.

१० यहूदाच्या आसपासच्या सगळ्या राज्यांना यहोवाची दहशत बसली. आणि त्यांनी यहोशाफाटशी लढाई केली नाही. ११ पलिष्टी लोकांनी यहोशाफाटला नजराणा* म्हणून भेटवस्तू व पैसे दिले. आणि अरबी लोकांनी त्याला आपल्या कळपांतून ७,७०० एडके आणि ७,७०० बकरे दिले.

१२ यहोशाफाट राजा शक्‍तिशाली होत गेला+ आणि तो यहूदामध्ये मजबूत किल्ले+ व कोठारांची शहरं बांधत राहिला.+ १३ त्याने यहूदाच्या शहरांमध्ये मोठमोठी कामं हाती घेऊन ती पूर्ण केली. यरुशलेममध्ये त्याच्याकडे बरेच सैनिक आणि शूर योद्धे होते. १४ त्यांच्या घराण्यांप्रमाणे त्यांचे गट हे: यहूदाच्या घराण्यातले हजारांवरचे प्रमुख; पहिला प्रमुख अदनाह आणि त्याच्यासोबत त्याचे ३,००,००० शूर योद्धे.+ १५ त्याच्या खालोखाल, यहोहानान प्रमुख आणि त्याच्यासोबत त्याची २,८०,००० माणसं. १६ त्याच्या खालोखाल जिख्रीचा मुलगा अमसिया आणि त्याच्यासोबत त्याचे २,००,००० शूर योद्धे; अमसिया स्वेच्छेने यहोवाच्या सेवेसाठी पुढे आला होता. १७ तसंच, बन्यामीन+ वंशातला शूर योद्धा एल्यादा आणि त्याच्यासोबत त्याची २,००,००० माणसं; या माणसांकडे धनुष्यं आणि ढाली होत्या.+ १८ त्याच्या खालोखाल यहोजाबाद आणि त्याच्यासोबत युद्धासाठी तयार असलेली त्याची १,८०,००० माणसं. १९ हे सगळे राजाची सेवा करायचे. यांशिवाय, राजाने संपूर्ण यहूदामध्ये तटबंदी असलेल्या शहरांतही सैनिक तैनात केले होते.+

१८ यहोशाफाटकडे भरपूर धनसंपत्ती होती आणि त्याला खूप मान होता.+ पण तरी त्याने अहाबच्या घराण्याशी लग्नाचे संबंध जोडले.*+ २ मग काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोनामध्ये अहाबकडे गेला.+ तेव्हा अहाबने त्याच्यासाठी आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात मेंढरांचं आणि गुराढोरांचं बलिदान दिलं. आणि आपल्यासोबत रामोथ-गिलादवर+ हल्ला करायला त्याला प्रवृत्त केलं.* ३ मग इस्राएलचा राजा अहाब हा यहूदाच्या राजाला, यहोशाफाटला म्हणाला: “तू माझ्यासोबत रामोथ-गिलादमध्ये लढाई करायला येशील का?” त्यावर यहोशाफाट म्हणाला: “हो मी येईन. माझे लोक घेऊन मी तुझ्यासोबत येईन आणि युद्धात तुला मदत करीन.”

४ पण यहोशाफाट इस्राएलच्या राजाला म्हणाला: “कृपा करून याबद्दल आधी यहोवाचा सल्ला घे.”+ ५ म्हणून मग इस्राएलच्या राजाने ४०० संदेष्ट्यांना बोलावून विचारलं: “आम्ही रामोथ-गिलादशी युद्ध करायला जावं की नाही?” ते म्हणाले: “हो जा. कारण खरा देव ते शहर राजाला नक्की मिळवून देईल.”

६ मग यहोशाफाट म्हणाला: “इथे कोणी यहोवाचा संदेष्टा नाही का?+ आपण त्याच्याकडूनही देवाचा सल्ला घेऊ.”+ ७ त्यावर इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “इथे आणखी एक माणूस आहे;+ इम्लाचा मुलगा मीखाया. आपण त्याच्याकडूनही यहोवाचा सल्ला घेऊ शकतो, पण मला तो अजिबात आवडत नाही. कारण माझ्या बाबतीत तो कधीच चांगला संदेश देत नाही, नेहमी वाईटच देतो.”+ पण यहोशाफाट म्हणाला: “राजाने असं बोलू नये.”

८ मग इस्राएलच्या राजाने दरबारातल्या एका अधिकाऱ्‍याला बोलावून म्हटलं: “पटकन जा आणि इम्लाच्या मुलाला, मीखायाला घेऊन ये.”+ ९ त्या वेळी इस्राएलचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट, शाही पोशाख घालून शोमरोनच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या खळ्याजवळ* आपल्या राजासनांवर बसले होते. आणि सगळे संदेष्टे त्यांच्यापुढे भविष्यवाणी करत होते. १० मग कनाना याचा मुलगा सिद्‌कीया याने आपल्यासाठी लोखंडाची शिंगं बनवली, आणि तो म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, ‘सीरियाच्या लोकांचा नाश होईपर्यंत तुम्ही या शिंगांनी त्यांना ढकलत राहाल.’”* ११ बाकीचे सगळे संदेष्टेही असंच म्हणत होते: “जा, रामोथ-गिलादवर हल्ला कर. यहोवा ते शहर राजाला नक्की मिळवून देईल; तू यशस्वी होशील.”+

१२ इकडे, मीखायाला बोलवायला गेलेला दूत त्याला म्हणाला: “पाहा! सगळे संदेष्टे राजाबद्दल चांगल्या गोष्टी बोलत आहेत. तर आता कृपा करून तुमचंही बोलणं त्यांच्यासारखंच+ चांगलं असू द्या.”+ १३ पण मीखाया म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची शपथ, माझा देव जे सांगेल तेच मी बोलेन.”+ १४ मग मीखाया राजाकडे आला आणि राजाने त्याला विचारलं: “मीखाया, मी रामोथ-गिलादशी युद्ध करायला जावं की नाही?” तो लगेच म्हणाला: “हो जा, तू यशस्वी होशील. ते शहर तुझ्या हाती दिलं जाईल.” १५ त्यावर राजा त्याला म्हणाला: “मी किती वेळा तुला शपथ घालून सांगू, की यहोवाच्या नावाने फक्‍त खरं तेच बोल?” १६ तेव्हा तो म्हणाला: “मला सगळे इस्राएली लोक, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे डोंगरांवर इकडे-तिकडे पसरलेले दिसत आहेत.+ यहोवा म्हणतो: ‘यांना कोणीही मालक नाही. तेव्हा प्रत्येकाला शांतीने आपापल्या घरी परत जाऊ द्या.’”

१७ मग इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “मी तुला म्हणालो होतो ना, ‘हा माझ्याबद्दल चांगला संदेश देणार नाही, वाईटच देईल’?”+

१८ मग मीखाया म्हणाला: “तर आता यहोवाचा संदेश काय आहे तो ऐक: मी पाहिलं, की यहोवा आपल्या राजासनावर बसलाय+ आणि त्याच्या उजवीकडे व डावीकडे+ स्वर्गातली सगळी सेना उभी आहे.+ १९ यहोवाने मग विचारलं, ‘इस्राएलचा राजा अहाब याने रामोथ-गिलादला जावं आणि तिथे त्याचा मृत्यू व्हावा, म्हणून त्याला कोण फसवेल?’ तेव्हा कोणी असं सुचवलं, तर कोणी तसं. २० मग एक स्वर्गदूत+ पुढे आला आणि यहोवासमोर उभा राहिला. तो म्हणाला, ‘मी त्याला फसवीन.’ तेव्हा यहोवाने त्याला विचारलं, ‘तू हे कसं करशील?’ २१ त्यावर तो स्वर्गदूत म्हणाला: ‘मी जाईन आणि त्याच्या सर्व संदेष्ट्यांना खोटं बोलायला लावीन.’ तेव्हा देव त्याला म्हणाला: ‘तू त्याला फसवशील; तू नक्की यशस्वी होशील. जा आणि तसंच कर.’ २२ म्हणूनच यहोवाने तुझ्या या संदेष्ट्यांना खोटं बोलायला लावलंय.+ पण खरंतर तुझ्यावर संकट येईल अशी घोषणा यहोवाने केली आहे.”

२३ तेव्हा कनानाचा मुलगा सिद्‌कीया+ मीखायाच्या+ जवळ आला आणि त्याला थोबाडीत मारून+ म्हणाला: “यहोवाची पवित्र शक्‍ती* मला सोडून तुझ्याशी कधीपासून बोलायला लागली?”+ २४ मीखायाने उत्तर दिलं: “ज्या दिवशी तू आतल्या खोलीत लपायला पळशील त्या दिवशी तुला हे कळेल.” २५ तेव्हा इस्राएलचा राजा म्हणाला: “मीखायाला धरा आणि त्याला शहराचा प्रमुख आमोन व राजाचा मुलगा योवाश यांच्या हवाली करा. २६ त्यांना सांगा, की ‘राजाचा असा हुकूम आहे: “या माणसाला तुरुंगात टाका+ आणि मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला फक्‍त भाकरीच्या तुकड्यावर व घोटभर पाण्यावर ठेवा.”’” २७ पण मीखाया म्हणाला: “तू सुखरूप परत आलास, तर असं समज की यहोवा माझ्याशी बोललाच नाही.”+ तो पुढे म्हणाला: “लोकांनो, तुम्हीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा.”

२८ यानंतर इस्राएलचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ-गिलादवर हल्ला करायला गेले.+ २९ तेव्हा इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “मी वेष बदलून लढाईत जाईन, पण तू मात्र तुझा शाही पोशाख घाल.” मग इस्राएलच्या राजाने आपला वेष बदलला आणि ते लढाईला गेले. ३० इकडे, सीरियाच्या राजाने आपल्या रथदलाच्या अधिकाऱ्‍यांना असा आदेश दिला होता: “कोणत्याही छोट्या-मोठ्या सैनिकाशी किंवा अधिकाऱ्‍याशी लढू नका; फक्‍त इस्राएलच्या राजाशी लढा.” ३१ मग यहोशाफाटला पाहताच रथदलाचे अधिकारी आपसात म्हणाले: “हा इस्राएलचा राजा असावा.” म्हणून मग ते त्याच्याशी लढायला गेले. त्या वेळी यहोशाफाट मदतीसाठी ओरडू लागला.+ तेव्हा यहोवाने त्याची मदत केली आणि त्यांना लगेच त्याच्यापासून दूर केलं. ३२ तो इस्राएलचा राजा नाही हे समजताच रथदलाच्या अधिकाऱ्‍यांनी त्याचा पाठलाग करायचं सोडून दिलं.

३३ मग एका माणसाने सहजच एक बाण सोडला आणि तो इस्राएलच्या राजाला जाऊन लागला; चिलखताचे दोन भाग जिथे जोडले होते, तिथे जाऊन तो बाण रुतला. मग राजा रथ चालवणाऱ्‍या माणसाला म्हणाला: “रथ वळव आणि मला या लढाईतून बाहेर ने, कारण मी फार जखमी झालोय.”+ ३४ त्या दिवशी दिवसभर लढाई चालली. आणि इस्राएलच्या राजाला सीरियाच्या लोकांच्या दिशेने रथात आधार देऊन संध्याकाळपर्यंत उभं करावं लागलं. आणि सूर्यास्ताच्या वेळी त्याचा मृत्यू झाला.+

१९ मग यहूदाचा राजा यहोशाफाट सुखरूप* यरुशलेममध्ये आपल्या राजमहालात परत आला.+ २ तेव्हा, दृष्टान्त पाहणाऱ्‍या हनानीचा+ मुलगा येहू+ हा यहोशाफाट राजाला भेटायला गेला आणि त्याला म्हणाला: “दुष्टाला मदत करणं आणि यहोवाचा द्वेष करणाऱ्‍यांवर प्रेम करणं तुला योग्य वाटतं का?+ म्हणून आता यहोवाचा राग तुझ्यावर भडकलाय. ३ पण तुझ्यात काही चांगल्या गोष्टी दिसून आल्यात.+ कारण तू देशातून पूजेचे खांब* काढून टाकलेस आणि खऱ्‍या देवाची सेवा करण्याचा मनाशी ठाम निश्‍चय केलास.”+

४ यहोशाफाट यरुशलेममध्ये राहायचा. तो पुन्हा बैर-शेबापासून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत राहणाऱ्‍या लोकांना भेटला.+ आणि त्याने त्यांना आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याच्याकडे परत येण्याचं प्रोत्साहन दिलं.+ ५ त्याने संपूर्ण देशात, म्हणजे यहूदातल्या प्रत्येक तटबंदीच्या शहरात न्यायाधीश नेमले.+ ६ तो न्यायाधीशांना म्हणाला: “तुम्ही जे काही करता ते विचारपूर्वक करा. कारण तुम्ही माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी न्याय करता. आणि तुम्ही जेव्हा न्याय करता, तेव्हा तो तुमच्यासोबत असतो.+ ७ तर आता यहोवाचं भय बाळगा.+ आणि जे काही कराल ते काळजीपूर्वक करा. कारण आपला देव यहोवा हा अन्याय+ आणि पक्षपात करत नाही,+ किंवा लाचसुद्धा घेत नाही.”+

८ यहोशाफाटने यरुशलेममध्येही काही लेव्यांना व याजकांना, तसंच इस्राएलच्या घराण्याच्या काही प्रमुखांना, यहोवाच्या नावाने न्याय करण्यासाठी आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांचे खटले सोडवायला नेमलं.+ ९ त्याने त्यांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही विश्‍वासूपणे आणि पूर्ण मनाने* यहोवाचं भय बाळगून असं करा: १० इतर शहरांत राहणारे तुमचे भाऊबंद तुमच्याकडे एखादा खुनाचा खटला घेऊन आले;+ किंवा एखाद्या नियमाबद्दल, आज्ञेबद्दल, कायद्याबद्दल किंवा मग न्याय-निर्णयाबद्दल* प्रश्‍न विचारायला आले, तर त्यांनी यहोवासमोर दोषी ठरू नये म्हणून त्यांना ताकीद द्या. नाहीतर देवाचा राग तुमच्यावर आणि तुमच्या भाऊबंदांवर भडकेल. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून असं करा. ११ पाहा, मुख्य याजक अमऱ्‍या याला तुमच्यावर नेमण्यात आलंय. तो तुम्हाला सर्व बाबतींत यहोवाची इच्छा काय आहे ते माहीत करून घ्यायला मदत करेल.+ आणि राजाच्या कामाची देखरेख करण्यासाठी, यहूदाच्या घराण्याचा प्रमुख असलेला इश्‍माएलचा मुलगा जबद्याह याला नेमण्यात आलंय. आणि लेवी हे तुमच्यासाठी देखरेख करणारे अधिकारी म्हणून सेवा करतील. तेव्हा, हिंमत धरून काम करा! यहोवा भलं करणाऱ्‍यांसोबत असो.”+

२० काही काळाने मवाबी+ व अम्मोनी+ लोक यहोशाफाटशी युद्ध करायला आले; त्यांच्यासोबत काही अम्मोनईम* लोकही होते. २ तेव्हा यहोशाफाटला असं सांगण्यात आलं: “तुझ्याशी लढाई करायला समुद्राच्या* प्रदेशातून, म्हणजे अदोमच्या+ प्रदेशातून एक मोठं सैन्य आलंय. आणि ते हससोन-तामारपर्यंत, म्हणजे एनगेदीपर्यंत+ पोहोचलंय.” ३ हे ऐकून यहोशाफाट खूप घाबरला. त्याने यहोवाकडून मार्गदर्शन घेण्याचा निश्‍चय केला+ आणि संपूर्ण यहूदात उपासाची घोषणा केली. ४ तेव्हा यहूदाचे सगळे लोक यहोवाकडे मदत मागण्यासाठी एकत्र जमले.+ ते यहोवाचं मार्गदर्शन घेण्यासाठी यहूदाच्या सर्व शहरांतून आले.

५ मग यहोशाफाट हा यहूदाच्या आणि यरुशलेमच्या मंडळीमध्ये, यहोवाच्या मंदिराच्या नवीन अंगणासमोर उभा राहिला. ६ तो म्हणाला:

“हे आमच्या पूर्वजांच्या देवा यहोवा! स्वर्गात तूच देव नाहीस का?+ आणि सर्व राष्ट्रांवर तुझाच अधिकार नाही का?+ तुझ्या हातांत शक्‍ती व सामर्थ्य आहे आणि कोणीही तुझ्यासमोर उभा राहू शकत नाही.+ ७ हे आमच्या देवा, तूच या देशातल्या लोकांना तुझ्या इस्राएली लोकांपुढून घालवून दिलं होतंस ना? आणि मग हा देश तुझा मित्र अब्राहाम याच्या संततीला* कायमचा वारसा म्हणून तूच दिला होतास ना?+ ८ तुझे लोक या देशात राहू लागले आणि त्यांनी तुझ्या नावासाठी इथे एक मंदिर बांधलं.+ ते म्हणाले होते: ९ ‘आमच्यावर जर तलवार, न्यायदंड, रोगाची साथ किंवा दुष्काळ यांच्यामुळे संकट आलं, तर आमच्या संकटाच्या काळात आम्हाला या मंदिरासमोर आणि तुझ्यासमोर उभं राहू दे (कारण या मंदिरात तुझं नाव आहे)+ आणि मदतीसाठी तुझा धावा करू दे. आणि तू कृपा करून आमचं ऐक आणि आम्हाला वाचव.’+ १० इस्राएली लोक जेव्हा इजिप्त देशातून बाहेर आले होते, तेव्हा तू त्यांना अम्मोनी, मवाबी आणि सेईरच्या+ डोंगराळ प्रदेशातल्या लोकांवर हल्ला करू दिला नाहीस. म्हणून इस्राएली लोकांनी त्यांचा नाश केला नाही आणि ते त्यांच्यापासून दूर निघून गेले.+ पण आता बघ हे अम्मोनी, मवाबी आणि सेईरच्या डोंगराळ प्रदेशातले लोक काय करत आहेत! ११ जो देश तू आम्हाला वारसा म्हणून दिला होता, त्यातून आम्हाला हाकलून द्यायला ते आले आहेत.+ ते अशी आमची परतफेड करत आहेत! १२ हे आमच्या देवा, तू त्यांना शिक्षा करणार नाहीस का?+ आमच्याविरुद्ध येणाऱ्‍या या मोठ्या सैन्यासमोर आम्ही अगदी कमजोर पडलोय; आणि काय करावं हे आम्हाला कळत नाही.+ म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागून आहेत.”+

१३ त्या वेळी, यहूदातली सगळी माणसं आपल्या बायका-मुलांना व तान्ह्या बाळांना घेऊन यहोवासमोर उभी होती.

१४ मग मंडळीमध्ये असलेल्या यहजिएलवर यहोवाची पवित्र शक्‍ती* आली. यहजिएल हा जखऱ्‍याचा मुलगा होता; जखऱ्‍या बनायाचा, बनाया ईयेलचा आणि ईयेल हा आसाफच्या मुलांपैकी लेवी मत्तन्याह याचा मुलगा होता. १५ तेव्हा यहजिएल म्हणाला: “हे यहोशाफाट राजा आणि यहूदा व यरुशलेमच्या लोकांनो! लक्ष देऊन ऐका! यहोवा तुम्हाला असं सांगतो, ‘या मोठ्या सैन्याला पाहून घाबरू नका किंवा भिऊ नका. कारण ही लढाई तुमची नाही, तर देवाची आहे.+ १६ उद्या तुम्ही त्यांचा सामना करायला जा. ते सीस घाटातून येतील, आणि यरुएलच्या ओसाड रानासमोर जिथे खोरं संपतं तिथे ते तुम्हाला दिसतील. १७ ही लढाई तुम्हाला लढावी लागणार नाही. तुम्ही फक्‍त आपल्या जागी स्थिर उभे राहा+ आणि यहोवा तुम्हाला कसं वाचवेल ते पाहा.+ हे यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांनो! घाबरू नका किंवा भिऊ नका.+ उद्या त्यांचा सामना करायला जा. यहोवा तुमच्यासोबत असेल.’”+

१८ तेव्हा, यहोशाफाटने जमिनीवर वाकून दंडवत घातला. आणि यहूदा व यरुशलेमच्या सर्व लोकांनीसुद्धा यहोवापुढे नमन करून यहोवाची उपासना केली. १९ त्यानंतर इस्राएलचा देव यहोवा याची मोठ्या आवाजात स्तुती करण्यासाठी+ लेवी, म्हणजे कहाथचे व कोरहचे वंशज+ उभे राहिले.

२० मग, दुसऱ्‍या दिवशी सकाळी लवकर उठून ते तकोवाच्या+ ओसाड रानाकडे जायला निघाले. ते जात असताना यहोशाफाट त्यांच्यासमोर उभा राहून त्यांना म्हणाला: “हे यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांनो! मी काय म्हणतो ते ऐका. तुमच्या देवावर, यहोवावर भरवसा ठेवा, म्हणजे तुम्हाला खंबीरपणे उभं राहता येईल.* त्याच्या संदेष्ट्यांवर विश्‍वास ठेवा,+ म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”

२१ मग लोकांशी सल्लामसलत केल्यावर, यहोशाफाटने यहोवासाठी गीत गायलं आणि त्याची स्तुती करायला काही माणसांना नेमलं.+ ते पवित्र पोशाख घालून सैन्याच्या पुढे चालत होते व असं म्हणत होते: “यहोवाचे आभार माना, कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम राहतं.”+

२२ ते आनंदाने स्तुतिगीतं गाऊ लागले. तेव्हा यहोवाने यहूदावर हल्ला करायला आलेल्या अम्मोनी, मवाबी व सेईरच्या डोंगराळ प्रदेशातल्या माणसांवर अचानक मागून हल्ला घडवून आणला. आणि त्यांनी एकमेकांचीच कत्तल केली.+ २३ अम्मोनी व मवाबी लोकांनी सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्‍या लोकांचा+ समूळ नाश करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला; सेईरमध्ये राहणाऱ्‍या लोकांचा पूर्णपणे नाश केल्यावर त्यांनी एकमेकांना मारून टाकलं.+

२४ यहूदाचे लोक ओसाड रानातल्या+ पहारेकऱ्‍यांच्या बुरुजापर्यंत आले. आणि त्यांनी समोर पाहिलं तेव्हा त्यांना जमिनीवर सगळीकडे शत्रूंचे मृतदेह पडलेले दिसले;+ त्यांच्यातला एकही वाचला नव्हता. २५ म्हणून मग यहोशाफाट आणि त्याचे लोक त्यांची लूटमार करायला गेले. त्यांना तिथे खूप मोठ्या प्रमाणात सामान-सुमान, कपडा-लत्ता आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. त्यांनी या सगळ्या वस्तू मृतदेहांवरून काढून घेतल्या. लुटीचा माल इतका होता, की त्यांना आणखी घेऊन जाता येईना.+ ती लूट नेण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले, कारण लुटीचा माल खूप जास्त होता. २६ मग चौथ्या दिवशी ते बराखाच्या खोऱ्‍यात एकत्र जमले आणि तिथे त्यांनी यहोवाची स्तुती केली. म्हणून त्यांनी त्या जागेचं नाव बराखाचं* खोरं असं ठेवलं.+ आणि आजपर्यंत ते याच नावाने ओळखलं जातं.

२७ मग यहूदा आणि यरुशलेमची सर्व माणसं जल्लोष करत यहोशाफाटच्या नेतृत्वाखाली यरुशलेममध्ये परत आली. कारण यहोवाने त्यांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवून दिला होता.+ २८ ते सर्व जण तंतुवाद्यं व वीणा+ वाजवत, आणि कर्णे+ फुंकत यरुशलेममध्ये आले आणि यहोवाच्या मंदिरात गेले.+ २९ यहोवा देव इस्राएलच्या शत्रूंविरुद्ध लढला ही गोष्ट जेव्हा सगळ्या राष्ट्रांना कळली, तेव्हा त्यांना देवाची फार दहशत बसली.+ ३० म्हणून यहोशाफाटच्या राज्यात शांती टिकून राहिली आणि त्याच्या देवाने त्याला सर्व शत्रूंपासून विसावा दिला.+

३१ यहोशाफाट यहूदावर राज्य करत राहिला. तो राजा बनला तेव्हा तो ३५ वर्षांचा होता. त्याने एकूण २५ वर्षं यरुशलेममध्ये राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अजूबा असून ती शिल्ही याची मुलगी होती.+ ३२ यहोशाफाट आपल्या वडिलांच्या, आसाच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिला;+ त्या मार्गापासून तो भरकटला नाही. यहोवाच्या नजरेत जे योग्य ते त्याने केलं.+ ३३ पण उपासनेची उच्च स्थानं* मात्र काढून टाकण्यात आली नव्हती.+ आणि अजूनही लोकांनी आपल्या पूर्वजांच्या देवाची उपासना करण्याचा निर्धार केला नव्हता.+

३४ यहोशाफाटबद्दलची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी माहिती, हनानीचा+ मुलगा येहू+ याच्या लिखाणांत नमूद आहे. या लिखाणांचा समावेश इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात करण्यात आला आहे. ३५ नंतर यहूदाचा राजा यहोशाफाट याने इस्राएलचा दुष्ट राजा अहज्या याच्याशी मैत्रीचे संबंध जोडले.+ ३६ जहाजं बांधून ती तार्शीशला+ पाठवता यावीत, म्हणून त्याने त्याला आपला भागीदार बनवलं. त्यांनी मिळून एस्योन-गेबेर+ इथे जहाजं बांधली. ३७ पण, मारेशामध्ये राहणाऱ्‍या दोदावाहूचा मुलगा अलियेजर याने यहोशाफाटविरुद्ध अशी भविष्यवाणी केली: “तू अहज्याशी मैत्रीचे संबंध जोडलेस, म्हणून यहोवा तुझ्या सगळ्या कामांचा नाश करेल.”+ त्यामुळे ती जहाजं फुटली+ आणि तार्शीशला पोहोचू शकली नाहीत.

२१ नंतर यहोशाफाटचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात आपल्या पूर्वजांसोबत दफन करण्यात आलं. मग त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोराम हा राजा बनला.+ २ त्याचे भाऊ, म्हणजे यहोशाफाटची मुलं ही: अजऱ्‍या, यहीएल, जखऱ्‍या, अजऱ्‍या, मीखाएल आणि शपत्याह. ही सर्व इस्राएलचा राजा यहोशाफाट याची मुलं होती. ३ त्यांच्या वडिलांनी त्यांना सोन्या-चांदीच्या अनेक भेटवस्तू आणि मौल्यवान गोष्टी दिल्या होत्या. याशिवाय, त्याने त्यांना यहूदामधली तटबंदीची शहरंही दिली होती.+ पण आपलं राज्य मात्र त्याने यहोरामला दिलं.+ कारण तो त्याचा पहिला मुलगा होता.

४ यहोराम आपल्या वडिलांच्या जागी राज्य करू लागला. आपलं राज्यपद मजबूत करण्यासाठी त्याने आपल्या सर्व भावांना, तसंच इस्राएलमधल्या काही अधिकाऱ्‍यांनाही तलवारीने मारून टाकलं.+ ५ यहोराम राजा बनला तेव्हा तो ३२ वर्षांचा होता आणि त्याने आठ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ ६ अहाबच्या घराण्याप्रमाणेच तोही इस्राएलच्या राजांसारखाच वाईट वागला.+ कारण त्याने अहाबच्या मुलीशी लग्न केलं होतं;+ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. ७ पण यहोवाने आपला सेवक दावीद याच्याशी जो करार केला होता, त्यामुळे त्याला दावीदच्या घराण्याचा नाश करायची इच्छा नव्हती.+ कारण त्याने दावीदला आणि त्याच्या मुलांना वचन दिलं होतं, की तो त्यांच्या वंशाचा दिवा कायम ठेवेल.+

८ यहोरामच्या काळात अदोमने यहूदाविरुद्ध बंड केलं+ आणि आपला स्वतःचा एक राजा नेमला.+ ९ म्हणून यहोराम आणि त्याचे सेनाधिकारी आपले सगळे रथ घेऊन पलीकडे गेले. तिथे अदोमी लोकांनी येऊन त्याला आणि त्याच्या रथ-दलाच्या अधिकाऱ्‍यांना घेरलं. पण यहोरामने रात्री उठून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना हरवलं. १० अदोमने यहूदाविरुद्ध केलेलं ते बंड आजपर्यंत चालू आहे. त्याच काळात लिब्नानेही+ त्याच्याविरुद्ध बंड केलं, कारण यहोरामने आपला पूर्वजांचा देव यहोवा याला सोडून दिलं होतं.+ ११ तसंच, यहोरामने यहूदाच्या डोंगरांवर उच्च स्थानं* बांधली+ आणि यरुशलेमच्या लोकांना देवाशी अविश्‍वासूपणे वागायला लावलं.* असं करून त्याने यहूदाला देवापासून दूर नेलं.

१२ काही काळाने, एलीया+ संदेष्ट्याकडून त्याला एक पत्र मिळालं. त्यात असं लिहिलं होतं: “तुझा पूर्वज दावीद याचा देव यहोवा असं म्हणतो, की ‘तू तुझ्या वडिलांच्या, म्हणजे यहोशाफाटच्या+ किंवा यहूदाचा राजा आसा याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालला नाहीस.+ १३ याउलट तू इस्राएलच्या राजांच्या मार्गांनुसार चाललास.+ अहाबचं घराणं जसं देवाशी अविश्‍वासूपणे वागलं,+ तसं तू यहूदा व यरुशलेमच्या लोकांना देवाशी अविश्‍वासूपणे वागायला लावलंस.*+ आणि तुझ्यापेक्षा चांगल्या असलेल्या तुझ्या भावांना, तुझ्या वडिलांच्या घराण्यालासुद्धा तू संपवलंस.+ १४ म्हणून आता यहोवा तुझ्या बायका-मुलांवर आणि तुझ्या लोकांवर संकट आणेल आणि तुझ्या संपूर्ण मालमत्तेचा नाश करेल. १५ आणि तुला अनेक आजार होऊन भयंकर त्रास होईल. तुला आतड्यांचाही रोग होईल आणि तो दिवसेंदिवस इतका वाढेल, की शेवटी तुझी आतडी बाहेर पडतील.’”

१६ मग यहोवाने पलिष्ट्यांना+ आणि इथियोपियाजवळ असलेल्या अरबी लोकांना+ यहोरामवर हल्ला करायला प्रवृत्त केलं.+ १७ त्यांनी यहूदावर हल्ला केला आणि देशात घुसून राजमहालातली सगळी धनसंपत्ती लुटून नेली.+ शिवाय, ते यहोरामच्या बायका-मुलांनाही आपल्यासोबत घेऊन गेले. त्याचा सगळ्यात लहान मुलगा यहोआहाज*+ याला सोडून दुसरा कोणताही मुलगा त्याच्याजवळ उरला नाही. १८ हे सगळं घडल्यावर यहोवाने यहोरामला आतड्यांच्या अशा एका रोगाने पिडलं, जो कधीही बरा होणार नव्हता.+ १९ काही काळाने, म्हणजे दोन वर्षं पूर्ण झाल्यावर त्याच्या या रोगामुळे त्याची आतडी बाहेर आली, आणि त्याला भयंकर त्रास होऊन शेवटी तो मेला. पण लोकांनी त्याच्या पूर्वजांसारखा त्याचा सन्मान केला नाही; त्यांनी त्याच्या सन्मानासाठी मोठी आग पेटवली नाही.+ २० यहोराम राजा बनला तेव्हा तो ३२ वर्षांचा होता. आणि त्याने यरुशलेममधून आठ वर्षं राज्य केलं. तो मेला तेव्हा कोणालाही वाईट वाटलं नाही. लोकांनी त्याला दावीदपुरात दफन केलं,+ पण राजांच्या कबरेत मात्र त्याला दफन केलं नाही.+

२२ मग यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांनी यहोरामच्या सगळ्यात लहान मुलाला, म्हणजे अहज्याला* त्याच्या जागी राजा बनवलं. कारण, अरबी लोकांसोबत यहूदाच्या छावणीत आलेल्या लुटारूंच्या टोळ्यांनी त्याच्या सगळ्या मोठ्या मुलांना मारून टाकलं होतं.+ म्हणून यहोरामचा मुलगा अहज्या हा यहूदावर राज्य करू लागला.+ २ अहज्या राजा बनला त्या वेळी तो २२ वर्षांचा होता. त्याने एक वर्ष यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अथल्या+ असून ती अम्री+ याची नात* होती.

३ अहज्या हा अहाबच्या घराण्यासारखाच वागला;+ कारण वाईट कामं करायला त्याची आई त्याला सल्ला द्यायची. ४ अहाबच्या घराण्याप्रमाणेच तो यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला; कारण त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अहाबच्या घराण्यातले लोक त्याचे सल्लागार बनले होते; आणि त्यामुळे त्याचा नाश झाला. ५ त्यांचा सल्ला ऐकून तो इस्राएलचा राजा अहाब याच्या मुलासोबत, म्हणजे यहोरामसोबत सीरियाचा राजा हजाएल+ याच्याशी युद्ध करायला रामोथ-गिलाद+ इथे गेला. पण तिथे तिरंदाजांनी यहोरामला जखमी केलं. ६ म्हणून मग बरं होण्यासाठी तो इज्रेलला+ परत आला; कारण, सीरियाचा राजा हजाएल याच्याशी रामा इथे युद्ध करत असताना त्यांनी त्याला जखमी केलं होतं.+

अहाबचा मुलगा यहोराम+ जखमी झाल्यामुळे,*+ यहूदाचा राजा यहोराम+ याचा मुलगा अहज्या* त्याला भेटायला इज्रेलला गेला. ७ यहोरामला भेटायला जाणं, हे अहज्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. हे सगळं देवानेच घडवून आणलं होतं. यहोरामकडे आल्यावर ते दोघं निमशीचा नातू* येहू+ याला भेटायला गेले. अहाबच्या घराण्याचा नाश करण्यासाठी यहोवाने येहूचा अभिषेक केला होता.+ ८ येहू अहाबच्या घराण्याचा नाश करू लागला, तेव्हा त्याला यहूदाचे अधिकारी आणि अहज्याची सेवा करणारी अहज्याच्या भावांची मुलं भेटली. येहूने या सगळ्यांना मारून टाकलं.+ ९ मग तो अहज्याला शोधू लागला. अहज्या शोमरोनात लपून बसला होता, तेव्हा येहूच्या माणसांनी त्याला धरून येहूकडे आणलं. त्यांनी त्याला मारून टाकलं आणि दफन केलं.+ कारण ते म्हणाले: “ज्याने मनापासून यहोवाची सेवा केली, त्या यहोशाफाटचा हा नातू आहे.”+ अहज्यानंतर त्याचं राज्य चालवायला समर्थ असा कोणीही त्याच्या घराण्यात नव्हता.

१० अहज्याची आई अथल्या+ हिने जेव्हा पाहिलं, की आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तेव्हा तिने यहूदाच्या राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना मारून टाकलं.+ ११ पण राजाच्या ज्या मुलांना मारलं जाणार होतं, त्यांच्यापैकी अहज्याचा मुलगा यहोआश+ याला राजाच्या मुलीने, यहोशबाथने पळवून नेलं. तिने यहोआशला आणि त्याच्या दाईला एका आतल्या खोलीत लपवून ठेवलं. यहोराम+ राजाची मुलगी यहोशबाथ हिने (ही यहोयादा+ याजकाची बायको आणि अहज्याची बहीण होती) यहोआशला अथल्यापासून लपवून ठेवल्यामुळे तो वाचला.+ १२ अथल्या देशावर राज्य करत होती त्या काळात, यहोआश सहा वर्षं खऱ्‍या देवाच्या मंदिरात त्यांच्यासोबत लपून राहिला.

२३ मग सातव्या वर्षी, यहोयादाने धाडस दाखवलं आणि शंभरांवर अधिकारी असलेल्या प्रमुखांसोबत एक करार केला.+ त्याने यरोहामचा मुलगा अजऱ्‍या, यहोहानानचा मुलगा इश्‍माएल, ओबेदचा मुलगा अजऱ्‍या, अदायाचा मुलगा मासेया आणि जिख्रीचा मुलगा अलीशाफाट यांच्याशी करार केला. २ ते सर्व जण यहूदाच्या संपूर्ण प्रदेशात फिरले आणि त्यांनी यहूदाच्या सगळ्या शहरांमधून लेव्यांना+ आणि इस्राएलच्या घराण्यांच्या प्रमुखांना एकत्र जमवलं. ते यरुशलेमला आले तेव्हा, ३ त्या संपूर्ण मंडळीने खऱ्‍या देवाच्या मंदिरात राजासोबत एक करार केला.+ त्यानंतर यहोयादा त्यांना म्हणाला:

“पाहा! यहोवाने दावीदच्या वंशजांबद्दल जे वचन दिलं होतं, त्याप्रमाणे राजाचा मुलगा राज्य करेल.+ ४ तुम्ही असं करावं: शब्बाथाच्या दिवशी सेवा करणाऱ्‍या याजकांपैकी आणि लेव्यांपैकी+ एक तृतीयांश जणांनी द्वारपालांचं काम करावं;+ ५ एक तृतीयांश जणांनी राजमहालाजवळ+ आणि एक तृतीयांश जणांनी ‘पाया’ नावाच्या दरवाजाजवळ तैनात व्हावं. बाकीच्या सगळ्या लोकांनी यहोवाच्या मंदिराच्या अंगणांत थांबावं.+ ६ कोणालाही यहोवाच्या मंदिरात येऊ देऊ नका. फक्‍त सेवा करणारे याजक आणि लेवी आत येतील.+ कारण ते पवित्र सेवेसाठी निवडलेले आहेत. बाकीच्या सगळ्या लोकांनी मंदिराच्या बाहेर थांबून यहोवासाठी असलेलं आपलं कर्तव्य पूर्ण करावं. ७ लेवी शस्त्रं घेऊन चारही बाजूंनी राजाचं संरक्षण करतील. कोणीही मंदिरात आला, तर त्याला मारून टाका. आणि राजा जिथे कुठे जाईल तिथे त्याच्यासोबत राहा.”

८ तेव्हा, यहोयादा याजकाने सांगितलं होतं, अगदी तसंच लेव्यांनी आणि यहूदाच्या माणसांनी केलं. त्यांच्यापैकी प्रत्येकाने, शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्‍यावर असलेल्या आपल्या माणसांना सोबत घेतलं; तसंच, जी माणसं शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्‍यावर नव्हती त्या माणसांनाही त्यांनी सोबत घेतलं.+ कारण यहोयादा याजकाने कोणत्याही गटाला+ कामावरून सोडलं नव्हतं; त्याने त्यांना थांबवून ठेवलं होतं. ९ यहोयादा याजकाने मग शंभर रक्षकांवर अधिकारी असलेल्या प्रमुखांना,+ खऱ्‍या देवाच्या मंदिरात असलेल्या+ दावीद राजाच्या छोट्या ढाली,* गोलाकार ढाली+ आणि भाले दिले. १० नंतर त्याने सगळ्या लोकांना हातात शस्त्रं देऊन तैनात केलं. ते मंदिराच्या उजव्या टोकापासून डाव्या टोकापर्यंत सगळीकडे तैनात झाले; ते वेदीजवळ आणि मंदिराजवळ, राजाच्या चारही बाजूंना तैनात झाले. ११ मग त्यांनी राजाच्या मुलाला+ बाहेर आणलं. त्यांनी त्याच्या डोक्यावर मुकुट व साक्षपट*+ ठेवून त्याला राजा बनवलं. आणि यहोयादाने व त्याच्या मुलांनी त्याचा अभिषेक केला. नंतर ते अशी घोषणा करू लागले: “राजाला दीर्घायुष्य लाभो!”+

१२ अथल्याने जेव्हा लोकांच्या पळण्याचा आणि राजाचा जयजयकार होत असल्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती लगेच त्या लोकांकडे यहोवाच्या मंदिरात गेली.+ १३ तिने पाहिलं, की राजा प्रवेशद्वाराजवळ त्याच्या स्तंभाशेजारी उभा आहे आणि अधिकारी+ व कर्णे वाजवणारे राजासोबत आहेत. तसंच, देशातले सगळे लोकही जल्लोष करून+ कर्णे वाजवत आहेत. आणि गायक वाद्यं वाजवून स्तुती करण्यात पुढाकार घेत आहेत. हे सर्व पाहून अथल्याने आपले कपडे फाडले आणि ती मोठ्याने ओरडून म्हणाली: “विश्‍वासघात! विश्‍वासघात!” १४ तेव्हा यहोयादा याजकाने शंभर रक्षकांच्या प्रमुखांना, म्हणजे सैन्यावर नेमलेल्या अधिकाऱ्‍यांना बाहेर पाठवून अशी आज्ञा दिली: “तिला पहारेकऱ्‍यांमधून बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारून टाका!” कारण, याजकाने त्यांना आधीच सांगितलं होतं, की “तिला यहोवाच्या मंदिरात ठार मारू नका.” १५ म्हणून त्यांनी तिला पकडून नेलं, आणि राजमहालाच्या ‘घोडा-फाटकाजवळ’ आल्यावर तिला लगेच ठार मारलं.

१६ मग यहोयादाने असा एक करार केला, की तो स्वतः, सगळे लोक आणि राजा हे नेहमी यहोवाचे लोक म्हणून राहतील.+ १७ त्यानंतर सर्व लोक बआलच्या मंदिराकडे आले आणि त्यांनी ते मंदिर पाडून टाकलं.+ त्यांनी त्याच्या वेदींचा आणि मूर्तींचा पूर्णपणे चुराडा केला.+ त्यांनी वेदींसमोरच बआलच्या पुजाऱ्‍याला, मत्तानला मारून टाकलं.+ १८ मग यहोयादाने याजकांवर आणि लेव्यांवर यहोवाच्या मंदिराची देखरेख करण्याचं काम सोपवलं; दावीदने यांची वेगवेगळ्या गटांत विभागणी केली होती आणि त्यांना मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे+ यहोवाला होमार्पणं वाहण्यासाठी,+ आणि दावीदच्या सूचनेप्रमाणे आनंदाने गीत गाण्यासाठी यहोवाच्या मंदिरात नेमलं होतं. १९ याशिवाय यहोयादाने यहोवाच्या मंदिराच्या दरवाजांजवळ द्वारपाल नेमले.+ म्हणजे अशुद्ध असलेला कोणीही, मग तो कोणत्याही प्रकारे अशुद्ध असो, मंदिरात येणार नाही. २० नंतर, राजाला यहोवाच्या मंदिरातून राजमहालात घेऊन जाण्यासाठी यहोयादाने शंभर रक्षकांवर प्रमुख असलेल्यांना,+ प्रतिष्ठित माणसांना, लोकांच्या अधिकाऱ्‍यांना आणि देशातल्या सगळ्या लोकांना आपल्यासोबत घेतलं. ते सगळे वरच्या दरवाजातून राजमहालात आले, आणि त्यांनी राजाला राजासनावर+ बसवलं.+ २१ तेव्हा देशातल्या सगळ्या लोकांनी आनंदोत्सव केला. आणि अथल्याला तलवारीने मारून टाकण्यात आल्यामुळे शहर शांत झालं.

२४ यहोआश राजा बनला तेव्हा तो सात वर्षांचा होता.+ त्याने ४० वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव सिब्या असून ती बैर-शेबा+ इथली होती. २ यहोयादा याजक जिवंत होता तोपर्यंत यहोआश राजा यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ३ यहोयादाने त्याला दोन बायका करून दिल्या आणि त्याला मुलं व मुली झाल्या.

४ नंतर, यहोआशच्या मनात यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्याची इच्छा निर्माण झाली.+ ५ म्हणून त्याने सगळ्या याजकांना आणि लेव्यांना एकत्र बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “तुमच्या देवाच्या मंदिराची दरवर्षी दुरुस्ती करता यावी, म्हणून यहूदाच्या सर्व शहरांमध्ये जाऊन सगळ्या इस्राएली लोकांकडून पैसा गोळा करा.+ आणि हे काम लवकरात लवकर करा.” पण लेव्यांनी मात्र ते काम करायला उशीर लावला.+ ६ तेव्हा राजाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून विचारलं:+ “लेव्यांनी अजूनपर्यंत यहूदामधून आणि यरुशलेममधून पवित्र कर का गोळा केला नाही? आणि त्याबद्दल तुम्ही त्यांना का विचारलं नाही? यहोवाचा सेवक मोशे याने साक्षपेटीच्या मंडपासाठी+ जो पवित्र कर, म्हणजे इस्राएलच्या मंडळीचा पवित्र कर गोळा करण्याची आज्ञा दिली होती,+ तो अजूनपर्यंत का गोळा केलेला नाही? ७ तुम्हाला हे चांगलं माहीत आहे, की त्या दुष्ट बाईची, अथल्याची+ मुलं खऱ्‍या देवाच्या मंदिरात घुसली होती.+ आणि त्यांनी यहोवाच्या मंदिरातल्या सगळ्या पवित्र वस्तू बआलसाठी वापरल्या होत्या.” ८ मग, राजाच्या आज्ञेवरून एक पेटी+ बनवून ती बाहेर यहोवाच्या मंदिराच्या दरवाजाजवळ ठेवण्यात आली.+ ९ त्यानंतर संपूर्ण यहूदा आणि यरुशलेममध्ये अशी घोषणा करण्यात आली, की खऱ्‍या देवाचा सेवक मोशे याने ओसाड रानात इस्राएली लोकांवर जो पवित्र कर+ बसवला होता, तो लोकांनी यहोवासाठी आणावा. १० तेव्हा सगळे अधिकारी व लोक मोठ्या आनंदाने दान आणत राहिले+ आणि पेटी भरेपर्यंत* त्यात दान टाकत राहिले.

११ पेटीत भरपूर पैसा जमा झालेला दिसला, की लेवी ती पेटी राजाकडे घेऊन यायचे. मग राजाचा सचिव आणि मुख्य याजकाचा सहायक येऊन ती पेटी रिकामी करायचे+ आणि नंतर ती परत तिच्या जागेवर नेऊन ठेवायचे. असं ते दररोज करायचे आणि त्यामुळे त्यांनी भरपूर पैसा जमवला. १२ मग राजा आणि यहोयादा तो पैसा यहोवाच्या मंदिरातल्या कामाची देखरेख करणाऱ्‍या माणसांना द्यायचे. पुढे ही माणसं त्या पैशाचा वापर करून, यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी कारागिरांना आणि दगड फोडणाऱ्‍यांना कामावर ठेवायची.+ तसंच, त्या पैशाने ती माणसं यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी लोहारांना आणि तांब्याची कामं करणाऱ्‍यांनाही कामावर ठेवायची. १३ मंदिराच्या कामाची देखरेख करणाऱ्‍यांनी मग कामाला सुरुवात केली, आणि त्यांच्या देखरेखीखाली काम होत गेलं. शेवटी, त्यांनी खऱ्‍या देवाच्या मंदिराची दुरुस्ती पूर्ण केली आणि ते मजबूत करून आधीसारखं बनवलं. १४ मग काम संपल्यावर त्यांनी उरलेला पैसा राजाला आणि यहोयादाला आणून दिला. त्यांनी तो पैसा यहोवाच्या मंदिरासाठी भांडी बनवायला; तसंच, सेवेत आणि अर्पणं देताना वापरली जाणारी भांडी, आणि सोन्या-चांदीची भांडी व प्याले+ बनवायला वापरला. यहोयादा जिवंत होता तोपर्यंत ते यहोवाच्या मंदिरात दररोज होमार्पणं द्यायचे.+

१५ यहोयादा समाधानी जीवन जगला आणि शेवटी वृद्ध होऊन मेला. त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो १३० वर्षांचा होता. १६ त्यांनी त्याला दावीदपुरात राजांच्या कबरेत दफन केलं.+ कारण, त्याने खरा देव आणि त्याचं मंदिर यांच्या बाबतीत इस्राएलमध्ये चांगली कामं केली होती.+

१७ यहोयादाचा मृत्यू झाल्यावर यहूदाचे प्रमुख राजाकडे आले. त्यांनी त्याला दंडवत घातला आणि राजाने त्यांचं म्हणणं ऐकलं. १८ त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याच्या मंदिराचा त्याग केला आणि ते पूजेच्या खांबांची* व मूर्तींची उपासना करू लागले. त्यांनी केलेल्या पापामुळे देवाचा क्रोध यहूदावर आणि यरुशलेमवर भडकला. १९ यहोवा त्यांना आपल्याकडे परत आणण्यासाठी संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवत राहिला. ते संदेष्टे त्यांना चेतावणी* देत राहिले, पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही.+

२० मग देवाची पवित्र शक्‍ती* यहोयादा+ याजकाच्या मुलावर, जखऱ्‍यावर आली. तेव्हा तो एका उंच जागी उभा राहून लोकांना म्हणाला: “खरा देव असं म्हणतो, की ‘तुम्ही यहोवाच्या आज्ञा का मोडत आहात? अशाने तुमचं कधीही चांगलं होणार नाही. तुम्ही यहोवाला सोडून दिलंय, म्हणून तोही तुम्हाला सोडून देईल.’”+ २१ पण त्यांनी जखऱ्‍याविरुद्ध कट रचला,+ आणि राजाच्या आज्ञेवरून यहोवाच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारलं.+ २२ अशा प्रकारे, त्याचे वडील* यहोयादा यांनी दाखवलेलं एकनिष्ठ प्रेम यहोआश राजा विसरून गेला. आणि त्याने त्याच्या मुलाला मारून टाकलं. मरता-मरता जखऱ्‍या म्हणाला: “यहोवाने हे पाहावं आणि तुझ्याकडून याचा हिशोब घ्यावा.”+

२३ मग, वर्षाच्या सुरुवातीला सीरियाचं सैन्य यहोआशसोबत लढाई करायला आलं आणि त्यांनी यहूदा व यरुशलेमवर हल्ला केला.+ त्यांनी लोकांच्या सर्व अधिकाऱ्‍यांना मारून टाकलं+ आणि लुटीचा सगळा माल दिमिष्कच्या राजाला पाठवून दिला. २४ लढाई करायला आलेल्या सीरियाच्या सैन्यात फार कमी माणसं होती. पण तरीसुद्धा यहोवाने यहूदाचं मोठं सैन्य त्यांच्या हाती दिलं.+ कारण यहूदाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचा देव यहोवा याला सोडून दिलं होतं. आणि म्हणून त्यांनी* यहोआशला शिक्षा केली. २५ सीरियाचं सैन्य निघून गेलं, त्या वेळी यहोआश जबर जखमी* होऊन पडला होता. तेव्हा त्याच्या सेवकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला, कारण त्याने यहोयादा याजकाच्या मुलांचं* रक्‍त सांडलं होतं.+ त्यांनी यहोआशला त्याच्याच पलंगावर ठार मारलं.+ आणि त्याला दावीदपुरात+ दफन केलं, पण राजांच्या कबरेत मात्र त्याला दफन केलं नाही.+

२६ यहोआशविरुद्ध कट रचणाऱ्‍यांची नावं ही:+ अम्मोनी स्त्री शिमाथ हिचा मुलगा जाबाद, आणि मवाबी स्त्री शिम्रिथ हिचा मुलगा यहोजाबाद. २७ यहोआशच्या मुलांबद्दलची माहिती, तसंच त्याच्याविरुद्ध सांगितलेल्या न्यायाच्या संदेशांबद्दलची+ आणि खऱ्‍या देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीबद्दलची सगळी माहिती+ राजांच्या पुस्तकाच्या लिखाणांत नमूद आहे. मग त्याच्या जागी त्याचा मुलगा अमस्या हा राजा बनला.

२५ अमस्या राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये २९ वर्षं राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यहोअदान असून ती यरुशलेमची राहणारी होती.+ २ अमस्या यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला, पण पूर्ण मनाने नाही. ३ अमस्याने राज्यावरची पकड मजबूत करताच आपल्या वडिलांचा खून करणाऱ्‍या आपल्या सेवकांना ठार मारलं.+ ४ पण त्या सेवकांच्या मुलांना मात्र त्याने ठार मारलं नाही. कारण, यहोवाने मोशेच्या नियमशास्त्रात जी आज्ञा दिली होती त्याप्रमाणे तो वागला. ती आज्ञा अशी: “मुलांच्या पापासाठी वडिलांना, किंवा वडिलांच्या पापासाठी मुलांना ठार मारलं जाऊ नये. तर प्रत्येकाला स्वतःच्याच पापासाठी ठार मारलं जावं.”+

५ मग अमस्याने यहूदाच्या आणि बन्यामीनच्या सगळ्या माणसांना एकत्र करून त्यांना आपापल्या घराण्यांप्रमाणे उभं केलं; त्याने त्यांना हजारांवर व शंभरांवर अधिकारी असलेल्या त्यांच्या प्रमुखांच्या देखरेखीखाली उभं केलं.+ नंतर, त्याने २० वर्षं आणि त्याहून जास्त वय असलेल्यांची नोंदणी केली.+ तेव्हा ते ३,००,००० प्रशिक्षित योद्धे असल्याचं त्याला दिसून आलं. हे योद्धे मोठ्या ढाली आणि भाले हाताळू शकत होते. ६ याशिवाय, त्याने १०० तालान्त* चांदी देऊन इस्राएलमधून १,००,००० शूर योद्धेही भाड्याने मागवले. ७ पण खऱ्‍या देवाचा एक माणूस त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला: “हे राजा, इस्राएलच्या सैनिकांना आपल्यासोबत घेऊ नकोस. कारण यहोवा इस्राएलसोबत नाही,+ आणि तो एफ्राईमच्या लोकांसोबतही नाही. ८ तू तसं केलंस, तर खरा देव तुझ्या शत्रूपुढे तुला हरवेल. याउलट तूच जा आणि हिंमत धरून लढ. कारण देवाकडे मदत करायची आणि हरवायचीही ताकद आहे.”+ ९ त्यावर अमस्या खऱ्‍या देवाच्या माणसाला म्हणाला: “पण इस्राएलच्या सैन्याला मी १०० तालान्त दिलेत, त्याचं काय?” तेव्हा खऱ्‍या देवाचा माणूस त्याला म्हणाला: “यहोवा तुला त्याहून जास्त देऊ शकतो.”+ १० म्हणून मग अमस्याने एफ्राईमहून आलेल्या त्या सैनिकांना आपापल्या घरी परत पाठवून दिलं. त्यामुळे ते यहूदावर फार चिडले आणि रागाने निघून गेले.

११ त्यानंतर अमस्याने हिंमत धरून आपल्या सैन्याला क्षार खोऱ्‍यात+ युद्धासाठी नेलं. तिथे त्याने सेईरच्या १०,००० सैनिकांना ठार मारलं.+ १२ याशिवाय, यहूदाच्या माणसांनी आणखी १०,००० सैनिकांना जिवंत पकडलं. त्यांनी त्यांना डोंगराच्या शिखरावर नेऊन खाली फेकून दिलं, आणि त्या सगळ्यांचे तुकडे-तुकडे झाले. १३ पण अमस्याने ज्या सैनिकांना आपल्यासोबत युद्धावर न नेता परत पाठवून दिलं होतं,+ ते यहूदाच्या शहरांवर हल्ले करून लूटमार करू लागले. त्यांनी शोमरोनपासून+ थेट बेथ-होरोनपर्यंत+ लूटमार केली. त्यांनी ३,००० लोकांना मारून टाकलं आणि भरपूर माल लुटून नेला.

१४ अमस्या जेव्हा अदोमी लोकांना ठार मारून परत आला, तेव्हा त्याने सेईरमधल्या लोकांची दैवतं आपल्यासोबत आणली आणि त्यांना आपले देव बनवले.+ तो त्यांना नमन करू लागला आणि त्यांच्यासाठी बलिदानांचं हवन करू लागला. १५ त्यामुळे यहोवाचा राग अमस्यावर खूप भडकला, आणि त्याने त्याच्याकडे एका संदेष्ट्याला पाठवलं. तो संदेष्टा अमस्याला म्हणाला: “ज्या देवांनी त्यांच्या स्वतःच्या लोकांना तुझ्या हातून वाचवलं नाही, त्या देवांच्या नादी तू का लागलास?”+ १६ पण त्याचं बोलणं मधेच तोडून राजा त्याला म्हणाला: “गप्प बस्स!+ तू काय राजाचा सल्लागार आहेस?+ तू जर तोंड बंद केलं नाहीस तर तुला मारून टाकलं जाईल.” तेव्हा तो संदेष्टा गप्प बसला. पण त्याआधी तो म्हणाला: “मला माहीत आहे, की देवाने तुझा नाश करायचं ठरवलंय. कारण तू चुकीचं वागलास आणि माझा सल्लाही ऐकला नाहीस.”+

१७ मग यहूदाचा राजा अमस्या आपल्या सल्लागारांशी बोलला. आणि त्याने इस्राएलचा राजा येहू याच्या नातवाला, म्हणजे यहोआहाजचा मुलगा यहोआश याला दूतांच्या हातून असा संदेश पाठवला: “चल, युद्ध करायला ये! आपण समोरासमोर लढू.”+ १८ त्यावर इस्राएलचा राजा यहोआश याने यहूदाचा राजा अमस्या याला असं उत्तर दिलं: “लबानोनच्या काटेरी झुडपाने लबानोनच्या देवदार वृक्षाला एकदा असा निरोप पाठवला: ‘तुझी मुलगी माझ्या मुलाला बायको म्हणून दे.’ पण लबानोनच्या एका जंगली प्राण्याने तिथून जाताना, त्या काटेरी झुडपाला आपल्या पायांखाली तुडवलं. १९ तू म्हणतोस, की तू अदोमला हरवलंस.+ आणि यामुळे आता तुझं मन गर्वाने फुगलंय आणि तुला प्रशंसा हवी आहे. पण तू आपल्या घरातच बसून राहा. संकटाला आमंत्रण का देतोस? स्वतःसोबत यहूदालाही संकटात का पाडतोस?”

२० पण अमस्याने त्याचं ऐकलं नाही.+ अमस्याला आणि त्याच्या लोकांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिलं जावं, अशी खऱ्‍या देवाचीच इच्छा होती.+ कारण ते अदोमच्या देवांची उपासना करू लागले होते.+ २१ म्हणून इस्राएलचा राजा यहोआश यहूदाच्या राजाशी, अमस्याशी युद्ध करायला गेला. आणि ते यहूदामधल्या बेथ-शेमेश+ या ठिकाणी एकमेकांशी लढले. २२ युद्धात इस्राएलने यहूदाला हरवलं, आणि यहूदाचे सगळे सैनिक घरी पळून गेले. २३ मग इस्राएलचा राजा यहोआश याने बेथ-शेमेश इथे यहूदाचा राजा अमस्या याला बंदी बनवलं (अमस्या हा यहोआहाजचा* नातू आणि यहोआशचा मुलगा होता). यहोआशने अमस्याला बंदी बनवून यरुशलेमला आणलं. तिथे त्याने यरुशलेमच्या भिंतीचा ४०० हात* लांब भाग, म्हणजे एफ्राईमच्या दरवाजापासून+ कोपऱ्‍याच्या दरवाजापर्यंतचा+ भाग तोडून टाकला. २४ मग त्याने खऱ्‍या देवाच्या मंदिरात ओबेद-अदोमच्या देखरेखीखाली असलेलं आणि राजमहालाच्या भांडारांत असलेलं सगळं सोनं, चांदी व सगळ्या वस्तू लुटल्या;+ आणि लोकांना बंदी बनवून तो शोमरोनला परत गेला.

२५ यहूदाचा राजा यहोआश याचा मुलगा अमस्या,+ हा इस्राएलचा राजा यहोआहाज याच्या मुलाच्या मृत्यूनंतर, म्हणजे यहोआशच्या+ मृत्यूनंतर आणखी १५ वर्षं जगला.+ २६ अमस्याबद्दलची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी माहिती, यहूदामधल्या आणि इस्राएलमधल्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. २७ अमस्याने यहोवाच्या मार्गांवर चालायचं सोडून दिलं तेव्हापासून त्याचे शत्रू यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचू लागले;+ म्हणून तो लाखीशला पळून गेला. पण त्याच्या शत्रूंनी लाखीशला त्याच्यामागे माणसं पाठवली आणि त्याला ठार मारलं. २८ मग, त्यांनी त्याचा मृतदेह घोड्यावर टाकून परत आणला; आणि यहूदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांच्या कबरेत त्याला दफन केलं.

२६ त्यानंतर यहूदाच्या सर्व लोकांनी अमस्याचा मुलगा उज्जीया+ याला त्याच्या वडिलांच्या जागी राजा बनवलं. त्या वेळी तो १६ वर्षांचा होता.+ २ अमस्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर* उज्जीयाने एलोथ+ शहर पुन्हा बांधलं आणि ते यहूदाच्या सत्तेखाली आणलं.+ ३ उज्जीया+ राजा बनला त्या वेळी तो १६ वर्षांचा होता आणि त्याने ५२ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यखल्या असून ती यरुशलेमची राहणारी होती.+ ४ आपले वडील अमस्या यांच्याप्रमाणेच उज्जीयासुद्धा यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ५ जखऱ्‍याने उज्जीयाला खऱ्‍या देवाचं भय बाळगायला शिकवलं आणि जखऱ्‍याच्या दिवसांत तो देवाची सेवा करत राहिला. त्याने यहोवाची सेवा केली त्या संपूर्ण काळात, खऱ्‍या देवाच्या आशीर्वादाने त्याची भरभराट झाली.+

६ मग उज्जीयाने पलिष्टी लोकांशी जाऊन युद्ध केलं.+ त्याने गथ,+ यब्ने+ आणि अश्‍दोद+ या शहरांच्या भिंती पाडून टाकल्या आणि शहरांत घुसून त्यांवर कब्जा केला. मग त्याने अश्‍दोदच्या प्रदेशात आणि पलिष्ट्यांच्या बाकीच्या प्रदेशात शहरं बांधली. ७ खरा देव त्याला पलिष्टी लोकांवर, गुरबालमध्ये राहणाऱ्‍या अरबी लोकांवर+ आणि मऊनीमच्या लोकांवर विजय मिळवायला मदत करत राहिला. ८ अम्मोनी लोक+ उज्जीयाला नजराणा* देऊ लागले. हळूहळू त्याची कीर्ती थेट इजिप्तपर्यंत पसरली, कारण तो अतिशय शक्‍तिशाली झाला. ९ उज्जीयाने यरुशलेममध्ये असलेलं ‘खोरं-फाटक’,+ कोपऱ्‍याचा दरवाजा+ आणि आधार-भिंत* यांच्याजवळ मनोरे* बांधले+ आणि ते मजबूत केले. १० याशिवाय, त्याने ओसाड रानातही मनोरे बांधले+ आणि बऱ्‍याच विहिरी खोदल्या* (कारण त्याच्याजवळ भरपूर गुरंढोरं होती). त्याने शेफीलामध्ये आणि मैदानी* प्रदेशातसुद्धा असंच केलं. त्याला शेतीवाडीची फार आवड होती. त्यामुळे डोंगरांवर आणि कर्मेलमध्ये त्याचे बरेच शेतकरी व द्राक्षमळ्यांत काम करणारे लोक होते.

११ यासोबतच, उज्जीयाकडे शस्त्रं घेऊन तयार असलेलं एक मोठं सैन्यही होतं. त्याच्या सैनिकांची दलं सुसंघटितपणे युद्धाच्या मोहिमांवर जायची. राजाच्या अधिकाऱ्‍यांपैकी असलेला हनन्या याच्या आज्ञेवरून, सचिव ईयेल+ आणि प्रमुख मासेया यांनी सैनिकांची संख्या मोजून त्यांची नोंदणी केली.+ १२ या शूर योद्ध्यांवर अधिकारी असलेल्या घराण्यांच्या प्रमुखांची एकूण संख्या २,६०० इतकी होती. १३ त्यांच्या अधिकाराखाली ३,०७,५०० सैनिक शस्त्रं घेऊन युद्धासाठी तयार होते. शत्रूशी लढण्यासाठी राजाला मदत करणारं हे एक शक्‍तिशाली सैन्यदल होतं.+ १४ उज्जीयाने या संपूर्ण सैन्याला ढाली, चिलखत,+ टोप, भाले,+ गोफणीचे दगड+ आणि धनुष्यं देऊन सुसज्ज केलं होतं. १५ शिवाय, त्याने यरुशलेममध्ये कुशल कारागिरांकडून युद्धाची यंत्रं बनवून घेतली होती. आणि ती बुरुजांवर+ आणि शहराच्या भिंतींच्या कोपऱ्‍यांवर ठेवली होती. या यंत्रांनी बाण आणि मोठमोठे दगड फेकून मारले जाऊ शकत होते. उज्जीयाची कीर्ती दूरपर्यंत पसरली. कारण देवाने त्याला खूप मदत केली होती आणि तो शक्‍तिशाली झाला होता.

१६ पण, शक्‍तिशाली झाल्यावर त्याचं मन गर्वाने फुगलं आणि हेच त्याच्या नाशाचं कारण ठरलं. तो आपला देव यहोवा याच्याशी अविश्‍वासूपणे वागला, कारण तो यहोवाच्या मंदिरात धूप वेदीवर, धूप जाळण्यासाठी आत गेला.+ १७ तेव्हा लगेच अजऱ्‍या याजक आणि यहोवाचे इतर ८० धैर्यवान याजक त्याच्यामागे आत गेले. १८ ते उज्जीया राजाला अडवून म्हणाले: “उज्जीया, यहोवासाठी धूप जाळणं हे तुझं काम नाही!+ फक्‍त याजकांनीच धूप जाळला पाहिजे, कारण ते अहरोनचे वंशज आहेत आणि त्यांना पवित्र करण्यात आलंय.+ म्हणून आता पवित्र ठिकाणातून बाहेर जा. तू देवाशी अविश्‍वासूपणे वागलास आणि यासाठी तुला यहोवा देवाकडून कोणताही सन्मान मिळणार नाही.”

१९ पण उज्जीयाचा राग त्यांच्यावर खूप भडकला.+ त्या वेळी, त्याच्या हातात धूप जाळण्यासाठी धूप-पात्र असून तो यहोवाच्या मंदिरात धूपवेदीजवळ उभा होता. तो याजकांवर संतापलेला असतानाच, त्यांच्यासमोर त्याच्या कपाळाला कुष्ठरोग* झाला.+ २० मुख्य याजक अजऱ्‍या आणि त्याच्यासोबत असलेले याजक यांनी उज्जीयाच्या कपाळावर कुष्ठरोग झाल्याचं पाहिलं. तेव्हा ते लगेच त्याला बाहेर नेऊ लागले, आणि उज्जीया स्वतःसुद्धा ताबडतोब बाहेर निघून गेला. कारण यहोवाने त्याला शिक्षा दिली होती.

२१ उज्जीया राजा मरेपर्यंत कुष्ठरोगीच राहिला. कुष्ठरोगामुळे तो वेगळ्या घरात राहायचा,+ कारण त्याला यहोवाच्या मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. राजाचा मुलगा योथाम हा राजमहालाचा कारभार पाहायचा आणि देशातल्या लोकांचा न्यायनिवाडा करायचा.+

२२ उज्जीयाबद्दलचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा सगळा इतिहास आमोजच्या मुलाने, म्हणजे यशया संदेष्ट्याने+ लिहून ठेवला आहे. २३ मग, उज्जीयाचा मृत्यू झाला* आणि त्याला आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. पण, त्यांनी त्याला राजांच्या मालकीच्या जमिनीत* पुरलं. कारण ते म्हणाले: “हा कुष्ठरोगी आहे.” मग त्याच्या जागी त्याचा मुलगा योथाम+ राजा बनला.

२७ योथाम+ राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यरूशाह असून ती सादोकची मुलगी होती.+ २ योथाम हा आपले वडील उज्जीया यांच्याप्रमाणेच यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ पण आपल्या वडिलांप्रमाणे त्याने यहोवाच्या मंदिराच्या त्या भागात कधीही प्रवेश केला नाही, जिथे जाण्याची मनाई होती;+ लोक मात्र अजूनही दुष्टपणे वागत होते. ३ योथामने यहोवाच्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधून घेतला+ आणि ओफेलच्या भिंतीवर बरंच बांधकाम केलं.+ ४ याशिवाय, त्याने यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात+ शहरं बांधली+ आणि जंगलांमध्ये मजबूत किल्ले+ व मनोरे* उभारले.+ ५ त्याने अम्मोनी लोकांच्या+ राजाशी युद्ध केलं आणि शेवटी त्या लोकांवर विजय मिळवला. म्हणून मग अम्मोनी लोकांनी त्या वर्षी त्याला १०० तालान्त* चांदी, १०,००० कोर* मापं गहू आणि १०,००० कोर मापं जव दिलं. त्यांनी दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या वर्षीही त्याला हे सगळं दिलं.+ ६ अशा प्रकारे योथाम शक्‍तिशाली होत गेला. कारण त्याने आपला देव यहोवा याच्या मार्गांवर चालत राहण्याचा पक्का निश्‍चय केला होता.

७ योथामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याच्या वागणुकीबद्दलची आणि त्याने लढलेल्या युद्धांबद्दलची सगळी माहिती, इस्राएल आणि यहूदा यांच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे.+ ८ योथाम राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता आणि त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ ९ मग योथामचा मृत्यू झाला* आणि त्यांनी त्याला दावीदपुरात+ दफन केलं. नंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा आहाज हा राजा बनला.+

२८ आहाज+ हा राजा बनला तेव्हा तो २० वर्षांचा होता. त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. पण आपला पूर्वज दावीद याने जसं यहोवाच्या नजरेत योग्य ते केलं, तसं त्याने केलं नाही.+ २ याउलट, तो इस्राएलच्या राजांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालला.+ इतकंच नाही तर त्याने बआल दैवतांच्या धातूच्या मूर्तीही* बनवल्या.+ ३ तसंच, त्याने ‘हिन्‍नोम वंशजांच्या खोऱ्‍यात’* बलिदानांचं हवन केलं* आणि आपल्या स्वतःच्या मुलांचा अग्नीत होम केला.+ यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांमधून घालवून दिलं होतं, त्यांच्या घृणास्पद चालीरितींचं+ त्याने अशा प्रकारे अनुसरण केलं. ४ शिवाय, तो उच्च स्थानांवर,*+ टेकड्यांवर आणि प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली बलिदानं अर्पण करत राहिला आणि बलिदानांचं हवन करत राहिला.+

५ म्हणून त्याच्या देवाने, यहोवाने त्याला सीरियाच्या राजाच्या हाती दिलं.+ सीरियाच्या लोकांनी आहाजला हरवलं आणि त्याच्या पुष्कळ लोकांना बंदी बनवून दिमिष्कला नेलं.+ तसंच, देवाने त्याला इस्राएलच्या राजाच्याही हवाली केलं. इस्राएलच्या राजाने त्याला हरवून त्याच्या लोकांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. ६ रमाल्याहचा मुलगा पेकह+ याने एका दिवसात यहूदाच्या १,२०,००० शूर योद्ध्यांना मारून टाकलं. कारण यहूदाने आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याला सोडून दिलं होतं.+ ७ जिख्री नावाच्या एका एफ्राईमी योद्ध्याने राजाचा मुलगा मासेया याला मारून टाकलं. तसंच, राजमहालाची व्यवस्था पाहणारा अज्रीकाम आणि राजाच्या खालोखाल असलेला एलकाना यांनाही त्याने मारून टाकलं. ८ शिवाय, इस्राएली लोकांनी यहूदामधल्या आपल्या २,००,००० भाऊबंदांना बंदी बनवून नेलं; त्यांच्यामध्ये स्त्रिया, मुलं आणि मुली होत्या. यासोबतच, त्यांनी तिथे बरीच लूटमार केली आणि लुटीचा माल शोमरोनला नेला.+

९ पण तिथे ओदेद नावाचा यहोवाचा एक संदेष्टा होता. तो शोमरोनात परत येणाऱ्‍या सैन्यासमोर गेला आणि त्यांना म्हणाला: “पाहा! तुमच्या पूर्वजांच्या देवाचा, यहोवाचा क्रोध यहूदावर भडकला होता. म्हणून त्याने त्यांना तुमच्या हाती दिलं.+ पण तुम्ही इतक्या रागाने आणि निर्दयीपणे त्यांची कत्तल केली, की ती गोष्ट देवाच्या नजरेतून सुटली नाही. १० आणि आता तर तुम्ही यहूदाच्या व यरुशलेमच्या लोकांना आपले दास-दासी बनवायचाही विचार करताय!+ पण, तुम्ही स्वतःसुद्धा तुमचा देव यहोवा याच्यासमोर दोषी नाहीत का? ११ आता माझं ऐका! तुम्ही तुमच्या भाऊबंदांमधून ज्यांना बंदी बनवून आणलंय, त्यांना परत पाठवून द्या. कारण यहोवाचा क्रोध तुमच्यावर खूप भडकलाय.”

१२ मग एफ्राईमच्या काही प्रमुखांनी, म्हणजे यहोहानानचा मुलगा अजऱ्‍या, मशिल्लेमोथचा मुलगा बरेख्या, शल्लूमचा मुलगा यहिज्कीया आणि हदलाईचा मुलगा अमासा यांनी युद्धावरून परत येणाऱ्‍या सैन्याला अडवलं, १३ आणि ते त्यांना म्हणाले: “बंदिवानांना इथे आणू नका, नाहीतर आपण यहोवापुढे दोषी ठरू. तुम्ही जे काही करायचा विचार करताय, त्यामुळे आपल्या पापात आणि दोषात आणखी भर पडेल. कारण आपल्यावर आधीच खूप मोठा दोष आहे आणि देवाचा क्रोध इस्राएलवर भडकलाय.” १४ म्हणून मग शस्त्रधारी सैनिकांनी बंदिवानांना अधिकाऱ्‍यांच्या आणि संपूर्ण मंडळीच्या हवाली केलं. तसंच, त्यांनी लुटीचा सगळा मालही त्यांना देऊन टाकला.+ १५ मग ज्या माणसांना नेमण्यात आलं होतं, त्यांनी येऊन बंदिवानांना आपल्या ताब्यात घेतलं. आणि त्यांच्यापैकी ज्यांच्या अंगावर कपडे नव्हते त्या सर्वांना त्यांनी लुटीच्या मालातून कपडे दिले; त्यांनी त्यांना कपडे, पायात घालायचे जोडे, अन्‍नपाणी आणि अंगाला लावायला तेल दिलं. नंतर त्यांच्यापैकी कमजोर असलेल्यांना त्यांनी गाढवांवर बसवलं आणि सगळ्या बंदिवानांना खजुराच्या झाडांच्या शहरात, म्हणजे यरीहोत आपल्या भाऊबंदांकडे आणलं. मग ते परत शोमरोनला निघून गेले.

१६ त्या वेळी आहाज राजाने अश्‍शूरच्या राजांकडे मदत मागितली.+ १७ शिवाय, अदोमच्या लोकांनी परत एकदा येऊन यहूदावर हल्ला केला आणि तिथल्या लोकांना बंदी बनवून नेलं. १८ पलिष्टी लोकांनीही+ यहूदाच्या शेफीला+ आणि नेगेब प्रदेशांतल्या शहरांवर हल्ले केले. त्यांनी बेथ-शेमेश,+ अयालोन,+ गदेरोथ ही शहरं काबीज केली. तसंच त्यांनी सोखो, तिम्ना+ आणि गिम्जो या शहरांवर व त्यांच्या आसपासच्या नगरांवरही हल्ले केले. आणि ते तिथे राहू लागले. १९ इस्राएलचा राजा आहाज याच्यामुळे यहोवाने यहूदाला नमवलं. आहाजने यहूदाच्या लोकांना मोकळं सोडलं होतं आणि म्हणून लोक यहोवाशी आणखी अविश्‍वासूपणे वागले होते.

२० शेवटी अश्‍शूरचा राजा तिग्लथ-पिल्नेसर+ याने आहाजला मदत करण्याऐवजी त्याच्यावर हल्ला करून त्याला संकटात टाकलं.+ २१ आहाजने यहोवाच्या मंदिरात, राजमहालात आणि अधिकाऱ्‍यांच्या घरांत जे काही होतं ते सगळं+ घेऊन अश्‍शूरच्या राजाला भेट म्हणून दिलं होतं. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. २२ आणि आपल्या संकटाच्या काळात तर आहाज राजा यहोवाशी आणखीनच अविश्‍वासूपणे वागला. २३ दिमिष्कच्या ज्या दैवतांनी त्याला हरवलं होतं,+ त्यांनाच तो बलिदानं अर्पण करू लागला.+ कारण तो म्हणाला: “सीरियाच्या लोकांचे देव त्यांना मदत करतात. तेव्हा मीसुद्धा त्यांना बलिदानं अर्पण करीन, म्हणजे ते मला मदत करतील.”+ पण ती दैवतं त्याच्या आणि संपूर्ण इस्राएलच्या नाशाचं कारण ठरली. २४ पुढे, आहाजने खऱ्‍या देवाच्या मंदिरातली भांडी गोळा केली आणि त्यांचे तुकडे-तुकडे केले.+ तसंच, त्याने यहोवाच्या मंदिराचे दरवाजे बंद करून टाकले+ आणि यरुशलेमच्या चौकाचौकांत स्वतःसाठी वेदी बांधल्या. २५ शिवाय, इतर दैवतांना बलिदानांचं हवन करण्यासाठी त्याने यहूदाच्या सगळ्या शहरांत उच्च स्थानंही बांधली.+ आणि असं करून त्याने आपल्या पूर्वजांच्या देवाचा, यहोवाचा क्रोध भडकवला.

२६ आहाजबद्दलची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सगळं यहूदाच्या आणि इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.+ २७ मग आहाजचा मृत्यू झाला* आणि त्याला यरुशलेम शहरात दफन करण्यात आलं. पण त्यांनी त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत दफन केलं नाही.+ मग त्याच्या जागी त्याचा मुलगा हिज्कीया हा राजा बनला.

२९ हिज्कीया+ राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता आणि त्याने २९ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अबीया असून ती जखऱ्‍याची मुलगी होती.+ २ आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच+ हिज्कीया यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ३ त्याने आपल्या शासनकाळाच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, यहोवाच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि ते दुरुस्त केले.+ ४ मग त्याने याजकांना आणि लेव्यांना पूर्वेकडे असलेल्या चौकात जमा केलं. ५ तो त्यांना म्हणाला: “लेव्यांनो! मी काय म्हणतो ते ऐका. स्वतःला शुद्ध करा.+ मग तुमच्या पूर्वजांच्या देवाचं, यहोवाचं मंदिर शुद्ध करा, आणि पवित्र स्थानात ज्या काही अशुद्ध गोष्टी आहेत त्या काढून टाका.+ ६ आपले वाडवडील अविश्‍वासूपणे वागले. त्यांनी आपला देव यहोवा याच्या नजरेत जे वाईट ते केलं+ आणि त्याला सोडून दिलं. त्यांनी यहोवाच्या उपासना मंडपापासून आपलं तोंड फिरवलं आणि आपल्या देवाकडे पाठ फिरवली.+ ७ त्यांनी मंदिराच्या द्वारमंडपाचे दरवाजे बंद केले+ आणि तिथले दिवे विझवून टाकले.+ इतकंच नाही, तर त्यांनी इस्राएलच्या देवासाठी पवित्र स्थानात धूप जाळायचं+ आणि होमार्पण द्यायचंही बंद केलं.+ ८ म्हणून यहूदावर आणि यरुशलेमवर यहोवाचा राग भडकलाय.+ आणि त्याने त्यांच्यावर असं संकट आणलंय, की जो कोणी ते पाहतो किंवा त्याबद्दल ऐकतो त्याला दहशत बसते आणि तो चकित होऊन त्यांची थट्टा करतो.* आणि हे सगळं तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहतच आहात.+ ९ आपले वाडवडीलही यामुळे तलवारीने मेले.+ आणि आपल्या बायका, मुलं व मुली हे सगळे बंदिवासात गेले.+ १० म्हणून आता मला, इस्राएलचा देव यहोवा याच्याशी एक करार करायची मनापासून इच्छा आहे.+ म्हणजे मग आपल्यावर भडकलेला त्याचा राग शांत होईल. ११ माझ्या मुलांनो, ही काही हातावर हात ठेवून बसण्याची* वेळ नाही. कारण यहोवाने तुम्हाला त्याच्यासमोर उभं राहून त्याची सेवा करायला+ आणि त्याच्यासाठी बलिदानांचं हवन करायला* निवडलंय.”+

१२ तेव्हा जे लेवी कामासाठी पुढे आले ते हे: कहाथच्या घराण्यातून+ अमासयचा मुलगा महथ आणि अजऱ्‍याचा मुलगा योएल; मरारीच्या घराण्यातून+ अब्दीचा मुलगा कीश आणि यहल्ललेलचा मुलगा अजऱ्‍या; आणि गेर्षोनच्या घराण्यातून+ जिम्माचा मुलगा यवाह आणि यवाहचा मुलगा एदेन; १३ एलसाफानच्या मुलांपैकी शिम्री आणि यऊवेल; आसाफच्या+ मुलांपैकी जखऱ्‍या आणि मत्तन्याह; १४ हेमानच्या मुलांपैकी+ यहीएल व शिमी; आणि यदूथूनच्या+ मुलांपैकी शमाया आणि उज्जियेल. १५ मग या लेव्यांनी आपल्या भाऊबंदांना एकत्र जमवलं. आणि यहोवाने सांगितल्याप्रमाणे राजाने जी आज्ञा दिली होती, त्यानुसार स्वतःला पवित्र करून ते यहोवाचं मंदिर शुद्ध करायला आले.+ १६ त्यानंतर यहोवाचं मंदिर शुद्ध करण्यासाठी याजक मंदिरात गेले. यहोवाच्या मंदिरात त्यांना ज्या काही अशुद्ध वस्तू सापडल्या त्या सगळ्या त्यांनी यहोवाच्या मंदिराच्या अंगणात आणल्या.+ तिथून मग लेव्यांनी त्या उचलून बाहेर किद्रोन खोऱ्‍यात नेल्या.+ १७ अशा प्रकारे, त्यांनी पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी यहोवाचं मंदिर पवित्र करायचं काम सुरू केलं. आणि त्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते मंदिराच्या द्वारमंडपापर्यंत आले.+ त्यांनी आणखी आठ दिवस यहोवाचं मंदिर पवित्र केलं, आणि पहिल्या महिन्याच्या १६ व्या दिवशी ते काम पूर्ण केलं.

१८ त्यानंतर ते हिज्कीया राजाकडे गेले आणि म्हणाले: “आम्ही यहोवाचं संपूर्ण मंदिर शुद्ध केलंय. आम्ही होमार्पणाची वेदी+ व त्याची सगळी भांडी+ आणि भाकरीची थप्पी* ठेवायचं मेज+ व त्याची सगळी भांडी शुद्ध केली आहेत. १९ आणि आहाज राजाने त्याच्या शासनकाळात देवाशी अविश्‍वासूपणे वागून जी सगळी भांडी बाजूला काढली होती,+ तीसुद्धा आम्ही तयार करून पवित्र केली आहेत.+ ती सर्व भांडी यहोवाच्या वेदीसमोर आहेत.”

२० मग हिज्कीया राजा सकाळी लवकर उठला आणि त्याने शहरातल्या सगळ्या अधिकाऱ्‍यांना एकत्र जमवलं. त्यानंतर ते सगळे यहोवाच्या मंदिरात गेले. २१ त्यांनी राज्यासाठी, मंदिरासाठी आणि यहूदासाठी पापार्पण म्हणून सात बैल, सात एडके, सात नर कोकरं आणि सात बकरे आणले.+ मग राजाने याजकांना, म्हणजे अहरोनच्या वंशजांना ते यहोवाच्या वेदीवर अर्पण करायला सांगितलं. २२ तेव्हा त्यांनी बैल कापले+ आणि याजकांनी त्यांचं रक्‍त घेऊन ते वेदीवर शिंपडलं.+ त्यानंतर त्यांनी एडके कापले आणि याजकांनी त्यांचं रक्‍त वेदीवर शिंपडलं. मग त्यांनी नर कोकरं कापली आणि याजकांनी त्यांचं रक्‍त वेदीवर शिंपडलं. २३ नंतर त्यांनी पापार्पणाचे बकरे राजापुढे आणि इस्राएलच्या मंडळीपुढे आणून त्यांच्यावर हात ठेवले. २४ मग याजकांनी बकरे कापले आणि ते पापार्पण म्हणून दिले. आणि संपूर्ण इस्राएलच्या प्रायश्‍चित्तासाठी त्यांनी त्यांचं रक्‍त वेदीवर शिंपडलं. कारण राजा म्हणाला होता, की होमार्पण आणि पापार्पण हे संपूर्ण इस्राएलसाठी देण्यात यावं.

२५ यादरम्यान हिज्कीयाने लेव्यांना झांजा, तंतुवाद्यं आणि वीणा* देऊन यहोवाच्या मंदिरात उभं केलं होतं.+ त्याने दावीद राजा,+ राजासाठी दृष्टान्त पाहणारा गाद+ आणि नाथान+ संदेष्टा यांनी लावून दिलेल्या व्यवस्थेनुसार त्यांना उभं केलं होतं. कारण यहोवानेच आपल्या संदेष्ट्यांद्वारे ही व्यवस्था लावून दिली होती. २६ अशा प्रकारे, लेवी हे दावीदने बनवलेली संगीत वाद्यं घेऊन उभे होते, तर याजक कर्णे घेऊन उभे होते.+

२७ मग हिज्कीयाने वेदीवर होमार्पण देण्याची आज्ञा केली.+ होमार्पण देण्याचं सुरू होताच यहोवासाठी गीत गायला सुरुवात झाली. आणि इस्राएलचा राजा दावीद याने बनवलेल्या वाद्यांच्या तालावर कर्णेही फुंकले जाऊ लागले. २८ आणि गीत गायलं जात असताना व कर्णे फुंकले जात असताना संपूर्ण मंडळीने नमन केलं. होमार्पण देऊन पूर्ण होईपर्यंत हे सगळं चालू राहिलं. २९ होमार्पण देऊन झाल्यावर, राजाने आणि त्याच्यासोबत असलेल्या सगळ्यांनी लगेच गुडघे टेकून नमन केलं. ३० मग हिज्कीयाने आणि सगळ्या अधिकाऱ्‍यांनी लेव्यांना दावीदची+ आणि दृष्टान्त पाहणाऱ्‍या आसाफची स्तोत्रं गाऊन यहोवाची स्तुती करायला सांगितलं.+ तेव्हा त्यांनी मोठ्या आनंदाने देवाची स्तुती केली आणि गुडघे टेकून त्याला नमन केलं.

३१ त्यानंतर हिज्कीया म्हणाला: “तुम्हाला यहोवासाठी वेगळं करण्यात आलंय, तर आता बलिदानं आणि आभार मानण्याची अर्पणं घेऊन यहोवाच्या मंदिरात या.” तेव्हा संपूर्ण मंडळी बलिदानं आणि आभार मानण्याची अर्पणं आणू लागली. आणि ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्या प्रत्येकाने होमार्पणं आणली.+ ३२ संपूर्ण मंडळीने यहोवासाठी जी होमार्पणं आणली, त्यांची संख्या ही: ७० बैल, १०० एडके आणि २०० नर कोकरं.+ ३३ तसंच पवित्र अर्पणांची संख्या ही: ६०० गुरंढोरं आणि ३,००० मेंढरं. ३४ पण होमार्पणांसाठी आणलेल्या सगळ्या प्राण्यांची कातडी काढायला पुरेसे याजक नव्हते. म्हणून काम संपेपर्यंत आणि इतर याजक स्वतःला शुद्ध करेपर्यंत+ त्यांच्या भावांनी, म्हणजे लेव्यांनी त्यांना मदत केली.+ कारण स्वतःला शुद्ध करण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी जास्त काळजी घ्यायचे. ३५ याशिवाय आणखी बरीच होमार्पणं,+ तसंच शांती-अर्पणांची चरबी+ आणि होमार्पणांसोबत अर्पण केली जाणारी पेयार्पणंही दिली गेली.+ अशा रितीने, यहोवाच्या मंदिराची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.* ३६ खऱ्‍या देवाने लोकांसाठी जे काही केलं होतं,+ त्यामुळे हिज्कीयाने आणि सर्व लोकांनी आनंदोत्सव केला. कारण हे सगळं खूप लवकर घडून आलं होतं.

३० हिज्कीयाने मग संपूर्ण इस्राएलच्या आणि यहूदाच्या लोकांना असा निरोप पाठवला,+ की त्यांनी इस्राएलचा देव यहोवा याच्यासाठी वल्हांडण सण साजरा करायला यरुशलेममध्ये यहोवाच्या मंदिरात यावं.+ त्याने एफ्राईमच्या आणि मनश्‍शेच्या लोकांनाही पत्रं लिहून हा निरोप कळवला.+ २ पण राजाने, अधिकाऱ्‍यांनी आणि यरुशलेममधल्या संपूर्ण मंडळीने दुसऱ्‍या महिन्यात वल्हांडण सण साजरा करायचं ठरवलं.+ ३ कारण, बऱ्‍याचशा याजकांनी आणि यरुशलेममध्ये जमलेल्या लोकांनी स्वतःला शुद्ध केलं नव्हतं.+ आणि त्यामुळे ते हा सण त्याच्या नेहमीच्या वेळेला पाळू शकले नव्हते.+ ४ दुसऱ्‍या महिन्यात सण पाळण्याचा हा विचार राजाला आणि संपूर्ण मंडळीला योग्य वाटला. ५ म्हणून मग त्यांनी बैर-शेबापासून दानपर्यंत+ संपूर्ण इस्राएलमध्ये अशी घोषणा करायचं ठरवलं, की सर्व लोकांनी यरुशलेममध्ये यावं आणि इस्राएलचा देव यहोवा याच्यासाठी वल्हांडण सण साजरा करावा. कारण, याआधी त्यांनी नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे एकत्र मिळून हा सण साजरा केला नव्हता.+

६ मग दूतांनी* राजाकडून आणि अधिकाऱ्‍यांकडून पत्रं घेतली, आणि राजाच्या आज्ञेप्रमाणे ते संपूर्ण इस्राएलच्या व यहूदाच्या प्रांतात गेले. ते लोकांना म्हणाले: “इस्राएलच्या लोकांनो! अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचा देव यहोवा याच्याकडे परत या. म्हणजे तुम्ही जे अश्‍शूरच्या राजांच्या हातून बचावले आहात, त्या तुमच्याकडे तोही परत येईल.+ ७ तुम्ही तुमच्या वाडवडिलांसारखं आणि भाऊबंदांसारखं वागू नका. ते त्यांच्या पूर्वजांचा देव यहोवा याच्याशी अविश्‍वासूपणे वागले. आणि म्हणून लोकांना दहशत बसेल अशी देवाने त्यांची अवस्था केली. आणि ही गोष्ट तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघतच आहात.+ ८ आता आपल्या वाडवडिलांसारखं अडेलपणे वागू नका.+ यहोवाच्या अधीन व्हा आणि जे मंदिर यहोवाने कायमसाठी पवित्र केलंय, तिथे येऊन तुमच्या देवाची उपासना करा.+ म्हणजे तुमच्यावर भडकलेला त्याचा क्रोध शांत होईल.+ ९ तुम्ही यहोवाकडे परत आलात, तर तुमच्या भावांना आणि मुलांना ज्या लोकांनी बंदी बनवून नेलंय ते त्यांना दया दाखवतील+ आणि त्यांना आपल्या देशात परत येऊ देतील.+ कारण तुमचा देव यहोवा हा करुणामय* आणि दयाळू आहे.+ म्हणून तुम्ही त्याच्याकडे परत आलात, तर तो तुमच्यापासून आपलं तोंड फिरवणार नाही.”+

१० अशा प्रकारे ते दूत एफ्राईमच्या आणि मनश्‍शेच्या प्रदेशांतल्या प्रत्येक शहरांत गेले,+ इतकंच नाही तर ते जबुलूनच्या प्रदेशातही गेले. पण लोक त्यांच्यावर हसले आणि त्यांनी त्यांची थट्टा केली.+ ११ मात्र आशेर, मनश्‍शे आणि जबुलून इथले काही लोक नम्र होऊन यरुशलेमला आले.+ १२ यहोवाच्या वचनानुसार राजाने आणि अधिकाऱ्‍यांनी जी आज्ञा दिली होती, ती पाळण्यासाठी लोकांनी एक व्हावं,* म्हणून खऱ्‍या देवाचा आशीर्वादही यहूदावर होता.

१३ मग, दुसऱ्‍या महिन्यात+ बेखमीर* भाकरीचा सण+ पाळण्यासाठी मोठ्या संख्येने लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले; लोकांचा तो जमाव खरंच खूप मोठा होता. १४ त्यांनी यरुशलेममधल्या वेदी काढून टाकल्या.+ तसंच, त्यांनी सगळ्या धूप-वेदीही काढून टाकल्या+ आणि किद्रोन खोऱ्‍यात फेकून दिल्या. १५ दुसऱ्‍या महिन्याच्या १४ व्या दिवशी त्यांनी वल्हांडणाचा पशू कापून त्याचं बलिदान दिलं. याजकांना व लेव्यांना स्वतःची लाज वाटली, म्हणून त्यांनी स्वतःला शुद्ध केलं आणि ते यहोवाच्या मंदिरात होमार्पणं घेऊन आले. १६ आणि खऱ्‍या देवाचा माणूस मोशे याच्या नियमशास्त्राप्रमाणे, ते त्यांच्या ठरवून दिलेल्या जागी उभे राहिले. मग याजकांनी लेव्यांच्या हातून बलिदानांचं रक्‍त घेतलं आणि ते वेदीवर शिंपडलं.+ १७ जमलेल्या लोकांमध्ये असे बरेच लोक होते ज्यांनी स्वतःला शुद्ध केलं नव्हतं. त्यांनी यहोवासमोर पवित्र व्हावं, म्हणून त्यांच्या वतीने वल्हांडणाच्या बलिदानाचे पशू कापण्याची जबाबदारी लेव्यांवर होती.+ १८ बऱ्‍याच लोकांनी, खासकरून एफ्राईम, मनश्‍शे,+ इस्साखार आणि जबुलून इथल्या लोकांनी स्वतःला शुद्ध केलं नव्हतं, तरीसुद्धा ते वल्हांडणाचं भोजन करत होते. पण ही गोष्ट नियमशास्त्राच्या विरोधात होती. म्हणून हिज्कीयाने त्यांच्यासाठी अशी प्रार्थना केली: “हे यहोवा देवा, तू चांगला आहेस.+ तू अशा प्रत्येकाला क्षमा कर, १९ ज्याने पवित्रतेच्या नियमानुसार स्वतःला शुद्ध केलेलं नाही;+ पण आपल्या पूर्वजांच्या खऱ्‍या देवाला, यहोवाला शोधण्यासाठी आपलं मन तयार केलंय.”+ २० यहोवाने हिज्कीयाची ही विनंती मान्य करून लोकांना क्षमा केली.*

२१ यरुशलेममध्ये असलेल्या लोकांनी सात दिवस बेखमीर भाकरीचा सण+ मोठ्या आनंदाने साजरा केला.+ आणि लेवी व याजक दररोज यहोवासाठी मोठ्याने वाद्यं वाजवून यहोवाची स्तुती करत होते.+ २२ याशिवाय हिज्कीयाने, यहोवाची समंजसपणे सेवा करणाऱ्‍या सगळ्या लेव्यांशी बोलून त्यांना प्रोत्साहन दिलं. आणि सणाच्या त्या सात दिवसांदरम्यान त्यांनी खाणंपिणं केलं,+ शांती-अर्पणं वाहिली+ आणि आपल्या पूर्वजांच्या देवाचे, यहोवाचे आभार मानले.

२३ त्यानंतर संपूर्ण मंडळीने आणखी सात दिवस सण पाळायचं ठरवलं. म्हणून मग त्या सर्वांनी आणखी सात दिवस मोठ्या आनंदाने सण साजरा केला.+ २४ यहूदाचा राजा हिज्कीया याने मंडळीसाठी १,००० बैल व ७,००० मेंढरं दिली. तसंच, अधिकाऱ्‍यांनीसुद्धा मंडळीसाठी १,००० बैल व १०,००० मेंढरं दिली.+ आणि अनेक याजक स्वतःला शुद्ध करत होते.+ २५ यहूदाची संपूर्ण मंडळी, याजक, लेवी आणि तिथे राहणारे विदेशी लोक; तसंच, इस्राएलमधून आलेली सगळी मंडळी+ आणि तिथून आलेले विदेशी लोक+ हे सर्व आनंदोत्सव करत राहिले. २६ इस्राएलचा राजा दावीद याच्या मुलाच्या, म्हणजे शलमोनच्या काळापासून आतापर्यंत यरुशलेममध्ये असं कधीही झालं नव्हतं. म्हणून यरुशलेममध्ये लोक मोठा जल्लोष करत होते.+ २७ शेवटी, लेवी वंशातल्या याजकांनी उभं राहून लोकांना आशीर्वाद दिला;+ आणि त्यांची प्रार्थना पवित्र निवासस्थानात, म्हणजे स्वर्गात पोहोचली आणि देवाने ती ऐकली.

३१ मग सण साजरा केल्यावर, तिथे हजर असलेले सर्व इस्राएली लोक यहूदातल्या शहरांमध्ये गेले. त्यांनी यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्‍शे यांच्या संपूर्ण प्रदेशात जाऊन+ तिथल्या पूजेच्या स्तंभांचा चुराडा केला.+ तसंच, त्यांनी पूजेचे खांब* तोडून टाकले+ आणि उच्च स्थानं*+ व वेदी पाडून टाकल्या.+ या सगळ्यांचा पूर्णपणे नाश केल्यानंतर सर्व इस्राएली लोक आपापल्या शहरांत आपापल्या घरी निघून गेले.

२ मग हिज्कीयाने याजकांना आणि लेव्यांना त्यांच्या-त्यांच्या गटांमध्ये संघटित केलं.+ त्याने त्यांना आपली नेमून दिलेली सेवा पूर्ण करण्यासाठी,+ म्हणजे होमार्पणं आणि शांती-अर्पणं देण्यासाठी; तसंच, यहोवाच्या मंदिराच्या अंगणांच्या दरवाजांजवळ सेवा करण्यासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी आणि त्याची स्तुती करण्यासाठी संघटित केलं.+ ३ इतकंच नाही, तर यहोवाच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या होमार्पणांसाठी राजाने स्वतःच्या संपत्तीतून काही भाग दिला;+ त्याने सकाळी व संध्याकाळी दिल्या जाणाऱ्‍या होमार्पणांसाठी,+ तसंच शब्बाथाच्या दिवशी,+ नवचंद्राच्या दिवशी+ आणि सणांच्या दिवशी+ दिल्या जाणाऱ्‍या होमार्पणांसाठी स्वतःच्या संपत्तीतून काही भाग दिला.

४ याशिवाय, राजाने यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांना अशी आज्ञा दिली, की त्यांनी याजकांना आणि लेव्यांना त्यांच्या हक्काचा भाग द्यावा.+ म्हणजे त्यांना यहोवाच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करता येईल.* ५ राजाचा हुकूम निघताच, इस्राएली लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या पहिल्या उत्पन्‍नातलं धान्य, नवीन द्राक्षारस, तेल,+ मध आणि शेतातलं बाकीचं पीक आणलं.+ त्यांनी सगळ्या गोष्टींचा दहावा भाग* आणला आणि अशा रितीने भरपूर दान दिलं.+ ६ यहूदाच्या शहरांमध्ये राहणारे यहूदाचे आणि इस्राएलचे लोक यांनीसुद्धा आपल्या गुराढोरांतून आणि मेंढरांतून दहावा भाग आणला. यासोबतच त्यांनी त्यांचा देव यहोवा याच्यासाठी समर्पित केलेल्या पवित्र गोष्टींमधलाही दहावा भाग आणला.+ आणि या सगळ्या गोष्टी दान करून त्यांनी त्यांचे ढिगच्या ढीग रचले. ७ त्यांनी हे दान तिसऱ्‍या महिन्यात+ द्यायला सुरू केलं, आणि सातव्या महिन्यात+ संपवलं. ८ हिज्कीयाने आणि बाकीच्या अधिकाऱ्‍यांनी येऊन जेव्हा दानांचे ढिगारे पाहिले, तेव्हा त्यांनी यहोवाची स्तुती केली आणि इस्राएलच्या लोकांना आशीर्वाद दिला.

९ हिज्कीयाने याजकांना आणि लेव्यांना त्या ढिगाऱ्‍यांबद्दल विचारलं, १० तेव्हा सादोकच्या घराण्यातला मुख्य याजक अजऱ्‍या त्याला म्हणाला: “लोक यहोवाच्या मंदिरात दान आणू लागले,+ तेव्हापासून लोकांना पोटभर खायला मिळतंय आणि भरपूर उरतंयसुद्धा. यहोवाने त्याच्या लोकांना आशीर्वाद दिलाय आणि म्हणून इतकं सगळं उरलंय.”+

११ त्यावर हिज्कीयाने त्यांना यहोवाच्या मंदिरात कोठारं* तयार करायला सांगितली,+ आणि त्यांनी ती तयार केली. १२ ते विश्‍वासूपणे दहावा भाग*+ आणि दान, तसंच पवित्र गोष्टी आत आणत होते. आणि या सगळ्या गोष्टींवर देखरेख करण्यासाठी कोनन्या लेवी याला अधिकारी म्हणून नेमण्यात आलं होतं. त्याच्या खालोखाल त्याचा भाऊ शिमी हा होता. १३ हिज्कीया राजाच्या आज्ञेवरून कोनन्या आणि त्याचा भाऊ शिमी यांचे सहायक म्हणून ज्यांना नेमण्यात आलं ते हे: यहीएल, अजज्या, नहाथ, असाएल, यरीमोथ, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महथ व बनाया. अजऱ्‍या हा खऱ्‍या देवाच्या मंदिराची देखरेख करणारा अधिकारी होता. १४ पूर्वेकडच्या दरवाजावरचा द्वारपाल,+ म्हणजे लेवी इम्नाहचा मुलगा कोरे हा खऱ्‍या देवासाठी स्वेच्छेने दिलेल्या अर्पणांची देखरेख करणारा होता.+ तसंच, यहोवाला दिलेलं दान आणि परमपवित्र गोष्टी वाटून देण्याची जबाबदारीही+ त्याच्यावर होती.+ १५ त्याच्या हाताखाली याजकांच्या शहरांमध्ये एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमऱ्‍या आणि शखन्याह ही माणसं होती.+ ती भरवशालायक असून त्यांच्यावर, वेगवेगळ्या गटांत काम करणाऱ्‍या आपल्या सर्व भाऊबंदांना एकसारखा हिस्सा वाटून देण्याची जबाबदारी होती;+ मग त्यांचे भाऊबंद लहान असोत किंवा मोठे. १६ यांच्या शिवाय, वंशावळीत ज्यांची नावं लिहिण्यात आली होती, आणि जे आपापल्या गटाच्या क्रमानुसार दररोज यहोवाच्या मंदिरात येऊन सेवा करायचे, त्यांनाही त्यांचा हिस्सा देण्याची जबाबदारी या माणसांवर होती. यासोबतच, वंशावळीत नोंद असलेल्या तीन वर्षांच्या व त्याहून जास्त वयाच्या मुलांनाही ते हिस्सा द्यायचे.

१७ याजकांची आणि २० वर्षं व त्याहून जास्त वय असलेल्या लेव्यांच्या नावांची नोंद,+ वंशावळीमध्ये त्यांच्या घराण्यांप्रमाणे+ आणि त्यांच्या गटांच्या जबाबदाऱ्‍यांप्रमाणे करण्यात आली होती.+ १८ वंशावळीत त्यांच्या मुला-मुलींची, बायकांची आणि त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची नावंही नोंदवण्यात आली होती. (त्यांच्यावर पवित्र कामांच्या जबाबदाऱ्‍या सोपवण्यात आल्या होत्या, म्हणून स्वतःला पवित्र ठेवण्याची ते नेहमी काळजी घ्यायचे.) १९ या वंशावळीत अहरोनच्या वंशजांची, म्हणजे आपापल्या शहरांच्या आसपासच्या प्रदेशांत राहणाऱ्‍या याजकांचीही नावं नोंदवण्यात आली होती.+ त्या सगळ्या शहरांमधून काही माणसांना निवडण्यात आलं होतं. आणि त्यांच्यावर याजकांना आणि लेव्यांच्या वंशावळीत नावं असलेल्या सर्वांना त्यांचा हिस्सा वाटून देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

२० हिज्कीयाने संपूर्ण यहूदामध्ये ही व्यवस्था लावून दिली. आणि तो आपला देव यहोवा याच्या नजरेत जे चांगलं आणि जे योग्य ते करत राहिला व त्याला विश्‍वासू राहिला. २१ हिज्कीयाने आपल्या देवाची उपासना करण्यासाठी जे काही काम हाती घेतलं, मग ते खऱ्‍या देवाच्या मंदिरातल्या सेवेच्या बाबतीत असो+ किंवा नियमशास्त्र व त्यात दिलेल्या आज्ञा पाळण्याच्या बाबतीत असो, ते सगळं त्याने पूर्ण मनाने केलं, आणि तो यशस्वी झाला.

३२ हिज्कीयाने या सगळ्या गोष्टी विश्‍वासूपणे पूर्ण केल्यानंतर,+ अश्‍शूरचा राजा सन्हेरीब याने येऊन यहूदावर हल्ला केला. तिथल्या तटबंदीच्या शहरांत घुसून ती काबीज करण्यासाठी त्याने त्या शहरांना वेढा घातला.+

२ हिज्कीयाने जेव्हा पाहिलं, की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमवर हल्ला करण्याचा त्याचा विचार आहे, ३ तेव्हा त्याने अधिकाऱ्‍यांशी आणि योद्ध्यांशी सल्लामसलत करून शहराबाहेर असलेले पाण्याचे झरे बुजवून टाकायचं ठरवलं.+ आणि या बाबतीत त्यांनी त्याला साथ दिली. ४ मग बरेच लोक एकत्र जमले आणि त्यांनी त्या प्रदेशातून वाहणारे सगळे झरे आणि ओढे बुजवून टाकले. ते म्हणाले: “अश्‍शूरचे राजे आले, तर त्यांना इथे पाणी मिळायला नको.”

५ शिवाय, शहराच्या भिंतीचा जो भाग पडला होता तो बांधून काढण्याचाही हिज्कीयाने निश्‍चय केला. त्याने तो सगळा भाग पुन्हा बांधून काढला आणि त्यावर बुरूज बांधले. तसंच, त्याने बाहेरच्या बाजूने आणखी एक भिंत उभी केली. यासोबतच, हिज्कीयाने दावीदपुरात असलेली टेकडीही* दुरुस्त केली.+ आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रं व ढाली बनवल्या. ६ त्यानंतर, त्याने लोकांवर सेनाधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या दरवाजाजवळ असलेल्या चौकात एकत्र जमवलं. मग त्यांना धीर देत तो म्हणाला: ७ “हिंमत धरा! खंबीर व्हा! अश्‍शूरच्या राजाला आणि त्याच्या सैन्याला घाबरू नका किंवा भिऊ नका.+ कारण त्याच्यासोबत जितके आहेत त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत.+ ८ त्याचा भरवसा मनुष्याच्या बळावर आहे, पण आपला भरवसा आपला देव यहोवा याच्यावर आहे. तोच आपल्याला मदत करेल आणि आपल्यासाठी लढेल.”+ तेव्हा लोकांना यहूदाचा राजा हिज्कीया याच्या शब्दांमुळे हिंमत मिळाली.+

९ अश्‍शूरचा राजा सन्हेरीब हा आपलं सगळं सैन्यबळ घेऊन लाखीशमध्ये+ होता, तेव्हा त्याने आपल्या सेवकांच्या हातून यरुशलेममध्ये यहूदाचा राजा हिज्कीया याला आणि तिथल्या सगळ्या यहुदी लोकांना असा निरोप पाठवला:+

१० “अश्‍शूरचा राजा सन्हेरीब म्हणतो: ‘यरुशलेमला वेढा पडलेला असताना, तुम्ही कोणाच्या भरवशावर तिथे राहताय?+ ११ हिज्कीया तुम्हाला फसवतोय. “आपला देव यहोवा आपल्याला अश्‍शूरच्या राजाच्या हातून वाचवेल,” असं सांगून तो तुम्हाला भुकेने आणि तहानेने मरायला लावतोय.+ १२ हा तोच हिज्कीया आहे ना, ज्याने तुमच्या देवाची उच्च स्थानं+ आणि वेदी काढून टाकल्या?+ आणि मग यहूदाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना म्हणाला, की “तुम्ही फक्‍त एकाच वेदीपुढे नमन केलं पाहिजे आणि त्यावरच बलिदानांचं हवन केलं पाहिजे”?+ १३ मी आणि माझ्या पूर्वजांनी इतर देशांच्या लोकांचं काय केलं, हे तुम्हाला माहीत नाही का?+ त्या देशांतल्या लोकांचे देव त्यांना माझ्या हातून वाचवू शकले का?+ १४ माझ्या पूर्वजांनी ज्या राष्ट्रांचा सर्वनाश केला, त्या राष्ट्रांतला कोणताही देव त्याच्या लोकांना माझ्या हातून वाचवू शकला नाही. मग तुमचा देव तुम्हाला माझ्या तावडीतून कसा काय वाचवू शकेल?+ १५ हिज्कीयाला तुमची फसवणूक किंवा दिशाभूल करू देऊ नका!+ त्याच्यावर भरवसा ठेवू नका. कारण कोणत्याही राष्ट्राचा किंवा राज्याचा देव त्याच्या लोकांना माझ्या आणि माझ्या पूर्वजांच्या हातून सोडवू शकलेला नाही. तर मग तुमचा देव कसा काय तुम्हाला माझ्या हातून सोडवेल?’”+

१६ सन्हेरीबच्या सेवकांनी तर खरा देव यहोवा आणि त्याचा सेवक हिज्कीया यांची आणखीनच जास्त निंदा केली. १७ सन्हेरीबने इस्राएलचा देव यहोवा याची निंदा करण्यासाठी+ आणि त्याच्या विरोधात बोलण्यासाठी पत्रंही लिहिली.+ त्यात तो म्हणाला: “इतर देशांचे देव जसं त्यांच्या लोकांना माझ्या हातून सोडवू शकले नाहीत,+ तसंच हिज्कीयाचा देवसुद्धा त्याच्या लोकांना माझ्या हातून सोडवू शकणार नाही.” १८ सन्हेरीबचे सेवक यरुशलेम शहराच्या भिंतीवर असलेल्या लोकांशी, मोठमोठ्याने यहुदी लोकांच्या भाषेत बोलत राहिले. लोकांना घाबरवण्याचा आणि त्यांच्या मनात दहशत निर्माण करून शहर काबीज करण्याचा त्यांचा हेतू होता.+ १९ ते पृथ्वीवरच्या राष्ट्रांच्या देवांबद्दल, म्हणजे माणसांनी बनवलेल्या देवांबद्दल जसं वाईट बोलले, तसंच यरुशलेमच्या देवाबद्दल बोलले. २० पण हिज्कीया राजा आणि आमोजचा मुलगा, म्हणजे यशया संदेष्टा+ हे दोघं याविषयी स्वर्गातल्या देवाकडे प्रार्थना करत राहिले आणि त्याच्याकडे मदतीसाठी धावा करत राहिले.+

२१ मग यहोवाने एक स्वर्गदूत पाठवला आणि अश्‍शूरच्या राजाच्या छावणीतल्या प्रत्येक शूर योद्ध्याला, प्रमुखाला आणि अधिकाऱ्‍याला मारून टाकलं.+ म्हणून अश्‍शूरचा राजा अपमानित होऊन आपल्या देशात परत गेला. नंतर जेव्हा तो त्याच्या देवाच्या मंदिरात गेला, तेव्हा त्याच्या स्वतःच्याच काही मुलांनी त्याला तलवारीने मारून टाकलं.+ २२ अशा प्रकारे, यहोवाने हिज्कीयाला आणि यरुशलेमच्या सगळ्या लोकांना अश्‍शूरचा राजा सन्हेरीब याच्या हातून वाचवलं. तसंच, त्याने आजूबाजूच्या सर्व शत्रूंपासूनही त्यांना सोडवलं आणि विसावा दिला. २३ मग पुष्कळ लोकांनी यरुशलेममध्ये यहोवासाठी भेटी आणल्या आणि यहूदाचा राजा हिज्कीया याच्यासाठीही अनेक मौल्यवान वस्तू आणल्या.+ यानंतर सर्व राष्ट्रं हिज्कीयाला खूप मान देऊ लागली.

२४ त्या काळात, हिज्कीया फार आजारी पडला आणि मरणाला टेकला. तेव्हा त्याने यहोवाला प्रार्थना केली+ आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकून त्याला एक चिन्ह दिलं.+ २५ पण हिज्कीयाने आपल्यावर झालेल्या उपकाराची जाणीव ठेवली नाही, कारण त्याचं मन गर्विष्ठ झालं होतं. आणि त्यामुळे त्याच्यावर, यहूदावर आणि यरुशलेमवर देवाचा क्रोध भडकला. २६ पण हिज्कीयाने स्वतःला नम्र केलं आणि आपला गर्विष्ठपणा सोडून दिला.+ तसंच, यरुशलेमचे लोकही नम्र बनले. आणि म्हणून हिज्कीयाच्या शासनकाळात यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला नाही.+

२७ हिज्कीया अतिशय श्रीमंत आणि वैभवशाली बनला.+ त्याने आपल्याकडे असलेलं सोनं, चांदी, मौल्यवान रत्नं, बाल्सम* तेल, ढाली आणि सर्व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी भांडारं बांधली.+ २८ तसंच त्याने धान्य, नवा द्राक्षारस आणि तेल ठेवण्यासाठीही कोठारं बांधली. यासोबतच, त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरांसाठी आणि शेरडामेंढरांसाठी तबेले व मेंढवाडे बांधले. २९ शिवाय, त्याने स्वतःसाठी अनेक शहरं बांधली. आणि भरपूर गुरंढोरं व शेरडामेंढरांचे कळप जमवले, कारण देवाने त्याला पुष्कळ धनसंपत्ती दिली होती. ३० हिज्कीयानेच गीहोनच्या+ वरच्या पाटाचं पाणी अडवून+ ते सरळ खाली दावीदपुराच्या+ पश्‍चिमेकडे आणलं. त्याने जे काही काम हाती घेतलं त्यात त्याला यश मिळत गेलं. ३१ पण, बाबेलच्या* अधिकाऱ्‍यांनी जेव्हा हिज्कीयाच्या देशात घडलेल्या चिन्हाबद्दल+ विचारायला आपले दूत त्याच्याकडे पाठवले,+ तेव्हा देवाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी+ आणि त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याला एकटं सोडलं.+

३२ हिज्कीयाबद्दलची बाकीची माहिती आणि त्याचं एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्‍या कार्यांबद्दलची माहिती+ ही आमोजच्या मुलाच्या, म्हणजे यशया+ संदेष्ट्याच्या दृष्टान्तांच्या अहवालात लिहिण्यात आली आहे. तसंच, यहूदाचे आणि इस्राएलचे राजे यांच्या इतिहासाच्या पुस्तकातही ती लिहिण्यात आली आहे.+ ३३ नंतर हिज्कीयाचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदच्या मुलांच्या कबरींकडे जाणाऱ्‍या टेकडीच्या चढावर पुरण्यात आलं;+ यहूदा आणि यरुशलेमच्या सगळ्या लोकांनी मोठ्या सन्मानाने त्याला दफन केलं. मग त्याच्या जागी त्याचा मुलगा मनश्‍शे राजा बनला.

३३ मनश्‍शे+ राजा बनला तेव्हा तो १२ वर्षांचा होता. आणि त्याने ५५ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+

२ मनश्‍शेने यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं. यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांमधून घालवून दिलं होतं, त्यांच्या घृणास्पद चालीरितींचं त्याने अनुसरण केलं.+ ३ त्याचे वडील हिज्कीया यांनी उपासनेची जी उच्च स्थानं* पाडून टाकली होती, ती त्याने पुन्हा बांधली.+ तसंच, त्याने बआल दैवतांसाठी वेदी बांधल्या आणि पूजेचे खांब* बनवले. त्याने आकाशातल्या सगळ्या सैन्याला नमन केलं आणि त्यांची उपासना केली.+ ४ यहोवा ज्या मंदिराबद्दल असं म्हणाला होता, की “यरुशलेम हे कायम माझ्या नावाने ओळखलं जाईल,”+ त्या यहोवाच्या मंदिरात त्याने वेदी बांधल्या.+ ५ तसंच, यहोवाच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत+ त्याने आकाशातल्या सगळ्या सैन्यासाठी वेदी बांधल्या. ६ मनश्‍शेने ‘हिन्‍नोम वंशजांच्या खोऱ्‍यात’+ आपल्या स्वतःच्या मुलांचा अग्नीत होम केला.*+ याशिवाय, त्याने जादूटोणा केला,+ शकुन पाहिले, भूतविद्येची कामं केली आणि भूतविद्या करणाऱ्‍यांना व ज्योतिष्यांना नेमलं.+ त्याने फार मोठ्या प्रमाणात यहोवाच्या नजेरत जे वाईट ते केलं आणि त्याचा क्रोध भडकवला.

७ तसंच, आपण बनवलेली कोरीव मूर्तीही त्याने खऱ्‍या देवाच्या मंदिरात ठेवली.+ देव या मंदिराविषयी दावीद आणि त्याचा मुलगा शलमोन यांना म्हणाला होता: “हे मंदिर, आणि इस्राएलच्या सर्व वंशांतून मी निवडलेलं यरुशलेम, कायम माझ्या नावाने ओळखलं जाईल.+ ८ आणि जो देश मी इस्राएली लोकांच्या पूर्वजांना दिला होता, त्यातून मी पुन्हा कधीही त्यांना बाहेर काढणार नाही. पण त्यासाठी त्यांनी माझ्या सगळ्या आज्ञांचं, म्हणजे मोशेद्वारे दिलेल्या संपूर्ण नियमशास्त्राचं, कायद्यांचं आणि न्याय-निर्णयांचं* काळजीपूर्वक पालन करणं गरजेचं आहे.” ९ मनश्‍शे यहूदाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना बहकवत राहिला; यहोवाने ज्या राष्ट्रांचा इस्राएली लोकांसमोर सर्वनाश केला होता, त्यांच्यापेक्षाही जास्त वाईट कामं करायला लावून त्याने त्यांना बहकवलं.+

१० यहोवा मनश्‍शेसोबत आणि त्याच्या लोकांसोबत बोलत राहिला, पण त्यांनी मुळीच लक्ष दिलं नाही.+ ११ म्हणून यहोवाने अश्‍शूरच्या राजांच्या सेनाधिकाऱ्‍यांना त्याच्यावर हल्ला करायला लावलं. त्यांनी मनश्‍शेला आकड्यांनी पकडलं* आणि त्याला तांब्याच्या बेड्या घालून बाबेलला नेलं. १२ आपल्या या दुःखाच्या काळात मनश्‍शेने त्याचा देव यहोवा याच्याकडे दयेची भीक मागितली. आणि तो त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर फार नम्र बनला. १३ तो देवाला प्रार्थना करत राहिला. आणि देवाला त्याची दया आली. देवाने त्याची कृपेची विनंती ऐकून यरुशलेममध्ये त्याचं राज्यपद त्याला परत दिलं.+ तेव्हा मनश्‍शेला समजलं, की यहोवा हाच खरा देव आहे.+

१४ त्यानंतर, मनश्‍शेने दावीदपुरासाठी खोऱ्‍यात असलेल्या गीहोनच्या+ पश्‍चिमेकडे बाहेरून एक अतिशय उंच भिंत बांधली.+ ही भिंत ‘मासे फाटकापर्यंत,’+ आणि तिथून पुढे शहराला वळसा घालून ओफेलपर्यंत बांधण्यात आली.+ याशिवाय, त्याने यहूदातल्या सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये सेनाधिकारी नेमले. १५ मग त्याने परक्या दैवतांच्या मूर्ती व यहोवाच्या मंदिरातल्या मूर्ती काढून शहराबाहेर फेकून दिल्या.+ यासोबतच, त्याने यहोवाच्या मंदिराच्या डोंगरावर आणि यरुशलेममध्ये ज्या वेदी बांधल्या होत्या+ त्याही काढून शहराबाहेर फेकून दिल्या. १६ त्याने यहोवाची वेदीसुद्धा दुरुस्त केली+ आणि तिच्यावर तो शांती-अर्पणं+ व आभाराची अर्पणं देऊ लागला.+ त्याने यहूदाच्या लोकांना इस्राएलचा देव यहोवा याची उपासना करायला सांगितलं. १७ लोक जरी आपला देव यहोवा यालाच बलिदानं अर्पण करत असले, तरी ते ही बलिदानं अजूनही उच्च स्थानांवर* देत होते.

१८ मनश्‍शेबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने देवाला केलेली प्रार्थना आणि इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाने दृष्टान्त पाहणारे त्याच्याशी जे काही बोलले, ते सगळं इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. १९ याशिवाय, त्याची प्रार्थना+ आणि ती कशा प्रकारे मान्य करण्यात आली याविषयीची माहिती; तसंच त्याने केलेली सगळी पापं व त्याचा अविश्‍वासूपणा+ यांविषयीची सर्व माहिती त्याच्या दृष्टान्त पाहणाऱ्‍यांच्या लिखाणांत नमूद आहे. यासोबतच, त्याने जिथे-जिथे उच्च स्थानं बांधली व पूजेचे खांब* उभे केले+ त्या ठिकाणांबद्दलची माहिती आणि नम्र होण्याआधी त्याने बनवलेल्या कोरीव मूर्तींबद्दलची माहितीसुद्धा त्या लिखाणांत नमूद आहे. २० मग मनश्‍शेचा मृत्यू झाला* आणि त्यांनी त्याला त्याच्या राजमहालाजवळ दफन केलं. त्याच्यानंतर, त्याचा मुलगा आमोन हा राजा बनला.+

२१ आमोन+ राजा बनला तेव्हा तो २२ वर्षांचा होता. आणि त्याने दोन वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ २२ आपले वडील मनश्‍शे यांच्याप्रमाणेच आमोन हा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ मनश्‍शेने ज्या कोरीव मूर्ती बनवल्या होत्या, त्या सगळ्यांना आमोन बलिदानं अर्पण करत राहिला+ आणि त्यांची सेवा करत राहिला. २३ पण त्याचे वडील मनश्‍शे यांच्याप्रमाणे+ तो यहोवासमोर नम्र झाला नाही.+ उलट, त्याने आणखी जास्त पापं केली. २४ पुढे आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुद्ध कट रचून+ त्याच्याच महालात त्याला ठार मारलं. २५ पण देशातल्या लोकांनी आमोन राजाविरुद्ध कट रचणाऱ्‍या सगळ्यांना मारून टाकलं+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा योशीया+ याला राजा बनवलं.

३४ योशीया+ राजा बनला तेव्हा तो आठ वर्षांचा होता आणि त्याने ३१ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ २ त्याने यहोवाच्या नजरेत जे योग्य ते केलं. तो आपला पूर्वज दावीद याच्या सर्व मार्गांप्रमाणे चालला; त्यांपासून तो भरकटला नाही.

३ योशीया आपल्या शासनकाळाच्या आठव्या वर्षी, म्हणजे वयाने लहान असतानाच आपला पूर्वज दावीद याच्या देवाची सेवा करू लागला.+ मग, आपल्या शासनकाळाच्या १२ व्या वर्षी त्याने यहूदा आणि यरुशलेममधून उपासनेची उच्च स्थानं,*+ पूजेचे खांब,* कोरलेल्या मूर्ती+ आणि धातूच्या मूर्ती* काढायला सुरुवात केली.+ ४ पुढे लोकांनी योशीयासमोर बआलच्या वेदी पाडून टाकल्या. आणि योशीयाने त्यांवर असलेले धूपस्तंभ तोडून टाकले. तसंच त्याने पूजेचे खांब,* कोरलेल्या मूर्ती आणि धातूच्या मूर्तीही* तोडून टाकल्या आणि त्यांचा चुराडा केला. मग त्याने तो चुरा मूर्तींना बलिदानं अर्पण करणाऱ्‍या लोकांच्या कबरींवर फेकून दिला.+ ५ आणि त्यांच्या वेदींवर त्याने पुजाऱ्‍यांची हाडं जाळून टाकली.+ अशा प्रकारे, त्याने यहूदा आणि यरुशलेम शुद्ध केलं.

६ मग त्याने मनश्‍शे, एफ्राईम,+ शिमोन या प्रदेशांतल्या शहरांपासून थेट नफताली प्रदेशातल्या शहरांपर्यंत, आणि त्यांच्या आजूबाजूच्या उद्ध्‌वस्त झालेल्या भागांतही तेच केलं. ७ त्याने तिथल्या वेदी पाडून टाकल्या आणि पूजेचे खांब* व कोरलेल्या मूर्ती तोडून त्यांचा चुराडा केला.+ तसंच, त्याने इस्राएल देशातले सगळे धूपस्तंभही तोडून टाकले.+ त्यानंतर तो यरुशलेमला परत गेला.

८ मग आपल्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी, म्हणजे संपूर्ण देश आणि मंदिर शुद्ध केल्यानंतर, योशीयाने असल्याहचा मुलगा शाफान,+ इतिहास-लेखक असलेला योवाहाजचा मुलगा यवाह आणि शहराचा प्रमुख मासेया यांना आपला देव यहोवा याच्या मंदिराची दुरुस्ती करायला पाठवलं.+ ९ ते हिल्कीया महायाजकाकडे आले आणि त्यांनी त्याला देवाच्या मंदिरात गोळा झालेला सगळा पैसा दिला. हा पैसा, द्वारपाल म्हणून सेवा करणाऱ्‍या लेव्यांनी मनश्‍शे, एफ्राईम आणि इस्राएलच्या बाकीच्या प्रदेशांतल्या लोकांकडून;+ तसंच यहूदा, बन्यामीन आणि यरुशलेमच्या लोकांकडून गोळा केला होता. १० मग त्यांनी हा पैसा यहोवाच्या मंदिराच्या कामाची देखरेख करणाऱ्‍या माणसांना दिला. पुढे त्यांनी तो पैसा कामगारांना दिला आणि कामगारांनी तो यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती व डागडुजी करण्यासाठी वापरला. ११ देखरेख करणाऱ्‍या माणसांनी हा पैसा कारागिरांना आणि बांधकाम करणाऱ्‍यांना, घडवलेले दगड आणि टेकाव्यांसाठी लाकडं विकत घ्यायला दिला. तसंच, यहूदाच्या राजांनी दुर्लक्ष केल्यामुळे ज्या इमारती उद्ध्‌वस्त झाल्या होत्या, त्या बांधून काढायला आणि त्यांसाठी लागणाऱ्‍या तुळया* विकत घ्यायलाही त्यांनी तो पैसा त्यांना दिला.+

१२ त्या माणसांनी प्रामाणिकपणे काम केलं.+ त्यांच्या कामाची देखरेख करण्यासाठी जे लेवी नेमण्यात आले होते ते हे: मरारीच्या घराण्यातले+ यहथ आणि ओबद्या; कहाथच्या घराण्यातले+ जखऱ्‍या आणि मशुल्लाम. शिवाय, कुशल संगीतकार+ असलेले सगळे लेवी १३ ओझी वाहणाऱ्‍यांवर* अधिकारी होते. आणि ते सर्व प्रकारची कामं करणाऱ्‍यांवरही देखरेख करायचे. लेव्यांपैकी काही जण सचिव, अधिकारी आणि द्वारपाल म्हणून सेवा करायचे.+

१४ यहोवाच्या मंदिरात गोळा झालेला पैसा ते जेव्हा बाहेर काढत होते,+ तेव्हा हिल्कीया याजकाला यहोवाने मोशेद्वारे दिलेलं+ नियमशास्त्राचं पुस्तक सापडलं.+ १५ नंतर हिल्कीया हा सचिव शाफानला म्हणाला: “मला यहोवाच्या मंदिरात नियमशास्त्राचं पुस्तक सापडलंय.” मग हिल्कीयाने ते पुस्तक शाफानला दिलं. १६ शाफान ते पुस्तक घेऊन राजाकडे गेला आणि त्याला म्हणाला: “तुमच्या सेवकांना जी कामं नेमून देण्यात आली होती, ती सगळी ते करत आहेत. १७ त्यांनी यहोवाच्या मंदिरातला सगळा पैसा जमा केलाय, आणि तो मंदिराच्या दुरुस्तीचं काम पाहणाऱ्‍या माणसांना आणि कामगारांना दिलाय.” १८ सचिव शाफानने राजाला असंही सांगितलं: “हिल्कीया याजकाने मला एक पुस्तक दिलंय.”+ मग शाफान ते पुस्तक राजासमोर वाचू लागला.+

१९ नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेली वचनं ऐकताच राजाने दुःखी होऊन आपले कपडे फाडले.+ २० मग राजाने हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम,+ मीखाचा मुलगा अब्दोन, सचिव शाफान आणि राजाचा सेवक असाया यांना असा हुकूम दिला: २१ “जा, आणि हे जे पुस्तक सापडलंय त्यात लिहिलेल्या वचनांविषयी माझ्या वतीने, तसंच यहूदा आणि इस्राएलमध्ये उरलेल्या लोकांच्या वतीने यहोवाला विचारा. कारण आपल्या पूर्वजांनी यहोवाचं ऐकलं नाही. या पुस्तकात जे लिहिलंय त्यानुसार ते वागले नाहीत आणि म्हणून आता यहोवाचा क्रोध आपल्यावर खूप भडकणार आहे.”+

२२ तेव्हा हिल्कीया आणि त्याच्यासोबत राजाने ज्यांना पाठवलं होतं, ते सगळे हुल्दा संदेष्टीकडे गेले.+ हुल्दा ही वस्त्र-भांडाराची देखरेख करणाऱ्‍या शल्लूमची बायको होती. (शल्लूम हा तिकवाचा मुलगा आणि हरहसचा नातू होता.) हुल्दा यरुशलेमच्या उपनगरात राहायची. राजाने पाठवलेले लोक तिकडे जाऊन तिच्याशी बोलले.+ २३ ती त्यांना म्हणाली: “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, की ‘ज्या माणसाने तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय त्याला जाऊन असं सांगा: २४ “यहोवा म्हणतो, ‘मी या जागेवर आणि इथे राहणाऱ्‍या लोकांवर संकट आणीन.+ यहूदाच्या राजासमोर जे पुस्तक वाचण्यात आलंय, त्यात लिहिलेले सगळे शाप मी त्यांच्यावर आणीन.+ २५ कारण त्यांनी मला सोडून दिलंय.+ ते इतर देवांना बलिदानांचं हवन करत आहेत आणि आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तूंनी मला संताप आणत आहेत.+ म्हणून या जागेवर माझा क्रोध भडकेल आणि तो शांत होणार नाही.’”+ २६ पण ज्या यहूदाच्या राजाने तुम्हाला यहोवाकडे चौकशी करायला पाठवलंय, त्याला असं सांगा, की “तू जी वचनं ऐकलीस,+ त्यांबद्दल इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: २७ ‘या जागेविषयी आणि इथल्या लोकांविषयी मी जे बोललो, ते ऐकून तू देवासमोर नम्र झालास आणि आपलं हृदय कोमल केलंस. तू माझ्यासमोर नम्र झालास आणि आपले कपडे फाडून माझ्यापुढे रडलास. म्हणून मी यहोवा म्हणतो, की मी तुझा धावा ऐकलाय.+ २८ आणि त्यामुळे तू जिवंत आहेस तोपर्यंत मी या जागेवर आणि इथल्या लोकांवर संकट आणणार नाही. तू तुझ्या पूर्वजांकडे जाशील;* तू शांतीने आपल्या कबरेत जाशील.’”’”+

मग, त्या लोकांनी हा संदेश राजाला येऊन सांगितला. २९ तेव्हा योशीया राजाने निरोप पाठवून यहूदा आणि यरुशलेम इथल्या सगळ्या वडीलजनांना बोलावून घेतलं.+ ३० त्यानंतर यहूदातले सगळे पुरुष, यरुशलेमचे सर्व रहिवासी, याजक व लेवी अशा सर्व लहानमोठ्या लोकांना सोबत घेऊन राजा यहोवाच्या मंदिरात गेला. मग त्याने यहोवाच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या पुस्तकातली सगळी वचनं त्यांच्यासमोर वाचली.+ ३१ मग योशीया आपल्या जागी उभा राहिला आणि त्याने यहोवासमोर असा करार केला,*+ की तो यहोवाच्या सांगण्यानुसार चालेल आणि त्याच्या आज्ञा, स्मरण-सूचना* व कायदे यांचं पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने पालन करेल;+ तसंच, या पुस्तकात लिहिलेल्या कराराच्या सर्व वचनांप्रमाणे तो वागेल.+ ३२ शिवाय, त्याने यरुशलेम आणि बन्यामीन इथल्या सगळ्या लोकांना तो करार पाळण्याचं प्रोत्साहन दिलं. आणि यरुशलेमचे लोक आपल्या पूर्वजांच्या देवाच्या कराराप्रमाणे वागू लागले.+ ३३ योशीयाने मग इस्राएलच्या संपूर्ण प्रदेशातून सगळ्या घृणास्पद वस्तू* काढून टाकल्या.+ आणि त्याने इस्राएलमधल्या सगळ्या लोकांना त्यांचा देव यहोवा याची सेवा करायलाही मदत केली. योशीयाच्या संपूर्ण जीवनकाळात इस्राएली लोक आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याच्या मार्गांपासून भरकटले नाहीत.

३५ मग योशीयाने यरुशलेममध्ये यहोवासाठी वल्हांडण सण साजरा करण्याची व्यवस्था केली.+ आणि पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी+ त्यांनी वल्हांडणाचा पशू कापला.+ २ योशीयाने याजकांना यहोवाच्या मंदिरात सेवा करायला नेमलं आणि ती सेवा करण्याचं त्यांना प्रोत्साहन दिलं.+ ३ मग, सगळ्या इस्राएली लोकांना शिक्षण देणारे, म्हणजे यहोवासाठी पवित्र असलेले लेवी+ यांना योशीया म्हणाला: “यापुढे तुम्हाला कराराची पवित्र पेटी खांद्यांवर वाहून न्यावी लागणार नाही.+ तुम्ही ती इस्राएलचा राजा दावीद याच्या मुलाने, शलमोनने बांधलेल्या मंदिरात ठेवा.+ आणि तुमचा देव यहोवा व त्याचे इस्राएली लोक यांची सेवा करा. ४ इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा मुलगा शलमोन यांनी लिहून ठेवलेल्या सूचनांनुसार,+ तुम्ही आपापल्या घराण्यांप्रमाणे आणि आपापल्या गटांप्रमाणे सेवेसाठी तयार व्हा.+ ५ तुम्ही पवित्र ठिकाणी आपापल्या गटांप्रमाणे उभे राहा; आपल्या भाऊबंदांच्या प्रत्येक घराण्यासाठी लेव्यांच्या घराण्यातला एक गट असेल अशा प्रकारे तुम्ही उभे राहा. ६ मग वल्हांडणाचा पशू कापा,+ स्वतःला शुद्ध करा आणि यहोवाने मोशेद्वारे दिलेली आज्ञा तुमच्या भाऊबंदांना पाळता यावी, म्हणून त्यांच्यासाठी तयारी करा.”

७ त्यानंतर, तिथे हजर असलेल्या सगळ्या लोकांना वल्हांडणाची बलिदानं अर्पण करता यावीत, म्हणून योशीयाने त्यांना नर कोकरांचे आणि बकऱ्‍यांच्या नर पिल्लांचे कळप दिले; त्याने त्यांना एकूण ३०,००० जनावरं दिली. याशिवाय त्याने त्यांना ३,००० बैलसुद्धा दिले. ही सगळी जनावरं राजाने स्वतःच्या संपत्तीतून दिली.+ ८ तसंच अधिकाऱ्‍यांनीसुद्धा लोकांना, याजकांना आणि लेव्यांना स्वेच्छेने दान दिलं. खऱ्‍या देवाच्या मंदिराच्या कामाचं नेतृत्व करणाऱ्‍यांनी, म्हणजे हिल्कीया,+ जखऱ्‍या आणि यहीएल यांनीही याजकांना वल्हांडणाचे २,६०० पशू आणि ३०० बैल दिले. ९ कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल, तसंच लेव्यांचे प्रमुख हशब्याह, ईयेल आणि योजाबाद यांनीसुद्धा लेव्यांना वल्हांडणाचे ५,००० पशू आणि ५०० बैल दिले.

१० अशा प्रकारे सगळी तयारी पूर्ण झाली. मग राजाच्या आज्ञेनुसार याजक आपापल्या जागी आणि लेवी आपापल्या गटांप्रमाणे उभे राहिले.+ ११ मग त्यांनी वल्हांडणाचे पशू कापले.+ आणि याजकांनी लेव्यांकडून जनावरांचं रक्‍त घेऊन ते वेदीवर शिंपडलं.+ त्या वेळी लेवी हे जनावरांची कातडी काढत होते.+ १२ मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे यहोवाला होमार्पणं देता यावीत, म्हणून लेव्यांनी होमार्पणांची तयारी केली आणि आपापल्या घराण्यांप्रमाणे उभे असलेल्या लोकांना ती दिली. त्यांनी बैलांच्या बाबतीतही हेच केलं. १३ मग, रिवाजाप्रमाणे त्यांनी वल्हांडणाच्या पशूचं मांस भाजलं.+ तसंच त्यांनी पातेली, हंड्या आणि कढया यांत पवित्र अर्पणं शिजवली. त्यानंतर त्यांनी ते सगळं लगेच लोकांकडे आणलं. १४ नंतर त्यांनी स्वतःसाठी आणि याजकांसाठी तयारी केली. कारण याजक, म्हणजे अहरोनचे वंशज हे रात्र होईपर्यंत होमार्पणं देण्यात आणि जनावरांची चरबी अर्पण करण्यात गुंतले होते. म्हणून लेव्यांनी स्वतःसाठी आणि याजकांसाठी, म्हणजे अहरोनच्या वंशजांसाठी सर्व तयारी केली.

१५ दावीद, आसाफ,+ हेमान आणि राजासाठी दृष्टान्त पाहणारा यदूथून+ यांनी देऊन ठेवलेल्या आज्ञेप्रमाणे, गायक असलेली आसाफची+ मुलं आपापल्या जागी उभी होती.+ तर द्वारपाल वेगवेगळ्या दरवाजांजवळ उभे होते.+ या सगळ्यांना आपलं काम सोडून जावं लागलं नाही. कारण त्यांच्या भाऊबंदांनी, म्हणजे लेव्यांनी त्यांच्यासाठी सगळी तयारी करून ठेवली होती. १६ अशा रितीने, त्या दिवशी वल्हांडण सण साजरा करण्यासाठी+ आणि यहोवाच्या वेदीवर होमार्पणं देण्यासाठी, योशीया राजाच्या आज्ञेवरून यहोवाच्या सेवेची सगळी तयारी करण्यात आली.+

१७ त्या वेळी तिथे हजर असलेल्या सगळ्या इस्राएली लोकांनी वल्हांडण सण साजरा केला, आणि सात दिवस बेखमीर* भाकरीचा सण साजरा केला.+ १८ शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून आतापर्यंत इस्राएलमध्ये कधीही असा वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता. तसंच योशीया राजा, याजक व लेवी यांनी आणि त्या वेळी हजर असलेल्या यहूदा, इस्राएल आणि यरुशलेम इथल्या सर्व लोकांनी जसा वल्हांडण सण साजरा केला, तसा इस्राएलच्या इतर कोणत्याही राजाने साजरा केला नव्हता.+ १९ हा वल्हांडण सण योशीया राजाच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी साजरा करण्यात आला.

२० हे सगळं घडल्यावर, म्हणजे योशीयाने मंदिराविषयीची सगळी तयारी केल्यावर, इजिप्तचा राजा नखो+ हा फरात नदीजवळ असलेल्या कर्कमीश इथे युद्ध करायला आला. तेव्हा योशीया त्याच्याशी लढायला गेला.+ २१ म्हणून नखोने आपल्या दूतांच्या हातून त्याला असा निरोप पाठवला: “हे यहूदाच्या राजा! तू माझ्याशी लढायला का येतोस? आज मी तुझ्याशी नाही, तर दुसऱ्‍या राष्ट्राशी लढायला निघालोय. आणि देवाने मला लवकर जायला सांगितलंय. देव माझ्यासोबत आहे. तू देवाच्या विरोधात जाऊ नकोस, कारण यातच तुझं भलं आहे. नाहीतर तो तुझा नाश करेल.” २२ पण, योशीयाने माघार घेतली नाही. तो आपला वेष बदलून+ नखोशी लढायला गेला. देवाने नखोद्वारे जे सांगितलं होतं, ते योशीयाने ऐकलं नाही. आणि तो मगिद्दोच्या+ मैदानात त्याच्याशी लढायला गेला.

२३ मग तिरंदाजांनी योशीया राजाला बाण मारून जखमी केलं. तेव्हा तो आपल्या सेवकांना म्हणाला: “मी खूप जखमी झालोय, मला इथून घेऊन जा.” २४ म्हणून मग त्याच्या सेवकांनी त्याला रथातून उतरवलं आणि त्याच्या दुसऱ्‍या एका युद्ध-रथातून त्याला यरुशलेमला परत आणलं. अशा प्रकारे, योशीयाचा मृत्यू झाला आणि त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरेत दफन केलं.+ मग यहूदाच्या आणि यरुशलेमच्या सगळ्या लोकांनी त्याच्यासाठी शोक केला. २५ यिर्मयाने+ योशीयासाठी शोकगीत गायलं. आणि आजही सर्व गायक व गायिका+ त्यांच्या शोकगीतांत योशीयाचा उल्लेख करतात. तसंच, इस्राएलमध्ये शोकगीतं गायली जावीत असंही ठरवण्यात आलं. ही गीतं शोकगीतांच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहेत.

२६ योशीयाबद्दलची बाकीची माहिती आणि यहोवाच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याने एकनिष्ठ प्रेम दाखवणारी जी कामं केली त्यांबद्दलची माहिती; २७ तसंच, त्याने जे काही केलं त्याबद्दलची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी माहिती, इस्राएलच्या आणि यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे.+

३६ त्यानंतर, देशातल्या लोकांनी योशीयाचा मुलगा यहोआहाज+ याला त्याच्या वडिलांच्या जागी यरुशलेममध्ये राजा बनवलं.+ २ यहोआहाज राजा बनला तेव्हा तो २३ वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममधून तीन महिने राज्य केलं. ३ पण इजिप्तच्या राजाने त्याला यरुशलेममधल्या त्याच्या राज्यपदावरून काढून टाकलं, आणि देशावर १०० तालान्त* चांदी आणि एक तालान्त सोनं इतका दंड लावला.+ ४ याशिवाय, इजिप्तच्या राजाने यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला यहूदा आणि यरुशलेमचा राजा बनवलं, आणि त्याचं नाव बदलून यहोयाकीम असं ठेवलं. पण नखो+ त्याच्या भावाला, म्हणजे यहोआहाजला मात्र इजिप्तला घेऊन गेला.+

५ यहोयाकीम+ राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता, आणि त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. तो आपला देव यहोवा याच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ ६ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर+ याने त्याच्यावर हल्ला केला, आणि त्याला तांब्याच्या दोन बेड्यांनी बांधून बाबेलला नेलं.+ ७ शिवाय, नबुखद्‌नेस्सरने यहोवाच्या मंदिरातली काही भांडीही बाबेलला नेली आणि ती आपल्या राजमहालात ठेवली.+ ८ यहोयाकीमबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली घृणास्पद कामं आणि त्याच्यात दिसून आलेल्या वाईट गोष्टी, यांबद्दलची सगळी माहिती इस्राएलच्या आणि यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. मग त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोयाखीन हा राजा बनला.+

९ यहोयाखीन+ राजा बनला तेव्हा तो १८ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममधून तीन महिने आणि दहा दिवस राज्य केलं. तो यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ १० मग वर्षाच्या सुरुवातीला,* नबुखद्‌नेस्सर राजाने यहोयाखीनला बाबेलमध्ये आणण्यासाठी आपल्या काही सेवकांना पाठवलं.+ तसंच, त्याने त्यांना यहोवाच्या मंदिरातल्या मौल्यवान वस्तूही आणायला सांगितल्या.+ त्यानंतर त्याने यहोयाखीनच्या वडिलांचा भाऊ सिद्‌कीया याला यहूदाचा आणि यरुशलेमचा राजा बनवलं.+

११ सिद्‌कीया+ राजा बनला तेव्हा तो २१ वर्षांचा होता. त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ १२ आपला देव यहोवा याच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. यहोवाच्या आज्ञेवरून बोलणाऱ्‍या यिर्मया संदेष्ट्यासमोर तो नम्र झाला नाही.+ १३ ज्या नबुखद्‌नेस्सर राजाने त्याला देवाच्या नावाने शपथ घ्यायला लावली होती, त्याच्याविरुद्धही त्याने बंड केलं.+ त्याने आपली अडेल वृत्ती व मनाचा कठोरपणा सोडला नाही. आणि इस्राएलचा देव यहोवा याच्याकडे तो परत आला नाही. १४ याजकांच्या सगळ्या प्रमुखांनी आणि लोकांनीही फार मोठ्या प्रमाणावर देवाचा विश्‍वासघात केला. त्यांनी इतर राष्ट्रांच्या घृणास्पद चालीरितींचं अनुकरण केलं आणि यहोवाने यरुशलेममध्ये पवित्र केलेलं त्याचं मंदिर अशुद्ध केलं.+

१५ त्यांच्या पूर्वजांचा देव यहोवा याला आपल्या निवासस्थानाबद्दल आणि आपल्या लोकांबद्दल कळवळा असल्यामुळे, तो त्याच्या दूतांद्वारे त्यांना वारंवार ताकीद देत राहिला. १६ पण ते खऱ्‍या देवाच्या दूतांची थट्टा करत राहिले.+ त्यांनी देवाचे शब्द तुच्छ लेखले+ आणि त्याच्या संदेष्ट्यांची निंदा केली.+ ते सुधारण्याच्या पलीकडे गेले, आणि शेवटी यहोवाचा क्रोध त्याच्या लोकांवर भडकला.+

१७ म्हणून देवाने खास्दी लोकांच्या राजाला त्यांच्यावर हल्ला करायला लावलं.+ त्या राजाने येऊन त्यांच्या तरुण मुलांना पवित्र ठिकाणी+ तलवारीने मारून टाकलं;+ तरुण-तरुणी, म्हातारे किंवा आजारी अशा कोणावरही त्याने दया केली नाही.+ देवाने सगळं काही त्याच्या हाती दिलं.+ १८ त्याने खऱ्‍या देवाच्या मंदिरातली छोटी-मोठी अशी सगळी भांडी; तसंच, यहोवाच्या मंदिरातला आणि राजाचा व अधिकाऱ्‍यांचा सगळा खजिना बाबेलला नेला.+ १९ त्याने खऱ्‍या देवाचं मंदिर जाळून टाकलं,+ यरुशलेम शहराच्या भिंती पाडल्या,+ सगळे मजबूत बुरूज जाळून टाकले आणि सगळ्या मौल्यवान गोष्टींचा नाश केला.+ २० जे तलवारीपासून वाचले, त्यांना तो बाबेलला बंदी बनवून घेऊन गेला.+ आणि पर्शियाचं शासन सुरू होईपर्यंत+ ते त्याचे आणि त्याच्या मुलांचे सेवक बनून राहिले.+ २१ यहोवाने यिर्मयाद्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं म्हणून हे सगळं घडून आलं.+ आणि शब्बाथाच्या वर्षांची परतफेड होईपर्यंत देश ओसाड पडून होता;+ देश ओसाड पडून होता त्या काळात, म्हणजे ७० वर्षं पूर्ण होईपर्यंत देशाने विसावा घेतला.+

२२ यहोवाने यिर्मयाद्वारे बोललेले शब्द पूर्ण व्हावेत म्हणून,+ पर्शियाचा राजा कोरेश+ याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी, यहोवाने त्याचं मन प्रेरित केलं. तेव्हा, राजाने आपल्या संपूर्ण राज्यात एक घोषणा केली आणि त्याने ती लेखी रूपातही पाठवली.+ ती घोषणा अशी होती: २३ “पर्शियाचा राजा कोरेश म्हणतो, ‘स्वर्गाचा देव यहोवा याने पृथ्वीवरची सगळी राज्यं माझ्या हातात दिली आहेत+ आणि त्याने मला यहूदातल्या यरुशलेममध्ये त्याच्यासाठी एक मंदिर बांधण्याची आज्ञा दिली आहे.+ म्हणून, त्याच्या लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल, त्याने तिथे जावं. आणि त्याचा देव यहोवा त्याच्यासोबत असो.’”+

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “देवाकडे मार्गदर्शन मागायची.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

किंवा “घोडेस्वार.”

किंवा “घोडेस्वार.”

किंवा “मिसरमधून.”

किंवा कदाचित, “कळपचे कळप इजिप्त आणि कोवा देशातून विकत घ्यायचे; राजाचे व्यापारी कोवामधून ते विकत घ्यायचे.” कोवा हे कदाचित किलिकिया असावं.

म्हणजे, अर्पणाच्या भाकरी.

चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.

एक कोर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.

एक बथ म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.

लाकडं एकमेकांना जोडून पाण्यातून जाण्यासाठी तयार केलेलं एक साधन.

शब्दार्थसूची पाहा.

प्रमाण मापानुसार ‘एक हात’ म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). पण काहींचं असं म्हणणं आहे, की ‘जुनं माप’ हे ‘लांब हात’ या मापाला सूचित करतं; हे माप ५१.८ सें.मी. (२०.४ इंच) इतकं होतं. अति. ख१४ पाहा.

काही जुन्या हस्तलिखितांमध्ये “१२०” असं लिहिण्यात आलंय, तर काही इतर हस्तलिखितांमध्ये आणि भाषांतरांमध्ये “२० हात” लिहिण्यात आलंय.

शब्दशः “मोठं घर;” हे कदाचित मंदिरातल्या पवित्र स्थानाला सूचित करत असावं.

किंवा “मोठ्या फळ्या बसवल्या.”

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

म्हणजे, पवित्र स्थानाकडे होती.

किंवा “दक्षिणेकडे.”

किंवा “उत्तरेकडे.”

म्हणजे, “तो [अर्थात, यहोवा] कायमचं स्थापित करो.”

कदाचित याचा अर्थ, “त्याच्यात सामर्थ्य आहे” असा असावा.

किंवा “पाण्याचा मोठा हौद.”

सुमारे ७.४ सें.मी. (२.९ इंच). अति. ख१४ पाहा.

किंवा “लिलीच्या फुलासारखा.”

एक बथ म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.

एक प्रकारची समई.

किंवा “पाण्याच्या हातगाड्या.”

म्हणजे, मंडपांचा सण.

किंवा “मंदिर.”

एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

म्हणजे, अशी शपथ जी खोटी असली किंवा पूर्ण केली नाही तर शाप लागतो.

किंवा “दुःख सोसायला.”

किंवा “तुझ्या नावलौकिकाविषयी.”

शब्दशः “न्याय दे.”

शब्दशः “न्याय दे.”

किंवा “या ठिकाणाबद्दल.”

शब्दशः “तुझे डोळे उघडे असू दे.”

हे कदाचित लेव्यांना सूचित करत असावं.

किंवा “हमाथच्या प्रवेशापासून.”

सणाच्या नंतरचा दिवस, किंवा १५ वा दिवस.

किंवा “उद्‌घाटन.”

किंवा “पुन्हा बांधली.”

किंवा “तात्पुरत्या आश्रयांचा.”

किंवा “सुसंघटित.”

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

किंवा “कोडी घालून.”

किंवा “लवाजमा.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तुमच्या शब्दांबद्दल.”

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “तिने त्याच्यासाठी जितक्या भेटवस्तू आणल्या होत्या, तितक्याच किंमतीच्या भेटवस्तूही त्याने तिला दिल्या.”

एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.

हिब्रू शास्त्रवचनांत, एक मिना म्हणजे ५७० ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

किंवा “घोडेस्वारसुद्धा.”

म्हणजे, फरात नदी.

शब्दशः “शलमोन आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वडीलजनांशी.”

शब्दशः “निवडलेले.”

शब्दशः “खऱ्‍या देवाच्या माणसाला.”

किंवा “मजबूत भिंती असलेल्या.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पांगापांग केली.”

शब्दशः “धावणाऱ्‍यांच्या.”

शब्दशः “निवडलेले.”

शब्दशः “निवडलेले.”

म्हणजे, कायमचा आणि न बदलणारा करार.

किंवा “तरणा बैल.”

म्हणजे, अर्पणाची भाकर.

एक प्रकारची समई.

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.

शब्दशः “संख्येने जास्त.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “तुमचे हात गळू देऊ नका.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पूर्णपणे समर्पित मनाने.”

किंवा “मजबूत करू लागला; पुन्हा बांधू लागला.”

किंवा “मजबूत करायचं; पुन्हा बांधायचं.”

किंवा “मजबूत केली; पुन्हा बांधली.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पूर्णपणे यहोवाला समर्पित असतं.”

किंवा “त्यांना मदत करायला.”

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

असं दिसून येतं, की ही आग आसाचा मृतदेह जाळण्यासाठी नाही, तर सुगंधी मसाले जाळण्यासाठी पेटवण्यात आली होती.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “कर.”

किंवा “सोयरीक केली.”

किंवा “त्याचं मन वळवलं.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “शिंगांनी त्यांना हुंदडत राहाल.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “शांतीने.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पूर्णपणे समर्पित अंतःकरणाने.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “मऊनी.”

हा मृत समुद्र असावा.

शब्दशः “बीज.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “धीर धरता येईल.”

म्हणजे, “आशीर्वाद.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “इतर दैवतांसोबत वेश्‍येसारखी कृत्यं करायला लावली.”

किंवा “लोकांना इतर दैवतांसोबत वेश्‍येसारखी कृत्यं करायला लावलीस.”

याला अहज्या असंही म्हटलं आहे.

२इति २१:१७ मध्ये याला यहोआहाज म्हटलं आहे.

शब्दशः “मुलगी.”

किंवा “आजारी असल्यामुळे.”

काही हिब्रू हस्तलिखितांमध्ये याला “अजऱ्‍या” म्हटलं आहे.

शब्दशः “मुलगा.”

सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.

कदाचित देवाचं नियमशास्त्र असलेली गुंडाळी.

किंवा कदाचित, “सगळ्यांनी दान देईपर्यंत.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “त्यांच्याविरुद्ध साक्ष.”

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, जखऱ्‍याचे वडील.

म्हणजे, सीरियाच्या लोकांनी.

किंवा “आजारी.”

किंवा “मुलाचं.” कदाचित आदर देण्यासाठी अनेकवचन वापरण्यात आलं आहे.

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

याला अहज्या असंही म्हटलं आहे.

सुमारे १७८ मी. (५८४ फूट). अति. ख१४ पाहा.

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजल्यानंतर.”

किंवा “कर.”

भिंतीच्या बाजूला बांधलेला टेकावा.

अतिशय उंच इमारत.

किंवा “कापून काढल्या,” कदाचित खडकातून.

किंवा “पठारी.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

ही जमीन शाही कबरींच्या शेजारी असावी असं दिसतं.

अतिशय उंच इमारत.

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

एक कोर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

किंवा “ओतीव मूर्ती.”

शब्दार्थसूचीत “गेहन्‍ना” पाहा.

किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळली.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

किंवा “शिट्टी वाजवतो.”

किंवा “दुर्लक्ष करण्याची.”

किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळायला.”

म्हणजे, अर्पणाची भाकर.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मंदिरातल्या सेवेची तयारी करण्यात आली.”

शब्दशः “धावणारे.”

किंवा “कृपाळू.”

शब्दशः “लोकांचं मन एक व्हावं.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “बरं केलं.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “यहोवाचा नियम पाळण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करता येईल.”

किंवा “दशांश.”

किंवा “जेवणाच्या खोल्या.”

किंवा “दशांश.”

किंवा “मिल्लोही.” या हिब्रू शब्दाचा अर्थ “भर घालणं” असा होतो.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “बॅबिलॉनच्या.”

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “अग्नीतून पार केलं.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “खड्ड्यांत पकडलं.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “ओतीव मूर्ती.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “ओतीव मूर्तीही.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “बीम.”

किंवा “सामान्य मजुरांवर.”

काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.

किंवा “पुन्हा करार केला.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मूर्ती.”

शब्दार्थसूची पाहा.

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

कदाचित, वसंत ऋतूत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा